Wednesday, December 24, 2025
Home Blog Page 5812

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मुस्लिमांचे मृतदेह श्रीलंकेत जाळले जातायत, मुस्लिम धार्मिक नेते म्हणाले हे तर इस्लामविरूद्ध..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । श्रीलंकेतील मुस्लिम धार्मिक नेत्यांनी कोरोना व्हायरसमुळे प्राण गमावलेल्या मुस्लिमांच्या अंत्यसंस्काराबाबतच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे.या मुस्लिम धर्मगुरूंचे असे म्हणणे आहे की सुधारित नियम हा इस्लामिक परंपरेच्या विरोधात असून आम्ही सरकारच्या या निर्णयाशी सहमत नाही आहोत. विशेष म्हणजे, श्रीलंकेने देशातील मुस्लिमांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून अंत्यसंस्कारावेळी कोरोनामुळे मृत पावलेल्यांना जाळणे हे सक्तीचे केले आहे.

मुस्लिम धर्मगुरू म्हणाले, ‘आमच्या धार्मिक तत्त्वांच्या विरोधात’
जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोविड -१९ मुळे मरण पावलेल्या मुस्लिमांना १८० हून अधिक देशांत दफन करण्याची परवानगी देण्यात आली आहे, असा दावा ऑल सिलोन जमीअतुल उलेमा (एसीजेयू) ने आरोग्य सेवा महासंचालकांना पाठवलेल्या पत्रात केला आहे. “देशाचा कायदा पाळणे आणि त्यासंदर्भात लोकांना मार्गदर्शन करणे हे आपले नैतिक कर्तव्य आहे,” असेही या पत्रात म्हटले आहे. याचा अर्थ असा नाही की आम्ही या निर्णयाचे समर्थन करत आहोत किंवा याच्याशी सहमत आहोत कारण ते आमच्या धार्मिक तत्त्वांच्या विरोधात आहे. ‘

Muslims Adapt Funeral Rites in The Age of Corona | Al Bawaba

मुस्लिमांचा विरोध असूनही मृतदेह जाळले जात आहेत
या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती त्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना केली आहे. आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की शरीर दफन केल्याने या विषाणूचा प्रसार होण्याचा धोका आहे. देशात या प्राणघातक संसर्गजन्य आजारामुळे आतापर्यंत ९ लोकांचा मृत्यू झाला असून त्यापैकी किमान ३ मुस्लिम आहेत. मुस्लिम मृतांच्या कुटुंबियांचा निषेध असूनही त्यांचे मृतदेह जाळले जात आहेत. श्रीलंकेत आतापर्यंत कोरोना विषाणूची ८३५ प्रकरणे नोंदली गेली आहेत. यापैकी ४०४ हे श्रीलंकेचे नौदल कर्मचारी आहेत. गेल्या महिन्यातील २० मार्चपासून देशात लॉकडाऊन सुरू आहे, परंतु ११ मेपासून ते हटवण्याची सरकारची योजना आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

पाकिस्तानमध्ये अश्लील व्हिडिओ बनवून महिलांना ब्लॅकमेल करण्यात महिलाच आहेत आघाडीवर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । पाकिस्तानच्या फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (एफआयए) म्हटले आहे की देशात अश्लील छायाचित्रे आणि व्हिडिओंच्या सहाय्याने महिलांनीच महिलांना ब्लॅकमेल केल्याच्या घटना चिंताजनक प्रमाणात वाढल्या आहेत. जिओ न्यूज उर्दूच्या अहवालानुसार एफआयएच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की गेल्या वर्षी पाकिस्तान आणि कराची, लाहोर आणि इस्लामाबाद या तीन मोठ्या शहरांमध्ये आणि या वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांतच सायबर गुन्हेगारीच्या सुमारे ९५ घटना नोंदवल्या गेल्या आहेत.

या अहवालानुसार यापैकी ६७ प्रकरणे (एकूण प्रकरणांपैकी ७० टक्के) महिलांनी ब्लॅकमेल केल्याचा आरोप लावून त्यांना ब्लॅकमेल करण्यात आरोपी या महिलाच असल्याचे म्हटले होते.

अहवालात असेही म्हटले आहे की हे चिंताजनक तथ्य देखील उघडकीस आले आहे की ज्या समाजास सुशिक्षित वर्ग म्हटले जाते तेच अश्लील ब्लॅकमेलिंगच्या बाबतीत पुढे आहे.

असेही काही प्रकरणे समोर आली आहेत की काही सुशिक्षित महिलाच स्वत: चे अश्लील फोटो आणि व्हिडिओ बनवतात किंवा मिळवतात आणि सुशिक्षित पुरुष तसेच महिलांना ब्लॅकमेल करत असल्याबद्दल अटक करतात.

तपास एजन्सीचे म्हणणे आहे की बहुतेक महिलांना त्यांचे पती, माजी पती, मंगेतर आणि जवळचे पुरुष मित्रच ब्लॅकमेल करण्यात गुंतले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

एसटी प्रवास सेवा स्थगित करण्यामागे राज्याच्या परिवहन मंत्र्यांनी दिल ‘हे’ कारण

मुंबई । कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सध्या तरी आंतरजिल्हा एसटी वाहतूक बंद राहणार असल्याची माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली आहे. ही वाहतूक टप्प्याटप्याने सुरु करण्यात येणार आहे. रेड झोनमधून लोकांना आमच्या जिल्ह्यात सोडू नका असा अनेक ठिकाणी विरोधाचा सूर उमटल्यानंतर हा निर्णय घ्यावा लागल्याचे परब म्हणाले आहेत. याविषयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करण्यात येणार आहे. सुरुवातील ग्रीन झोन संदर्भातील विचार होणार असून रेड झोन संदर्भात सध्या विचार नसल्याचे ते म्हणाले. त्यामुळे येत्या काही दिवसात मुंबई, पुण्यातून लवकर एसटी सेवा सुरु होण्याची शक्यता सध्या दिसत नाही.

लॉकडाऊनमुळे राज्यातील विविध ठिकाणी अडकलेल्या इतर जिल्ह्यातील विद्यार्थी, कामगार, नोकरदार वर्गाला त्यांच्या तालुक्यात एसटीने सोडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र, एसटीच्या माध्यमातून रेड झोनमधून लोकांना आमच्या जिल्ह्यात सोडू नका असा विरोध राज्यातील अनेक जिल्ह्यातील नागरिकांकडून होत आता आहे. मुंबईतून कोरोना आमच्या गावात येईल अशी भीती त्यांना वाटत असल्यानं त्यांचा यासाठी विरोध झाला. या विरोधामुळं आम्ही निर्णय बदलल्याचे परब यावेळी म्हणाले.

दरम्यान, जे लोक परराज्याच्या सीमेवर जाण्यास इच्छुक आहेत त्यांना अद्यापही मोफत सेवा सुरु आहे. एका दिवसात २५० ते २७५ बसेसने पाच हजार प्रवासी परराज्याच्या सीमेवर सोडले आणि तीन हजार प्रवासी परराज्यांच्या सीमेवरुन आपापल्या जिल्ह्यात सोडले,” अशी माहिती अनिल परब यांनी दिली आहे. आंतरजिल्ह्याबाबत नीट नियोजन करुन, मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने अडकलेल्या लोकांची गावी जाण्याची व्यवस्था करु,असं अनिल परब यांनी सांगितलं आहे.

“लोक अडकलेत याची आम्हाला देखील जाणीव आहे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून नियोजनबद्ध निर्णय घेत आहोत. जे लोक रस्त्यावरुन चालत आहेत, त्यांना आधी मोकळं करुन, जिल्ह्यांबाबतचा निर्णय घेऊ,” असं अनिल परब यांनी सांगितलं. यावेळी लोकांना आवाहन करताना त्यांनी म्हटलं की, एसटी डेपोमध्ये गर्दी करु नका, आपली काळजी आम्हाला आहे. लवकरात लवकर निर्णय घेऊ, कृपया स्टॅंडवर जाऊ नका. तिथे प्रक्रिया होणार नसून पोलीस स्टेशन किंवा तहसीलला प्रक्रिया पूर्ण करायची आहे.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

कराडचे नाव झळकणार जगाच्या नकाशावर; कोरोना लस संशोधन प्रकल्पात कृष्णा हॉस्पिटलचा सहभाग

Krushna Hospital Karad

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

जगभर थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसवर पुण्यातील जगप्रसिद्ध सीरम इन्स्टिट्यूटने प्रतिबंधक लस विकसित केली असून, या लसीच्या वैद्यकीय चाचण्यांना देशभरात येत्या आठवड्यात प्रारंभ होणार आहे. या वैद्यकीय चाचण्यांसाठी भारतातील 40 वैद्यकीय संशोधन केंद्रांची निवड करण्यात आली असून, यामध्ये कराड येथील कृष्णा हॉस्पिटलचाही समावेश आहे. जगभरात महत्वपूर्ण ठरणाऱ्या या कोरोना लस संशोधन अभ्यास प्रकल्पासाठी कृष्णा हॉस्पिटलची निवड झाल्याने, कराडचे नाव पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर पोहचण्यास मदत होणार आहे, अशी माहिती कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी दिली आहे.

धनुर्वात, गोवर, डेंग्यू यासारख्या आजारांवरील लस शोधणाऱ्या पुण्यातील जगप्रसिद्ध सीरम इन्स्टिट्यूटने अमेरिकन बायोटेक्नॉलॉजी कंपनी ‘कोडाजेनिक्स’च्या मदतीने फेब्रुवारी महिन्यातच कोरोनावर मात करणारी लस विकसित करण्यास प्रारंभ केला आहे. या लसीच्या वैद्यकीय चाचण्यांसाठी ‘ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ची मान्यता मिळाली आहे. देशातील 40 निवडक संस्थांमध्ये होणाऱ्या या वैद्यकीय चाचण्यांसाठी गोवा येथील सुप्रसिद्ध ‘सी.आर.ओ.एम. क्लिनिकल रिसर्च ॲन्ड मेडिकल टुरिझम’ या एन.ए.बी.एच. मान्यताप्राप्त संस्थेचे सहकार्य लाभणार आहे.

अत्याधुनिक सुविधा, सुसज्ज इन्फ्रास्ट्रक्चर, तज्ज्ञ स्टाफ, वैद्यकीय संशोधनाचा दीर्घ अनुभव या निकषांच्या आधारे कृष्णा हॉस्पिटलची या महत्वपूर्ण संशोधन अभ्यास प्रकल्पासाठी निवड करण्यात आली असून, कृष्णा हॉस्पिटलमधील सर्व तज्ज्ञ संशोधक डॉक्टर्स या संशोधन कार्यात अमूल्य योगदान देण्यासाठी सज्ज झाले आहेत.

या चाचण्यांमध्ये पहिल्या टप्प्यात समाजातील उच्च जोखीम गटात मोडणाऱ्या; जसे की आरोग्य कर्मचारी, पोलिस, सुरक्षा गार्ड, भाजीपाल व फळ विक्रेते, किराणा माल विक्रेते यांचा अभ्यास केला जाणार आहे. कृष्णा हॉस्पिटलमधील डॉ. सुजाता पाटील, डॉ. अपर्णा पतंगे व डॉ. सुजाता जाधव या प्रकल्पाच्या समन्वयक म्हणून काम पाहणार असून, ‘सी.आर.ओ.एम.’चे संचालक डॉ. धनंजय लाड आणि डॉ. विजयकुमार पाटील हे सीरम इन्स्टिट्यूटच्यावतीने प्रकल्पाचे निरीक्षक म्हणून काम पाहतील. कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी या लसीचा मोठा उपयोग होणार असून, वैद्यकीय चाचण्यांच्या यशस्वीतेनंतर ही लस लवकरच सामान्य लोकांसाठीही उपलब्ध करून देण्याचा सीरम इन्स्टिट्यूटचा मनोदय आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

महामंडळाची लालपरी मदतीसाठी धावली ! पाथरीतुन ९७ मजुर मायदेशी निघाले

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे

करमाड रेल्वे दुर्घटनेनंतर रोजगारासाठी महाराष्ट्रात आलेल्या मध्यप्रदेशातील मजुरांना त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी घेण्यात आलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करत सोमवारी  सकाळी परभणी जिल्ह्यातील पाथरी बस्थानकातून तालुक्यातील ९७ मजुरांना घेऊन महामंडळा च्या तीन बसेस रवाना झाल्या. यावेळी दिड महिन्याच्या लॉक डाऊन नंतर गावाकडे जाण्याचा ओडीमध्ये असणाऱ्या या मजुरांना महामंडळाची लालपरी मदतीसाठी धावल्याची भावना निर्माण झाली होती.

 मध्यप्रदेशातील मजुरांना  त्यांच्या राज्यात सोडण्या बाबत निर्णय घेण्यात आल्यानंतर सोमवार दि.  ११ मे रोजी सकाळी ८ वाजता पाथरी बस्थानाक परिसरात मजूर जमा झाले होते. सदरील मजुरांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी उपजिल्हाधिकारी व्ही. एल. कोळी , तहसीलदार एन. यु. कागणे , मानवत चे तहसीलदार फुपाटे , पोलीस निरीक्षक के .बी. बोधगिरे , आगर प्रमुख प्रशांत  पानझाडे , पोलीस कर्मचारी सम्राट कोरडे ,यांची उपस्थिती होती.

यावेळी बस क्र .एम .एच. १३ सी. यु. ६९०३, बस क्र .एम. एच २० बी .एल.  ४०८७, आणि बस क्र .एम. एच .२० इ. एल. २४६० या व्यवस्था करण्यात आलेल्या तीन बस मधून जाणाऱ्या ९७ मजुरांच्या समुहाला ला प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हिरवी झेंडी दाखवली. त्या नंतर या सर्व बस एका पाठोपाठ एक पाथरी बस्थानकाच्या बाहेर पडल्या . यावेळी पाथरी ते मध्यप्रदेशातील बिजासना देवी मंदीर पर्यंत त्यांचा प्रावस असणार आहे . सोबत प्रत्येक बस मध्ये २ चालक पाठवण्यात आले असुन मजुरांना प्रशासनाच्या वतीने जाते वेळेस  नास्ता आणि पाण्याची सोय ही करण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

लष्करी अभ्यासादरम्यान ‘या’ देशाच्या नौदलाने चुकून आपल्याच जहाजावर डागले क्षेपणास्त्र ,१९ जवान झाले ठार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । ओमानच्या आखातात देशातील लष्करी अभ्यासादरम्यान इराणच्या नौदलाने चुकून आपल्याच जहाजावर क्षेपणास्त्र डागल्याने १९ नौदल जवान शहीद झाले तर १५ जण जखमी झाले आहेत. इराणच्या सैन्याने ही माहिती दिली. सरकारी दूरचित्रवाणीवरील वृत्तानुसार, रविवारी जासाक बंदराजवळ सैनिकी सरावादरम्यान हेंडिजन-क्लास सपोर्ट क्षेपणास्त्र कोणार्क जहाजावर पडले.

अधिकृत वृत्तसंस्था ‘आरएनए’ च्या वृत्तानुसार, नौदलाच्या १२ जवानांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर अन्य तिघांनाही किरकोळ जखमा झाल्या आहेत. सरकारी दूरचित्रवाणीनुसार, कोणार्क टार्गेटच्या अगदी जवळ होता. कोणार्क समुद्रावर इतर जहाज्यांचा शोध काढत होता.ते म्हणाले की हे क्षेपणास्त्र चुकून पडले.

इराण नेव्हीचे हे जहाज १९८८ मध्ये हॉलंडकडून खरेदी केल्यानंतर २०१८ मध्ये ते अपग्रेड केले गेले. या जहाजाची लांबी ४७ मीटर आहे. ज्यामध्ये २० खलाशांचा एक दल होता. इराणनेही या जहाजाचा उपयोग समुद्रकिनारी भागात गस्त घालण्यासाठी केला होता.

या भागात तैनात असलेल्या अमेरिकेच्या नौदलाच्या ५ व्या डिव्हिजन कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.जगातील सुमारे २०% तेल हे होर्मूझच्या या आखातामधून येते आणि इराण नेहमीच या प्रदेशात आपले वर्चस्व वाढवण्यासाठी सतत नौदलाचा वापर करत असतो.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

विशेष रेल्वेसाठीच बुकिंग सुरु; जाणून घ्या कुठं आणि कसं मिळणार तिकीट?

नवी दिल्ली ।  लॉकडाऊनचा कालावधी वाढवत शहरात अडकून पडलेल्या मजुरांना स्वगृही पोहोचवण्यासाठी रेल्वेने गेल्या काही दिवसांपासून विशेष मोफत श्रमिक रेल्वे गाड्या चालवल्या आहेत. आता रेल्वेनं त्याहीपुढे एक पाऊल टाकलं आहे. लॉकडाऊनमध्ये विविध ठिकाणी अडकलेल्या मजुरांव्यतिरिक्त इतर प्रवाशांना घरी पोहचवण्यासाठी १२ मेपासून रेल्वे १५ पॅसेंजर ट्रेन चालवणार आहे. या पॅसेंजर ट्रेन जोडीने चालवण्यात येतील. (return journeys) यानुसार या ट्रेनच्या एकूण ३० फेऱ्या होतील. या विशेष रेल्वेसाठी सोमवारी सायंकाळी ४ वाजता ऑनलाईन तिकीट बुकींग होणार आहे. या रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची थर्मल स्क्रिनिंग होणार आहे. ज्या व्यक्तीत करोनाची कोणतीही लक्षणं आढळणार नाहीत केवळ त्यांनाच प्रवासाची परवानगी देण्यात येणार आहे. जर तुम्हीही या रेल्वेचं बुकींग करणार असाल तर खालील माहिती तुम्हाला उपयोगी पडेल..

कुठल्या ठिकाणांसाठी तिकीट बुक करता येईल?
पहिल्या दिवशी १२ मे रोजी राजधानी दिल्लीतून एकूण १५ रेल्वे प्रवासासाठी निघतील. १५ ठिकाणांच्या पहिल्या टप्प्यात नवी दिल्ली ते दिब्रुगढ (आसाम), आगरतला, हावडा, पाटणा, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिकंदाराबाद, बंगळुरू, चेन्नई, तिरुअनंतरपुरम, मडगाव, मुंबई सेंट्रल, अहमदाबाद आणि जम्मू तवीसाठी या विशेष रेल्वेचं संचालन होईल.

कुठं आणि कसं बुक करता येईल तिकीट?
पहिल्या टप्प्यात तिकीट बुकींग आज (सोमवार) सायंकाळी ४ वाजेपासून सुरू होईल. प्रवाशांना तिकीट खिडकीवर बुकींग करता येणार नाही. तर IRCTC च्या वेबसाइटवरून किंवा अपवरून हे बुकींग करावं लागेलं. (https://www.irctc.co.in/) रेल्वे स्थानकांवरील काउंटर वरून कुठल्याही प्रकारचे तिकीट दिले जाणार नाही. इंडिव्हिज्युअल युझरच्या अकाऊंटवरूनच हे तिकीट बुक केले जाऊ शकतील. यासाठी एजंटमार्फत तिकीट मिळणार नाही, असं रेल्वेनं स्पष्ट केलं आहे.

तिकिटासाठी किती भाडं आकारालं जाईल?
या विशेष रेल्वेसाठी राजधानी रेल्वे प्रमाणे तकीट भाडं आकारणी होईल. या सर्व रेल्वेमध्ये एसी कोच लावण्यात आलेले आहेत. याचा थेट परिणाम प्रवाशांच्या खिशावर होणार आहे. लॉकडाऊन दरम्यान ज्या प्रवाशांना प्रवास करायचा आहे त्यांना एसी तिकिटाचे पैसे मोजण्यासाठी तयार राहावं लागेल. विशेष रेल्वे गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडे कन्फर्म तिकीट असेल तरच त्यांना रेल्वे स्थानकात प्रवेश देण्यात येणार आहे.

रेल्वे प्रवास करताना या गोष्टींची नोंद नक्की घ्या?
या विशेष रेल्वेगाड्यांमध्ये पॅन्ट्री कारची सुविधा नसेल. आपल्या ठिकाणी लवकरात लवकर पोहचण्यासाठी या गाड्या सीमित रेल्वे स्टेशनवर थांबतील. सोबतच रेल्वे प्रवासात प्रवासी कोरोनापासून दूर राहतील, याचा सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येणार आहे. रेल्वे प्रवाशांनी मास्क परिधान करणं आवश्यक राहील तसंच रेल्वे प्रवासाअगोदर स्वास्थ्य ठिक असेल तरच प्रवासाची परवानगी दिली जाईल. अन्यथा तिकीट असेल तरीही परवानगी नाकारली जाईल. दरम्यान, मजूर, कामगार आणि इतर गरजवंतांसाठी श्रमिक विशेष रेल्वे अगोदर प्रमाणेच सुरू राहतील. या रेल्वने प्रवास करताना मजुरांकडून कोणत्याही प्रकारे भाडं न आकारता त्यांना त्यांच्या इच्छित स्थळी सोडलं जाईल. मात्र, इतर प्रवाशांना राजधानी दिल्लीतून निघालेल्या एकूण १५ रेल्वे प्रवासासाठी शुल्क आकारले जाणार आहे.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

सई ताम्हणकरचे ट्रेनरसोबतचे ‘ते’ चॅट मेसेज झाले व्हायरल! पहा फोटो

मुंबई | मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर आपल्या बॉल्ड अंदाजाने नेहमीच चर्चेत असते. सध्या कोरोनामुळे फिल्म इंडस्ट्रीसुद्द्धा घरात बसून आहे. यामुळे अनेक कलाकार लॉकडाऊन मुळे घरी बसून बोअर झाले आहेत. अशात आता सई ताम्हाणकरचा तिच्या ट्रेनरसोबतच्या चॅटिंगचा एक स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सई लोकडाऊन मुळे आपल्या घरीच आहे. ती मागील काही दिवस झाले घरातच वर्कआउट करत आहे. मात्र आता घरी बसून बसून सई बोअर झाली आहे. व्हायरल झालेल्या मेसेज मध्ये सईला तिचा ट्रेनर विचारतो कि सई तू कुठे हरवलीयेस? यावर सई म्हणते कंटाळा मला दुसऱ्या गावाला घेऊन गेलाय. तिकडे कंटाळा, पसारा आणि आलास आम्ही सगळे कैम्पिंग करतोय. तसेच पुढे साई असंही म्हणालाय कि उद्या दुःख आम्हाला जॉईन होणारे.

https://www.instagram.com/p/CAChnPYDqvD/

दरम्यान, सईच्या हे हटके उत्तर अनेकजणांना आवडलंय. सईने स्वतः हा स्क्रिनशॉट आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेयर केला आहे. आता सईचे चाहते या चेतला मोठ्या प्रमाणात शेयर करत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

कोरोनावर लस निघणे अजून दोन वर्षे तरी शक्य नाही – WHO

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन l देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे अनेक नागरिकांचा मृत्यू झाला झाला आहे. त्यामुळे भारतात काही ठिकाणी अगदी काळजी करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक देश कोरोनावर लस शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र कोरोनावर अजून 2 वर्ष तरी लस शोधणे कठीण आहे. त्यामुळे सध्या लोकांनी परिस्थितीशी जुळवून घ्यावं अस जागतिक आरोग्य संघटनेचे विशेष दूत डेव्हिड नाबारो यांनी म्हंटल आहे.

नाबारो यांनी भारतानं कोरोनाविरोधात केलेल्या उपाययोजनांचं कौतुक केलं. ते म्हणाले भारतीय नागरिक कोरोनाशी जुळवून घेत जगू शकतो. अशाच पद्धतीच्या जीवनशैलीनं कोरोनाला बाजूला ठेवता येऊ येईल. देशातील प्रत्येक नागरिकाला कोरोनाविषयी समजावून सांगणे हे संसर्गाची साखळी तोडण्यातील महत्वाचे ठरेल असं नाबारो म्हणाले. त्यांनी इंडियन एक्सप्रेसशी संवाद साधला तेव्हा ते बोलत होते.

WHO: Coronavirus 'will stalk the human race for a long time to ...

या विषाणूला न रोखता जगभरात पसरू दिला, तर अनेक लोकांना याचा संसर्ग होईल. आणि अनेक लोक मरण पावतील. आपल्याला करोनाविषयी सगळ्या गोष्टी अजून समजू शकलेल्या नाहीत. हा आजार श्वसन विकाराबरोबरच शरीरावर परिणाम करू शकतो.कोरोनावरील लस पुढील दोन वर्षे तरी निघणार नाही. त्यामुळे आता नागरिकांनी परिस्थितीशी जुळवून घ्यावं. अस आवाहन नाबारो यांनी केलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

राज्यात कोरोनाचा खाकीवर हल्ला आणखी तीव्र; कोरोनाग्रस्त पोलिसांची संख्या 1000 पेक्षा जास्त

मुंबई । कोरोनाविरुद्ध लढाईत आघाडीवर लढणाऱ्या पोलीस योद्ध्यांवर कोरोनाने आपला हल्ला अधिक प्रखर केला आहे. मागील काही दिवसांत पोलिसांमध्ये कोरोनाच्या संसर्ग वाढल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत तब्बल 1000 पेक्षा जास्त पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर 113 जण कोरोनातून बरे झाले आहेत.

धक्कादायक बाब म्हणजे मागील 24 तासात तब्बल 221 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे राज्यात एकूण 1007 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी सात जणांचा मृत्यू झाला असून 113 जणांना उपचारांनंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनाची लागण झालेल्यां पोलिसांमध्ये 901 कर्मचारी आणि 106 अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

तर मुंबई पोलीस दलातील ४ आणि पुणे, नाशिक, सोलापूर पोलीस दलातील प्रत्येकी एका पोलिसाने प्राण गमावले आहेत. दरम्यान, संपूर्ण राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 22 हजारांपेक्षा जास्त आहे. एकट्या मुंबईत 13 हजारांपेक्षा अधिक रुग्ण आहेत.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”