Sunday, December 21, 2025
Home Blog Page 5869

जाणुन घ्या जगप्रसिद्ध कंपन्याचे सीईओ मानसिक तणाव कसे हाताळतात

Worlds Top Company CEO
Worlds Top Company CEO

HelloHealth| दिवसभराच्या धकाधकीतून आपण सगळेच मानसिक ताणाला बळी पडतो. सुरुवातीस हा ताण एखाद्या चिमटीसारखा वाटतो परंतु कालांतराने याच तणावामुळे संपुर्ण शरीराची लाहीलाही होते. परिणामी, तुमचे स्वास्थ्य ढासळते, आनंद नाहिसा होतो. हा ताण कोणालाच नाही चुकला. जगप्रसिद्ध अब्जाधिशही याच तणावाला तोंड देतात. फक्त त्यांची यास सामोरे जाण्याची पद्धत निराळी असते. हे एवढेच कारण आहे त्यांच्या अद्वितीय यशाचे.

पाहुया तर जगातील या व्यक्ती मानसिक तणाव कसा हाताळतात ते.

१. शेरील सँडबर्ग

फेसबुकच्या सीईओ शेरील सँडबर्ग यांना रोज नवनवीन आव्हानांना सामोरे जावे लागते. एवढ्या मोठ्या कंपनीचा डोलारा सांभाळायचा म्हणजे ताण तर येणारच. म्हणून त्या रात्री झोपताना फोन बंद करुन झोपतात. जेणेकरुन त्यांना वारंवार ई-मेल आणि मेसेजस पाहण्यासाठी रात्री अपरात्री उठावे लागणार नाही.

२. जॅक डॉर्सी

ट्विटरचे सीईओ जॅक डॉर्सी सांगतात, ‘सहसा ताण अनपेक्षित घटनांतून निर्माण होतो. दिनक्रमातील कामांमध्ये जितके सातत्य असेल तितका तणाव कमी होतो.’ ते आपल्या दिवसाची आखणी आधीच तयार करुन ठेवतात. म्हणजे अवेळी येणाऱ्या अडथळ्यांमुळे चिडचिड होत नाही..

३. सुझॅन वॉचिस्की

व्यस्त दिनक्रमामुळे उद्योजकांकडे स्वतःसाठी वेळ काढणे कठीण होते. परंतु, युट्युबच्या सीईओ सुझॅन वॉचिस्की दिवसभरातला ताण दूर करण्यासाठी स्वतःसाठी वेळ राखून ठेवतात. यातून त्यांना फक्त मनःशांतीच नाही तर बऱ्याच प्रश्नांचा उलगडाही होतो.

४. टिम कूक

अॅपलचे सीईओ टिम कूक यांना समीक्षक जगातील सर्वात मोठी डोकेदुखी वाटते. आजकाल प्रत्येकजण आपले मत, विचार आणि समीक्षण समोरच्यावर लादत असतो. अशी बिनबुडाची बोलणी वेळीच दुर्लक्षित करावी नाहीतर ती आपल्या मेंदूत कॅन्सरसारखी जखडून बसतात. याने तुम्हाला भोवतालच्या नकारात्मकतेस डावलून प्रगती करण्यास मदत होते.

५. मेग व्हिटमन

P & G, eBay आणि ह्युलेट पॅकार्ड (Hewlett-Packard HP) यासारख्या नामवंत कंपन्यांच्या सीईओ राहिलेल्या मेग व्हिटमन सांगतात की, ताण कमी करण्यासाठी त्या आपल्या मुलासोबत फ्लाय फिशिंग करण्यासाठी जातात. संशोधनातही असे आढळून आलेय की अवांतर छंद जोपासल्याने मनावरील ताण कमी होतो.

जवाब दो! उत्तरप्रदेशातील साधूंच्या हत्येनंतर आता काँग्रेसचे भाजपाला जळजळीत १० सवाल

मुंबई । भारतीय जनता पक्ष बुलंदशहरमध्ये झालेल्या साधूंच्या हत्याकांडाबाबत ‘कानठळ्या बसवणारे मौन’ धारण करून बसला आहे. यातून त्यांचा दुतोंडीपणा आणि कोरोनासारख्या संकटकाळातही राजकारण करण्याची निंदनीय प्रवृत्ती चव्हाट्यावर आल्याची जळजळीत टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर केली आहे. पालघरच्या मॉब लिंचिंगच्या दुर्दैवी घटनेमध्ये २ साधूंसह तिघांची हत्या झाली होती. या घटनेनंतर त्याच रात्री महाराष्ट्र पोलिसांनी धरपकड करून ११० आरोपींना ताब्यात घेतले व उच्चस्तरीय चौकशीची घोषणा करण्यात आली होती. पालघरच्या घटनेसाठी चोरांची अफवा कारणीभूत असल्याचे तातडीनेच स्पष्ट झाले होते. तरीही भाजपने त्या घटनेला धार्मिक रंग देऊन महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान आता उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे झालेल्या दोन साधूंच्या निर्घृण हत्येवर भाजपने मौन का धारण केलं असा सवाल उपस्थित करत काँग्रेसने त्यांना १० प्रश्न विचारले आहेत.

१.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पालघरच्या घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना तात्काळ फोन केला होता. तसाच फोन ते उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना
२. भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांच्यासह एकाही नेत्याने यासंदर्भात निषेधाचे ट्वीट केलेले नाही. ही हत्या निषेधार्ह नाही का?
३. पालघरचे साधू आणि बुलंदशहरमधील साधूंमध्ये फरक आहे का?
४. बुलंदशहरातील साधूंचे मारेकऱ्याबरोबर आधी भांडण झाले होते. तरीही त्या साधूंना संरक्षण का देण्यात आले नाही?
५. साधूंशी भांडण झाल्यानंतर त्या मारेकऱ्यावर तातडीने प्रतिबंधात्मक कारवाई का झाली नाही?
६. हे उत्तर प्रदेश सरकारचे इंटिलिजन्स फेल्युअर आहे का?
७. भर लॉकडाऊनमध्ये हत्येचे सुनियोजित षडयंत्र आखून तलवारीने साधूंची हत्या होते, हे उत्तर प्रदेश सरकारचे अपयश नाही का?
८. या हत्याकांडाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी भाजप करणार आहे का?
९. पालघरच्या घटनेनंतर महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याचा राजीनामा मागणारे भाजप नेते आता उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागणार आहेत का?
१०. पालघरमध्ये साधूंच्या हत्येनंतर हिंदुत्ववादी संघटनांनी सात्विक आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. काही भाजप नेते तर एक वेळचा अन्नत्यागही करत आहेत. आता बुलंदशहरमधील साधूंच्या हत्येच्या निषेधार्थ हे भाजप नेते दुसऱ्याही वेळचे अन्नत्याग करणार आहेत का?

दरम्यान, बुलंदशहर येथे झालेल्या दोन साधूंच्या हत्येचा तीव्र शब्दांत निषेध करून सावंत यांनी दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी सचिन सावंत यांनी केली. या घटनेबाबत संताप व्यक्त करताना ते म्हणाले की, ”भाजपचे सरकार असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये कायदा सुव्यवस्थेचा पूर्णतः बोजवारा उडाल्याचे हे निदर्शक आहे.”

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

लाॅकडाउन असताना संरपंचाने लाऊडस्पिकरवरुन गावकर्‍यांना मंदिरात बोलावले; यात्रा भरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल

सातारा प्रतिनिधी | गावामध्ये यात्रा भरवून नागरिकांना मंदिरात येण्याचे आवाहन करणार्‍या जावळी तालुक्यातील संरपंचाविरोधात मेढा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. तालुक्यातील वालुथ ग्रामस्थांनी याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केल्यानंतर सदर कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, वालुथ (ता. जावळी) येथे ग्रामदैवत यात्रा दि. 21 व 22 रोजी होती. जगावर आलेले महामारीचे संकट टाळण्यासाठी कोणत्याही स्वरूपाचे धार्मिक, वैयक्तिक, घरगुती व शासकीय कार्यक्रम करू नये म्हणून शासनाने जमावबंदी आणि लॉक डाऊन केले आहे. यात्रे निमित्ताने ग्रामस्थांनी काळजीपोटी दि. 20 रोजी मंदिराला कुलूप लावले होते. मात्र दि.21 रोजी रात्री 9 वाजता सरपंच समाधान पोफळे यांनी मंदिरांची कुलूपे काढली. आणि ग्रामस्थांनी दर्शनास यावे असे त्यांनी लाऊडस्पीकर वरून आवाहन केले.

कोठेही जत्रा भरवण्यास मनाई असताना जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली करत जावळी तालुक्यात अगोदरच कोरोनाचा आकडा वाढत असताना वालुथ येथील सरपंचांने यात्रा भरवली असल्याची  तक्रार गावातील काही लोकांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस प्रमुख यांच्याकडे केली. त्यानंतर मेढा पोलीस स्थानकामध्ये वालुथ गावचे सरपंच समाधान जगन्नाथ पोपळे, संजय गणपत चव्हाण भीमराव बबन पोफळे, प्रकाश बाजीराव पोफळे, नामदेव वामन पोफळे, अनिल भीमराव पोफळे, अमरदीप अंकुश तरडे असे एकूण सात जणांवर मेढा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. वालूथ येथील प्रदीप गोळे यांच्यासह गावातील 20 लोकांनी अर्ज दाखल केला होता. अधिक तपास  मेढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निळकंठ राठोड करत आहे.

‘टिकटॉक’ने केली मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत; दिले ‘इतके’ कोटी

मुंबई । तरुणांमध्ये नव्हे तर थोरा-मोठ्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेले व्हिडिओ शेअरिंग ऍप ‘टिकटॉक’ने कोरोनाच्या लढाईत सामाजिक भान राखत आपलं लाखमोलाचं योगदान दिल आहे. या कंपनीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ५ कोटी रुपयांची मदत दिली आहे. तसेच पोलिसांसाठी एक लाख मास्कचा पुरवठा देखील केला आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टिकटॉक कंपनीचे आभार सुद्धा मानले आहेत.

याचबरोबर टिकटॉक ऍपच्या माध्यमातून कोरोनाबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती केल्याचे कंपनीने मुख्यमंत्री कार्यालयाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. “महाराष्ट्रात आणि मुंबईत टिकटॉकसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या हजारावर आहे. त्यामुळेच या राज्याप्रती असलेल्या सामाजिक दायित्वाच्या भावनेची आम्हाला जाणीव असल्याचे टिकटॉक इंडियाचे प्रमुख निखिल गांधी यांनी या पत्रात म्हटलं.

तसेच राज्याच्या पोलीस दलासाठी एक लाख मास्क उपलब्ध करुन दिल्याचेही त्यांनी पत्रात सांगितले. कोरोनाविरोधातील लढ्यासाठी अधिकाधिक मदत गोळा व्हावा यासाठी टिकटॉक ॲपवर लाईव्ह डोनेशनचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

फडणवीस-राज्यपाल भेट; म्हणाले राज्यात अघोषित आणीबाणीसदृश्य परिस्थिती

मुंबई । राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा राज्यातील ठाकरे सरकावर टीका करत राज्यपाल भगतसिंह कोश्यारीची भेट घेऊन त्यांना एक पत्र दिलं आहे. यावेळी रिपब्लिक टीव्ही वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आपल्या वाहिनीवर सोनिया गांधींवर आक्षेपार्ह्य विधान केल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं होत. ही घटना म्हणजे मुस्कटदाबी करुन त्यांच्यात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण करणारी असून राज्य सरकारला जाब विचारण्याची मागणी या पत्रातून फडणवीस यांनी राज्यपालांना केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना दिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, “राज्यात अघोषित आणीबाणीसदृश्य आणि अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली असून लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या माध्यमांची मुस्कटदाबी करुन त्यांच्यात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. कुणी आपल्या विरोधात बोलूच नये अशी स्थिती निर्माण केली जात आहे”.

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पत्रात राज्य सरकारने कारवाई केलेल्या काही प्रसारमाध्यमांचा उल्लेख करत कारवाईबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.  “एखादं वृत्त प्रतिकूल असेल तर त्याचा खुलासा करता येऊ शकतो. पण असे न करता थेट धमक्या देणे, अटक करणे, चौकशीचा ससेमिरा लावण्याची दहशत दाखवणे असे प्रकार सर्रास केले जात आहेत,” असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

पुढे त्यांनी म्हटलं आहे की, “अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपींची अशा पद्धतीने चौकशी करण्याचं धाडस सरकार दाखवू शकलेलं नाही”. “सोशल मीडियात सरकारविरोधात लिखाण करणाऱ्यांची सुद्धा मुस्कटदाबी केली जात आहे. त्यांच्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल करण्याचे प्रकार राज्यभर सर्वत्र सुरु आहेत. दुसरीकडे वृत्तपत्र वितरण सुरक्षित असल्याचं जागतिक आरोग्य संघटना आणि तत्सम संस्थ्यांनी सांगितलं असतानाही वृत्तपत्र वितरणावर बंदी टाकण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने सुद्ध राज्य सरकारला याबद्दल जाब विचारला आहे,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. “एकूणच हे प्रकार निष्पक्ष माध्यमांच्या अस्तित्वावरच घाला घालणारे आहेत. लोकशाही धोक्यात आणणारे आहेत आणि म्हणून अघोषित आणीबाणीसदृश्य आहेत. या सर्व घटनांची अतिशय गंभीर दखल घेत याबद्दल राज्य सरकारला जाब विचारावा,” अशी मागणी यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

अमेरिकन सीमा सुरक्षा एजन्सीच्या कोठडीत भारतीयाला झाला कोविड -१९चा संसर्ग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मेक्सिकोच्या सीमेवरुन बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश केल्याप्रकरणी अटक केलेल्या ऐका ३१ वर्षीय भारतीय नागरिकाला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले आहे. बॉर्डर सिक्युरिटी एजन्सीचा संसर्ग होणारा तो पहिला व्यक्ती आहे. यूएस कस्टम आणि बॉर्डर प्रोटेक्शनने (यूएस सीबीपी) अहवाल दिला की २३ एप्रिल रोजी बॉर्डर पेट्रोलिंग एजंटने तीन मेक्सिकन नागरिक आणि एका भारतीयाला पकडले आहे त्यांनी कॅलिफोर्नियाजवळील मेक्सिकन सीमेवरुन बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश केला आहे.

सीबीपीचे कार्यकारी आयुक्त मार्क मॉर्गन म्हणाले की मेक्सिकोमधील नागरिक आपल्या देशात परत आले आहेत, परंतु भारतीयाला बॉर्डर पेट्रोलिंग सेंटरमध्ये आणले गेले.या भारतीयाची ओळख जाहीर केलेली नाहीये. त्याच्यामध्ये फ्लूची लक्षणे दिसून आली,त्यानंतर डॉक्टरांनी त्याची तपासणी केली आणि त्याला आयसोलेट ठेवले. त्याची कोरोना चाचणी घेण्यात आली आणि त्यानंतर त्याला संसर्ग झाल्याची पुष्टी करण्यात आली.एजन्सीने सांगितले की कोविड -१९ ने संक्रमित झालेल्या सीबीपी कोठडीतील हा पहिलाच मनुष्य होता.त्यांनी सांगितले की सध्या ते त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांना शोधत आहेत.

Indian national is first case in US border protection custody to have COVID-19 । - India TV

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

नांदेडहून पंजाबला गेलेले ५ भाविक कोरोना पॉजिटीव्ह

नांदेड । नांदेड येथे दर्शनासाठी आलेल्या पांजाबच्या ५ भाविकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यानंतर आता इतर राज्यांतून पंजाबात आलेल्या सर्व नागरिकाची चाचणी करण्याचा निर्णय पंजाब सरकारनं घेतला आहे. सादर नागरिकांना १४ दिवस क्वारंटाईनही राहावं लागणार आहे. पंजाबात सापडलेल्या या पाच कोरोना रुग्णांचे नांदेड कनेक्शन समोर आल्यानंतर आता नांदेड मध्ये पण सादर रुग्णांच्या संपर्कात कोणी आले होते का याचा शोध घेतला जात आहे.

राज्यातील नागरिकांना परत आणण्यासाठी पंजाब सरकारनं ८० लग्झरी बस नांदेडला पाठवल्या होत्या. नांदेडहून तख्त सचखंड श्री हुजूर साहिबच्या दर्शनासाठी गेलेल्या शीख भाविकांचा एक गट रविवारी सकाळी पंजाबला परतला. हे सर्व मार्च महिन्यापासून नांदेडला गेले होते. अचानक लॉकडाऊन सुरू झाल्यानं हे भाविक तिथंच अडकले होते. पंजाब सरकारनं धाडलेल्या बसमध्ये ५२ प्रवासी प्रवास करू शकतात. परंतु, सोशल डिस्टन्सिंग ध्यानात घेता एका बसमध्ये केवळ ३५ प्रवासी बसवण्यात आले होते.

नांदेडहून परतणाऱ्या ८ रुग्णांपैंकी ५ रुग्ण तरन-तारनमधील सुरसिंह गावातील तर ३ जण कपूरतलाच्या फगवाडाचे रहिवासी आहेत. धक्कादायक म्हणजे, नांदेडहून परतलेल्या भाविकांची सुरसिंह रुग्णालयात स्क्रिनिंगही पार पडली होती. यावेळी त्यांच्यात कोणतीही लक्षणं आढळली नव्हती. प्रशासनाकडून सुरसिंह गाव आणि लाहुका यांना कंन्टेन्मेंट झोन घोषित करण्यात आलंय. आता या रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या नागरिकांची तपासणीही केली जाणार आहे.

कोराना रुग्ण वाचवण्यासाठी कनिकाने पुढे केला मदतीचा हात

Kanika Kapoor

मुंबई | बॉलिवूड गायिका कनिका कपूर हिला ही कोरोनाने ग्रासले होते. मात्र ती करोनामुक्त झाल्यावर तिने कोरोना रुग्णांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. कानिकाने करोनाग्रस्तांच्या उपचारांसाठी प्लाज्मा डोनेट करण्याचं ठरवलं आहे.

ही मदत करण्यासाठी तिने सोमवारी संध्याकाळी किंक किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये करोनाग्रस्ताला पहिल्यांदा प्लाज्मा थेरपी दिली गेली. ५८ वर्षांच्या डॉक्टरवर ही प्लाज्मा थेरपी देण्यात आली. याशिवाय प्लाज्मा दान करणारी पहिली कॅनेडियन डॉक्टर होती जी करोनारुग्ण होती. मात्र उपचारांनंतर ती करोना मुक्त झाली. केजीएमयू डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, ज्या रुग्णांना प्लाज्मा थेरपी दिली त्यांच्यावर नजर ठेवली जात आहे.जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये रक्ताची चाचणीही केली. जर सर्व ठीक असेल तर तिच्या शरीरातील ५०० मिली प्लाज्मा केजीएमयूचे डॉक्टर काढून घेतील. केजीएमयूच्या ब्लड ट्रान्सफ्यूजन मेडिसीन विभागाचे अध्यक्षा डॉ. तूलिका चंद्रा यांनी ही माहिती दिली. त्या म्हणाल्या कनिकाने सोमवारी संस्थेच्या डॉक्टरांकडे प्लाज्मा दान करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अशी माहिती त्यांनी दिली.

दरम्यान किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये करोनाग्रस्ताला पहिल्यांदा प्लाज्मा थेरपी दिली गेली. ५८ वर्षांच्या डॉक्टरवर ही प्लाज्मा थेरपी देण्यात आली. याशिवाय प्लाज्मा दान करणारी पहिली कॅनेडियन डॉक्टर होती जी करोनारुग्ण होती. मात्र उपचारांनंतर ती करोना मुक्त झाली. केजीएमयू डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, ज्या रुग्णांना प्लाज्मा थेरपी दिली त्यांच्यावर नजर ठेवली जात आहे.

पुढच्या २४ तासांत पृथ्वीचा अंत? जाणुन घ्या पृथ्वीच्या जवळ येत असलेल्या उल्कापिंडेची खरी गोष्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेच्या अंतराळ संस्था नासाने सुमारे दीड महिन्यापूर्वी जगासमोर एक गोष्ट ठेवली. एक मोठा लघुग्रह, म्हणजेच एक उल्का पिंड वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत आहे असं नासाने यावेळी म्हटलं होते. या उल्केचा आकार डोंगराएढा असल्याचं बोललं जातंय. यामुळे जगभरातील लोक या घटनेने घाबरले आहेत. दरम्यान, नासाचे असे म्हणणे आहे की या उल्कापिंडामुळे घाबरून जाण्याची काहीच गरज नाही. कारण हे पृथ्वीपासून सुमारे ६२.९० लाख किलोमीटर अंतरावरून जाईल. अंतराळ विज्ञानामध्ये जरी हे अंतर फारसे जास्त मानले जात नाही, परंतु ते फार कमीही मानले जात नाही.

उल्का वेग ताशी ३१,३१९ किलोमीटर आहे. याचा अर्थ प्रति सेकंद ८.७२ किलोमीटर इतके आहे. असा विश्वास आहे की जर हि उल्का इतक्या वेगाने पृथ्वीच्या कोणत्याही भागाला धडकली तर त्यामुळे मोठी त्सुनामी येऊ शकते. यासंदर्भातील बरेच फोटो यावेळी सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या उल्काचे नाव ५२७६८ (१९९८ OR२) आहे. हे १९९८ मध्ये प्रथम नासाने पाहिले होते. त्याचा व्यास सुमारे ४ किलोमीटर इतका आहे. नासाच्या शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, नासाच्या सेंटर फॉर नेर-अर्थ स्टडीनुसार बुधवारी, २९ एप्रिल रोजी पूर्वेकडच्या पहाटे ०५:५६ वाजता उल्कापात पृथ्वीजवळून जातील.

What Would YOU Do If You Knew The World Was Ending? Video Game ...

खगोलशास्त्रज्ञांच्या मते, असे उल्कापात दर शंभर वर्षानंतर पृथ्वीला धडकण्याची शक्यता ५० हजार एवढी आहे. पण काही प्रमाणात ते पृथ्वीजवळून जाते. या प्रकरणात खगोलशास्त्रज्ञ असेही म्हणतात की लहान उल्कापात काही मीटर लांबीच्या असतात. ते सहसा वातावरणात प्रवेश करताच जळून जातात. त्यातून कोणतेही मोठे नुकसान होण्याचा धोका नसतो. हवामानशास्त्रज्ञ म्हणतात की उल्कापिंड ५२,७६८ सूर्याला एक फेरी मारण्यासाठी १३४० दिवस किंवा ७.६ वर्षे घेते. यानंतर, पृथ्वीच्या दिशेने उल्कापिंडाला पुढील फेरी (१९९८ OR २) पूर्ण करण्यास मे १८ मे २०३१ रोजी लागू शकेल. त्यावेळी ते १.९० कोटी किलोमीटरच्या अंतरावरून निघेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

राज्यातील ‘या’ ३ महापालिकांवर प्रशासक नियुक्त करा! राज्य निवडणूक आयोगाचं राज्य सरकारला पत्र

मुंबई । कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील औरंगाबाद, नवी मुंबई आणि वसई विरार या महापालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या तिनही महानगरपालिकांची मुदत संपत आली आहे. त्यामुळं या महापालिकांवर प्रशासकाची नियुक्ती करण्यासाठीच्या सरकारच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता येथे निवडणुका घेणं अशक्य असल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळे या महानगपालिकांवर प्रशासकीय आयुक्त नेमावा असं पत्र राज्य निवडणुक आयोगाने राज्य सरकारला दिलं आहे. त्यामुळे राज्य सरकारने प्रशासकीय आयुक्तांच्या नेमणुकीसाठी पाऊल उचलायला सुरवात केली आहे.

दरम्यान, औरंगाबाद महानगपालिकेची मुदत 28 एप्रिल रोजी म्हणजेच आज संपत असून नवी मुंबई महानगपालिकेची मुदत 7 मे रोजी संपणार आहे. तर वसई-विरार महानगरपालिकेची मुदत 28 जून रोजी संपणार आहे. कोरोनामुळे या तीनही महापालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या असून त्या लवकर होणं शक्य नाही, त्यामुळे या तीनही महापालिकांवर प्रशासक नियुक्त करावा असं पत्र राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”