Wednesday, December 24, 2025
Home Blog Page 5814

उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक जाऊन दाखल केला उमेदवारी अर्ज

मुंबई । शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज विधानभवन येथे विधानपरिषद सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला. 21 मे रोजी होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब जाऊन आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

21 मे रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी होणार्‍या निवडणुकीसाठी शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी विधान परिषद सदस्य नीलम गोरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शशिकांत शिंदे आणि अमोल मितकरी यांना उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.

भारतीय जनता पक्षाने आधीच चार उमेदवार जाहीर केले आहेत. उर्वरित पाच जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झाले आहेत. कॉंग्रेसने दोन उमेदवार उभे करण्याचा विचार केला होता. त्यांच्या वतीने राजेश राठोड आणि राजकिशोर ऊर्फ पापा मोदी यांना उमेदवारी देण्याची चर्चा होती. एकूण दहा उमेदवारांचा एक पराभव निश्चित होता. कारण सर्व उमेदवारांना विजयासाठी किमान 29 मतांची आवश्यकता आहे. हे लक्षात घेता शिवसेनेचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणुका आल्या तर स्वत: उमेदवारी अर्ज मागे घेण्याची घोषणा केली. त्यानंतर रविवारी रात्री काँग्रेस नेते बाळासाहेब पाटील यांनी काँग्रेसचा एक उमेदवार आम्ही मागे घेत आहोत असे सांगत निवडणूक बिनविरोधच होईल असे सांगितले.

मॉडेल पूनम पांडेला पोलिसांनी केली अटक; लॉकडाउनचं उल्लंघन केल्याचा आरोप

मुंबई । आपल्या हॉट आणि बोल्ड अंदाजासाठी नेहमीच चर्चेत असणाऱ्या मॉडेल पूनम पांडे आणि तिच्या प्रियकराला लॉकडाउनचं उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी यावेळी पूनमची बीएमडब्ल्यू कारही जप्त केली. मुंबई पोलिसांनी रविवारी संध्याकाळी दोघांना मरिन ड्राइव्ह येथे अटक केलं. लॉकडाउन असतानाही दोघं कारमधून फिरायला निघाले होते. दोघांविरोधात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लॉकडाउनच्या काळात घरातून बाहेर पडण्यास मनाई असतानाही पूनम तिची बीएमडब्ल्यू गाडी घेऊन बाहेर पडली. म्हनुनच लॉकडाउनचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी पूनमला आणि तिचा प्रियकर अहमदला अटक केली आहे. दरम्यान पूनम पांडे आपला प्रियकर अहमदसोबतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी तिने चेहऱ्याला मास्क लावून प्रियकराला किस करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. २०१३ मध्ये नशा सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. पूनम इन्स्टाग्रामवर सक्रिय असून ३० लाखांहून अधिक लोक तिला फॉलो करतात.

Poonam Pandey files criminal case against Raj Kundra & associates ...

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

धक्कादायक ! औरंगाबादमध्ये कोरोनाचा १४ वा बळी; ८० वर्षीय वृद्धाचा मृत्यू

औरंगाबाद प्रतिनिधी | औरंगाबादमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. त्यात मृत्यूचे प्रमाण देखील वाढताना दिसत आहे. कालपर्यंत १३ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. त्यात आज पुन्हा रामनगर येथील ८० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाचा १४ वा बळी गेला आहे. अशी माहिती माध्यम समन्वयक अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांनी दिली.

रामनगर येथील ८० वर्षीय रुग्णाचा मध्यरात्री १ वाजून १० मिनिटाने मृत्यू झाला. या रुग्णाला ताप येणे, खोकला, दम लागणे यामुळे ८ मे रोजी घाटी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल झाले होते. त्यानंतर त्या रुग्णाचे स्वब घेण्यात आले. ९ मे रोजी त्या रुग्णाचा अहवाल पॉजिटिव्ह आला होता. त्या रुग्णाचे ऑक्सीजनचे प्रमाण देखील अत्यंत कमी झाले होते. त्यामुळे या रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

या रुग्णांचा आज मृत्यू झाला . त्यामुळे शहरात कोरोनाबाधित मृत्यू होण्याची संख्या आज १४ वर जाऊन पोहचली आहे. यामुळे आणखीनच चिंता वाढली आहे. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा या खूप सतर्क असल्याचं पाहायला मिळत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

औरंगाबादमध्ये कोरोनाबांधितांची संख्या ६०० पार, आज ४४ जणांचा अहवाल पॉजिटिव्ह

औरंगाबाद प्रतिनिधी । औरंगाबाद शहरात कोरोनाबधितांची संख्या पाहता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. शहराचा कोरोनाबधितांचा अहवाल पाहिला तर काल रात्रीपर्यंत ५५८ कोरोनाबधितांची संख्या होती. त्यात आज सकाळी आलेल्या अहवालानुसार ४४ जणांचा कोरोनाचा अहवाल पॉजिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरात कोरोनाबधितांची संख्या ६०२ वर गेली असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी दिली.

औरंगाबादचा कोरोनाबधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्याबरोबर चिंता देखील वाढताना दिसून येत आहे. त्यात आज सकाळी आलेल्या अहवालानुसार कोरोनाबधितांची संख्या सहाशेच्या वर गेली आहे. त्यात आज आलेल्या अहवालानुसार औरंगाबाद जिल्ह्यातील विविध भागांतील ४४ जणांचा अहवाल पॉजिटिव्ह आला आहे. त्यामध्ये न्याय नगर येथील-२, संजय नगर-१, एसआरपीएफ, सातारा परिसर-१, कोतवालपुरा-१, सिडको -एन-४ या भागातील-१, सातारा परिसर सदानंद नगर-८, बीड बायपास रोड -१, भवानीनगर, जुना मोंढा-३, पुंडलिक नगर गल्ली क्रमांक सहा येथील-१, दत्त नगर-कैलास नगर-५, कैलास नगर-१, बायजीपुरा-१, रामनगर -६, किल्लेअर्क-८ आणि ग्रामीण भागातील सातारा गाव -१, गंगापूर तालुक्यातील फुलशिवरा येथील -३ असे एकूण ४४ जणांचा अहवाल पॉजिटिव्ह आला आहे. त्यामध्ये २७ पुरुष आणि १७ महिलांचा यात समावेश आहेत.

औरंगाबाद मध्ये ४४ कोविडबाधित रुग्ण
औरंगाबाद जिल्ह्यातील विविध भागातील ४४ कोविडबाधित रुग्णांची आज सकाळी वाढ झाल्याने कोरोनाबधितांची संख्या ६०२ वर गेली आहे. त्यापैकी ९२ कोरोनामुक्त झाले आहेत तर आजपर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या ४९६ रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णसंख्या आज सहाशेच्या वर गेली आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगणे आवश्यक आहे. याशिवाय आतातरी याकडे गांभीर्याने बघावे आणि घरातच सुरक्षित राहावे असे आवाहन देखील डॉक्टरांनी केले आहे.

औरंगाबादमध्ये कोरोनामुळे १४ वा बळी
औरंगाबाद मध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालला आहे. त्यात मृत्यूचे प्रमाण देखील वाढताना दिसत आहे. कालपर्यंत १३ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. त्यात आज पुन्हा रामनगर येथील ८० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील कोरोनामुळे आज १४ वा बळी गेला आहे. अशी माहिती माध्यम समन्वयक अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांनी दिली. पुढे त्यांनी सांगितले की, रामनगर येथील ८० वर्षीय रुग्णाचा मध्यरात्री १ वाजून १० मिनिटाने मृत्यू झाला. या रुग्णाला ताप येणे, खोकला, दम लागणे यामुळे ८ मे रोजी घाटी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल झाले होते. त्यानंतर त्या रुग्णाचे स्वब घेण्यात आले. ९ मे रोजी त्या रुग्णाचा अहवाल पॉजिटिव्ह आला होता. त्या रुग्णाचे ऑक्सीजनचे प्रमाण देखील अत्यंत कमी झाले होते. त्यामुळे या रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. या रुग्णांचा आज मृत्यू झाला . त्यामुळे शहरात कोरोनाबाधित मृत्यू होण्याची संख्या आज १४ वर जाऊन पोहचली आहे. यामुळे आणखीनच चिंता वाढली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

आणि बुद्ध हसला! आजच्याच दिवशी पोखरणमध्ये भारताने जगाला हादरे दिले होते

नवी दिल्ली । दिवस ११ मे १९९८, वेळ दुपारी ३.४५, ठिकाण पोखरण आणि एक शक्तिशाली स्फोट. बरोबर २२ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी भारताने संपूर्ण जगाला आपली ताकत दाखवून दिली होती. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असा तो क्षण होता. तत्कालिन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या त्या धाडसी निर्णयामुळे संपूर्ण जग अवाक झाले होते. भारताने राजस्थानच्या पोखरण रेंजमध्ये अणूस्फोटाची यशस्वी चाचणी करून एक अणुवस्त्र संपन्न देश म्हणून स्वतःला सिद्ध केलं. संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या भारताने विध्वंसक अशा अणूबॉंम्ब बनविण्यासाठी सज्ज झाला होता. १९९८ सालच्या ११ मे च्या दुपारी ३.४५ च्या सुमारास ३ त्यानंतर २ दिवसांनी १३ मे रोजी दोन अशा एकूण पाचही अणूस्फोटाच्या चाचण्या यशस्वी ठरल्या. भारत अणवस्त्र संपन्न देश बनल्याचा संदेश या चाचण्यांमधून जगभरात गेला.

बलाढ्य अमेरिकेला गुंगारा देत भारताने पोखरण अणूस्फोट
अमेरिकेसह जगातील कुठल्याही देशाला काहीही थांगपत्ता लागू न देता भारताने ही मोहिम यशस्वी करुन दाखवली होती. भारताचे दिवंगत राष्ट्रपती अब्दुल कलाम भारताच्या या सिक्रेट मिशनचे प्रमुख होते. अणू चाचणी करण्याचा आमचा कोणताही इरादा नाही असे भारताचे तत्कालिन परराष्ट्र सचिव के.रघुनाथ यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र सचिवांना सांगितल्यानंतर काही महिन्यातच ही चाचणी करण्यात आली. या अणू चाचणीबद्दल कमालीची गुप्तता बाळगण्यात आली होती. पाच जणांनाच या चाचणीबद्दल माहिती होती. त्यावेळी अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयए भारताच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेऊन होती. अमेरिकन सॅटलाइटसचे पोखरण रेंजवर लक्ष होते. पण भारतीय वैज्ञानिकांनी या अमेरिकन सॅटलाइटला चकवा देऊन ही चाचणी यशस्वी करुन दाखवली. या प्रोजेक्टमध्ये सहभागी असलेले वैज्ञानिक कोड भाषेमध्ये परस्परांशी बोलायचे. नेमके काय चालू आहे हे कोणालाही कळू नये यासाठी वैज्ञानिक सैनिकी गणवेश घालून पोखरण रेंजवर जायचे.

जगाने लादले होते भारतावर निर्बंध
पोखरण अणू चाचणीनंतर भारताला आंतरराष्ट्रीय समुदायाच्या नाराजीचा सामना करावा लागणार होता आणि घडलेसुद्धा तसेच. भारताने ही चाचणी केल्याचे जाहीर करताच अमेरिकेने लगेच परराष्ट्र सचिव स्तरावरील चर्चा स्थगित केली आणि भारतावर निर्बंध लादले. वाजपेयींच्या नेतृत्वलाखाली भारताने त्या सर्व परिस्थितीचा समर्थपणे सामना केला व आपली अणवस्त्र संपन्नता शांततेसाठी असल्याचे जगाला पटवून दिले. त्यामुळेच तत्कालिन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात अमेरिकेसह अन्य पाश्चिमात्य देशांनी भारताबरोबर अणूऊर्जा करार केला.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

नोकरी जाण्याची बाळगू नका भीती! मोदी सरकार आहे पाठीशी; आणली ‘ही’ नवी योजना

नवी दिल्ली । लॉकडाऊनमुळे देशाचं अर्थकारण मंदावलं आहे. याची सगळ्यात जास्ती झळ खासगी क्षेत्रातील उद्योगांना बसली आहे.  अशात व्यापार कमी झाल्यानं अनके कंपन्या नोकर कपात करण्याच्या तयारीत आहेत. म्हणून जर तुम्ही खासगी क्षेत्रातील कंपनीत काम करत आहात आणि जर नोकरी जाण्याची चिंता सतावत असेल तरी काळजी करू नका. तुम्हाला ‘अटल बिमित व्यक्ती कल्याण’ या योजनेता लाभ घेता येईल. जर तुमची कंपनी तुमच्या वेतनातून पीएफ किंवा ईएसची रक्कम कापत असेल तर या योजनेअंतर्गत तुम्हाला २४ महिन्यांकरिता सरकारकडून पैसे मिळत राहणार आहेत. ‘कर्मचारी राज्य विमा महामंडळा’च्या (ईएसआयसी) ‘अटल बिमित व्यक्ती कल्याण’ योजनेअंतर्गत लाभ घेता येणार आहे. परंतु यासाठी आधी नोंदणी करणं आवश्यक आहे. ईएसआयसीच्या संकेतस्थळावर याबाबत संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

‘अटल बिमित व्यक्ती कल्याण’ या योजनेअंतर्गत एखाद्या व्यक्तीची नोकरी गेल्यास सरकार त्याला दोन वर्षांपर्यंत आर्थिक मदत करणार आहे. ही मदत दोन वर्षांपर्यंत प्रत्येक महिन्याला केली जाणार आहे. बेरोजगार व्यक्तीच्या गेल्या ९० दिवसांच्या सरकारची २५ टक्के इतकी रक्कम त्याला मदत म्हणून देण्यात येणार आहे. जे लोक ईएसआयसीशी जोडले गेले आणि ज्यांनी दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधीसाठी नोकरी केली आहे त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. याव्यरिक्त आधार क्रमांक आणि बँक अकाऊंटही डेटाबेसशी जोडलेला असणं आवश्यक आहे.

असा घेता येईल लाभ?

‘अटल बिमित व्यक्ती कल्याण’ योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करणं आवश्यक आहे. तुम्ही ईएसआयसीच्या संकेतस्थळावर जाऊन या योजनेचा फॉर्म डाऊनलोड करू शकता. फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी https://www.esic.nic.in/attachments/circularfile/93e904d2e3084d65fdf7793e9098d125.pdf या लिंकचा वापर करा. हा फॉर्म भरल्यानंतर तो नजीकच्या ईएसआयसी कार्यालयात जमा करावा लागणार आहे. तसंच यासोबत २० रूपयाचा नॉन ज्युडिशिअल स्टँप पेपरवर नोटरीद्वारे अॅफिडेव्हिट द्यावं लागणार आहे. यामध्ये AB-1 पासून AB-4 पर्यंत फॉर्म जमा करून घेतला जाईल. सध्या यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध नसली तरी लवकरच ती सुरू करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. या योजनेचा फायदा केवळ एकदाच घेता येऊ शकतो.

या लोकांना योजनेचा लाभ घेता येणार नाही

जर एखाद्या व्यक्तीला चुकीच्या कामामुळे कंपनीतून काढून टाकलं असेल, तसंच एखाद्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला असेल त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. तसंच जर तुम्ही स्वेच्छा निवृत्ती घेतली असेल तरीही या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

दिलासादायक ! अमरावतीत 15 कोरोनाबाधित रुग्ण झाले बरे; आज मिळाला डिस्चार्ज

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई

अमरावती येथील कोविड रूग्णालयात उपचार घेतल्यानंतर बरे झालेल्या 15 कोरोनामुक्त नागरिकांना घरी सोडण्यात आले. रुग्णालयात दाखल या सर्व रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल उपचारांनंतर निगेटिव्ह आला. ही बाब दिलासा देणारी ठरली असून, वैद्यकीय यंत्रणेने या सर्वांचे अभिनंदन करत त्यांना निरोप दिला.

यात 10 पुरुष व्यक्ती व 5 महिलांचा समावेश आहे. कमिला ग्राऊंड येथील तीन महिला व एक पुरुष, हैदरपुरा येथील 2 पुरुष, बडनेरा येथील एक महिला, तारखेडा येथील तीन पुरुष, खोलापुरी गेट येथील 2 पुरुष, एक महिला, चेतनदास बगिचा येथील एक पुरुष असे 15 कोरोनामुक्त नागरिकांना अमरावती कोविड रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला आहे.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांच्यासह अनेक डॉक्टर, पारिचारिका, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी यावेळी उपस्थित होते. यावेळी  ब-या झालेल्या सर्व नागरिकांना मिठाई देण्यात आली. यानंतर दक्षता म्हणून हे सर्वजण होम क्वारंटाईन राहणार आहेत. आजपर्यंत बरे होऊन परतलेल्या नागरिकांची संख्या ही २१ झाली आहे.

मॉडेल पूनम पांडे विरोधात मुंबई पोलिसांत गुन्हा दाखल

मुंबई । मॉडेल आणि बॉलिवूड अभिनेत्री पूनम पांडे सोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टिव्ह असते. पूनम नेहमीच तिच्या पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांना तिच्या दैनंदिन कामांविषयी सांगत असते. आत्ता पर्यंत अनेकदा तिने असे काही फोटोशूट केले आहे कि ती बातम्यांमध्ये आली आहे. रविवारी रात्री उशिरा पूनम मुंबईतील मरिन ड्राइव्हवर कार चालवत असताना दिसली. यानंतर मुंबई पोलिसांनी तिच्यावर लोकडाऊनचे उल्लंघन केल्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

https://www.instagram.com/p/B_sorqwJeFQ/?utm_source=ig_web_copy_link

कोविड १९ चा प्रसार रोखण्यासाठी सध्या देशभरात लॉकडाऊन आहे. मुंबई शहरात तर कोरोनाने हाहाकार माजवला आहे. अशात मॉडेल पूनम पांडे लॉकडाऊनचे उल्लंघन करून मारिन ड्राइव्हवर कर चालवत असताना मुंबई पोलिसांनी सापडली आहे. मुंबई पोलिसांनी पुनांची महागडी कार देखील जप्त केली असून पूनम वर गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, राज कुंद्रा आणि त्याच्या साथीदारांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात खटला दाखल झाल्यानंतर फेब्रुवारीमध्ये पूनम चर्चेत होती. पांडे यांच्या म्हणण्यानुसार, करार संपल्यानंतरही कुंद्रा आणि त्याचे सहकारी तिच्या अॅपवर वैशिष्ट्यीकृत सामग्री वापरत होते. तथापि, राज म्हणाले होते की आपण डिसेंबर २०१९ मध्ये अॅपचे व्यवस्थापन करणारी कंपनी सोडली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

https://www.instagram.com/p/B-AD7aUpmCa/?utm_source=ig_web_copy_link

https://www.instagram.com/p/B-KVnqHJAjZ/?utm_source=ig_web_copy_link

https://www.instagram.com/p/B6KgRCnpxV-/?utm_source=ig_web_copy_link

https://www.instagram.com/p/B-FS1AqpOtL/?utm_source=ig_web_copy_link

https://www.instagram.com/p/B8b7G2wJrRV/?utm_source=ig_web_copy_link

१२ मे साठी रेल्वेचे तिकिट कसे काढायचे? जाणुन घ्या संपुर्ण प्रक्रिया

नवी दिल्ली | लाॅकडाउनमध्ये बंद असणारी भारतीय रेल्वे आता मंगळवार पासून पुन्हा सुरु होणार आहे. यामुळे देशाच्या विविध भागांत अडकलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र रेल्वेचे तिकिट कसे काढायचे याबाबत अनेकांच्या मनात शंका आहे. त्याबाबत आता IRCTC ने खूलासा केला असून तिकिट विक्री उद्या सोमवार, १‍१ मे पासून सुरु होणार आहे.

रेल्वेचे तिकिट बुक करण्यासाठी प्रवाशांना IRCTC ची अधिकृत वेबसाईट https://www.irctc.co.in/ ला भेट द्यावी लागणार आहे. १२ तारखेपासून सुटणार्‍या रेल्वेगाड्यांच्या बुकिंग करता तिकिट फक्त आॅनलाईन पद्धतीनेच काढता येणार आहे. IRCTC कडून एजंट कडून तिकिट विक्रीला प्रतिबंध केला आहे. तसेच तात्काळ तिकिट सुविधाही बंद ठेवण्यात येणार असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. तसेच करंट बुंकिंग सुविधाही बंद असणार आहे. त्यामुळे प्रवाशाना तिकिट काढण्यासाठी IRCTC ची वेबसाईट किंवा अधिकृत मोबाईल अॅप चा वापर करावा लागणार आहे.

दरम्यान, एसी चे डबे उपलब्ध राहणार असून त्याचे भाडे राजधानी एक्सप्रेसच्या पटीमध्ये राहणार आहे असे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. तसेच प्रवाशांना रेल्वेप्रवासादरम्यान सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करणे बंधनकारन राहणार आहे. तोंडाला मास्क लावूनच प्रवाशांना संपुर्ण प्रवास करावा लागणार आहे.

रेल्वेचे तिकिट काढण्यासाठी खालील गोष्टी करा –

१) ११ मे रोजी संध्याकाळी ठिक ४ वाजता आॅनलाईन बुंकिंग सुविधा सुरु होणार आहे. तेव्हा या वेळेत https://www.irctc.co.in/ या रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर लाॅगइन व्हा.

२) बरोबर ४ वाजता बुकिंग सुरु होईल तेव्हा तुमच्या प्रवासाचे ठिकाण निवडून तुमचे तिकिट बुक करा. आणि आॅनलाईन पेअमंट करा.

३) कोणत्याही एजंटला जादाचे पैसे देऊन स्वत:ची फसवणुक करुन घेऊ नका. तुम्ही तुमच्या मोबाईलवर देखील रेल्वेचे तिकिट बुक करु शकता.

४) तात्काळ सेवा बंद ठेवण्यात आल्याने तुम्हाला आॅनलाईन तिकिट बुक करणे हा एकमेव मार्ग आहे. तेव्हा जो सर्वांत आधी प्रक्रिया पार पाडेल त्याला सर्वांत अगोदर तिकिट मिळणार आहे. तेव्हा वेळ चुकवू नका.

५) यातूनही तुम्हाला तिकिट मिळाले नाहीच तर निराश होऊ नका. कारण एकाच वेळी अनेकजणांनी बुकिंगसाठी प्रयत्न केल्याने वेबसाईट हँग पडण्याची शक्यता असते. मात्र रेल्वे खाते तांत्रिक बिघाड होणार नाही यासाठी काळजी घेतील.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

राज्यात दिवसभरात १ हजार २७८ नवीन कोरोनाग्रस्त; एकूण रुग्णसंख्या २२ हजार १७१ वर

मुंबई । राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २२ हजार १७१ झाली आहे. आज १२७८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ३९९ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ४१९९ रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख ३८ हजार ७६६ नमुन्यांपैकी २ लाख १५ हजार ९०३ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर २२ हजार १७१ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २ लाख ४४ हजार ३२७ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १४ हजार ४६५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात ५३ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या ८३२ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी मुंबई मधील १९, पुण्यातील ५, जळगाव शहरात ५, धुळे शहरात २, धुळे ग्रामीण भागात १, पिंपरी चिंचवड मध्ये १, अहमदनगरमध्ये १, औरंगाबाद शहरात १, नंदूरबारमध्ये १, सोलापूर शहरात १ तर वसई विरारमध्ये १ मृत्यू झाला आहे. मालेगाव शहरातील १४ मृत्यू हे २७ एप्रिल ते १० मे २०२० या कालावधीतील आहेत. त्यांची नोंद आज घेण्यात आली आहे. याशिवाय मध्यप्रदेशमधील एक मृत्यू आज मुंबई येथे झाला आहे.

आज झालेल्या मृत्यूंपैकी ३३ पुरुष तर २० महिला आहेत. आज झालेल्या ५३ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १९ रुग्ण आहेत तर ३० रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. रुग्णांना असणाऱ्या इतर आजारांबाबत १७ जणांची माहिती अप्राप्त आहे. उर्वरित ३६ रुग्णांपैकी २७ जणांमध्ये (७५ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील : (कंसात मृत्यूंची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: १३,७३९ (५०८)
ठाणे: १२१ (२)
ठाणे मनपा: ८८० (८)
नवी मुंबई मनपा: ८२६ (४)
कल्याण डोंबिवली मनपा: ३५१ (३)
उल्हासनगर मनपा: २६
भिवंडी निजामपूर मनपा: ३० (२)
मीरा भाईंदर मनपा: २१४ (२)
पालघर: ३४ (२)
वसई विरार मनपा: २२९ (१०)
रायगड: ९२ (१)
पनवेल मनपा: १३८ (२)
ठाणे मंडळ एकूण: १६,६८० (५४४)

नाशिक: ५९
नाशिक मनपा: ३८
मालेगाव मनपा: ५६२ (३४)
अहमदनगर: ५४ (३)
अहमदनगर मनपा: ०९
धुळे: ९ (३)
धुळ मनपा: ४५ (३)
जळगाव: १४४(१२)
जळगाव मनपा: ३४ (७)
नंदूरबार: २२ (२)
नाशिक मंडळ एकूण: ९७६ (६४)

पुणे: १६२ (५)
पुणे मनपा: २३७७ (१४६)
पिंपरी चिंचवड मनपा: १४० (४)
सोलापूर: ९
सोलापूर मनपा: २४१ (११)
सातारा: ११९ (२)
पुणे मंडळ एकूण: ३०४८ (१६८)

कोल्हापूर: १३ (१)
कोल्हापूर मनपा: ६
सांगली: ३३
सांगली मिरज कुपवाड मनपा: ४ (१)
सिंधुदुर्ग: ६
रत्नागिरी: ३६ (१)
कोल्हापूर मंडळ एकूण: ९८ (३)

औरंगाबाद:९३
औरंगाबाद मनपा: ४७५ (१३)
जालना: १२
हिंगोली: ५९
परभणी: १ (१)
परभणी मनपा: १
औरंगाबाद मंडळ एकूण: ६४१ (१४)

लातूर: २५ (१)
लातूर मनपा: १
उस्मानाबाद: ३
बीड: १
नांदेड: ४
नांदेड मनपा: ३९ (३)
लातूर मंडळ एकूण: ७३ (४)

अकोला: १७ (१)
अकोला मनपा: १४२ (१०)
अमरावती: ४ (१)
अमरावती मनपा: ७८ (११)
यवतमाळ: ९६
बुलढाणा: २४ (१)
वाशिम: १
अकोला मंडळ एकूण: ३६२ (२४)

नागपूर: २
नागपूर मनपा: २४९ (२)
वर्धा: ०
भंडारा: १
गोंदिया: १
चंद्रपूर: १
चंद्रपूर मनपा: ३
गडचिरोली: ०
नागपूर मंडळ एकूण: २५७ (२)

इतर राज्ये: ३६ (९)
एकूण: २२ हजार १७१ (८३२)