Thursday, December 25, 2025
Home Blog Page 5789

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकात ५० माकडांचा रहस्यमयरीत्या मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील कोरोनाच्या संकटात वाढ होत असतानाच कर्नाटकातील एका जिल्ह्यात जवळपास ५० माकडे मृतावस्थेत आढळून आली आहेत. यानंतर प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. त्या माकडांवर विषप्रयोग करण्यात आला असावा अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. हे कोणत्या कारणास्तव केले गेले, याबद्दल सध्या काहीही स्पष्ट झालेले नाही. मात्र कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर माकडांच्या या अशा रहस्यमयी मृत्यूमुळे लोकं भयभीत झाले आहेत.

ही घटना कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यामधील आहे. शुक्रवारी येथील बेलथांगडी तालुक्यात सुमारे ५० माकडे ही मृतावस्थेत आढळून आली. एका वृत्तानुसार, या वानरांचे मृतदेह बांदर गावातल्या कुंडलपाळके-पाडमुंझा रोडवर सापडले. या घटनेची माहिती मिळताच जिल्ह्यातील आरोग्य अधिकाऱ्यांनी ताबडतोब घटनास्थळाला भेट दिली आणि सर्व मृत वानरांची तपासणी केली.

वानरांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा शोध घेण्यासाठी बिसराला मंगरुरु येथील पशु रुग्णालयात त्यांचे शव पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, या सर्व माकडांना विष दिले गेले असावे अशी भीती व्यक्त केली जात आहे. यामागील स्पष्ट कारण अद्यापही समोर आलेले नसले तरी पिकाच्या नुकसानीमुळे माकडांवर विषप्रयोग करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

उल्लेखनीय बाब ही आहे की गेल्या काही दिवसांत अनेक राज्यातून अशा आणखी घटना समोर आल्या आहेत, ज्यामध्ये वानरे अशी रहस्यमयरित्या मृतावस्थेत आढळून येत आहेत. एप्रिलच्या उत्तरार्धात, म्हैसूर जिल्ह्यातही तीन माकडांचे मृतदेह सापडले आहेत. मात्र, अधिकाऱ्यांना अशी असे सांगितले आहे की एकतर त्यांना विष देण्यात आले असेल किंवा कीटकनाशके फवारलेली फळे खाऊन त्यांचा मृत्यू झाला असेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

सावधान! येत्या २४ तासात ‘अम्फान’ चक्रीवादळ पूर्व किनारपट्टीला धडकू शकते; हवामान विभागाचा इशारा

नवी दिल्ली । येत्या २४ तासात बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळ एक चक्रीवादळ येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. ‘अम्फान’ नावाचं हे चक्रीवादळ हे पूर्व किनार पट्टीवर धडकणार आहे. आज शनिवारी सायंकाळपर्यंत बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळ निर्माण होण्याचा अंदाज आहे. या चक्रीवादळाचा भारताच्या पूर्व किनारपट्टीतील राज्यांना तडाखा बसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या वादळाचा वेग ताशी ५५-६६ किमी असणार आहे. मासेमारी करण्यासाठी समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्याता आला आहे.

‘अम्फान’ चक्रीवादळ ओडिशा किनाऱ्यापासून पारादीपच्या दक्षिणेस ११०० किमी दक्षिणेस, दिघाच्या दक्षिणेस १२५० किमी दक्षिणेस आणि बांग्लादेशच्या किनाऱ्यापासून खेपूपाराच्या १३३० किमी दक्षिण-पश्चिम येथे केंद्रीत होऊ शकते. येत्या २४ तासात दुपारी १२ वाजेपर्यंत ‘चक्रवाती वादळ’ आणि अधिक तीव्रतेचे चक्रीवादळ वादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.चक्रीवादळ प्रणाली ‘डिप्रेशन’ वरुन ‘दीप डिप्रेशन’ पर्यंत विकसित होते आणि मग या चक्रीवादळाला मोठा वेग प्राप्त होते. हे वादळ ताशी ७५-८५ किमी वेगाने येते. तसेच या वादळाच्या वेग मर्यादेत मोठी वाढ होऊन ते ९५ किमी प्रतितास वेगापर्यंत जाऊ शकते.

हवामान विभागाने केला ‘अर्लट’ जारी
समुद्राची स्थिती अत्यंत वाईट असण्याची शक्यता आहे. समुद्र अधिक खवलेल्या असेल. १८ मेपासून आंध्र किनारपट्टी आणि ओडिशा-पश्चिम बंगालच्या किनारपट्टीला धोका आहे. त्यामुळे मासेमारी करण्यासाठी समुद्रात जाऊ नका, असा इशारा मच्छिमारांना देण्यात आला आहे. जे समुद्रात गेले आहेत. त्यांनी 17 मे पर्यंत समुद्रातून बाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अंदमान आणि निकोबार बेटांवर आज आणि उद्या हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये १८ मे रोजी मुसळधार पाऊस आणि १९ आणि २० मे रोजी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अ‍ॅम्फान या चक्रीवादळविषयी हवामान कार्यालयाने १४ मे रोजी सुरक्षा बल आणि ८ राज्यांचा सतर्क राहण्याचा इशारा देताना अर्लट राहा असे म्हटले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

देशभरात मागील 24 तासांत 103 जणांचा कोरोनामुळं मृत्यू; ‘या’ राज्यात झाले सर्वाधिक मृत्यू

नवी दिल्ली । संपूर्ण देशात कोरोनाचा कहर सुरु आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मागील 24 तासांतील आकडेवारीनुसार 103 लोकांचा मृत्यू झाला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 30 हजार पार पोहचली आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, ‘आतापर्यंत 85 हजार 940 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच 2752 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 30 हजार 153 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. जाणून घ्या देशभरातील सर्व राज्यातील कोरोनाची सद्यस्थिती.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसा, कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्यामुळे 1 मे ते 15 मेपर्यंत कोरोना व्हायरसमुळे 1502 लोकांचा मृत्यू झाला आहे. 1 मेपर्यंत 1147 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. परंतु, 15 मेपर्यंत 2649 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. म्हणजेच, देशात आतापर्यंत झालेल्या एकूण मृत्यूंपैकी 56.70 टक्के लोकांचा मृत्यू 1 मे ते 15 मे दरम्यान झाले आहेत.

कोणत्या राज्यात किती मृत्यू?
महाराष्ट्रात 1068, गुजरातमध्ये 606, मध्यप्रदेशमध्ये 239, पश्चिम बंगालमध्ये 225, राजस्थानमध्ये 125, दिल्लीमध्ये 123, उत्तर प्रदेशमध्ये 95, आंध्रप्रदेशमध्ये 48, तामिळनाडूमध्ये 71, तेलंगणामध्ये 34, कर्नाटकात 36, पंजाबमध्ये 32, जम्मू-काश्मीरमध्ये 11, हरियाणामध्ये 11, बिहारमध्ये 7, केरळमध्ये 4, झारखंडमध्ये 3, ओडिशामध्ये 3, चंदिगढमध्ये 3, हिमाचल प्रदेशमध्ये 3, आसाममध्ये 2 आणि मेघालयमध्ये एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

मोक्षदा पाटीलांची मोठी कारवाई; ११ लाखांचा गुटखा अन २२ लाखांचा मुद्देमाल केला जप्त

औरंगाबाद प्रतिनिधी | कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. अस असताना धंद्यांना मात्र तेजी आली असल्यामुळे दारू, तसेच तंबाखू जन्य पदार्थाना मोठी मागणी आहे. फुलंब्री तालुक्यात या पदार्थांची सर्रास विक्री सुरू आहे. यावर कारवाई करत तालुक्यातील पाल येथे पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या विशेष पथकाने छापा टाकून 11 लाख 60 हजार रुपयांचा  गुटखा तसेच एकूण  22 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी पाल येथे लाखो रुपयांचा गुटखा येणार असल्याची माहिती विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विवेक जाधव यांना खबऱ्या मार्फत मिळाली. त्यावरून त्यांनी सापळा रचून पाल येथे टाटा 407 कंपनीचे वाहन पकडले व त्यात काय आहे असे विचारले. तेव्हा चालक इम्रान इंद्रिस शेख याने उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने यामध्ये राजू पंडित मोरे व संतोष तेजराव जाधव यांचा हा गुटक्याचा माल असल्याची माहिती दिली.

यावेळी पाहणी केली असता यामध्ये 58 गोण्या गोवा पर्पल गुटख्याच्या व 4 गोण्या गायछापच्या आढळून आल्या असून याची  किंमत 11 लाख 60 हजार रुपये तर टाटा 407 हे वाहन मिळून एकूण 22 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी वाहनासाहित सर्व मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील कारवाई पोलीस करत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

मैत्रीत ट्रम्प यांनी केली मोदींसोबत दगाबाजी; सरकारच्या ‘त्या’ योजनेला केला विरोध

वृत्तसंस्था । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीनमधून काढता पाय घेणाऱ्या कंपन्यांना भारताकडे आकर्षित करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या योजनेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी खोडा घातला आहे. ट्रम्प यांनी चीनमधून बाहेर पडून भारतामध्ये निर्मिती उद्योग स्थापन करु इच्छिणाऱ्या अ‍ॅपलसारख्या तंत्रज्ञान क्षेत्रातील बड्या कंपनीला मोठ्या प्रमाणात कर लादण्यात येईल असा कडक इशारा दिला आहे. चीनमधून बाहेर पडून अमेरिकेव्यतिरिक्त इतर कोणत्याही देशामध्ये निर्मिती उद्योग सुरु करणाऱ्या अमेरिकन कंपन्यांवर अशाप्रकारे कर लादण्याचा इशारा देत मूळच्या अमेरिकन कंपन्यांनी पुन्हा एकदा आपल्या देशामध्ये निर्मिती उद्योग सुरु करावा असं प्रोत्साहन ट्रम्प देत असल्याचे पीटीआयच्या वृत्तामध्ये म्हटलं आहे.

यासाठी पीटीआयने ट्रम्प यांच्या मुलाखतीमधील संदर्भांचा दाखला दिला आहे. अमेरिकन कंपन्यांनी पुन्हा अमेरिकेमध्ये येऊन निर्मिती उद्योग सुरु करत रोजगारनिर्मितीसाठी हातभार लावावा असं आवाहन ट्रम्प यांनी केलं आहे. या माध्यमातून ट्रम्प यांनी पुन्हा एकदा ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ म्हणजेच ‘अमेरिकेला पुन्हा श्रेष्ठ बनवूया’ या आपल्या अभियानाशी सांगड घालणारी भूमिका स्पष्ट केली आहे.

लॉजिस्टीकला बसलेल्या फटका टाळण्यासाठी मूळची अमेरिकन कंपनी असणाऱ्या अ‍ॅपलने आपल्या निर्मिती उद्योगातील भराच मोठा भाग हा भारतामध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यासंदर्भातील बातम्यांवरुन ट्रम्प यांना मुलाखतीदरम्यान प्रश्न विचारण्यात आला. “आम्ही करारबद्ध केलेल्या कंपन्यांबरोबर अ‍ॅपल स्पर्धा करत आहे. अ‍ॅपलबरोबर अन्याय झाल्यासारखं वाटलं तरी आम्ही या गोष्टीला परवानगी देणार नाही. इतर देशांप्रमाणे आपणही आपल्या देशांच्या सीमांचे निर्बंध कठोर केले तर अ‍ॅपलला त्यांचे १०० टक्के प्रोडक्ट अमेरिकेमध्येच निर्माण करता येतील. खरं तर हे असंच व्हायला हवं,” असं उत्तर ट्रम्प यांनी दिलं.

ट्रम्प यांनी अमेरिकन कंपन्यांना चीनमधून अमेरिकेत येण्यासाठी प्रोत्साहन म्हणून सवलती देण्याऐवजी कर लादण्याच्या माध्यमातून स्वदेशात येण्यास भाग पडण्याचे धोरण स्वीकारले आहे. कंपन्यांनी पुन्हा अमेरिकेमध्ये यावे यासाठी सरकारकडून काहीही विशेष सुविधा दिल्या जाणार नसून या कंपन्यांना अमेरिकत परत यावेच लागेल असं ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आहे. चीनपेक्षा अमेरिकेमध्ये मागणी आणि पुरवठ्यासंदर्भातील अनेक चांगल्या सुविधा असल्याचे ट्रम्प यांनी म्हटलं आहे. मागील काही आठवड्यांपासून ट्रम्प यांच्या भाषणांमध्ये अनेकदा चीनचा उल्लेख दिसून येत आहे. कोरोनाची निर्मिती चीनमध्येच झाल्याचे ट्रम्प वारंवार सांगताना दिसत आहेत.

चीनमधून बाहेर पडणाऱ्या कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी मोदी सरकारची ‘ही’ आहे विशेष योजना
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्या चीनमधून बाहेर पडण्याचा विचार करत असतानाच भारतासारख्या काही देशांनी या कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी विशेष योजना आखल्या आहेत. जागतिक मागणीनुसार पुरवठा करण्यासाठी भारतामध्ये निर्मिती झालेल्या वस्तूंचा मोठा वाटा असेल असं पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केलं आहे. चीनमधून काढता पाय घेण्याच्या तयारी असणाऱ्या कंपन्यांना भारतामध्ये उद्योग सुरु करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासंदर्भात भारत सरकारने प्रयत्न सुरु केले आहेत. यासाठी वेगवेगळ्या योजना राबवण्याचा विचार सुरु झाला आहे. याचअंतर्गत भारतामध्ये बहुराष्ट्रीय कंपन्यांना सहज जमीन उपलब्ध करुन देण्यासंदर्भात काम सुरु झाले आहे. चीनमधून भारतात येऊन इच्छिणाऱ्या कंपन्यांना कारखाने उभारण्यासाठी मोठा भूभाग उपलब्ध करुन देण्याची तयारी सुरु झाली आहे. या कंपन्यांसाठी उपलब्ध करुन देण्यात येणारी जमीन ही युरोपमधील लक्झ्मबर्ग देशाच्या क्षेत्रफळाहून दुप्पट आकाराची असण्याची शक्यता आहे. संपूर्ण प्रकरणाशी थेट संबंध असणाऱ्या सुत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारे ब्लूमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार भारतानने आतापर्यंत ४ लाख ६१ हजार ५८९ हेक्टर जमीन या कंपन्यांना देण्यासाठी निश्चित केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

पुण्याहून कराडला आलेल्या एकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथे पुणे येथून प्रवास करुन आलेला एका प्रवाशाचा अहवाल कोरोना (कोविड-19) बाधित आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. तसेच जिल्ह्यात एकूण 74 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर एकुण 104 जणांना विलगीकरण कक्षात दाखल केले गेले आहे.

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 29, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 24, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 2 व ग्रामीण रुग्णालय वाई येथील 9 असे एकूण 64 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे बी. जे. वैद्य’कीय महाविद्यालय , पुणे यांनी कळविले आहे. तसेच कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे तपासणी करण्यात आलेल्या 10 संशयितांचे नमुने निगेटिव्ह आल्याचे कळविले आहे, असे एकूण 74 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

104 जण विलगीकरण कक्षात दाखल
काल दि. 15 मे रोजी रात्री उशिरा क्रातीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 40, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथे 64 असे एकूण 104 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली.

दरम्यान, आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 129 झाली असून या पैकी उपचार घेत असलेले बाधीत रुग्णांची संख्या 66 आहे. तर कोरोना मुक्त होवून घरी गेले रुग्ण 61 असून कोरोना बाधित मृत्यु झालेले 2 रुग्ण आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

MIM च्या नगरसेवकांमध्ये तुंबळ हाणामारी; २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

औरंगाबाद प्रतिनिधी । महावितरणचे कंत्राट आणि कामाच्या दर्जावरून एमआयएमच्या नगरसेवकांमध्ये गुरुवारी रात्री चांगलाच राडा झाल्याची चर्चा आहे. यावेळी झालेल्या तुंबळ हाणामारीत दोन नगरसेवक जखमी झाले होते. परंतु, यात दोन्ही गटांकडून तक्रार देण्यासाठी कोणीही समोर न आल्याने अखेर सिटी चौक पोलिसांनी तक्रार देत नगरसेवकांसह वीस कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. नगरसेवक नासेर सिद्दीकी, अजीम ऊर्फ अज्जू नाईकवाडी, तय्यब नाईकवाडी अशी गुन्हा नोंद झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महावितरणकडून मिळालेल्या कंत्राटाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करत एमआयएमच्या नगरसेवकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली होती. यातून नगरसेवक नाईकवाडी यांचे भाऊ व कंत्राटदार तय्यब यांना जाबविचारताच दोन्ही गट एकमेकांवर तुटून पडले. हा प्रकार नाईकवाडीयांना कळताच ते घटनास्थळी धावले. त्यामुळे पुन्हा मोठ्या प्रमाणावर हाणामारी झाली. सिटी चौक पोलिस ठाण्याचे निरीक्षक संभाजी पवार तत्काळ मोठ्या फौजफाट्यासह दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळला.

दरम्यान, रात्री उशिरापर्यंत तक्रारदारांची वाट पाहण्यात आली. परंतु, कोणीही पुढे आले नाही. त्यावर अखेर, भादंवि कलम १६०, १८८ व २६९ नुसार गुन्हे दाखल करत उपनिरीक्षक ए. डी. नागरे यांच्याकडे तपास दिला. यात जखमी नगरसेवक उपचार घेऊन घरी गेले, परंतु शुक्रवारीसंध्याकाळपर्यंत तक्रार देण्यासाठी कोणीही आले नव्हते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

लष्कर-ए-तैयबासाठी काम करणाऱ्या OGW च्या ५ जणांना अटक; जम्मू काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई

श्रीनगर । लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या OGW च्या पाच जणांना अटक करण्यात जम्मू काश्मीर पोलिसांना यश आले आहे. आज पहाटे बडगाम जिल्ह्यातील दहशतवाद्यांच्या अरिजल खानसाहब येथील अड्ड्यावर करण्यात आलेल्या कारवाईत लष्कर-ए-तैयबासाठी काम करणाऱ्या एकाला अटक करण्यात आली. झहूर वाणी असे अटक केलेल्या दहशतवाद्यांचे नाव सांगितले जात आहे. पोलिसांनी त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला आहे.

या प्रकरणात चौकशीनंतर आणखी चार जणांना अटक करण्यात आल्याची माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून हे सर्वजण खानसाहब येथील रहिवासी असल्याचे समजत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेले कामगार लष्कर-ए-तैयबाच्या अतिरेक्यांना मदत करत होते आणि त्यांना लपण्यासाठी जागा देत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा गट गेल्या काही महिन्यांपासून येथे कार्यरत होता. तत्पूर्वी, डोडा येथे पोलिस आणि सैन्याने केलेल्या संयुक्त कारवाईत हिझबुल मुजाहिद्दीनला मदत करणारा ओव्हर ग्राऊंड कार्यकर्ता तनवीर अहमद मलिक याला अटक करण्यात आली होती

OGW काय आहे?
ओजीडब्ल्यू हा दहशतवादी संघटनांचा सहानुभूतिवादी गट आहे. ओजीडब्ल्यू चे कार्यकर्ते दहशतवाद्यांना सुरक्षा दलांबद्दल महत्त्वपूर्ण माहिती देतात. याशिवाय दहशतवाद्यांना स्थानिक मदतही दिली जाते. जम्मू-काश्मीर पोलिसांच्या क्राइम गॅझेटनुसार ओजेडब्ल्यू हे लपलेल्या दहशतवाद्यांचे ‘डोळे आणि कान’ म्हणून काम करतात.

निर्मला सितारमन आज पुन्हा संध्याकाळी ४ वाजता लाईव्ह; आता कोणती घोषणा?

मुंबई । पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना संकटादरम्यान जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली होती. ‘स्वावलंबी भारत’ पॅकेजविषयी आज चौथ्या टप्प्यातही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे. आज (१६ मे) अर्थमंत्र्यांची चौथी पत्रकार षरिषद होणार आहे. चार वाजता होणाऱ्या बैठकीत आज काय घोषणा केल्या जातात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

काल आपल्या तिसऱ्या पत्रकार परिषदेत अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी कृषी क्षेत्राशी संबंधित ११ महत्वाच्या घोषणा केल्या होत्या. तसेच पायाभूत सुविधा मजबूत करण्यासंबंधी यातील ८ घोषणा आहेत. तर प्रशासकीय सुधारणांसंबंधी ३ घोषणा आहेत. तसेच शेतीच्या पायाभूत सुविधांसाठी १ लाख कोटींचं पॅकेज देण्यात आल्याची घोषणाहि सितारमन यांनी कालच्या पत्रकार परिषदेत केली होती.

आता आज निर्मला सितारामन काय घोषणा करणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. आज संध्याकाळी ठीक चार वाजता सितारमन यांची पत्रकार परिषद सुरु होणार असून यावेळी अर्थमंत्री कोणतीतरी मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

औरंगाबादेत आज पुन्हा २३ नवीन कोरोनाग्रस्त; एकूण संख्या पोहोचली ८६५ वर

औरंगाबाद प्रतिनिधी । औरंगाबाद येथील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे. शहरात आज शनिवारी सकाळी 23 नवीन कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. आज त्यांचा कोरोना अहवाल प्राप्त झाला असून तो पॉझिटिव्ह असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे. आता जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 865 झाली असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

औरंगाबाद शहरातील आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. एमजीएम मेडिकल कॉलेज (3), हनुमान चौक, चिकलठाणा (1), राम नगर (3), एमआयडीसी (1), जालान नगर (1), संजय नगर, लेन नं.6 (3), सादात नगर (4), किराडपुरा (1), बजाज नगर (1), जिनसी रामनासपुरा (1), जुना मोंढा, भवानी नगर, गल्ली नं. पाच (1), जहागीरदार कॉलनी (1), आदर्श कॉलनी (1), रोशन गेट (1)
या भागातील कोरोनाबाधित आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.