Wednesday, December 24, 2025
Home Blog Page 5810

मुंबईत अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींसाठी लोकल ट्रेन सुरु करा; उद्धव ठाकरेंची मोदींकडे मागणी

मुंबई । कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशातील लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपण्याच्या काही दिवसांपूर्वीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करत प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या मागण्याही ऐकल्या. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही यावेळी पंतप्रधानांकडे काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करत मुंबई लोकल सुरु करण्याची मागणी केली.

कोरोना व्हायरसशी देश, राज्य आणि मुंबईचा लढा सुरु असताना या परिस्थितीमध्ये अत्यावश्यक सेवेवर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रवासादरम्यान अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. एसटी आणि बेस्ट सेवा सुरु आहे. पण, या बसेसची संख्या तुलनेने कमी आहे, त्यामुळे ही समस्या कर्मचाऱ्यांपुढे आहे. परिणामी लोकल ट्रेन सुरु करावी अशी विनंती मुख्यमंत्री ठाकरेंनी मोदींना केली आहे. मात्र, फक्त अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींसाठीच ती असावी व केवळ ओळखपत्र पाहून प्रवास करण्याची परवानगी द्यावी असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदींसोबतच्या चर्चेत स्पष्ट केलं.

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागताच २२ मार्चपासून आजतागायत मुंबईत एकही लोकल धावलेली नाही. रेल्वेच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं आहे. पण, आता मात्र हे चित्र काही अंशी बदलण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता प्रयत्नशील असल्याचं पाहायला मिळत आहे. एकंदरच राज्यात आणि आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईपुढे असणाऱ्या अडचणी पाहता मुख्यमंत्र्यांनी लोकल पुन्हा सुरु करण्याची ही मागणी पंतप्रधानांकडे केल्याचं स्पष्ट होत आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेली ही मागणी पाहता आता केंद्राकडून यावर कोणता निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

लॉकडाउन कायम ठेवा! परंतु..; उद्धव ठाकरेंनी केली मोदींकडे ‘ही’ मागणी

मुंबई । लॉकडाउन कायम ठेवत काही निर्बंध शिथील करावे अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केली आहे. यासोबत उद्धव ठाकरे यांनी राज्यात पोलिसांना विश्रांती देण्याची गरज असून केंद्रीय पोलीस दलाला राज्यात पाठवावं अशी विनंती पंतप्रधानांकडे केली आहे. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा येत्या १७ मेला संपत असून या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्याशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील परिस्थितीची माहिती देत आपलं म्हणणं पंतप्रधान मोदींपुढे मांडलं.

उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना सांगितलं की, “शेतकऱ्यांसाठी आम्हाला कर्जाची गरज आहे. स्थलांतरित कामगार राज्य सोडून जात आहे. यावेळी कोरोनाचे विषाणू ते आपल्या घरी नेणार नाहीत याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. आपण स्थलांतरित कामगारांना राज्य सोडून जाण्याची जबरदस्ती करु नये. शक्य असेल तर त्यांनी येथेच थांबावं. लॉकडाउन उठवला जाऊ नये. तो कायम ठेवून काही निर्बंध शिथील केले जावेत अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

लॉकडाऊनच्या बाबत पंतप्रधानांनी निश्चित व ठोस अशी दिशा दाखवावी, आम्ही सर्व राज्यं त्याप्रमाणे अंमलबजावणी करूत असं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं. गेल्या २ महिन्यांपासून सर्व जण अडकले आहेत. परराज्यातील मजुरांना घराची ओढ लागली आहे. इतर राज्यांतले महाराष्ट्रीय परत येत आहेत. हे मजूर विविध झोन्समधून ये जा करीत आहेत, अशा वेळी सर्वांनी व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे, अन्यथा संसर्ग वाढण्याचा धोका देशाला आहे. महाराष्ट्राने साडे पाच लाख मजुरांच्या निवारा व नाश्ता, भोजनाची व्यवस्था चोखपणे ठेवली तसेच इतर राज्यांशी समन्वय ठेऊन मजुरांना पाठवणे सुरु केलं आहे, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली.

आपण एप्रिल मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखला. आता असं सांगण्यात येते की मे महिन्यात या रोगाचा उच्चांक येईल, तो जून , जुलैमध्येही येऊ शकतो असेही बोललं जात आहे. वुहानमध्ये परत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झालाय असे मी वाचले. जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा इशारा दिला आहे. अशा वेळी लॉकडाऊन बाबत काळजीपूर्वक कार्यवाही व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. मुबईत उपनगरीय रेल्वे सेवा सुरु करावी. मात्र फक्त अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींसाठीच ती असावी व केवळ ओळखपत्र पाहून प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी केली.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

अभिनेता सोनू सूद आला मजुरांच्या मदतीला धावून, केली अशाप्रकारे मदत..

मुंबई । देशातील विविध भागातून राज्यांत कामासाठी आलेल्या परप्रांतातील कामगारांना या लॉकडाउनचा फटका बसला आहे. राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक यासारख्या भागात इतर राज्यातील अनेक मजूर कामासाठी येत असतात. मात्र लॉकडाउनमुळे अनेक दिवस हाताला काम नाही आणि खायला अन्न नाही अशा अवस्थेचा मजुरांना सामना करावा लागला. दरम्यान केंद्र सरकारने कामगारांना घरी जाण्यासाठी विशेष रेल्वे गाड्यांची सोय केली, पण प्रत्येकाला रेल्वेचा प्रवास परवडणारा नाही.

मुंबईतल्या अशाच परप्रांतीय कामगारांसाठी बॉलिवूड अभिनेता सोनू सुद धावून आला आहे. कर्नाटकातील कामगारांसाठी सोनू सुदने १० खासगी बस गाड्यांची सोय केली आहे. सोमवारी ठाण्यावरुन या बसगाड्या कर्नाटकातील गुलबर्गा च्या दिशेने रवाना झाल्या. या मजुरांसाठी वाहतूक व्यवस्थेची सोय करण्यापूरताच मर्यादीत न राहता सोनू या बस निघतेवेळीसुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहिला होता. “सध्याच्या खडतर काळात प्रत्येक जणाला आपल्या परिवारासोबत राहण्याचा हक्क आहे. यासाठी मी महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारच्या अधिकाऱ्यांशी बोलून खास परवानगी मागितली आणि या कामगारांना घरी पाठवण्याची व्यवस्था केली आहे.” सोनू सुदने प्रसारमाध्यमांना माहिती दिली.

गेल्या काही दिवसांपासून स्वगृही परतण्यासाठी मजुरांची सुरु असणारी पायपीट पाहून सोनूने त्यांच्यासाठी वाहतुकीच्या साधनाची सोय करण्याचा निर्णय घेतला होता. आपल्या या निर्णयात महाराष्ट्र राज्य प्रशासनाने चांगली साथ दिल्याचंही तो म्हणाला. इतक्यावरच न थांबता आपण, इतर राज्यांतील मजुरांना त्यांच्या मुळ राज्यांत पाठवण्यासाठीही पावलं उचलणार असल्याचा मानस त्याने व्यक्त केला. शिवाय या मजुरांसाठी प्रवासाच्या मोफत सुविधा उपलब्ध करुन देण्याची विनंतीही त्याने शासनाकडे केली. अतिशय स्तुत्य असं पाउल उचलल्यामुळे सोशल मीडियापासून कलाविश्वापर्यंत अभिनेता सोनू सूद प्रशंसेस पात्र ठरत आहे.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

म्हणूनच आपल्या पाकिस्तान देशातील खेळाडूंचा विक्रम मोडण्याची इच्छा इंझमाम उल हकला कधीही नव्हती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । प्रत्येक खेळाडूला क्रिकेटच्या क्षेत्रात विक्रम करायचा असतो. एवढेच नव्हे तर अनेक फलंदाज सामन्यात नेहमीच विक्रम नोंदवत असतात. यामुळे या नोंदी तरुण खेळाडूंना प्रेरणा देतात आणि त्यांनाही दिग्गजांचा विक्रम मोडायचा असतो.मात्र यादरम्यान, पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हकने एक रोचक गोष्ट सांगितली आहे. त्याचे असे म्हणणे होते की आपल्या देशातील (पाकिस्तान) खेळाडूंचे रेकॉर्ड तो कधीही तोडू इच्छित नव्हता.

विशेष म्हणजे पाकिस्तानसाठी कसोटी क्रिकेटमध्ये दुसर्‍या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा करणारा माजी कर्णधार इंझमाम म्हणाला की त्याने आपल्या देशाचा खेळाडू हनिफ मोहम्मदचा विक्रम मोडण्याचा कधीही विचार केलेला नव्हता.

हनिफने १९५८ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ३३७ धावा फटकावल्या होत्या. इंझमामने २००२ मध्ये लाहोरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध ३२९ धावा केल्या.

Inzamam Ul HAQ- India TV

या सामन्यात पाकिस्तानचा माजी कर्णधाराला दुसर्‍या टोकाकडून कोणाचीही साथ मिळाली नाही आणि मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात तो हनीफचा विक्रम मोडण्यास चुकला. इतकेच नव्हे तर त्याने असेही म्हटले होते की इंझमामला पुढच्या सामन्यात इतर फलंदाजाची साथ मिळाली असती तर ब्रायन लाराच्या ४०० धावांच्या विक्रमाला त्याने केव्हाच मागे टाकले असते कारण न्यूझीलंडचा कोणताही गोलंदाज त्याला त्या सामन्यात त्रास देऊ शकला नव्हता.

इंझमाम त्याच्या यूट्यूब चॅनलवर म्हणाला, “मला आठवते मी शेवटच्या फलंदाजाला सांगितले की तू थोडा वेळ थांबू शकशील का ? तेव्हा त्याच्या चेहर्‍यावरील भाव बरेच काही बोलले. त्याला आत्मविश्वासच नव्हता.”

“म्हणून मी मोठे शॉट्स खेळायचं ठरवलं आणि शेवटी मी बाउंड्री वरच बाद झालो. दुसर्‍या टोकाला माझा चांगला फलंदाज असता तर मी आणखी काही धावा करू शकलो असतो,” असे तो म्हणाला.

Inzamam-ul-Haq, Mark Boucher enlisted as Honorary Life Members of MCC
इंझमाम म्हणाला, “खरं सांगायचं तर हनीफ भाईचा रेकॉर्ड मोडण्याचा माझा हेतू नव्हता. जर हा विश्वविक्रम झाला असता तर वेगळी गोष्ट झाली असती, परंतु माझ्या सहकारी पाकिस्तानी खेळाडूचा विक्रम मोडणे मला कधीच आवडले नसते.”

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

अखेर मोदी सरकारने उचलले ते पाऊल ज्याची सर्वजण वाट पाहत होते; काँग्रेसही म्हणाले हे बरोबर केले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी सोमवारी कोरोनोव्हायरसच्या लॉकडाऊन दरम्यान प्रवासी रेल्वेगाड्या १२ मेपासून सुरू करण्याच्या केंद्राच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. चिदंबरम यांनी एका ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “रस्ते वाहतूक आणि हवाई वाहतुकीसह किरकोळ वाहतूक सुरू केली पाहिजे.” ते म्हणाले की प्रवासी आणि वस्तूंसाठी रस्ता, रेल्वे आणि हवाई सेवा सुरू करणे हाच देशातील आर्थिक आणि व्यावसायिक गतिविधी सुरू करण्याचा एकमेव मार्ग आहे.

चिदंबरम यांच्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, “आंतरराज्य प्रवासी गाड्यांचे काम काळजीपूर्वक सुरू करण्याच्या सरकारच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.” मार्च महिन्यात देशभरात कोरोनव्हायरसमुळे लॉकडाऊन लागू केल्यामुळे सर्व वाहतूक सेवा थांबविण्यात आल्या आणि त्यानंतर केंद्र सरकारने १५ आंतरराज्यिय प्रवासी गाड्या १२ मेपासून सुरू करण्यासंदर्भात रविवारी जाहीर केले.भारतीय रेल्वेने १२ मे २०१० पासून १५ जोड्यांच्या ट्रेनसह हळूहळू प्रवासी रेल्वेगाड्या सुरू करण्याची योजना आखली आहे. या गाड्या नवी दिल्ली स्थानकास देशातील १५ अन्य महत्त्वाच्या शहरांशी जोडणार्‍या विशेष गाड्या म्हणून धावतील, ”अशी माहिती रेल्वे मंत्रालयाने रविवारी एका ट्वीटमध्ये जाहीर केली.

नवी दिल्ली, दिब्रूगड, अगरतला, हावडा, पाटणा, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बेंगलुरू, चेन्नई, तिरुअनंतपुरम, मडगाव, मुंबई मध्यवर्ती, अहमदाबाद आणि जम्मू तवी या गाड्या चालवल्या जातील. आयआरसीटीसी वेबसाइटवर देण्यात आलेल्या ऑनलाइन बुकिंग सेवेद्वारे प्रवाशांच्या तिकिट आरक्षणाची प्रक्रिया आज सायंकाळी चार वाजता सुरू होईल. प्रवाशांना त्यांच्या प्रवासादरम्यान मास्क घालण्याची आणि सर्व सामाजिक अंतर राखण्याच्या आणि खबरदारीच्या उपायांचे पालन करण्याची आवश्यकता असेल. स्टेशनवर अधिकाऱ्यांमार्फत त्यांची तपासणी केली जाईल आणि केवळ विषम प्रवाशांनाच परवानगी दिली जाईल.

प्रवासी गाड्या पुन्हा सुरू केल्याने अडकलेल्या लोकांना आपापल्या घरी परतण्यास मदत होईल. अधिकाऱ्यांनी सांगितले की हे अशा लोकांसाठी आहे ज्यांना परत कामावर जाण्याची गरज आहे आणि लॉकआऊट झाल्यापासून ते अडकले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

मागील २४ तासांत देशभरात ४२१३ नवे कोरोना रुग्ण; आतापर्यंतचा एका दिवसातील सर्वाधिक संख्या

नवी दिल्ली । देशात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक फुगत चालला आहे. ताज्या आकडेवारीनुसार देशात कोरोनाबाधितांची संख्या 67 हजारांच्या पुढे पोहचली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 4 हजार 213 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. चिंताजनक बाब म्हणजे आतापर्यंतचा एका दिवसातील हा सर्वात मोठा आकडा आहे.

देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढून 67 हजार 152 झाली आहे. गेल्या 24 तासात 97 जणांचा मृत्यू झाला आहे. तर देशात 20 हजार 916 रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर आतापर्यंत 2 हजार 206 जणांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना, दिलासादायक बाब म्हणजे रिकव्हरी रेट वाढून तो 31.1 टक्क्यांवर पोहचला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे. लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 मे रोजी सुधारित डिस्चार्ज पॉलिसीची घोषणा करण्यात आली. आता डिस्चार्ज देण्यापूर्वी चाचणी करण्याची आवश्यकता नाही. डिस्चार्जनंतर रुग्णाला 7 दिवस होम आयसोलेशनमध्ये राहणं बंधनकारक आहे. ही डिस्चार्ज पॉलिसी अनेक देशांच्या अभ्यासातून करण्यात आली आहे. अभ्यासानुसार डिस्चार्ज पॉलिसीमध्ये बदल करण्यात आले आहेत.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

दिल्लीत अडकलेल्या युपीएससीच्या विद्यार्थ्यांना राज्य सरकार रेल्वेने परत आणणार

नवी दिल्ली । लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर अनेक राज्यांत मजूर, विद्यार्थी मोठ्या संख्येने अडकले आहेत. लॉकडाऊनमुळे शाळा, महाविद्यालयं बंद असून परीक्षादेखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे शिक्षणासाठी महाराष्ट्राबाहेर गेलेले अनेक विद्यार्थी विविध राज्यात अडकले आहेत. यात दिल्लीत युपीएससी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण सर्वात जास्त आहे.

दिल्लीत युपीएससी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी गेलेले अनेक विद्यार्थी लॉकडाऊनमुळे अडकले आहेत. या विद्यार्थ्यांना आता घरी परत आणण्यासाठी राज्यातील ठाकरे सरकारची तयारी झाली आहे. दिल्लीत युपीएससीची तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना घेऊन येणारी रेल्वे १६ मे रोजी राज्याच्या दिशेने निघणार असल्याची माहिती मिळत आहे. दिल्लीहून जवळपास १२०० विद्यार्थी या रेल्वेने येणार आहेत. दिल्ली ते पुणे किंवा मुंबईपर्यंत ही रेल्वे गाडी जाणार आहे.

यापूर्वी दिल्लीहून भुसावळपर्यंतच रेल्वे जाणार होती. मात्र आता विद्यार्थ्यांना मुंबई किंवा पुण्यापर्यंत नेण्यास केंद्र सरकारने तयारी दर्शवली आहे. या विद्यार्थ्यांना आधी बसेसने दिल्ली रेल्वे स्टेशनवर पोहचवले जाणार आहे. आणि त्यानंतर त्यांना रेल्वे गाडीत बसवले जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा संपूर्ण खर्च राज्यातील ठाकरे सरकारकडून करण्यात येणार आहे. दिल्लीहून घरी परतणारे एकूण १६०० विद्यार्थी आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात १२०० विद्यार्थी येणार आहेत. तर इतर विद्यार्थ्यांना दुसऱ्या टप्प्यात आणले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. काही दिवसांपूर्वी कोटा येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांची सुद्धा विनामूल्य घरवापसी राज्य सरकारने केली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

दिलासादायक! देशात २०,९१७ रुग्ण करोनामधून बरे

नवी दिल्ली । भारतात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताच आहे. या वाढत्या रुग्णांच्या संख्येनं आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत आहे. मात्र, देशभरातील आरोग्य यंत्रणांच्याच प्रयत्नानं कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असल्याची दिलासादायक माहिती मिळत आहे.

देशभरात कोरोना विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ३१.१५ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. संपूर्ण देशभरात २० हजार ९१७ रुग्ण करोना व्हायरसमधून पूर्णपणे बरे झाले आहेत. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी दिली. तर मागच्या २४ तासात १ हजार ५५९ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

मागच्या २४ तासात सोमवार सकाळपर्यंत देशभरात करोनाचे नवे ४ हजार २१३ रुग्ण सापडले व ९७ जणांचा मृत्यू झाला. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, भारतात आता करोना व्हायरसचे ६७,१५२ रुग्ण असून २,२०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी रुग्णांमध्ये लक्षणे असतील तर त्यांना स्वत:हून समोर येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

७ स्थलांतरित मजुरांचं ‘धाडसी’ जगणं समजण्यासाठी ‘या’ चित्रपट निर्मात्यानेही १२०० किलोमीटरचा प्रवास केला..!!

जीना इसी का नाम हैं | विनोद कापरी हे एक चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक असून त्यांनी मागील महिन्यात सात स्थलांतरित कामगारांसह उत्तरप्रदेशमधील ‘गाझियाबाद’ पासून बिहारमधील ‘सहारसा’ पर्यंत सात दिवस, सात रात्री प्रवास केला. हे माजी पत्रकार २०१८ च्या ‘पिहू’ या पुरस्कार प्राप्त चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शकदेखील आहेत. विनोद कापरी यांनी ‘आऊटलूक’शी स्थलांतरित कामगारांचा जिकिरीचा प्रवास, त्यांचे तणाव आणि आयुष्यातील चढउतार, आणि त्यांच्या कथेचा पाठपुरावा करण्यासाठी कशामुळे प्रेरणा मिळाली याविषयी संवाद साधला. इथे काही संपादित उतारे दिलेले आहेत.
 
प्रश्न :- आपण प्रवासाला सुरुवात कशी केली? 
उत्तर :- १३ एप्रिल रोजी मी ‘ट्विटर’वर ३०-४० स्थलांतरित कामगारांविषयी एक पोस्ट पाहिली होती. ते गाझियाबादच्या लोणी परिसरात अन्न आणि पैशाशिवाय अडकले आहेत अशी ती पोस्ट होती. मी त्यांच्यासाठी निधी जमा करण्यासाठी मदत केली. पण ३-४ दिवसांनी त्यांनी मला परत कॉल केला आणि पुरवठा संपला असल्याचं सांगितलं. त्यांनी असही सांगितले की ‘वारंवार अन्नाची विचारणा करायला लाज वाटत आहे.’ तो अतिशय स्वाभिमानी लोकांचा समूह होता. पुढच्या वेळी जेव्हा पुरवठा संपला तेव्हा त्यांनी बिहारच्या सहारसा इथे जाण्यासाठी काही मार्ग आहे का विचारले. मी त्यांना तुम्ही जाऊ नये असा सल्ला दिला आणि ही खूप धोकादायक कल्पना असल्याचेही सांगितले. या स्थितीत राहण्यापेक्षा वाटेवर मेलेले बरे असे ते म्हणाले. मी २७ तारखेला जेव्हा त्यांना कॉल केला तेव्हा त्यांच्यापैकी ७ जण आधीच निघून गेल्याचे त्यांनी सांगितले. मी गुगलवर सहारसाचे अंतर तपासले आणि ते १,२०० किलोमीटर असल्याचे पाहून मी घाबरून गेलो !! मला त्यांच्या प्रवासाचे दस्तऐवजीकरण करणे खूप आवश्यक वाटले. मी आणि माझी टीम आम्ही पुढच्या दिवशी सकाळी निघालो आणि आम्हाला ते संभल जवळ सापडले.

हे जगणं शूर आणि धाडसीच आहे..

प्रश्न :- तुमच्या प्रवासाबद्दल आम्हाला काय सांगाल?
उत्तर :- त्यांना पोलिसांनी मारहाण केली आणि ज्या दिवशी त्यांनी प्रवास सुरु केला त्याच दिवशी त्यांना परत जाण्यास सांगितले. त्यांनी पर्यायी मार्गाचा आधार घेतला. त्यांच्यापैकी एक जण तंत्रज्ञानाच्या खूप अधीन होता. त्याने पायी वाट शोधण्यासाठी ‘गुगल अर्थ ऍपचा’ वापर केला. त्याच रात्री त्यांनी गंगा नदी ओलांडण्याचा प्रयत्न केला. मच्छिमारांच्या एका समूहाने त्यांना अडवले आणि नदी किती खोल आहे याची काही कल्पना तरी आहे का? विचारले. जेव्हा मच्छिमारांनी त्यांना नदी ओलांडायला किती अडचण येते आहे ते सांगून त्यांना सकाळपर्यंत वाट पाहायला सांगितले आणि सकाळी नदीपलीकडे नेले. शिवाय त्यांच्याकडे सायकली होत्या आणि ते त्यांच्यासोबत पोहण्यासही सक्षम नव्हते. सायकल ही दुसरीच समस्या होती. त्यांनी त्यांच्या कुटुंबांकडे घरी परत येण्यासाठी पैसे मागितले होते आणि त्या वापरलेल्या (सेकंड हॅन्ड) सायकली खरेदी केल्या होत्या. आधीच या वाईट स्थितीत सायकलींना काही ना काही होत होते. त्यांना एखादा दुरुस्तीवाला माणूस सापडेपर्यंत अनेक किलोमीटर अंतर सायकलला पुढे ढकलत न्यावे लागले. 

रस्त्यातील प्रवासाचा एक क्षण

प्रश्न :- त्यांना इतर कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागले? 
उत्तर :- अन्न हा नक्कीच मुख्य मुद्दा होता. त्यांच्याकडे पैसे नव्हते. केवळ काही चने आणि सातू यांचा साठा होता. संचारबंदीमुळे सगळे हॉटेल बंद होते. आम्हाला कधी कधी एखादे किराणा दुकान मिळायचे आणि आम्ही तिथे ब्रेड आणि बटर घ्यायचो. किंवा फळ विक्रेत्याकडून केळी खरेदी करायचो. सात लोकांना एकत्र अंघोळ करताना पाहून कोणीही त्यांना सहज ओळखेल आणि पोलिसांना कळवेल आणि पुन्हा पोलीस येऊन त्यांना मारतील या भीतीने वाटेत त्या मजुरांनी अंघोळच केली नाही. उष्णता आणि घामामुळे त्यांना अंघोळ करण्याची कितीही गरज भासली तरी ते करू शकले नाहीत. डास आणि किटकांमुळे त्यांच्या अनेक रात्री हलाखीत गेल्या होत्या. 

प्रश्न :- त्यांना कोणी मदत केली का? 
उत्तर :-
होय. लखनऊला पोहोचल्यावर त्यांना खूप त्रास होऊ लागला. त्यांना अक्षरशः नको नको झालं होतं. त्यांच्या खांद्यावरून सायकल वाहून नेण्याने खांदा सुजला होता. एका ट्रकचालकाने त्यांच्यावर दया केली आणि जवळपास ३० किलोमीटर त्यांना ट्रकमधून नेले. मग त्यांनी पुन्हा सायकल चालविली. पुन्हा एका ट्रकचालकाने त्यांना गोरखपूरपर्यंत जवळपास १०० किलोमीतर अंतराची लिफ्ट दिली. त्यामुळे त्यांचा प्रवास थोडा चांगला झाला. जेव्हा ते बिहारच्या सीमेवर पोहोचले तेव्हा अजूनही त्यांच्या गावापर्यंत पोहोचण्यासाठी ३५० किलोमीटर अंतर बाकी होतं. तेव्हा कोरोनाच्या लक्षणांसाठी त्यांची तपासणी करण्यात आली. बिहार पोलिसांनी त्यांना संरक्षणामध्ये बसमधून त्यांच्या गावाशेजारच्या अलगाव केंद्रावर पाठवले. गावांमध्ये अलगाव केंद्रे बनविणे आणि स्थानिकांना तिथे ठेवणे ही चांगली गोष्ट बिहार सरकारने केली आहे. 

प्रश्न :- गावात पोहोचल्यावर त्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या? 
उत्तर :- ओह्ह, तो क्षण किती भावनिक होता हे मी सांगू शकत नाही. ते उत्साह आणि आनंदाने ओरडत होते. मी त्यांच्याबरोबर होतो आणि ते मला जिथे ते अंघोळ करायचे ते तळे, त्यांचे मंदिर, मक्याचे शेत हे सगळे दाखवत होते. ते एक सुंदर गाव होते. बस जेव्हा अलगाव केंद्राकडे जात होती तेव्हा त्यांच्या घरचे लोक रडत तिच्या पाठीमागे धावत होते. अलगावमध्ये जाण्यापूर्वी ते अगदी थोडक्यात त्यांना भेटले होते. पण त्यांचे कुटुंबीय त्यांच्याच गावात असल्याने ते खूप शांततेत होते. मी आणि माझ्या टीमने त्यांच्या गावात एक रात्र घालवली, त्यांच्या पाहुणचाराने आम्ही भारावून गेलो होतो. एकूण आमच्या प्रवासाचा शेवट आनंदी झाला. 

घरी पोहचल्यानंतर स्थलांतरित मजूर

प्रश्न :- कदाचित हे होणार नाही म्हणून रस्त्यावर तुम्ही चिंतेत होता का? 
उत्तर :-
यात काहीच शंका नाही, निरंतर आम्ही त्याच चिंतेत होतो मी मजुरांच्या रस्त्यातच कोसळणे, मृत्यू आणि अपघात इ.चे अहवाल वाचले होते. संचारबंदीमुळे रस्त्यावर कमी गर्दी होती, त्यामुळे ट्रक अधिक वेगाने पुढे जात होते. त्यांच्यापैकी कुणीही थकव्यामुळे किंवा ट्रकच्या भरघाव वेगात सायकलींवरचे नियंत्रण गमावून खाली कोसळू नये म्हणून मी देवाकडे प्रार्थना करत होतो.

प्रश्न :- वाटेत काही आनंदाचे क्षणही आले असतील? 
उत्तर :-
त्या ट्रकचालकाने चांगले १०० किलोमीटर अंतर ट्रकमधून नेल्यावर त्यांना खूप आनंद झाला होता. आम्ही एकत्र रात्रीचे जेवण केले. त्यानंतर त्यांनी आमच्यासाठी भोजपुरी गाणे गायले. मी ती सुंदर संध्याकाळ कधीच विसरू शकत नाही. आणि शेवटी जेव्हा मी गाव सोडत होतो, तेव्हा त्यांच्यापैकी ३ जण रडत होते. आम्ही नेहमीच संपर्कात राहण्याचे वचन एकमेकांना दिले आहे.

प्रश्न :- या प्रवासामुळे तुमच्यामध्ये काही बदल झाले का? 
उत्तर :- जेव्हा मी उपक्रमासाठी (assignment)  निघालो तेव्हा मला एक उत्सुकता होती, की कशामुळे लोक इतके अफाट निर्णय घेतात? मला हे धाडसी लोक कोण आहेत जे जाणून घ्यायचे होते आणि त्यांना जवळून पाहायचे होते. माझ्या घराचे दोन वेळा नूतनीकरण झाले आहे. आणि हे लोकसुद्धा असेच त्यांच्यासारखे होते ज्यांनी ते नूतनीकरण केले होते. मी आता त्यांच्याकडे पूर्णतः वेगळ्या दृष्टीने पाहतो आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे आम्हाला रस्त्यात वाईट लोकांपेक्षा जास्त चांगले लोक भेटले. केवळ स्थलांतरितांवर पोलिसांनी केलेल्या अत्याचाराची घटना मी माझ्या आठवणींमधून काढू शकतो का? ज्याने माझ्या आठवणी चांगल्या होतील. नाही. पंक्चर दुरुस्ती करणारा तो माणूस, ज्याने त्या कामगारांकडून पंक्चरचे ३० रुपये घ्यायलाही नकार दिला, तो मला आठवेल आणि खूप स्पष्टपणे आठवेल. आणि तो मिठाई दुकानवाला ज्याने त्या दिवशी केवळ चहा बनवला होता पण आमची गोष्ट ऐकल्यावर त्याने आमच्यासाठी सामोसे बनवले. आणि नक्कीच ते ट्रक ड्राइव्हर ज्यांनी मोठा धोका पत्करून त्यांना ट्रकमधून प्रवास करण्यास मान्यता दिली. जर पोलिसांनी त्यांना पकडले असते तर त्यांना २०,००० रु दंड भरावा लागला असता. अगदी ट्रकसुद्धा जप्त करून घेतले असते. तरीही जेव्हा त्यांनी गोष्ट ऐकली तेव्हा ते पाघळले आणि लिफ्ट देण्यास तयार झाले. या जगात वाईटापेक्षा नक्कीच चांगले अधिक आहे.

‘आऊटलूक’ माध्यमाच्या ऑनलाईन एडिशनसाठी सलीक अहमद यांनी विनोद कापरी यांची मुलाखत घेतली असून हॅलो महाराष्ट्रसाठी याचा अनुवाद जयश्री देसाई यांनी केला आहे. मूळ इंग्रजी लेखाची लिंक सोबत देत आहोत. अधिक संपर्कासाठी – 9561190500

मूळ इंग्रजी मुलाखतीची लिंक – https://www.outlookindia.com/website/story/india-news-film-maker-journeys-1200-kms-with-seven-migrant-labourers-to-understand-these-brave-people/352198

कोरोना संकट काळात तरी राजकारण करणं थांबवा! ममता बॅनर्जींची मोदींना विनंती

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत आहेत. यावेळी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्व राज्यांना समान वागणूक दिली पाहिजे असंही स्पष्टपणे सांगितलं. केंद्र सरकारने कोरोनासारख्या इतक्या कठीण काळात राजकारण करणं थांबवावं अशी मागणी पंतप्रधान मोदींसोबत आयोजित बैठकीत बोलताना ममता बॅनर्जी यांनी केली.

ममता बॅनर्जी यांनी बैठकीत बोलताना म्हटलं की, “आम्ही एक राज्य म्हणून कोरोनासोबत लढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. केंद्राने अशा कठीण काळात राजकारण करु नये. आम्ही आंतरराष्ट्रीय सीमारेषा तसंच इतर मोठ्या राज्यांच्या सीमांनी व्यापलो आहोत. आमच्यासमोर अनेक आव्हानं आहेत. सर्व राज्यांना समान महत्त्व दिलं पाहिजे. आपण टीम इंडिया म्हणून काम करण गरजेचं आहे”.

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनचा तिसरा टप्पा १७ मे रोजी संपत आहे. मात्र अद्यापही परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात नाही. त्यामुळे लॉकडाउन वाढवला जाणार की नियम शिथील करत सेवा सुरु केल्या जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”