Saturday, December 20, 2025
Home Blog Page 578

देवेंद्रभौ, तुमची आकडेमोड चुलीत घाला; सामनातून टीकेची झोड

fadnavis sad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रातील मोदी सरकारने २३ जुलै रोजी अर्थसंकल्प मांडला. यावेळी सरकारकडून देशातील गरीब, मध्यमवर्गीय आणि शेतकरी वर्गाला खुश करण्यासाठी अनेक मोठमोठ्या घोषणा केल्या. मात्र महाराष्ट्रासाठी विशेष असं काहीही केंद्राने दिले नाही. मुंबई आणि महाराष्ट्राचे नावही अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात घेतलं नाही. यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करत आहेत. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधकांचे हे दावे खोडून काढत आकडेवारीचा संदर्भ दिला. परंतु आता याच आकडेवारीवरुन ठाकरे गटाने संताप व्यक्त करत थेट ‘देवेंद्रभौ, तुमची आकडेमोड चुलीत घाला’ असं म्हटलं आहे. सामना अग्रलेखातून फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली आहे.

सामना अग्रलेखात नेमकं काय म्हंटल?

निर्मलाताई ‘बजेट’ पेश करीत असताना महाराष्ट्रात देवेंद्रभौ फडणवीस हे हाती कागद-पेन्सिल घेऊन टिपणे काढीत होते (तसा फोटू प्रसिद्ध झाला आहे) व सर्व संपल्यावर ‘महाराष्ट्रावर अन्याय झाला नाही हो’ अशी बोंब त्यांनी ठोकली. त्यांच्या बोंबाबोंबीत मग इतरांनीही सहभाग घेतला. महाराष्ट्रावर धडधडीत अन्याय झाला असताना गुजरात व्यापारी मंडळाची ‘री’ ओढणारे देवेंद्रभौंचे महामंडळ म्हणजे आश्चर्यच आहे. महाराष्ट्राशी बेइमानी होत असताना त्या बेइमानीचे समर्थन करणे हा काही महाराष्ट्रधर्म नाही. महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्या अन्नदात्या शेतकयांसाठी काय दान मिळाले? केंद्रातले सरकार वाचवले, पण शेतकऱ्यांचे प्राण वाचवायला गुजरात व्यापारी मंडळ तयार नाही.

आंध्र, बिहारमधील लाखो कोटी रुपयांची कामे व ठेकेदारी, त्यातील कमिशन शेवटी गुजरातकडेच वळणार आहे व हे सर्व ओरपून झाल्यावर महाराष्ट्रात येऊन अमित शहा भ्रष्टाचार व नैतिकतेवर प्रवचन झोडणार आहेत. केंद्राला सर्वाधिक महसूल देणाऱ्या महाराष्ट्राला काय मिळाले हे सांगायला कोणी तयार नाही. महाराष्ट्राच्या तिजोरीत खडखडाट आहे. निधी वाटपावरून अजित पवार व देवेंद्रभींचे ‘लाडके भाऊ’ गिरीश महाजन यांच्यात खडाजंगी झाली. ‘आता पैसा जमा करण्यासाठी जमिनी विकू काय?’ असा त्रागा अर्थमंत्री अजित पवारांनी केला, पण उपमुख्यमंत्री फडणवीस केंद्रीय बजेटची आकडेमोड करीत बसले आहेत. निर्मलाताईंनी महाराष्ट्राच्या तोंडाला साफ पाने पुसली तरी गुजरातचे लवंग, इलायची, कतरी सुपारीचे पान चघळत ते पिचकाऱ्या मारीत आहेत. महाराष्ट्राच्या वाट्याला काय आले? कोणते उद्योग, कोणते प्रकल्प, कोणता निधी आला? शे-दोनशे कोटींचे चणे-फुटाणे फेकले असतील व त्यामुळे महाराष्ट्रातील चमच्यांना आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तर त्यांनी खुशाल त्यांचा शिमगा साजरा करावा.

महाराष्ट्रातून आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र खेचून गुजरातला नेले, महाराष्ट्राच्या जमिनी बुलेट ट्रेनच्या नावाखाली घेतल्या, उद्योग पळवले व त्या बदल्यात मराठी माणसाला काय दिले, तर एक दिल्लीचे पायपुसणे म्हणून काम करणारे टुकार – भिकार सरकार ! महाराष्ट्र हा देशाला सदैव देणारा आहे. महाराष्ट्र हा दाता आहे. निसर्गाने महाराष्ट्राची जडणघडण त्यासाठीच केली, पण गुजरात व्यापार मंडळाने महाराष्ट्राचे हे दात्याचे स्थान नष्ट करण्याचा अफझलखानी विडाच उचलला आहे. औरंगजेबाचा जन्म गुजरातमधील दाहोद येथे झाला. त्या मातीचा गुण-वाण सध्याच्या गुजरात व्यापार मंडळास लागला आहे व त्या गुणधर्मास जागून महाराष्ट्राची लूट सुरू केली आहे.

गुजरातच्या व्यापार मंडळाने स्वातंत्र्यपूर्व काळात ईस्ट इंडिया कंपनीस खंडणी देऊन आपले व्यापार-उद्योग वाचवले. आज तशाच खंडण्या देऊन दिल्लीतील डळमळीत खुर्च्या वाचवल्या जात आहेत. या खंडणीच्या खेळात देशाला काय मिळाले? महाराष्ट्राला काय मिळाले? जनतेने गुजरात व्यापार मंडळाचे बहुमत काढून घेतले, पण त्याची ना खंत ना खेद! सत्ता टिकविण्यासाठी देशाच्या अर्थसंकल्पाचा वापर करणारे नादान व्यापारी मंडळ म्हणून यांचा उल्लेख इतिहासात होईल. लोकसभा निकालाने पीडित बजेट पेश करून व्यापार मंडळाने आपण ईस्ट इंडिया कंपनीचे वारसदार असल्याचे सिद्ध केले. देवेंद्रभौ, तुमची आकडेमोड चुलीत घाला! असं म्हणत ठाकरे गटाने फडणवीस आणि भाजपवर निशाणा साधला आहे.

Dharmaveer Anand Dighe Divyang Yojana : दिव्यांगांसाठी नवी योजना!! दर महिन्याला 3000 रुपये मिळणार

Dharmaveer Anand Dighe Divyang Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माझी लाडकी बहीण आणि माझा लाडका भाऊ योजनेनंतर आता राज्यातील दिव्यांग नागरिकांसाठी नवी योजना सुरु झाली आहे. दिव्यांगांचे जीवनमान सुधारावे, त्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी महिला आणि बाल कल्याण योजनेअंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सुमारे 40 ते 80 टक्के दिव्यांग व्यक्तींसाठी ‘धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य’ योजनेतंर्गत (Dharmaveer Anand Dighe Divyang Yojana) एक रकमी अर्थसहाय्य करण्यात येत आहे. या योजनेनुसार 2024-25 ते सन 2028-29 या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये दिव्यांगांना दर महिन्याला एक ते तीन हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत केली जाणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कायमस्वरुपी रहिवासी असलेल्या दृष्टी नसलेले, कर्णबधीर, अस्थिव्यंग, मनोविकलांग व इतर प्रकारचे शारीरिक व्यंगत्व आलेल्या दिव्यांग व्यक्तींना सामान्य जीवन जगता यावे, योग्य औषधोपचार व आहार घेता यावा व व्यंगत्वामुळे अर्थार्जन आणि जीवनमान सुधारणांची संधी गमावल्यामुळे आलेले परालंबित्व कमी व्हावे, यासाठी ‘धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजना’ (Dharmaveer Anand Dighe Divyang Yojana) सुरू करण्यात येत आहे. या योजनेतंर्गत तब्बल ६० हजार दिव्यांग नागरिकांना आर्थिक लाभ मिळणार आहे. यासाठी दरवर्षी 111.83 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बृहन्मुंबई महानगरपालिका कार्य क्षेत्रात ही योजना राबविण्यात येत आहे.

किती रुपये मिळणार? Dharmaveer Anand Dighe Divyang Yojana

‘धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजना’ अंतर्गत वय वर्ष १८ वरील ४० टक्के दिव्यंगत्व आलेल्या व्यक्तींना दर महिन्याला १००० रुपये याप्रमाणे ६ महिन्याचे एकदम ६ हजार रुपये म्हणेजच वर्षाकाठी १२ हजार रुपये मिळतील. तसेच ८० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींना दर महिन्याला ३००० रुपये या हिशोबाने दर ६ महिन्यानंतर एकत्रित १८ हजार रुपये याप्रमाणे दरवर्षी ३६ हजार रुपये मिळतील. पुढील ५ वर्षासाठी हिआर्थिक मदत मिळेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सदर दिव्यांग व्यक्तीकडे पिवळे अथवा निळे वैश्विक ओळखपत्र (UIAD CARD) असणे आवश्यक आहे.

अर्ज कसा करायचा?

या योजनेसाठी अर्ज करायचा असल्यास तुम्हाला https://portal.mcgm.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. याठिकाणी योजनेसाठी पात्रतेचे निकष, योजनेच्या अर्टी, शर्ती, आवश्यक कागदपत्रे व अर्जाचा नमुना उपलब्ध आहे. सर्व कागदपत्रांसहित पूर्ण भरलेले अर्ज सर्व संबंधित विभाग कार्यालयात सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत जमा करावेत, असे आवाहन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी केले आहे.

Pune Rain Update : पुण्यात पावसाचा रेड अलर्ट!! शाळांना सुट्टी, गरज असेल तरच घराबाहेर पडा

Pune Rain Update

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात मागील ५ -६ दिवसांपासून पावसाची तुफान बॅटिंग (Pune Rain Update) बघायला मिळत आहे. अनेक ठिकाणी नद्यानाले ओसंडून वाहत आहेत तर अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पावसाच्या सततधारेमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. महाराष्ट्रातील एक महत्वाचे शहर आणि शिक्षणाचे माहेरघर मानलं जाणाऱ्या पुण्यात सुद्धा मुसळधार पाऊस सुरु आहे. हवामान विभागाने पुण्याला आज रेड अलर्ट दिला आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील शाळांना आज सुट्टी देण्यात आली आहे. पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करत म्हंटल की, पुणे शहरातील शाळांना २५ जुलै, २०२४ रोजी सुट्टी ! हवामान विभागाने येत्या काही तासांत पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात अतिमुसळधार पावसाचा (Pune Rain Update) इशारा दिला असल्याने (रेड अलर्ट) या भागातील शाळा २५ जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत. असं ट्विट मोहळ यांनी केल आहे.

पुण्यास मुसळधार पावसाचा इशारा – Pune Rain Update

दरम्यान, येत्या काही तासांत पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर खडकवासला धरणातून 40 हजार क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू होत आहे. तसेच पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळं नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी केले आहे.

पुणे शिवाय पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना सुद्धा आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मुंबईला आज पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. तर ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना देखील ऑरेंज अलर्ट दिला आहे.

MahaRERA : महारेरा घेणार राज्यातील 5,260 रिअल इस्टेट एजंटांसाठी 5वी परीक्षा

MahaRERA : महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी ॲथॉरिटी (MahaRERA) म्हणजेच महरेरा घर घेणाऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी प्रयत्नशील असते. म्हणूनच अलीकडेच महरेरा कडून रियल इस्टेट एजंट्सची पात्रता परीक्षा घेतली जाते. या पात्रता परीक्षेत पास झालेल्या एजंटनाच व्यवहार करण्याची परवानगी दिली जाते. आता महरेरा कडून 5,260 रिअल इस्टेट ची परीक्षा घेतली जाणार आहे. ही महरेरा कडून घेतली जाणारी पाचवी परीक्षा असणार आहे. ही परीक्षा 29 जुलै रोजी घेण्यात येणार आहे.

पुण्यातील 1,533 एजंट देणार परीक्षा

मिळालेल्या माहितीनुसार 5,260 उमेदवारांपैकी 3,081 मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर), 1,533 पुण्यातील, 518 नागपूरचे आहेत, असे महारेराने एका निवेदनात म्हटले आहे. महारेरा नुसार, आत्तापर्यंत चार बॅच परीक्षेला बसले आहेत आणि 9,295 रिअल इस्टेट एजंट्सनी ती पास केली आहे.
महारेराने जानेवारी 2023 मध्ये रिअल इस्टेट एजंटना प्रशिक्षण घेणे आणि नोंदणीचे विहित प्रमाणपत्र घेणे अनिवार्य केले होते. असे करण्यात अयशस्वी झाल्यास महारेरा अशा रिअल इस्टेट एजंटची नोंदणी निलंबित करेल असे सांगण्यात आले होते.

महाराष्ट्रात 47,000 एजंट नोंदणीकृत

संपूर्ण महाराष्ट्रात सुमारे 47,000 एजंट नोंदणीकृत आहेत. त्यापैकी 13,785 एजंटची नोंदणी नूतनीकरण न केल्यामुळे रद्द करण्यात आली आहे. एप्रिलमध्ये, महारेराने प्रशिक्षण आणि प्रमाणन आवश्यकतांचे पालन करण्यात अयशस्वी झालेल्या 20,000 हून अधिक एजंटची नोंदणी निलंबित केली होती.
“त्यांना रिअल इस्टेट क्षेत्रातील कामकाज पुन्हा सुरू करण्यासाठी अनिवार्य आवश्यकतांचे पालन करावे लागेल. सुरू केलेल्या कारवाईमुळे, आगामी परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांची संख्या मागील आवृत्तीत सुमारे 1,700 वरून 5,000 हून अधिक झाली आहे,” महारेरा एका निवेदनात म्हटले आहे.

“रिअल इस्टेट क्षेत्रात, ‘एजंट’ हा घर खरेदीदार आणि विकासकांसाठी महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे एजंट्सना RERA कायद्यातील तरतुदींची माहिती असणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे महारेराने एजंटांसाठी हे अनिवार्य केले आहे. प्रशिक्षण घेण्यासाठी, प्रमाणपत्र मिळविण्यासाठी परीक्षा उत्तीर्ण करा असे महरेरा कडून सांगण्यात आले आहे.

Cleaning Tips : काळाकुट्ट आणि दुर्गंधीयुक्त झालाय लादी पुसायचा मॉप ? वापरून पहा सोपी ट्रिक

Cleaning Tips : पारंपारिक पद्धतीने म्हणजे कापडाने किंवा अगदी आधुनिक पद्धतीने तुम्ही फरशी मॉपने पुसत असाल तरी सुद्धा फरशी पुसण्यासाठी वापरण्यात येणार कापड किंवा मॉपचं कापड हे कालांतराने वारंवार वापरून अतिशय मळकट आणि कळकट होऊन जाते. एवढेच नाही जर फरशी पुसल्यानंतर तुम्ही मॉप व्यवस्थित धुतला नाही आणि तो व्यवस्थित कोरडा केला नाही तर त्यातून कुबट वास सुद्धा यायला सुरुवात होते.

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पुरेसा सूर्यप्रकाश नसल्यामुळे या मॉपच्या कापडाला किंवा फरशीच्या कापडाला कुबट वास जास्तीचा जाणवायला लागतो. म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही काही ट्रिक्स तुम्हाला सांगणार आहोत जेणेकरून असा दुर्गंधी येणारा आणि काळा कुट्ट झालेला मॉप तुम्ही सहजरीत्या स्वच्छ (Cleaning Tips) करू शकाल चला तर मग जाणून घेऊया…

व्हिनेगर आणि बेकिंग सोडा (Cleaning Tips)

आपल्याला माहितीच असेल की व्हिनेगर आणि बेकिंग सोडा ह्या गोष्टी किचनमध्ये (Cleaning Tips)जेवण बनवण्या व्यतिरिक्त स्वच्छतेच्या कामासाठी सुद्धा चांगल्या प्रकारे वापरता येऊ शकतात. जर तुमच्या मॉपचं कापड सुद्धा वारंवार वापरून काळ पडलं असेल आणि त्यातून दुर्गंधी येत असेल तर असा मग स्वच्छ करण्यासाठी सर्वात आधी एका मोठ्या टॉप मध्ये उकळलेलं गरम पाणी घ्या. या गरम पाण्यामध्ये व्हाईट विनेगर घाला. त्यानंतर त्यामध्ये बेकिंग सोडा घाला आणि या द्रावणात हा घाण झालेला मॉप किमान अर्धा तास तरी भिजत ठेवा. अर्ध्या तासानंतर हा मॉप साबण आणि पाण्याने स्वच्छ (Cleaning Tips)
धुऊन घ्या. अशा प्रकारे काळाकुट्ट झालेला मॉप अगदी चुटकीसरशी स्वच्छ करू शकाल.

कापड कधी बदलाल? (Cleaning Tips)

खरंतर वारंवार फरशी पुसल्यामुळे मॉपच्या कापडाला धूळ आणि इतर घाण चिकटून ते कापड खराब होऊन जाते. आपण कितीही धुतलं तरी ते स्वच्छ दिसत नाही. मॉपचे कापड हे एका ठराविक काळानंतर बदलणं आवश्यक असतं. दर दोन ते तीन महिन्यातून एकदा हे मॉपच्या खालचं (Cleaning Tips)
कापड बदलणं गरजेचं आहे

Railways Insurance : काय सांगता…! भारतीय रेल्वे देते केवळ 45 पैशांमध्ये 10 लाखांचा विमा ?

Railways Insurance : भारतामध्ये स्वस्तात मस्त प्रवासाचे साधन म्हणून रेल्वेला मोठी पसंती आहे. म्हणूनच देशभरात लाखो लोक रोज रेल्वेने प्रवास करणे पसंत करतात. रेल्वे विभागाकडूनही प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक योजना चालवल्या जातात. याच योजनांपैकी एक महत्वाची योजना म्हणजे रेल्वेचा विमा. खरंच रेल्वे विभागकडून केवळ 45 पैशांमध्ये 10 लाखांचा विमा मिळतो ? चला जाणून घेउया…

खरंतर रेल्वे प्रवास विम्याचा लाभ फक्त त्या प्रवाशांनाच मिळतो ज्यांनी तिकीट खरेदी करताना विमा घेतला आहे. या विम्याचा हप्ता फक्त 45 पैसे आहे. महत्वाचं म्हणजे रेल्वे प्रवास विमा अशा प्रवाशांसाठी उपलब्ध आहे जे ऑनलाइन रेल्वे तिकीट बुक करतात. तिकीट काउंटरवरून तिकीट बुक केल्यास रेल्वे प्रवास विमा उपलब्ध नाही. तसेच जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही ही सुविधा मिळत (Railways Insurance) नाही. हा विमा ऐच्छिक आहे. म्हणजे घ्यायचे की नाही हे प्रवाशांवर अवलंबून असते.

10 लाखांचे विमा संरक्षण (Railways Insurance)

रेल्वे प्रवास विम्याच्या बाबतीत, विमा कंपनी रेल्वे अपघातात प्रवाशाने झालेल्या नुकसानीची भरपाई करते. रेल्वे अपघातात प्रवाशाचा मृत्यू झाल्यास 10 लाख रुपयांची विमा रक्कम दिली जाते.एखादा रेल्वे प्रवासी अपघातात पूर्णपणे अपंग झाला तरी कंपनी त्याला 10 लाख रुपये देते. कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 7.5 लाख रुपयांची विमा रक्कम उपलब्ध आहे. त्याच वेळी, दुखापत झाल्यास, उपचार खर्चासाठी 2 लाख रुपये दिले (Railways Insurance) जातात.

कसा मिळवाल विमा ?

  • जेव्हा ऑनलाइन रेल्वे तिकीट बुकिंग केले जाते, तेव्हा वेबसाइट आणि ॲपवर रेल्वे प्रवास विम्याचा पर्याय असतो. तिकीट बुक करताना (Railways Insurance) विम्याचा पर्याय नक्की निवडा.
  • विम्यासाठी तुमच्याकडून फक्त 45 पैसे आकारले जातील.
  • विमा पर्याय निवडल्यावर, तुमच्या ईमेल आयडी आणि मोबाइल नंबरवर एक लिंक पाठवली जाईल.
  • ही लिंक विमा कंपनीची असते.
  • या लिंकवर जा आणि तेथे नॉमिनी तपशील भरा.
  • विमा पॉलिसीमध्ये नॉमिनी असल्यास विमा क्लेम (Railways Insurance) मिळवणे सोपे होते.

Ravikant Tupkar : रविकांत तुपकरांनी काढला नवा पक्ष!! विधानसभेच्या 25 जागा लढवणार

Ravikant Tupkar

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी आज मोठा निर्णय घेतला. रविकांत तुपकर यांनी नव्या पक्षाची घोषणा केली आहे. महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडी असं त्यांच्या पक्षाचे नाव आहे. रविकांत तुपकरांचा पक्ष महाराष्ट्रात विधानसभेच्या २५ जागा लढवणार आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील ६ मतदार संघाचा समावेश आहे. रविकांत तुपकर यांनी पुण्यात आपल्या समर्थकांसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी आपल्या नव्या पक्षाची आणि आगामी धोरणांबाबत घोषणा केली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून मला वेगळं केलं हे ऐकून मला धक्का बसला. संघटनेसाठी मी अनेकदा जेल मध्ये गेलो, शेकडो पोलीस केस अंगावर घेतल्या लाठ्या काठ्या खाल्ल्या. असं असतानाही राजू शेट्टी यांनी जी भूमिका घेतली ते ऐकून मला धक्का बसला. २००७ मध्ये आम्ही राजू शेट्टी यांच्यासोबत आलो तेव्हा संघटना कोल्हापूर पर्यंत मर्यादित होती. आज संघटना नाव रूपाला आली आणि माझी गरज संपली अशी खंत रविकांत तुपकर यांनी व्यक्त केली. आज आम्ही 4 तास कार्यकर्त्यांची बैठक घेतली आणि काही महत्वपूर्व निर्णय घेतले. त्यानुसार आम्ही महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडीची स्थापना करत आहोत असं तुपकर (Ravikant Tupkar) म्हणाले.

25 जागांवर निवडणूक लढवेल- Ravikant Tupkar

आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडी २५ जागांवर निवडणूक लढवेल, यात बुलढाणा जिल्ह्यातील ६ मतदारसंघाचा समावेश आहे. लवकरच राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा करणार आहे तसेच राज्यातील तिसरी आघाडी म्हणून विधानसभा निवडणूक लढवणार असं रविकांत तुपकर यांनी म्हटलं आहे. तुपकर यांनी नवीन पक्ष काढल्यामुळे विधानसभा निवडणुकीत रंगत आणखी वाढली आहे. यापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून सदाभाऊ खोत यांनी बाहेर पडत रयत क्रांती संघटना स्थापन केली, आता रविकांत तुपकर यांनी महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडीची स्थापना केल्याने राजू शेट्टींपुढे आणखी एक आव्हान उभं राहिले असं म्हणावं लागेल.

शेतकरी जावयाला सासऱ्याकडून 20 लाखांची ‘स्कॉर्पियो’ भेट, सर्वत्र होतीये लग्नाची चर्चा

Wedding Gift

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपला देशात कृषिप्रधान देश आहे. आपल्या देशातील जवळपास 75 टक्के लोकसंख्या ही शेती या व्यवसायावर अवलंबून आहेत. त्यामुळे आजकाल जास्तीत जास्त तरुण वर्ग देखील शेती करायला लागलेला आहे. देशात आणि राज्यात शेतकऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. परंतु शेती करत असलेल्या शेतकरी मुलाला आजकाल मुलगी द्यायला कोणीही तयार होत नाही. शेतकरी मुलांचे लग्न देखील लवकर जमत नाही. असे असताना दुसरीकडे सोलापूरमध्ये एका शेतकरी जावयाला सासऱ्याने तब्बल 20 लाखांची आलिशान अशी गाडी गिफ्ट केलेली आहे. या शेतकरी जावयाची सध्या संपूर्ण राज्यभर चर्चा चालू झालेली आहे.

बार्शी गावातील बाबुळगाव येथील अक्षय बाबर या शेतकरी तरुणाला त्याच्या लग्नामध्ये त्याच्या सासर्‍यांनी चक्क वीस लाखांची स्कॉर्पिओ गाडी भेट दिलेली आहे. अक्षयने लग्नात हुंडा घेण्यास पूर्णपणे नकार दिला होता. परंतु आपल्या जावयाची आणि लेकीची हौस व्हावी, यासाठी त्याच्या सासर्‍याने ही गाडी गिफ्ट केलेली आहे. त्यांनी हे लग्न अत्यंत साध्या पद्धतीने केलेले आहे. परंतु जावयाला गाडी गिफ्ट दिलेली आहे.

अक्षय बाबर हा एक युवा शेतकरी आहे. त्याची जवळपास 15 एकर वडिलोपार्जित बागायती शेती आहे. लग्नात सासऱ्याने दिलेल्या स्कॉर्पिओ गाडीवर त्याने त्याची प्रतिक्रिया दिलेली आहे. तो म्हणाला की, “माझ्या कुटुंबीयांनी मुलगी आणि नारळ घेण्याचा निर्णय घेतलेला होता परंतु मुलीच्या घरच्यांनी गाडी भेट देण्याचा निर्णय घेतला.”

महाराष्ट्रात नवरा नवरी जेवण करायला जातात. तेव्हा नवरदेवाच्या सासरचे मंडळी काही ना काही देत असतात. कोणी पैसे देतात, कोणी सोने देतात. परंतु या लग्नात स्कॉर्पिओ गाडी दिलेली आहे. त्यामुळे सध्या त्याच्या या लग्नाची चर्चा सर्वत्र गाजत आहेत. त्यांनी लग्नाची अगदी साध्या पद्धतीने केलेले आहे. परंतु त्याच्या सासऱ्यांनी हौस म्हणून शेतकरी जावयाला ही गाडी गिफ्ट दिलेली आहे.

HDFC बँकेची ग्राहकांना भेट!! FD वरील व्याजदर वाढवले

HDFC Bank FD Rate

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील आघाडीची बँक असलेल्या HDFC बँकेने आपल्या ग्राहकांना मोठी खुशखबर दिली आहे. बँकेने आपल्या मुदत ठेवीवरील व्याजदरात (HDFC Bank FD Rate Hike) वाढ केली आहे. HDFC बँकेने 3 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेसाठी ठराविक मुदतीच्या मुदत ठेवींच्या व्याजदरात 20 बेस पॉइंट्स (bps) पर्यंत वाढ केली आहे. हे नवीन व्याजदर आजपासून म्हणजेच 24 जुलै 2024 पासून लागू होतील. या नव्या व्याजदरानंतर, बँक 4 वर्षे 7 महिने – 55 महिन्यांच्या कालावधीसाठी सामान्य नागरिकांसाठी 7.40% आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.90% व्याजदर देते.

कसे असतील नवे व्याजदर –

HDFC बँक सर्वसामान्य नागरिकांसाठी 7 ते 29 दिवसांच्या कालावधीतील मुदत ठेवींवर 3% व्याज दर देत आहे. 30 ते 45 दिवसांमध्ये मॅच्युअर झालेल्या ठेवींवर 3.50% व्याज मिळेल, तर 46 दिवस आणि सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या मुदतीच्या एफडीवर 4.50% व्याज मिळेल. हि बँक सहा महिने ते एक दिवस आणि ९ महिन्यांपेक्षा कमी मुदतीच्या ठेवींसाठी 5.75% व्याज दर ऑफर देते. तसेच ९ महिने ते एक दिवस आणि एक वर्षापेक्षा कमी मुदतीच्या ठेवींवर 6% व्याजदर ग्राहकांना देईल.

HDFC बँक एक वर्ष आणि 15 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या मुदत ठेवींवर 6.60% व्याजदर देईल, तर 15 महिने आणि 18 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या मुदत ठेवींना 7.10% व्याजदर ग्राहकांना देण्यात येईल. 18 महिने ते 21 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी बँक 7.25% व्याज दर देत आहे. तसेच 21 महिने आणि दोन वर्षे आणि अकरा महिन्यांपेक्षा कमी मुदतीच्या ठेवींवर 7% व्याज दर ऑफर करते. बँकेने 2 वर्षे 11 महिने – 35 महिन्यांच्या मुदत ठेवीवरील व्याज दर 20 bps ने वाढवून 7.15% ते 7.35% केले आहेत आणि 4 वर्षे 7 महिने – 55 महिन्यांच्या कालावधीसाठी 20 bps ने 7.20% वरून 7.40% पर्यंत वाढ केली आहे. HDFC बँकेच्या या निर्णयामुळे ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे हे नक्की.

Central Railway Megablock : मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक ; पुण्याकडे जाणाऱ्या 19 रेल्वे गाड्या केल्या जाणार रद्द

Central Railway Megablock : राज्यभरात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. याचा परिणाम देखील मध्य रेल्वेवर झाला आहे. पावसाच्या दिवसात विशेषतः कोकण रेल्वेला मोठा फटका बसतो. त्यामुळे कोकण रेल्वे दरड कोसळून बंद पडण्याचं गाऱ्हाण नेहमीचंच आहे. मात्र आता मध्य रेल्वे कडून सहा दिवसांचा मेगाब्लॉक घेतला जाणार असल्याची माहिती आहे. या मेगाब्लॉक चा परिणाम पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांवर होणार असून यामुळे पुण्याकडे जाणाऱ्या 19 रेल्वे गाड्या रद्द केल्या जाणार आहेत तर 22 एक्सप्रेस गाड्यांचे मार्ग बदलले ( Central Railway Megablock) जाणार आहेत. त्यामुळे मुंबई – पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होणार आहेत.

रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार मध्य रेल्वेच्या पुणे विभागामध्ये सहा दिवसांचा मेगाब्लॉक असणार आहे. दौंड रेल्वे स्थानकावरील विविध कामासाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे. हा ब्लॉक दिनांक 27 जुलै ते १ ऑगस्ट या दरम्यान असणार आहे. या काळामध्ये अनेक गाड्या रद्द करण्यात येणाऱ्या तर काही गाड्यांचे मार्ग देखील बदलले (Central Railway Megablock) जाणार आहेत.

पुणे विभागातल्या 19 गाड्या रद्द (Central Railway Megablock)

मध्य रेल्वेच्या सहा दिवसांच्या ब्लॉकचा परिणाम पुणे विभागातील रेल्वे गाड्यांवर होणार असून या ब्लॉग दरम्यान 19 गाड्या रद्द केल्या जाणार आहेत. तर 22 एक्सप्रेस गाड्यांचे मार्गही बदलले जाणार आहेत. सोलापूर – पुणे इंटरसिटी एक्सप्रेस तीन दिवसांसाठी रद्द करण्यात येणार आहे. याबरोबरच सोलापूर रेल्वे विभागातून काही गाड्यांच्या मार्गामध्ये बदल करण्यात येणार असून लोकमान्य टिळक टर्मिनस ते विशाखापट्टणम एक्सप्रेस ही गाडी 29 जुलै ते एक ऑगस्ट दरम्यान मिरज – कुर्डुवाडी मार्गे रवाना होईल. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बंगळुरू एक्सप्रेस ही गाडी ब्लॉक काळात पुणे- मिरज- कुर्डूवाडी मार्गे रवाना केली जाईल. त्याबरोबरच बंगळुरु- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल एक्सप्रेस 27 ते 31 जुलै पर्यंत कुर्डूवाडी- मिरज -पुणे मार्गे वळवली (Central Railway Megablock) जाणार आहे.

लांब पल्ल्यांच्या गाड्यांवर परिणाम (Central Railway Megablock)

या मेगा ब्लॉक चा परिणाम लांब पल्ल्यांच्या गाड्यांवर सुद्धा होणार असून नागरकोयल-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस ही गाडी 28 जुलै रोजी गुंतकल-बल्लारी-हुबळी-मिरज-पुणे मार्गे रवाना होईल. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागरकोयल ही गाडी 29 जुलै रोजी पुणे-मिरज-हुबळी-बल्लारी-गुंतकल मार्गे आणि चेन्नई – एकतानगर एक्स्प्रेस ही गाडी 28 जुलै रोजी गुंतकल- बल्लारी- हुबळी- मिरज-पुणे (Central Railway Megablock) मार्गे धावणार आहे.