Wednesday, December 24, 2025
Home Blog Page 5815

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या प्रकृतीत बिघाड; AIIMS मध्ये दाखल

नवी दिल्ली | देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्यांना दिल्ली येथील AIIMS रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सिंग यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना दवाखाण्यात दाखल करण्यात आले असल्याचे समजत आहे.

कार्डियो थोरासिक वॉर्ड मध्ये सिंग यांना दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. छातीत अचानक दुखू लागल्याने त्यांना तातडीने रात्री ९ च्या दरम्यान एम्स मध्ये भरती करण्यात आले. 

मनमोहन सिंग सलग 10 वर्षे देशाचे पंतप्रधान राहिले आहेत. एक अर्थतज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे. आज ते वेळोवेळी सरकारच्या धोरणांविषयी बोलत असतात. तथापि, वयाच्या 87 व्या वर्षी ते आता राजकारणात सक्रिय राहिले नाहीत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

गुड न्युज! मंगळवारपासून पेसेंजर ट्रेन सुरू होणार; भारतीय रेल्वेने घेतला मोठा निर्णय

नवी दिल्ली  | गेल्या दीड महिन्यापासून देशात लॉक डाऊन सुरू आहे. रेल्वे आणि विमानसेवा ही बंद असल्याने नागरिक घरात बसून आहेत. मात्र लॉकडाऊन कायम असताना नागरिकांना एक मोठा दिलासा मिळाला आहे. त्याला कारण ही तसेचं आहे. भारतीय रेल्वेने पॅसेंजर ट्रेन्स सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 12 मे म्हणजे येत्या मंगळवारपासून भारतीय पेसेंजर ट्रेन सुरू होणार आहेत. त्यामुळे नागरिकांना आता प्रवास करता येणार आहे.

https://hellomaharashtra.in/lifestyle-news-in-marathi/how-to-book-railway-ticket-online/

रेल्वे मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार (दि.१२) मे पासून पॅसेंजर ट्रेन्स सुरू करण्यात येणार आहेत. तसेच या ट्रेनने प्रवास करण्यासाठी उद्या म्हणजे सोमवार (दि. ११) मे पासून सायंकाळी 4 वाजल्यापासून बुकिंग सुरू होणार आहे. तिकिट बुकिंगसाठी नागरिकांनी IRCTCच्या वेबसाईटवर लॉगिन करावे लागणार आहे.

सुरुवातीला रेल्वेकडून येवून – जावून ३० ट्रेन्स चालवण्यात येणार आहेत. या रेल्वेतून प्रवास करताना प्रवाशांनी चेहऱ्यावर मास्क लावणं बंधनकारक असल्याचंही रेल्वेने म्हटलं आहे. यासोबतच रेल्वेमध्ये बसण्यापूर्वी प्रवाशांचं स्क्रिनिंग होईल आणि त्यानंतरच त्यांना रेल्वेत बसण्याची परवानगी देण्यात येणार आहे. अशी ही माहिती रेल्वेने दिली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

हुश्श! महाविकास आघाडीतील तिढा सुटला; विधानपरिषद निवडणूक बिनविरोधच

मुंबई । राज्यातील विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार असल्याच्या निर्णयावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. काँग्रेस पक्षाने अखेर माघार घेतली असून यामुळे महाविकास आघाडीतील तिढा सुटला आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांची आज बैठक पार पडली. यात विधानपरिषद निवडणूक बिनविरोध लढण्यावर शिक्कामोर्तब झाला असल्याची माहिती काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

“विधान परिषेदेच्या ९ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे आणि अर्ज दाखल करण्याचा सोमवारी अखेरचा दिवस आहे. महाविकास आघाडीनं ६ जागा लढवाव्या अशी आमची अपेक्षा होती. परंतु करोनाच्या या संकटात सर्व सदस्यांना मुंबईत आणणं आणि मतदान घडवून आणणं शक्य नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्याचीही विनंती केली. त्यानंतर आम्ही सर्व बाबींचा विचार करून ५ जागांवर ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला,” अशी प्रतिक्रिया थोरात यांनी दिली आहे.

“करोनाचं संकट नसतं आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उमेदवार नसते तर कदाचित ही निवडणूक झाली असती. संख्याबळाचं आणि अन्य विचार करता आमच्या सहा जागा येणं शक्य होतं. परंतु एकंदरीत करोनाची परिस्थिती पाहता कोणाला या ठिकाणी मतदानासाठी आणणं शक्य नव्हतं. मुख्यमंत्री करोनाच्या संकटात स्वत: काम करत आहेत. संख्याबळाचाही आम्ही विचार केला त्यानुसार आमच्या वाटाल्या कमी जागा आहेत. आम्ही नंतर सर्व गोष्टींचा विचार केला आणि मुख्यमंत्र्यांनीही यात कोणताही गोंधळ वाढवू नये अशी विनंती केली,” असं थोरात म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

राज्यपाल कोश्यारींचा कारनामा; मॉडेल तरुणीला विशेष हेलिकॉप्टरने डेहरादूनला जाण्यास केली मदत?

देहरादून । कोरोना जागतिक साथीच्या आजारामुळे देशभरात सध्या लॉकडाउन लागू करण्यात आले आहे. एकीकडे पोलिस प्रशासनातर्फे संचारबंदीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे, तर दुसरीकडे बरेच राजकारणी नियम मोडण्यात कसलीही कसर सोडत नाहीत. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी असाच एक पराक्रम केला असल्याचे बोलले जात आहे. राज्यपालांनी जैनी उर्फ जयंती नावाच्या एका मॉडेलला महाराष्ट्रातून विशेष हेलिकॉप्टरमार्फत दिल्ली येथे जाण्यास मदत केल्याचे वृत्त पंजाब केसरी ने दिले आहे.

विशेष म्हणजे राज्यपालांनी आपल्या पदाचा वापर करुन सैन्याच्या हॅलीकाॅप्टरने आणि गाडीने देहराडून पर्यंत पोहोचवल्याचं म्हटलं जात आहे. याबाबत एका माजी IAS अधिकारी राहिलेल्या प्रदिप कस्नी नावाच्या फेसबुक अकाऊंटवरुन भारतीय सैन्यावर आरोप करण्यात आला आहे. तसेच वेटरन जवान पूर्व सैनिक नावाच्या एका फेसबुक पेजने याबाबत भारतीय सैन्याने यावर खुलासा करावा अशी मागणी केली आहे.

सदर मॉडेल ला सैन्याच्या गाडीने देहरादून येथील त्यांच्या घरी पाठविण्यात आले. नंतर त्या मॉडेल ला कुटुंबासहित क्वारंटाईन मध्ये राहण्यास सांगण्यात आले. मात्र तरीही सदर मॉडेल नियमांचे पालन करत नसल्याचे बोलले जात आहे. मॉडेल जेनी उर्फ जयंती तिच्या वडिलांसोबत नवोदय विद्यालयाच्या क्वार्टरमध्ये असलेल्या दोन खोलीत राहत आहे. तिचे वडील शिक्षण संचालनालयामध्ये परिचारक म्हणून कार्यरत आहेत. नियमांनुसार, त्याच्या वडिलांना देखील होम क्वारेन्टाईनमध्ये घरीच राहणे अपेक्षित आहे. मात्र त्यांचे वडील बरेच दिवस कार्यालयात येत आहेत आणि हजेरी लावत आहेत. आता सदर मॉडेलच्या कुटुंबियांवर कारवाई होणार आहे का?, तसेच मॉडलला देहरादूनला जाण्यास मदत केल्याप्रकरणी राज्यपालांवर कावाईल होणार का?, आदी प्रश्न्नावर चर्चा सुरु आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक विधिवत पार पडणारच – छत्रपती संभाजी राजे

कोल्हापूर । सर्व शिवभक्तांना मी एकच शब्द देतो, की महाराजांचा राज्याभिषेक विधिवत पार पाडला जाईल. त्या परंपरे मध्ये खंड पडू देणार नाही असे आश्वासन छत्रपती संभाजी राजे यांनी दिले आहे. राजसदरेतील राज्याभिषेक सोहळा सर्व शिवभक्तांना थेट पाहता येईल याविषयी सुद्धा उपाय योजना करण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

गेल्या काही दिवसांपासून मी महाराष्ट्रातील विविध भागांतील शिवप्रेमी, इतिहासकार, शिवराज्याभिषेक महोत्सव समिती चे सदस्य, अनेक दुर्गप्रेमी संस्थांचे सदस्य, संबंधित विविध संघटना, शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, पत्रकार या सर्वांशी चर्चा करत आहे. निर्णय घेऊन सर्वांना कळवण्यात येईल. कोरोनाचा संसर्ग अजून किती प्रमाणात वाढेल? लॉकडाऊनचा कालावधी अजून किती दिवस असेल? किती शिवभक्तांना गडावर जाण्याची परवानगी मिळेल? ह्याबाबत स्पष्टता येत नाही आहे. माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे. या महिनाअखेरपर्यंत परिस्थिती पाहून योग्य तो निर्णय घेण्यात येईल. अशी माहिती छत्रपती संभाजी राजे यांनी दिली आहे.

यावर्षी सुद्धा माझ्या मनात अजून मोठं अन आगळं वेगळं नियोजन होतं. परंतु कोरोनामुळे सर्वत्र परिस्थिती अजूनही गंभीर आहे. कोरोनामूळे, दरवर्षी प्रमाणे शिवभक्तांना इच्छा असूनही लाखोंच्या संख्येने गडावर येता येणार नाही. संसर्ग टाळण्याच्या दृष्टीने ते योग्यही आहे. गेली 14 वर्षं आपण हा सोहळा अगदी राजवैभवात संपन्न करत आहोत. शिवराज्याभिषेक सोहळा आता लोकोत्सव झाला आहे. देशभर किंबहुना आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे. गेल्या वर्षी 5 देशांचे राजदूत त्या त्या देशाचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून राजसदरेवर महाराजांना मुजरा करण्यासाठी दाखल झाले होते असंही त्यांनी यावेळी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

सोलापुरात एकाच दिवशी आढळले 48 कोरोना बाधित, एकूण संख्या 264

सोलापूर प्रतिनिधी । सोलापूर शहरात थैमान घातलेल्या कोरोनाने आता मोहोळ तालुक्यात प्रवेश केला आहे. मोहोळ तालुक्यातील पहिला कोरोनाबाधित रुग्ण पेनुर येथे आढळल्यानंतर आज ढोक बाभुळगाव, सावळेश्वर आणि पाटकूल येथे नवीन कोरोना बाधित रुग्ण आज आढळले आहेत. सोलापूर जिल्ह्यात आज एका दिवशी 48 कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने सोलापुरातील एकूण रुग्ण संख्या 264 झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली. कोरोना झाल्यानंतर डॉक्टरांनी उपचार करुन कोरोना मुक्त केलेले 12 रुग्ण (नऊ पुरुष व तीन महिला) यांना आज घरी सोडण्यात आले आहे.

आज नव्याने आढळलेल्या 48 रूग्णांमध्ये एमआयडीसी रोड वरील संजीव नगर मधील एक पुरुष, जुळे सोलापुरातील गजानन नगर येथील एक पुरुष, होटगी रोड वरील बजरंग नगर येथील एक स्त्री, आंबेडकर उद्यान जवळील सम्राट चौकातील मंत्रि चंडक येथील एक पुरुष, सम्राट चौकातील मंत्री चांडक येथील पोलिस कॉलनी मधील एक पुरुष, रविवार पेठेतील एक पुरुष, मुरारजी पेठ येथील पोलिस वसाहतीतील एक पुरुष, जुळे सोलापुरातील समृद्धी हेरिटेज येथील एक महिला, मोदीखाना येथील निर्मिती टॉवर मधील एक पुरुष, कुंभारी येथील अश्विनी ग्रामीण हॉस्पिटल मधील एक पुरुष, सिद्धेश्वर पेठ येथील सहा पुरुष व दोन महिला, सदर बाझार लष्कर येथील दोन पुरुष व दोन महिला, लोकसेवा शाळेजवळील एक पुरुष, शास्त्रीनगर येथील तीन पुरुष व चार महिला, बुधवार पेठेतील मिलिंद नगर येथील एक महिला, तेलंगी पाछा पेठ येथील एक महिला, विडी घरकुल मधील तुळशी शांती नगर येथील एक महिला, सिद्धार्थ चौकातील एक महिला, कुमार स्वामी नगर येथील एक पुरुष, नीलम नगर येथील एक पुरुष, हुडको कॉलनी कुमठा नाका येथील एक पुरुष व एक महिला, मोदीखाना येथील एक पुरुष, जुना कुंभारी रोड गवळी वस्ती येथील एक पुरुष, कुंभारी नाका येथील एक महिला, सिव्हिल क्वॉर्टर येथील एक महिला, होटगी नाका येथील मुलींच्या वस्तीगृहातील एक महिला, मजरेवाडी सहारा नगर येथील एक पुरुष, शिवाजीनगर मोदी येथील एक पुरुष, मोहोळ तालुक्यातील पाटकुल येथील एक पुरुष, मोहोळ तालुक्यातील ढोक बाभुळगाव येथील एक पुरुष, सावळेश्वर येथील एक महिला असे 48 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.

कोरोनामुळे आजपर्यंत मृत झालेल्या व्यक्तींची संख्या 14 असून 209 रुग्ण सध्या रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली. कोरोनावर मात करून रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या 41 झाली आहे.

इडली मंच्युरियन – लॉकडाऊनमधील हटके नाष्टा

सारं काही पोटासाठी | मेघना देशमुख

आईचे लाडके चिरंजीव-चिरंजीवी म्हणून तुम्ही घरीच असाल तर साधारण महिन्यातून एक ते दोनदा इडली खाण्याचा योग येतो. तुम्ही कॉलेज आणि नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी असाल तर इडली चुरायचा योग आठवड्याला येणार म्हणून समजा..!! रोज वेगळं तरी किती खायचं..मग किमान आवडीची असलेली इडली आठवड्यातून एकदा तरी वाट्याला येतेच. इडली-सांबर किंवा इडली चटणी हा पचायला हलका असलेला पदार्थ प्रादेशिक विविधतेनुसार वेगळी टेस्ट जिभेवर टाकून जातो. अर्थातच इडलीचं पीठसुद्धा मॅटर्स..!! लॉकडाऊन काळात घरात असलेले लोक विविध पदार्थ बनवण्याचा जीवापाड प्रयत्न करत आहेत. स्वतः असे पदार्थ बनवल्याचा आनंद शेवटी काही औरच..!! बऱ्याचदा असं होतं की एखादा पदार्थ गरजेपेक्षा जास्त बनवला जातो किंवा घरातील मंडळींच्या आवडीचे ताल असल्याने काही पदार्थ टाकून द्यायची वेळ येते. आता इडलीच्या बाबतीत असं होत असेल तर काय करायचं..?? किंवा ठरवून जरी इडलीपासून वेगळा पदार्थ बनवायचं तुमच्या कधी डोक्यात आलंय का? नसेल तर टेन्शन नको..!! मी आहे ना..!! या इडल्या परत तशाच चविष्ट बनवण्यासाठी मी घेऊन आलेय खास इंडो-चायनिज फ्युजन रेसिपी “इडली – मंच्युरियन”. बाहेरचं चायनिज खाणाऱ्या लहान मुलांना आणि नेहमीच्या, त्याच त्याच चवीची इडली खाऊन कंटाळलेल्यांना हा पदार्थ म्हणचे एक पर्वणीच आहे. चला तर मग झटपट बघूया काय आहे ही रेसिपी.

साहित्य :-
4 इडली
1 वाटी उभा व बारीक चिरलेला कोबी
1/ 2 वाटी चिरलेली शिमला मिरची
2 चमचे बारीक चिरलेला कांदा
2 चमचे चिरलेली कांद्याची पात
1 वाटी तेल
4 चमचे कॉर्नफ्लोअर
1 कप पाणी
1 चमचा शेजवान चटणी
1 चमचा व्हिनेगर
प्रत्येकी 1 चमचा सोया सॉस,ग्रीन चिली सॉस, रेड चिली सॉस.
टोमॅटो सॉस
चवीसाठी मीठ

कृती :- प्रथम प्रत्येक इडलीचे समान काप करून घ्या. त्यासाठी 1 इडली घेऊन तिला मधोमध 1 उभा काप द्या. नंतर आडवे 3 कप देऊन तिचे 6 समान तुकडे करून घ्या. अशाप्रकारे सगळ्या इडल्यांचे काप करा. ह्या तुकड्यांवर 2 चमचे कॉर्नफ्लोअर पसरून त्यात घुसळून घ्या. यामुळे इडलीचे तुकडे निघणार नाहीत आणि मंच्युरियनही कुरकुरीत होतात. आता कढईमध्ये तेल गरम करा. कमी आचेवर हे काप तळून घ्या. तळल्या नंतर हे काप टिशू पेपरवर काढून घ्या.

यानंतर पॅनमध्ये 2 चमचे तेल घ्या. तेल गरम झाल्यावर त्यावर कांदा परतून घ्या. त्यात कोबी आणि शिमला मिरची घालून 2 मिनिट परता. त्यात 2 चमचे कॉर्नफ्लोअर व 2 चमचे पाणी हे मिश्रण घाला. वरील सर्व मिश्रणावर सॉस पसरा. चवीसाठी आवश्यकतेनुसार मीठ घाला.1 चमचा व्हिनेगार घालून हे मिश्रण परतुन घ्या. तुम्हाला जर थोडासा अजिनोमोटो आणि लाल रंग घालायचा असेल तर तोही तुम्ही घालू शकता.

आता या मिश्रणात इडलीचे तळलेले काप घाला. ते चांगले परतून घ्या. यात 1 चमचा शेजवान चटणी घालून या मिश्रणाच्या पॅनवर 2 मिनिट झाकण ठेवा. हे मिश्रण 2 मिनिट शिजल्यावर एका डिशमध्ये काढून त्यावर कांद्याची पात व टोमॅटो सॉसचे गार्निशिंग करून सर्व्ह करा.

मेघना देशमुख यांना पाककलेची आणि रांगोळी काढण्याची विशेष आवड असून याच्या ऑर्डर्सही त्या घेतात. लॉकडाऊन पश्चात अनेकांना घरगुती व्यवसाय मदत करतील या हेतूने त्या पाककलेमार्फत लोकांशी जोडले जाण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचा संपर्क – 8698163195

अशाच नवनवीन पाककृतींसाठी हॅलो महाराष्ट्रला like आणि subscribe करा. मिळवा लेटेस्ट, मुद्देसूद आणि खात्रीशीर बातम्या.

सोलापूरात आत्तापर्यंत 16 पोलिसांना कोरोना; बंदोबस्तावर असलेल्या तिघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

सोलापूर प्रतिनिधी । सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील चार पोलिस कर्मचारी यापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. त्यांच्या संपर्कातील 68 पोलीस कर्मचाऱ्यांपैकी 48 जणांना विलगीकरण कक्षात तर वीस जणांना होम क्वारंनटाइन करण्यात आले होते. त्यापैकी नऊ जणांचे रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह आले असून त्याची तपासणी खाजगी लॅब मधून करण्यात आली आहे. आता या नऊ जणांच्या संपर्कातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. तर दुसरीकडे शहरात बंदोबस्तासाठी असलेल्या तीन कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.

सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील दोन पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आल्यानंतर त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना तातडीने विलगीकरण कक्षात हलविण्यात आले. त्यांच्या वैद्यकीय तपासणीनंतर आणखी दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांच्याच संपर्कातील आणखी नऊ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी आज (रविवारी) दिली. तर शहरातील तीन पोलिस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सांगितले.

शहर जिल्ह्यातील नागरिक कोरोनापासून दूर राहावेत, या हेतूने 22 मार्चपासून राज्यातील पोलिस कर्मचारी रात्रंदिवस रस्त्यांवर पहारा देत आहेत. शहर जिल्ह्यातील नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन सातत्याने करूनही अनेक शहर जिल्ह्यांमधील नागरिक ऐकत नसल्याचे दिसून येत आहे. सोलापूर शहर हद्दीत आठ ठिकाणी तर शहरांतर्गत सात ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली आहे. तर जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक रस्त्यांवर पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. जेणेकरून विनाकारण कोणीही परी जिल्ह्यातून आपल्या जिल्ह्यात येणार नाही, अशी खबरदारी पोलिसांनी घेतली आहे. तरीही ग्रामीण पोलीस दलातील 13 तर शहर पोलीस दलातील तीन पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे आता समोर आले आहे. त्यांच्या संपर्कातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा शोध तातडीने घेतला जात असून त्यापैकी काहींना वैद्यकीय तपासणीसाठी हलविण्यात आल्याचेही पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

संपर्कातील कर्मचारी व व्यक्तींचा शोध सुरू
शहर पोलीस दलातील तीन कर्मचाऱ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये सुमारे 80 ते 90 जण आल्याचा अंदाज आहे. तर ग्रामीण पोलीस दलातील या नऊ कर्मचाऱ्यांच्या संपर्कात नेमके किती पोलीस अधिकारी व कर्मचारी आले, याची माहिती संकलित करण्याचे काम सुरू झाले आहे. तत्पूर्वी, ग्रामीण पोलीस दलातील कोरोना पॉझिटिव्ह चार पोलीस कर्मचाऱ्यांच्या संपर्कातील 68 जणांना वैद्यकीय तपासणीसाठी ताब्यात घेतले होते. त्यापैकी 48 कर्मचारी आयसोलेशन वॉर्डमध्ये तर 20 कर्मचारी होम क्वारंनटाइन करण्यात आले होते. कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, याची खबरदारी म्हणून ग्रामीण पोलीस दलातील 55 वर्षांवरील 14 पोलीस अधिकारी व 138 कर्मचाऱ्यांना घरीच राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

धक्कादायक! पोलीस पाटलाची शेतकऱ्याला कुऱ्हाडीने मारहाण; कराड तालुक्यातील घटना

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

शेतातील घास गवतातून ट्रॅक्टर का नेला, असे विचारल्याच्या कारणावरून चिडून जावून पोलीस पाटील याने गावातीलच एकाच्या हातावर कुऱ्हाडीने मारहाण केल्याची तर इतरांनी शिवीगाळ, दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना हवेलीवाडी-सवादे ता. कराड येथे शनिवार दि. ९ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. अनिल राजाराम एैर वय ४१ रा. हवेलीवाडी-सवादे ता. कराड असे मारहाणीतील जखमीचे नाव आहे. पोलीस पाटील श्रीकृष्ण पांडूरंग नलवडे, हणमंत पांडूरंग नलवडे, यशवंत मारूती नलवडे, राहुल मारूती नलवडे, महादेव ज्ञानू एैर, सुनिल उर्फ सोन्या राजाराम नलवडे अशी या गुन्ह्यातील संशयीतांची नावे आहेत.

याबाबत अनिल राजाराम एैर यांनी कराड ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांकडील माहिती अशी, अनिल एैर व त्यांच चुलत भाऊ  सुनिल महादेव एैर हे नालगौंडी शिवारात शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास उसाला पाणी पाजण्याच्या पाईप जोडण्यासाठी गेले होते. त्यावेळी शेतात तोडलेली झाडे नेण्यासाठी गावचा पोलीस पाटील श्रीकृष्ण नलवडे याने ट्रॅक्टर बोलवला होता. संजय येरळेकर हा चालक ट्रॅक्टर घेवून आला. त्याने अनिल एैर यांच्या शेतातील घास गवतातून ट्रॅक्टर नेला. त्यामुळे अनिल यांनी त्याबाबत त्याच्याकडे विचारणा केली. त्यामुळे चिडून जावून श्रीकृष्ण नलवडे याने त्याच्या हातातील कुऱ्हाडीने अनिल एैर यांच्या डाव्या हातावर मारहाण करून त्यांना जखमी केले.

नलवडे याच्यासोबतच्या हणमंत पांडूरंग नलवडे, यशवंत मारूती नलवडे, महादेव ज्ञानू एैर यांनी हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण व शिवीगाळ केली. तर राहुल मारूती नलवडे, सुनिल उर्फ सोन्या राजाराम नलवडे यांनी अनिल एैर यांचे चुलतभाऊ सुनिल एैर व शंकर एैर यांना हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली, असे अनिल एैर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून पोलिसांनी श्रीकृष्ण नलवडे याच्यासह सहाजणांविरूध्द गुन्हा नोंद केला आहे. या गुन्ह्याचा तपास हवालदार सुर्यकांत खिलारे करत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

कोरोना इम्पॅक्ट | स्थानिक स्वराज्य संस्था बळकट झाल्या तरच, केंद्र आणि राज्यातील सत्ता चांगल्या चालतील – मणी शंकर अय्यर

लढा कोरोनाशी | Covid -१९ च्या विरोधातील अनपेक्षित पण स्वागतार्ह परिणाम म्हणजे “संघर्षात्मक संघराज्य” होय. ते केंद्रांच्या राज्यांसोबतचे संबंधांचे वैशिष्ट्य आहे. विशेषतः त्यांचे जे भाजपाचे नाहीत. २०१४ साली त्यांनी याचे वचन दिले होते, पण पुढच्या सहा वर्षात त्यांचा ‘जुमला’ कामी न आल्याने आता या देशव्यापी संकटाच्या दबावाखाली “सहकारी संघराज्य” या घटकाला ते नमते घेत आहेत. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्या वारंवार झालेल्या टेलीकॉन्फरन्समध्ये राज्य आणि केंद्र यांच्या सहकारी प्रयत्नांशिवाय या covid -१९ च्या परिस्थितीचा सामना करण्याचे कोणतेच मार्ग नसल्याचे मध्यवर्ती आस्थापनांनी मान्य केले आहे. राज्यांसह सल्लामसलत करण्याच्या प्रक्रियेद्वारे निराकरण करण्याची आवश्यकता देखील केंद्राने मान्य केली आहे. तसेच राज्यांना संबंधित परिस्थितीत मार्गदर्शक तत्वांना स्वीकारण्यासाठी लवचिकता बहाल केली आहे. पूर्णपणे अनपेक्षित आणि अत्यंत महागड्या आकस्मिक अशा या परिस्थितीची पूर्तता करण्यासाठी पुरेशा निधीची तसेच केंद्रीय मार्गदर्शक सूचीची आवश्यकता असल्याचे राज्यांनी स्वीकारले आहे. संविधानाच्या ९ आणि ९ अ भागात मागच्या साधारण एका शतका अधिक काळ जतन करून ठेवलेल्या ७३ आणि ७४ व्या संविधानिक घटनादुरुस्तीनुसार पुढे जाऊन नगरपालिका आणि पंचायतींकडे काम सोपवले पाहिजे. त्यासोबत  आणखी काय करण्याची गरज आहे याकडे लक्ष दिले पाहिजे. 

अकराव्या अनुसूचीतील २३ व्या नोंदीच्या प्रारंभिक बिंदूमध्ये “आरोग्य, स्वच्छता, इस्पितळे, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि दवाखाने” या २९ विषयांच्या यादीसह स्पष्टपणे पंचायतींचे विभाजन करण्याचे ठरविले जाऊ शकते. राज्य विधानमंडळाद्वारे सुसंगत कायदे लागू केले जाऊ शकतात. सर्व राज्यांच्या कायद्यात या विषयांचा समावेश आहे. त्यायोगे यासंदर्भात पंचायतींना कार्यक्षमतेसह सक्षम बनविणे, वित्त आणि कार्यकारी राबविणे हे आता राज्य कायद्यानुसार एक वैधानिक बंधन आहे जे कलम २४३ ग च्या तरतुदीनुसार शासित आहे. या कलमाद्वारे राज्य विधानमंडळाकडून  “कायद्याद्वारे पंचायतींना अधिकार आणि सत्ता बहाल केली जाईल, ज्याची कदाचित त्यांना स्वराज्य संस्था म्हणून कार्य करण्यास सक्षम होण्यास मदत होईल.”  याचा अर्थ राज्य सरकार पंचायतींना राज्य सरकारचा विस्तार म्हणून वागवू शकत नाही. पण, “स्वराज्य संस्था” मानू शकते. जर “सहकारी संघराज्य” याचा तर्क असा आहे की राज्यांनी केंद्र सरकारच्या अंमलबजावणीच्या शस्त्राप्रमाणे नाही पण संघराज्यातील स्वायत्त घटक म्हणून काम केले पाहिजे. तर पंचायतींनीही स्वतःला राज्य सरकारचा विस्तार न समजता “स्वराज्य संस्थेतील” घटक समजले पाहिजे. पंचायतीला संविधानाच्या तीन स्तरीय हस्तांतरणीय  पद्धतीत आणण्याचा विचार केला पाहिजे. केंद्र-राज्य-पंचायत (आणि नगरपालिका). 

केरळच्या या संकटावर मात करण्याच्या कामगिरीचे आश्चर्यकारक तत्व म्हणजे त्यांच्या हस्तांतरणीय पद्धतीतील मजबूत प्रणाली आहे. जी कुडुंबश्री कार्यक्रमाला पंचायतींच्या सहकार्याने सक्षम करते. जसे की राज्य अर्थमंत्री थॉमस इसाक यांनी अलीकडच्या स्तंभामधील लेखात यावर भर दिला आहे (covid च्या बाकापुढे म्हणजे एप्रिल १७). आता संचारबंदी थोडी सुलभ झाल्यामुळे स्थलांतरित कामगार आभारपूर्वक त्यांच्या मूळ गावी परतत आहेत.  Covid-१९ विरोधातील या मोहिमेत अगदी पंचायतींनी (आणि नगरपालिकेने स्वराज्य संस्था-२४३ W म्हणून) पूर्णपणे सहभाग घेणे आणखी महत्वाचे आहे. खरोखरच जेव्हा सहकारी संघराज्याचा सरकारच्या तीन स्तरात विस्तार होईल, तेव्हाच तळागाळात मोहिमेचे नियोजन आणि अंमलबजावणी करणे थोडे साध्य होईल. सामान्य आर्थिक क्रियाकल्पांची पुनर्रचना होईपर्यंत स्वदेशी स्थलांतरित कामगारांसह लाखो गावकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मोफत अथवा अनुदानित अन्न देण्याची आवश्यकता आहे, याची विशेष नोंद घेणे गरजेचे आहे.   

अकराव्या अनुसूचीच्या २८ व्या प्रवेशामध्ये ज्यामध्ये हस्तांतरणाचे विषय आहेत त्यात “सार्वजनिक वितरण प्रणाली” चा उल्लेख आहे. अनुसुचीत इतरही अनेक नोंदी आहेत ज्या या उपक्रमाशी संबंधित आहेत पण एकदा राज्यांनी पत्र आणि भावनेने पंचायतींची भागीदारी स्वीकारली की, अकराव्या आणि बाराव्या अनुसूचीत सर्व संबंधित नोंदीत संरक्षण अपरिहार्यपणे वाढविण्यात येईल, आणि राज्यांशी अनुरूप कायदे होतील. covid -१९ शी लढण्यासाठी  केंद्र आणि राज्यांच्या नियामक सत्ताधाऱ्यांनी  त्यांच्या स्वराज्य संस्थेच्या प्रचंड क्षमतेच्या बाबतीत जागे होणे गरजेचे आहे.  या प्रसंगातून उभे राहण्यासाठी आपल्याकडे पंचायतींमध्ये निवडून आलेले ३२ लाख आणि अतिउत्सुक  असे २ लाख नगरपालिकेचे सैन्य आहे. त्यापैकी एक तृतीयांशापेक्षा अधिक म्हणजे सुमारे १०-१२ लाख लोक हे अनुसूचित जाती जमातींमधून निवडून आले आहेत आणि म्हणूनच ते प्रत्येक शहर आणि गावातील जास्त गरजू आणि निराधार  लोकांच्या संपर्कात आहेत. अशा सुमारे १४ लाख महिला आहेत ज्यांनी स्वतःला निवडणुकीत गाव नेते म्हणून स्थापित केले आहे. त्या लोकशाही पद्धतीने निवडलेल्या महिलांची जगातील सर्वात मोठी संस्था आहेत. त्यापैकी जवळपास १ लाख या संबंधित पंचायत आणि नगरपालिकेमध्ये पदाधिकारी आहेत. रात्रीच्या सुमारास आपल्या घरातून बाहेर आलेल्या स्त्रियांनी – पालघर गावच्या महिला सरपंचानी ज्या परिस्थितीत घडलेल्या सर्व गोष्टींसाठी स्वतःला जबाबदार धरून त्या दोन साधूंची कत्तल थांबविण्याचा प्रयत्न केला, अशा पद्धतीची कल्पना तुम्ही करू शकता का? तो अधिकार तिच्या समाजातूनच तिला मिळाला होता? विचार करा अशा महिला कोरोना विषाणूच्या या लढ्यात “अग्रभागी कामगार” म्हणून विधायक भूमिका करू शकतील. 

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्थलांतरित कामगारांचा लोंढ्याची तपासणी, सामाजिक अलगाव, विलगीकरणासह शक्य तितक्या विस्ताराने परत आणण्याचे नियोजन आणि कोणत्याही अपवादाशिवाय  शरीर आणि आत्मा एकत्र ठेवण्यासाठी आवश्यक असणारे आर्थिक अनुदान प्राप्त केले आणि ठेवले आहे याची खात्री करून घेणे. कलम २४३ अ आणि २४३ स च्या अंतर्गत संबंधित ग्रामसभा, आणि वॉर्ड सभाना संबोधित केलेल्या सक्षम पंचायत (आणि नगरपालिका) यांच्याद्वारे केवळ शेवटच्या घटकापर्यंत वितरण सर्वसमावेशकपणे निश्चित करता येईल. शेवटच्या घटकापर्यंत वितरणासाठी स्थानिक नोकरशाहीवर अवलंबून राहणे ही प्रशासनाची अडचण आहे. 

Covid-१९चे रुग्ण थांबविण्याच्या योजनेसाठी पंचायत आणि नगरपालिका या  तीनही स्तरांचा समावेश असलेल्या कलम २४३ ZD मध्ये जिल्हा यंत्रणेचे संपूर्ण उपयोजन आवश्यक आहे. गाव आणि परिसर पातळीवर ग्राम सभा, ग्राम संसद आणि वॉर्ड सभा यांचा सहभाग आवश्यक आहे. केवळ अशाप्रकारे covid -१९ वरील या युद्धाला लोक चळवळ करता येईल, केवळ अशानेच आपल्यासारख्या प्रचंड लोकसंख्या असणाऱ्या देशात आपल्याला यशस्वी होता येईल. पंतप्रधानांनी २४ एप्रिल रोजी पंचायत दिवसादिवशी प्रसारित होत असताना हा संदेश देण्याची विलक्षण संधी गमावली. त्यांनी असे केले असते तर भारत आणि जग या आजरातून सावरलं असतं आणि त्यांनी नोंद केली असती की युद्धाचा मानवतावादी चेहरा हा पंचायत आणि नगरपालिकेतील लोकांच्या चेहऱ्याचे प्रतिबिंब आहे.

द इंडियन एक्सप्रेसमध्ये आलेल्या मणी शंकर अय्यर यांच्या मूळ इंग्रजी लेखाचा अनुवाद जयश्री देसाई यांनी केला आहे. त्यांचा संपर्क क्रमांक – 9146041816