Wednesday, December 24, 2025
Home Blog Page 5813

वेळेचा सदुपयोग ! होम क्वारंटाइन केलेले ऊसतोड मजूर करत आहेत वृक्ष संवर्धन

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे

तब्बल दीड महिन्यापासून चालू असलेल्या लॉकडाऊनमुळे घराघरात बसलेल्या व्यक्तींना उद्योग नसल्याने ते वैतागले आहेत व त्यांचा वेळ जात नसल्याच्या वेगवेगळ्या गोष्टी आज आपण ऐकत आहोत. त्यातून त्यांना नैराश्य येत असल्याच्या बातम्या ही येत आहेत. समजा तुम्ही स्वतःच्या गावात व त्यातही जिल्हा परिषद शाळेमध्ये होम क्वारंटाईन केले आहात, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय कराल ?त्या ठिकाणी ना दूरदर्शन संच ना मनोरंजनाचे साधन. १४ दिवस कसा वेळ व्यतीत करणार हा तुमच्या पुढे मोठा प्रश्न असणार .

कल्पनेनेच थरकाप उडत असला तरी तुमच्या अंगामध्ये काबाड कष्ट करण्याची प्रवृत्ती असेल तर याही परिस्थितीत तुम्ही वेळ सुयोग्य पद्धतीने व्यतीत करू शकता आणि त्यातून तुम्हाला मिळणारा आनंद ही समाधान देणारा असेल. हो असंच काहीतरी घडले आहे पाथरी तालुक्यातील वडी गावामध्ये याठिकाणी ऊसतोडीसाठी गेलेले मजूर गावात आल्यानंतर त्यांना १४ दिवसांसाठी होम क्वांरटाईन करण्यात आले आहे. गाव उपक्रमशील असल्याने याठिकाणी मागील काही वर्षापूर्वी वृक्षारोपण करण्यात आला आहे. आता या ऊसतोड कामगार यांनी या वृक्षांना संवर्धन करण्याचे काम हाती घेतले आहे .त्यामुळे काम केल्याचे समाधान व वृक्ष संवर्धनाची व निसर्ग जोपासण्याची त्यांना जणू संधी मिळाली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वडी येथील जिल्हा परिषद शाळेत गावातील ऊसतोड मजूर कामगारांना होम क्वारंटाइन करण्यात आले .रोज काब्बाड कष्ट करण्याची सवय असल्याने आणि त्यांना स्वस्त बसवत नसल्यानी त्यांनी स्वंय प्रेरणेतून शाळा परिसरात लागवड केलेल्या झाडांचे संगोपन करण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी सर्व झाडांची अंतर्गत मशागत करून झाडाचे आळे खोदकाम करून, त्यांना पाणी देणे, परिसर स्वच्छ करून, काडी कचरा नष्ट करुन परिसरात येणार्‍या उपद्रवी वानरांनाही प्रतिबंध केला असुन शाळा परिसर रोज सकाळी व संध्याकाळी स्वच्छता मोहीम अभियान राबविले जात आहे. एवढेच नाही तर परिसरात उघड्यावर देखील शौचालयचा येणार्‍या प्रतिबंध करत आहेत.

यामध्ये ऊसटोळी मुकादम दत्ता शिंदे यांच्यासह रंजित होळकर, अरुण देशमुख,देविदास होळकर, त्रिंबक खेत्री,संजय होळकर,बाबासाहेब थोरात, यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील महिला देखील स्वयंपाक पाणी आटोपल्या नंतर परिसरात खूरपण्याने निंदणी करणे,सडा सारवरण करणे आदी काम सोशल डिस्टान्सिंगचे नियम पाळत सुरक्षित अंतर ठेवून करत आहेत.

त्यांच्या या कामाचे आता ग्रामस्थ कौतुक करत आहेत. आता इतरही होम क्वांरटाईन करण्यात आलेल्या व्यक्तींनी हा आदर्श घेतल्यास हे १४ दिवस म्हणजे आयुष्यातील आठवणी दिवस होण्यास नक्कीच मदत होईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

गेली १२ वर्षे ‘हा’ वेगवान गोलंदाज कोहलीला मानतोय आपला शत्रू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । भारतीय कर्णधार विराट कोहलीने आपल्या फलंदाजीने जगभरातील गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले आहे. यामुळेच सर्व गोलंदाजांना त्याला बाद करावयाचे असते आणि अशा प्रकारे दोन्ही खेळाडूंमध्ये बॉल आणि बॅटची मोठी लढाई बघायला मिळते. उदाहरणार्थ, पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरसमोर विराट कोहलीला खेळताना सर्व क्रिकेट चाहत्यांना पाहायचे आहे. त्याचप्रमाणे बांगलादेशचा वेगवान गोलंदाज रुबल हुसेननेही कोहलीशी झालेल्या आपल्या वादाबद्दल सांगितले आहे.

Rubel Hossain | Bangladesh cricket player profiles

बांगलादेशचा वेगवान गोलंदाज रुबेल हुसेनने म्हटले आहे की,गेल्या १० वर्षांहून अधिक काळ भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली त्याच्यात कलह सुरु आहे जो अंडर-१९ क्रिकेट पासून सुरु झालेला आहे. तर रुबेल आणि कोहली यांच्यात एकदिवसीय विश्वचषक -२०११ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सतत होत असलेल्या बाचाबाची विषयी चर्चा सुरू आहे.

बीडीक्रिकटाइम.कॉमच्या फेजबुक पेजवरील लाईव्ह सेशनमध्ये त्याचे सहकारी तामीम इक्बाल आणि तस्कीन अहमद यांच्याशी बोलताना रुबेल म्हणाला, “मी अंडर-१९ पासून विराटबरोबर खेळतो आहे. तेव्हापासून माझ्यात आणि त्याच्यात भांडण होते आहे.१९ वर्षांखालील क्रिकेटच्या दिवसात तो बरेच स्लेजिंग करायचा. आता मात्र तो जास्त करत नाही. “

Magical moments will be difficult to come by: Virat Kohli on ...

रुबेल म्हणाला, “दक्षिण आफ्रिकेत एक सामना चालू होता. ही तिरंगी मालिका होती. तो खूपच स्लेजिंग करत होता. तो आमच्या फलंदाजांना शिवीगाळ करीत होता. आम्हाला माहित आहे की असे घडते.”

तो पुढे म्हणाला, “आमच्या दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि पंचांना त्यामध्ये मध्यस्थी करावी लागली.”

विशेष म्हणजे विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकला. तेव्हापासून कोहलीने मागे वळून पाहिले नाहीये आणि त्याने सातत्याने आपला खेळ सुधारला आहे आणि आज त्याची गणना जगातील अनेक महान फलंदाजांमध्ये केली जात आहे.

The reason behind Rubel Hossain's celebration after dismissing ...

२०१९ मध्ये इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या आयसीसी विश्वचषकातही रुबेल आणि कोहली समोरासमोर आले होते. त्या सामन्यात भारताने बांगलादेशचा २८ धावांनी पराभव केला.रुबेलने कोहलीला २६ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येला बाद केले. अशाप्रकारे, विराट कोहली आणि रुबेल यांच्यात बॉल आणि बॅट यांच्यासह झालेले भांडण आजपर्यंत कायम आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

एकनाथ खडसे भाजप सोडण्याच्या तयारीत? म्हणाले…

जळगाव  । भाजपचे राज्यातील जेष्ठ आणि दिग्गज नेते एकनाथ खडसे यांना भाजपने विधान परिषदसाठीच तिकीट नाकारलं. यामुळं भाजपचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे एकनाथ खडसे तीव्र नाराज असून त्यांनी भाजप सोडण्याचे आता संकेत दिले आहेत. आपल्याला इतर पक्षांकडून ऑफर असल्याचा खुलासा खडसे यांनी केला आहे. कोरोनाचं संकट संपल्यानंतर निर्णय घेऊ असंही त्यांनी सांगितलं आहे.

“मला संधी दिली नाही तरी ठीक आहे. पण पक्षात अनेक लोक तिकीट मिळेल या आशेने गेली कित्येक वर्ष निष्ठेने काम करत आहेत. चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांनी अनेकांना तिकीट देऊ असं आश्वासन दिलं होतं. भाजपाच्या असंख्य कार्यकर्ते, नेत्यांचे मला फोन येत आहेत. तुमच्यावर अन्याय होत आहे, तुम्ही निर्णय घ्या अशी विनंती करत आहेत. काही पक्षही आपल्याकडे यावं यासाठी विचारणा करत आहेत,” असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं आहे.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “पण कोरोनामुळे निर्माण झालेली स्थिती पाहता सध्या असा निर्णय घेणे योग्य राहणार नाही. कोरोनासारख्या गंभीर स्थितीत राजकीय विचार करणं तसंच राजकारणावर चर्चा करणं योग्य ठरणार नाही. आज तशी परिस्थिती नाही. त्यामुळे जे आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी चर्चा करुन योग्य वेळी निर्णय घेण्यात येईल”.

भाजपने विधान परिषद निवडणुकीत ज्येष्ठ आणि दिग्गज नेत्यांना उमेदवारी नाकारली असून नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपाकडून डावलण्यात आलं आहे. भाजपाच्या केंद्रीय समितीने नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके , डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. अजित गोपछडे, माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील आणि गोपीचंद पडळकर या चार नावांची घोषणा केली. या चौघांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्जही दाखल केले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

वहिनींचे शेजारच्या तरुणाशी बोलणे दिराला आवडत नव्हते; फावड्याने केला खून

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । लॉकडाऊनच्या दरम्यान, उत्तर प्रदेशमधील फर्रुखाबाद येथे एका व्यक्तीने फावडीने त्याच्याच मेहुण्यावर हल्ला केला. रक्ताने माखलेल्या या महिलेला तातडीने उपचारासाठी लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तेथे उपचारादरम्यानच या महिलेचा मृत्यू झाला. महिलेच्या मृत्यूनंतर घरात एकच गोंधळ उडाला.या घटनेची माहिती मिळताच पोलिसही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पुढील तपास सुरू केला.त्यातच आरोपी हा फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिस आता त्याचा शोध घेत आहेत. सीओ सिटी मन्नीलाल गौर यांनी सांगितले की,सध्या तपास केला जात आहे.

मेहुण्याने तिच्या चेहऱ्यावर आणि मानेवर केला हल्ला
कोतवाली फतेहगड परिसर, सोल्जर कॉलनी गुजराती गली येथे राहणारी ३८ वर्षीय प्रीती मिश्रा यांनी पत्नी धर्मेंद्र मिश्रा यांच्यावर मेहुणे विपिन मिश्रा यांनी फावडीने हल्ला केला.यात त्या महिलेचा चेहरा आणि मानेवर अनेकवेळा हल्ला केला गेला, त्यानंतर तिला वाईट पद्धतीने रक्तबंबाळ करण्यात आले.यांनतर महिलेला ताबडतोब उपचारासाठी लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे तिची प्रकृती ही चिंताजनक बनली मात्र प्राथमिक उपचारानंतरच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.महिलेच्या मृत्यूनंतर घरात एकच गोंधळ उडाला.

शेजार्‍याशी बोलल्यामुळे गमवावे लागले प्राण
मृताच्या १३ वर्षाच्या मुलाने सांगितले की त्याची आई शेजारच्या एका तरूणाशी वारंवार बोलत असायची,ज्यासाठी त्याचा काका विपिन नकार देत असे. यामुळे बर्‍याच वेळा त्यांच्यात वादही झाला. दुपारी आई घरात झोपली होती,तेव्हा काकाने तिच्यावर फावडीने हल्ला केला. सीओ सिटी मन्नीलाल गौर यांनी सांगितले की, याविषयी अधिक तपास केला जात आहे. तहरीर मिळण्याबाबत दावा दाखल केला जाईल.तसेच आरोपीही फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. तर पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

मुंबईत टी- सीरिज म्युझिक कंपनीची इमारत तातडीने सील; ‘हे’ आहे कारण

मुंबई । मुंबईतील टी- सीरिज कंपनीच्या इमारतीला तातडीने सील करण्यात आलं आहे. इमारतीचा केअर टेकर कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं होतं. यानंतर पूर्ण परिसरच सील करण्यात आला. मुबईतील अंधेरी पश्चिममधील लिंक रोड येथे सिनेसृष्टीतील आघाडीची म्युझिक आणि सिनेप्रोडक्शन कंपनी असलेल्या टी-सीरिज कंपनीचे ऑफिस आहे. इमारत सील करण्यात आली आहे. या इमारतीत काम करणाऱ्या एका केअर टेकरची कोरोना टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह निघाली यानंतर शनिवारी दुपारी टी-सीरिजची इमारत आणि त्याच्या आसपासचा पूर्ण परिसर सील करण्यात आला आहे.

टी-सीरिज कंपनीच्या प्रवक्त्याने वृत्तपत्राला अधिक माहिती देताना सांगितलं की, ‘अंधेरीतील ऑफिस येथे काम करणारा एक कर्मचारी तिथेच काम करायचा आणि तेथेच तो रहातही होता. पण आता तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं कळलं. म्हणून पूर्ण इमारत सील करण्यात आली आहे. इमारत सील केल्यानं तिथे राहणाऱ्यांपैकी अनेक आता त्यांच्या घरी जाऊ शकत नाही. त्यामुळं इमारतीतच त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय करण्यात आली आहे. इमारतीत अजून दोन ते तीन कर्मचारी काम करायचे. त्यांचीही चाचणी करण्यात आली असून त्यांचा टेस्ट रिपोर्ट येणे बाकी आहे. सुरक्षेच्या कारणांसाठी पूर्ण टी- सीरिज ऑफिस बंद करण्यात आले आहे. १५ मार्चपासूनच कर्मचाऱ्यांसाठी हे ऑफिस बंद करण्यात आलं होतं. जे काम करत आहेत ते सर्व कर्मचारी वर्क फ्रॉम होम करत आहेत.’

गेल्या महिन्यात टी- सीरिज ऑफिसची समोरची इमारतही सील करण्यात आली होती. या इमारतीतील ए विंगमध्ये राहणाऱ्या ११ वर्षाच्या मुलीला कोरोनाची लागण झाली होती. या दोन्ही इमारती समोरा समोर आहेत. याशिवाय टी-सीरिजच्या समोरच्या इमारतीत विकी कौशल, चित्रांगदा सिंह, चाहत खन्ना, अहमद खान, सपना मुखर्जी, राजकुमार राव- पत्रलेखा, राहुल देव, मुग्धा गोडसे, कृष्णा अभिषेक, कश्मीरा शाह, नील नितिन मुकेश, आनंद एल. राय, अर्जन बाजवा, विपुल शाह आणि प्रभुदेवा यांचे फ्लॅट आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

धक्कादायक! एका कोरोना रुग्णामुळे तब्बल ५३३ जणांना झाली कोरोनाची लागण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । घानाचे अध्यक्ष नाना अकुफो अ‍ॅडो यांनी देशातील वाढत्या कोरोना विषाणूच्या घटनांविषयी एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. राष्ट्रपतींनी अशी माहिती दिली आहे की कोरोनामुळे देशात आतापर्यंत २२ लोकांचा मृत्यू झाला आहे तर ४९४ लोक यातून बरे झाले आहेत. घानाचे अध्यक्ष म्हणाले की, देशातील एका संक्रमित रुग्णाने फिश प्रोसेसिंग कारखान्यामध्ये सुमारे ५३३ सहकाऱ्यांना संक्रमित केले आहे. रविवारी त्यांनी एका मुलाखती दरम्यान हे सांगितले.

President says one person infected 533 with coronavirus at Ghana ...

घानामध्ये आता ४,७०० प्रकरणे आहेत
घाना अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले की तेमा सिटी येथील एका कारखान्यात एकूण ५३३ लोकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. परंतु या व्यतिरिक्त इतर कोणतीही माहिती त्यांनी दिलेली नाही. अध्यक्ष अफुको एडो म्हणाले, “या एका व्यक्तीने सर्व ५३३ लोकांना संसर्गित केले आहे.कारखान्यात सुरक्षा उपाय असतानाही फॅक्टरीमध्ये हा विषाणू कसा पसरला हे मात्र त्यांनी सांगितले नाही.

राष्ट्रपती म्हणाले की ५३३ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद ही घानामध्ये झालेल्या एकूण संक्रमित प्रकरणांच्या ११.३ टक्के इतकी आहे. या नवीन आकडेवारीमुळे घानामधील एकूण प्रकरणांची संख्या आता ४,७०० वर पोहोचली आहे. पश्चिम आफ्रिकेतील कोरोना विषाणूमुळे घाना आता सर्वाधिक प्रभावित झाला आहे.

Go And Hug The Two Coronavirus Patients And See If You Will ...

देशात तीन आठवड्यांचा लॉकडाउन आहे
राष्ट्रपती म्हणाले की, साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव होण्यापासून १,६०,५०१ चाचण्या घेण्यात आल्या आहेत. ते म्हणाले की घाना हा आफ्रिकेतील एकमेव असा देश आहे जिथे इतक्या प्रमाणात चाचण्या घेतल्या जात आहेत. अध्यक्ष अ‍ॅडोच्या शब्दांत सांगायचे तर ते म्हणाले की, ‘आमची रणनीती लागू केली गेली आहे ज्यात आम्ही आक्रमकपणे लोकांना ओळखत आहोत, त्यांच्या चाचण्या घेत आहोत आणि हा व्हायरस दूर करण्यासाठी सर्व शक्य असलेले उपचार प्रदान करतो’.

त्यांनी मे अखेरपर्यंत सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या जमाव करण्यास बंदी घातली आहे. देशातील सर्व शाळा आणि विद्यापीठांनाही बंद राहण्यास सांगितले आहे. अफुको अडो यांनी घानाची राजधानी अकारा आणि कुमासी या दोन मोठ्या शहरांमध्ये लागू केलेल्या तीन आठवड्यांच्या लॉकडाउनमुळे दिलासा मिळालेला आहे. लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेविषयी त्यांना मोठी चिंता आहे.

Coronavirus Africa summary: cases, deaths, news - 27 April - AS.com

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

गुड न्यूज ! ‘कोरोना अँटिबॉडीचा’ शोध लावणारी पहिली टेस्ट किट पुण्यात तयार

पुणे | गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून भारत कोरोना व्हायरस या विषाणूजन्य आजाराशी दोन हात करत आहे. मात्र कोरोना रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अस असताना एक आनंदाची बातमी समोर आली आहे. पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीने पहिली स्वदेशी कोरोना अँटिबॉडी किट तयार केली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी ही माहिती दिली आहे.

कोविड१९ अँटिबॉडीचा शोध घेणारी पहिली स्वदेशी टेस्टिंग किट पुण्यात तयार केली आहे. ही किट जास्त लोकसंख्या असलेल्या परिसरात कोरोना व्हायरस संसर्गावर पाळत ठेवण्यात आणि कोरोना संक्रमितांची ओळख पटवण्यास मदत करेल. अस आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सांगितलं.

तसेच कोरोना विषाणूवर लस शोधून काढण्यासाठी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च व भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड हे संयुक्त संशोधन प्रकल्प राबविणार आहेत. आयसीएमआरची पुणे येथे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी ही संस्था असून तिच्या सहकार्याने कोरोना प्रतिबंधक लस विकसित करण्यात येणार आहे. ही लस बनवण्यासाठी अनेक देश प्रयत्न करत आहेत. स्वदेशी बनावटीची ही लस बनविण्यात भारताला यश आल्यास ते देशाच्या संशोधन क्षेत्रासाठी अतिशय महत्वाचे ठरणारे कार्य असेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

मागील २४ तासात देशभरात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ; संख्या झाली इतकी

नवी दिल्ली । भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत सतत भर पडत आहे. रुग्ण बरे होत असले तरी नव्या रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत नाही, त्यामुळे आरोग्य यंत्रणांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. गेल्या २४ तासांत भारतात ४ हजार २१३ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे, तर आता भारतात कोरोना रुग्णांची संख्या ६७ हजार १५२ वर पोहोचली आहे. रविवारी ही संख्या ६२ हजार ९३९ एवढी होती. सध्या ४४०२९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. २२०६ जणांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत.

दिलासादायक बाब म्हणजे २ हजार १०९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या सर्वात जास्त आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत २२ हजार १७१ रुग्ण आढळले आहेत. तर ८३२ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. महाराष्ट्रा पाठोपाठ गुजरातमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सर्वात मोठी आहे. गुजरातमध्ये आतापर्यंत ८ हजार १९५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे लॉकडाऊनचा कालावधी १७ मे पर्यंत वाढला आहे. पण लॉकडाऊन वाढवून सुद्धा कोरोनाग्रस्तांच्या संख्या कमी होताना दिसत नाही आहे.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Boys Locker Room | फेक अकाऊंट काढून तरुणीनेच दिली रेप करण्याची आयडिया; करत होती अश्लिल चॅटिंग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । बॉईज लॉकर रूम प्रकरणात एक मोठा ट्विस्ट आला आहे. तपासादरम्यान सायबर सेलने सर्वांना आश्चर्यचकित केल्याचे समोर आले. या प्रकरणात पोलिसांचे म्हणणे आहे की, एका मुलीने ‘सिद्धार्थ’ नावाने बनावट प्रोफाइल बनवून स्नॅपचॅटवर मुलांमध्ये एंट्री केली होती. मुलाच्या चारित्र्याबद्दल जाणून घेण्यासाठी तिने हे सर्वकाही केले.हे चॅटिंग केवळ इंस्टाग्रामवरच नव्हे तर स्नॅपचॅटवरही झाले होते. या प्रकरणात सायबर सेलने आणखी दोन जणांना पकडले आहे.

Delhi Crime News: #boyslockerroom के खिलाफ सोशल ...

मुलीने तिच्याच गँगरेपचे प्लँनिंग सुचवले
पोलिसांनी सांगितले की,या मुलीने तिच्या सिद्धार्थ या नावाने त्या मुलाला तिच्याच सामूहिक बलात्कारा करण्याविषयीचे सुचवले होते. ज्या मुलाकडे हे मेसेज पाठवले गेले होते तो मुलगाही अल्पवयीन आहे. त्याने ‘सिद्धार्थ’ (आरोपी मुलगी) च्या सुचविलेल्या योजनेत भाग घेण्यास नकार दिला आणि चॅटिंग थांबविले. चॅटिंग संपल्यानंतर त्या मुलाने या चॅटिंगचा स्क्रीनशॉट त्या मुलीसह त्याच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये पाठविला. ‘सिद्धार्थ’ नावाची प्रोफाइल काल्पनिक होती, जी तिने स्वत:च तयार केली होती आणि हे फक्त त्या मुलीलाच ठाऊक होते. आता त्या मुलाने चॅटिंग थांबवले की आपल्या बचावासाठी त्याने चॅटिंग डीलीट केले हे शोधण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.

BoysLockerRoom: Chat Groups Casually Body-Shaming And Sexualising ...

स्क्रीनशॉट इंस्टाग्राम स्टोरीज वर पोस्ट केला
यापैकी एका मित्राने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर स्क्रीनशॉट पोस्ट केला होता तिथून तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्याच वेळी, जेव्हा लोकांना मुलांच्या या लॉकर रूमबद्दल कळले तेव्हा त्यामध्ये या स्नॅपचॅटच्या चॅटिंगचा देखील उल्लेख केला गेलेला होता.लोकांना वाटले की हे चॅटिंग इन्स्टाग्रामवर केले गेले आहे. सध्या सायबर सेलला आणखी तीन इंस्टाग्राम अकाऊंट्सची माहिती मिळालेली आहे. दोन्ही आरोपींचीही चौकशी करण्यात येत आहे.

पोलिसांना त्या अल्पवयीन मुलीबद्दल कसे कळले?
सायबर सेलच्या म्हणण्यानुसार, जेव्हा मुलांच्या या लॉकर रूममधील सदस्यांची एक-एक करून तपासणी केली गेली तेव्हा असे आढळून आले की, बलात्काराबाबतची व्हायरल चॅट या ग्रुपमधील सदस्यांची नसून ती बाहेरील दोन लोकांमधील आहे. या तपासणीनंतरच या अल्पवयीन मुलीचे नाव समोर आले. यावेळी पोलिसांना सिद्धार्थ नावाचे प्रोफाइल बनावट असल्याचेही समजले.

Delhi Police Says Its Looking Into 'Boys Locker Room' Controversy

२४ पेक्षा जास्त लोकांची चौकशी
डीसीपी अनेश रॉय या प्रकरणाबाबत म्हणाले, “आतापर्यंत बॉईज लॉकर रूम प्रकरणाशी संबंधित चोवीस पेक्षा जास्त लोकांची अनेकदा चौकशी झाली आहे. सर्व उपकरणे ताब्यात घेऊन फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्याच वेळी, गटातील अश्लील चॅटिंगचे स्क्रीनशॉट सार्वजनिक केले गेले. त्याच्या आधारे एक अल्पवयीन मुलाची ओळख पटली आहे. गुन्हा दाखल करून त्याला अटकही केली आहे. यासह त्याचा मोबाईल जप्त करुन तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. त्यांनी ग्रुपमधील उर्वरित सदस्यांचीही चौकशी केली. नुकतीच दिल्लीतील काही शालेय मुले बॉईज लॉकर रूम नावाचा एक ग्रुप बनवून अश्लील चॅट करत होते अशी बातमी उघडकीस आली.

बॉईज लॉकर रूम म्हणजे काय?
वास्तविक ‘बॉईज लॉकर रूम’ हा इन्स्टाग्रामवर १७ ते १८ वर्षांच्या मुलांचा एक ग्रुप होता. ज्यामध्ये मुलींचे मॉर्फेड फोटो अपलोड करण्यात आले आणि आक्षेपार्ह गोष्टी केल्या गेल्या. मात्र, या दोघां मुलांमधील स्नॅपचॅटमध्ये झालेल्या बलात्काराशी संबंधित चॅटिंगमुळे हे प्रकरण उघडकिस आले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

एसटीची मोफत बस प्रवास सेवा स्थगित; प्रशासकीय पातळीवर गोंधळ

मुंबई । लॉकडाऊनमुळं शहारत अडकून पडलेल्या राज्यातील नागरिकांना घरी परतण्यासाठी एसटी बस सेवा सशुल्क द्यायची की मोफत यावरून गोंधळ सुरू आहे. त्यामुळं सोमवारपासून सुरू होणारी मोफत सेवा आता अचानक स्थगित करण्यात येत असल्याचं सांगण्यात येत आहे. राज्य सरकारकडून याबाबत येत्या काही दिवसांत निर्णय घेण्यात येईल.त्यामुळे प्रशासकीय पातळीवर आदेशाचे गोंधळ कायम असल्याचे दिसून येते.

शनिवारी ९ मे रोजी राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी सोमवारपासून मजूर, विद्यार्थी, भाविक आणि अडकलेल्या लोकांसाठी मोफत प्रवास सेवा सुरू करण्याची घोषणा केली होती. मात्र आता एसटी बस सेवा सशुल्क द्यायची की मोफत यावरून प्रशासकीय स्तरावर गोंधळ असून एसटी महामंडळाकडून ही सेवा स्थगित करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून येत्या काही दिवसांत सेवेबाबत निर्णय अपेक्षित आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांनी दिली.

दरम्यान, एसटीची कोणतीही सेवा सुरू नाही, असं सांगण्यात येत आहे. मुंबईतील बोरिवली येथील नेन्सी कॉलनी आगारात आलेल्या लोकांना परत जाण्यास सांगण्यात येत आहे. त्यामुळं एसटी कर्मचारी आणि गावी जाण्यासाठी इच्छुक असलेल्या प्रवाशांमध्ये बाचाबाचीचे प्रकार घडत आहेत. राज्याच्या परिवहन खात्यानं घरी परतणाऱ्या नागरिकांसाठी एसटीची मोफत सेवा सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. एसटीकडून कोणतंही भाडं आकारण्यात येणार नाही, असं सांगण्यात आलं होतं. तसेच यासाठी नोंद नोंदणीची नियमावली सुद्धा जारी करण्यात आली होती. मात्र, प्रशासनिक पातळीवर गोंधळ उडल्यानं अखेर ही सेवा स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळं मुंबई पुण्यासारख्या शहरात अडकून पडलेल्या नागरिकांचा हिरमोड झाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”