Sunday, December 21, 2025
Home Blog Page 5867

बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवण्यासाठी वापरली ‘ही’ पध्द्त जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन हे ट्विटरवर सर्वाधिक फॉलो केले जाणारे सेलिब्रिटी आहेत. अमिताभ ट्विटरवर नियमितपणे पोस्ट करत असतात.मात्र, इंस्टाग्रामवर अमिताभचे फॉलोवर्स इतर सेलिब्रिटींपेक्षा कमी आहेत. अशा परिस्थितीत अमिताभ बच्चन यांनी एक मजेदार पोस्ट शेअर केली आहे.

आपले एक जुने छायाचित्र पोस्ट करताना अमिताभ यांनी लिहिले – कोणीतरी मला सांगत होते की इतर सर्व तरुणांपेक्षा मला इंस्टावर मोठ्या संख्येने फॉलोअर्स का मिळत नाहीत .. .. ते म्हणाले “कारण तुम्ही बिकिनीतले छायाचित्र ठेवू शकत नाही” !!! आणि अचानक पॉप अप झालं .. ती बिकिनी नाही, हा माझ्या ‘महान’ चित्रपटातला सीन आहे ज्यात मी तिहेरी भूमिका साकारली होती… आणि आज हा सिनेमा रिलीज होऊन ३७ वर्षे झाली आहेत !!

 

इंस्टाग्रामवर अमिताभचे १५.८ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. त्याचवेळी ट्विटरवर ४१.६ दशलक्ष लोक अमिताभ यांना फॉलो करतात.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

चिंताजनक! देशात कोरोनाग्रस्तांची संख्या ३१ हजार ३३२ तर मृत्यूंनी गाठला हजाराचा टप्पा

नवी दिल्ली । लॉकडाउनचा कालावधी संपत आलेला असला तरी अद्यापही कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं नाही. भारतात गेल्या २४ तासात ७३ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३१ हजार ३३२ झाली आहे. सोबतच १८९७ नवे रुग्ण सापडले आहेत. तर मृतांची संख्या १००७ झाली आहे. आतापर्यंत ७६९५ जणांना उपचार करुन घरी सोडण्यात आलं आहे.

देशात कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत. मंगळवारी महाराष्ट्रात एका दिवसात ७२९ नवे रुग्ण सापडले. यानंतर महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ९ हजार ३१८ झाली आहे. केवळ मुंबईत करोनाग्रस्तांचा आकडा ५ हजार ९८२ वर पोहोचला आहे. मंगळवारी मुंबईत करोनाचे ३९३ नवे रुग्ण सापडले. तर मुंबईतील धारावी परिसरात ४२ नवे रुग्ण समोर आले आहेत. दरम्यान, १०६ रुग्णांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहितीही आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

अमेरिकेत १० लाखांहून अधिक जणांना करोनाची बाधा

वॉशिंग्टन । जगभरात करोनाच्या संसर्गाने थैमान घातले आहे. जगभरात करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. युरोपीयन देशांमध्ये करोनाबाधितांची संख्या वाढत असली तर मृतांच्या संख्येत स्थिरता असल्याचे चित्र आहे. तर, दुसरीकडे अमेरिकेतही करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. अमेरिकेत १० लाखांहून अधिक जणांना करोनाची बाधा झाली आहे.

जगभरातील अपडेट्स –
– करोनाच्या संसर्गामुळे अमेरिकेत ५९ हजारजणांचा मृत्यू
– अमेरिकेत करोनाबाधितांची संख्या १० लाखांहून अधिक झाली
– स्पेनमध्ये मृतांची संख्या २३ हजार ८२२ इतकी झाली
– स्पेनमध्ये दोन लाख ३२ हजार जणांना करोनाच्या संसर्गाची बाधा
– फ्रान्समध्ये करोनाच्या संसर्गाने २३ हजारहून अधिकजणांचा मृत्यू
– ब्रिटनमध्ये करोनामुळे २१ हजारजणांनी प्राण गमावले
– रशियात ९० हजारांहून अधिकजणांना करोनाचा संसर्ग

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ९३१८ वर, २४ तासांत ७२९ नवे रुग्ण

मुंबई | राज्यात आज दिवसभरात कोरोनाचे नवे ७२९ रुग्ण सापडले आहेत. यामुळे राज्यातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या ९३१८ वर पोहोचली आहे. यामध्ये सर्वाधित रुग्ण मुंबई मध्ये सापडले आहेत. यापैकी 1388 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

मंगळवारी दिवसभरात करोना बाधित ७२९ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, यामुळे राज्यातील एकूण रुग्णांचा आकडा ९ हजार ३१८ इतका झाला आहे. गेल्या २४ तासात करोना बाधित ३१ रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यात मुंबईतील २५ रुग्णांचा समावेश आहे. जळगावमध्ये चार तर पुणे शहरातील दोन रुग्ण दगावले आहेत. यामुळे राज्यातील करोना मृत्यूची संख्या ४०० इतकी झाली आहे.

मुंबईतील करोना बाधित रुग्णांची संख्या ६ हजार १६९ इतकी झाली असून, मुंबईतील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २४४ इतकी झाली आहे. आज दिवसभरात १०६ जणांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. आज मृत्यू झालेल्या ३१ जणांपैकी १६ पुरूष तर १५ महिला रुग्ण आहेत. पुण्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या १ हजार ०४४ झाली असून, पुण्यातील करोना बळींची एकूण संख्या ७६ इतकी असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रात्री उशिरा सांगितले.

सोलापुरातील कोरोना बाधितांची संख्या झाली 68, आज एकाचा मृत्यू

सोलापूर प्रतिनिधी | कोरोनाचे आज एकूण 58 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 55 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी दोन रुग्ण हे सारीचे असून एक रुग्ण हा कोरोणाचा होता. कोरोना असलेल्या रुग्णाचा आज सकाळी 11 वाजता मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर कोरोना बाधितांची संख्या 68 वर गेली आहे तर मृत्यू झालेल्यांची संख्या सहा इतकी झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

आज मृत्त् पावलेल्या व्यक्तीचे वय 76 वर्षे असून तो पुरुष आहे. आज मृत्यू झालेला इसम बापुजी नगर परिसरातील रहिवासी आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या दुसऱ्या दोन व्यक्तींमध्ये एक 32 वर्षीय महिला असून ती रेल्वे स्टेशन परिसरातील रहिवासी आहे. दुसरा 27 वर्षे पुरुष असून तो सिद्धेश्वर पेठ परिसरातील रहिवासी आहे. ते दोन्ही रुग्ण सारीचे म्हणून दाखल झाले आहेत.

कोरोनामुळे बाधित झालेल्या रुग्णांची संख्या 68 इतकी झाली आहे. त्यामध्ये पुरुष 52 तर 26 स्त्रियांचा समावेश आहे. कोरोनामुळे आज पर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये तीन पुरुष तर तीन स्त्रियांचा समावेश आहे.

सोलापूर कोरोना मीटर
होम कवारन टाईन – १९७३
इन्स्टिट्यूशन कोरंटाईन – ८७०
आयसोलेशन वॉर्ड – १४६९ अहवाल प्राप्त – ११३३
निगेटिव्ह – १०६५
पॉझिटिव्ह – ६८
अहवाल येणे बाकी – ३३६
मृत्यू – 6

राज्यातील राष्ट्रीय महामार्गासाठी २० हजार कोटी द्या; अशोक चव्हाणांची नितिन गडकरिंना मागणी

नांदेड | राज्यामध्ये राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. या महामार्गाच्या निर्मितीसाठी अनेक अडचणी येत आहेत, काही प्रश्न निर्माण झाले आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात यावी व त्यासोबतच राज्यातील राष्ट्रीय महामार्गाचे काम जलद गतीने होण्यासाठी २० हजार कोटी रूपयांचा निधी केंद्र सरकारने राज्यातील राष्ट्रीय महामार्गास द्यावा अशी मागणी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आज केली.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील विविध राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सचिव यांच्याशी दिल्ली येथून व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधला. महाराष्ट्राच्यावतीने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या चर्चेत सहभाग घेतला. यावेळी त्यांनी राज्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या रस्ते निर्मितीतील विविध अडचणी आणि येणाऱ्या समस्या या विषयी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांना अवगत केले.

राज्यामध्ये राष्ट्रीय महामार्गाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. परंतु अनेक ठेकेदार वेळेवर काम करीत नाहीत. त्यामुळे वाहतूक अडथळा निर्माण होत आहे. जे ठेकेदार विहित वेळेत काम करीत नाहीत अशांची कामे रद्द करावीत व त्यांना काळ्या यादीत टाकावे अशी मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी केली. राज्यातील राष्ट्रीय महामार्गाची कामे जलद गतीने होण्यासाठी व येणार्‍या समस्यांचे निराकरण करण्यासाठी विभागीय आयुक्त स्तरावर समितीचे गठण करण्यात यावे व त्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्गाच्या कामांना गती द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

महाराष्ट्रातील अंकलेश्वर- चोपडा- ब्राहणपूर -देवराई- शेवगांव- नेवासा- संगमनेर, कोल्हापूर- महाबळेश्वर- शिरूर, सागरी मार्ग-खोल – अलिबाग – रत्नागिरी – वेंगुर्ला – रेड्डी- गोवा या मार्गांना राष्ट्रीय महामार्गाची मान्यता देण्यात यावी अशी मागणी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केली आहे.

शारजामध्ये वाळूच्या वादळाच्या पार्श्वभूमीवर कोणती योजना आखलेली,याबाबत सचिनने केला खुलासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना या साथीच्या आजारामुळे सर्व खेळांचे काम थांबले आहे.ज्यामुळे सर्व खेळाडू घरीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत आहेत.या भागात बीसीसीआयने क्रिकेटचा देव असलेल्या सचिन तेंडुलकरचा एक व्हिडिओ पोस्ट केला आणि त्यास ‘लॉकडाउन डायरी’ असे नाव दिले.या व्हिडिओमध्ये सचिन तेंडुलकरने १९९८ मध्ये शारजा येथे खेळल्या गेलेल्या कोका-कोला कप मधील सामना आठवला आणि त्या सामन्यात सचिन तेंडुलकरने आलेल्या वादळाच्या दरम्यान फलंदाजी केली आणि संघासाठी १४३ धावांची वादळी शतकी खेळी केली.

या सामन्या संदर्भात बोलताना सचिन तेंडुलकरने स्टार स्पोर्ट्स शो ‘क्रिकेट कनेक्ट’ मध्ये सांगितले की,त्यावेळी आलेले वाळूचे वादळ मी पहिल्यांदाच पाहिले.ते येत आहे हे आम्ही सर्वांनी पाहिले.मी एक गमतीशीर विचार त्यावेळी माझ्या मनात आला की वादळ येत आहे, म्हणून मी अ‍ॅडम गिलख्रिस्टला पकडले पाहिजे जेणेकरुन आपण उडून जाऊ नये.मात्र नंतर पंचांनी सामना थांबविला. “

 

त्यानंतर सचिन पुढे म्हणाला, “जेव्हा आम्ही ड्रेसिंग रूममध्ये गेलो होतो तेव्हा आम्ही लक्ष्य काय असेल याचा विचार करत होतो.” पण सामन्यात केवळ ८ ते ९ धावाच कमी झाल्याने आम्ही सर्वजण किंचित निराश झालो.माझ्या मनात त्यावेळी फक्त एकच गोष्ट होती की आम्हाला हा सामना जिंकून पुढे जाऊन अंतिम सामन्यात खेळावे. ”

OTD: Sachin Tendulkar's Desert Storm knock vs Australia - Sportstar

या सामन्यात टीम इंडिया जिंकू शकली नाही परंतु चांगल्या रनरेटमुळे त्यांनी ऑस्ट्रेलियाबरोबर अंतिम फेरी गाठली. न्यूझीलंड या तिरंगी मालिकेत बाद झाला. त्यानंतर, सचिनने अंतिम सामन्यात भारतासाठी १२१ चेंडूंत १३४ धावांची सर्वोत्तम खेळी करून हा सामना भारताला जिंकून दिला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

शेन वॉर्न बरोबर झालेला सामना मी कधीही विसरू शकत नाही- सचिन तेंडुलकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने या खेळामध्ये जवळपास २४ वर्षांचा कालावधी घालवला.आपल्या या प्रदीर्घ कारकीर्दीत त्याने ग्लेन मॅकग्रा, शेन वॉर्न, मुरलीधरन यासारख्या मोठ्या गोलंदाजांचा सामना केला.पण सचिन तेंडुलकर म्हणतो की वॉर्नबरोबरचा त्याचा सामना तो कधीच विसरू शकत नाही.

अलीकडेच बीसीसीआयने सचिन तेंडुलकरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यात सचिनने वॉर्नबरोबरच्या त्याच्या चकमकींबद्दल भाष्य केले आहे.सचिन म्हणाला, “वॉर्नशी झालेला माझा सामना मी कधीच विसरू शकत नाही. त्याची सुरुवात १९९८ मध्ये झाली होती आणि त्यावेळी मी वॉर्नला राउंड द विकेट खेळण्याचा सराव केला होता. कारण त्यावेळी कोणीही त्याबाजूने त्याच्यावर हल्ला चढविला नव्हता.जर एखादा फलंदाज खराब चेंडूची वाट पाहत असेल तर गोलंदाज फक्त त्याच्याकडे डॉट बॉल टाकण्याचा प्रयत्न करेल, परंतु वॉर्न विकेट घेण्यासाठी गोलंदाजी करीत असे. हे त्याचे सर्वात मोठे शस्त्र होते. “

तेंडुलकर पुढे म्हणाला की, “मला आठवते मुंबईतल्या सराव सामन्यात मी दुहेरी शतक झळकावले होते आणि त्यावेळी वॉर्नने एकही बॉल राउंड द विकेटने टाकलेला नव्हता. मग मी म्हणालो की जेव्हा तो राउंड द विकेट येईल तेव्हा ते सर्वात कठीण जाईल. दुसऱ्या डावात वॉर्नने राउंड द विकेट गोलंदाजी केली. मी त्याच्यासाठी खूपच सराव केला होता कारण आपण वेळ आल्यावर पाहून घेऊ असा विचार करून तुम्ही वर्ल्ड क्लास गोलंदाजासमोर जाऊ शकत नाही. माझ्या डोक्यात त्याला खेळण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध होते ज्याचा मी सराव केलेला होता.

How is that no out! Shane Warne still upset over this delivery to ...

उल्लेखनीय म्हणजे वॉर्नने सर्व फॉर्मेटमध्ये सचिनला केवळ चारच वेळा (कसोटीत तीन वेळा आणि वनडेमध्ये एकदा) बाद केले आहे.या दरम्यान सचिनची सरासरी ५४.२५ इतकी होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

३ मे रोजी मोदीजी काय सांगणार? बजरंगी भाईजान मधील मुन्नी म्हणते …

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बजरंगी भाईजान या चित्रपटातून सलमानसोबत काम केल्याने चर्चेत आलेल्या मुन्नीने पंतप्रधान मोदींची मिमिक्री केल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेयर केला आहे. यात मोदी ३ मी ला काय म्हणतील यावर तिने भाष्य केलाय.

हर्षाली मल्होत्रा सध्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. ती सतत सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच तिचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ती ‘मोदीजी 3 को कहेंगे कि 0 लगाना भूल गया’ असे बोलताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये ती ‘३ मे रोजी मोदीजी पुन्हा येतील. बोलतील मित्रांनो मी ० लावायला विसरलो. लॉकडाउन ३० मे पर्यंत आहे’ असे बोलताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

https://www.instagram.com/p/B_e_OfAFv1r/?utm_source=ig_web_copy_link

‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटात हर्षालीने पाकिस्तानी मुलगी मुन्नीची भूमिका साकारली होती. ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटात झळकण्यापूर्वी हर्षालीने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. ती ‘कुबूल है’, ‘लौट आओ तृषा’ आणि ‘सावधान इंडिया’ या मालिकेत दिसली होती. हर्षाली सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर अॅक्टिव्ह असते. इन्स्टाग्रामवर तिच्या फॉलोअर्सची संख्या एखाद्या बड्या स्टारप्रमाणेच आहेत.

परग्रहवासी खरंच पृथ्वीवर आले होते का? अमेरिकेच्या नौदलाने प्रसारित केले UFO चे ३ व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेच्या पेंटागॉनने आकाशात यूएफओ दर्शविणारे काही व्हिडिओ अधिकृतपणे जाहीर केले आहेत.हे व्हिडिओ समोर आल्यानंतर संपूर्ण जग हादरून गेले आहे. असे तीन व्हिडिओ यूएस नेव्हीच्या वैमानिकांनी रिलीज केले आहेत,ज्यामध्ये अज्ञात विमान दाखविण्यात आले आहे.

प्रसिद्ध केले गेलेले हे व्हिडिओ व्हिडिओ व सेन्सर तंत्रज्ञानाद्वारे २००४ आणि २०१५ मध्ये प्रशिक्षण उड्डाणां दरम्यान वैमानिकांनी आकाशात शूट केले.नंतर हे यूएस नेव्हीने अधिकृतपणे स्वीकारले.यातील दोन व्हिडिओ क्लिप पहिल्यांदा न्यूयॉर्क टाइम्समध्ये २०१७ मध्ये आणि तिसरी क्लिप २०१८ मध्ये द स्टार्स अ‍ॅकॅडमीमध्ये सापडली. संरक्षण खात्याने हे तीन अज्ञात व्हिडिओ रीलिज करण्यासाठी नौदलाला अधिकृत केले होते.

संरक्षण विभागाचे प्रवक्ते सुसान गफ म्हणाले की, यातील एक व्हिडिओ नोव्हेंबर २००४ मध्ये घेण्यात आला होता, तर दुसरा जानेवारी २०१५ मध्ये मिळविण्यात यश आले होते.हे व्हिडिओ २००७ ते २०१७ दरम्यान लोकांसाठी अनधिकृतपणे उपलब्ध होते.

https://youtu.be/XX66Qj4zNDI

यामधील एका व्हिडिओमध्ये, लहान बुलेटच्या आकाराचे काहीतरी दिसले आहे, जे काही काळ हवेमध्ये फिरत राहते.यानंतर, ते एका वेगाने एका दिशेने निघून जाते.दुसर्‍या व्हिडिओमध्ये, त्याचे निरीक्षण करणाऱ्या विमानाचे सेन्सर्स हवेत उडणाऱ्या त्या अज्ञात विमानांवर लक्ष देऊन आहेत.व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर,विमानाचा पायलट त्याचा वेग पाहून आश्चर्यचकित झाला आणि त्याने विचारले कि आपण काय पाहिले ? तिसर्‍या व्हिडिओमध्ये,एक अंडाकृती थांबण्यापूर्वी त्याच वेगाने उडत आहे.यानंतर, ते एकाच ठिकाणी गोल आणि गोल फिरते.

या व्हिडिओबद्दल सोमवारी एका निवेदनात असे सांगण्यात आले आहे की,त्यांचा संपूर्ण ‘आढावा’ घेतल्यानंतरच त्यांनारिलीज करण्यात आले आहे. यापूर्वीच्या तपासणीत असा निर्णय घेण्यात आला आहे की ‘या अज्ञात व अवर्गीकृत व्हिडिओवरून कोणतीही संवेदनशील माहिती किंवा तंत्रज्ञानाची माहिती घेण्यात आलेली नाहीये.’

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.