Wednesday, December 24, 2025
Home Blog Page 5804

काल मोदींनी फक्त एक हेडलाइन आणि एक कोर पान दिलं- पी. चिदंबरम

मुंबई । काल देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या तब्बल २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजवर माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी टीका केली आहे. लॉकडाउनमुळे खीळ बसलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी काल २० लाख कोटीच्या पॅकेजची घोषणा केली. मोदींनी जाहीर केलेले पॅकेज म्हणजे फक्त एक ‘हेडलाइन आणि एक कोरं पान आहे’ अशा शब्दात चिदंबरम यांनी टीका केली.

चिदंबरम यांनी ट्विटरच्या माध्यमातून या पॅकेजवर टीका करताना म्हटलं कि, “काल पंतप्रधानांनी हेडलाइन आणि कोरं पान दिलं. अर्थमंत्री ते कोरं पान कसं भरतात ते आज आम्ही पाहू. अर्थव्यवस्थेमध्ये सरकारकडून जे पैसे ओतले जाणार आहेत, त्यातल्या प्रत्येक अतिरिक्त रुपयावर आमचे बारीक लक्ष असेल. कोणाला काय मिळणार त्याचा सुद्धा आम्ही बारकाईने अभ्यास करु” असे चिदंबरम म्हणाले.

 

वेगवेळया राज्यातून घराकडे निघालेल्या हजारो स्थलांतरित मजुरांबद्दल चिदंबरम म्हणाले की, गरीब आणि उद्धवस्त मजुरांनी शेकडो किलोमीटरची पायपीट केली, त्यांना या पॅकेजमधून काय मिळते त्यावरही आमचे लक्ष असेल.दरम्यान, काल मोदींनी आपल्या भाषणात सांगितल्याप्रमाणे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन आज या पॅकेजबद्दल विस्तृत माहिती देणार आहेत. त्यामुळे पॅकेजमधून कुठल्या क्षेत्राला किती लाभ होईल ते स्पष्ट होईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

क्रिकेटमधील नव्या नियमांवरून सचिन आणि सौरवने ICC ची उडविली खिल्ली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली ही दोन नावं भारतीय क्रिकेटच्या इतिहासात खूप महत्त्वाची आहेत. १९९९ च्या विश्वचषक स्पर्धेनंतर नव्या भारतीय संघाला दिशा देण्यात या दोघांचा सिंहाचा वाटा आहे. त्या दोघांनी मॅच फिक्सिंग सारख्या संकटातून भारतीय क्रिकेटला वर आणले. भारतीय फलंदाजीची धुरा या दोघांनी अगदी समर्थपणे पेलली. वन डे क्रिकेटच्या इतिहासातली सर्वात यशस्वी सलामीवीर जोडी म्हणून या दोघांनी दमदार कामगिरी केलेली आहे. या जोडीने जगभरातील आपल्या काळातील अनेक महान गोलंदाजांवर अधिराज्य गाजवले आहे. या जोडीला नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने एका ट्विटच्या माध्यमातून अभिवादन केले आहे.

 

ICC ने सचिन आणि गांगुली यांचा एक एकत्रित फोटो आपल्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वर ट्विट केला आहे. त्या फोटोच्या कॅप्शन मध्ये ICC ने असे लिहिले की वन डे क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर + सौरव गांगुली म्हणजे १७६ वेळा दमदार भागीदारी, तसेच ८,२२७ धावा आणि सरासरी ४७.५५… इतर कोणत्याही फलंदाजांच्या जोडीने अद्यापही ६,००० धावांचा पल्लाही गाठलेला नाही.

 

 

ICC च्या या ट्विट वर सचिनने एक जोरदार रिप्लाय दिला. “ही आठवण खूपच मस्त आहे,. पण तुला काय वाटतं दादी (गांगुली). ICC च्या नव्या नियमानुसार ३० यार्ड वर्तुळाबाहेर ४ खेळाडू आणि २ नवे चेंडू असते तर आपण अजून किती धावा काढू शकलो असतो?”, असं लिहित त्याने मस्करी करण्याचा ईमोजी वापरला. गांगुलीने सचिनच्या या ट्विट वर लगेच उत्तरही दिलं. “मला वाटतं अजून ४,००० धावा आपण सहज केल्या असत्या. आणि सामन्यात दोन नवे चेंडू … ऐकून खूप मस्त वाटतंय.. अगदी पहिल्या षटकापासून कव्हरच्या दिशेने मारलेला चेंडू सीमारेषेपार जाताना दिसतोय… तोही पूर्ण ५० षटकांत .” असा रिप्लाय गांगुलीने दिला.

Ganguly-Tendulkar faced better bowlers than Rohit-Kohli: Ian ...

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

तर लाईव्ह भाषण करून जनतेला गोंधळात टाकताच कशाला?; प्रकाश आंबेडकरांची मोदींवर टीका

मुंबई । काल देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वावलंबी भारत अभियानाची घोषणा केली असून २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. हे पॅकेज स्वावलंबी भारत अभियानाचा महत्त्वाचा भाग आहे. आतापर्यंत जाहीर करण्यात आलेली आर्थिक मदत आणि हे पॅकेज एकत्र मिळून २० लाख कोटींचं आहे. २०२० मध्ये जाहीर करण्यात आलेलं हे २० कोटींचं पॅकेज स्वावलंबी योजनेला नवी गती देईल. हे पॅकेज जीडीपीच्या १० टक्के असल्याचंही मोदी म्हणाले होते. इतकेच सांगून याबाबत अधिक माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन देतील असं मोदींनी म्हटलं. मोदींच्या कालच्या भाषणातील तपशीलावरून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधानांवर ट्विट करत टीका केली आहे.

आपल्या ट्विटमध्ये प्रकाश आंबेडकर लिहतात, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणतीही कठोर किंवा वाईट बातमी देशासमोर द्यायची नाही. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर त्यांनी हे सर्व सोडून दिलं आहे. कदाचित हा त्यांच्या पीआरचा भाग असावा,” अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. “जर पंतप्रधानांना काही ठोस सांगायचंच नसेल तर ते लाईव्ह येऊन गोंधळ निर्माण करतातच का?” असा सवाल त्यांनी ट्विट करत मोदींना केला आहे.

तर आणखी एका ट्विटमध्ये प्रकाश आंबेडकर म्हणाले ”पंतप्रधानांनी संघटीत मध्यमवर्गासाठी २० लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं. पण असंघटीत आणि स्थलांतरीत कामगारांच्या हाती निराशाच आली आहे. मध्यम वर्गाची बाजू घेण्याची आणि आर्थिक दुर्बल वर्गाकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात दिसून आली. परंतु याची पुनरावृत्ती चौथ्या टप्प्यातही करण्यात येत आहे,” असं आंबेडकर म्हणाले.

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

कोरोना इम्पॅक्ट | लोकांच्या खात्यात पैशांआधी, पोटात अन्न जाणं जास्त गरजेचं आहे.

थर्ड अँगल | भारतातील प्रचंड गरीब लोकसंख्या ही उदरनिर्वाहासाठी रोजंदारीवर अवलंबून आहे. सध्याची संचारबंदी आणि त्याचा विस्तार यामुळे लाखो दैनंदिन कामगार आणि त्यांची कुटुंबे त्यांना जगण्यासाठी आवश्यक असणारे पैसे कमवू शकत नाही आहेत. या अभूतपूर्व परिस्थितीत भारतीय राज्यांनी व्यापक प्रमाणातील भूक रोखण्यासाठी जलद गतीने प्रतिसाद देण्याची गरज आहे. राज्य हे आव्हान गंभीररीत्या घेत आहे. भारताने महिलांना लक्ष्य करीत प्रधान मंत्री जन- धन योजनेच्या खात्यांसह आतापर्यंतचा सर्वात मोठा रोख हस्तांतरणाचा कार्यक्रम राबविला आहे. सर्व प्रयत्नांमध्ये अन्नाचे अनुदान वाढविले आहे. दिलेल्या आर्थिक त्रासाच्या प्रमाणामुळे अनेकांनी रोख हस्तांतरण वाढविण्याची मागणी केली आहे. रोख रक्कम सोबत ठेवणे सोपे असते आणि ती व्यापकपणे स्वीकारली जाते. पण खाली स्पष्टीकरण दिलेल्या आमच्या राष्ट्रीय प्रातिनिधिक सर्वेक्षण डाटाचे विश्लेषण असे सूचित करते की, या हस्तांतरणामध्ये बऱ्याच गरिबांना वगळले जाईल. आणि इतरांना ते खूप उशिरा मिळेल. आताची त्वरित गरज ही गरजूना पुरेशा प्रमाणात अन्नाची मदत वितरित करणे यावर लक्ष केंद्रित करणे ही आहे. 

प्रधान मंत्री जन धन योजनेद्वारा पैशांचं रोख हस्तांतरण भारतातील अनेक अत्यंत गरीब लोकांना वगळेल आणि काहींच्या खात्यात ते पैसे खूप उशिरा येतील. 

रोहिणी पांडे, सिमोन शनर्स, चॅरिटी मुर

रोख हस्तांतरण कार्यक्रमांतर्गत प्रधान मंत्री जन धन योजनेचे खाते असणाऱ्या महिलेला पुढच्या तीन महिन्यासाठी ५००रु (अंदाजे ७ डॉलर) पाठवले जातील. अधिकृत आकडेवारीनुसार अंदाजे २०० दशलक्ष महिलांचे (४७% प्रौढ महिला) प्रधान मंत्री जन धन योजनेचे खाते आहे. महिलांच्या स्वतःच्या प्रधान मंत्री जन धन योजनेच्या खात्याचे चित्र तथापि भिन्नच रंगवले आहे. २०१८ च्या राष्ट्रीय प्रातिनिधिक सर्वेक्षणातील वित्तीय अंतर्दृष्टी अंतर्भाव सर्वेक्षणाने उत्तरदात्यांना विचारले की त्यांच्याकडे बँकेचे खाते आहे का? आणि असल्यास ते प्रधान मंत्री जन धन योजनेचे खाते आहे? साधारणपणे ८०% महिला उत्तरदात्यांनी त्यांचे बँक खाते असल्याचे सांगितले पण केवळ २१% महिलां उत्तरदात्यानी त्यांच्याकडे प्रधान मंत्री जन धन योजनेचे खाते असल्याचे सांगितले. सरकार आणि सर्वेक्षणातील आकडे यांमधील अंतर काय दर्शविते? बहुधा सुप्तपणाचे संयोजन, प्रणालीतील खात्याच्या दुसऱ्या प्रती (duplication) आणि आपले खाते कोणते आहे याबद्दलची महिलांमधील अज्ञानता होय. यात सुधारणा करण्यासाठी सरकारने रोख हस्तांतरणाविषयी माहिती देण्याचे नियोयन केले. चला असे म्हणूया, की तो आणीबाणीचा कार्यक्रम म्हणजे त्या अज्ञान महिलांना त्यांच्याकडे प्रधान मंत्री जन धन योजनेचे खाते आहे याची माहिती देणे, आणि त्याचे डुप्लिकेशन करणे आणि सुप्त समस्या कमी करणे होय. २०० दशलक्ष प्रधान मंत्री जन धन योजनेचे खाते असणाऱ्या लोकांना लक्ष्य केल्यामुळे covid मुळे ज्यांच्याकडे पैसे आणि अन्न नाही आहे अशा सर्वाधिक आवश्यकता असणाऱ्या गरीब कुटुंबाना हस्तांतरण केले जाईल? 

अधिकृत आकडेवारी आपल्याला २०० दशलक्ष प्रधान मंत्री जन धन योजनेचे खाते असणाऱ्या स्त्रियांपैकी किती महिला या सर्वाधिक आवश्यकता असणाऱ्या गरीब कुटुंबातील आहेत हे सांगत नाही. सर्वेक्षण आकडेवारी आपल्याला थोडी पुढे घेऊन जाते. वर नमूद केलेले २०१८चे सर्वेक्षण जर्मन फाउंडेशन कार्यपद्धती वापरते. जिथे १० घरगुती वैशिष्ट्यांच्या प्रश्नांची उत्तरे घेतली जातात. तसेच जे दारिद्रयरेषेखालील कुटुंबे आहेत त्यांच्या मालमत्तेची मालकी मोजण्यासाठी  गुणांकन केले जाते. निकाल? हे सर्वेक्षण आपल्याला सांगते की साधारण एकूण ३२५ दशलक्ष पेक्षा अधिक पैकी एक तृतीयांश प्रौढ महिला यूएन मान्यताप्राप्त  २.५० डॉलर दर दिवस या निकषानुसारही कमी दारिद्र्य रेषेखाली जगत आहेत. सामान्य वेळी १० पैकी नऊ महिला म्हणतात, ६००० रु सोबत सगळे इतर खेचून नेत महिनाभर आणीबाणीचा सामना करणे कठीण होईल. तर जरी आपण सरकारी आकडेवारीनुसार पाहिले आणि असा विचार केला की केवळ अशा गरीब महिलांनी प्रधान मंत्री जन धन योजनेचे खाते उघडले आहे. हा एक उदार अंदाज आहे. तरी १२५ दशलक्ष महिला किंवा एक तृतीयांश महिलांकडे प्रधान मंत्री जन धन योजनेचे खाते नाही. आणि आपल्याला हेही माहित आहे, काही उत्तम कुटुंबाकडेही खाते आहे. २०१८ च्या सर्वेक्षणाची आकडेवारी सांगते की ७५% प्रधान मंत्री जन धन योजनेचे खाते असणारी कुटुंबे गरीब आहेत. जर आपण २०१८च्या सर्वेक्षणाच्या आधारावर गरीब महिलांना प्रधान मंत्री जन धन योजनेचे खाते वाटप केले तरी १२५ दशलक्ष महिलांकडे पीएमजेडीवाय खात्यांची कमतरता आहे. याचा अर्थ किमान १२५-१७५ दशलक्ष गरीब महिला आणि कुटुंबाना या आणीबाणीच्या रोख हस्तांतरणाचा लाभ घेता येणार नाही.     

रोख रक्कम पोहोचवणे ही शेवटची मर्यादा आहे. २०१८ ची आकडेवारी सांगते की चार पैकी १ गरीब महिला त्यांचे खाते असणाऱ्या बँकेपासून ५ कि.मी अंतरावर राहतात. बँकांमधील सध्याच्या सामाजिक अंतर पद्धतींसह लांबणीबर टाकलेले रोख वितरण सूचित करते. काही महिलांना लवकरात लवकर रोख रकमेची गरज आहे, पण त्यांना हे हस्तांतरण मिळविणे कठीण जाईल. थोडक्यात, सध्या रोख हस्तांतरणासाठी वापरले जाणारे नेटवर्कचे कव्हरेज हे भारताच्या सामाजिक सुरक्षेतून घसरत चाललेल्या गरीब कुटुंबाना थांबविण्यास अपुरे आहेत. या कुटुंबांना दिलासा देण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने पीएमजेडीवाय रोख हस्तांतरणाशिवायही अधिक गोष्टींचा अवलंब केला पाहिजे. जेव्हा अनेकजण बेरोजगार झालेले असतात आणि लक्षणीय महागाईला सामोरे जात असतात तेव्हा या संचारबंदीच्या काळात त्यांच्यापर्यंत जेवण (अन्न) पोहोचवणे हे सर्वात कठीण आव्हान असते. सरकारने स्थापन केलेले सामाजिक संरक्षणाचे स्थापत्यही सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी उत्तम प्रतिसाद देत आहे. पण अजूनही त्यांची पात्रता ही रेशन कार्ड असणे ही आहे आणि २०१८ च्या सर्वेक्षण आकडेवारीनुसार जवळपास ७० दशलक्ष महिलाकडे रेशन कार्ड नाही आहे.  

संचारबंदीला तोंड देणाऱ्यासाठी जे काही राबविले गेले आहे त्यामध्ये गरीब आणि उघड्यावर असलेल्या लोकांना तपासून त्यांचे दस्तऐवजीकरण करण्यासाठी अजिबात वेळ नाही आहे. तसेच अन्न वितरण साखळीतील पोकळी भरून काढण्याच्या काळजीसाठी देखील वेळ नाही आहे. धोरण तयार करणाऱ्यांनी त्यांच्याकडे जे आहे ते सर्व करण्याची खूप गरज आहे. यापैकी काही संसाधने अनावश्यक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचाही धोका आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी गरिबांवर उपासमार करण्याची ही वेळ नाही. भारताकडे धान्याचा जरुरीपेक्षा जास्त साठा आहे. सर्वसाधारणपणे सर्व गरीबांपर्यंत पोहोचण्यास सुलभ असणाऱ्या सार्वजनिक वितरण प्रणालीच्या दुकानांपर्यंत ते धान्य पोहोचण्याची उत्तम व्यवस्थाही आहे. तामिळनाडू सारख्या काही राज्यांनी अगोदरच सार्वत्रिक राशन पोहोचवण्याची ऑफर दिली आहे. अधिक धान्य साठा राज्यांना दिल्यास त्यांना सार्वजनिक वितरण प्रणालीचा विस्तार करता येईल आणि सामुदायिक स्वयंपाक घरासारख्या अतिरिक्त प्रयत्नांना आधार देता येईल. संचारबंदीचे उपाय लोकांना अनुदानित अन्न मिळवण्यापासून रोखत नाहीत ना हे सुनिश्चित करण्यासाठी जे करणे शक्य आहे ते सर्व केले पाहिजे.  त्याबरोबर सामाजिक अलगाव व्यवस्थित पाळला जात आहे का याचीही खात्री करून घेतली पाहिजे. या साथीच्या आजारामुळे निर्माण झालेल्या आर्थिक आणि आरोग्याच्या समस्या याआधी कधीच न आलेल्या आहेत. अन्न असुरक्षेचा सामना करण्यासाठी भारताने तयारी दर्शविली पाहिजे, सर्वाधिक असुरक्षित नागरिकांपर्यंत आरोग्य आणि कल्याण सुरक्षा पोहोचवण्यासाठी प्राधान्य दिले पाहिजे. 

रोहिणी पांडे हे Henry J Heinz II मध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक आणि Yale University येथे Economic Growth Centre चे संचालक आहेत, Schaneris हे University of Southern California येथे अर्थशास्त्राचे (संशोधन) सहाय्य्क प्राध्यापक आहेत, Moore हे Yale University च्या  South Asia Economics Research Mac Millan Centre चे संचालक आहेत. या लेखाचा अनुवाद जयश्री देसाई यांनी केला आहे.

कोरोना काळात चुकीची माहिती व्हायरल होऊ नये म्हणून..!!

थर्ड अँगल | Covid च्या सभोवतालचा समाज माध्यमांवरील माहितीच्या साथीच्या आजाराचे बहुआयामी दृष्टिकोन – आस्था कांत, रिया गोलेचा

काही महिन्यांपूर्वीपर्यंत लोक जगाला एक चांगले ठिकाण कसे बनवता येईल याबद्दल विचार करत होते. त्यासाठी एचआयव्ही/एड्स, ट्युबरक्युलॉसिस, मलेरिया यासारखे आजार औषधे आणि सार्वजनिक आरोग्य यांच्या माध्यमातून बरे करण्याचा विचार करत होते. आज, एका नव्या रोगकारकापासूनचा आजार Covid-१९ हा मानवतेच्या क्षमतेला मध्यस्थी करण्याचे आणि या आजारामुळे उदभवलेल्या संकटाचे व्यवस्थापन करण्याचे आव्हान देत आहे. पण आज देश या विषाणूपेक्षा वेगळीच लढाई लढतो आहे. ते सुद्धा या भीती आणि चिंता पसरवणाऱ्या चुकीच्या धारणेच्या, एकूणच चुकीच्या माहितीच्या संसर्गाच्या विरोधात आहेत. विषाणू नवीन असल्याने त्याच्या माहितीचा अभाव आहे आणि त्याचा प्रचंड परिणाम आरोग्यावर होतो आहे. covid -१९ च्या माहितीची भूक खूप व्यापक आहे. विविध स्रोतांसह (संस्थात्मक आणि वैयक्तिक) माहितीची पोकळी भरण्याचा प्रयत्न केला जात आहे. आपण अनेकदा समाज माध्यमांवरील विरोधाभासी माहितीचा प्रसार करतो. या उद्रेकात जागतिक समुदायाने माहिती हाताळण्यासाठी विषाणूविषयी अधिक माहिती आणि चुकीची माहिती हे दोन्ही दृष्टिकोन स्वीकारणे गरजेचे आहे. 

चुकीची माहिती ही वस्तुस्थितीवर आधारित नसते ती जनमतावर प्रभाव पाडण्यासाठी अनावधानाने पाठवलेली असते किंवा सत्य अस्पष्ट करण्यासाठी पाठविलेली असते. त्याचे परिणाम हे खूप गंभीर आणि दूरगामी असतात. अलीकडे स्थलांतरित कामगारांना घरी घेऊन जाण्यासाठी विशेष रेल्वे कार्यान्वित केल्या जात असल्याची चुकीची माहिती व्हिडीओ ब्लॉग आणि समाज माध्यमांवर हेतुपुरस्सररित्या व्हायरल होते आहे. परिणामी सार्वजनिक आरोग्याची भीती निर्माण झाली आहे.  Harvard T H Chan School of Public Health चे डीन Michelle Williams आणि Harvard T H Chan School of Public Health चे प्राध्यापक K Viswanath यांनी अलीकडे एका लेखात चुकीच्या माहितीशी लढण्यासाठीच्या पाच मार्गांवर चर्चा केली आहे. यामध्ये १) असत्य माहिती पुसून टाकण्यासाठी सक्षम होण्यास covid -१९ विषयी स्वतःला शिक्षित करणे. २) एखादी माहिती सामायिक करण्यापूर्वी आणि पुढे पाठविण्याआधी थोडे थांबून त्याच्या सत्यतेच्या स्रोताचा विचार करणे. ३) भीती आणि असहिष्णुता पसरविणाऱ्या “संशयखोर वृत्ती”च्या औषधाची देखभाल करणे, जसे की संशोधक विषाणूविषयीची अधिक माहिती जाणून घेत आहेत त्याप्रकारे अनिश्चिततेची प्रचलित पातळी स्वीकारणे. ४) चुकीच्या माहितीने पोकळी भरून काढणे टाळणे. ५) माहितीचे भरवशाचे आणि विश्वसनीय स्रोत तपासून माहिती घेत राहणे. याचा समावेश आहे.

भारतासारख्या देशात जिथे समाज माध्यमांचा वापर व्यापक प्रमाणात प्रचलित आहे अशा ठिकाणी हे पुराव्याच्या आधाराचे सल्ले संबंधित आहेत. लोकांची मते आणि त्यांच्या क्रिया यांच्यावर प्रभाव पाडणारे समाजमाध्यम हे शक्तिशाली साधन आहे. या साथीच्या आजाराच्या सुरुवातीला समाज माध्यमांवर जणू काही आरोग्य तज्ञ असल्याचाच दावा करणारे तोतया व्हिडिओ फिरत होते. विविध सिद्धांतांवरील, अनेक चुकीचे, विषाणूच्या उत्पत्तीवरचे आणि chloroquine medication ची अधिक मात्रा घेऊन विषाणूपासून स्वतःला वाचविण्याच्या चुकीच्या संकल्पनांचे व्हिडीओ यांचा त्यात समावेश होता. विषाणूच्या प्रसारासाठी एका विशिष्ट समुदायाला राक्षस समजणारे व्हिडिओदेखील व्हायरल झाले होते. 

अनेक घटक चुकीच्या माहितीच्या विरोधात काम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. समाज माध्यमांवरील वाढता धोका रोखण्यासाठी सरकार उपाय राबवित आहेत. दंतकथा आणि वारंवार विचारले जाणारे प्रश्न रोखण्यासाठी mygov.in, आयसीएमआर, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयसारख्या वेबसाईटवर माहिती अपलोड केली जात आहे. टेलिकम्युनिकेशन विभागाने सर्व टेलिकॉम कंपन्यांना त्यांच्या रिंगटोन काढून टाकण्यास आणि कोरोना विषाणूच्या माहितीची ऑडिओ क्लिप कॉलची रिंगटोन म्हणून वापरण्याचे आदेश दिले. चुकीची माहिती हाताळण्यासाठी  “MyGov Corona Help desk” आणि व्हाट्स अपचा चर्चा समूह ही सुरु करण्यात आला आहे. चुकीच्या माहितीचा प्रसार थांबविण्यासाठीच्या सरकारच्या प्रयत्नांना खाजगी क्षेत्रही पाठींबा देते आहे. उदाहरणार्थ व्हाट्स अप नेही covid -१९ च्या चुकीच्या माहितीच्या प्रसारणाला प्रतिसाद म्हणून त्यांच्या संदेश पुढे पाठविण्याच्या मर्यादा आणि सुरक्षा सेटिंग कडक केल्या आहेत. इतके गहन प्रयत्न करूनही अजून आणखी बरेच काही करण्याची गरज आहे. अस्सल खाती सत्यापित करणे, माहितीच्या विश्वासार्ह स्रोतांना चालना देणे आणि चुकीची माहिती हाताळणाऱ्या संशोधनाचा निधी वाढविणे ही या दिशेने काम करण्याची पावले असू शकतात. समाज माध्यम दिग्गजांनी चुकीची माहिती रोखण्यासाठी आता मजबूत यंत्रणा राबविली पाहिजे. चुकीच्या माहितीच्या परिणामाचे विश्लेषण आणि त्याला सामोरे जाण्यासाठी साधने तयार करण्यासाठी संशोधकांना समाज माध्यम कंपनीकडून नियंत्रित केला जाणारा डाटा मिळविण्याची परवानगी देणे आवश्यक आहे. या ‘चुकीच्या माहितीच्या साथीच्या’ या संकटकाळात आपण चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी आपण “मिश्र दृष्टिकोन” वापरला पाहिजे जिथे प्रणालीतील पुढाकाराने वैयक्तिक फायदा मिळू शकेल. वैयक्तिक पातळीवर Harvard T H Chan School of Public Health’s च्या भारतीय संशोधन केंद्राने कोरोना विषाणूवर दिलेल्या सल्ल्यानुसार “दोनदा विचार करा” हा मार्गदर्शक मंत्र आहे. संदेश पुढे पाठविण्याआधी, हे सत्य आहे का? याची कशी मदत होईल? याने काही प्रेरणा मिळेल? हे खरेच आवश्यक आणि योग्य आहे का? हे प्रश्न स्वतःला विचारा. समाजाला एकत्र येऊन सामाजिक नेतृत्वाच्या कामासाठी सक्रिय होण्याची संधी देत चळवळ उभी करण्याचीही आवश्यकता आहे. यामध्ये जागरूकता मोहीम उभी करणे, चुकीच्या माहितीच्या विरोधात लढण्यासाठी स्वतःला वचनबद्ध करणे याचा समावेश आहे. चुकीची माहिती रोखून आपल्या माहिती प्रणालीच्या लवचिकतेला संरक्षण देणे ही काळाची गरज आहे. 

आस्था कांत या Harvard T H Chan School of Public Health च्या भारतीय संशोधन केंद्रात प्रकल्प व्यवस्थापक आणि रिया गोलेचा या प्रकल्प समन्वयक आहेत. त्यांची ही मते वैयक्तिक आहेत. या लेखाचा अनुवाद जयश्री देसाई यांनी केला आहे.

कोरोनाबाधित जवानाची गळफास घेऊन रुग्णालयातच आत्महत्या

नवी दिल्ली । देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. पंतप्रधान मोदी यांनीही यापार्श्वभूमीवर देशातील लॉकडाऊन १८ मे नंतरही सुरु राहणार असल्याचे सांगितले आहे. देशात सामान्य नागरिकांबरोबरच पोलीस, शासकीय अधिकारी आणि जवान हे सुद्धा कोरोनाचे शिकार झाले आहे. अशात कोरोनाची बाधा झालेल्या एका जवानाने रुग्णालयातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, सदर जवान अलवर येथे सिग्नल कोर्स येथे तैनात आहे. कोरोनाची लक्षणे दिसू लागल्यानंतर त्याला दिल्ली येथील लष्कराच्या बेस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याच्या घशातील नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. सदर जवानाने १२ मी रोजी पहाटेच्या वेळी रुग्णालयाच्या मागील बाजूला असणाऱ्या एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जवानांची ओळख पटली असून तो महाराष्ट्रातील असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, आत्महत्या केलेल्या जवानाला फुफ्फुसाचा कर्करोग होता. लष्कराच्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. जवानाचा कोरोना चाचणीसाठी अहवाल पाठवला असता, तो संक्रमित असल्याचं समोर आलं आहे. त्या जवानाला ५ मे रोजी सैन्याच्या आर. आर. रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मृत जवानाचे कुटुंब अलवर येथे राहते. त्यांनाही घटनेची माहिती देण्यात आली आहे.

सनी लियोनी झाली ३९ वर्षांची, पहा ‘हे’ खास फोटो

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुगलवर सर्वाधिक सर्च होणारी अभिनेत्री म्हणून जिची खास ओळख आहे अशा सनी लियोनीचा आज ३९ वा वाढदिवस आहे. सनी नेहमीच आपल्या बोल्ड अंदाजामुळे सर्वत्र चर्चेत राहत असते. पॉर्नस्टार म्हणून करिअरची सुरवात केलेल्या सनी लियोनीने काही वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आणि सनी ने काही दिवसांतच बॉलिवूडमध्येही आपली जागा बनवली.

सनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर नेहमी आपले वेगवेगळे फोटो अपलोड करत असते. सनी तिच्या हॉट आणि बोल्ड फोटोंमुळे नेहमीच गुगुलवर सर्वाधी सर्च केली जाते. आज सनीच्या ३९ व्या वाढदिवसानिमित्त आपण सनीचे ३९ खास फोटो पाहणार आहोत.

https://www.instagram.com/p/CAGyp-WDANh/?utm_source=ig_web_copy_link

राज्यात दिवसभरात सापडले १ हजार २६ नवीन कोरोनारुग्ण, एकूण रुग्णसंख्या २४ हजार ४२७ वर

मुंबई । राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २४ हजार ४२७ झाली आहे. आज १०२६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ३३९ कोरोना बाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ५१२५ रुग्ण बरे झाले आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख २१ हजार ६४५ नमुन्यांपैकी १ लाख ९५ हजार ८०४ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करिता निगेटिव्ह आले आहेत तर २४ हजार ४२७ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २ लाख ८१ हजार ६५५ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १५ हजार ६२७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात ५३ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या आता ९२१ झाली आहे.आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील २८, पुण्यात ६, पनवेल मध्ये ६, जळगावमध्ये ५, सोलापूर शहरात ३, ठाण्यात २, रायगडमध्ये १, औरंगाबाद शहरात १ आणि अकोला शहरात १ मृत्यू झाला आहे.

आज झालेल्या मृत्यूंपैकी २९ पुरुष तर २४ महिला आहेत. आज झालेल्या ५३ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २१ रुग्ण आहेत तर २७ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ५ जण ४० वर्षांखालील आहे. या ५३ रुग्णांपैकी ३५ जणांमध्ये ( ६६ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: १४,९२४ (५५६)
ठाणे: १४० (३)
ठाणे मनपा: १००४ (११)
नवी मुंबई मनपा: ९५५ (४)
कल्याण डोंबिवली मनपा: ३८४ (३)
उल्हासनगर मनपा: ५३
भिवंडी निजामपूर मनपा: ३५ (२)
मीरा भाईंदर मनपा: २४३ (२)
पालघर: ३८ (२)
वसई विरार मनपा: २६३ (१०)
रायगड: १२९ (२)
पनवेल मनपा: १४६ (८)
ठाणे मंडळ एकूण: १८,३३७ (६०३)

नाशिक: ८२
नाशिक मनपा: ४३
मालेगाव मनपा: ६१६ (३४)
अहमदनगर: ५४ (३)
अहमदनगर मनपा: १०
धुळे: ९ (३)
धुळे मनपा: ५४ (३)
जळगाव: १५२ (१५)
जळगाव मनपा: ४० (९)
नंदूरबार: २२ (२)
नाशिक मंडळ एकूण: १०८२ (६९)

पुणे: १६७ (५)
पुणे मनपा: २६२१ (१५५)
पिंपरी चिंचवड मनपा: १४९ (४)
सोलापूर: ९
सोलापूर मनपा: ३०८ (१९)
सातारा: १२३ (२)
पुणे मंडळ एकूण: ३३७७ (१८५)

कोल्हापूर: १३ (१)
कोल्हापूर मनपा: ६
सांगली: ३४
सांगली मिरज कुपवाड मनपा: ४ (१)
सिंधुदुर्ग: ६
रत्नागिरी: ५५ (२)
कोल्हापूर मंडळ एकूण: ११८ (४)

औरंगाबाद:९४
औरंगाबाद मनपा: ५५९ (१५)
जालना: १६
हिंगोली: ६१
परभणी: १ (१)
परभणी मनपा: १
औरंगाबाद मंडळ एकूण: ७३२ (१६)

लातूर: २६ (१)
लातूर मनपा: ५
उस्मानाबाद: ४
बीड: १
नांदेड: ४
नांदेड मनपा: ४२ (४)
लातूर मंडळ एकूण: ८२ (५)

अकोला: १८ (१)
अकोला मनपा: १५१ (११)
अमरावती: ५ (२)
अमरावती मनपा: ८४ (११)
यवतमाळ: ९८
बुलढाणा: २५ (१)
वाशिम: २
अकोला मंडळ एकूण: ३८३ (२६)

नागपूर: २
नागपूर मनपा: २६६ (२)
वर्धा: १ (१)
भंडारा: १
गोंदिया: १
चंद्रपूर: १
चंद्रपूर मनपा: ३
गडचिरोली: ०
नागपूर मंडळ एकूण: २७५ (३)

इतर राज्ये: ४१ (१०)
एकूण: २४ हजार ४२७ (९२१)

माण तालुक्यात कोरोनाचा शिरकाव; अहमदाबादहून आलेला २५ वर्षीय तरुण कोरोना बाधित

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

माण तालुक्यातील रहिवासी असलेला एक 25 वर्षीय तरुण कोरोना बाधित असल्याचे समोर आले आहे. संस्थात्मक विलगीकरणात असलेल्या सदर तरुणाचा रिपोर्ट आला असून तो पॉझिटिव्ह असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. आज दिवसभरातला जिल्ह्यात चार बाधित रुग्ण सापडले आहेत. सध्या जिल्ह्यात उपचार सुरु असलेल्या बाधितांची संख्या 86 झाली आहे

हाती आलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री उशिरा माण येथील रहिवासी असलेल्या तरुणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सदर तरुण संस्थात्मक विलगीकरणात असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच या तरुणाने अहमदाबाद येथून प्रवास केल्याचे समजत आहे. सातारा जिल्हयातील माण तालुक्यात पहिल्यांदाच कोरोना रुग्ण सापडला आहे. आज दिवसभरात खटाव बरोबरीने माण तालुक्यातही कोरोना संशयिताचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

दरम्यान, ताज्या आकडेवारीनुसार आता सातारा जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १२३ झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

लॉकडाऊनमधील ‘या’ लग्नाने चंद्रकांतदादांना माणसांत आणि जमिनीवर आणलं

पुणे प्रतिनिधी | कोरोनाच्या संकटकाळात अनेक घरगुती सांस्कृतिक कार्यक्रम रद्द झाले आहेत. अनेकांनी बुक केलेल्या हॉलच्या तारखाही रद्द झाल्या आहेत. पारंपरिकतेचा वैश्विक अभिमान बाळगणाऱ्या पुणेकरांनी मात्र ठरलेल्या तारखेलाच विवाह करण्याचा ट्रेंड सेट केला आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी योग्य अंतर राखून लग्न केलं आहे. रविवार दिनांक १० मे रोजी परशुराम सलगरे आणि रेखा सोनटक्के यांचा विवाह लॉकडाऊनमध्ये पर्वती येथील तक्षशीला बौद्ध विहारात योग्य अंतर राखून पार पडला.

पुण्यातल्या ‘डायस’ प्लॉट परिसरात राहणारे सलगरे आणि प्रेमनगर मार्केटयार्ड येथे राहणारे सोनटक्के कुटूंबिय आपल्या पाल्यांचा विवाह करण्याबाबत ठाम होते. याबाबत निर्णय घेऊन मोजक्या जणांत हा सोहळा संपन्न करण्याचे नियोजन त्यांनी केले होते. परशुराम सलगरे या तरुणाचा मंडप डेकोरेशनचा व्यवसाय आहे. सलगरे आणि सोनटक्के कुटुंबियांच्या लग्न सोहळ्यास भाजपचे प्रदेशअध्यक्ष आणि कोथरूडचे विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील उपस्थित होते. मागील २ वर्षांमध्ये राज्याच्या सत्तानाट्यात कुरघोडी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चंद्रकांतदादांना याही गोष्टींसाठी वेळ मिळाला हे पाहून त्यांना बाहेरचा म्हणून हिणवणाऱ्या पुणेकरांनी देखील काही क्षण त्यांना आपलं समजलं.

विधानपरिषद निवडणुकीच्या कुरघोडीयुक्त राजकारणातही चंद्रकांतदादांचा हात असेल अशी शक्यता एकनाथ खडसे यांनी आज बोलून दाखवली. त्यातही लग्नासारख्या शुभप्रसंगी उपस्थित राहून चंद्रकांतदादांनी आजही आपले पाय जमिनीवर आणि माणसांत असल्याचं सिद्ध केलं आहे. या लग्नासाठी प्रभाग क्रमांक २८ ( ब )चे नगरसेवक श्रीनाथ भिमाले, भाजप झोपडपट्टी आघाडीचे पदाधिकारी गणेश शेरला, सचिन खंडाळे, अमोल खंडाळे तसेच तक्षशीला बौद्ध विहाराचे गणेश चव्हाण, भन्ते सुनील गायकवाड आदी उपस्थित होते.