Sunday, December 21, 2025
Home Blog Page 5866

लोकडाउन मध्ये बोअर झालायत? घरच्या घरी असा बनवा खव्याचा गोड पराठा

sweet paratha
sweet paratha

Hello Recipe| गोड पदार्थ म्हणले की आपल्या तोंडाला पाणी सुटते. त्यात तो पदार्थ दुधाचा असल्यास तर मग बोलायला नको. असाच एक पदार्थ आम्ही तुमच्यासाठी घेवून आलो आहोत.

खव्याचा गोड पराठा करण्याचे साहित्य
१.पेढा – १०० ग्रॅम
२.तांदूळ पीठ – अर्धी वाटी
३.साजूक तूप – ६ चमचे
४.खजूर, अक्रोड, पिस्त्याचे तुकडे
५.साखर – २ चमचे
६.दुधाची पावडर आणि मैदा प्रत्येकी अर्धा वाटी.

कृती –

पेढा, साखर, तूप, खजूर, अक्रोड पिस्त्याचे तुकडे एकत्र करून मिक्सर वर जाडसर वाटून घ्यावे. दुसरीकडे एका भांड्यात दुधाची पावडर, मैदा, तांदळाचे पीठ एकत्र करून पराठयासाठी मळून घ्यावे. मिक्सर मध्ये वाटलेले सारण मळलेल्या पिठात घालून पोळपाटावर लाटून घ्यावे गरम तव्यावर पराठा भाजून घ्यावा पराठा भाजत आल्यावर त्याला तूप लावा आणि गरम गरम पराठ्याचा आस्वाद घ्या.

हि रेसिपी चाखून झाल्यावर प्रतिक्रिया कळवायला विसरु नका बरं का, अशाच हटके पाककृती जाणून घेण्यासाठी तुमच्या हक्काच्या www. hellomaharashtra.com या ठिकाणाला भेट द्या.

इरफान खानच्या अकाली निधनावर लता दीदी, सचिन, बिग बी शोकाकुल, म्हणाले..

मुंबई । आपल्या कसदार अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारा अभिनेता इरफान खानचे बुधवारी निधन झाले. मंगळवारी कोलन इन्फेक्शनमुळे त्यांना इस्पितळात भरती करण्यात आलं होतं. यादरम्यान त्यांच्या आरोग्याविषयीच्या अनेक अफवा पसरत होत्या. मात्र इरफान यांच्या टीमने ते लढवय्ये असून लवकर बरे होतील अशी आशा व्यक्त केली होती. मात्र रुपेरी पडद्यावरून असंख्य प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या या कलाकारानं आज जगातून कायमची एक्झिट घेतली. इरफान खानच्या अकाली जगातून निघून जाण्यानं त्याच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. या चाहत्यांमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, बिग बी अमिताभ बच्चन, आणि गान सम्राग्नि लता मंगेशकर यांनी तीव्र शोक व्यक्त केला. ट्विटरच्या माध्यमातून या सर्वानी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सचिन आपल्या ट्विटमध्ये म्हणाला कि, ”इरफान खान यांचे निधन झाल्याची बातमी ऐकून वाईट वाटले. तो माझ्या सर्वात आवडत्या अभिनेत्यानंपैकी एक होता आणि मी त्याचे जवळजवळ सर्व चित्रपट पाहिले आहेत, त्याचा शेवटचा चित्रपट अंग्रेजी मिडीयम सुद्धा मी पाहिला. तो फारच सहजपणे अभिनय करायचा, तो अफलातून होता. त्याच्या आत्म्याला शांती लाभो! त्याच्या प्रिय व्यक्तीबद्दल संवेदना!”

बॉलीवूडचे शहंशाह बिग बी अमिताभ बच्चन यांनी इरफानच्या निधनावर संवेदना व्यक्त केल्या. आपल्या ट्विटमध्ये अमिताभ बच्चन म्हणतात कि,” ”नुकतीच इरफान खानच्या निधनाची बातमी ऐकली, ही सर्वात त्रासदायक आणि दुखद बातमी आहे. एक अविश्वसनीय प्रतिभा असलेला, एक कृपाळू सहकारी, जागतिक सिनेमात एक महत्त्वपूर्ण योगदान देणारा हा कलाकार आम्हाला लवकर सोडून गेला. त्याच्या जाण्याने एक प्रचंड मोठी पोकळी तयार झाली आहे.”

गान कोकिळा लता मंगेशकर यांनी सुद्धा इरफानच्या जाण्यावर तीव्र शोक व्यक्त केला. त्यानी ट्विट करत म्हटलं कि,” गुणी अभिनेता इरफान खान यांच्या निधनाची बातमी ऐकून मला खूप दुःख झालं आहे. मी त्यांना विनम्र शब्दांजली अर्पण करते.”

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

SBI देतेय ४५ मिनिटांत स्वस्तात कर्ज, ६ महिने EMI भरण्याची गरज नाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाउन दरम्यान अशी शक्यता आहे की आपल्याला पैशाची आवश्यकता भासेल.ही गोष्टी लक्षात घेऊन स्टेट बँक ऑफ इंडियाने आता तुमच्यासाठी आपत्कालीन कर्ज सुरू केले आहे.यासाठी या लॉकडाउन दरम्यान आपल्याला घराबाहेर पडण्याची देखील आवश्यकता नाही. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आपल्याला फक्त ४५ मिनिटांत हे कर्ज मिळेल.

६ महिने ईएमआय देण्याची गरज नाही
स्टेट बँक ऑफ इंडियाने केवळ वेतन कपात आणि व्यवसायावर होणाऱ्या परिणामांमुळे ग्राहकांसाठी हे कर्ज सुरु केले आहे. हे आपत्कालीन कर्ज केवळ एसबीआय ग्राहकांसाठीच आहे. कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना पुढील ६ महिन्यांसाठी हप्ते देण्याची गरजही नसल्याचे बँकेने म्हटले आहे.यासाठीचा ईएमआय हा ६ महिन्यांनंतर सुरू होईल.

सर्वात स्वस्त कर्ज
एसबीआयने हे नवीन कर्ज फक्त आपल्या बँक ग्राहकांसाठीच सुरु केले आहे. या वैयक्तिक कर्जासाठी ग्राहकांना फक्त १०.५० टक्केच व्याज द्यावे लागेल.जे देशातील इतर कोणत्याही बँकेच्या व्याजापेक्षा खूपच स्वस्त आहे.

अर्ज कसा करावा
ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत क्रमांकावरून ५६७६७६ वर पीएपीएल <खाते क्रमांकाचे शेवटचे ४ अंक> पाठवावे लागतील.आपण कर्जासाठी पात्र आहात की नाही हे आपल्याला मेसेजमध्ये सांगितले जाईल.

पात्र ग्राहकांना चार प्रक्रियांमध्ये कर्ज मिळेल
– अ‍ॅपमधील Avail Now वर क्लिक करा
– नंतर कालावधी आणि रक्कम निवडा
– रजिस्टर्ड नंबरवर ओटीपी येईल. पैसे टाकताच आपल्या खात्यात पैसे जमा होईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

सातारा जिल्हा रुग्णालयातील महिला कर्मचार्‍याला कोरोनाची लागण

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ९ हजार पार गेली असून कोरोना विषाणुने आता राज्यातील ग्रामिण भागांतही पाय पसरायला सुरवात केली आहे. सातारा जिल्हा रुग्णालयातील एका महिला कर्मचार्‍याला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून यामुळे आता जिल्ह्यातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या ४२ वर पोहोचली आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक आमोद गडीकर यांनी दिली आहे.

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे एक कोरोना बाधित रुग्ण सापडला असून सदर रुग्ण जिल्हा रुग्णालयातील महिला कर्मचारी असल्याची माहिती आहे. यामुळे आता सातारा शहरातही कोरोनाचा शिरकाव झाला असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, मंगळवारी कराड तालुक्यात पाच आणि फलटण येथे एक कोरोना बाधित रुग्ण सापडले होते. जिल्ह्यातील कराड, जावळी, पाटण हे भाग मागील काही दिवसांपासून खबरदारी म्हणुन संपुर्ण सील करण्यात आले आहेत. तसेच रविवारी कराड येथे एका परिचारिकेचा मेदूला आॅक्सिजनचा पुरवठा कमी झाल्याने मृत्यू झाला होता. आता जिल्हा रुग्णालयातील महिला कर्मचारीच कोरोना पोझिटिव्ह आढळल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.

इरफानचे ‘ते’ शेवटचे ट्विट..मनाला चटका लावून जाणारे

मुंबई । आपल्या कसदार अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारा अभिनेता इरफान खानचे बुधवारी निधन झाले. मंगळवारी कोलन इन्फेक्शनमुळे त्यांना इस्पितळात भरती करण्यात आलं होतं. यादरम्यान त्यांच्या आरोग्याविषयीच्या अनेक अफवा पसरत होत्या. मात्र इरफान यांच्या टीमने ते लढवय्ये असून लवकर बरे होतील अशी आशा व्यक्त केली होती. मात्र रुपेरी पडद्यावरून प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या या कलाकारानं आज जगातून कायमची एक्झिट घेतली. अंग्रेजी मीडियम हा सिनेमा त्याचा शेवटचा सिनेमा ठरला. कॅन्सर सारख्या आजारावर मात करुन इरफान खानने अंग्रेजी मीडियम या सिनेमाचं शुटींग पूर्ण केलं होतं. काही दिवसांपूर्वीच हा सिनेमा हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आला होता.

आईविना मुलीचा सांभाळ करणाऱ्या एका मध्यमवर्गीय बापाची भूमिका इरफानने या सिनेमात केली आहे. अंग्रेजी मीडियम या सिनेमात चंपक नावाची भूमिका साकारणाऱ्या इरफानने या सिनेमातील चंपकचा एक भावुक पण मजेशीर एक डायलॉग ट्विट करत आपल्या सर्व चाहत्यांना हा सिनेमा पाहण्याची विनंती केली होती. या चंपकचा हाच डायलॉग आज इरफानच्या जाण्याने मनाला चटका लावून जात आहे.

इरफानने केलेले शेवटचे हेच ते शेवटचे ट्विट..

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

सचिनला आठवले कसोटी क्रिकेटमधील आपले’सर्वोत्कृष्ट सत्र’, स्टेन आणि मॉर्केलने कसे सतावले?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना साथीच्या आजारामुळे सर्व खेळांचे काम सध्या थांबले आहे. ज्यामुळे सर्व खेळाडू घरीच राहून सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत आहेत.या मालिकेत क्रिकेटचा देव म्हणवल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर याचे नावही जोडले गेले आहे. त्याचा एक व्हिडिओ बीसीसीआयने नुकताच पोस्ट केला असून त्यास ‘लॉकडाउन डायरी’ असे नाव दिले आहे.या व्हिडिओमध्ये सचिन तेंडुलकरने ग्लेन मॅकग्रा, डेल स्टेन आणि मॉर्ने मॉर्केल या गोलंदाजांसह कसोटी क्रिकेटमधील बेस्ट सेशन बद्दल सांगितले आहे.

स्टार स्पोर्ट्स शो क्रिकेट कनेक्टेड मध्ये सचिनने १९९९ मध्ये अ‍ॅडलेड येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्याबद्दल ग्लेन मॅकग्राबद्दल एक मनोरंजक खुलासा केला. सचिन म्हणाला, “१९९९ अ‍ॅडलेड येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या शेवटच्या सत्रात फलंदाजी करीत होतो आणि दिवसाचा अवघ्या ४० मिनिटांचा खेळ बाकी होता आणि ग्लेन मॅकग्रा गोलंदाजीला आला तेव्हा त्याने पाच किंवा सहा षटके निर्धाव टाकली.त्याची रणनीती मला निराश करणारी होती पण संयम वापरुन मी बाहेर जाणाऱ्या ७०% चेंडूंना फटके मारले नाही. “

यानंतर सचिन पुढे म्हणाला, “दुसर्‍या दिवशी एक नवीन सुरुवात होती. त्यावेळी मॅकग्राच्या षटकात मी दोन ते तीन चौकार ठोकले तेव्हा मी आणि मॅकग्रा समान पातळीवर होतो. अशाप्रकारे मी माझा संयम पाळत मॅकग्राचा सामना केला. “

यानंतर सचिनने आपल्या कारकीर्दीतील दुसर्‍या सर्वोत्कृष्ट घटनेविषयी सांगितले, जेव्हा टीम इंडियाने २०१०-११ मध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. त्यावेळी डेल स्टेन आणि मॉर्ने मॉर्केल हे त्यांच्या संघातील दोन वेगवान गोलंदाज होते. केपटाऊन कसोटीबद्दल सचिन म्हणाला, “मी आणि गौतम केपटाऊनमध्ये गंभीरपणे फलंदाजी करीत होतो.स्टेन आणि मॉर्केल गोलंदाजी करत होते. त्यावेळी आम्ही सुमारे ५८ मिनिटे स्ट्राइक रोटेट करण्यात अपयशी ठरत होतो. एकतर आम्ही चौकार मारत होतो किंवा दोन धावा घेत होतो. “

 

सचिन पुढे म्हणाला, “त्यांचे क्षेत्ररक्षण खूपच आक्रमक होते.ते एकही बॉल अशा प्रकारे टाकत नव्हते की आम्ही चेंडू फाइन लेगच्या दिशेने टोलवून सिंगल घेऊ.यामुळे आम्ही चौकार मारत होतो किंवा दोन धावा घेत होतो.अशाप्रकारे,आम्ही या कसोटी सामन्यात खडतर वेळ घालविला आणि चांगली भागीदारी रचली.अशाप्रकारे,हे कसोटी क्रिकेटमधील माझ्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट सत्र आहे, जे मी विसरू शकत नाही. “

या सामन्यात सचिनने १४६ धावा केल्या तर गौतम गंभीरचे शतक थोडक्यात हुकले आणि या सामन्यासह दक्षिण आफ्रिकेविरूद्धची मालिकाही १-१ अशी बरोबरीत सुटली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘व्हाइट हाउस’ने केलं अनफॉलो

वॉशिंग्टन । अमेरिका राष्ट्रपती कार्यालयाचे अधिकृत ट्विटर हॅण्डल असणाऱ्या ‘द व्हाइट हाउस’ने पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्विटरवर अनफॉलो केले आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींसह सहा भारतीय ट्विटर हॅण्डलला व्हाइट हाउसने फॉलो केले होते. कमालीची बाब म्हणजे कोरोनाच्या विरोधात लढाईत अमेरिकेला हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधांची मदत दिल्यानंतर व्हाइट हाउसने त्यांना फॉलो करण्यास सुरुवात केली होती. व्हाइट हाउसने पंतप्रधान मोदी, पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रपती भवनासहित सहा ट्विटर हॅण्डलला अनफॉलो केले आहे.

याआधी व्हाइट हाउसच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून पंतप्रधान मोदींनी फॉलो करण्यात येत होते. पंतप्रधान मोदी हे जगातील एकमेव नेते होते. मोजक्याच जणांना ट्विटरवर फॉलो करणारे व्हाइट हाउसने पंतप्रधान मोदींना फॉलो करण्यास सुरुवात केल्यांनतर भारत आणि अमेरिकेचे संबंध आणखी दृढ होण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल पडल्याचं बोललं जात होत. मात्र, पंतप्रधान मोदींना व्हाइट हाउसने अचानकपणे अनफॉलो का केले, याबाबत कोणतीही माहिती अजून तरी समोर आली नाही. दरम्यान, अचानकपणे ट्विटरवर व्हाइट हाउसने पंतप्रधान मोदींसह सहा भारतीय ट्विटर हॅण्डलला अनफॉलो केल्यामुळे चर्चा सुरू झाली आहे.

याआधी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधांचा पुरवठा केल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले होते. त्यानंतर व्हाइट हाउसच्या ट्विटर हॅण्डलने पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती कार्यालयाला फॉलो करण्यास सुरुवात केली होती. सध्या व्हाइट हाउस १३ जणांना ट्विटरवर फॉलो करत असून हे सर्वजण अमेरिकन सरकारमधील महत्त्वाच्या व्यक्ती आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

‘गँगस्टर’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार्‍या कंगनाने बॉलिवूडमध्ये पूर्ण केली १४ वर्षे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने नुकतेच बॉलिवूडमध्ये आपली १४ वर्षे पूर्ण केली आहेत.तिने १४ वर्षांपूर्वी अनुराग बासूच्या गँगस्टर या चित्रपटातून सिने जगतात प्रवेश केला होता. सिंगापूरला पहिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार घ्यायला जाण्यासाठी तिच्याकडे पैसे नव्हते हे आठवून कंगना नॉस्टॅल्जियात हरवली होती.पहिल्या चित्रपटाची १४ वर्षे पूर्ण झाल्यावर कंगनाने खुलासा केला की तिला या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता पण पुरस्कार घेण्यासाठी सिंगापूरला जाण्यासाठीही तिच्याकडे पैसे नव्हते आणि त्यानंतर एका मित्राने तिच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला.

ती म्हणालली, “मला नामांकित केले गेले हे मला माहित नव्हते. जेव्हा टीम या कार्यक्रमासाठी जात होती तेव्हा त्यांनी माझ्या प्रवासाच्या योजनेबद्दल विचारले. मला सिंगापूरला कसे जायचे, कुठे राहायचे आणि तेदेखील माहित नव्हते तिकिटांच्या किंमतीबद्दल माझ्या कर्मचाऱ्यांस विचारण्यासही मला लाज वाटली. “

ते म्हणाले, “जेव्हा मी हा पुरस्कार जिंकला तेव्हा ‘गँगस्टर’ आणि ‘क्वीन’ डीओपी बॉबी सिंग जो आता या जगात नाही, त्याने मला फोनवर सांगितले की तो माझी ट्रॉफी घेत आहे आणि मी खूप उत्साही होते आणि तो माझ्या आयुष्यातील एक सर्वोत्तम क्षण होता. “

Kangana set to star in 'one of a kind' female-led action movie ...

कंगना आता ‘थलायवी’, ‘धाकड’ आणि ‘तेजस’ सारख्या चित्रपटात दिसणार आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

अभिनेता इरफान खान यांचे निधन

मुंबई । बॉलिवूड अभिनेता इरफान खान यांचं वयाच्या ५४ व्या वर्षी निधन झालं. मंगळवारी कोलन इन्फेक्शनमुळे त्यांना इस्पितळात भरती करण्यात आलं होतं. यादरम्यान त्यांच्या आरोग्याविषयीच्या अनेक अफवा पसरत होत्या. मात्र इरफान यांच्या टीमने ते लढवय्ये असून लवकर बरे होतील अशी आशा व्यक्त केली होती. मात्र बुधवारी दिग्दर्शक शूजित सरकारने इरफान यांच्या निधनाचं ट्वीट करत खान कुटुंबियांचं सांत्वन केलं.

जबर इच्छाशक्तीच्या जोरावर कॅन्सरवर मात केल्यानंतर तो भारतात परतला होता. लंडनमधील रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले होते. सप्टेंबर २०१९ मध्ये इरफान खान उपचारानंतर पुन्हा भारतात परतला होता. दोन दिवसांपूर्वी त्याची आई सईदा बेगम यांचं निधन झालं. लॉकडाउनमुळे इरफान आईला शेवटचं पाहायलाही जाऊ शकला नाही. आईचं अंत्यदर्शनही त्याला व्हिडिओ कॉलद्वारे घ्यावं लागलं होतं. आईला शेवटचं पाहता आलं नाही ही सल त्याच्या मनात होती.

इरफान खानने मार्च २०१८ मध्ये कॅन्सर झाल्याचं जाहीर केलं होतं. यानंतर त्याने सर्व कामं थांबवली होती आणि उपचारासाठी लंडनला निघून गेला होता. २०१९ मध्ये परतल्यानंतर त्याने ‘अंग्रेजी मीडियम’ चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं होतं. चित्रपटातील अभिनयासाठी इरफान खानचं कौतुक करण्यात आलं होतं. सोबतच पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पदार्पण केल्याबद्दल आनंदही व्यक्त केला होता. १३ मार्च २०२० रोजी अंग्रेजी मीडियम चित्रपट रिलीज होणार होता. मात्र लॉकडाउनमुळे ६ एप्रिल रोजी डिजीटल प्लॅटफॉर्मवर चित्रपट रिलीज करण्यात आला. ‘अंग्रेजी मीडियम’ हा त्याचा शेवटचा चित्रपट ठरला.

जवळपास ३० वर्षांच्या करिअरमध्ये इरफानने ५० हून अधिक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं. बॉलिवूडसोबतच त्याने हॉलिवूडमध्येही छाप सोडली. कलाक्षेत्रातील अभूतपूर्व कामगिरीसाठी २०११ मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन त्याचा गौरव करण्यात आला होता. मकबूल,  ‘लाइफ इन अ मेट्रो’, ‘पानसिंग तोमर’, ‘द लंचबॉक्स’, ‘हैदर’, ‘गुंडे’, ‘पिकू’, ‘तलवार’, ‘हिंदी मीडियम’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या होत्या.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

पुलवामा शहीदाची वीरपत्नी कोरोनाच्या लढाईत पोलिसांच्या मदतीला

नवी दिल्ली । देशावर कोरोनाचे अभूतपूर्व असं संकट आलं आहे. संपूर्ण देशात कोरोनाच्या संसर्गाने थैमान घातलं आहे. अशा वेळी संपूर्ण देश या कोरोनाशी लढत आहे. या लढाईत सर्वात आघाडीवर असलेले कोरोना योद्धे आपला जीव धोक्यात घालून या संकटाला रोखण्याचा प्रयन्त करत आहेत. यामध्ये डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस, सुरक्षा यंत्रणेतील व्यक्ती, सफाई कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या योद्ध्यांचे सर्व स्तरातून कौतुक होताना दिसत आहे. असं असतानाच अनेकजण या कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी अनेकांनी मदतीचे हात पुढे केले आहेत.

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेले मेजर विभूति ढौंडियाल यांची पत्नी निकिता कौल यांनाही कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मदतीला धावून आल्या आहेत. निकिता यांनी करोनाविरुद्धच्या लढ्यात उतरलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी १ हजार पीपीई (पर्सनल प्रोटेक्टीव्ह इक्विपमेंट्स) कीट्स दिले आहेत. निकिता यांनी हरीयाणा पोलिसांना ही मदत केली आहे. पीपीई कीट्समध्ये मास्क, ग्लोव्हज आणि इतर प्रतिबंधात्मक साहित्याचा समावेश होतो. या कीट्सचा फायदा हरयाणा पोलिसांना होणार होणार आहे.

यासंदर्भात फरिदाबाद पोलिसांनी ट्विटही केले आहे. पोलिसांनी आपल्या ट्विटमध्ये, “पुलवामा हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या मेजर विभूती ढौंडियाल यांच्या पत्नी निकिता कौल यांनी फरिदाबाद पोलिसांना एक हजार पीपीई कीट्स दिले आहेत. आम्ही यासाठी त्यांचे आभार मानतो,” असं म्हटलं आहे.

याचबरोबर हरीयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनाही ट्विटवरुन कौल यांच्या योगदानाचे कौतुक केलं आहे. “देशासाठी प्राण देणाऱ्या मेजर विभूती ढौंडियाल यांची पत्नी निकिता कौल यांनी करोनाविरुद्ध लढणाऱ्या हरयाणा पोलिसांच्या कर्मचाऱ्यांना एक हजार पीपीई कीट्स (मास्क, ग्लोव्हज, गॉगल) दिले आहेत. यासाठी मी त्यांचे आभार मानतो. तुमचे योगदान बहुमूल्य आहे,” असं खट्टर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”