Thursday, December 25, 2025
Home Blog Page 5788

महाराष्ट्र हे देशाच्या अर्थव्यवस्थेचे केंद्रस्थान; केंद्राने राज्यांना आर्थिक मदत करायलाच हवी – राहुल गांधी

नवी दिल्ली । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज व्हिडीओ कॉन्फेरंन्सिंगद्वारा काही पत्रकारांशी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर संवाद साधला. यावेळी गांधी यांनी केंद्र सरकारच्या सेन्ट्रलाइझ कामकाज पद्धतीवर टीका करत केंद्राने राज्य सरकारांना आर्थिक मदत करणे गरजेचे असल्याचे म्हटले. तसेच महाराष्ट्र हे देशाच्या अर्थव्यवस्थेचे केंद्रस्थान आहे. तेव्हा केंद्राने महाराष्ट्राला मदत करणे देशासाठी गरजेचे असल्याचे मत यावेळी राहुल यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र एक मोठे राज्य आहे. आणि महाराष्ट्र हे नुसते मोठे राज्य नसून ते एक अद्वितीय राज्य आहे. महाराष्ट्र हे देशाच्या अर्थव्यवस्थेचे केंद्रस्थान आहे. त्यामुळे महाराष्ट्राला कोरोना काळात केंद्र सरकारकडून सहायय मिळणे गरजेचे आहे. सर्वच राज्यांना केंद्र सरकारने मदत करणे महत्वाचे आहे. कारण सरकार जेवढी मदत राज्यांना करेल तेवढा देशाला त्याचा फायदा होईल. राज्यच कोविड विरुद्धची लढाई लीड करू शकतात असे म्हणत राहुल यांनी केंद्र सरकार ला कामकाज पद्धतीत विकेंद्रीकरण करण्याचा सल्ला दिला.

दरम्यान, केंद्र सरकारचे काम हे मॅनेजमेंट करणे आहे तर राज्यांचे काम हे ऑपरेशन करणे आहे. सध्या अशी तक्रार येत आहे कि केंद्र सरकार राज्यांना जेवढी आर्थिक मदत करायला हवी तेवढी करत नाहीये. केंद्र सरकार कोविडची सेन्ट्रलाइझ पद्धतीने लढू पाहत आहे. मात्र मला वाटत कि हि लढाई राज्यांना मदत करून लढायला हवी आहे. असाही राहुल गांधी यांनी यावेळी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

खडसेंना डावलण्याचा प्लॅन दिल्लीत शिजला; राज्यातील भाजप नेतृत्वात ती ताकदच नाही- पृथ्वीराज चव्हाण

पुणे । विधानसभेपाठोपाठ विधान परिषदेची उमेदवारी नाकारल्याने एकनाथ खडसे यांनी संतापून राज्यातील भाजप नेत्यांवर टीकास्त्र सोडले होते. त्यावरून खडसे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये बराच कलगीतुराही रंगला आहे. दरम्यान आज भाजप-खडसे वादावर माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण एक गौप्यस्फोट केला आहे. ”आपल्या नेतृत्वाला अडचण होईल म्हणून खडसे नसलेले बरे, हा प्लान दिल्लीत झाला आहे. राज्यातील भाजप नेतृत्वात ही ताकद नाही. भाजपच्या दिल्ली नेतृत्वाचा वरदहस्त असल्याशिवाय असे होणे शक्य नाही,’”अशी टिप्पणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. ते पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित ऑनलाइन वार्तालाप कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी एकनाथ खडसे यांची प्रशंसा केली. राज्यात भाजप शून्यातून उभा करण्याचे काम एकनाथ खडसे, गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या लोकनेत्यांनी केले आहे. असा नेता काँग्रेसमध्ये आला तर त्याचा पक्षासाठी फायदा होईल असंही  त्यांनी म्हटलं. भाजपने त्यांना सन्मानाची वागणूक दिली नाही. प्रभावी नेता, पर्यायी नेतृत्व म्हणूनच त्यांना लक्ष्य करण्यात आले. पाच वर्षे मंत्रीपदासाठी झुलवत ठेवण्यात आले. प्रभावी लोकनेता आणि पर्यायी नेतृत्व असल्यानेच खडसेंना लक्ष्य करण्यात आले असून, भाजपच्या दिल्ली नेतृत्वाचा वरदहस्त असल्याशिवाय महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वामध्ये असे करण्याची ताकद नाही,’ अशा शब्दात पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपमधील अंतर्गत वादावर खोचक टिप्पणी केली. मात्र, खडसे यांना काँग्रेसने विधान परिषदेच्या सहाव्या जागेची, तसेच पक्ष प्रवेशाची ऑफर दिली होती का, याबाबत अधिक भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

केरळमध्ये मान्सून यायला ४ दिवस उशीर; ‘या’ कारणामुळे यंदा पाऊस होणार लेट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नैऋत्य मान्सूनची प्रतीक्षा आता सुरू झाली आहे. दरम्यान, यावर्षी मान्सूनला केरळमध्ये यायला चार दिवस उशीर होऊ शकेल, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिली आहे. याबाबत माहिती देताना हवामान खात्याने शुक्रवारी सांगितले की, केरळमध्ये नैऋत्य मान्सूनची सुरूवात यंदाच्या १ जूनच्या तारखेपासून थोड्या वेळानंतर होण्याची शक्यता आहे. यावर्षी ५ जूनपासून केरळमध्ये मान्सूनला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

गेल्या १५ वर्षात हवामान खात्याचा अंदाज अचूक होता
केरळमध्ये मान्सूनच्या आगमनानंतर, देशात चार महिन्यांचा अधिकृतपणे पावसाळा सुरू होईल. यासह हवामान खात्याने असेही म्हटले आहे की २०१५ वगळता मागील १५ वर्षांत त्याचे अंदाज गाडगी अचूक असल्याचे सिद्ध झाले आहेत. गेल्या वर्षी ८ जून रोजी मान्सून हा केरळमध्ये पोहोचला होता. त्यावेळी हवामान खात्याने ६ जूनचा अंदाज जाहीर केला होता. २०१८ मध्ये २९ मे चा अंदाज करण्यात आला होता आणि मान्सून २९ मे रोजीच आला होता. २०१७ मध्ये ३० मेचा अंदाज केलेला होता आणि त्यावेळीही मान्सून ३० मे रोजीच पोहोचला होता. २०१६ मध्ये ७ जूनचा अंदाज जाहीर झाला होता आणि ८ जूनला मान्सून पोहोचला. या व्यतिरिक्त २०१५ मध्ये हवामान खात्याने ३० मे रोजी मान्सून येण्याची अपेक्षा केली होती, परंतु मान्सून हा थोड्या उशिराने ५ जूनला केरळमध्ये पोहोचला.

अंदमान निकोबारमध्ये मान्सून कधी येईल?
यापूर्वी हवामान खात्याने सांगितले की, शनिवारी नैऋत्य मान्सून हा अंदमान आणि निकोबार बेटांवर,तसेच बंगालच्या उपसागरापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. आयएमडीच्या म्हणण्यानुसार नैऋत्य मान्सून अनेकदा अंदमान आणि निकोबार बेटांवर तसेच बंगालच्या उपसागरात २० मे पर्यंत पोहोचतो आणि त्यानंतर तो केरळमध्ये १० ते १२ दिवसांत पोहोचतो. धान्य, खडबडीत धान्ये, डाळी आणि तेलबिया या खरीप पिकांच्या पेरणीसाठी नैऋत्य मान्सून महत्त्वपूर्ण मानला जातो.

या राज्यात मान्सूनला उशीर होईल
या वर्षापासून, विभागाने १९६०-२०१९ च्या आकडेवारीच्या आधारे देशाच्या बर्‍याच भागांमध्ये मान्सून सुरू होण्याच्या आणि परत येण्याच्या तारखांमध्येही बदल केला आहे. पूर्वीच्या तारखा १९०१ आणि १९४० मधील डेटावर आधारित होते. इतर राज्यांविषयी बोलायचे झाल्यास महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओडिशा, झारखंड, बिहार आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात मान्सून सामान्य तारखांच्या तुलनेत ३ ते ७ दिवस उशीरा येईल.

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

मुंबई पोलीस दलातील आणखी एका पोलिसाचा कोरोनाने मृत्यू; बळींची संख्या झाली ८

मुंबई । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनच्या काळात कायदा, सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांनाही आता या विषाणूनं विळखा घातला आहे. कोरोनाच्या विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांच्या मुंबई दलात आज (शनिवारी) आठवा बळी गेला. त्यामुळे पोलीस दलात कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांच्या जीवाला अधिक धोका वाढून परिस्थिती चिंताजनक बनली आहे.

सविस्तर माहितीनुसार शाहूनगर पोलीस ठाण्यातील एक सहाय्यक पोलीस निरीक्षक ताप आणि सर्दी यामुळे आजारी होते. दरम्यान, त्यांनी सायन रुग्णालयात कोरोनाची चाचणी केली होती आणि त्याचा रिपोर्ट आज (शनिवार) पॉझिटिव्ह आला. मात्र, आजच पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास ते राहत्या घरी बाथरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यानंतर त्यांना सायन रुग्णालय उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले अशी महती पोलिसांनी दिली.

ताज्या आकडेवारीनुसार, राज्यभरात आत्तापर्यंत १ हजार १४० पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. यांमध्ये १२० अधिकारी आणि १ हजार २० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यांपैकी ८६२ पोलिसांवर सध्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत, तर २६८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच राज्यात एकूण १० पोलिसांचा करोनाची लागण झाल्याने मृत्यू झाला आहे. यांमध्ये मुंबई पोलीस दलातील आता ८ पोलिसांचा समावेश आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

अमरावतीच्या मोझरीत होणार पश्चिम विदर्भातील सर्वात मोठे कोविड रुग्णालय

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई

देशात व राज्यात सर्वत्र थैमान घातलेल्या कोरोना विषाणू कोविड आजाराच्या रुग्णांवर प्रभावीपणे उपचारपध्दतीचा अवलंब व्हावा, यासाठी अमरावती शहरापासून केवळ 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या तुकडोजी महाराजांच्या मोझरी मधील आयुर्वेदीक महाविद्यालयाच्या परिसरात उभ्या असलेल्या एका सुसज्ज रुग्णालयात आता सुमारे 350 खाटांचे सुसज्ज कोविड रुग्णालय कायमस्वरुपी निर्माण करण्यात येणार आहे. कोरोनाचे संकट गेल्यावर सुध्दा हे रुग्णालय इतर विविध आजाराच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी उपयोगात येणार आहे.

जिल्ह्यात ज्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय आहेत, त्याठिकाणी तसेच कोविड रुग्णालय स्थापन करण्याचे प्रशासनाने ठरविले आहे. याचा भाग म्हणून मोझरी सह अचलपूर येथील ट्रामा केंद्राच्या जागेत तसेच चांदूर बाजारच्या ग्रामीण रुग्णालयात 100 बेडचे कोविड रुग्णालय स्थापित करण्यात येणार आहे. या केंद्रात कोविड आजारासंबंधी सर्व आवश्यक साधनसामुग्री सुसज्ज ठेवण्यात येणार आहे. भविष्यात सुध्दा जिल्ह्यात कोरोना सारखी आपत्तीचे पुनरागमन झाल्यास त्याठिकाणी तत्काळ उपचार होणार आहेत.

काश्मिरी जनतेचं दुःख समजण्यासाठी तुम्हाला धर्माची गरज नाही – शाहिद आफ्रिदीचे ट्विट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन l काश्मिरी जनतेचं दुःख समजण्यासाठी तुम्हाला धर्माची गरज नाही, सेव काश्मीर अस ट्विट पाकिस्तान संघाचा खेळाडु शाहिद आफ्रिदीने केलं आहे. शाहिद आफ्रिदीने काश्मीरबाबत असे अनेक ट्विट केले आहेत. तो सोशल मीडियावर कायम ऍक्टिव्ह असतो. सध्या जगावर कोरोनाचे संकट असल्याने तो त्याच्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनेक गरजू लोकांच्या उपयोगाला येत आहे. त्याने उपासमारीची वेळ आलेल्या अनेक गरजू कुटुंबाना मदत केली आहे.

 

दरम्यान काश्मीरचं खरं सौंदर्य हे तिथल्या जनेतेने आतापर्यंत दाखवलेल्या धैर्य आणि संयमात असल्याचं वक्तव्य आफ्रिदीने एका कार्यक्रमात केलं होतं. जम्मू काश्मीरमध्ये ही सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. तिथं 2 हजारांहून अधिक कोरोनाग्रस्तांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. शाहिद आफ्रिदीने याआधीही अनेक वेळा जम्मू काश्मीर प्रश्नावरून अनेक ट्वीट केले आहेत.

अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रांनी जम्मू काश्मीर प्रश्नांबाबत मध्यस्ती करावी. अशी मागणी ही त्याने मागे केली होती. जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यावरही त्याने ट्विट केल होत. आजही त्याने काश्मिरी जनतेचं दुःख समजण्यासाठी तुम्हाला धर्माची गरज नाही. अस ट्विट केले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

मुद्रा शिशू कर्जाच्या व्याजावर सरकार देतेय १५०० करोड रुपयांची मदत; जाणुन घ्या कसा मिळवायचा फायदा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी गुरुवारी माहिती देताना सांगितले की, सरकार मुद्रा शिशु योजनेंतर्गत कर्जाची परतफेड करण्यासाठी व्याजदरामध्ये २% सूट देईल. २० लाख कोटींच्या स्वावलंबी भारत आर्थिक मदत पॅकेजच्या दुसर्‍या हप्त्याचा हा एक भाग होता आणि त्यामध्ये शेतकरी, स्थलांतरित कामगार तसेच रस्त्यावरील भाजी विक्रेते यांचा समावेश करण्यात आला.

शेतकऱ्यांना सवलतीची कर्जे, रस्त्यावरील भाजीपाला आणि फळ विक्रेत्यांसाठी कर्जे आणि स्थलांतरित मजुरांना मोफत अन्नधान्य यासह अनेक नवीन उपायांचे अनावरण अर्थमंत्र्यांनी यावेळी केले. आर्थिक मंदीमुळे फटका बसलेल्या समाजातील दुर्बल घटकांना मदत करण्यासाठीचे सरकारचे हे प्रयत्न होते.

Pradhan Mantri Mudra Yojana: Introduction & Eligibility | Pixr8

मुद्रा शिशु कर्जाबद्दल महत्वाच्या गोष्टी येथे जाणून घ्या:

मुद्रा योजना म्हणजे काय ?
२०१५-१६ मध्ये, एनडीए सरकारने लहान कंपन्यांपर्यंत पतपुरवठा करण्यासाठी तसेच उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या आर्थिक समावेशास प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान मुद्रा योजना (पीएमएमवाय) जाहीर केली. मायक्रो युनिट डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी (मुद्रा) ही बँकांनी आणि इतर कर्ज देणाऱ्या संस्थांकडून लघु कर्जदारांना दहा लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यासाठी सुरू करण्यात आली.

या योजनेंतर्गत शिशु, किशोर व तरुण या तीनही प्रकारांत १० लाख रुपयांपर्यंतची कोलेटरल फ्री कर्जे दिली जातात. ‘किशोर’ योजनेमध्ये ५०,००१ ते ५ लाख रुपयांपर्यंतची कर्जे दिली जातात. यामधील तिसरी श्रेणी ही ५-१० लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठीची आहे.

या निर्णयामुळे मुद्र शिशु कर्जाअंतर्गत ५०,००० रुपयांपर्यंतच्या लहान कर्जदारांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. सुमारे दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे अनेक छोट्या व्यवसायांना मोठा फटका बसला आहे. यामुळे कर्जदारांच्या कर्जाची परतफेड करण्याच्या क्षमतेवर देखील परिणाम झाला आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामण काय म्हणाल्या ?
अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी गुरुवारी सांगितले की, सरकारी मुद्रा शिशु योजनेंतर्गत जे लोक वेळेवर कर्जाची परतफेड करतात त्यांना पुढील १२ महिन्यांच्या कालावधीसाठीच्या व्याजदरात २% सूट देण्यात येईल. या योजनेचा फायदा ३० दशलक्षाहून अधिक लोकांना होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक मदत पॅकेजअंतर्गत सरकारने जाहीर केलेल्या उपाययोजनांचा हा दुसरा भाग होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडिया बॅगा भरणार; BCCI सरकारच्या परवानगीची पाहत आहे वाट

मुंबई । सध्या कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा पूर्णपणे ठप्प झाल्या आहेत. मात्र श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयला जुलै महिन्यातला प्रस्तावित दौरा खेळण्याची विनंती केली होती. त्यावर केंद्र सरकारने परवानगी दिल्यास भारतीय संघ जुलै महिन्यात श्रीलंकेचा दौरा करण्यास तयार असल्याचं बीसीसीआयने स्पष्ट केलं. या दौऱ्यासाठी भारतीय संघाला क्वारंटाइन सुविधा तयार करुन देण्याची तयारी श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने दाखवली आहे. याचसोबत या दौऱ्यातले सर्व सामने प्रेक्षकांविना खेळवण्यासही श्रीलंकन क्रिकेट बोर्ड तयार आहे. श्रीलंका दौऱ्यात टीम इंडिया ३ वन-डे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे.

बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी हिंदुस्थान टाईम्सशी बोलताना म्हटलं कि, “लॉकडाउन संदर्भात केंद्र सरकार काय निर्णय घेतं आणि काय नियम आखून देतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. जर भारतीय संघाच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जाणार असेल तर आम्ही श्रीलंकेविरुद्ध मालिका खेळण्यास तयार आहोत.” दरम्यान, भारतात पुन्हा एकदा क्रिकेट सुरु व्हावं यासाठी बीसीसीआयही प्रयत्नशील आहे.

कोरोनाचा प्रभाव कमी असलेल्या भागात भारतीय खेळाडूंना सरावाची परवानगी मिळते का याची चाचपणी बीसीसीआयचे अधिकारी करत आहेत. सध्या सर्व क्रिकेट बोर्डांना कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आर्थिक फटका बसला आहे. भारतीय संघाने श्रीलंकेचा दौरा केल्यास लंकन क्रिकेट बोर्डासाठी हा दौरा आर्थिक दृष्टीकोनातून फायदेशीर ठरणार आहे. मात्र त्यासाठी भारतातील केंद्र सरकार लॉकडाउनसंदर्भात काय निर्णय घेतं याची वाट पहावी लागणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

जेव्हा मुलाला दुखापत होते तेव्हा आई त्याला कर्ज देत नाही; पंतप्रधानांनीही शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे पाठवावेत – राहुल गांधी

नवी दिल्ली । काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या देशातील विविध पत्रकार आणि विचारवंतांशी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर चर्चा करत आहेत. आज राहुल यांनी काही पत्रकारांसोबत व्हिडीओ कॉन्फेरंसिंग द्वारा संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटींच्या पॅकेजवर टीका करत शेतकरी आणि कामगारांच्या थेट खात्यावर सरकारने पैसे पाठवावेत अशी मागणी केली. जेव्हा मुलाला दुखापत होते तेव्हा आई त्याला कर्ज देत नाही. पंतप्रधान मोदींनीही शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे पाठवावेत असं म्हणत गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवला.

आज आपल्या गरीब जनतेला पैशांची गरज आहे, मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती करतो की त्यांनी या पॅकेजवर पुनर्विचार करावा. सरकारने मनरेगाच्या कामगारांना २०० दिवसांसाठीची रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा करावी. तसेच शेतकऱ्यांनाहि कर्ज न देता त्यांना थेट आर्थिक सहाय्य करत त्यांच्या खात्यावर थेट रक्कम हस्तांतरित करावी असे आवाहन राहुल गांधी यांनी केले आहे. हे लोक आपले भविष्य आहेत असंही राहुल यांनी यावेळी म्हटले आहे.

दरम्यान, रस्त्यावर येणाऱ्या परप्रांतीयांना कर्जाची गरज नसून पैशांची गरज आहे. तसेच कोरोनामुळे संकटात असलेल्या शेतकरी वर्गाला कर्जाची नव्हे तर पैशांची गरज आहे.मुलाला दुखापत होते तेव्हा आई त्याला कर्ज देत नाही तर ती त्याच्या पाठीशी उभी राहते. तेव्हा हे समजून घेऊन पंतप्रधान मोदींनी आपल्या पॅकेजवर पुनर्विचार करावा असे आवाहन राहुल गांधी यांनी केले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

वानखेडेच्या पिचवर आता कोरोनाचा सामना; स्टेडियमवर क्वारंटाईन जम्बो सेंटर उभारणार

मुंबई । राज्यावर कोरोनाचे संकट कायम आहे. जून महिन्यात कोरोना विषाणू बाधितांचा आकडा वाढू शकतो, अशी भीती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. कोरोनाचा संकटाचा सामना करण्यासाठी लाखभर खाटांची व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली. त्याचवेळी वानखेडे स्टेडियमवर क्वारंटाईन जम्बो सेंटर उभारणार येणार आहे. त्यादृष्टीने मुंबई महापालिकेने तयारी सुरु केली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनला पत्रही लिहिलेले आहे असंही त्यांनी सांगितलं. त्यामुळं एरवी भारतीय संघ ज्या वानखेडे स्टेडियमवर प्रतिस्पर्धी संघांचा सामना करतो आता त्या मैदानात कोरोनाचा सामना होऊ शकतो.

दरम्यान, काल मुंबईतल्या वांद्रे-कुर्ला संकुलातील विशेष कोविड रुग्णालयाची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांकडून पाहणी करण्यात आली. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गोरेगावातल्या कोरोना केअर सेंटरला भेट दिली. त्याचवेळी वानखेडे स्टेडियमवर क्वारंटाईन जम्बो सेंटर उभारण्याची संकल्पना ठेवण्यात आली. बीएमसीने वानखेडे स्टेडियमवर कोरोनव्हायरसचा मुकाबला करण्यासाठी कोविड -१९ रुग्णांना क्वारंटाईन करण्यासाठी जागा मागितली आहे. याबाबत एमसीएला पत्र पाठविण्यात आले आहे. त्यानुसार येथे ५०० खाटांसाठी जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) ने शुक्रवारी मुंबई क्रिकेट असोसिएशनला (एमसीए) वानखेडे स्टेडियमची काही सुविधा वापरण्याबाबत नोटीस बजावली आहे. ‘ए’ प्रभागातील सहाय्यक महानगरपालिका आयुक्त चंदा जाधव यांनी जारी केलेल्या पत्रात “हॉटेल, लॉज, क्लब, कॉलेज, प्रदर्शन केंद्रे, वसतिगृह,विवाहगृह, जिमखाना, मेजवानी हॉल तातडीने देण्यात यावेत” अशी विनंती केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”