Sunday, December 21, 2025
Home Blog Page 577

भाजपचा बालेकिल्ला चिंचवड विधानसभेत इच्छुकांमुळे बंडाळीची शक्यता

chinhwad assembly election 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कसब्याने मारलं पण चिंचवडने तारलं… पुण्यातल्या पोटनिवडणुकीतला हा कित्ता आपल्याला माहित असेल… अश्विनी जगताप आमदार झाल्या… आणि पुन्हा एकदा सिद्ध झालं की चिंचवड म्हटलं की फक्त भाजपच… नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेलाही चिंचवडनेच महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंना पडता पडता वाचवलय… त्यामुळे हे तर फिक्सय की महाराष्ट्राचं वारं पलटो ना पलटो… पण चिंचवडमध्ये महायुतीचाच आमदार डोळे झाकून निवडून येतोय… पण यात प्रॉब्लेम असा झालाय की आमदारकी एका पावलावर दिसत असल्यानं महायुतीतील अनेक इच्छुकांनी नुसतं रान तापवलंय… यामुळे येणाऱ्या काळात नाराजी, फोडाफोडी, कोलांट्या उड्या आणि बंडाळी असं सगळं काही चिंचवड विधानसभेत पाहायला मिळू शकतं… पण खरंच येणाऱ्या विधानसभेला चिंचवड मधून कोणाला उमेदवारी मिळेल? बंडाळी कोण करेल? आणि या सगळ्यातून कोणता उमेदवार विजयाचा झेंडा हाती धरेल? चिंचवड विधानसभेच्या इतिहास ते वर्तमान व्हाया पोटनिवडणूक असा सारा काही राजकीय सारीपाट पाहूयात

जगताप, काटे, नखाते, कलाटे ही आडनाव आहेत महायुतीतील सध्या विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची… पण चिंचवड मधूनच महायुतीच्या बाजूने निवडणूक लढवण्यासाठी सगळीच राजकीय मंडळी इतकी इच्छुक का आहेत? या प्रश्नाचं उत्तर शोधण्याच्या आधी आपल्याला इतिहासात डोकवावं लागतं…. साल 2009 चं… लोकसभेच्या पुनर्रचनेनंतर या नव्या कोऱ्या चिंचवड विधानसभा मतदारसंघाची स्थापना झाली… तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा शहराचा मुख्य चेहरा असणारे लक्ष्मण जगताप यांना अपक्ष निवडणूक लढवावी लागली…कारण आघाडीत जागा काँग्रेसला सुटली… त्यामुळे काँग्रेसकडून उभे राहिलेल्या भाऊसाहेब भोईर यांना धोबीपछाड देत अपक्ष उमेदवार लक्ष्मण जगताप हे आमदार झाले… यानंतर त्यांनी राजकारणात कधीच मागे वळून पाहिलं नाही… ते पुन्हा आपल्या मूळ पक्षात म्हणजे राष्ट्रवादीत गेले…

2012 च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला एकहाती सत्ता मिळवून दिली…. पण नंतर त्यांचं अनेक मुद्द्यांवरून पक्षासोबत बिनसलं… म्हणून 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचं तिकीट नाकारत त्यांनी शेकाप मनसे गटातून उमेदवारी अर्ज भरला… निवडणूक लढवली… पण त्यांचा पराभव झाला… पण यानंतर राजकारणाचं वारं पाहून त्यांनी भाजपशी सलगी करत 2014 ची पक्षाकडून चिंचवडची उमेदवारी मिळवली… आणि निवडणूक जिंकली सुद्धा… 2019 लाही सगळं काही सेम टू सेम… फक्त युती झाल्यामुळे तिकीट न मिळालेले शिवसेनेचे राहुल कलाटे नाराज झाले… त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला… राष्ट्रवादीनं त्यांना पुरस्कृत केलं… अत्यंत काट्याने काटा काढावा अशा झालेल्या या अटीतटीच्या लढतीत अखेर लक्ष्मण जगतापांनी विजयाची हॅट्रिक पूर्ण केली… आणि चिंचवडमध्ये राजकारणाचा नवा जगताप पॅटर्न अस्तित्वात आणला….

पण 3 जानेवारी 2023 रोजी आमदार लक्ष्मण जगताप यांचं दुर्धर आजाराने निधन झालं… चिंचवडच्या जागेसाठी पोटनिवडणूक लागली… तेव्हा काहीही झालं तरी भाजपचा हा गड जिंकणं पक्षासाठी महत्त्वाचा होता म्हणून जगतापांची पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली… तर महाविकास आघाडीने राहुल कलाटेंना डावलून नाना काटेंना उमेदवारी दिल्यामुळे कलाटे पुन्हा अपक्ष लढले… अत्यंत चुरशीच्या तिरंगी झालेल्या या पोटनिवडणुकीत अखेर अश्विनी जगताप यांनीच बाजी मारली… राहुल कलाटे यांनी घेतलेल्या मतांनी निकालाला कलाटणी मिळून आघाडीच्या नाना काटेंना इथं पराभवाचा धक्का बसला…

कट टू 2024. राष्ट्रवादीचे नाना काटे अजित दादांसोबत आहेत… राहुल कलाटे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली असली तरी त्यांनी आपली राजकीय भूमिका अद्या स्पष्ट केली नाही… येनवेळी ते शरद पवार गटाची तुतारी हाती घेत निवडणूक रिंगणात दिसतील असं काही राजकीय विश्लेषक सांगतायेत… पण आता मुख्य मुद्दा येतो तो महायुतीचा… भाजपच्या अश्विनी जगताप या इथल्या विद्यमान आमदार… पोट निवडणुकीनंतर आता मुख्य विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केलीये… त्यामुळे भाजपातील इच्छुक उमेदवारांच्या पोटात मोठा गोळा आलाय… त्यात पहिलं नाव येतं ते दिवंगत लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांचं… खरंतर पोटनिवडणुकीतच भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी ते इच्छुक होते.. पण उमेदवारी अश्विनी जगताप यांना जाहीर झाल्यानंतर नाराज शंकर जगताप काही तास नॉट रिचेबल देखील होते… पण पुन्हा त्यांनी पोटनिवडणुकीत भाजपाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती… त्यामुळे ते अगदी ठामपणे आपली उमेदवारी सध्या पक्ष श्रेष्ठींकडे मागतायेत… यासोबत शत्रुघ्न काटे आणि चंद्रकांत नखाते देखील उमेदवारीसाठी अडून बसलेत… या सगळ्यात तिकीट कुणाला द्यायचं? यावरून महायुतीत मोठे घासाघीस होऊ शकते… यातल्याच एका नाराज उमेदवाराला गळाला लावून शरद पवार चिंचवड मधून निवडणूक लढवतील, अशी सध्या तरी मतदारसंघाची स्थिती आहे…

बाकी या मतदारसंघाच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचं झालं तर चिंचवड हा अनेक गावांचा मिळून तयार झालाय…. आयटीयन्स, उद्योजक, वाणिज्य व्यावसायिक असा मोठा वर्ग इथे राहतो…. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पगडा असला तरी याच मतदारसंघात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकं नोकरीसाठी इथं स्थलांतरित झालेत. म्हणूनच पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक मतदार अशी या मतदारसंघाची ओळखय… उत्तर भारतीयांची ही संख्या इथे लक्षणीय असल्यामुळे हा भाजपचा कोअर मतदार आहे…. एका शब्दात सांगायचं झालं… तर भाजप चिंचवड मधून डोळे झाकून निवडून येईल… पण अजितदादा भाजपसोबत आल्याने नाना काटे काय भूमिका घेणार? शंकर जगतापांची नाराजी भाजपला परवडणारी आहे का? राहुल कलाटे पवारांची तुतारी हाती घेऊन निवडणुकीला यंदा तरी कलाटणी देतील का? तुम्हाला काय वाटतं? चिंचवडचा पुढचा आमदार कोण? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा

Mumbai News : मुंबईची वाढणार कनेक्टिव्हिटी ; भारतीय रेल्वे जोडणार 250 नवीन उपनगरी सेवा

Mumbai News : मुंबईच्या बाबतीत बोलायचे झाल्यास रेल्वे खूप महत्वाची भूमिका बजावते. लोकल ट्रेन्सचा वापर त्यातही प्रामुख्याने केला जातो. मुंबईची कनेक्टिव्हिटी वाढवण्याकडे रेल्वे प्रशासनाचा कल असून त्याच बाबतचा महत्वपूर्ण निर्णय भारतीय रेल्वे कडून घेण्यात आला आहे. भारतीय रेल्वेने पुढील पाच वर्षांसाठी मुंबईसाठी एक विशेष योजना आखली आहे, ज्यामध्ये 250 नवीन उपनगरी सेवा जोडल्या जाणार आहेत.

याशिवाय रेल्वे नेटवर्कमध्ये सुधारणा करण्यात येणार असून मुंबईतील रेल्वे प्रवास सुलभ करण्यासाठी नवीन मेगा टर्मिनल बांधण्यात येणार आहे.
याविषयी बोलताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की, मुंबई आणि त्याच्या उपनगरी भागातील वाहतूक सुधारण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून गाड्यांची ‘क्रॉस मूव्हमेंट’ कमी करण्यासाठी उपनगरीय नेटवर्कची पुनर्रचना करण्याचा रेल्वेचा मानस आहे.

दोन गाड्यांमधील अंतर कमी करण्याचा विचार

दोन गाड्यांमधील अंतर सध्याच्या 180 सेकंदांवरून 150 सेकंदांपर्यंत कमी करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान लागू करण्याचा रेल्वेचा विचार असल्याचे मंत्री म्हणाले. ते म्हणाले की, उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवा वेगळे करण्यावर अधिक लक्ष दिले जात आहे. “उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवांवर मोठे लक्ष दिले जात आहे,” असे वैष्णव यांनी स्पष्ट केले.

पनवेल-कळंबोलीत नवीन कोचिंग कॉम्प्लेक्स

मुंबईच्या उपनगरीय रेल्वे प्रणाली दररोज 3,200 सेवा चालवते, ज्यामध्ये 75 लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. कोस्टल रोडचा विकास आणि मुंबईत टप्प्याटप्प्याने मेट्रो रेल्वेच्या अंमलबजावणीमुळे देशाच्या आर्थिक राजधानीतील वाहतूक अधिक सुलभ होईल. याशिवाय, नवी मुंबईतील पनवेल-कळंबोली येथे एक नवीन कोचिंग कॉम्प्लेक्स बांधले जात आहे, ज्याचा वापर लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी टर्मिनल म्हणून केला जाईल.

पुण्यातही नवीन टर्मिनल

पुणे रेल्वे स्थानकावरील गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने हडपसर, उरुळी, खडकी आणि शिवाजीनगर येथे नवीन टर्मिनल बांधण्याचाही रेल्वेमंत्री वैष्णव यांनी उल्लेख केला.

अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 2,62,200 कोटींची तरतूद

केंद्रीय अर्थसंकल्प 2024 मध्ये रेल्वेसाठी 2,62,200 कोटी रुपयांच्या विक्रमी वाटपाची घोषणा रेल्वेमंत्र्यांनी केली. या रकमेपैकी 1,08,000 कोटी रुपये सुरक्षेशी संबंधित कामांसाठी खर्च केले जाणारआहेत. महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी 15,940 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची घोषणा रेल्वेमंत्री वैष्णव यांनी केली. राज्यात सध्या 81,000 कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू आहेत, ज्यामुळे रेल्वे नेटवर्कचे संपूर्ण विद्युतीकरण झाले आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. याव्यतिरिक्त, अमृत भारत स्टेशन इनिशिएटिव्ह अंतर्गत, रेल्वे संपूर्ण महाराष्ट्रात 128 स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे.

Mumbai Expresways : चौथ्या मुंबईला जोडण्यासाठी नव्या रस्त्यांची उभारणी? काय आहे MMRDA चा प्लॅन?

Mumbai Expresways : मुंबईच्या विकासासाठी अनेक महत्वाचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. त्यातही मुंबईकरांचा प्रवास हा जलद आणि ट्रॅफिकमुक्त व्हावा या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. आता यात आणखी एका प्रकल्पाची भर पडणार आहे. एम एम आर क्षेत्रातील मुंबई, नवी मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर अशी सर्व शहर महामार्गासोबत थेट जोडण्यात यावी यासाठी नव्या महामार्गाची योजना आखण्यात आली असून याला ” नवी मुंबई NH-3 व्हाया कल्याण बदलापूर प्रवेश नियंत्रण ” ( एक्सेस कंट्रोल ) (Mumbai Expresways) असे नाव देण्यात आले आहे

मिळालेल्या माहितीनुसार या रस्त्याच्या उभारणीबाबत एमएमआरडीए मुख्यालयात एक महत्त्वाची बैठक पार पडली यावेळी टाटा कन्सल्टिंग इंजिनियर कंपनीने सुचवलेल्या अनेक पर्यायावर तज्ञांशी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी संवाद साधला. तर टाटामार्फत यावेळी बदलापूर ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा रूट एक्सेस कंट्रोल मार्गासाठी चांगला पर्याय असल्याचं (Mumbai Expresways) निश्चित करण्यात आला आहे.

कसा असेल हा मार्ग ?

बदलापूर इथून जात असलेल्या मुंबई बडोदा राष्ट्रीय महामार्गाच्या इथून या रस्त्याची सुरुवात होणार आहे. याच मार्गावरन पुढे जात पालेगाव इथे मार्गाला पहिला इंटरचेंज मिळणार आहे. याद्वारे नागरिकांना अंबरनाथ शहरात तसेच काटई बदलापूर मार्गावर जाता येणार आहे. त्याच्यापुढे हा मार्ग कल्याण पूर्वेतून जात (Mumbai Expresways) असून मार्गावर हेदुटणे इथं मार्गाला दुसरा इंटरचेंज देण्यात येणार आहे. या मार्गावरील अत्यंत महत्त्वाचा हा इंटरचेंज असून इथून वाहन चालकांना मेट्रो बाराच्या हेडूटनेस्थानकात जाता येणार आहे. याशिवाय कल्याण रिंग रोडची कनेक्टिव्हिटी या मार्गावरून असणार आहे. कल्याण शेळफाटा मार्गावर देखील इथून जाता येणार आहे.

मुंबई- पुणे एक्सप्रेसवेला जाता येणार

याच्यापुढे शिरडून इथं या रस्त्यावरून मल्टी मोड कॉरिडॉर मार्गाला जाता येणाऱ्या या मल्टीमोड कॉरिडोर उभारण्याचं काम देखील जलद गतीने सुरू आहे. या कॉरिडोर मुळे थेट पुढे मुंबई- पुणे एक्सप्रेस वे ला जाता येणार आहे. शिवाय हाच मार्ग सीएसटी कोस्टल रोडलाही जोडला जाणार असून याद्वारे थेट नवी मुंबई (Mumbai Expresways) आंतरराष्ट्रीय विमानतळ गाठायला सोपं होणार आहे.

पनवेलला जाणं सोपं होणार

आता तिसरा इंटरचेंज असणार आहे तो शिरढोण इथे असणार असून कल्याण इथली 27 गाव इथं जोडली जाणार आहेत. तर ऊसाटणे इथून जाणाऱ्या राज्य महामार्गाला याची कनेक्टिव्हिटी असणार आहे. कामाच्या स्टेटस बद्दल बोलायचं झालं तर उसाटणे येथील रस्त्याचे काम प्रगतीपथावर असून पुढे मुंबई पनवेल हायवे (Mumbai Expresways) ला या मार्गाची जोडणी करण्यात येणार आहे. त्यामुळे पनवेलला जाणं सोपं होणार आहे.

त्याच्यापुढे हा मार्ग खारघर तुर्भे लिंक रोडला थेट जोडण्यात येणार असून या लिंक रोडची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. प्रत्येक उभारणीचे काम देखील लवकर सुरू होणार आहे. या लिंक रोड द्वारे नवीन मुंबई थेट जाता येणार (Mumbai Expresways) आहे तसेच मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ इथे जात येणार आहे.

समृद्धी महामार्गलाही जोडणार

मिळालेल्या माहितीनुसार बदलापूर इथून मुंबई बडोदा राष्ट्रीय महामार्गाला हा रस्ता जोडला जाणार असून याद्वारे नागरिकांना समृद्धी महामार्गाला जाता येणार आहे. त्यामुळे मुंबई ते डायरेक्ट नागपूर रस्त्याला हा मार्ग जोडला जाणार आहे. तर समृद्धी महामार्गाद्वारे पुढे मुंबई आग्रा हायवे इथे थेट जाता येणार आहे. त्यामुळे नाशिकच्या दिशेने सुद्धा प्रवास या महामार्गावरून (Mumbai Expresways) करता येणार आहे.

राज ठाकरेंची सर्वात मोठी घोषणा!! विधानसभेला “इतक्या’ जागा लढवणार

Raj Thackeray Vidhan Sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. राज्यात ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी विरुद्ध भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांची महायुती असा थेट सामना पाहायला मिळेल. त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. त्यानुसार, विधानसभा निवडणुकीत मनसे २२५ ते २५० जागा लढवणार आहे अशी मोठी घोषणा राज ठाकरेंनी (Raj Thackeray) केली आहे. राज ठाकरेंच्या या घोषणेमुळे महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्हीसमोर आव्हान उभं राहणार हे नक्की…..

आज वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात मनसेचा मेळावा पार पडला. यावेळी राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीचा रोडमॅपच मांडला. राज ठाकरे म्हणाले, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काही लोकं काही करून सत्तेत बसवायचे आहेत. अनेक लोकं हसतील. हसू दे. मला काही हरकत नाही. पण ती गोष्ट घडणार म्हणजे घडणार. सर्वच जण आम्ही तयारीला लागलो आहोत. विधानसभा निवडणुकीत युती होईल का जागा मिळतील का? असा निर्णय मनात आणून नका. आपण विधानसभेच्या २२५ ते २५० जागा लढवणार आहोत अशी माहिती राज ठाकरेंनी दिली.

आपण सर्व्हे करतोय पक्षातील काही लोकं पाठवून. पहिला सर्व्हे झाला,तुमच्या मतदारसंघात ते लोक येऊन गेलेत. आता पुढे ते लोक येऊन तुम्हाला भेटतील, तुमच्या इथली परिस्थिती त्यांना सांगा. निवडून येण्याची क्षमता असलेले, तयारी असलेल्यांनाच तिकीट देणार आहे. तिकीट मिळालं की पैसे काढायला मोकळा अशा लोकांना तिकीट देणार नाही असेही राज ठाकरेंनी स्पष्ट केलं. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 1 ऑगस्टपासून राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पावसाचा अंदाज घेऊन हा दौरा असेल. तसेच यावेळी ते पदाधिकाऱ्यांना भेटणार आहेत.

Lavasa Landslide : लवासामध्ये दरड कोसळली; 3-4 जण अडकल्याची शक्यता

Lavasa Landslide

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मुसळधार पावसामुळे लवासामध्ये असलेल्या दोन व्हिलांवर दरड कोसळल्याची (Lavasa Landslide) घटना घडली आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाल्याने हे दोन्ही व्हिला गाडले गेले आहेत. या घटनेमध्ये २ ते ४ जण बेपत्ता झाले आहेत. स्थानिक नागरिकांनी जिल्हा प्रशासनाला याबाबत माहिती दिली आहे. मागच्या वर्षी ईशराळवाडी येथेही अशीच भूस्खलनाची घटना घडली होती.

काही नागरिक अडकल्याची भीती – Lavasa Landslide

पुण्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार आणि धुव्वाधार पाऊस सुरु आहे. आजही अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचलं आहे. संपूर्ण पुणे शहराला समुद्राचं रूप आलं आहे. रेस्क्यू करून नागरिकांना बाहेर काढण्यात येत आहे. लवासा या ठिकाणी सर्वात जास्त म्हणजेच ४५३.५ मिली मिटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. याच पावसाच्या तडाख्यात लवासात भूस्खलन होऊन दरड (Lavasa Landslide) कोसळली. पुनर्वसित अशा रामनगरमध्ये दरड कोसळली. लवासातल्या काही बंगल्यांवर दरड कोसळल्याची माहिती आहे. या दरडीमध्ये काही नागरिक अडकल्याची माहिती आहे. तसेच जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुणे जिल्हाधिकारी आपत्ती व्यवस्थापन कक्षातून जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेत आहेत असं असलं तरी लवासा या ठिकाणी अजून पर्यंत प्रशासनाची कुठलीही मदत पोहचली नाही आहे.

प्रशासनाचा एकही कर्मचारी घटनास्थळी नाही त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, पुण्यामध्ये आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पावसाचा हाहाकार आणि पूरस्थिती लक्षात घेता जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. तसेच काही कामानिमित्तच घराबाहेर पद अन्यथा घरीच बस असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

ST Bus: लालपरी घडवणार आवडेल तिथे स्वस्तात मस्त प्रवास ; काय आहे योजना ? जाणून घ्या

ST Bus: हल्ली सगळ्यांकडे आपआपल्या खासगी गाड्या असतात. वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झालेली सुद्धा पाहायला मिळते. मात्र आजही राज्यातल्या गावखेड्यात लाल परी म्हणजेच राज्य परिवहन मंडळाची ST प्रवाशांसाठी मुख्य वाहन आहे. आजही राज्यातल्या अनेक दुर्गम भागात ST ची सेवा सुरळीत चालू आहे. मात्र मागच्या काही दिवसांपासून लाल परीचा प्रवासी हा लाल परी कडे पाठ फिरवताना दिसतो आहे. म्हणूनच एसटी महामंडळाकडून आपला प्रवासी परत आणण्यासाठीची धडपड सुरू आहे. त्यासाठी एसटी महामंडळाकडून (ST Bus) अनेक योजना देखील राबवण्यात येत आहेत. त्यातलीच एक योजना म्हणजे ‘आवडेल तिथे प्रवास’

ही योजना 1988 पासून राबवली जाते या योजनेअंतर्गत वर्षभरात 12 कोटी 27 लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. या योजनेअंतर्गत प्रवास करायचा असल्यास दहा दिवसांचा पास देण्यात येत होता मात्र 2006 पासून चार दिवसांचा पासही दिला जात आहे. दोन मे 2010 पासून दहा दिवसांचे पास बंद करून त्याऐवजी सात दिवसांचा पास देण्यात (ST Bus) येत आहे.

काय आहे सध्याची स्थिती ? (ST Bus)

सध्या जलद रातराणी, आंतरराज्य शहरी मिडी बस सेवा अंतर्गत चार दिवसांच्या पाससाठी प्रौढांसाठी 1170 रुपये तर शिवशाही आंतरराज्य करिता 1520 रुपये आकारले जातात. सात दिवसांच्या पाससाठी 2040 व 3,030 रुपये आकारले जातात. तर 2023 ते 2024 या आर्थिक वर्षात 89 हजार 89,633 ची विक्री झाली आहे. आणि त्यातून महामंडळाला 1 हजार 226 लाखांचं उत्पन्न (ST Bus) मिळालं आहे.

काय आहेत नियम ? (ST Bus)

आंतरराज्य वाहतुकीसाठी एसटी सेवा जिथे जाते तिथपर्यंत हे पास वैध राहणार आहेत. योजनेतील सर्व प्रकारचे पास महामंडळाच्या शहरी वाहतुकीत वैध राहतील. उच्च दर्जाच्या गाडीचा पास निम्न दर्जाच्या गाडीस वैध राहतील. पासची मुदत संपल्यानंतर परताना केला जाणार नाही. आवडेल तेथे कोठेही प्रवास पास योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या पासाच्या दिवसाची गणना ००.०० ते २४.०० अशी करण्यात येईल. साध्या सेवेचे (ST Bus) पास सर्व प्रकारच्या साध्या बसेससाठी (साधी, जलद, रातराणी, शहरी, यशवंती (मिडी) आंतरराज्य मार्गासह ग्राह्य राहतील.

Gold Price Today : सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण!! 2 दिवसात 5000 रुपयांनी स्वस्त

Gold Price Today 25 july

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय अर्थसंकल्पात मोदी सरकारने कस्टम ड्युटी 15 टक्क्यांवरून 6 टक्के केल्यानंतर सोन्याच्या किमती (Gold Price Today) दणकण आपटल्या आहेत. मागील २ दिवसात सोन्याच्या भावात तब्बल ५००० रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे सोने खरेदीदार ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आज ममल्टी कमोडिटी एक्सचेंजवर २४ कॅरेट १० ग्राम सोन्याचा दर 67842 रुपयांवर व्यवहार करत आहे. तर गुड रिटर्न नुसार, एक तोळा २४ कॅरेट सोन्याचा भाव ६९८२० रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

MCX वरआज सकाळी ९ वाजता सोन्याचा व्यवहार ६८१०० रुपयांपासून सुरु झाला. मात्र यानंतर सोन्याच्या किमतीत (Gold Price Today) घसरण पाहायला मिळाली. ११ वाजता सोन्याच्या किमतीनी ६७६८० रुपयांची निच्चांकी पातळी गाठली. मात्र यानंतर सोन्याचा भाव थोडयाफार प्रमाणात पुन्हा वाढला. सध्या १० ग्राम २४ कॅरेट सोने ६७८५० रुपयांवर व्यवहार करत आहे. प्रथमच सोन्याच्या किमती ७० हजारांच्या खाली गेल्याने ग्राहकवर्ग चांगलाच खुश झाला आहे. कारण आधीच सर्वत्र महागाई आहे मात्र सोन्याच्या किमती कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. तुम्ही घरबसल्या मिस्ड कॉलद्वारे सुद्धा सोन्या-चांदीची किंमत तपासू शकता. 22 कॅरेट सोन्याचे आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता.

गुड रिटर्न नुसार सोन्याचा भाव – Gold Price Today

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)-

पुणे- 64,000 रुपये
मुंबई – 64,000 रुपये
नागपूर – 64,000 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 69,820 रूपये
मुंबई – 69,820 रूपये
नागपूर – 69,820 रूपये

सोन्याची शुद्धता कशी तपासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

Railway Recruitment 2024 : रेल्वे विभागात 32,000 पदे भरणार; अश्विनी वैष्णव यांची लोकसभेत माहिती

Railway Recruitment 2024 Ashwini Vaishnaw

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रेल्वे मंत्रालय रेल्वे संरक्षण दलात (RPF) 32,000 पदे भरणार (Railway Recruitment 2024) आहे अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची लोकसभेत दिली आहे. आपल्या सरकारने रेल्वे विभागात 2014 ते 2024 पर्यंत 5.02 लाख नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या असून, 2004 ते 2014 या काळात यूपीए सरकारच्या कार्यकाळात 4.11 लाख नोकऱ्यांच देण्यात आल्या होत्या. म्हणजेच UPA सरकारच्या तुलनेत रेल्वे भरतीत 25 टक्के वाढ झाल्याचा दावा अश्विनी वैष्णव यांनी केला.

लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना अश्वीनी वैष्णव म्हणाले, 28 डिसेंबर 2020 ते 31 जुलै 2021 या कालावधीत सात टप्प्यांत 726 केंद्रांवर 211 शहरांमधील 1.26 कोटी उमेदवारांसाठी CBT आयोजित करण्यात (Railway Recruitment 2024) आली होती. त्याचप्रमाणे, 17 ऑगस्ट 2022 ते 11 ऑक्टोबर 2022 पर्यंत – एका महिन्यापेक्षा जास्त कालावधीच्या पाच टप्प्यांमध्ये – 191 शहरे आणि 551 केंद्रांमध्ये 1.1 कोटींहून अधिक उमेदवारांचे CBT द्वारे मूल्यांकन केले गेले. रेल्वे मंत्रालयाने या वर्षी विविध गट ‘क’ पदांसाठी वार्षिक कॅलेंडर सादर करून भरतीचे व्यवस्थापन कसे केले आहे त्यात सुधारणा केली आहे. अश्विनी वैष्णव यांनी लोको पायलट कर्मचाऱ्यांसाठी कामाची परिस्थिती सुधारण्याच्या उद्देशाने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत, तसेच ट्रेनच्या ऑपरेशनची सुरक्षा सुधारण्यावरही भर दिल्याचे सांगितलं.

32,603 ​​रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी – Railway Recruitment 2024

जानेवारी ते मार्च 2024 पर्यंत एकूण 32,603 ​​रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आल्या. यामध्ये RPF मध्ये असिस्टंट लोको पायलट, टेक्निशियन, सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल या पदांचा समावेश आहे. RPF कॉन्स्टेबलची भरती प्रक्रिया ही रेल्वे संरक्षण दलात सामील होण्यास उत्सुक असलेल्यांसाठी एक मोठी संधी आहे. सातव्या केंद्रीय वेतन आयोगानुसार (CPC), RPF कॉन्स्टेबलचे मूळ वेतन २१,७०० रुपयांपासून सुरू होते. तर त्यांचे एकूण वेतन 37,420 रुपये ते 44,460 रुपये असते.

निलंगा विधानसभा मतदारसंघात संभाजी पाटील निलंगेकरांची आमदारकी धोक्यात आलीय?

Nilanga assembly

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लातूर गेला… आता निलंगेकरांच्या हातून निलंगाही जातोय… होय… ज्या लातूरला भाजपचा बालेकिल्ला म्हटलं जायचं त्या लातूरच्या लोकसभेची जागा निवडून आणण्याची जबाबदारी ज्या भाजपचे विद्यमान आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या खांद्यावर देण्यात आली होती…त्यांच्याच मतदारसंघातून भाजपचा उमेदवार तब्बल 28 हजार मतांनी पिछाडीवर गेला… हा आकडा सांगतोय… भाजपच्या हातातून लातूर तर गेलाच…पण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत निलंगाही… दोन टर्मचे आमदार राहिलेले संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांचा येणाऱ्या विधानसभेला करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी काँग्रेसचे अनेक मोहरे सध्या समोर आलेत… लोकसभेतील निलंग्याचा काँग्रेसच्या बाजूने प्लस मध्ये जाणारा आकडा पाहता अनेक इच्छुकांना आमदारकीचे स्वप्न पडू लागलेत…तर दुसरीकडे लोकसभेच्या पराभवाचे क्लारिफिकेशन देत संभाजी पाटलांनी काहीही झालं तरी विधानसभेला आपणच निवडून येत असतोय… हे अगदी ठासून सांगितलंय… मग आता यातलं नेमकं खरं काय आणि खोटं काय? संभाजी पाटील निलंगेकरांची आमदारकी राहतेय की जातेय? निलंगा मतदार संघातील सामान्य जनतेचा कौल सध्या तरी कुणाच्या बाजूने दिसतोय? निलंग्यात निलंगेकर फॅक्टर राजकारणात अस्ताकडे कसा चाललाय?

लातूरच्या राजकारणात निलंगा विधानसभा हा नेहमीच इम्पॉर्टंट राहिलाय… निलंगेकर कुटुंबानं या मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व गाजवलं, असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही… याच निलंग्याने महाराष्ट्राला शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्यासारखा सुसंस्कृत मुख्यमंत्रीही दिला… ग्रामीण महाराष्ट्राची जाण आणि शिस्तप्रिय राजकारणी म्हणून त्यांचा उभ्या महाराष्ट्राला परिचय होता…2004 पर्यंत शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनीच एक दोन अपवाद वगळता निलंग्याची आमदारकी आपल्याजवळ ठेवली… पण 2004 च्या आसपास असं काही घडलं की निलंग्याच्या राजकारणात विखार पाहायला मिळाला… कौटुंबिक वादातून पाटील निलंगेकर घराण्यात राजकीय विस्तव पडला…. आणि तत्कालीन भाजप नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली तरुण – तडफदार शिवाजीरावांचा नातू संभाजी पाटील निलंगेकर याला भाजपकडून आमदारकीचं तिकीट दिलं… देशात पहिल्यांदाच एकाच घरात पाहायला मिळालेल्या आजोबा विरुद्ध नातू अशा या संघर्षात भाजपने संपूर्ण ताकद लावली… आणि मुख्यमंत्री राहिलेल्या… आणि तत्कालीन गृहमंत्री असलेल्या शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा त्यांच्याच नातूने पराभव केला… अर्थात ही राजकीय ठिणगी होती… याची धग पुढेही कायम राहिली…

2009 च्या निवडणुकीत आजोबांनी पुन्हा रिव्हर्स गिअर टाकत नातवाला पराभवाचा दणका दिला… पण 2014 ला शिवाजीराव पाटलांचं वय लक्षात घेता त्यांनी आपला मुलगा अशोक पाटील निलंगेकरांना काँग्रेसच्या तिकिटावर निवडणुकीच्या मैदानात उतरवलं…तर भाजपकडून अर्थात संभाजी पाटील निलंगेकर हे उमेदवार होते… अत्यंत अटीतटीच्या झालेल्या लढतीत काकाला पराभूत करून संभाजी पाटील निलंगेकरांनी पुन्हा आपलं वर्चस्व सिद्ध केलं… अगदी हाच कित्ता त्यांनी 2019 लाही गिरवला… थोडक्यात संभाजी पाटील निलंगेकर यांच्या राजकीय वर्चस्वाला नख लावणं वाटतं तितकं सोपं नाही… हे जणू त्यांनी दाखवून दिलं… फडणवीस सरकारच्या काळात कामगार मंत्री राहिलेल्या याच संभाजी पाटलांना नुकत्याच पार पडलेल्या लातूर लोकसभेची भाजप समन्वयकाची महत्त्वाची जबाबदारी दिली होती… यावरून त्यांच्या मतदार संघावर असणाऱ्या कंट्रोलचा अंदाज आपल्याला येऊ शकतो…

आजोबांना एकदा… तर काकांना दोनदा… पराभवाचं पाणी पाजणाऱ्या संभाजी पाटील निलंगेकरांनी संस्थात्मक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवर आपला होल्ड मिळवायला सुरुवात केली… पण सत्तेत महत्त्वाच्या पदांवर राहून देखील मतदार संघातील प्रश्नांना तडीस नेण्यात संभाजी पाटलांना काही यश आलेलं दिसत नाहीये… निलंग्यात असणारी बेरोजगारीची भीषणता, शिक्षण संस्थांची कमतरता, औद्योगिक प्रकल्पांचा अभाव आणि कायमचा भेडसावणारा पाणी प्रश्न या सगळ्यांमुळे संभाजी पाटील निलंगेकर यांच्याबाबत मतदारसंघात अँटी इनकंबनसी आहे, हे नाकारून चालणार नाही… त्याचंच रिफ्लेक्शन नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांतही दिसलं… संभाजी पाटील निलंगेकरांच्या मतदारसंघातूनच म्हणजेच निलंग्यातूनच 28 हजार मतांच्या पिछाडीवर भाजप उमेदवाराला राहावं लागलं… हा जितका भाजप नेतृत्वाचा पराभव होता… भाजपच्या उमेदवाराचा पराभव होता… तितकाच तो संभाजी पाटील निलंगेकरांचाही… म्हणूनच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत संभाजी पाटील निलंगेकरांची आमदारकी इथं काठावर आलीये….

2024 साठी महायुतीकडून या जागेसाठी संभाजी पाटील निलंगेकरच निवडणूक लढवतील, याबाबत नो डाऊट…. तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसकडून काका अशोक पाटील निलंगेकर सलग दोन टर्मच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी यंदा जोरदार फील्डिंग लावतील… यासोबत डॉ. अरविंद भातांबरे आणि अभय सोळुंके यांचीही नाव इच्छुकांच्या यादीत घेतली जातायेत… मात्र सतत दोन टर्म चे अपयश, मतदारसंघातील अगदी तुरळक जनसंपर्क यामुळे अशोक पाटील निलंगेकरांच्या नावावर यंदा काँग्रेस फुली मारू शकतो… तर दुसऱ्या बाजूला 2019 ला वंचितकडून चांगली लढत दिलेल्या भातांबरे हे नंतर काँग्रेसमध्ये आल्यामुळे त्यांना तिकीट मिळण्याचे सध्या जास्त चान्सेस वाटतायत… मतदार संघात लिंगायत, मुस्लिम, दलित समाजाची संख्या लक्षणीय असली तरी निलंग्यानं नेहमी मराठा उमेदवाराला आमदार केलं… त्यामुळे यंदा निलंगेकर घराण्यातून निलंग्याचा कौल भातांबरे यांच्या रूपानं लिंगायत समाजाकडे शिफ्ट होईल का? हे पाहणं फूट महत्वाचं आहे…

शेवटी मुद्दा राहतो तो फक्त वाऱ्याच्या अंदाजाचा… लोकसभेला संभाजी पाटील निलंगेकर मायनस मध्ये असले तरी त्यांचा मतदारसंघावर असणारा होल्ड सर्वांना माहिती आहेच… त्यात लोकसभेची निवडणूक वेगळ्या मुद्द्यांवर आणि विधानसभा वेगळ्या मुद्द्यांवर लढवली जाणार असल्यानं हा रिझल्ट आहे असा विधानसभेला पाहायला मिळेल, असं म्हणणं थोडं धाडसाच ठरेल… आपण कितीही नाकारलं तरी संभाजी पाटील निलंगेकरांचा तगडा जनसंपर्क, लोकांच्यात मिसळण्याची कला आणि अनेक छोट्या मोठ्या विकास कामांमुळे तेच या निवडणुकीत सरशी मारतील, असं चित्र सध्या तरी मतदारसंघात दिसतय… बाकी काँग्रेसला संभाजी पाटलांची विजयी हॅट्रिक रोखायची असेल तर संभाजी पाटलांच्या विरोधात तोडीस तोड सक्षम उमेदवार दिल्यास काँग्रेसचा हा बालेकिल्ला पक्षाला पुन्हा मिळू शकतो… पण काँग्रेसकडून उमेदवार कोण? हाच सध्यातरी निलंग्याच्या राजकारणातील एक्स फॅक्टर असणार आहे…. वन लाईन मध्ये सांगायचं झालं तर निलंग्यात आमदारकीचा कौल यंदा तरी फिफ्टी फिफ्टी पाहायला मिळतोय…पण त्यातही काँग्रेसनं माती न खाता नीट डाव टाकले तर यंदा भातांबरे आमदारकीच्या खुर्चीवर बसू शकतात, असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे…बाकी निलंग्यात संभाजी पाटील निलंगेकर पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध करतील की काँग्रेस निलंगेकरांच्या राजकीय लेगसीला धक्का देत सर्वसामान्य उमेदवाराच्या हातात सत्तेच्या चाव्या देतील? याबद्दल तुम्हाला काय वाटतं?

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा हाहाकार!! पहा कोणत्या शहरात काय परिस्थिती?

Maharashtra Rain Update

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार (Maharashtra Rain Update) पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक महत्वाची शहरे पाण्याखाली गेली आहेत. मुंबई, पुणे कोल्हापूर , चंद्रपूर मध्ये लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. नद्या-नाले ओसंडून वाहत आहेत. जगबुडी आणि नारंगी नदीला पुन्हा पूर आला आहे. कोल्हापुरातील पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. कोयना धरणातील पाणीसाठा ७५ टीएमसीवर पोहोचला आहे. रायगड जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. पुणे, पालघर, रायगड आणि ठाणे जिल्ह्यात शाळांना सुट्या सुद्धा देण्यात आल्यात.

मुंबई सह पश्चिम उपनगरात आज पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पश्चिम उपनगरात अंधेरी जोगेश्वरी मालाड गोरेगाव कांदिवली दहिसर तसेच सांताक्रुझ वांद्रे या परिसरामध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे अंधेरी सबवे बंद करण्यात आलाय आहे. मुंबई लोकलवर सुद्धा परिणाम पाहायला मिळत आहे. मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल १० ते १५ मिनिटे उशीराने धावत आहेत. पाऊस जर असाच पडत राहिला तर रेल्वेची वाहतूक काही प्रमाणात ठप्प होण्याची शक्यता आहे.

पुण्यास धुवाधार पाऊस – Maharashtra Rain Update

पुण्यात सुद्धा पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला. येत्या काही तासांत पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर खडकवासला धरणातून 40 हजार क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू होत आहे. तसेच पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचलं आहे. रेस्क्यू टीमच्या साहाय्याने नागरिकांना बाहेर काढण्यात येत आहे. पावसामुळे पुण्यातील ताम्हिणी घाटात मुळशी हद्दीमध्ये काही ठिकाणी तसेच माणगाव हद्दीत तीन ठिकाणी दरड कोसळून रस्त्यावर माती आलेली आहे. जेसीबी द्वारे बाजूला करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. तर दूसरीकडे पुणे-कोलाड रस्ता वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्यात आलेला आहे.

रायगडमध्येही पावसामुळं (Maharashtra Rain Update) जनजीवन विस्कळीत झालं आहे. महाडमध्ये सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्याचबरोबर, अंबा, कुंडलिका नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. या नद्यांचे पाणी शहरात शिरण्याची शक्यता आहे. त्यामुळं नगर प्रशासनाने भोंगा वाजवून नागरिकांने सतर्क केले आहे. कोल्हापुरात पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सातारा आणि सांगली जिल्ह्यातही पावसाची रिपरिप सुरूच आहे.