Thursday, December 25, 2025
Home Blog Page 5803

सोशल मीडियावर अमेरिकेतील ‘हा’ एका वर्षाचा ‘लिटिल शेफ’ का प्रसिद्ध होतो आहे, पहा व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल प्रत्येकजण कोरोना विषाणूमुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे आपल्या स्वयंपाकघरात नवनवीन पदार्थ बनवताना दिसत आहे. यापैकीच एका छोट्या शेफची छायाचित्रेही सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. अमेरिकेच्या व्हर्जिनिया राज्यातील एक वर्षाचा असलेला लिटिल शेफ कोबेने आपल्या इंटरेस्टिंग व्हिडिओंद्वारे इंस्टाग्रामवर लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. तो सोशल साइटवर लोकांना किचनमध्ये स्वयंपाक करण्यासाठी नवीन टिप्स देताना दिसतो आहे.

अमेरिका का एक साल का 'नन्‍हा शेफ' क्‍यों हो रहा है मशहूर, देखें वीडियो

या लिटिल शेफच्या इन्स्टाग्राम अकाऊंटचे नाव बदलून आता ‘कोबे ईट्स’ असे करण्यात आले आहे . आतापर्यंत त्याचे ५ लाख, १४ हजाराहून अधिक फॉलोअर्स झालेले आहेत. ‘फूड डॉट कॉम’ एनडीटीव्हीच्या एका वृत्तानुसार असे सांगितले गेले आहे की त्याचे आई-वडील कोबेचे हे अकाउंट सांभाळतात आणि कोबेचा व्हिडिओ देखील तेच पोस्ट करतात, ज्यामध्ये त्याने आपल्या स्वयंपाकघरात बर्‍याच रंजक पद्धतीने डिशेस तयार करत असताना दिसून येतो.


View this post on Instagram

 

Lets make a smoothie for a snack! ????not too much spinach tho

A post shared by KOBE EATS (@kobe_yn) on May 8, 2020 at 1:14pm PDT

 

कोबेच्या प्रत्येक व्हिडिओला इन्स्टाग्रामवर हजारो लाईक्स मिळतात, ज्यामध्ये तो आपल्या आई अ‍ॅशलीच्या मदतीने मनोरंजकपणे स्वयंपाक कसा करावा हे शिकवतो. सुरुवातीला, तो आपल्या आईसह डिशेसच्या व्हिडिओवर रेटिंग देताना दिसला, त्यानंतर त्याने स्वतःच स्वयंपाक करण्यास सुरवात केली. यानंतर त्याचे व्हिडिओ खूपच व्हायरल होऊ लागले. कोबेकडे एक यूट्यूब चॅनेल देखील आहे ज्याला २ लाखाहून अधिक लोकांनी सब्‍सक्राइब केले आहे. त्याच्या फेसबुक अकाऊंटबरोबरच त्यांच्या वैयक्तिक वेबसाईटवरही लोकांचे खूप प्रेम मिळत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

राज्यात CRPFच्या २० कंपन्या पाठवा; राज्य सरकारची केंद्राकडे मागणी

मुंबई । राज्यातील पोलिसांच्या मदतीसाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या २० कंपन्या पाठवण्याची मागणी महाराष्ट्र सरकारनं केंद्राकडं केल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज दिली. राज्यात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. जवळपास गेले दोन महिने राज्यातील पोलीस अहोरात्र कार्यरत आहेत. लॉकडाऊनचे नियम कठोरपणे राबवण्याची जबाबदारी सांभाळतानाच पोलिसांना कायदा व सुव्यवस्थेकडंही लक्ष द्यावं लागत आहे. त्यामुळं त्यांच्यावर अतिरिक्त ताण येत आहे. त्यातच राज्यात एक हजारांहून अधिक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कोरोनामुक्त झालेल्या पोलिसांना काही दिवस क्वारंटाइन राहावं लागणार आहे. शिवाय, अनेक पोलिसांना विश्रांतीची गरज आहे. तसेच येत्या २५ मे रोजी रमझान ईदही असल्यानं कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीनं केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) २० कंपन्या म्हणजेच २००० हजार सशस्त्र पोलिसांची मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केंद्राकडे केली आहे.

“राज्यात राज्य राखीव पोलीस दलाचे ३२०० पोलीस कर्मचारी कार्यरत आहे. त्यांच्या मदतीने राज्यात सध्या पोलीस दल कार्यरत आहे. मात्र पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांना विश्रांतीची गरज आहे. त्यातच येत्या काळात रमाझान ईदचा सण आहे. त्यादृष्टीनं राज्यात कायदा सुव्यवस्था राखणं आवश्यक आहे. त्यामुळे राज्यात तातडीनं केंद्रीय सशस्त्र दलाचे २००० पोलीस म्हणजेच २० कंपन्या पाठवाव्यात,” अशी मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केंद्राकडे केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलीकडंच फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेला संबोधित केलं होतं. मुंबईत लष्कर बोलवलं जाणार नाही, असं त्यावेळी ते म्हणाले होते. मात्र, गरज पडल्यास पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी केंद्रीय पोलीस दलाची मदत घेतली जाईल, असंही त्यांनी सांगितलं होतं. त्यानुसार राज्यानं ही मागणी केली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात आत्तपार्यंत ८१९ पोलिसांना करोनाची लागण झाली आहे. तर सात पोलिसांचा करोनाची लागण होऊन मृत्यू झाला असल्याची माहिती मंगळवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करुन दिली होती.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Twitter ने आपल्या कर्मचार्‍यांसाठी केली मोठी घोषणा, कायमचे Work From Home करण्यासाठी दिली सूट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊनमुळे अनेक देशांमध्ये कंपन्यांनी आपल्या कर्मचार्‍यांना वर्क फ्रॉम होम करण्याचा सल्ला दिला आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी अद्याप कोणतीही लस उपलब्ध झालेली नाही आहे. म्हणूनच, हा संसर्ग टाळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे सोशल डिस्टंसिंग. हेच लक्षात घेऊन ट्विटरने आपल्या कर्मचार्‍यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सी यांनी आपल्या कर्मचार्‍यांना कायमचे वर्क फ्रॉम होम करण्याचा पर्याय दिला आहे. याचा अर्थ असा की आता कोविड-१९ चा उच्चटन झाल्यानंतरही ट्विटरचे कर्मचारी वर्क फ्रॉम होम करू शकतील.

Twitter grants employees option to work from home 'forever ...

ट्विटर, फेसबुक, अल्फाबेट (गूगल) आणि इतरही अनेक मोठ्या मल्टीनॅशनल कंपन्यांनी ही पावले उचलली आहेत. त्याचबरोबर कंपन्यांनी आता आपल्या सर्व कर्मचार्‍यांना या वर्षाच्या अखेरपर्यंत वर्क फ्रॉम होम करण्यास सांगितले आहे. डोर्सी यांनी आपल्या सर्व कर्मचार्‍यांना मंगळवारी ई-मेलद्वारे अनिश्चित काळासाठी वर्क फ्रॉम होम करण्याचा पर्याय दिला आहे.मात्र हा पर्याय कार्यालयातील सफाई कामगार आणि सुरक्षा कर्मचार्‍यांना लागू होणार नाही, परंतु जे लोक ऑनलाइन किंवा संगणकावर काम करतात त्यांनाच लागू होईल. ट्विटरची नवी दिल्ली, लंडन आणि सिंगापूरसह जगभरात ३५ कार्यालये आहेत.

Twitter to let employees work from home indefinitely ...

सप्टेंबरपूर्वी कार्यालय सुरू होण्याची शक्यता नाहीः ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी
ट्विटरच्या प्रवक्त्याने माध्यमांना सांगितले की आम्ही विचारशील आहोत. आम्ही अशा कंपन्यांपैकी एक आहोत ज्यांनी प्रथम वर्क फ्रॉम होम मॉडेल सुरू केले. डोर्सी म्हणाले की, सप्टेंबरपूर्वी ट्विटरचे कार्यालय सुरू होण्याची सुतारामही शक्यता नाही. ट्विटर ही पहिल्या टेक कंपन्यांपैकी एक होती ज्यांनी पहिलेच आपल्या ५००० कर्मचार्‍यांना वर्क फ्रॉम होम करणे अनिवार्य केले.

जुलैमध्ये फेसबुक-गूगलचे कार्यालय सुरू होऊ शकते
ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉन इंडियाने आपल्या कर्मचार्‍यांना ऑक्टोबरपासून काम करण्यास परवानगी दिली आहे. ६ जुलैपासून फेसबुक आपले कार्यालय सुरू करेल तसेच गूगल कर्मचारीही जुलैच्या सुरूवातीस कार्यालयात जाऊ शकतात, परंतु बहुतेक लोक हे वर्क फ्रॉम होमच करतील.

Twitter claims more diversity in 2017 but that's not what data ...

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेलं पॅकेज पुरेसं आहे, पण..’- पृथ्वीराज चव्हाण

सातारा । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनमुळे ठप्प पडलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी तब्बल २० लाख कोटींचं आर्थिक पॅकेज जाहीर केलं आहे. या पॅकेजच्या घोषणेनंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहे. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेलं पॅकेज मला पुरेसं वाटत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. सोबतच २० लाख कोटी हे रोखीने खर्च करणं अपेक्षित असून अमेरिकेतील लेंडिंग आणि स्पेंडिंग धोरणानुसार विचार करणे अपेक्षित असल्याचं मत त्यांनी नोंदवलं आहे. पण या पॅकेजमध्ये आरबीआयने केलेली मदत गृहित धरली जाऊ नये असंही ते म्हणाले.

पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेल्या पॅकेजवर समाधान व्यक्त करत चव्हाण म्हणाले,“अमेरिकेने जीडीपीच्या ११ टक्के, जपानने १० टक्के, जर्मनीने २२ टक्के इतकं आर्थिक पॅकेज जाहीर केलं आहे. त्यामुळे २०४ लाख कोटींची अर्थव्यवस्था असणाऱ्या भारताने १० टक्के खर्च करणं अपेक्षित होतं. आता लोकांना विश्वास देणे आवश्यक आहे. उत्पादन वाढून पुरवठा जरी झाला तरी मागणी कशी वाढेल याकडे लक्ष द्यावं लागेल. अर्थव्यवस्थेचं चक्र फिरतं ठेवायचं असेल तर कामगार, शेतकऱ्यांच्या खिशात पैसे पोहोचणं गरजेचं आहे,” असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं आहे.

“कामगारांचे पैसे देण्यासाठी उद्योग, कंपन्यांकडे पैसे नाहीत. लॉकडाउनच्या काळात कामगारांना टिकवायचं असेल तर त्यांना थेट पैसे देण्याची गरज आहे. लघु उद्योगांना चालना आवश्यक आहे. लोकांच्या खिशापर्यंत कसा पोहोचवायचा याचा विचार केला पाहिजे. देशातील ग्रामीण भागात रोजगार निर्मितीसाठी मनरेगा हा एक चांगला मार्ग आहे. शहरी भागात मनरेगासारखा मोठा कार्यक्रम राबवता येऊ शकतो पाहिजे,” असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

राज्य शासनाने ‘त्या’ यादीत छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा समावेश करावा- अमोल कोल्हे

मुंबई । राज्य सरकारच्या थोर महापुरुषांच्या यादीत सुधारणा करून त्यात छत्रपती संभाजी महाराजांचं नावाचा समावेश करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली आहे. थोर महापुरुषांच्या यादीत छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख करण्यात आलेला नाही. राज्य सरकारनं यात लक्ष घालून तात्काळ सुधारणा करावी,’ अशी विनंती डॉ. कोल्हे यांनी केली आहे.

खासदार डॉ. कोल्हे यांनी या संदर्भातील बाब सरकारच्या निदर्शनास आणून देत याविषयी ट्विट केलं आहे. ‘महाराष्ट्राच्या ज्वलंत इतिहासात छत्रपती संभाजी महाराजांचं योगदान न विसरता येण्यासारखं आहे. मात्र, सरकारनं बनविलेल्या थोर महापुरुषांच्या दिनविशेष यादीत संभाजी राजेंच्या नावाचा उल्लेख नाही. यात सुधारणा व्हायला हवी,’ असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. या ट्विटमध्ये कोल्हे यांनी मुख्यमंत्री कार्यालय व सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटला टॅग केलं आहे.

खासदार असलेले डॉ. कोल्हे हे एक उत्तम अभिनेते म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहेत. छोट्या पडद्यावर त्यांनी आतापर्यंत अनेक व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेमुळं ते महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले आहेत. दरम्यान, राज्य सरकारच्या थोर महापुरुषांच्या यादीत सुधारणा करून त्यात छत्रपती संभाजी महाराजांचं नावाचा समावेश करावा या डॉ. कोल्हे यांच्या मागणीला नेटकऱ्यांनीही जोरदार पाठिंबा दिला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

सांगली जिल्ह्यात आणखी तिघांना कोरोनाची लागण

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे

सांगली जिल्ह्याचा ऑरेंज झोनमध्ये समावेश झाल्यानंतर प्रशासनाकडून काही प्रमाणात शिथिलता देण्यात आल्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे आज स्पष्ट झाले. सांगली मिरज आणि जत तालुक्यातील अंकलेत मध्ये आणखी तिघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. मिरज होळीकट्टा येथील ६८ वर्षीय महिला, सांगली येथील फौजदार गल्लीतील ४० वर्षीय महिला तर अंकले येथील कोरोना बाधित ठरलेल्या रुग्णाचा सहकारीही कोरोनाबाधित झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा ११ वर पोहोचली.

जिल्ह्यातील कोरोनाबधित रुग्णांची संख्या कमी झाल्याने ३ मेपासून काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. नोकरी उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने लोक मोठ्या प्रमाणात बाहेर येत आहेत त्यामुळे कोरण्याचा संसर्ग पुन्हा वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. वाळवा तालुक्यातील कामेरी येथील ९४ वर्षे आजी कोरणा मुक्त झाली होती त्यामुळे रुग्णांची संख्या कमी होण्याचे संकेत होते मात्र मंगळवारी पुन्हा जिल्ह्यात आणखी तिघे जण करीत असल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले.

Five more members of Sangli family test positive

सांगलीतील विजय नगर आणि महसूल कॉलनीमध्ये दोन रुग्ण सापडल्यानंतर फौजदार गल्लीतील ४० वर्षीय महिलेमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली. त्यामुळे त्या महिलेची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याशिवाय मिरज होळीकट्टा येथील ६८ वर्षीय महिले मध्येे कोरोना ची लक्षणेेे आढळून आली. त्यामुळे त्या महिलेची कोरोना चाचणी घेण्यात आली तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

मुंबईमध्ये अंकले येथील चौघेजण कामासाठी होते. चौघे जण बुधवारी चेंबूर येथून नागज फाटा येथे आले होते. या चौघांना गावकऱ्यांनी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत कॉरंटाईन केले होते. या चौघांमध्ये एकाची लक्षणे संशयास्पद लक्षणे आढळली होती. तेथे त्यांच्या स्वॅबची तपासणी केल्यानंतर त्याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. त्या कोरोना बाधित ठरलेल्या रुग्णाचा सहकारीही कोरोना बाधित झाला आहे.

List of coronavirus test centres in India | Condé Nast Traveller ...

कोरोनाबाधित रुग्ण सापडलेल्या ठिकाणी शासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना तात्काळ सुरू केले असून कॉन्टॅक्ट ट्रेसिंग चालू आहे. या ठिकाणी वैद्यकीय पथके रवाना झाली आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी दिली. सद्यस्थितीत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 11 वर पोहोचली असून मिरजेतील कोविड रुग्णालयातील आयसोलेशनमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Nine of Sangli family test positive, Maharashtra's Covid-19 cases ...

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

… म्हणून अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, ‘सॉरी’

नवी दिल्ली । काल देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर तब्बल २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली. आत्मनिर्भर भारत अभियानाचा नारा देत या पॅकेजमुळे देश झेप घेईल, असा आशावादही मोदींनी व्यक्त केला. मोदींच्या घोषणेनंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याविषयीचं एक ट्विट केलं. या ट्विटमध्ये त्यांच्याकडून पॅकेजसंदर्भात माहिती देताना चूक झाली. आपली चूक झाल्याचं लक्षात येताच त्यांनी त्यात दुरुस्ती केली. त्याचबरोबर झालेल्या चुकीबद्दल माफी मागायलाही त्या विसरल्या नाही.

याबाबतचं सविस्तर वृत्त असं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली. या घोषणेनंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विट करून याची माहिती दिली. मात्र, ट्विट करताना २० लाख कोटी रुपयांऐवजी त्यांच्याकडून २० लाख असं लिहिलं गेलं. ही चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी लगेच दुरुस्त केली. “टाईप करताना चूक झाली असून, २० लाख ऐवजी २० लाख कोटी असं वाचावं,” असं म्हणत त्यांनी नम्रपणे झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली.

दरम्यान, देशात कोरोनाच्या संकटानं अडचणींमध्ये मोठी भर घातली आहे. एकीकडं आरोग्य क्षेत्रातील समस्यांना तोंड देत असताना आर्थिक संकटही लॉकडाउनमुळं गंभीर होताना दिसत आहे. लॉकडाउनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाल्यानं बेरोजगारीबरोबर इतर आर्थिक आव्हान उभी राहिली आहेत. अशा परिस्थितीत केंद्र सरकारनं मोठ्या पॅकेजची घोषणा करावी, अशी मागणी राजकीय नेत्यांसह विविध क्षेत्रातील व्यक्तींकडून केली जात होती. अखेर केंद्र सरकारनं अर्थजगतासह देशातील विविध घटकांना दिलासा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशवासीयांशी संवाद साधताना २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

चेकपोस्टवर ट्रकखाली चिरडून शिक्षक ठार

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे

डफळापूर जवळील चेकपोस्टवर पोलिसांसोबत नाकाबंदीच्या ठिकाणी मदतीस म्हणून ड्युटीवर असलेल्या शिक्षकाला चेकपोस्टवरून पळालेल्या भरधाव ट्रक चालकाने अंगावर ट्रक घालून चिरडले. त्यात मदतनीस शिक्षक जागीच ठार झाला. ही दुर्दैवी घटना डफळापूर स्टँड नजिक मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास घडली.

नानासाहेब कोरे असे ठार झालेल्या शिक्षकांचे नाव आहे. सदरचे शिक्षक हे कोळी वस्ती येथे जिल्हा परिषद मराठी शाळेत शिक्षक म्हणून नोकरीस होते. या दुर्घटनेत संजय बसगौंडा चौगुले हा थोडक्यात बचावला आहे.

शिंगणापूर नजिकच्या तपासणी नाक्यावर कोरे हे शिक्षक नियंत्रण कर्मचारी म्हणून कर्तव्य बजावत होते.सोमवारी रात्रीच्या ड्युटीवर होते.याचवेळी रात्री तीनच्या सुमारास सीमेंट भरलेला ट्रक कर्नाटक राज्यातून अथणी तालुका येथून जतकडे निघाला होता.दरम्यान त्या ठिकाणी डयुटीवर असणारे शिक्षक नानासो कोरे यांनी ट्रकला थांबण्याचा ईशारा केला मात्र ट्रक चालकाने ट्रक थांबवला नाही उलट कोरे यांना शिवीगाळ करुन तेथुन निघुन गेला.

त्यास परत थांबविण्यासाठी चौगुले व कोरे यांनी ट्रकचा डफळापूर पर्यंत पाठलाग केला.त्यांनी त्याची गाडी ट्रकच्या पुढे काढली. गाडी बाजुला लावुन परत ट्रक थांबवण्यास सांगितले असता, ट्रक चालकाने ट्रक न थांबवता शिक्षक कोरे याना ट्रकने उडवुन दिले. यात कोरे जागीच ठार झाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

”कसोटी क्रिकेट तेव्हाच संपेल जेव्हा भारत हे क्रिकेट खेळणार नाही”- ग्रेग चॅपेल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसमुळे रखडलेल्या क्रिकेट कार्यक्रमामुळे बर्‍याच क्रिकेट मंडळांना सध्या आर्थिक पेचप्रसंगाचा सामना करावा लागत आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने तर आपल्या प्रशिक्षक कर्मचार्‍यांचे पगारही कमी करण्यास सुरवात केली आहे. त्याचबरोबर असेही एक वृत्त आहे की या वर्षाच्या अखेरीस जर भारताने ऑस्ट्रेलियाचा दौरा केला नाही तर ऑस्ट्रेलियाला खूप नुकसान होईल आणि त्यांना कोट्यवधी डॉलर्सचे कर्ज घ्यावे लागू शकते.

त्याचवेळी ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे की जेव्हा या साथीच्या नंतर क्रिकेट पुन्हा सुरू होईल तेव्हा कसोटी क्रिकेटला याचा खूप त्रास होईल आणि जर भारताने यासाठी मदत केली नाही तर हे स्वरूपही संपेल. .

Test cricket will die the day India leaves it - Greg Chappell- India TV

चॅपेल हे फेसबुक लाइव्हवर म्हणाले की, ” कसोटी क्रिकेट तेव्हाच संपेल जेव्हा भारत हे क्रिकेट खेळणार नाही. भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या देशांव्यतिरिक्त अन्य देश कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी युवा क्रिकेटपटूंमध्ये गुंतवणूक करताना दिसत नाहीत.” “

चॅपेल पुढे म्हणाले, “मी टी -२० च्या विरोधात आहे असे नाही. ते जनतेमध्ये नेणे खूप सोपे आहे. कसोटी क्रिकेटसाठी आर्थिक प्रश्न हा खूप मोठा होणार आहे. भारतीय कर्णधार विराट कोहलीने या कसोटीला ‘अल्टिमेट क्रिकेट’ असे संबोधले आहे. त्यामुळे आशा आहे की ते टिकेल. “

तसे, चॅपेलची गणना टीम इंडियाच्या सर्वात खराब प्रशिक्षकांमध्ये केली जाते. आपल्या ‘प्लेइंग इट माय वे’ या पुस्तकात सचिन तेंडुलकरने चॅपेलला रिंगमास्टर म्हटले होते, परंतु याच चॅपेलच्या कार्यकाळात टीम इंडियाने धावांचा पाठलाग करताना एका वर्षात सलग १७ सामने जिंकले आहेत. चॅपेलच्या येण्यापूर्वी भारताचा रन चेज रिकॉर्ड खूप खराब होते. चॅपेल याच्या कार्यकाळातच भारताने तब्ब्ल ३५ वर्षांनंतर वेस्ट इंडिज मध्ये कसोटी मालिका जिंकली आणि त्याच वर्षी दक्षिण आफ्रिकेत भारताने पहिली कसोटीही जिंकली.

What Greg Chappell did was a mistake: Sourav Ganguly on being ...

आपल्याच कार्यकाळात चॅपेलने धोनीसारख्या खेळाडूलाही भारतीय संघात आणले. एकदा तर धोनीची ताकद पाहून चॅपल देखील आश्चर्यचकित झाला होता. धोनीबद्दल बोलताना तो म्हणाला की, “मी जेव्हा त्याला पहिल्यांदा फलंदाजी करताना पाहिले तेव्हा मला आश्चर्यच वाटले. त्यावेळी तो नक्कीच भारताचा सर्वात रोमांचक क्रिकेटपटू होता. तो सर्वात विलक्षण स्थानावरून होता बॉल मारत होता. तो मी पाहिलेला सर्वात शक्तिशाली फलंदाज आहे. “

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

मोदींनी जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजवर मनसेनं केला ‘हा’ परखड सवाल

मुंबई । काल देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर तब्बल २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. मनसेनं आर्थिक पॅकेजवरून भाजपला टोला हाणला आहे. मनसेच नेते संदीप देशपांडे यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

लॉकडाऊनमुळं ठप्प झालेली अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर आणण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी काल २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. महाराष्ट्रासह भाजपच्या देशभरातील नेत्यांनी मोदींच्या या घोषणेचं जोरदार स्वागत केलं आहे. मनसेचे देशपांडे यांनी भाजपला पीएम केअर फंडासाठी भाजप नेत्यांकडून केल्या गेलेल्या आवाहनांची आठवण करून दिली आहे. ”२० लाख कोटी रुपयांचं पॅकेज देणारे पीएम केअर फंडासाठी (PM Care Fund) एवढी जाहिरात का करत आहेत,” असा बोचरा सवाल मनसेच नेते संदीप देशपांडे यांनी भाजपाला केला आहे.

कोरोनाच्या संकटाशी लढण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी नव्यानं ‘पीएम केअर फंड’ अर्थात, मदतनिधी सुरू केला आहे. जनतेनं यात योगदान द्यावे, असं आवाहन भाजपकडून सातत्यानं करण्यात येत आहे. राज्यातील भाजप नेत्यांनी तर आपल्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींना सीएम केअर फंडाऐवजी पीएम केअर फंडात मदत करण्याचं आवाहन केलं होतं. त्यावरून भाजपवर टीकेची झोड उठली होती. मनसेनं आता नेमकं यावरच बोट ठेवलं आहे.

पंतप्रधान मोदींच्या कालच्या भाषणाची खिल्ली उडवण्यात काँग्रेस-राष्ट्रवादीही मागे राहिली नाही. संकटाचं संधीत रूपांतर करण्याचं आवाहन मोदींनी दरवेळी केलं असून ‘थाळी वाजवा, दिवे जाळा’ असा मोदींच्या या आवाहनाचा अर्थ आहे, असं काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही मोदींच्या भाषणातील काही शब्द ट्विट करून ‘पैचान कौन?’ असा प्रश्न विचारला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”