Wednesday, December 24, 2025
Home Blog Page 5811

कराडकरांसाठी आनंददायी बातमी! तालुक्यातील तब्बल १५ कोरोनाग्रस्त आज मिळला डिस्चार्ज

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

कराड तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. तालुक्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ८६ वर पोहोचली आहे. अशात आत कराडकरांना दिलासा देणारी बातमी आली आहे. कराड तालुक्यातील तब्ब्ल १५ कोरोनाग्रस्त ठणठणीत बरे झाले असून त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये कृष्ण हॉस्पिटल मधून आज ११ कोरोनाग्रस्तांना डिस्चार्ज देण्यात आला तर कराड उपजिल्हा रुग्णालयातून ४ कोरोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनाला हरवण्यात तालुक्यातील १५ जणांना यश आल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

सोमवारी कराड तालुक्यातील आणखी 15 रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने तालुक्यात आशादायी वातावरण निर्माण झाले आहे. आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या नागरिकांमध्ये आगाशिवनगर येथील 25 वर्षीय युवक, 27 वर्षीय युवक व 65 वर्षीय वृद्ध गृहस्थ तसेच वनवासमाची येथील 32 वर्षीय महिला, 38 वर्षीय युवक व 13 वर्षीय मुलगा, मलकापूर येथील 54 वर्षीय पुरुष, कापील येथील 11 वर्षीय मुलगा, 49 वर्षीय गृहस्थ, कामेरी येथील 48 वर्षीय पुरुष, मिरेवाडी-फलटण येथील 28 वर्षीय युवक आदींचा समावेश आहे. तसेच उपजिल्हा रुग्णालयातील चार रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. यामध्ये वनवासमाची 3 तर आगाशिवनगर नगर 1 रुग्णांचा समावेश आहे. असे एकूण 15 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

बरे होऊन डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांचे डॉक्टर्स, नर्स यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले असून पुष्पगुच्छ देऊन पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसल,े डॉ. ए. वाय. क्षीरसागर, तहसीलदार अमरदीपक वाकडे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होत.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/705260063637732/

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

सोने झाले स्वस्त; जाणुन घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । सोन्याच्या किंमतींमध्ये सध्या मोठी घसरण होते आहे. आज सोन्याच्या वायद्यातील व्यापार खूप संथ आहे. आज सकाळी एमसीएक्स एक्सचेंजमध्ये ५ जून २०२०च्या सोन्याच्या फ्युचर्स किंमतीकडे नजर टाकल्यास ती ०.२२ टक्क्यांनी किंवा १०० रुपयांनी घसरून ४५,७१२ रुपये प्रति १० ग्रॅम झाली. ताज्या अहवालानुसार, आज एमसीएक्स एक्सचेंजमध्ये ५ ऑगस्ट २०२० रोजी सोन्याच्या फ्युचर्स किंमतीकडे पाहता तो ०.२६ टक्क्यांच्यासह व्यापार करीत होता. अशाप्रकारे ५ ऑगस्ट २०२० रोजी सोन्याचा वायदाहा १२२ रुपयांनी घसरून ४५,९३५ रुपये प्रति १० ग्रॅम झाले.

जागतिक बाजारपेठेतही सध्या सोन्याच्या भावात घसरण दिसून येत आहे आणि कॉमेक्सवरील सोन्याचे जागतिक वायदेचे भाव ०.३६ टक्क्यांनी घसरत होते. कॉमेक्स जागतिक वायदेच्या किमतीवर प्रति औंस १७०७.७० डॉलरवर व्यापार करीत ६.२० डॉलरने खाली आला. त्याचबरोबर मुंबईतील संक्रमण फ्री ग्रीन झोनच्या दागिन्यांच्या व्यापाऱ्यांनी आपली दुकाने उघडण्यास सुरूवात केली आहे. पण आता रत्ने व दागिने या उद्योगाचा व्यापार खूपच स्वस्त झाला आहे.

Should you invest in gold?: ETMarkets Investors' Guide: Is gold ...

अशा परिस्थितीत ज्वेलरी व्यापाऱ्यांचे असे म्हणणे आहे की त्यांची विक्री सामान्यपेक्षा २० ते २५ टक्के कमी झाली आहे. या लॉकडाउन -३ दरम्यान गृहराज्य मंत्रालयाने अतिरीक्त वस्तू आणि शेजारच्या परिसरातील दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. या संदर्भात अखिल भारतीय जेम्स अँड ज्वेलरी हाऊसिंग कौन्सिलचे (जीजेएफ) अध्यक्ष अनंत पद्मनाभन म्हणाले की, गेल्या एका आठवड्यात स्थानिक अधिकाऱ्यांची परवानगी मिळाल्यानंतर दागिन्यांच्या व्यापाऱ्यांनी काही राज्यात दुकाने उघडली आहेत. ते पुढे म्हणाले की, या किरकोळ विक्रेत्यांची विक्री केवळ २० ते २५ टक्के इतकी आहे. लोक लग्नासाठीच्या खरेदीसाठी त्यांच्याकडे येत आहेत कारण सोन्याची किंमत वाढत आहे. यासह काही लोकांनी अक्षय तृतीयेवर सोन्याची ऑनलाईन ऑर्डरही बुक केली होती. आता ते दुकानांवर येऊन डिलिव्हरी घेत आहेत.

ते म्हणाले की, देशात सध्या सोन्याचे दर दहा ग्रॅम ४५,००० रुपयांवर आहे. पद्मनाभन म्हणाले की, १८ मे पर्यंत कोविड -१९ ची स्थिती काय आहे आणि सरकार या संदर्भात कोणता निर्णय घेते यावर आमचे लक्ष आहे. नंतर ते म्हणाले की, तामिळनाडूतील सराफा व्यापाऱ्यांनी दुकाने उघडण्याच्या परवानगीसाठी स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे. “सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या साथीला आळा घालण्यासाठी आम्ही सर्व खबरदारीच्या उपाययोजना करू.”

NSE, BSE To Extend Gold ETF Trading Hours On Akshaya Tritiya

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

आज पासून सुरु झाली स्वस्त सोन्याची विक्री; जाणुन घ्या संपुर्ण प्रक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोना विषाणूचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर चांगलाच झाला आहे. भविष्यातील अनिश्चिततेमुळे शेअर बाजारामध्येही सध्याला मोठी घसरण दिसून आली. त्याच वेळी, गुंतवणूकदारांनीही सुरक्षित गुंतवणूक मानल्या जाणाऱ्या सोन्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. यामुळे सोन्याच्या किंमती या गगनाला भिडलेल्या आहेत. मात्र,आपणास स्वस्तात सोने घ्यायचे असल्यास, आपण सॉव्हरेन गोल्ड बाँड योजनेचा लाभ घेऊ शकता, ज्याचे सब्सक्रिप्शन हे आजपासून सुरु झाले आहे. दुसर्‍या टप्प्यातील या गोल्ड बाँडचे २०२०-२१ आर्थिक वर्षाचे सब्सक्रिप्शन सोमवारी वर्गणीसाठी उघडेल. या योजनेतील सब्सक्रिप्शनची शेवटची तारीख हि १५ मे आहे. सध्याच्या आर्थिक वर्षाचा दुसरा सोन्याचा रोख अशा काळात येणार आहे जेव्हा गुंतवणूकदारांमध्ये सोन्याच्या मागणीत जोरदार वाढ झालेली आहे. सोन्याचा इश्यूचा दर ४५४० रु. आहे

सोमवारी वर्गणीसाठी सुरू झालेल्या सोन्याच्या बाँडचा इश्यू दर सरकारने ४५९० रुपये प्रति ग्राम निश्चित केला आहे. मात्र, जर आपण ऑनलाईन अर्ज करत असाल आणि डिजिटल माध्यमातून पैसे भरत असाल तर आपल्याला प्रति ग्रॅम ५० रुपयांची सूट देखील मिळेल. अशा गुंतवणूकदारांना सोन्याची इश्यू किंमत प्रति ग्रॅम ४५४० रुपये असेल. ही योजना नोव्हेंबर २०१५ मध्ये सुरू झाली होती. यामध्ये सोन्याची फिजिकल मागणी कमी करणे आणि सोन्याच्या खरेदीसाठी वापरण्यात येणारी घरगुती बचत ही आर्थिक बचतीत वापरणे हे यामागील उद्दीष्ट आहे. आपण घरी सोने खरेदी करण्याऐवजी सॉवरेन गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक केल्यास आपण करही वाचवू शकता.

आर्थिक वर्षात केवळ ५०० ग्रॅम सोन्याचे बाँड खरेदी करता येतील –
सॉव्हरेन गोल्ड बाँड योजनेत गुंतवणूक करणारी व्यक्ती आर्थिक वर्षात ५०० ग्रॅम पर्यंत सोन्याचे बाँड खरेदी करू शकते. एक ग्रॅम ही किमान गुंतवणूक आहे. कोणतीही व्यक्ती किंवा एचयूएफ आर्थिक वर्षात जास्तीत जास्त ४ किलो सोन्याचे बाँड खरेदी करू शकते. एकंदरीत, बाँड खरेदी करण्यासाठी स्वतंत्रपणे मर्यादा ही ४ किलो आहे, तर ट्रस्ट किंवा संस्थेसाठी ही २० किलो निश्चित केली गेली आहे. योजनेची परिपक्वता ही ८ वर्षे आहे. परंतु, अद्याप आपल्याला बाँड्स विकायचे असल्यास आपल्याला कमीतकमी ५ वर्षे तरी प्रतीक्षा करावी लागेल. आपण या योजनेत गुंतवणूक करून आपला कर देखील वाचवू शकता. योजनेंतर्गत गुंतवणूकीवर वार्षिक २.५% व्याज दिले जाईल.

येथून स्वस्त सोने खरेदी करा
सॉव्हरेन गोल्ड बाँडची विक्री बँक, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, निवडलेली पोस्ट ऑफिस आणि एनएसई व बीएसई मार्फत केली जाते. आपण यापैकी कोणत्याही ठिकाणी जाऊन या बाँड योजनेत सामील होऊ शकता.या बाँडची किंमत ही भारत बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन लि. च्या ९९९ शुद्ध सोन्याच्या शेवटच्या ३ दिवसांच्या सरासरी किंमतींच्या आधारे रुपये मध्ये निश्चित केली जाते.

११ मे ते १५ मे या कालावधीत तिसरी मालिका ८ ते १२ जून दरम्यान सब्सक्रिप्शन होऊ शकते. त्याचा हप्ता १६ जून रोजी जाहीर केला जाईल. ८ ते १२ जून दरम्यानची तिसरी मालिका, ३ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट दरम्यानची पाचवी मालिका. त्याच वेळी, सहाव्या मालिकेचे सब्सक्रिप्शन हे ३१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर दरम्यान घेतली जाऊ शकते. त्याचा हप्ता हा ८ सप्टेंबर रोजी जाहीर केला जाईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

जनतेच्या डोळ्यांत धूळ टाकून त्यांनाच शहाणपणा शिकवणारं; निष्क्रिय आणि भ्रामक – नरेंद्र मोदी सरकार

थर्ड अँगल | भावना आणि राजकीय विधाने सामान्यतः मतदारांचे लक्ष विचलित करून त्यांना आकर्षित करू शकतात. संकटात ते कोणत्याही शासनासाठी खराब पर्याय आहेत. “यापुढे रस्त्यावर स्थलांतरित कामगार दिसणार नाहीत” असे सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगून ४१ दिवस झाले आहेत. “त्यांना जवळच्या उपलब्ध आसऱ्याच्या ठिकाणी घेऊन जाण्यात आले आहे”, आणि जवळपास २३ लाख लोकांना अन्न देण्यात आलं असल्याची माहिती भारताच्या सॉलिसिटर जनरलने देशातील न्यायाधीशांना दिली. हेच न्यायाधीश ज्यांना सरकारचा प्रत्येक शब्द ऐकायची सवय आहे. सॉलिसिटर जनरल यांनी सांगितलेली गोष्ट बोचणारी असली तरी खरीच होती. नोकरी, अन्न आणि वाहतूक सेवांच्या अनुपस्थितीत कंटाळलेले आणि तरीही मजबूत धीर उराशी बाळगलेले हे कामगार, ज्यांनी एकेकाळी अर्थव्यवस्थेला शक्ती दिली आहे, त्यांचा घरी परतण्याचा हजारो किलोमीटरचा खडतर प्रवास पायी आणि सायकलवरून सुरुच आहे. पालक त्यांच्या मुलांना सोबत घेऊन, सामान आणि शिल्लक असेल ते डोक्यावर घेऊन ओढत आहेत. आजारी आणि जखमी होईपर्यंत, जितके सहन करू शकता येईल तितके ते सहन करत ते पुढे चालले आहेत. काहीजण थकवा आणि आजारपणामुळे रस्त्यावरच मरत आहेत तर काहीजण घरी पोहचून मरत आहेत. एक समूह रेल्वे रुळावरून जाताना जमिनीत गाडला गेला, त्यांना वाटले की रूळ रिकामाच आहे.

वेगवेगळ्या उपाययोजनांमध्ये भारताची ५३ दिवसांची वाढीव संचारबंदी जगातील एक कठीण संचारबंदी होती. यामुळे covid-१९ च्या प्रकरणांच्या संख्यांची गती कमी होईल, पण सरकारच्या १६ मे नंतर एकही प्रकरण सापडणार नाही या दाव्याविरुद्ध त्यावर मात करता येणार नाही. दिल्लीतल अखिल भारतीय वैद्यक विज्ञान, या अव्वल वैद्यकीय संस्थेचे संचालक रणदीप गुलेरिया या आठवड्यात मिंट या प्रसारमाध्यमाशी बोलताना म्हणाले, “आम्ही जे पाहत आहोत त्यानुसार प्रकरणे वेगाने वाढत आहेत. महत्वाची समस्या अशी आहे की आपल्याला घसरणारा कल दिसत नाही आहे (इटली किंवा चीनसारखा). 

कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी भारतीयांनी कदाचित मेणबत्त्या पेटवल्या असतील, थाळ्या वाजवल्या असतील, आणि डोक्यावरुन पुढे गेलेले जेट बघून ते आश्चर्यचकितही झाले असतील. सुरक्षा दलांनी बँड वाजवले असतील, आणि नौदल जहाजांनी अग्रभागी काम करणाऱ्यांना अभिवादन केले असेल पण या शैलीमागील तात्पर्य शोधणे खूप कठीण होते. कोरोना विषाणूभोवतीचे चांगले दिग्दर्शित कार्यक्रम हे मोठ्या प्रमाणात  कमकुवत नियोजनाचे, औदासिन्याचे, इस्लामफोबियाचे संधीसाधू उत्तेजन देणारे आणि स्वातंत्र्य कमी करत असल्याचे दिसून येत आहेत. विषाणू मारण्यापूर्वी आगाऊ सूचना देऊ शकत नाही. या प्रकरणात भारताला आगाऊ चेतावणी मिळाली होती, पण तेवढे पुरेसे झाले नाही. २१ जानेवारी रोजी पहिले प्रकरण सापडण्याआधीच भारताने प्रवाशांची कोरोना विषाणूची चाचणी सुरू केली होती, या सत्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी फारसे ठाम नव्हते. 

Factchecker.in ने दिलेल्या वृत्तानुसार, त्या दिवसापर्यंत केवळ ३ विमानतळांवर तपासणी सुरु होती (त्या दिवशी आणखी चार विमानतळ सुरु करण्यात आले), आणि केवळ हाँगकाँग, चीन यांसारख्या २० देशांमधील प्रवाशांना संसर्ग झाल्याची नोंद झाली. पत्रकार नितीन सेठी आणि कुमार संभव श्रीवास्तव यांनी  www.article-14.com (इथे आणि इथे) दिलेल्या वृत्तानुसार, एकट्या संचारबंदीमुळे एका विशिष्ट दिवशी वाढलेले संक्रमण ४० टक्क्यांनी कमी होईल असा इशारा सर्वोत्तम वैद्यकीय संशोधन परिषदेकडून मिळाला असूनही मोदी सरकारने एक महिनाभर त्याकडे दुर्लक्ष केले. यानंतर त्वरित भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने हस्तक्षेप करण्याचा सल्ला देण्यात आला. यामध्ये दारोदारी जाऊन गरिबांना अन्न आणि इतर जीवनावश्यक वस्तू पुरविण्याचा, जिल्हास्तरीय संसर्ग देखरेखीचा, संसर्गजन्य समूह शोधण्याचा, अलगावसाठी जलद अहवाल देण्याचा, दाट लोकवस्ती असलेल्या भागात लोकांचा एकत्रित अलगाव करण्याचा तसेच रुग्णालयातील बेड आणि आत्यंतिक काळजी युनिट (icu) यांची वाढ करण्याचा समावेश आहे. “ही चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरु आहे आणि कोणतीही कार्यवाही झालेली नाही. “अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या मेडिसीन विभागाचे प्रमुख आणि पंतप्रधान covid -१९ च्या टास्क फोर्सचे सभासद नवीत विग यांनी २९ मार्च रोजी झालेल्या अंतर्गत बैठकीत “आपल्याला सत्य सांगायलाच हवं.” अशी भूमिका मांडली होती.

तज्ज्ञांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष – कोरोना संकटाच्या काळात तज्ज्ञांच्या सल्ल्याकडे सरकारने दुर्लक्ष केलं आहे. सत्य कधीही सार्वजनिक केले जात नाही, ते दाबण्याचा किंवा त्याकडे दुर्लक्ष करण्याचाच पर्याय केला जातो. १ मे रोजी संचारबंदी वाढविल्यानांतर पुन्हा एकदा टास्क फोर्सच्या २१ सभासदांना दुर्लक्षित करण्यात आल्याची माहिती विद्या कृष्णन यांनी Caravan साठी दिली. त्यांनी लिहिलं आहे, “तीन महिने साथीच्या आजाराच्या वाढत्या प्रकरणांशी आपण संघर्ष करत आहेत आणि नोवल कोरोना विषाणूच्या प्रतिसादात तज्ज्ञांच्या सल्ल्याची बाजू बाजूला ठेवणे हा मोदी प्रशासनाचा ट्रेडमार्क झाला आहे.”आर्थिक आणि सामाजिक अनागोंदी तसेच गुडघे टेकलेल्या प्रतिक्रियांवर तोडगा काढत दिलेल्या सूक्ष्म नियोजन आणि अंमलबजावणीच्या सर्व सूचना मोदी सरकारने नाकारल्या आहेत हे अगदी स्पष्ट आहे.

उत्तम नियोजन, संवाद आणि अंमलबजावणी साध्य करण्यासाठी काय करू शकतो, हे समजून घेण्यासाठी मोदींना जिथे साथीच्या सुरुवातीच्या काळात सर्वाधिक प्रकरणे नोंद झाली, त्या केरळच्या कामाकडे पाहण्याची गरज आहे. आता त्यांनी भारताच्या ३.४% प्रमाणाच्या तुलनेत ०.७९% मृत्यूच्या प्रमाणासह केवळ ४ मृत्युंसहित यावर मात केली आहे. भारताच्या २३% च्या तुलनेत केरळचे ९३% रुग्ण बरे झाले आहेत. याऊलट भारत सध्या घसरणाऱ्या अर्थव्यवस्थेच्या पुनरुत्थानाची, संसर्गाची, मृत्यूची दखल घेण्याच्या आवश्यकतेला संतुलित करण्याचा प्रयत्न करीत आहे. दिल्लीतील केंद्र सरकारकडून अनेकदा दिले जाणारे विरोधाभासी आदेश आणि दिशानिर्देश समजून घेण्यासाठी लोक संघर्ष करीत आहे. सरकार सध्या चार तासांत दिलेल्या संचारबंदीपासून सुरु झालेल्या पूर्वीच्या चुका, जसे की देशभरातील नोकरी, पैसा आणि शेवटी अन्न यांच्याशिवाय अडकलेले स्थलांतरित कामगार यासारख्या चुका संतुलित करण्यासाठी संघर्ष करीत आहेत. सर्वोच्च न्यायालयाला २ दशलक्ष लोकांची काळजी घेतली जात असल्याचा दावा करूनही, मोदींनी भारतातील लोकांना गरजुंना मदत करायला सांगून नैतिक जबाबदारी सोपविली. 

निष्क्रियतेचे ४० दिवस – ज्यांना घरी परत जायचे होते, पण घरी जाऊ शकत नव्हते किंवा परवानगी नव्हती अशांसाठी कोणत्याही प्रकारे रेल्वे आणि बसची व्यवस्था केली गेली नव्हती. पहिली रेल्वे ही ४० दिवसांच्या निरर्थक निष्क्रियतेनंतर सुरु करण्यात आली. तीही कामगारांच्या राहण्याच्या गर्दीच्या ठिकाणी संसर्ग होण्याचा धोका होण्याच्या काळात होय. शहरी भागातील ८०% सकारात्मक प्रकरनामधून ते कदाचित हा संसर्ग तुलनेने स्वच्छ अशा ग्रामीण भागात घेऊन जातील. कर्नाटकमध्ये, भारतीय जनता पक्षाच्या सरकारने रेल्वे रद्द केल्या तेही, बांधकामाचे काम पुन्हा सुरु झाल्यानंतर जेव्हा बांधकाम व्यावसायिकांनी कामगार नसल्याची तक्रार केल्यावरही त्यांनी रेल्वे रद्द केल्या. टीकेच्या वादळानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला. काही शहरामध्ये कट्टर कामगारांना गरजेच्या वेळी शिव्या दिल्यानंतर ते परत येणार नाहीत असे सांगितले. मी हे लिहीत असताना स्थलांतरित कामगारांमध्ये सर्वत्र अशांतता पसरली आहे. पुन्हा कंपनी सुरु करू पाहणाऱ्यांना सरकारच्या कारभाराच्या मनमानीविरोधात संघर्ष केला पाहिजे. बरेच जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकारी स्थानिक जुलमी अधिकाऱ्यांप्रमाणेच काम करत आहेत. सरकारी ढीगभर अधिसूचनांचे ते हवे तसे अर्थ सांगत आहेत.

राहुल जॅकोब लिहितात, “covid च्या सूचनांच्या पावसात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.” थिंक टँक पीआरएसने विधिमंडळ संशोधनाचा हवाला देत, त्यांनी दिल्लीपासून ६०० आणि राज्यांमधून ३,५०० पर्यंत निर्देश दिला. सरकारद्वारे चालविल्या जाणाऱ्या कंपन्यांसह बऱ्याच कंपन्यांनी सांगितले की ते सरकारच्या संचारबंदीदरम्यान कामगारांना पगार देण्याच्या आदेशाचे पालन करू शकणार नाहीत किंवा करणार नाहीत. आज देशात विक्रमी पातळीवर बेरोजगारीची नोंद झाली आहे. मोदींनी घरमालकांना (नोकरीस ठेवणारा मालक) दयाळूपणे वागण्याचे आवाहन केले आहे. पण त्यांच्या सरकारने काहीच केले नाही. जसे बऱ्याच देशांनी काही कंपन्यांना परतफेड करण्यासाठी किंवा कामगारांना पगार देण्यासाठी अगदी अंशतः का असेना मदत केली आहे. मार्च २०१९ मध्ये मोदींनी जाहीर केलेल्या विशेष आर्थिक टास्क फोर्स कडून काहीही ऐकण्यात आले नाही. केवळ या आठवड्यात सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार यांनी सांगितल्याप्रमाणे  “दुपारचे जेवण निःशुल्क नाही” याशिवाय आर्थिक उत्तेजन पॅकेजवरही शांतता होती. दरम्यान मोदी सरकार नवी संसद इमारत बांधण्यासाठी आणि नवी दिल्लीतील सेंट्रल व्हिस्टाची नव्याने रचना (डिझाईन) करण्यासाठी २०,००० कोटींचा प्रकल्प नव्याने पुढे आणत आहे. (त्याऐवजी राज्य सभेने ८० कोटी खर्चाची कपात जाहीर केली आहे). सोप्या काळात भावना आणि राजकीय विधाने यामुळे मतदारांचे लक्ष विचलित करता येऊ शकते आणि निवडणुकीत त्याचा चांगला लाभांश मिळू शकतो. संकटकाळात ते कमी होत असलेल्या परतावा आणि प्रशासकीय अराजक यांच्या अधीन आहेत जे शासनासाठी लक्षात घेण्यासारखे खूप दुर्बल पर्याय आहेत. 

समर हळरणकर हे Article-14.com चे संपादक आहेत. हा प्रकल्प कायद्याचा दुरुपयोग आणि त्याला मिळालेल्या आशेचा मागोवा घेतो. स्क्रोल या ऑनलाईन माध्यमासाठी त्यांनी लिहलेल्या या लेखाचा अनुवाद जयश्री देसाई यांनी केला आहे. अधिक संपर्क – 9146041816

मूळ इंग्रजी लेख वाचण्यासाठी – https://scroll.in/article/961418/smoke-mirrors-and-modi-a-grand-illusion-of-governance

रेल्वेची साईट क्रॅश; पहिल्याच दिवशी ऑनलाईन तिकीट बुकिंगचा उडाला बोजवारा

नवी दिल्ली । लॉकडाऊनमध्ये विविध ठिकाणी अडकलेल्या मजुरांव्यतिरिक्त इतर प्रवाशांना घरी पोहचवण्यासाठी १२ मेपासून रेल्वे १५ पॅसेंजर ट्रेन चालवणार आहे. या पॅसेंजर ट्रेन जोडीने चालवण्यात येतील. (return journeys) यानुसार या ट्रेनच्या एकूण ३० फेऱ्या होतील. यासाठी आज (सोमवारी) दुपारी ४ वाजल्यापासून IRCTC या रेल्वेच्या संकेतस्थळावर तिकिटांचे ऑनलाईन बुकिंग सुरु होणार होते. मात्र, रेल्वेचे हे संकेतस्थळ उघडत नसल्याच्या तक्रारी आता समोर येत आहेत. दुपारी ४ वाजल्यापासून बुकिंगला सुरुवात होणार होती. मात्र, रेल्वेचे संकेतस्थळ उघडायला गेल्यास This page not working असा संदेश झळकत आहे. त्यामुळे रेल्वेने आपल्या गावी जाण्याची आस लावून बसलेल्या लोकांचा हिरमोड झाला आहे.

दरम्यान, रेल्वेकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. एकाचवेळी अनेक लोक संकेतस्थळावर आल्यामुळे रेल्वेची साईट क्रॅश झाल्याची शक्यता आहे. मात्र, थोड्याचवेळात म्हणजे ६ वाजता संकेतस्थळ पुन्हा सुरु होईल, असे IRCTCने स्पष्ट केले आहे.

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाची पार्श्वभूमी पाहता सुरु असणाऱ्या लॉकडाऊनच्या काळात पूर्णपणे बंद असणारी रेल्वे वाहतूक आता खास सुविधेअंतर्गत टप्प्याटप्पाने सुरु होणार आहे. त्यानुसार प्रवाशांसाठी रेल्वेनं महत्त्वाची नियमावली जारी केली आहे. मुख्य म्हणजे तिकीट कन्फर्म असेल तरच रेल्वे प्रवास करा, असंही प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येत आहे.

रेल्वे प्रवासाठी देण्यात आलेल्या काही अटींमध्येच कन्फर्म ई तिकीट असणं अनिवार्य असेल. त्याशिवाय रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जाणार नाही. शिवाय प्रवासाची सुरुवात करतेवेळी आणि प्रवासादरम्यानही सोशल डिस्टन्सिंगचं काटेकोरपणे पालन गेलं जाण्याची अट नमूद करण्यात आली आहे. निर्धारित स्थानकावर पोहोचल्यानंतर तेथे आरोग्य विभागाच्या आदेशांनुसार सर्व अटीचं पालन करणं प्रवाशांना बंधनकारक असेल. रेल्वेची कँटीन सेवा बंद असेल. शिवाय नेहमी देण्यात येणाऱ्या सुविधा उदा. ब्लँकेट, चादर, उशी या सुविधा पुरवण्यात येणार नाही.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

अर्थव्यवस्थेला कोरोनाच्या संकटापासून वाचवण्यासाठी सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय !

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोना विषाणूमुळे जागतिक अर्थव्यवस्था संकटात जाते आहे. हे पाहता सौदी अरेबियाने एक मोठा निर्णय घेतला असून त्या अंतर्गत सौदी अरेबियाने आपल्या अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारण्यासाठी व्हॅल्यू एडेड टॅक्स तीनपट वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यासह, शासकीय कर्मचार्‍यांना देण्यात येणार कॉस्ट ऑफ लिविंग अलाउंस देखील थांबविला आहे जेणेकरून आर्थिक तूट कमी होऊ शकेल.सौदी अरेबियाने दोनच वर्षांपूर्वी व्हॅट लागू केला होता. याची अंमलबजावणी करण्यामागील सौदीचा हेतू हा होता की जगभरातील कच्च्या तेलाच्या बाजारपेठेवरील त्यांचे अवलंबन कमी व्हावे. सौदीच्या सरकारी वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार व्हॅट दर हा पाच टक्क्यांवरून १५ टक्के इतका करण्यात आला आहे. हा नवीन कर दर १ जुलैपासून लागू होईल.

अर्थमंत्री मोहम्मद अल जादान यांनी आपल्या निवेदनात असे म्हटले आहे की हे बदल त्रासदायक आहेत परंतु हे दीर्घकाळ आर्थिक आणि आर्थिक स्थिरतेसाठी अत्यंत महत्वाचे आहे. ज्यासह आम्ही कोरोना विषाणूच्या या संकटाच्या विचित्र परिस्थितीमुळे उद्भवलेल्या नुकसानीसह परिस्थितीपासून मुक्त होऊ.

कोरोना संकट से अर्थव्यवस्था को बचाने के लिए सऊदी अरब ने लिया बड़ा फैसला! Taxes को लेकर उठाने जा रहा है ये कदम

यामुळे अर्थव्यवस्था सापडली संकटात
कोरोना विषाणूमुळे जगभरात सुरु असलेल्या लॉकडाऊननंतर तेलाच्या किंमती कमी झाल्यामुळे तेलाने संपन्न असलेल्या सौदीला मोठा त्रास सहन करावा लागला आहे. आता सरकारी खर्च हा उत्पन्नापेक्षा अधिक झाला आहे आणि या वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांतच सौदीची अर्थसंकल्प तूट ही ९ अब्ज डॉलर्स होती. कच्च्या तेलाच्या किंमतीतील घसरण हे यामागील प्रमुख कारण आहे. तेलाच्या किंमती खाली आल्यामुळे सौदीचा महसूल हा तब्ब्ल २२ टक्क्यांनी कमी झाला आहे.

 २०११ नंतरची ही पहिलीच अशी वेळ आहे जेव्हा चलनाचे असे हाल झाले आहे. कोरोना संकटामुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या नवीन नियमांमुळे विकास दर कमी होईल, परंतु असेही अपेक्षित आहे की क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी घेतलेल्या आर्थिक सुधारणांची मोठ्या प्रमाणावर अंमलबजावणी केली जाईल.

गेल्या वर्षी सौदी अरेबियाने सरकारी तेल कंपन्या अरामकोच्या शेअर्समध्ये लोकसहभाग घेण्याच्या योजनेद्वारे २५.६ अब्ज डॉलर्स जमा केले. तेल कंपनीचे शेअर्स विक्री करण्याची योजना हा क्राउन प्रिन्सच्या योजनेचा एक प्रमुख भाग होता, ज्याद्वारे त्याला देशाच्या अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण करायचे आहे आणि केवळ तेलावरील देशाचे अवलंबित्व कमी करायचे आहे

Saudi Arabia's King Salman meets with Iraqi Prime Minister in ...

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे आहे तब्बल ‘इतक्या’ कोटींची संपत्ती; शपथपत्रात केले जाहीर

मुंबई । विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक अर्ज भरला. यावेळी निवडणूक उमदेवार म्हणून भरलेल्या शपथपत्रात प्रथमच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संपत्ती अधिकृतपणे  जाहीर करण्यात आली. मुख्यमंत्री ठाकरे आणि त्यांची पत्नी रश्मी ठाकरे यांची एकत्रित संपत्ती अंदाजे 125 कोटी रुपये इतकी आहे. त्यांच्याकडे एकूण ३ बंगले आहेत. ज्यापैकी वांद्रे पूर्व कला नगर येथे ‘मातोश्री’ बंगला आणि ‘मातोश्री’च्या अगदी समोर बांधले जात असलेलं नवं घर. सोबतच कर्जत येथे ठाकरे यांचं फार्म हाऊस आहे.

निवडणूक शपथपत्रात उद्धव ठाकरेंनी आपल्या संपत्तीचे स्त्रोत सुद्धा जाहीर केले आहेत. यामध्ये विविध कंपन्यांचे समभाग, विविध कंपन्यांमध्ये भागीदारी आणि त्यांचे डिव्हिडंड असे ठाकरे यांच्या उत्पन्नाचे विविध स्रोत आहेत. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे एकही वाहन नसल्याचं त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. याचसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पोलिसांमध्ये एकूण 23 प्रकरणांची नोंद आहे. ज्यामधील 12 रद्द झाल्या असून बाकीच्या खाजगी तक्रारी आहेत.

बऱ्याच वर्षांपूर्वी नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर ठाकरे घराण्यावर त्यांच्या संपत्तीबाबत थेट आरोप केले होते. आपल्या आरोपात नारायण राणे म्हणाले होते कि, संपत्ती जाहीर करावी लागेल म्हणून ठाकरे निवडणूक लढत नाहीत. त्यानंतर ठाकरे घराण्यातील व्यक्तींच्या संपत्तीची प्रामुख्याने चर्चा सुरु झाली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

शोएब अख्तरला आता पाकिस्तानात सुट्टी नाही; भारताबाबत केले ‘हे’ मोठे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । रावळ पिंडी एक्सप्रेस म्हणून प्रसिद्ध असलेल्या माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब अख्तरच्या वक्तव्यामुळे पाकिस्तानमध्ये सध्या एक वादळ निर्माण होऊ शकते. काही कट्टरपंथी पाकिस्तानी लोकांना शोएब अख्तरचे भारताचा एजंट ठरवून पाकमध्ये त्याचे राहणे अवघड करू शकतात. याआधीही तो पाकिस्तानी हिंदू क्रिकेटपटू दानिश कनेरियाच्या दुर्लक्ष तसेच भेदभावाचा मुद्दा उपस्थित करून पाकिस्तानच्या मीडिया आणि कट्टरपंथीयांच्या संतापाचा बळी ठरला आहे.

वास्तविक शोएब अख्तरने जे म्हटले आहे त्याला बंडखोरी म्हटले जाऊ शकते, किमान आजच्या पाकिस्तानच्या वातावरणात तरी. आपल्याला पाकिस्तान सोडून भारतात स्थायिक व्हायचे आहे, असे शोएब अख्तरने नुकतेच म्हटले आहे. शोएब अख्तर म्हणाला की, जर तो अब्जाधीश झाला तर त्याला मुंबईत कायमस्वरूपी घर घ्यायचे आहे. अख्तरने असेही सांगितले की आपण भारतातून मिळवलेल्या पैशापैकी ३० टक्के रक्कम या देशात डोनेट करतो.

हॅलो एपवरील एका व्हिडिओ सेशन मध्ये अख्तर म्हणाला होता, ‘मी भारतातून जे कमावतो त्यातील ३० टक्के पैसे मी येथे डोनेट करतो. मी जर कधी अब्जाधीश झालो तर मला मुंबईत स्थायिक होणे आवडेल. २००५मध्ये जेव्हा काश्मीरमध्ये भूकंप झाला होता तेव्हा त्याने अनेक भारतीयांना पाठिंबा दर्शविला होता तसेच तो पाकिस्तानमधील हिंदूंनाही मदत करत असल्याचे सांगितले. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे दानिश कनेरिया आहे.

शोएब अख्तर म्हणाला की, सर्व धर्मांचे अनुसरण करणारे त्याच्यावर प्रेम करतात. तो म्हणाला, ‘मी आतून खूप मऊ आहे, परंतु बाहेरून माझी इमेज अशी आहे की मी खूप गंभीर आणि आक्रमक आहे. तो म्हणाला की त्याने शाहरुख खानबरोबर आपल्या चाहत्यांवर प्रेम कसे करावे हे शिकले आहे. अख्तर म्हणाला, ‘शाहरुख आपल्या चाहत्यांशी असा भेटतो कि जसा तो त्यांना वर्षानुवर्षे ओळखत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

महाराष्ट्र पोलिसांच्या सन्मानात सचिन, विराट, अक्षयने ठेवला ‘हा’ DP

मुंबई । देशात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढताना दिसत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी डॉक्टर, नर्स, पोलिस, सफाई कर्मचारी आपल्या कुटुंबाची पर्वा न करता देशासाठी लढत आहे. अशातच कोरोनासोबत दोन हात करताना खाकी वर्दीतील वीरांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. काहींनी तर आपले प्राण सुद्धा गमावले आहे. अशा पोलीस दलातील कोरोनावीरांचा सन्मान करण्यासाठी सेलिब्रिटी मैदानात उतरले आहेत. आपल्या सोशल मीडियाचा DP बदलून सेलिब्रिटींनी महाराष्ट्र पोलिसांचं प्रतिक चिन्ह लावलं आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar), भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार कप्तान विराट कोहली (Virat Kohli) आणि अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) यांनी महाराष्ट्र पुलिस (Maarashtra Police) यांचा सन्मान करत आपले DP बदलले आहेत.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटरवर, ”सदैव देशसेवेस कर्तव्यतत्पर असणारे पोलीस एकटे नाहीत हे अधोरेखित करण्यासाठी त्यांच्या सन्मानार्थ मी फेसबुक, ट्विटर व इन्स्टाच्या अकाऊंटवर डीपी म्हणून महाराष्ट्र पोलिसांचा लोगो ठेवणार आहे. तुम्हीही आपला डीपी ठेवून पोलीस बांधवांच्या सन्मानात सहभागी व्हा.” असं आवाहन ट्विटरवर केलं होत.

दरम्यान, पोलिसांच्या प्रोत्साहन देण्यासाठी अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपले डीपी बदलत महाराष्ट्र पोलिसांचा लोगो डीपी म्हणून ठेवला. यांनतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ”उद्योग, खेळ, मनोरंजन इत्यादी क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच समाजातील सर्व घटकांनी माझ्या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद देऊन, महाराष्ट्र पोलिसांचे मनोबल वाढवण्यासाठी जे प्रयत्न केले त्याबद्दल मी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो.” असं ट्विट केलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

हिरे व्यापारी नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाच्या खटल्याची सुनावणी आजपासून लंडनच्या कोर्टात सुरू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । लंडनच्या वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट कोर्टाकडून हिऱ्यांचा व्यापारी असलेल्या नीरव मोदी याच्या भारताशी प्रत्यार्पणाच्या खटल्याची सुनावणी आजपासून सुरू होणार आहे. नीरव मोदी याच्यावर फसवणूक आणि पैशाच्या अफ़रातफ़रीचे गुन्हे दाखल आहेत. तत्पूर्वी, यूकेच्या कोर्टाने नीरव मोदीचा जामीन अर्ज रद्द केला होता आणि त्याला ११ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. प्रत्यार्पण प्रकरणाची सुनावणी ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होईल.

नीरव मोदी याच्यावर भारतातील पंजाब नॅशनल बँकेकडून दोन अब्ज डॉलर्स (चौदा हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांच्या) कर्जाची फसवणूक आणि पैशाच्या घोटाळ्याचा आरोप आहे तसेच त्याला फरार घोषित केले गेले आहे.आपल्या प्रत्यार्पणाच्या आदेशाला त्याने यूकेच्या न्यायालयात आव्हान दिले आहे.४९ वर्षीय नीरव मोदी सध्या दक्षिण पश्चिम लंडनच्या तुरुंगात आहे.

 

मोदीला भारताकडे सुपूर्द करण्याच्या याचिकेशी संबंधित सुनावणी ही पाच दिवस चालणार आहे. ब्रिटन सरकारने भारताच्या अर्जावर कारवाई करण्यास मान्यता दिली होती. केंद्रीय अन्वेषण विभाग आणि दक्षता संचालनालय या दोन तपास यंत्रणांनी मोदींविरोधात हा खटला दाखल केला आहे. त्याच्यावर असा आरोप आहे की भारतीय बँकेची बनावट संमती दर्शवून त्याने परदेशातील बँकांकडून कर्ज घेतले आणि त्या पैशामध्ये फेरफार केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.