Sunday, December 21, 2025
Home Blog Page 583

Property Rule : अल्पवयीन मुलांच्या नावे मालमत्ता खरेदी करता येते का ? काय सांगतो नियम ?

Property Rule : सध्या रिअल इस्टेट क्षेत्रात गुंतवणुकीवर भर दिला जातो आहे. स्थावर मालमत्तेमध्ये गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. कारण जास्तीचा मिळणारा परतावा ही या क्षेत्रातील जम्याची बाजू मानवी लागेल. गुंतवणूंकीच्या इतर पर्यायांपैकी हमखास चांगला परतावा देणारी गुंतवणूक म्हणून रिअल इस्टेट क्षेत्राकडे पहिले जाते. अशावेळी एक घर किंवा प्रॉपर्टी असताना दुसरी घेण्याकडे कल वाढतो आहे. अशावेळी आपल्या आपत्याच्या नवे मालमत्ता घेण्याकडे अनेकांचा विचार असतो. मात्र तुम्हाला माहिती आहे का ? अल्पवयीन मुलगा किंवा मुलगीच्या नावे मालमत्ता खरेदी (Property Rule) करता येते का ? चला पाहूया काय सांगतो नियम ?

भारतीय प्रॉपर्टी ऍक्ट 1882 नुसार अल्पवयीन व्यक्ती स्वतः मालमत्ता खरेदी करू शकत नाही. मात्र त्याचे पालक विविध माध्यमातून मुलांना संपत्तीचे मालक बनवू शकतात. म्हणजे एखाद्या वेळी पालक स्वतः मालमत्ता खरेदी करू शकतात व मुलांना भेट स्वरूप देऊ शकतात. अशाप्रकारे अल्पवयीन व्यक्ती त्या मालमत्तेची कायदेशीर मालक जरी असली तरी प्रॉपर्टीचे व्यवस्थापन करण्याची संपूर्ण जबाबदारी ही (Property Rule) पालकांची असते. प्रॉपर्टीच्या संबंधित काही करार असतील तर त्यामध्ये अशी मुलं सहभागी होत नाहीत किंवा ती होऊ शकत नाहीत.

त्यांच्या वतीने मालमत्ता एखाद्याला भाड्याने देणे किंवा मालमत्तेची विक्री इत्यादी गोष्टी कायदेशीर रित्या पालक करू शकतात. परंतु जेव्हा मुलं हे त्यांचे कायदेशीर म्हणजेच 18 वर्षे वय पूर्ण करते तेव्हा आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया करून त्या मालमत्तेची संपूर्ण मालकी अशा मुलांकडे (Property Rule) हस्तांतरित करता येते.

अल्पवयीन मुलांच्या नावावर असलेली प्रॉपर्टी विकता येते का?

अल्पवयीन मुलांच्या नावावर मालमत्ता असली तरी त्याची देखभाल व्यवस्थापन हे पालक करू शकतात. मात्र अशा मालमत्तेची विक्री करायची असेल किंवा ती मालमत्ता तारण ठेवायची असेल शिवाय इतरांना भेट द्यायची असेल तर केवळ न्यायालयाच्या परवानगीने ते करता येते. जेव्हा मूल हे 18 वर्षे पूर्ण करते तेव्हा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच पालक मालमत्तेची मालकी मुलांकडे (Property Rule) हस्तांतरित करू शकतात.

कर भरावा लागतो का? (Property Rule)

जर आपण कायद्यानुसार बघायला गेलं तर अल्पवयीन व्यक्तीच्या नावावर दोन पेक्षा जास्त मालमत्ता नसतील किंवा भेटवस्तू दिलेल्या मालमत्तेतून जे काही उत्पन्न मिळत असेल त्यावर कर लागत नाही. मात्र पालकांच्या देखरेखी खाली मालमत्ता जर भाड्याने दिली तर त्यातून मिळणाऱ्या भाड्यावर मात्र कर भरावा लागतो. मुलांच्या वतीने पालक मालमत्ता खरेदी करत असले तरी अशी मालमत्ता खरेदी (Property Rule) करण्यासाठीचा पैसा हा अल्पवयीन मुलांचा असणं गरजेचं आहे.

Budget 2024 : रेल्वे प्रवासात ज्येष्ठ नागरिकांसाठी इतर सेवांसह तत्काळ तिकीट भाड्यात 50% सवलतिची आशा

Budget 2024 : आजपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले असून मंगळवारी दिनांक 23 जुलै 2024 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन या वर्षीचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पांकडून मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्यांना मोठी आशा आहे. मध्यमवर्गीयांसाठी सार्वजनिक वाहतुकीमध्ये महत्वाची भूमिका बजावणारे वाहन म्हणजे रेल्वे. यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वे (Budget 2024) विभागाला काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

COVID-19 साथीचा उद्रेक होण्यापूर्वी, ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटांवर पन्नास टक्के सूट दिली जात होती. मात्र, महामारीच्या काळात हा लाभ बंद झाला. तथापि, ही अपेक्षा पुन्हा एकदा पुढील अर्थसंकल्प, 2024 (Budget 2024) मध्ये दिसू शकते, कारण केंद्रात मोदी सरकारचा तिसरा कार्यकाळ सुरू होत आहे.

रेल्वे वाहतूक हे देखील भारताच्या आर्थिक विकासासाठी वाहतुकीचे एक आवश्यक आणि स्वस्त साधन आहे.मोदी सरकार नवीन अर्थसंकल्प जाहीर करण्याच्या विचारात असताना भारतीय रेल्वेच्या वाढीवर भर दिला जात आहे. मोदी सरकार नवीन अर्थसंकल्प जाहीर करण्याच्या विचारात असताना भारतीय रेल्वेच्या वाढीवर भर दिला जात आहे. रेल्वे भाड्यात ५० टक्के सवलत (Budget 2024) मिळावी या वृद्धांच्या इतर दीर्घकाळापासूनच्या मागणीकडेही सरकार लक्ष देईल का? असा सवाल उपस्थित होतो.

काय मिळतात सवलती (Budget 2024)

31 डिसेंबर 2019 पर्यंत, दुरांतो, शताब्दी, जनशताब्दी, राजधानी, मेल आणि एक्स्प्रेस यांसारख्या विविध गाड्यांसाठी 60 वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि 58 वर्षे व त्याहून अधिक वयाच्या महिलांसाठी भाड्यात लक्षणीय सवलत दिली गेली आहे. ज्येष्ठ नागरिक पुरुषांना 40% कमी शुल्क आकारण्यात आले, तर ज्येष्ठ नागरिक महिलांना 50% सवलत मिळाली. IRCTC ने वृद्धांसाठी (Budget 2024) सर्व मानकीकृत स्पेशल एक्स्प्रेस गाड्यांमध्ये हे कमी भाडे दिले आहे.

Budget 2024 : 3 कोटी लोकांना मिळणार हक्काचं घर ; बजेटमधून सर्वसामान्यांना काय ?

Budget 2024 : आजपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले असून मंगळवारी दिनांक 23 जुलै 2024 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन या वर्षीचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पांकडून मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्यांना मोठी आशा आहे. त्यामुळे अर्थसंकल्पामध्ये सर्वसामान्य माणसाला काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं (Budget 2024) आहे.

2024 च्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन गरिबांसाठी मोठी घोषणा करू शकतात ज्यामुळे देशातल्या तीन कोटी गरिबांचं हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. आता तुम्ही म्हणाल हे कशावरून ? तर फेब्रुवारी महिन्यात जेव्हा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारचा अंतिम अर्थसंकल्प सादर केला होता तेव्हा त्याने प्रधानमंत्री आवास योजनेची व्याप्ती वाढवण्याबाबत भाष्य केलं होतं. याबरोबरच मध्यमवर्गीयांसाठी नवीन गृहनिर्माण योजना आणण्याचा आश्वासनही दिलं होतं त्यामुळे आता या अर्थसंकल्पात (Budget 2024) यावर ठोस घोषणा होण्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

याशिवाय यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणसाठी अधिक निधी दिला जाण्याची शक्यता आहे. तसेच नवीन निधी उपलब्ध झाल्याने मार्च 2025 पर्यंत ग्रामीण भागात 31.4 लाख घरं बांधण्याचं उद्दिष्ट गाठता येणार आहे. पंतप्रधान आवास योजना ही मोदी सरकारची प्रमुख योजना आहे. 2024 पर्यंत ग्रामीण भागात 2.95 कोटी घर बांधण्याचं (Budget 2024) या योजनेचं उद्दिष्ट आहे.

मात्र केंद्र सरकारच्या माहितीनुसार आतापर्यंत देशात 2.63 घरांचा बांधकाम पूर्ण झाले. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत बहुतेक राज्यांमध्ये केंद्र सरकार घराच्या किमती 60% रक्कम खर्च (Budget 2024) करतात उर्वरित खर्च राज्य सरकार उचलतात. एवढेच नाही तर ईशान्येकडील राज्यांमध्ये हा खर्च केंद्राच्या वाट्याला 90% पर्यंत जातो. तर केंद्रशासित प्रदेशांमध्ये (Budget 2024) शंभर टक्के खर्च केंद्र सरकार करते. एकूणच यंदाच्या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होण्याच्या दृष्टीने घोषणा होण्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Satara Rain Update : सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट!! आणखी 4 दिवस मुसळधार पाऊस

Satara Rain Update

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पश्चिम महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस (Satara Rain Update) सुरु आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुणे जिल्ह्याला पावसाने चांगलंच झोडपून काढलं असून रस्त्ये आणि नद्या पाण्याने तुडुंब भरले आहेत. सातारा जिल्ह्यातही पावसाची रिपरिप सुरूच आहे. हवामान विभागाकडून सातारा जिल्ह्यासाठी आज आणि उद्या असे दोन दिवस रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यानंतर पुढील दोन दिवसांसाठी सुद्धा ऑरेंज अलर्ट देण्यात आल्याने सातारा जिल्ह्यासाठी आजपासून पुढील चार दिवस पावसाचे असणार आहेत. त्यामुळे सातारकरांनी सावध राहावे. कामाविषयी घराबाहेर पडू नये.

साताऱ्यात मुसळधार पाऊस – Satara Rain Update

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सातारा जिल्ह्याला पुढील २ दिवस जोरदार पावसाचा इशारा (Satara Rain Update) देण्यात आला आहे. तर मैदानी भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. सध्या सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात दमदार पाऊस होत आहे. महाबळेश्वर तालुक्यातही जोरदार पाऊस होत आहे. मुसळधार पावसामुळे कोयना धरणात 60.42 टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून धरण 57.41 टक्के भरले आहे. जिल्ह्यातील नद्यांच्या आणि धरणांच्या पाणी पातळीमध्ये वेगाने वाढ झाल्याने रस्ते वाहतुकीवर विपरीत परिणाम झाला आहे. पाटण, जावळी, महाबळेश्वर आणि सातारा तालुक्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस सुरूच आहे.

उर्वरित महाराष्ट्राच्या हवामानाबद्दल सांगायचं झालयास, मुंबईमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार, असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. पुणे विभागाला आज येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे. घाट माथ्यावर देखील अति मुसळधार पाऊस पडेल असा देखील अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. कोल्हापुरात पावसाने थैमान घातलं आहे. अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील नद्यांच्या आणि धरणांच्या पाणी पातळीमध्ये वेगाने वाढ झाल्याने रस्ते वाहतुकीवर विपरीत परिणाम झाला आहे.त्याचप्रमाणे अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, गोंदिया, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये देखील मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. त्यामुळे हवामान विभागाने या विभागांना येल्लो अलर्ट जारी केला आहे.

Travel : मुंबईकरांनो मान्सून ट्रिप प्लॅन करताय ? लोकल ट्रेन पकडा आणि थेट पोहचा ‘या’ ठिकाणांना

Travel : पावसाळा आला की निसर्ग आपले रूप बदलू लागतो. निसर्गाचं ही बदलेलं रुपडं पाहण्यासारखं असतं . धरणीने पांघरलेली हिरवी शाल. हिरव्या गर्द डोंगर रांगा आणि त्यामधून दुधासारखे कोसळणारे धबधबे… आहाहा ! निसर्गाचे हे सुंदर रूप पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करत असतात. मुंबई मध्ये राहणाऱ्या मुंबईकरांसाठी आपल्या धकाधकीच्या जीवनातून निवांत क्षण घालवण्यासाठी मान्सून म्हणजे परफेक्ट सिझन… म्हणूनच तुम्ही पण मुंबईच्या आसपास पावसाळी पर्यटन स्थळांचा विचार करीत असाल तर आम्ही आज तुम्हाला मुंबईपासून जवळ असणारी टॉप ५ पर्यटन स्थळांबद्दल सांगणार (Travel ) आहोत. चला तर मग जाणून घेऊया …

कान्हेरी (Travel )

मुंबई शहराच्या पश्चिम भागात बोरिवलीच्या उत्तरेला कान्हेरी लेणी आहेत. ही लेणी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात आहेत आणि मुख्य उद्यानापासून 6 किमी अंतरावर आहेत. बोरिवली स्टेशन पासून 7 कि.मी. दूर आहेत. या लेण्यांमध्ये बौद्ध कला दिसून येते. पावसाळयात कान्हेरी वॉटरफॉल हा प्रवाहित होतो.

झेनिथ धबधबा

मुंबईपासून जवळ असलेला आणखी एक प्रसिद्ध धबधबा म्हणेज झेनिथ धबधबा. हा धबधबा खोपोली मध्ये आहे. कर्जतमधील खोपोलीजवळ – मुंबईपासून ७३ किमी अंतरावर आहे. पावसाळ्यात या धबधब्याच्या परिसरात हिरवीगार हिरवळ असल्याने, मुंबईकरांसाठी हे सर्वात लोकप्रिय ठिकाणांपैकी (Travel ) एक आहे.

टपालवाडी धबधबा (Travel )

नेरळ रेल्वे स्थानकापासून तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या आनंदवाडी आदिवासी वाडीजवळ हा धबधबा आहे. पोहण्यासाठी एक दोहा देखील येथे आहे. मात्र हे ठिकाण आदिवासी पाड्यांमध्ये असल्यामुळे तुम्हाला येथे जेवणाची सोय उपलब्ध नाही.

आनंदवाडी धबधबा

नेरळ रेल्वे स्थानकापासून अवघ्या ३ ते ४ कि मी अंतरावर असलेला प्रसिद्ध धबधबा म्हणजे आनंदवाडी धबधबा. आनंदवाडी या छोट्या गावालगत असलेल्या डोंगराच्या कुशीत हा धबधबा लपलेला आहे. रिक्षाने अवघ्या १० मिनिटात आनंदवाडी गावात पोहचता येते. गावात खाण्यापिण्याची सोयही (Travel ) होउ शकते.

भिवपुरी धबधबा (Travel )

मुंबई-पुणे पासून जवळ कर्जत तालुक्यातील भिवपुरी या छोट्या शहरामध्ये हा धबधबा आहे. हा भाग पावसाळ्यात धबधब्यांनी फुलून जातो. तुम्ही या धबधब्याला भेट देण्यासाठी भिवपुरी रोड रेल्वे स्टेशनवर देखील उतरून धबधब्याकडे जाऊ शकता. या धबधब्याचे मुख्य आकर्षण (Travel ) म्हणजे याचे पाणी २० फूट उंचावरून कोसळतो.

Hit And Run Case | पिंपरीत हिट अँड रन प्रकरण समोर, कारच्या धडकेने महिला थेट हवेत उडाली; पहा थरकाप उडवणारा व्हिडीओ

Hit And Run Case

Hit And Run Case | पुण्यामध्ये आजकाल अनेक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. त्यातही दिवसेंदिवस हिट अँड रन या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. आपण हिट अँड रन (Hit And Run Case) याच्या अनेक बातम्या ऐकत असतो. अशातच आता पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एक अशी घटना समोर आलेली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये एका चार चाकीने महिलेला जोरदार धडक दिली आणि त्यानंतर त्या कारचालकाने समोरच्या दुचाकी आणि एका रिक्षाला धडक दिली. या घटनेत महिला गंभीर जखमी झालेली आहे. आणि तिच्यावर रुग्णालयात सध्या उपचार देखील चालू आहेत. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलेले आहे.

पिंपरी चिंचवड गावातील घटना घडलेली आहे. 21 जुलै रोजी दुपारी 2.30 च्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेमध्ये एक महिला गंभीर दुखापत झालेली आहे. या घटनेनंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्या कार चालकांना ताब्यात घेतलेले आहे. आणि त्याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार रविवारी म्हणजेच 21 जुलै रोजी दीड वाजताच्या सुमारास पिंपरी गावातून एक महिला रस्त्याने जात होती. तेवढ्या समोरून एक कार अत्यंत वेगाने आली. आणि कारने त्या महिलेला धडक दिली. धडक इतकी जोरात होती की, ती महिला थेट हवेत उडाली आणि जमिनीवर जोरदार खाली आपटली. त्यानंतर कार चालकाने गाडीचा वेग कमी न करता तसेच समोर असलेल्या रिक्षा आणि दुचाकीला देखील धडक दिली.

ही घटना घडल्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी त्या कार चालकाचा पाठलाग देखील केला. परंतु तो व्यक्ती तिथून फरार झाला. पोलीस पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्यानंतर त्या कार चालकाला ताब्यात देखील घेतले आहे. आणि गुन्हा देखील दाखल केलेला आहे.

Income Tax | तुमच्या कष्टाचा पैसा सरकार इन्कम टॅक्सच्या रूपात का घेते? जाणून घ्या सविस्तर माहिती

Income Tax

Income Tax | 2024 चा ITR भरण्याची शेवटची तारीख जवळ झालेली आहे. 31 जुलै 2024 ही ITR भरण्याची शेवटची तारीख आहे 23 जुलै रोजी अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पात प्राप्तीकरासाठी काही सवलत मिळेल का? याबाबत अनेक लोकांना अपेक्षा आहेत. आणि त्यामुळे सध्या सगळेजण बजेटची वाट पाहत आहेत. परंतु असे अनेक लोक आहेत, ज्यांना असा प्रश्न पडतो की आपण कष्टाने पैसे कमवतो. त्यावर सरकार कर का वसूल करते? सरकार आपल्या मेहनतीच्या पैशांमध्ये वाटा का घेते? या बदल्यात त्यांना काय मिळते याबद्दल आज माहिती जाणून घेणार आहोत.

आयकर (Income Tax) हा कराचा एक प्रकार आहे जो सरकार त्यांच्या अधिकारक्षेत्रातील व्यवसाय आणि व्यक्तींच्या उत्पन्नावर गोळा करते. आयकराबाबत नियम आणि कायदे निश्चित करण्यात आले आहेत, त्यानुसार करदात्याने त्याचे कर दायित्व निश्चित करण्यासाठी आयकर विवरणपत्र भरणे बंधनकारक आहे.

सरकार तुमच्या कमाईत वाटा का घेते? | Income Tax

तुम्ही मेहनत करून जे पैसे कमावता, त्याचा हिस्सा सरकार आयकराच्या रूपात जमा करते. तुम्हाला तुमच्या कमाईवर आयकर भरावा लागेल. मात्र, त्यासाठी स्लॅब निश्चित करण्यात आले आहेत. 2022-23 या आर्थिक वर्षात सरकारला आयकरातून 14 लाख कोटी रुपये मिळाले होते. तर त्या काळात अंदाजे ६ कोटी भारतीय नागरिकांनी आयकर रिटर्न भरले होते. वर्षानुवर्षे आयकर भरणाऱ्या लोकांची संख्या वाढते आणि त्याचप्रमाणे लोकांचे उत्पन्नही वाढते. मात्र, सरकार सर्वांकडून कर वसूल करते, असे नाही. ज्यांचे उत्पन्न करपात्र आहे त्यांनाच आयकर स्लॅबनुसार कर भरावा लागतो. यासाठी आयकर स्लॅब निश्चित करण्यात आले आहेत.

सरकार आयकर कमाईचे काय करते?

आयकर हा सरकारच्या उत्पन्नाचा मोठा स्रोत आहे. यातून मिळणारे उत्पन्न हे विकासकाम, प्रशासन चालवणे, विविध योजना, पायाभूत सुविधांचा विकास, संरक्षण, शिक्षण, आरोग्य सेवा इत्यादींसाठी वापरते. आयकर भरणे ही तुमची नैतिक जबाबदारी आहे. कर भरून तुम्ही तुमची जबाबदारी पूर्ण करता. आयकरातून मिळणाऱ्या उत्पन्नातूनच देशात विकासाची कामे केली जातात. तुमच्यासाठी तो आम्ही आणि तुम्ही वापरत असलेले चांगले रस्ते, पूल, सार्वजनिक वाहतूक, पायाभूत सुविधा, उत्तम शिक्षण, उत्तम आरोग्य सेवा, सुरक्षा अशा अनेक योजनांवर खर्च केला जातो.

कर व्यवस्था काय आहे?

सध्या भारतात दोन कर प्रणाली आहेत. नवीन कर व्यवस्था आणि जुनी कर व्यवस्था. नवीन कर प्रणालीमध्ये कोणत्याही प्रकारची सूट नाही. जुन्या कर प्रणालीमध्ये 80C, 80D सारख्या कर कपाती उपलब्ध आहेत. 2023 च्या अर्थसंकल्पात, अर्थमंत्र्यांनी नवीन कर प्रणाली डीफॉल्ट बनविण्याची घोषणा केली, त्यानंतर सर्व करदात्यांना जुनी कर व्यवस्था आणि नवीन कर प्रणाली यापैकी एक निवडणे अनिवार्य झाले.

विराट- रोहित 2027 चा वर्ल्डकप खेळणार का? गंभीरने स्पष्टच सांगितलं

virat rohit gambhir

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) …. भारतीय क्रिकेटचे २ अनमोल हिरे… दोघेही भारताचे आधारस्तंभ.. मागील १५ वर्षापासून दोघांनीही भारतीय क्रिकेटची चांगली सेवा केली आहे. मात्र यंदाच्या T20 विश्वचषक स्पर्धेनंतर दोघांनीही आंतरराष्ट्रीय T20 मधून निवृत्ती जाहीर केली आहे. दोघांचं वाढत वय पाहता विराट कोहली आणि रोहित शर्मा २०२७ चा वर्ल्डकप खेळणार का? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडतोय. २०२७ मध्ये रोहित शर्माचं वय 40 तर विराटचं वय 39 वर्षे असणार आहे. त्यामुळे ते तेव्हा खेळतील का हा प्रश्नच आहे. मात्र भारताचा नवनिवार्चित कोच गौतम गंभीरने (Gautam Gambhir) दोन्ही खेळाडूंच्या भविष्याबाबत मोठा दावा केला आहे..

प्रसारमाध्यमांशी बोलतांना गंभीर म्हणाला, “मला वाटते की रोहित शर्मा आणि विराट कोहली हे मोठ्या स्टेजवर काय करू शकतात ते त्यांनी दाखवून दिले आहे, मग तो टी-20 विश्वचषक असो किंवा 50 षटकांचा विश्वचषक असो… एक गोष्ट मी अगदी स्पष्टपणे सांगू शकतो की, विराट आणि रोहित मध्ये अजूनही खूप क्रिकेट बाकी आहे. महत्त्वाचे म्हणजे, चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आणि ऑस्ट्रेलियाचा मोठा दौरा त्यांच्यासमोर पुढे आहे. या दोन्ही स्पर्धेत त्यांना पुरेशी प्रेरणा मिळेल.. आणि मग, आशा आहे की, जर त्यांनी त्यांची त्यांचा फिटनेस कायम राखला तर नक्कीच विराट कोहली आणि रोहित शर्मा 2027 चा वर्ल्डकप सुद्धा खेळतील.

मात्र गंभीर पुढे म्हणाला, आणखी किती काळ क्रिकेट खेळायचं या दोघांचाही वैयक्तिक निर्णय आहे. त्यांच्यात किती क्रिकेट शिल्लक आहे ते मी सांगू शकत नाही. पण हे त्यांच्यावर सुद्धा अवलंबून आहे कि संघाच्या यशात ते किती योगदान देऊ शकतात. रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघेही जागतिक दर्जाचे खेळाडू आहेत. जगातील कोणत्याही संघाची हीच इच्छा असेल कि त्यांनी जास्तीत जास्त काळ संघासोबत राहावं. आमचीही तीच इच्छा आहे असं गौतम गंभीरने स्पष्ट केलं. गंभीरच्या या विधानानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या चाहत्यांना नक्कीच आनंद झाला असेल यात शंकाच नाही.

औसा विधानसभा मतदारसंघात ठाकरेंचा जुना खेळाडू राजकारण फिरवणार??

Ausa assembly

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस – शिवसेना – भाजप अशा पक्षातील अनेक प्रस्थापित नेत्यांची आमदारकीची स्वप्न आधी अधुरी असताना… अचानकच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा स्वीय सहाय्यक औसा मतदारसंघात ऍक्टिव्ह होतो… गाठीभेटी, जनसंपर्क वाढवतो… आणि अखेर पिए टू एमएलए असा भला मोठा राजकीय प्रवास पूर्ण करतो… मी बोलतोय देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू, माजी स्वीय सहाय्यक आणि औसा मतदारसंघाचे भाजप आमदार अभिमन्यू पवार यांच्याबद्दल… या मतदारसंघानं राजकारणातील खेकडे प्रवृत्ती बघितलीय… जातीचं धारदार राजकारण बघितलय.. आणि कधीही मार्गी न लागलेले मतदारसंघातील जीवन मरणाचे प्रश्नही… मुख्यमंत्र्यांच्या जास्त कनेक्ट मध्ये राहिल्यामुळे अभिमन्यू पवारांनी मोठ्या प्रमाणावर निधी तालुक्यात आणला, याबाबत नो डाऊट… पण हाच अभिमन्यू शिवसेना फुटीनंतर चक्रव्ह्युवात सापडलाय… ग्राउंडला केलेल्या रिसर्चनुसार औसा विधानसभेत यंदा कोण आमदार होतोय? मतदारसंघाच्या इतिहासापासून ते आमदारांच्या रिपोर्ट कार्ड पर्यंत सगळं काही तपशिलात पाहुयात

वारकरी संप्रदायाची पताका अविरत फडकवत ठेवणाऱ्या नाथपीठाचा वारसा लाभलेला औसा विधानसभा मतदारसंघ… काँग्रेसचा विचार नसानसात पेरलेला असताना इथं शिवसेनेची एन्ट्री झाली… आणि औसा मतदारसंघ गांधीवादी विचारांकडून हिंदुत्ववादी विचारांकडे शिफ्ट झाला… कास्ट पॉलिटिक्सला इथं फार महत्व दिलं जाऊ लागलं… आणि यातूनच शिवसेनेचे दिनकर माने यांनी सलग दोन टर्म औसा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं… विलासराव देशमुख-शिवराज पाटील चाकूरकर या दोन काँग्रेस नेत्यांमधील अंतर्गत संघर्षामुळेच इथं शिवसेनेचे माने विजयी झाले होते… पण 2009 मध्ये बसवराज पाटील यांनी त्यांचा पराभव केला… 2014 मध्ये युती तुटल्यानंतर याठिकाणी भाजपने शेतकरी नेते पाशा पटेल यांना उमेदवारी दिली होती. पण त्यांचा निभाव लागू शकला नाही…. शिवसेनेचे माने दुसऱ्या क्रमांकावर राहिले… आणि पुन्हा एकदा काँग्रेसच्या बसवराज पाटील यांचा विजय सोप्पा झाला… बसवराज पाटील हे लिंगायत समाजाचे नेते… औसा मतदारसंघात लिंगायत मतदार मोठ्या संख्येने असल्याने त्यांना इथं उमेदवारी देण्यात आली होती. लिंगायत मतांच्या बळावरच पाटील यांनी 2009 आणि 2014 असं सलग दोन निवडणुकांमध्ये विजय मिळवला होता….

पण 2014 ला भाजपला थोड्याफार का प्रमाणात मिळालेल्या मतांचा रिस्पॉन्स पाहता इथं थोडासा जोर लावला तर आमदार निवडून आणायला स्कोप आहे, असा विचार कदाचित भाजप नेतृत्वाच्या मनात आला असावा… त्यात 2014 लाच राज्यात फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार आल्याने औश्यात भाजपला कशी एन्ट्री मिळेल? यासाठी स्वतः फडणवीसांनी डावपेच टाकायला सुरुवात केली… त्यातच त्यांना उत्तर सापडलं आणि ते म्हणजे अभिमन्यू पवार… फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून अभिमन्यू पवार त्यांचे स्वीय सहायक म्हणजेच पीए होते… पवारांची राजकीय आणि सामाजिक जडणघडण संघाच्या शाखेतच झाल्यामुळे आणि कुठलही काम चोख पार पाडण्याच्या अभिमन्यू पवारांच्या स्वभावामुळे त्यांच्यावरचा फडणवीसांचा विश्वास कणकणाने वाढत गेला… भविष्यातील व्हिजन डोळ्यांसमोर ठेवून पवार यांना दोन ते तीन वर्षांपासून औशात ऍक्टिव्ह ठेवलं… मतदारसंघातील अनेक विकास कामं पवारांनी मुख्यमंत्र्यांचा सपोर्ट असल्याने तडीस लावली… मिनिटा मिनिटाला माणूस जोडत औसामध्ये तगडा जनसंपर्क तयार केला… आणि जेव्हा 2019 ची शिवसेना-भाजप युतीची जागा वाटपाची चर्चा सुरू झाली… तेव्हा फडणवीसांनी अगदी हुशारीनं मेरिटच्या बेसिसवर ही जागा भाजपच्या वाट्याला खेचून आणली… अर्थात उमेदवार होते अभिमन्यू पवार…

काँग्रेसकडून बसवराज पाटील विरुद्ध भाजपच्या अभिमन्यू पवार यांच्यात अटीतटीचा सामना झाला… पण अखेर पवारांनी गुलाल उधळत औसा मतदारसंघात पहिल्यांदाच भाजपचा झेंडा फडकवत ठेवला… यानंतर औसा मतदारसंघात अनेक राजकीय उलथा पालथी झाल्या… माजी आमदार दिनकर माने शिवसेनेच्या फुटीत ठाकरेंसोबतच राहिले… तर काँग्रेसचे आमदार बसवराज पाटलांनी नुकताच भाजपात प्रवेश केल्यानं यंदा इथे भाजप विरुद्ध शिवसेना ठाकरे गट… अभिमन्यू पवार विरुद्ध दिनकर माने… कमळ विरुद्ध मशाल… अशी अटीतटीची लढत पाहायला मिळू शकते…

विद्यमान आमदार पवार साहेबांबद्दल बोलायचं झालं तर शेत शिवार रस्त्यांची केलेली कामं, विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात घेतलेला पुढाकार, बंद पडलेला किल्लारी सहकारी साखर कारखाना सुरू करणं, बाजार समितीवर वर्चस्व अशा अनेक गोष्टी येणाऱ्या विधानसभेला स्टॅंडिंग आमदारांना प्लसमध्ये ठेवणाऱ्या आहेत… त्यात बसवराज पाटील भाजपसोबत आल्यानं लिंगायत समाजाचा मोठा वोट शेअरही भाजपला यंदा मिळू शकतो… फक्त मराठा समाज इथे नेमकी कशी भूमिका घेईल? यावरही इथल्या आमदारकीची बरीचशी समीकरण ठरणार आहेत… अभिमन्यू पवार मराठा असल्यामुळे आणि तालुक्यातील लिंगायत समाजातील मोठं नाव बसवराज पाटील हे भाजपमध्ये आल्याने मराठा प्लस लिंगायत यांची मतदानाला होणारी गोळा बेरीज पाहता अभिमन्यू पवार यांचेच सध्या तरी आमदार होण्याचे चान्सेस जास्त दिसतायेत…

फक्त ठाकरे गटाच्या मशालीमुळे फडणवीसांचे अभिमन्यू चक्रव्ह्यूवात सापडण्याचा धोका जास्त आहे… माजी आमदार दिनकर माने हे ठाकरे गटात आहेत… त्यात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही औसा मतदारसंघातून मशालीला लीड मिळाल्यानं मानेंना पुन्हा एकदा आमदारकीची स्वप्न पडू लागली आहेत… त्यात ठाकरे गटाकडूनच संतोष सोमवंशी यांचं नावंही उमेदवारीसाठी चर्चेत आहे… पण सध्यातरी सगळ्याच शक्यतांचा विचार केला तरी अभिमन्यू पवार यांचंच नाणं विधानसभेला जोरदार वाजेल… असं राजकीय विश्लेषकांचंही म्हणणं आहे…बाकी औसा विधानसभा मतदारसंघातून आमदारकीचा गुलाल यंदा कुणाला लागतोय? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा…

Economic Survey 2024 : आर्थिक सर्वेक्षणानुसार कशी आहे देशाची परिस्थिती?? समोर आली मोठी माहिती

Economic Survey 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रातील मोदी सरकार २३ जुलै रोजी देशाचा अर्थसंकलप सादर करणार आहेत. तत्पूर्वी आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेच्या पटलावर आर्थिक सर्वेक्षण (Economic Survey 2024) सादर केले. या आर्थिक सर्वेक्षणात चालू आर्थिक वर्षात देशाचा विकासदर ६.५ ते ७ टक्क्यांपर्यंत असू शकतो, असे म्हटले आहे. जून महिन्यात RBI ने 7.2 टक्के वाढीचा अंदाज वर्तवला आहे. अशा परिस्थितीत सरकारने देशाच्या विकासाचा अंदाज आरबीआयपेक्षा कमी ठेवला आहे. या आर्थिक पाहणीत बॅंकाच्या घटत्या NPA, आणि पेट्रोल, डिझेलच्या किमती कमी करून सर्वसामान्याना दिलासा देण्याचा उल्लेख आहे.

आर्थिक सर्वेक्षणानुसार (Economic Survey 2024) देशाची महागाई नियंत्रणात असून अर्थव्यवस्था खूप चांगल्या स्थितीत आहे. या आर्थिक वर्षात बँकिंग आणि आर्थिक सेवांची कामगिरीही उत्तम राहिल्याचं या आर्थिक पाहणी अहवालात सांगण्यात आलंय. सेवा क्षेत्रात चांगली वाढ दिसून येईल. अशा परिस्थितीत नोकऱ्या निर्माण करण्यात कॉर्पोरेटची मोठी भूमिका दिसून येते. देशाला निर्यातीच्या बाबतीत थोडा फटका बसू शकतो. परंतु सरकार यासाठी सतर्क आहे. आर्थिक सर्वेक्षणानुसार, भारताच्या अर्थव्यवस्थेचा वेग आणखी वाढवण्यासाठी देशाच्या अर्थव्यवस्थेत कार्यशक्ती वाढवण्याची गरज आहे. त्यासाठी 2030 सालापर्यंत बिगर कृषी क्षेत्रात दरवर्षी सरासरी 78.5 लाख नोकऱ्यांची आवश्यकता असेल.

आर्थिक सर्वेक्षण म्हणजे काय? Economic Survey 2024

अर्थ मंत्रालयाचा इकोनॉमिक अफेयर्स विभागाअंतर्गत येणारे इकोनॉमिक डिव्हिजन आर्थिक सर्व्हे तयार करते. मुख्य आर्थिक सल्लागारांच्या देखरेखीखाली हा सर्व्हे तयार केला जातो. आर्थिक सर्व्हेमध्ये गेल्यावर्षीचा लेखाजोखा आणि येणाऱ्या वर्षात अर्थव्यवस्थेसाठी लागणाऱ्या सुचनांचा यात समावेश असतो. सरत्या आर्थिक वर्षात देशाची प्रगती कशी राहिली, कोणत्या क्षेत्रात देशाची वाटचाल कशी होती, याबाबतची माहिती आर्थिक सर्वेक्षणात असते. आर्थिक पाहणी अहवालाच्या मदतीनेच आगामी वर्षात सरकारने नेमकं कोणत्या क्षेत्रावर लक्ष देण्याची गरज आहे, याचा अंदाज बांधला जातो.