Thursday, December 25, 2025
Home Blog Page 5802

मोदी सरकार लघुउद्योगांसाठी ६ महत्त्वाची पावले उचलणार – निर्मला सीतारामन

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठे आणि धाडसी निर्णय घेण्यासाठी ओळखले जातात. भारताच्या विकास आणि वृद्धीसाठी आवश्यक असणारं व्हिजन डोळ्यासमोर ठेवूनच मोदींनी २० लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. १.७९ लाखांचं प्रधान मंत्री गरीब कल्याण पॅकेज कोरोना संकट चालू झाल्यानंतर लगेच देण्यात आलं असं सांगतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर योजनेद्वारे गरीब, कष्टकरी आणि दिव्यांगांना सर्वतोपरी मदत करण्यात येणार असल्याचं निर्मला सीतारामन पुढे म्हणाल्या.

लघुउद्योगाच्या दृष्टीने ६ महत्त्वाची पाऊले उचलणार असल्याचं निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं. यामध्ये ३ लाख करोड रुपयांचं कर्ज लघुउद्योजकांसाठी देण्याचं निर्मला सीतारामन म्हणाल्या.

१)मध्यम-सूक्ष्म आणि लघु, कुटीर आणि गृहउद्योगांना सध्या पैशांची कमतरता जाणवत असून या उद्योगाद्वारे देशातील १२ करोड लोकांना रोजगार मिळतो. या सर्व उद्योगांना ३ लाख कोटींचं विनातारणी कर्ज देण्याचं अर्थमंत्र्यांतर्फे सांगण्यात आलं.

२) सरकारतर्फे २० हजार करोड रुपयांची तरतूद आर्थिक तुटीत असलेल्या संस्थांना देण्यात येणार असून त्यांना चालना देण्यासाठी हे आवश्यक असल्याचं सांगण्यात आलं. देशातील ४५ लाख सूक्ष्म उद्योजकांना फायदा होण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी जाहीर केलेल्या पॅकेजची मदत होईल असंही यावेळी सांगण्यात आलं.

३) सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांना वाढीसाठी आवश्यक पैसे उपलब्ध होण्यासाठी ५० हजार कोटींची तरतूद करण्यात आली असून यासाठी ‘फंडांचा फंड’ काढण्यात येईल असंही सीतारामन यांनी यावेळी सांगितलं.

४) MSME (सूक्ष्म-मध्यम-मोठे उद्योगांची) व्याख्या बदलण्यात आली असून यातील गुंतवणुकीची मर्यादा वाढवण्यात आली आहे. लघुउद्योजकांसाठी १ करोड रुपयांची गुंतवणूक आणि ५ करोड रुपयांची उलाढाल आतापासून ग्राह्य धरण्यात येणार आहे. उत्पादन आणि सेवा पुरवठा करणाऱ्यांसाठी ही मर्यादा सारखीच राहील असं सांगण्यात आलं आहे. मध्यम उद्योगांसाठी १० करोड रुपयांची गुंतवणूक आणि ५० करोड रुपयांची उलाढाल तर मोठ्या उद्योगांसाठी २० करोड रुपयांची गुंतवणूक आणि १०० करोड रुपयांची उलाढाल ही सुधारणा करण्यात आली आहे.

५) ३ लाख करोड रुपयांची मदत जाहीर केल्यानंतर यांच्या कामात आणि स्पर्धेत वाढ होईल हे लक्षात घेऊन २०० कोटींपेक्षा मोठी असलेली जागतिक कंत्राटे घेतली जातील आणि ती या उद्योगांना जोडली जातील असं यावेळी सांगण्यात आलं.

६) ४५ दिवसांच्या मुदतीमध्येच या कर्जाचं वाटप करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

‘एअर इंडिया’ची विमान देशांतर्गत घेणार’ टेक ऑफ’; १९ मेपासून सेवा सुरू होणार!

नवी दिल्ली । लॉकडाऊनमुळे परदेशात अडकलेले अनेक भारतीय ‘एअर इंडिया’ची विमान मायदेशी पोहचत आहेत. अशा वेळी एअर इंडियानं देशांतर्गत सेवा सुरू करणार असल्याचं म्हटलं आहे. एअर इंडिया १९ मे ते २ जून दरम्यान विशेष देशांतर्गत विमान सेवा (डोमेस्टिक फ्लाईट) सुरू करणार आहे. यातील बहुतांश विमानं ही दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि बंगळुरूहून उड्डाण घेतील. एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या विमानांच्या उड्डाणांसाठी वेळापत्रकही तयार करण्यात आलं आहे. आता, केवळ नागरी उड्डाण मंत्रालयाकडून अधिकृतरित्या परवानगी मिळणं बाकी आहे.

एअर इंडियानं आखलेल्या नियोजनानुसार मुंबईहून विशाखापट्टणम, कोचीन, अहमदाबाद, बंगळुरू, हैदराबाद आणि विजयवाडासाठी विशेष विमान असेल. दिल्लीहून असणारी विमानं जयपूर, बंगळुरू, हैदराबाद, कोचीन, अहमदाबाद, विजयवाडा, गया, लखनऊ आणि इतर शहरांसाठी असतील. याशिवाय हैदराबाद ते मुंबई, दिल्ली तसंच बंगळुरू ते मुंबईसाठीही विमान असेल. दिल्ली ते हैदराबादसाठीही विमानसेवा एअर इंडियाकडून पुरवण्यात येणार आहे. याशिवाय भुवनेश्वरहूनन एक विमान बंगळुरूलाही उतरेल. दिल्लीसाठी १७३, मुंबईसाठी ४०, हैदराबादसाठी २५, कोचीनसाठी १२ तर चेन्नईसाठी एक विमान असणार आहे.

यातील बहुतेक विमानांची वेळ परदेशातून भारतात परतणाऱ्या नागरिकांच्या सुविधेसाठी असेल. परदेशातून मायदेशात दाखल होणाऱ्या नागरिकांना आपल्या राज्यात पोहचण्यासाठी या उड्डाणांचा वापर करता येईल. विमानात सोशल डिस्टन्सिंगचे नियमही पाळावे लागतील. नोटिफिकेशन जारी करण्यात आल्यानंतर या विशेष देशांतर्गत विमानांसाठी एअरलाईनच्या वेबसाईटवरून तिकीट बुकींग करावं लागेल. ‘एअरपोर्टस अथॉरिटी ऑफ इंडिया’च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डोमेस्टिक फ्लाईटस सुरू करण्याची तयारी सुरू आहे. कारण, लवकरच खासगी विमान कंपन्यांना देशांतर्गत सेवा सुरू करण्याची परवानगी मिळू शकते.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

देशभरात २४ तासांत १२२ जणांचा कोरोनाने मृत्यू; 3 हजार 525 नवे रुग्ण

नवी दिल्ली । देशात दिवसागणिक कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग अजूनही नियंत्रणात न आल्यानं लॉकडाऊनचा चौथा टप्पा जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, मागील २४ तासांत देशभरात 3 हजार 525 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर 122 जणांचा करोनाने बळी घेतला आहे. देशभरातील करोनाबाधितांची रुग्ण संख्या आता 74 हजार 281 वर पोहचली आहे. ज्यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले 47 हजार 480 रुग्ण, उपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेले 24 हजार 386 जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या 2 हजार 415 जणांचा समावेश आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

भारतात इतर देशांपेक्षा कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण सर्वात कमी म्हणजे सुमारे 3.2 टक्के इतके आहे. काही राज्यांमध्ये तर हे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षाही कमी आहे. या तुलनेत जागतिक कोरोना मृत्युदर 7.5टक्के राहिलेला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी मंगळवारी दिली. हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 14 दिवसांमध्ये रुग्णसंख्या दुप्पट होण्याचे प्रमाण 10.9दिवस होते. गेल्या तीन दिवसांमध्ये ते 12.2 दिवसांवर आले आहे. केवळ 2.37 टक्के रुग्णांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. 0.41 टक्के रुग्ण कृत्रिम श्वासोच्छवासावर आहेत, तर 1.82 रुग्णांना ऑक्सिजन द्यावा लागत आहे.

देशभरातील नमुना चाचण्यांची क्षमता प्रतिदिन १ लाखांवर पोहोचली असून गेल्या आठवडय़ात ती 95 हजार होती. 347 सरकारी तसेच, 137 खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांत आत्तापर्यंत 17 लाख 62 हजार 840 नमुना चाचण्या झाल्या आहेत. मागील २४५ तासांमध्ये 191 नमुना चाचण्या झाल्या असल्याचेही हर्षवर्धन यांनी सांगितलं.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

सीआयएच्या अहवालाच्या पार्शवभूमीवर चीनवर बंदी घालण्यासाठी अमेरिकी सीनेटर्सने संसदेत मांडले एक विधेयक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएकडे याबाबत ठाम पुरावे आहेत की जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) चीनच्या धमकीमुळे जगातील बाकीच्या देशांना कोरोना विषाणूचा इशारा दिला नाही. दरम्यान, अमेरिकेच्या नऊ प्रभावशाली सिनेटर्सच्या गटाने अमेरिकन संसदेत एक विधेयक मांडले आहे की, चीन कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या फैलावमागील कारणांबद्दल संपूर्ण माहिती पुरवित नाही आणि ते नियंत्रित करण्यास सहकार्यदेखील करत नाही, म्हणून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना चीनवर बंदी घालण्याची परवानगी देण्यात यावी.

‘कोविड -१९ अकाउंटबिलिटी अ‍ॅक्ट’ हे विधेयक सिनेटचे सदस्य लिंडसे ग्राहम यांनी तयार केले तसेच इतर आठ खासदारांनी त्याचे समर्थन केले आहे. मंगळवारी हे विधेयक सिनेटमध्ये मांडण्यात आले. या विधेयकात असे म्हटले आहे की अध्यक्ष ६० दिवसांच्या आत कॉंग्रेसमध्ये हे प्रमाणित करतील की चीनने युनायटेड स्टेट्स आणि त्याच्या सहयोगी संस्था किंवा यूएन-संलग्न संस्था जसे की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांच्या नेतृत्वात असलेल्या कोविड -१९ च्या तपासासाठी संपूर्ण माहिती पुरविली आहे आणि मांसाहारी वस्तूंची विक्री करणारी सर्व बाजारपेठा त्यांनी बंद केल्या आहेत, ज्यामुळे की प्राण्यांपासून मानवांमध्ये कोणताही संसर्ग होण्याचा धोका आहे.

त्यात असेही म्हटले आहे की, जर राष्ट्रपतींनी हे प्रमाणित केले तर त्यांनी चिनी मालमत्ता सील करण्याची, प्रवासावर निर्बंध लादणे, व्हिसा रद्द करणे, अमेरिकन वित्तीय संस्थांना चीनी व्यवसायांना कर्ज देण्यापासून रोखणे आणि चीनी कंपन्यांना अमेरिकन स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध केले जाणे यासारख्या आवश्यक गोष्टींवर निर्बंध लादण्याचा अधिकार त्यांना असेल. ग्राहम म्हणाले, “मला खात्री आहे की चीनी कम्युनिस्ट पक्षाने जर कोरोना विषयी अनेक गोष्टी लपविल्या नसत्या तर हा विषाणू अमेरिकेत पोहोचलाच नसता.”

ते पुढे म्हणाले, “चीनने आंतरराष्ट्रीय समुदायाला परीक्षणासाठी वुहान प्रयोगशाळेला भेट देण्यास नकार दिला आहे,” ते म्हणाले. मला वाटते चीनवर आत्ताच दबाव आणला गेला नाही तर तो या तपासणीला कधीही सहकार्य करणार नाही.

गेल्या वर्षी चीनच्या वुहानमध्ये झालेल्या या साथीमुळे ८०,००० हून अधिक अमेरिकन लोक मरण पावले आहेत. खुलासे झाल्यानंतर वॉशिंग्टन आणि बीजिंग यांच्यात आणखी तणाव वाढण्याची शक्यता आहे. हे उल्लेखनीय आहे की यामुळे जगभरात एकूण २,५०,००० लोक मरण पावले आहेत तसेच ४ दशलक्षांहून अधिक लोकांना चीनच्या वुहानमधून पसरलेल्या या कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

कोविड -१९ संसर्गामुळे मृत्यू कशा प्रकारे होतो, हे शास्त्रज्ञांना आढळले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे होणा-या रोगाची लक्षणे, त्याचे निदान आणि शरीरावर त्याचा कसा परिणाम होतो याचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ म्हणतात की कोविड -१९ मुळे होणारे मृत्यू मुख्यत: प्रतिकारशक्तीच्या अति-सक्रियतेमुळे होतो. ‘फ्रंटियर्स इन पब्लिक हेल्थ’ या जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या एका अभ्यासानुसार, संशोधकांनी टप्प्याटप्प्याने याबाबतीत वर्णन केले आहे की हा विषाणू श्वसनमार्गास कसा संक्रमित करतो, पेशींमध्ये गुणाकार कसा वाढवितो आणि गंभीर प्रकरणांमध्ये रोगप्रतिकारक शक्तीला अतिसंवेदनशील कसा बनवितो. ज्याला वैज्ञानिक भाषेत ‘साइटोकाईन स्टोर्म’ असे म्हणतात.

‘साइटोकाईन स्टोर्म’ हे पांढर्‍या रक्त पेशींच्या हायपरएक्टिव्हिटीची एक अवस्था आहे. या अवस्थेत रक्तामध्ये मोठ्या प्रमाणात सायटोकिन्स तयार होतात. या अभ्यासाचे लेखक आणि चीनमधील जुनिआय मेडिकल युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक, डायशुन लिऊ म्हणाले, “सार्स और मर्ससारख्या संक्रमणानंतरही असेच घडते.” आकडेवारीवरून आता असे दिसून आले आहे की कोविड -१९ मध्ये गंभीररित्या संक्रमित झालेल्या रुग्णांना ‘साइटोकाईन स्टोर्म सिंड्रोम’ असू शकतो. “

लियू पुढे म्हणाले, “अत्यंत वेगाने वाढणारी सायटोकिन्स अत्यधिक प्रमाणात लिम्फोसाइट आणि न्युट्रोफिल सारख्या रोगप्रतिकारक पेशींना आकर्षित करते ज्यामुळे या पेशी फुफ्फुसांच्या ऊतींमध्ये प्रवेश करतात आणि त्यामुळे फुफ्फुसांचे नुकसानही होऊ शकते .” असे म्हणतात की ‘स्टोर्ममुळे’ शरीरात तीव्र ताप आणि रक्त जमा होते.

ते म्हणाले की, पांढऱ्या रक्त पेशी यादेखील निरोगी ऊतींवर हल्ला करतात आणि फुफ्फुस, हृदय, यकृत, आतडे, मूत्रपिंड आणि जननेंद्रियावर विपरित परिणाम करतात ज्यामुळे त्यांचे काम करणे थांबते.ते म्हणाले की बर्‍याच अवयवांचे कार्य थांबल्यामुळे फुफ्फुसे कामी करणे थांबवू शकते या अवस्थेस ‘एक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम’ असे म्हणतात. संशोधकांनी सांगितले की कोरोना विषाणूमुळे होणारे बहुतेक मृत्यू हे श्वसन प्रणालीच्या समस्येमुळे होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

कोरोना संकट संपल्यानंतर देशात ३ तर राज्यात असंख्य राजकीय भूकंप होणार; चंद्रकांत पाटलांचं भाकीत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “कोरोना संकट संपल्यानंतर देशात तीन तर महाराष्ट्रात असंख्य भूकंप होणार आहेत,” असा गौप्यस्फोट भाजपा नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त बोलत होते. कोरोनाचं संकट संपल्यानंतर देशामध्ये तसंच राज्यातही काँग्रेसमध्ये अनेक भूकंप होणार असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यावरही टीका केली.

ते म्हणाले कि, “बाळासाहेब थोरात तुम्ही सांभाळा, तुमचा पक्ष जपा, तुम्हाला कुठेही भवितव्य नाही,” असा इशारा पाटील यांनी दिला. भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी क्रॉस व्होटिंगची काँग्रेसची ऑफर होती असा दावा केला होता. यावरही पाटील यांनी भाष्य केलं. “राजघराण्यातील जोतिरादित्य शिंदे यांना काँग्रेसला जपता आलं नाही. तर इतरांना काँग्रेस काय सांभाळणार,” असं म्हणत त्यांनी काँग्रेसला टोला लगावला.

म्हणून नाथाभाऊंना तिकीट नाकारलं
“भाजपा हा पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून प्रेरणा घेऊन काम करतो. आमच्या अजेंड्यामध्ये जशा वैचारिक गोष्टी आहेत, तशाच कार्यपद्धती हा आमच्या अजेंड्याचा भाग आहे. केवळ घरामधल्यांना मोठं करणं हा आरएसएसचा अजेंडा नाही,” असं सांगताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांना तिकीट का नाकारण्यात आलं याबाबत स्पष्टीकरणं दिलं आहे.

खडसेंनी पक्षात पालक, मार्गदर्शकाच्या भूमिकेत रहावं
इतक्या मोठ्या नेत्यानं पक्षाचे वाभाडे करताना विचार तर करायला हवा असं मत चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केलं. पक्षानं ८७-८८ पासून नाथाभाऊंना सात वेळा तिकिट दिलं. तसेच त्यांच्या मुलाला तिकिट दिलं. लोकसभा निवडणुकीच्यावेळी हरीभाऊ जावळेंना तिकिट न देता, त्यांच्या सुनेला तिकिट दिलं गेलं. त्यामुळे  खडसेंवर अन्याय होत नाही असा विचार केंद्रानं बहुतेक केला असेल” असं चंद्रकांत पाटील म्हणाले. नाथाभाऊंना तिकिट द्यायला हवं अशीच माझी आणि देवेंद्र फडणवीस यांची भूमिका होती, परंतु केंद्रानंच त्यांना तिकिट नाकारलं असल्याचं पाटील यांनी सांगितलं. ”केंद्रीला चुकीची माहिती दिली असं नाथाभाऊंच म्हणणं असेल तर तुम्ही केंद्राकडे जाऊ शकता, त्यांना जाब विचारा. आमच्याकडे पंतप्रधान मोदींपासून अमित शाहंपर्यंत सर्वांशी सहज संपर्क साधता येतो” असे पाटील म्हणाले. एकनाथ खडसे यांच्याबद्दल मला आदर आहे. त्यांनी पक्ष वाढवण्यासाठी मेहनत घेतली पण आता त्यांनी पालक, मार्गदर्शकाच्या भूमिकेत रहावं असे चंद्रकात पाटील यांनी सांगितले.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

रोहित शर्माने केलं मोठं विधान; म्हणाला धोनीने टीम मध्ये खेळायला हवं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय टीमचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या टीम मध्ये पुन्हा येण्याच्या बातमी वर अनेक कयास सध्या लावले जात आहेत. धोनीने आपला शेवटचा सामना हा इंग्लड मध्ये झालेल्या २०१९च्या विश्वचषकामध्ये खेळला होता. वर्ल्ड कप मध्ये न्यूझीलंड बरोबर झालेल्या उपांत्य सामन्यानंतर धोनी टीम मध्ये पुन्हा दिसलेला नाहीये. मात्र २९ मार्च पासून सुरु होणार असलेल्या IPL द्वारे तो क्रिकेटच्या मैदानात पुन्हा उतरणार होता. मात्र कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे हि स्पर्धा रद्द करण्यात आली त्यामुळे त्याचे पुनरागमन हे आणखी लांबणीवर पडले. आता टीम मध्ये त्याच्या पुनरागमनाच्या आणि निवृत्तीविषयीच्या चर्चेने जोर धरला आहे. अशातच टीम इंडियाचा उप कप्तान असलेल्या रोहित शर्माने याविषयी एक मोठे विधान केले आहे.

रोहित शर्माने इंस्टाग्राम लाइव्ह सत्रामध्ये सुरेश रैनाशी संवाद साधला.यावेळी त्या दोघांनी सीएसकेच्या या फलंदाजाला झालेल्या दुखापतीपासून ते महेंद्रसिंह धोनीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुनरागमना पर्यंत अनेक विषयांवर गप्पा मारल्या.

IPL 2019: Dhoni's absence a massive boost for Mumbai Indians, says ...

रोहितने रैनाशी बोलताना सांगितले की, सीएसकेच्या या फलंदाजाचे अष्टपैलू कौशल्य आणि अनुभव लक्षात घेऊन त्याला संघात स्थान मिळावे अशी संघात नेहमीच चर्चा असते.”मला माहित आहे की बरीच वर्षे खेळल्यानंतर टीममधून बाहेर पडणे हे खूपच कठीण आहे. आम्ही बोलू इच्छितो की आमच्याकडे काही प्रमाणात रैना संघात असावा. आपल्याकडे गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातील अनुभव व क्षमता आहे.

“मला असे वाटते की आम्ही तुला बर्‍याच दिवसांपासून खेळताना पाहिले आहे, कुठेतरी मला कुठेतरी असे वाटते की तू संघात परतला पाहिजे. परंतु नंतर आपण पाहुयात आपल्या हातात काय आहे ते,” असे रोहित शर्माने इंस्टाग्राम लाइव्ह सत्रामध्ये सुरेश रैना यांना सांगितले.

चेन्नई सुपर किंग्जचा भरवशाचा फलंदाज असलेला सुरेश रैना म्हणाला की तो राष्ट्रीय संघात पुनरागमन करण्याबाबत तो आशावादी आहे.

MS Dhoni and Suresh Raina have been the pillars of Chennai Super Kings' journey in the IPL. (@ChennaiIPL Photo)

“मला एक दुखापत झाली होती आणि त्यावर एक शस्त्रक्रियाही झाली जे संघातील माझे स्थान गमावले जाण्याचे एक मोठे कारण होते. माझ्याकडे अजूनही बरेच क्रिकेट शिल्लक आहे. मात्र निवड होणे हे आपल्या हातात नाही, चांगली कामगिरी करणे हे आहे. मी नेहमीच माझे क्रिकेट आणि मोठ्या खेळाडूंबरोबर खेळण्याचा आनंद लुटला आहे. आम्ही जेव्हा तरूण होतो तेव्हा सिनिअर्सने आम्हाला नेहमीच पाठिंबा दिला. त्यामुळे जेव्हा आम्हाला गरज असायची तेव्हा ते आम्हांला साथ द्यायचे आणि मार्ग दाखव्हायचे. “

टी -२०विश्वचषक स्पर्धेपूर्वी एमएस धोनीच्या पुनरागमन आणि भविष्याबद्दलही या दोघांनीही सांगितले. कोरोनाव्हायरसचा सर्व देशभर होणाऱ्या प्रसारा मुळे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२० मध्ये अनिश्चितता वाढत असतानाही त्याच्या आंतरराष्ट्रीय भवितव्याविषयी कयास वर्तविले जात आहेत. आयपीएलकडे धोनीचे संभाव्य पुनरागमन म्हणून पाहिले जात होते. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह टीम मॅनेजमेंटनेही त्याच्या टीम इंडियामध्ये परत येण्याची शक्यता नाकारली नव्हती.

कोरोना साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जने आयोजित केलेल्या क्रिकेटच्या सराव सत्रात धोनी चांगली फलंदाजी आणि विकेट किपींग करत होता.”मी त्याला पाहिले आणि तो इतकी चांगली फलंदाजी करीत होता, तो तंदुरुस्त आहे. फक्त त्याने काय योजना आखली आहे हेच फक्त त्यालाच माहित आहे परंतु त्याच्या कौशल्यानुसार तो चांगला दिसत होता. आता येथे लॉकडाउन सुरु आहे, त्यामुळे त्याच्या योजना काय आहेत हे मला माहित नाही . त्याच्याकडे अजूनही बरेच क्रिकेट बाकी आहे आणि तो चांगली फलंदाजीही करीत आहे,” असे रैनाने सांगितले.

Rohit Sharma and Raina jointly selected MI-CSK's playing XI ...

रोहित म्हणाला, “जर तसे असेल तर त्याने खेळायला हवे. मला आशा आहे की त्याने पुन्हा खेळण्यास सुरुवात केली आहे.हे पण फक्त त्यालाच माहिती आहे. जेव्हा कधी तो उपलब्ध होईल तेव्हा लोकांनीच त्याला त्याच्या योजना काय आहेत हे विचारायला हवे,” असे रैनाने पुढे सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

देवेंद्र फडणवीस एक सज्जन माणूस, ते सहन करतात म्हणून काहीही म्हणायचं काय- चंद्रकांत पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधान परिषदेच तिकिट नाकारल्यामुळे एकनाथ खडसे यांच्याकडून होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी आपली भूमिका मांडली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत या मुद्द्यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “देवेंद्र फडणवीस एक सज्जन माणूस असून ते सहन करतात म्हणून त्यांच्याबद्दल काहीही म्हणायचं, त्यांनी आता छाती फाडून दाखवायची का?” असा सवाल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खडसे यांच्या आरोपावर येवेळी उपस्थित केला.

दरम्यान, माझा पत्ता कट होण्यामागे केंद्रीय नेतृत्वाचा काहीही संबंध नाही. राज्यातील नेत्यांनीच पत्ता कट केला आहे. राज्यातील नेत्यांनीच केंद्रीय नेतृत्वाकडे माझ्याविरोधात विषपेरणी केली आहे, असा आरोप एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर आरोप केला होता. खडसे यांचा हा आरोप फेटाळताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ”मार्चमध्येच विधान परिषदेचे उमेदवार ठरले होते तसेच खडसे यांच्याबद्दल केंद्राला योग्य माहिती दिली गेली नाही हे दोन्ही आरोप चुकीचे आहेत. मी आणि देवेंद्र फडणवीस दोघांनी एकनाथ खडसे, बावनकुळे व पंकजा मुंडे यांना विधान परिषदेचं तिकिट मिळावं यासाठी प्रयत्न केले होते. ४ आणि ५ मे रोजी जेव्हा नाथाभाऊंना तिकिट मिळणार नाही याची कल्पना आली तेव्हा पर्यायी उमेदवार तयार ठेवायला नको का? उमेदवारीचा फॉर्म भरता आला नसता, नाचक्की झाली असती. म्हणून अन्य उमेदवारांना मुंबईत आणलं” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “केंद्रीला चुकीची माहिती दिली असं नाथाभाऊंच म्हणणं असेल तर तुम्ही केंद्राकडे जाऊ शकता, त्यांना जाब विचारा. आमच्याकडे पंतप्रधान मोदींपासून अमित शाहंपर्यंत सर्वांशी सहज संपर्क साधता येतो” असे पाटील म्हणाले. एकनाथ खडसे यांच्याबद्दल मला आदर आहे. त्यांनी पक्ष वाढवण्यासाठी मेहनत घेतली पण आता त्यांनी पालक, मार्गदर्शकाच्या भूमिकेत रहावं असे चंद्रकात पाटील यांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

न्यूयॉर्कच्या किनाऱ्यावर आढळला शेपटीवर दात असलेला एक विचित्र प्राणी, व्हिडिओ पहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील ब्राइटन बीचवर एक विचित्र प्राणी सापडला आहे. समुद्रात राहणारा हा प्राणी मेला होता पण असा प्राणी यापूर्वी कधीही दिसलेला नाही. तो समुद्रातून वाहत आला होता आणि त्यानंतर त्याला पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमली. या प्राण्याचे मृत शरीर शास्त्रज्ञांकडे दिले गेले आहे जेणेकरुन हा प्राणी नेमका काय आहे हे समजू शकेल.

डेली स्टारच्या वृत्तानुसार, ब्राइटन बीचजवळ राहणारी लिआ डेनिसन मॉर्निंग वॉकसाठी समुद्राच्या किनाऱ्यावर गेली होती, तिथे अचानक तिला हा प्राणी दिसला. लिया त्यावेळी तिच्या बॉयफ्रेंड समवेत होती, त्यानंतर इतर अनेक लोकही हा विचित्र प्राणी पाहण्यास थांबले. सर्वात विचित्र गोष्ट अशी होती की या प्राण्याच्या लांब शेपटीवर दातं होती. लिया म्हणाली की आपल्या शेपटीवर दात असलेला असा कोणताही प्राणी आपण यादी पाहिलेला नाही. लियाने बीच सिक्युरिटीला त्या प्राण्याविषयी माहिती दिली त्यानंतर जवळच्या प्रयोगशाळेतल्या वैज्ञानिकांची टीम येऊन त्या प्राण्याला घेऊन गेली.

लियाने सांगितले की आम्ही या प्राण्याचा व्हिडिओ बनविला असून तो सोशल मीडियावर शेअर केला आहे, परंतु अद्याप हा प्राणी काय आहे हे कोणालाही सांगता आले नाही. काही सोशल मीडिया युसर्सचे म्हणणे आहे की ते समुद्रात सापडणाऱ्या थॉर्नबॅक रे या जीवजंतूशी संबंधित आहे. तथापि, हे प्राणी एकतर समुद्राच्या खूप खाली राहतात किंवा विलुप्त झाले आहेत.

https://youtu.be/1SvU2Ir-UHs

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

खडसेंचे आरोप फेटाळण्यासाठी चंद्राकांतदादांनी केलं संघाला समोर, म्हणाले..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांना विधान परिषदेचं तिकिट का नाकारण्यात आलं यामागचे कारण दिलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपली भूमिका मांडली. “भाजपा आरएसएसपासून प्रेरणा घेऊन काम करतं. आमच्या अजेंडयामध्ये जशा वैचारिक गोष्टी आहेत, तशाच कार्यपद्धती हा आमच्या अजेंडयाचा भाग आहे. घरातली भांडणं बाहेर जाऊ न देणं, दुसऱ्याला मोठं करणं फक्त घरामधल्यांना मोठं करणं हा आरएसएसचा अजेंडा नाही,” असं सप्ष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिलं.

”इतक्या मोठ्या नेत्यानं पक्षाचे वाभाडे करताना विचार तर करायला हवा’’ असं मत चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केलं. पक्षानं ८७-८८ पासून नाथाभाऊंना सात वेळा तिकिट दिलं. तसेच त्यांच्या मुलाला तिकिट दिलं. लोकसभा निवडणुकीच्यावेळी हरीभाऊ जावळेंना तिकिट न देता, त्यांच्या सुनेला तिकिट दिलं गेलं. त्यामुळे  खडसेंवर अन्याय होत नाही असा विचार केंद्रानं बहुतेक केला असेल” असं चंद्रकांत पाटील म्हणाले. नाथाभाऊंना तिकिट द्यायला हवं अशीच माझी आणि देवेंद्र फडणवीस यांची भूमिका होती, परंतु केंद्रानंच त्यांना तिकिट नाकारलं असल्याचं पाटील यांनी सांगितलं.

दरम्यान, संसदीय बोर्डाच्या बैठकीत पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे आणि मला उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला. आमच्या तिघांचीही नावे फायनल झाली असून केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवण्यात आल्याचं सांगण्यात आलं. पण प्रत्यक्षात इतरांचीच नावं जाहीर करण्यात आली. ज्यांची नावं जाहीर केली, ते मुंबईत फॉर्म भरण्यासाठी आले कसे? हे सर्व पूर्वनियोजित होतं. आम्हाला केवळ मूर्ख बनवण्यात आलं, असा संताप भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला आहे.

इतर निष्ठावंतांना तिकीट दिलं असतं तर समजू शकलो असतो, असं सांगतानाच चंद्रकांत पाटलांसाठी ज्या मेघा कुलकर्णींनी आमदारकीची सीट सोडली. त्यांना तरी विधानपरिषदेचं तिकीट द्यायला हवं होतं ना? असा सवाल करत खडसे यांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे. तसेच हा सर्व प्रकार पक्षश्रेष्ठींना सांगणार आहे असं खडसे म्हणाले होते. माझा पत्ता कट होण्यामागे केंद्रीय नेतृत्वाचा काहीही संबंध नाही. राज्यातील नेत्यांनीच पत्ता कट केला आहे. राज्यातील नेत्यांनीच केंद्रीय नेतृत्वाकडे माझ्याविरोधात विषपेरणी केली आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”