Saturday, December 27, 2025
Home Blog Page 5770

युपीए अध्यक्षा सोनिया गांधींनी बोलविली विरोधी पक्षांची बैठक; उद्धव ठाकरे, शरद पवार राहणार उपस्थित

नवी दिल्ली । संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (युपीए) अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कष्टकरी वर्ग, कामगारांच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी  २२ मे रोजी विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे. सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक होणार आहे. या बैठकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी देखील सहभागी होणार आहे. राष्ट्रवादीकडून शरद पवार, अजित पवार तर शिवसेनेकडून उद्धव ठाकरे, संजय राऊत उपस्थित राहणार आहेत. यांव्यतिरिक्त या बैठकीसाठी १७ पक्षांनी सहमती दर्शविली आहे. पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी या देखील उपस्थित राहणार आहेत. मात्र, सपा आणि बसपाचे नेते उपस्थित राहणार की नाही याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.

‘या’ ३ प्रमुख मुद्द्यांवर होणार बैठकीत चर्चा
कामगार कायदा सुधारणा, स्थलांतरीत मजूर आणि फेरीवाले या ३ मुद्दयांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. भाजपशासित राज्यांकडून कामगार कायद्यात बदल केले जात आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरात सरकारने कामगार कायद्यात सुधारणा करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे कामगार कायदा आणि स्थलांतरीत मजूर आणि फेरीवाल्यांच्या समस्या या तीन मुद्द्यांवर सोनिया गांधी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे समविचारी पक्षांसोबत चर्चा करणार आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

कौतुकास्पद! मस्जिदीची जागा दिली कोरोना संशयित रुग्णांच्या अलगाव साठी

पुणे | दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. महाराष्ट्रातील रुग्णसंख्या दिवसागणिक वाढते आहे. पुणे, मुंबई या शहरांमध्ये अधिकाधिक रुग्ण सापडत आहेत. प्रशासन आपल्यापरीने संक्रमण आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या धर्तीवर भारतभर असंतोष वाढला होता. एक विशिष्ट जमात जाणीवपूर्वक हा आजार पसरवण्यासाठी कार्यरत असल्याच्या अफवा सर्वत्र पसरल्या होत्या. पण पुणे शहरात या सगळ्याच्या विरुद्ध झाले आहे. मस्जिदीची जागा अलगाव साठी देऊन मुस्लिम बांधवानी एकतेचे उदाहरण घालून दिले आहे.

पुणे शहरातील आझम कॅम्पस मधील मस्जिदीतील वरच्या मजल्यावरील ९ हजार चौरस फूट अलगाव साठी देण्यात आली आहे. तसेच सर्व सुविधाही पुरविण्यात आल्या आहेत. सध्या पुणे शहरातील ६० संशयित रुग्णांना या ठिकाणी अलगाव साठी ठेवण्यात आले आहे. या मस्जिदीच्या व्यवस्थापनाने ही जागा देण्याचा प्रस्ताव आपणहून जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला होता. शहरातील रुग्णांची वाढती संख्या पाहता हा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडून स्वीकारण्यात आला. आझम कॅम्पस च्या पूर्व भागात ही  मस्जिद असून तिच्या वरच्या मजल्यावर एक मोठी सभागृहासारखी जागा आहे. ही जागा स्वच्छ करून प्रशासनाला देण्यात आली आहे.

तसेच इथे अलगाव साठी असणाऱ्या सर्व रुग्ण आणि बंदोबस्तातील पोलीस कर्मचारी यांच्या नाश्ता जेवणाची सोयही येथील व्यवस्थापनाने केली आहे. सामाजिक समता आणि एकतेचा संदेश देत. या मस्जिदीच्या व्यवस्थानाने सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे. विनाकारण वाढणारा हिंदू-मुस्लिम द्वेष बाजूला सारून बांधिलकीचा हात बळकट केला आहे.

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी महाराष्ट्रात राष्ट्रपती शासन लागू करा! सुब्रमण्यम स्वामींचा फुकटचा सल्ला

नवी दिल्ली । महाराष्ट्रातील कोरोनामुळे तयार झालेली सध्याची स्थिती पाहता तिथे राष्ट्रपती शासन लावणे हाच एक मार्ग असल्याचे भाजपचे राज्यसभा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी म्हणाले आहेत. कोरोनाला आळा घालण्यास उद्धव ठाकरे असमर्थ आहेत. अशावेळी राष्ट्रपती शासन लागू करणे हाच एकमेव पर्याय उरतो असे ते म्हणाले.

इतकेच नव्हे तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आत्ताच महाआघाडी तोडावी अन्यथा काँग्रेस आणि राष्ट्रवादी उद्धव ठाकरेंचं राजकारण संपवून टाकतील असा इशाराही त्यांनी राष्ट्रपती शासन लागू कारण्यासोबत ट्विटरवर देऊन टाकला आहे. आता महाविकास आघाडीचे नेते या सर्वाला कसे प्रत्युत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून प्रमुख विरोधी पक्ष भाजप राज्यातील गंभीर होत चालेल्या कोरोना परिस्थितीवरून राज्य सरकारवर टीका करत आहेत. कालच राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी ‘महाराष्ट्र बचाव’ची भूमिका घेऊन राज्यपालांना निवेदन देण्यात आल्याचं सांगितलं. आम्हाला राजकारण करायचं नाही. पण जनतेच्या वेदना मांडल्या नाही तर जनतेला न्याय मिळणार नाही. त्यामुळे ‘महाराष्ट्र बचाव’च्या माध्यमातून सरकारला टप्प्याटप्प्याने जागं करणार आहोत. यात कुणाला राजकारण वाटलं तरी आम्हाला त्याची पर्वा नाही, असंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

छोट्या दुकानदारांसाठी खुशखबर! फेसबुक लवकरच लॉंच करणार ऑनलाईन स्टोअर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातील सर्वात मोठे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या फेसबुकने नुकतेच ‘Facebook Shops’ या नावाने नवीन सर्व्हिस सुरू करणार असल्याचे जाहीर केले आहे. कंपनीचे सीईओ तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या मार्क झुकरबर्ग याने याबाबतची माहिती दिली आहे. तो म्हणाला की,’ या नवीन सुविधेच्या माध्यमातून दुकानदार फेसबुकवर आपले दुकान सेट करू शकतील आणि त्यांच्या स्वत: च्या पध्दतीने वस्तू तिथे दाखवू शकतील. फेसबुक याविषयी म्हणतो की, ‘या उपक्रमाचे उद्दीष्ट लहान तसेच मध्यम स्वरूपाच्या व्यावसायिकांना ऑनलाइन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणे हे आहे, जेणेकरून सध्याच्या या संकटाच्या परिस्थितीत ते आपले संरक्षण करू शकतील.

Privacy Matters: Facebook Shops - About Facebook

Facebook Shops कसे काम करेल – यामध्ये फेसबुक शॉप्सद्वारे एकच ऑनलाइन स्टोअर तयार केले जाईल जे फेसबुक आणि इंस्टाग्राम दोन्ही वर उपलब्ध असेल.

(१) याच्या चेकआउट फीचरद्वारे In -App शॉपिंग करता येईल, तर त्याच्या मेसेजिंग फीचरच्या माध्यमातून ग्राहक या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध व्यापाऱ्यांसह व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्राम डायरेक्टच्या माध्यमातून चॅट करु शकतील.

(२) मार्क झुकरबर्ग पुढे म्हणाला की, ‘ आम्ही आणखी सात ऑनलाइन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मशी जोडून आपल्या प्लॅटफॉर्मवर जास्तीत जास्त व्यापारी आणि प्रोडक्ट्सना एकत्र जोडण्याचा प्रयत्न करीत आहोत.

(३) झुकरबर्ग पुढे म्हणाला की,’ ही दुकानं तुम्ही याचे फेसबुक पेज तसेच इन्स्टाग्राम प्रोफाइल यांवर पाहू शकाल. ते स्टोरीज मधूनही दिसू शकतात किंवा जाहिरातींमधूनही पाहता येऊ शकतील.

(४) व्यवसायासाठी उपलब्ध असलेल्या वस्तू या दुकानांत दिसून येतील आणि युझर्स या वस्तूंची खरेदी किंवा ऑर्डर देऊ शकतील. फेसबुकने गेल्याच वर्षी फोटो शेअरिंग अ‍ॅप ,इन्स्टाग्राम आणि मेसेजिंग अ‍ॅप तसेच व्हॉट्स अ‍ॅपवर काही मर्यादित शॉपिंग पर्याय दिलेले होते. फेसबुकचा हा नवा उपक्रम त्याला विस्तार देताना दिसत आहे.

(५) कंपनीचा असा विश्वास आहे की यामुळे युझर्सची ग्रोथ कमी झाली असूनही कंपनीचे प्लॅटफॉर्म अधिक व्यवसाय करण्यात अनुकूल असेल आणि यामुळे कंपनीच्या महसुलात आणखी वाढ दिसून येईल.

(६) कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी एका लाइव स्ट्रीमिंगमध्ये म्हटले आहे की,’ या साथीच्या काळात अर्थव्यवस्थेची पुनर्बांधणी सुरू करण्यासाठी ई-कॉमर्सचा विस्तार करणे महत्त्वाचे ठरेल.

Facebook tried to fight $5B FTC fine, is ready to fight antitrust ...

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Lockdown Impact | स्वयंपाकाचे काम करणाऱ्या मैना हजारा करत आहेत नाला सफाईचे काम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात सर्वत्र कोरोनामुळे संचारबंदी असल्याने तळहातावर पोट असणाऱ्यांसमोर जीवन मरणाचा प्रश्न उभा राहिला आहे. अनेकांच्या रोजगारावर लॉकडाऊनमुळे गंभीर परिणाम झाला असून त्यांच्या हाताचे काम गेले आहे. शहरी भागात स्वयंपाकाचे काम करणाऱ्या महिलांवर देखील यामुळे मोठी समस्या ओढवली असून कोरोना संसर्गाच्या भीतीने कोणीही कामावर बोलावत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. दिल्ली येथे स्वयंपाकाचे काम करणाऱ्या मैना हजारा यांच्यावर कोरोनामुळे प्रथमच स्वच्छतेचे काम करण्याची वेळ आली आहे.

अनेकांच्या हाताला काम नाही. कुणी काम द्यायला तयार नाही अशा अवस्थेत आपल्या दोन मुलांचा सांभाळ कसा करायचा, घरभाडे कुठून द्यायचे? अशा अनेक समस्यांमुळे स्वयंपाकाचे काम करणाऱ्या मैना हजारा या नाला स्वछतेचे काम करत आहेत. मी एकवेळ उपाशीपोटी झोपू शकते मात्र लहान मुलांना उपाशी? त्यामुळे आता मी हे काम करत आहे असे हजारा यांनी सांगितले आहे. कोरोनाच्या रुग्ण संख्येच्या वाढत्या प्रमाणात नागरिकांनी अधिक सुरक्षित आणि सतर्क राहण्याची गरज आहे. मात्र पोटाचा प्रश्न महत्वाचा हेच पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. चार पैशांसाठी जीवावर उदार होऊन कोणतेही काम करण्यासाठी हे कामगार तयार झाले आहेत.

दरम्यान, गेल्या दोन महिन्यापासून देशात सुरु असणाऱ्या संचारबंदीमुळे सर्वत्र काम बंद आहे. स्थलांतरित कामगार उदरनिर्वाहाचे साधन आणि सुरक्षा काहीच उपलब्ध नसल्याने आपापल्या घरी परतण्यासाठी धडपडत आहेत तर स्थानिक रोजंदारी कामगार कामाशिवाय अस्वस्थ जगत आहेत. सर्वत्र बंद असल्याने छोटे व्यावसायिक, घरकाम करणारे कामगार आणि इतर रोजंदारी कामगार काम नसल्याने पुढे काय करायचे या चिंतेत आहेत. जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार ४० ते ६० दशलक्ष लोक बेरोजगार होण्याची शक्यता आहे. या सर्वांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थलांतरित कामगारांसहित या लोकांचे प्रश्न ही तितकेच गंभीर आहेत.

कोणत्याही परिस्थितीत ‘तो’ भाग नेपाळच्या नकाशामध्ये आणूच; नेपाळचा भारताला इशारा

नवी दिल्ली । भारताने लिपूलेख पासपर्यंत बांधलेल्या मार्गावर नेपाळने आक्षेप घेतला असून मागील काही दिवसापासून नेपाळ या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत आहे. भारतीय हद्दीतील कालापानी-लिंपियाधुरा-लिपुलेक या प्रदेशावर नेपाळने आपला दावा केला आहे. यावर आक्रमक होत हे प्रदेश कोणत्याही परिस्थितीत नेपाळच्या नकाशामध्ये परत आणले जातील, अशा इशारा नेपाळचे पंतप्रधान के.पी.शर्मा ओली यांनी भारताला दिला. त्यानुसार आता नेपाळ लिपुलेख आणि कालापानी हा नेपाळचाच भाग असल्याचा नकाशा प्रकाशित करणार आहे. नेपाळच्या मंत्रिमंडळाच्या पार पडलेल्या बैठकीनंतर त्यांनी हा नकाशा प्रकाशित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर नेपाळच्या पंतप्रधानांनी हे भाग नेपाळच्या नकाशात सामिल करण्याचा पुनरूच्चार केला.

“आम्ही चर्चेमधून त्या प्रदेशावर आपलाच हक्क असल्याचे सांगण्याचे सर्व प्रयत्न करणार आहोत. जर यामुळे कोणालाही राग आला तरी आम्हाला त्याची काळजी नाही. त्या प्रदेशावर कोणत्याही परिस्थितीत आम्ही आमचा हक्क दाखवू भारतासोबत मैत्री अधिक दृढ करायची असेल तर ऐतिहासिक गैरसमज त्यापूर्वी दूर झाले पाहिजेत,” असं ओली  म्हणाले.

“कोणाच्याही दबावाखाली येऊन आम्ही हा मुद्दा उचलला नाही. नेपाळ केवळ त्यांच्याच प्रदेशावर दावा करत आमचं सरकार केवळ लोकांच्या भावनांचं प्रतिनिधीत्व करत आहे. कोणत्या तिसऱ्या पक्षाच्या सांगण्यावरून नेपाळ हे पाऊल उचलत आहे असं यापूर्वी भारतीय लष्कराच्या प्रमुखांनी सांगितलं होतं,” असंही ओली म्हणाले. “कालापानी, लिंपियाधुरा आणि लिपुलेख हे आमचेच प्रदेश आहेत आणि आम्ही ते परत घेऊच. भारतानं या ठिकाणी लष्कर बोलावून तो प्रदेश वादग्रस्त केला. भारतानं लष्कर तैनात केल्यानंतर या ठिकाणी नेपाळी लोकांच्या येण्याजाण्यावरही बंदी घातली. १९६० पासून या ठिकाणी भारतानं लष्कर तैनात केलं आहे,” असं त्यांनी नमूद केलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

भारतीय रेल्वेने जाहीर केल्या ‘या’ २० सूचना; तिकीट बुक करण्याआधी वाचायलाच हवं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील कोरोनाच्या संक्रमणास आळा घालण्यासाठी सुरु असलेला लॉकडाऊन आता आणखी वाढवण्यात आला आहे. दरम्यान, लॉकडाऊनच्या या चौथ्या टप्प्यामध्ये सर्वसामान्यांना दिलासा मिळावा म्हणून भारतीय रेल्वेने काही विशेष गाड्या सुरु केल्या आहेत. मात्र, आत्तापर्यंत या गाड्यांची सेवा सर्वसामान्यांसाठी पूर्णपणे चालू केलेली नाही. रेल्वेने १२ मेपासून दिल्ली ते देशातील वेगवेगळ्या राज्यात १५ जोड्गाडय़ा चालू केलेल्या आहेत. दरम्यान, केंद्राने हे देखील स्पष्ट केले आहे की ३१ मे पर्यंत कोणतीही ट्रेन किंवा हवाई सेवा सामान्यपणे सुरू करता येणार नाही. सध्या चालणार्‍या या विशेष गाड्यांमध्ये प्रवास करण्यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचनाही केल्या गेल्या आहेत. त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात …

रेल्वेच्या या २० मार्गदर्शक सूचना
– आरक्षित तिकिटे ऑनलाईन प्रक्रियेद्वारे केवळ IRCTC वेबसाइट www.irctic.co.in किंवा IRCTC Rail Connect मोबाइल अ‍ॅपद्वारे बुक करता येतील.

– रेल्वे स्थानकांच्या आरक्षणाच्या काउंटरवरुन तिकीट बुक होणार नाही.

– प्रवाशांना RAC तिकिटे दिली जाणार नाहीत किंवा प्रवासादरम्यानही कोणतीही तिकिटे दिली जाणार नाहीत.

– प्रवाशांना प्रवास सुरू होण्याच्या ९० मिनिटांपूर्वी स्टेशनवर पोहोचणे बंधनकारक असेल.

– कोरोनाची लक्षणे आढळली नाहीत तरच प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात येईल.

– जर ताप, खोकला किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर रेल्वे कर्मचार्‍याशी त्वरित संपर्क साधा.

– स्टेशनमध्ये प्रवेश करण्यापूर्वी फेस मास्क आणि संपूर्ण प्रवासात फेस कव्हर असणे बंधनकारक आहे.

– सर्व प्रवाश्यांनी आरोग्य सेतु हे अ‍ॅप डाउनलोड केलेच पाहिजे.

– हात धुवून नियमितपणे अल्कोहोल-आधारित सॅनिटायझर वापरा.

– प्रवासी त्यांच्याबरोबर अन्न आणि पाणी घेऊन यावे.

– प्रवाशांना किमान सामान घेऊन प्रवास करण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे.

– वापरलेला मास्क फक्त झाकण असलेल्या डस्टबिनमध्येच फेकला पाहिजे.

– इच्छित स्थळी पोहोचल्यानंतर प्रवाश्यांनी राज्या सरकारने जाहिर केलेल्या प्रोटोकॉलचे पालन केले पाहिजे.

विशेष गाड्यांमध्ये ३ लाख तिकिटे आरक्षित केली
रेल्वेने १२ मेपासून विशेष गाड्या सुरू केल्या आहेत. आतापर्यंत या गाड्यांमध्ये ३ लाख प्रवाश्यांनी तिकिटे बुक केली आहेत. रेल्वेच्या म्हणण्यानुसार पीआरएसअंतर्गत आतापर्यंत ५० कोटींपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की लॉकडाऊनमुळे रेल्वेचे कर्मचारी वेगवेगळ्या राज्यात अडकलेल्या स्थलांतरित मजुरांसाठी विशेष गाड्यादेखील चालवत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

… म्हणून ‘राज’ पुत्र अमित ठाकरेंनी लिहलं काका उद्धव ठाकरेंना पत्र

मुंबई । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सरकारला सूचना करतच असतात. राजकारणात नुकतेच पाऊल ठेवलेले त्यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी डॉक्टरांच्या मानधनाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात कोरोनाविरुद्धच्या लढाईत जीव धोक्यात घालून लढणाऱ्या डॉक्टर व नर्सेसच्या मानधनात कपात करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मनसेनं जोरदार आक्षेप घेतला आहे.

“कोरोनामुळे निर्माण झालेल्या वैद्यकीय आणीबाणीच्याकाळात ‘डॉक्टर हेच देव’ असल्याचा आपल्याला अनुभव येत आहे. विशेषत: राज्यातील शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांचे कितीही आभार मानले तरी ते अपुरेच ठरतील. त्यामुळे शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांच्या मानधनात कपात करणे कुठल्याही दृष्टीने पटणारे नाही” असे अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे.

राज्य सरकारचा सार्वजनिक आरोग्य विभाग व आरोग्य सेवा आयुक्तलयानं २० एप्रिल रोजी काढलेल्या आदेशानुसार, बंधपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मासिक मानधन ५५ हजार व ६० हजार असं निश्चित केलं आहे. त्यापूर्वी हे मानधन वेतन व भत्ते मिळून ७८ हजार इतके होते. मात्र, नव्या आदेशान्वये बंधपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांचं मानधन कंत्राटी सेवेच्या निकषावर निश्चित करण्यात आलं आहे. त्यामुळं त्यांच्या मानधनात २० हजार रुपयांची कपात झाली आहे. बंधपत्रित अधिपरिचारिकांच्या बाबतीतही असाच निर्णय घेण्यात आला आहे. डॉक्टर व परिचारिकांच्या मानधनातील ही कपात अन्यायकारक असल्याचं अमित ठाकरे यांनी पुढे पत्रात म्हटलं आहे.

सध्याच्या वैद्यकीय आणीबाणीच्या काळात डॉक्टर व परिचारिका अत्यंत मोलाची कामगिरी बजावत आहेत. हरियाणासारख्या राज्यात करोनाच्या काळात वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे मानधन दुप्पट करण्यात आलं आहे. महाराष्ट्र सरकारकडून तितक्या उदारपणाची अपेक्षा नसली तरी डॉक्टरांच्या वेतनात किंचितही कपात होणार नाही याची काळजी सरकारनं घेतली पाहिजे, अशी अपेक्षा अमित यांनी व्यक्त केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

पश्चिम विदर्भातील धरणांमध्ये ३५% जलसाठा; मागील वर्षीच्या तुलनेत २०% वाढ

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई

अमरावती विभागातील ५ जिल्ह्यामध्ये असलेले मोठे, मध्यम व लघु प्रकल्पात मागील वर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात या ५०९ पाणी प्रकल्पात केवळ १४.१५% फक्त जलसाठा हा शिल्लक होता. दरम्यान मागील वर्षी पावसाने दमदार हजेरी लावल्याने या वर्षी या प्रकल्पात मे महिन्यात ३५% जलसाठा शिल्लक असल्याने अमरावती विभागात पाणी टंचाई ची फार चणचण जाणवणार नाही.

अमरावती विभागात सर्वात मोठे जलसाठा प्रकल्प असलेल्या अमरावतीच्या अप्पर वर्धा धरनात मागील वर्षी १६.४३% असलेला जलसाठा यावर्षी मात्र ५१.१८% असल्याने अमरावती सह इतर भागातही पाणी कापतिची परिस्थिती ओढवली नाही. २०१८ मध्ये समाधानकारक पावसाळा झाला नसल्याने मागील वर्षी अमरावती विभागातील अनेक धरणाना कोरड लागण्याच्या मार्गावर असल्याने पाणी टंचाई चा भीषण प्रश्न निर्माण झाला होता.जनावरांनसाठी ,वन्यजीव व शेतीसाठी पाणी नसल्याने बळीराजा  काळजीत सापडला होता.परंतु मागील वर्षी पावसाने दमदार हजेरी लावल्याने विभागातील सर्वच प्रकल्पात जलसाठा हा मोठया प्रमाणावर साठवल्या गेला.

त्यामुळे या वर्षी पाणी टंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागले नाही.अमरावती विभागातील एकूण पाच जिल्ह्यातील मोठे ,मध्यम व लघु असे एकूण ५०९ पाणी प्रकल्प आहे.यामध्ये ९ मोठ्या प्रकल्पात सध्या 42.96% टक्के जलसाठा आहे..अमरावती शहरासह अनेक भागांना पाणी पुरवठा करणाऱ्या अप्पर वर्धा धरणाने मागील वर्षी तळ गाठला होता.मे महिन्यात या प्रकल्पात १६.४३% इतका जलसाठा होता.परन्तु या वर्षी सध्याप्रकल्पात५१.१८% जलसाठा आहे.मागील पाच वर्षांच्या तुलनेत यावर्षी हा जलसाठा सर्वाधीक आहे..

गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा हैदोस; ४ वाहने पेटवली

गडचिरोली । जहाल माओवादी सृजनाक्काला चकमकीत ठार मारल्यामुळे संतापलेल्या नक्षलवाद्यांनी आज गडचिरोलीत बंद पुकारला आहे. या बंद दरम्यान सर्व व्यवहार ठप्प राहावेत म्हणून नक्षलवाद्यांनी 3 वाहने पेटवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. नक्षलवाद्यांनी हा धुडगूस घातल्यामुळे येथील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री येथील राष्ट्रीय महामार्गावरील गजामेंढीच्या जवळ त्रिशूल पाँइटवर छत्तीसगडमधून आलेल्या रेती वाहतूक करणाऱ्या 3 ट्रकला नक्षलवाद्यांनी आग लावून दिली. सुदैवाने चालकाने ट्रकमधून पळ काढल्याने त्यांचा जीव बचावला. मात्र यात ट्रकचालकाचे ९० लाखांचे नुकसान झाले आहे.

या घटनेनंतर सावरगाव पोलिसांसह गडचिरोली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पेट्रोलिंग वाढवली. त्यानंतर या राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला असून धुडगूस घालणाऱ्या नक्षलवाद्यांचाही शोध घेण्यात येत आहे. दरम्यान, गडचिरोलीतील जनजीवन सुरळीत असून नक्षलवाद्यांच्या बंदचा फारसा परिणाम झाला नसल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.

नक्षलवाद्यांनी दिली गडचिरोली बंदची हाक
काही दिवसांपूर्वी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत जहाल माओवादी सृजनाक्का मारल्या गेली होती. त्यामुळे नक्षलवादी हादरून गेले होते. या घटनेच्या निषेधार्थ या माओवाद्यांनी २० मे रोजी गडचिरोली बंदची हाक दिली होती. त्यानुसार संपूर्ण जिल्ह्यात बंदचे पोस्टरही लावण्यात आले होते. मात्र, आज बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. अनेक ठिकाणी नेहमीप्रमाणे सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते. पण बंद यशस्वी होण्यासाठी नक्षलवाद्यांनी काल रात्रीपासूनच जिल्ह्यात दहशत निर्माण करण्यास सुरुवात केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”