Sunday, December 21, 2025
Home Blog Page 582

IBPS CRP Clerk Bharti 2024 | IBPS अंतर्गत तब्बल 6128 लिपिक पदांसाठी भरती सुरु; असा करा अर्ज

IBPS CRP Clerk Bharti 2024

IBPS CRP Clerk Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन गेलो आहोत. कारण आता एका मोठ्या भरतीला सुरुवात झालेली आहे. ती म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS CRP Clerk Bharti 2024) अंतर्गत एक मोठी भरती चालू झालेली आहे. ही भरती लिपिक या पदासाठी आहे. या पदाच्या एकूण 6128 जागा आहेत. आणि या रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुकांनी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन देखील अर्ज करू शकता. याचप्रमाणे 28 जुलै 2024 तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर या वेबसाईटला भेट द्यायची आहे. आणि अर्ज करायचा आहे आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

महत्वाची माहिती | IBPS CRP Clerk Bharti 2024

  • पदाचे नाव – लिपिक
  • पद संख्या – 6128 जागा (महाराष्ट्रात 590 जागा)
  • नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जुलै 2024

अर्ज कसा करावा? | IBPS CRP Clerk Bharti 2024

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • 28 जुलै 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.
  • अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात सविस्तरपणे वाचा

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा

RRB JE Recruitment 2024 | रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत 7934 पदांसाठी भरती सुरु; ऑनलाईन पद्धतीने करा अर्ज

RRB JE Recruitment 2024

RRB JE Recruitment 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही तुमच्यासाठी अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ते म्हणजे आता रेल्वे भरती बोर्ड (RRB JE Recruitment 2024) अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. ही भरती कनिष्ठ अभियंता डेपो, मटेरियल अधीक्षक आणि केमिकल तसेच मेटलर्जिकल सहाय्यक या पदांसाठी आहे. या पदांच्या तब्बल 7934 रिक्त जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर अर्ज करायचा आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

महत्वाची माहिती | RRB JE Recruitment 2024

  • पदाचे नाव कनिष्ठ – अभियंता डेपो मटेरियल अधीक्षक आणि केमिकल तसेच मेटलर्जिकल सहाय्यक
  • पदसंख्या – 7934 जागा
  • अर्ज पद्धती – ऑनलाइन
  • वयोमर्यादा – 18 ते 26 वर्ष
  • अर्ज शुल्क – 500 रुपये

अर्ज कसा करावा ? | RRB JE Recruitment 2024

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • अर्ज करताना पीडीएफ जाहिरात सविस्तरपणे वाचा आणि दिलेल्या कागदपत्रांची पूर्तता करा.

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

Budget 2024 : अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी केल्या मोठ्या घोषणा!!! एका Click वर जाणून घ्या

Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत त्यांचा सातवा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली आहे. मोदी सरकारच्या काळातील हा सलग तिसरा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात एकूणच सर्वसामान्य माणसाला काय मिळेल ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. असे असताना यंदाच्या बजेट मध्ये शेतकरी , महिला , ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी (Budget 2024) देण्याकडे दिसत आहे.

शेतकरी, महिला, तरुण आणि गरीबांसाठी बजेट

यावेळी भाषणाच्या दरम्यान ,अर्थमंत्री सीतारामन यांनी लोकसभेत सांगितले की, ‘भारतीय जनतेने मोदीजींच्या नेतृत्वाखालील सरकारवर विश्वास दृढ केला आहे आणि त्यांना तिसऱ्यांदा निवडून दिले आहे.’ भारताची आर्थिक स्थिती स्थिर असतानाच, धोरणात्मक अनिश्चिततेच्या गर्तेत. यासोबतच त्यांनी सरकारच्या प्राधान्यक्रमांची माहिती दिली आणि सरकारचे लक्ष शेतकरी, महिला, तरुण आणि गरीबांवर असल्याचे (Budget 2024) सांगितले.

कृषी क्षेत्राला 1.52 लाख कोटींची तरतूद

सीतारामन यांनी सांगितल्याप्रमाणे कृषी कृषी क्षेत्राच्या विकासासाठी मोदी सरकारने यंदाच्या बजेटमध्ये 1.52 लाख कोटींची तरतूद केली आहे. यावेळी कृषी क्षेत्राचा विकास हे सरकारची पहिली प्राथमिकता असल्याचा सांगितले गेलं. शेतकऱ्यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म सरकार आणणार आहे. नैसर्गिक शेतीवर भर देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. याशिवाय भाजीपाला वाहतुकीसाठी विशेष साखळी तयार करणार असल्याचं या बजेटमध्ये सांगण्यात आलं. एवढेच नव्हे तर डिजिटल प्लॅटफॉर्मची सोबत घेऊन शेतकऱ्यांसाठी विविध योजनाही आणल्या जातील असं या बजेटच्यादरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Budget 2024) यांनी सांगितलं

आतापर्यंतचे ठळक मुद्दे (Budget 2024)

  • कृषी क्षेत्राचा विकास ही सरकारची पहिली प्राथमिकता
  • कृषी क्षेत्रासाठी 1.52 लाख कोटींची तरतूद
  • शेतीसाठी विविध योजना आणणार
  • शेतकऱ्यांना साठी डिजिटल प्लॅटफॉर्म
  • नैसर्गिक शेतीवर भर देण्याचा सरकारचा प्रयत्न
  • भाजीपाला वाहतुकीसाठी विशेष साखळी तयार करणार
  • महिलांच्या रोजगार निर्मिती साठी विशेष भर देणार
  • ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न
  • सहकार क्षेत्राचा विकास करून ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारणार
  • रोजगार निर्मिती साठी 2 लाख कोटी खर्च करणार
  • गरीब कल्याण अन्न योजना आणखी 5 वर्ष वाढवली
  • शैक्षणिक कर्जासाठी 3 टक्के व्याजाची सूट मिळणार
  • नव्या व्यवसायासाठी युवकांना कर्ज देणार
  • देशांतर्गत शिक्षणासाठी 10 लाखांपर्यंत सरकार मदत करणारपीएम विश्वकर्मा योजनेची व्याप्ती वाढवणार

BSNL Recharge Plan | BSNL ने आणला 105 दिवसांचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन; मिळणार ‘हे’ फायदे

BSNL Recharge Plan

BSNL Recharge Plan | खाजगी कंपन्यांनी त्याच्या रिचार्ज प्लॅनमध्ये वाढ केल्यापासून बीएसएनएल सरकारी कंपनी आता चांगलीच आघाडीवर आहे. मागील काही दिवसापूर्वी एअरटेल, जिओ, VI या कंपन्यांनी त्यांच्या रिचार्जच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केलेली आहे. त्यामुळे बीएसएनएल सध्या चर्चेत आहे. खाजगी कंपन्यांनी त्यांचे दरवाढ केल्यामुळे आता बीएसएनएल (BSNL Recharge Plan) नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांच्या ग्राहकांना टिकवून ठेवण्यासाठी अनेक नवनवीन योजना आणत आहेत. अत्यंत स्वस्त दरामध्ये ते युजर्सला अनेक रिचार्ज प्लॅन देत आहे.

तुम्हीही बीएसएनएल (BSNL Recharge Plan) सिम वापरत असाल, तर तुमच्यासाठी ही माहिती खूप महत्त्वाची ठरणार आहे. कारण बीएसएनएलने त्यांचा एक नवीन प्रीपेड प्लॅन लॉन्च केलेला आहे. ज्यामध्ये तुम्हाला 105 दिवसांची वैधता मिळत आहे. बीएसएनएलच्या नवीन प्लॅनमध्ये तुम्हाला फ्री कॉलिंग आणि डेटाचा लाभ देखील मिळणार आहे. आता या प्लॅनबद्दल आपण माहिती जाणून घेऊया.

कमी किमतीत जास्त फायदा

बीएसएनएलकडे सध्या अनेक प्लॅन आहेत. 70 दिवसापासून ते 395 दिवसांच्या वैद्यतेसह त्यांच्याकडे अनेक रिचार्ज प्लॅन आहेत. तुम्हाला तुमच्या गरजेनुसार पाहिजे तो प्लॅन तुम्ही निवडू शकता. यातच बीएसएनएल कडे 666 नवीन प्लॅन आहे. यामध्ये तुम्हाला जास्त काळाची वैधता देखील मिळते.

दररोज 2 जीबी डेटा | BSNL Recharge Plan

बीएसएनएलच्या 266 रुपयांच्या प्लॅनची वैधता 105 दिवसांची आहे. यामध्ये तुम्ही फ्री कॉलिंग करू शकता. त्याचप्रमाणे ग्राहकांना दररोज 2 जीबी डेटा मिळतो. तसेच तुम्हाला दररोज 100 मोफत एसएमएस देखील असणार आहेत. अनेक लोक सध्या या प्लॅनकडे वळताना दिसत आहेत. तुम्हाला जर कमी पैशात जास्त कालावधीसाठी रिचार्ज प्लॅन पाहिजे असेल, तर हा प्लॅन तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. कारण यामध्ये दररोज 2 जीबी डेटा देखील तुम्हाला प्रदान केला जात आहे.

SKin Care | किचनमधील ‘या’ गोष्टींचा वापर करून मिळवा चमकदार त्वचा; असा करा वापर

SKin Care

SKin Care | आजकाल प्रत्येक वयोगटातील माणसे ही स्वतःच्या त्वचेची (SKin Care) काळजी घेत असतात. त्वचा अत्यंत मुलायम चमकदार आणि सॉफ्ट दिसण्यासाठी ते वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करत असतात. अनेक लोक हे पार्लरमध्ये जातात आणि खूप खर्च करतात. त्याचप्रमाणे अनेक महागड्या ट्रीटमेंट आणि प्रोडक्ट्सवर देखील खर्च करतात. परंतु एवढे सगळे करूनही अनेकवेळा त्वचेवर त्याचा काहीच फायदा होऊ शकत नाही. उलट जास्त सौंदर्य उत्पादन वापरल्याने तुमच्या चेहऱ्याची चमक हळूहळू कमी होऊ लागते. आणि अनेक समस्या वाढतात.

त्याचप्रमाणे अनेक ब्युटी प्रॉडक्टमध्ये केमिकल असते. त्यामुळे तुमच्या त्वचेचा पोत देखील खराब होतो. आणि तुमचे पैसे देखील जास्त जातात. परंतु जर तुम्हाला पैसे खर्च न करता तुमची त्वचा अत्यंत सुंदर मुलायम करायची असेल, तर तुम्ही किचनमधील या तीन गोष्टींचा वापर करू शकता. त्यामुळे तुमची त्वचा (SKin Care) अत्यंत सुंदर आणि मुलायम होईल.

दही | SKin Care

दही हे मानवाच्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे आपल्या त्वचेला देखील दह्याचा खूप उपयोग होतो. ज्यांची त्वचा कोरडी आहे, त्यांच्यासाठी दही हे एक वरदान आहे. दह्यामध्ये लॅक्टिक ऍसिड असते. त्यामुळे आपल्या त्वचेला आणि गुणधर्म मिळतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या चेहऱ्याला दहा मिनिट दही लावू शकता. आणि ते धुवू शकता. तुम्ही आठवड्यातून दोन वेळा जर चेहऱ्याला दही लावले, तर तुमचा चेहरा अत्यंत मुलायम होईल आणि डाग देखील दूर होतील.

मध

मध ही स्वयंपाक घरात वापरली जाणारी एक आरोग्यदायी गोष्ट आहे. अनेकवेळा लहान मुलांना खोकला, सर्दी झाल्यावर देखील मध देतात. मध आपल्या आरोग्यासाठी जितकी फायदेशीर आहे. तितकीच ती आपल्या त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे. मधामध्ये अनेक नैसर्गिक गुणधर्म असतात. त्यामुळे तुम्ही मध – दहाचा फेस पॅक म्हणून देखील चेहऱ्याला लावू शकता.

लिंबू | SKin Care

लिंबू हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. लिंबामध्ये विटामिन सी मुबलक प्रमाणात असते. लिंबामुळे आपल्या चेहऱ्यावरील डाग, धब्बे आणि पिंपल्स देखील दूर होतात. तुम्ही मधामध्ये किंवा दह्यामध्ये लिंबाचा वापर करून जर चेहऱ्यावर लावलाय तर त्यामुळे तुमची स्किन खूप चांगली होईल.

Weather Update | मुंबईसह अनेक विभागांना सतर्कतेचा इशारा; मुसळधार पावसासह वाहणार सोसाट्याचा वारा

Weather Update

Weather Update |संपूर्ण राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. अनेक ठिकाणी पाऊस पडताना दिसत आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. हवामान विभाग देखील दररोज पावसाबद्दलचा अंदाज देत असतात. अशातच आज म्हणजे 23 जुलै 2024 रोजी पावसाचे वातावरण कसे असणार आहे. हे देखील सांगितलेले आहे. हवामान विभागाने (Weather Update) दिलेल्या माहितीनुसार राज्यातील काही भागांना ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. तर काही भागांना रेड अलर्ट दिलेला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये आज अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार (Weather Update) पुढील काही तास हे आता मुंबई शहर आणि उपनगरासाठी महत्त्वाचे असणार आहे. कारण या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी ताशी 45 ते 50 किलोमीटर वेगाने वारे देखील वाहण्याची शक्यता आहे.

पुण्यामध्ये आज हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. त्याचप्रमाणे घाटमाथ्यावर अतिमुसळधार पाऊस पडण्याची देखील शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागांमध्ये जोरदार पाऊस आणि सोसाट्याचा वारा देखील सुटणार आहे. त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यात देखील मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आलेला असून या विभागाला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे साताऱ्यात हे आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.

त्यामुळे प्रशासनाने आज नागरिकांना घराबाहेर पडताना विशेष काळजी घेण्यास सांगितलेली आहे. त्याशिवाय कामाशिवाय घराबाहेर पडू नका, असे आव्हान देखील करण्यात आलेले आहे. शिवाय रायगड, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये देखील ऑरेंज अलर्ट जाणून केलेला आहे. या ठिकाणी अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. तसेच पुढचे एक ते दोन दिवस पावसाचा जोर हा कायम राहण्याची देखील शक्यता आहे.

Side Effect Of Honey | ‘या’ लोकांसाठी मध ठरू शकते विष! शरीरासाठी आहे हानिकारक

Side Effect Of Honey

Side Effect Of Honey | मध आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. आपण अनेक ठिकाणी वाचले किंवा ऐकले असेल की, मध खाल्ल्याने आपल्या शरीराला खूप फायदा होतो. कारण मधामध्ये विटामिन सी, विटामिन बी, प्रथिने, लोह, फायबर, तांबे यांसारखे अनेक पोषक घटक असतात. जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. मधामध्ये अनेक अँटीऑक्सिडंट असतात. तरीही काही लोकांसाठी मध खाणे अत्यंत हानिकारक(Side Effect Of Honey) ठरू शकते. आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत की, कोणत्या लोकांसाठी मध हानीकारक असते.

मधुमेही रुग्ण | Side Effect Of Honey

मधुमेहाच्या रुग्णांनी चुकूनही मधाचे सेवन करू नये. जर तुम्ही हे विचार करून खात असाल की यातील नैसर्गिक साखरेमुळे तुमचे काही नुकसान होणार नाही, तर तुम्ही चुकीचे आहात. आम्ही तुम्हाला सांगूया की मधामध्ये आढळणारे फ्रुक्टोज हे साखरेचे स्रोत आहे आणि ते मधुमेही लोकांची साखरेची पातळी झपाट्याने खराब करू शकते. यामुळेच या आजारात फ्रक्टोज असलेल्या गोष्टींपासून दूर राहण्याचा सल्ला डॉक्टर देतात.

फॅटी यकृत समस्या

फॅटी लिव्हरच्या समस्येने त्रस्त असलेल्यांनीही मधाचे सेवन करू नये. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की मधामध्ये असलेल्या साखरेचा मुख्य स्त्रोत म्हणजे फ्रक्टोज यकृताची स्थिती बिघडू शकते. आम्ही तुम्हाला सांगूया, फ्रुक्टोज चयापचय करण्यात यकृत मोठी भूमिका बजावते, त्यामुळे फॅटी लिव्हरने त्रस्त लोकांसाठी हे आव्हानात्मक असू शकते.

दात आणि हिरड्यांशी संबंधित समस्या

मधामध्ये असलेली नैसर्गिक साखर दात आणि हिरड्यांशी संबंधित समस्या असलेल्या लोकांसाठी देखील हानिकारक आहे. यामुळे दातांमध्ये पोकळी निर्माण होऊ शकते. आम्ही तुम्हाला सांगतो, तुमच्या मौखिक स्वास्थ्य चांगल्या असल्यास तुम्ही याचे सेवन मर्यादित प्रमाणातच केले पाहिजे, कारण जास्त प्रमाणात सेवन केल्यास हिरड्या सडू शकतात.

क्लोस्ट्रिडियम संसर्ग | Side Effect Of Honey

बरेच लोक एक वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना मध चाटतात. अशा परिस्थितीत, आम्ही तुम्हाला सांगतो की त्याची थोडीशी मात्रा देखील त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. यामुळे त्यांच्यामध्ये क्लोस्ट्रिडियम संसर्गाचा धोका वाढतो, म्हणून नवजात बाळाला फक्त आईचे दूध देणे चांगले आहे, कारण ते बाळाच्या शरीरात साखरेचा पुरवठा करण्यासाठी पुरेसे आहे.

प्रशासनाचा भोंगळा कारभार पुन्हा एकदा उघडकीस; पोषण आहाराच्या पाकिटात सापडले मेलेल्या उंदराचे पिल्लू

Poshan Ahar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपले राज्य सरकार हे देशातील विविध नागरिकांसाठी अनेक योजना आणत असतात. राज्य सरकारकडून राज्यातील सर्व गर्भवती महिलांना आणि बालकांना पोषण आहार दिला जातो. हा पोषण आहार अंगणवाडी शाळामधून वितरित केला जातो. गर्भवती महिलांचे चांगले पालन पोषण व्हावे, त्याचप्रमाणे एका सुदृढ बालकाचा जन्म व्हावा. यासाठी गर्भवती महिलांना देखील हा पोषण आहार दिला जातो. त्याचप्रमाणे लहान मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी लहान मुलांना देखील हा आहार दिला जातो. परंतु आता हा आहार गर्भवती महिला आणि बालकांसाठी किती सुरक्षित आहे? असा प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण अशी एक घटना घडलेली आहे. यामुळे सगळेच जण हादरून केलेले आहेत. जळगावात पोषण आहाराशी संबंधित एक प्रकार समोर आलेला आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी सांगलीमध्ये पोषण आहारात एक मेलेला साप सापडला होता. तसेच पुण्यातील एका शाळेमध्ये पोषण आहारामधून विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती. आता जळगाव पुन्हा एकदा असाच एक प्रकार घडला आहे. ते म्हणजे आता जळगावतील पोषण आहाराच्या पाकिटात चक्क एक पेलेला पिल्लू सापडलेला आहे. त्यामुळे आता हा पोषण आहार आपल्या मुलांसाठी कितपत योग्य आहे असा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे.

जळगावातील नसीराबाद येथे अंगणवाडीतून पोषण आहाराच्या पाकिटात एक मेलेल्या उंदराचे पिल्लू सापडलेले आहे. त्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. यातील मिक्स तांदळाच्या पाकिटात हे पिल्लू आढळले आहे. गृहिणीच्या स्वयंपाका दरम्यान हा धक्कादायक प्रकार लक्षात आलेला आहे. त्यामुळे प्रशासनाचा भोंगळा कारभार पुन्हा एकदा उघडकीस आलेला आहे. हा पोषण आहार आहे की बालकांच्या जीवाशी केलेला खेळ आहे. असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होत आहे. परंतु आता या प्रकरणी नक्की कारवाई होणार आहे का आणि कारवाई झाली तरी काय होईल? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

BMC Recruitment 2024 | मुंबई महानगरपालिकेत नोकरी करण्याची संधी; महिना मिळणार 75 हजार रुपये पगार

BMC Recruitment 2024

BMC Recruitment 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही एक संधी घेऊन आलेला आहोत. ज्या विद्यार्थ्यांना मुंबई महानगरपालिकेत (BMC Recruitment 2024) काम करायचे आहेत. त्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण आता मुंबई महानगरपालिके अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासंदर्भात अधिकृत वेबसाईटवर नोटिफिकेशन देखील जारी करण्यात आलेले आहेत. या भरती अंतर्गत 16 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये सल्लागार, बालरोग तज्ञ, मनोसोपचारतज्ञ, शहर गुणवत्ता आश्वासक समन्वयक आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक ही पदे भरली जाणार आहेत. आता या भरतीची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

सल्लागार

या भरती अंतर्गत सल्लागार या पदाच्या 4 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे शिक्षण एमबीबीएस एमडी पूर्ण असणे गरजेचे आहे. या पदावर नियुक्ती झाल्यानंतर उमेदवाराला दर महिन्याला 73500 रुपये एवढा पगार दिला जाईल.

बालरोगतज्ञ

बालरोग तज्ञ या पदाच्या एकूण 4 रिक्त जागा आहेत. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे एमबीबीएस एमडी बालरोग ही पदवी असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दर महिन्याला 75 हजार रुपये एवढा पगार दिला जाईल.

मानसोपचार तज्ञ

मानसोपचार तज्ञ या पदाच्या एकूण 2 रिक्त जागा आहेत. या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे एमबीबीएस एमडी पदवी असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे निवड झालेल्या उमेदवाराला दर महिन्याला 75 हजार रुपये एवढा पगार दिला जाईल.

शहर गुणवत्ता आश्वासक समन्वयक

या पदाच्या एकूण 4 रिक्त जागा आहेत. त्याचप्रमाणे या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे एमबीबीएस किंवा कोणत्याही शाखेतील वैद्यकीय पदवी असणे गरजेचे आहे.

सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक

सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक या पदाच्या एकूण 2 रिक्त जागा आहे. या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे एमबीबीएस डिग्री असणे गरजेचे आहे.

वयोमर्यादा

या भरतीतील कोणत्याही पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 38 दरम्यान असणे गरजेचे आहे.

मुलाखतीचा पत्ता

सह कार्यकारी आरोग्य अधिकारी (एन.यू.एच.एम) कार्यालय एफ/ दक्षिण विभाग 1 ला मजला रूम नं. 13 डॉ बाबासाहेब रोड परेल या पत्त्यावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. 23 जुलै रोजी या मुलाखती पार पडणार आहे.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

Cleaning Tips : पावसाळ्यात साबण जास्त गळतो का ? वापरा सोप्या ट्रिक्स

तुम्हाला माहिती आहे का ? की रोजच्या वापरातला धुण्याचा आणि अंगाला लावण्याचा साबण हा कशामुळे वितळतो बरं. तर साबण तयार करण्यासाठी अनेक विविध प्रकारच्या केमिकल्सचा वापर केला जातो आणि ह्या केमिकल्स जर ओलाव्याच्या संपर्कात आल्या तर साबण वितळायला लागतो. खर तर हे जे केमिकल्स आहेत ते कपड्यांच्या संरक्षणासाठी तसेच त्वचेच्या स्वच्छता आणि संरक्षणासाठी साबणामध्ये वापरलेली असतात. आपण जर बघितलं तर पावसाच्या दिवसांमध्ये साबण झपाट्याने वितळू लागतो. कारण हवेमध्ये सुद्धा आर्द्रता असते त्यामुळे इतर ऋतूपेक्षा पावसाळ्यात साबण खूप जास्त प्रमाणात गळतो. मात्र काही छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली आणि काही ट्रिक्स ट्राय केल्या तर तुमच्या बाथरूम मध्ये साबण वितळण्यापासून तुम्ही थांबू शकता आणि हाच साबण तुम्हाला जास्त काळ वापरता येऊ शकतो.

काय काळजी घ्याल?

  • साबण अशा जागी ठेवा जिथं त्यावर पाणी पडणार नाही. कारण पाणी पडल्यामुळे साबण वेगाने वितळतो.
  • जर बाथरूम मध्ये सतत ओलावा राहील अशा ठिकाणी तुम्ही साबण ठेवला तर साबण सुकत नाही आणि त्यामुळे तो ओला राहून गळत जातो.
  • त्यामुळे साबण ठेवताना नेहमी हवेशीर आणि कोरड्या जागी ठेवा.
  • शक्यतो साबण बाथरूम मधलया खिडकीजवळ ठेवा. म्हणजे हवेमुळे तो सुकेल आणि दीर्घकाळ टिकेल सुद्धा.

काय वापराल ट्रिक

जर तुम्हाला साबण वारंवार गळत असल्याची तक्रार असेल तर साबण जमिनीवर पसरण्यापासून रोखण्यासाठी साबण ठेवण्यासाठी एक बॉक्स घ्या या बॉक्सवर दोन रबर बँड लावा. आता जेव्हा जेव्हा तुम्ही साबण वापराल तेव्हा तो सांभाळता रबर बँड वर ठेवा म्हणजे त्याचा प्रत्यक्ष संपर्क हा त्या बॉक्सशी येणार नाही आणि पर्यायाने साबण कमी गळेल. शिवाय साबण गळणार आहे तो बॉक्सच्या खालच्या बाजूला पडेल त्यामुळे नंतर हा जो गळालेला साबण आहे तुम्ही कपडे धुण्यासाठी वापरू शकता.

साबण न चुकता बॉक्स मध्ये ठेवा. कारण हेच तुमच्या फायद्याचे आहे. साबणाचा वापर करून झाल्यानंतर तो व्यवस्थित कोरड्या असणाऱ्या बॉक्समध्ये ठेवा बॉक्स जर ओला असेल तर पुन्हा साबण ओला होईल आणि गळत राहिल.