Sunday, December 21, 2025
Home Blog Page 588

Flipkart : फ्लिपकार्टवर सुरु झालाय GOAT सेल , अवघ्या 6500 रुपयांना स्मार्ट टीव्ही

Flipkart : भारतातील प्रसिद्ध इ कॉमर्स वेबसाईटस वर सध्या मान्सून सेल सुरु आहेत. याच बरोबर प्रसिद्ध शॉपिंग साईट फ्लिपकार्ट GOAT सेल (ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम) वर देखील सेल सुरु झाला आहे. हा सेल 20 ते 25 जुलै या कालावधीत असून या फ्लिपकार्ट GOAT सेलमध्ये टिलिव्हिजन वर अनेक चांगल्या ऑफर्स मिळत आहेत. ग्राहकांना या सेल मध्ये खरेदी (Flipkart) केल्यास चांगला डिस्काउंट मिळत आहे. धमाकेदार डिसकाउंटसह महागड्या वस्तू कमी किमतीत मिळण्याची संधी या सेल ने आणली आहे. या सेलमध्ये 6,499 पासून 47,999 रुपयांपर्यंत वस्तू मिळत आहेत.

मिळेल एक्सट्रा सूट (Flipkart)

  • Axis Bank, HDFC बँक आणि IDFC FIRST बँक कार्ड वापरून केलेल्या खरेदीवर 10% झटपट सूट घेऊ शकतात.
  • Flipkart UPI द्वारे UPI व्यवहारांवर 50 रुपयांपर्यंत सूट देखील आहे.
  • शिवाय तुमचा जुना टीव्ही तुम्ही एक्सचेंज करून त्यासाठी चांगली किंमत मिळवून नवा टीव्ही खरेदी करू शकता.
  • नो कॉस्ट EMI ऑप्शन उपलब्ध आहे.
  • फ्लिपकार्ट पे लेटर पर्यायाद्वारे ₹1 लाखांपर्यंतचे क्रेडिट उपलब्ध आहे.
  • Flipkart Plus सदस्यांना आणखी चांगली डील मिळते.

अवनीत सिंग मारवाह, CEO, Super Plastronics Pvt Ltd आणि भारतातील Blaupunkt TV चे अनन्य ब्रँड अधिकारी म्हणाले, “Flipkart ची आतापर्यंतची सर्वात मोठी विक्री म्हणून, Blaupunkt वरून उच्च दर्जाचे टेलिव्हिजन खरेदी करण्याची ही एक संधी आहे. तुमचा मनोरंजन अनुभव अपग्रेड करण्यासाठी सर्वोत्तम वेळ आहे . बँक प्रमोशनद्वारे मोठ्या बचतीसह विशेष सवलती आणि ऑफरसह, आम्ही (Flipkart) आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम मूल्य आणि सेवा प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहोत. ही विक्री खऱ्या अर्थाने ग्राहकांसाठी टेलिव्हिजन तंत्रज्ञानातील सर्वोत्तम खरेदी करण्याची ‘सर्वात मोठी’ संधी आहे.

  • 24Sigma707: 6499
  • 32CSG7111: 10699
  • 40 Sigma 703 BL: 14499
  • 40CSG7112: 15499
  • 43CSG7105: 17499
  • 43QD7050: 22499
  • 50CSGT7022: 26999
  • 50QD7010: 28999
  • 55CSGT7023: 29999
  • 55QD7020: 33999
  • 65CSGT7024: 40999
  • 65QD7030: 47999

सानिया मिर्झासोबत लग्न करणार? शमीने सगळंच स्पष्ट केलं

Mohammed Shami sania mirza

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा स्टार जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) आणि टेनिस स्टार सानिया मिर्झा (Sania Mirza) यांच्या लग्नाची चर्चा मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर सुरु आहे. शमीने पत्नी हसीन जहाँपासून घटस्फोट घेतला आहे तर दुसरीकडे सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचं नातं सुद्धा तुटलं आहे. दोघेही सध्या सिंगल लाईफ जगत असल्याने त्यांच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर सुरु असते. यापूर्वी सानिया मिर्झाच्या वडिलांनी या चर्चात कसलंही तथ्य नसल्याचे स्पष्ट केलं होते, आता मोहम्मद शमीने सुद्धा सानिया मिर्झासोबतच्या लग्नाच्या चर्चा फेटाळून लावल्या असून हिम्मत असेल तर व्हेरिफाईड पेजवरून अशा अफवा पसरवून दाखवा असं आव्हानही दिले.

शुभंकर मिश्रा यांना दिलेल्या मुलाखतीत शमीने सानिया मिर्झासोबतच्या लग्नाच्या अफवेबद्दल मौन सोडलं. शमी म्हणाला हे खूप विचित्र आहे. जाणूनबुजून असं कोणीतरी करतंय, पण असं एखाद्याला असं खेचलं नाही पाहिजे. मीम्स तुमच्या मनोरंजनासाठी आहेत याबाबत मी सहमत आहे, पण कोणाच्या तरी आयुष्याशी त्याचा संबंध जोडू नका. विचार करून मिम्स बनवा. कोणत्याही अनधिकृत पेजवरून तुम्ही मिम्स बनवताय, त्यावर तुमचा पत्ता नाही, लोक तुम्हाला ओळखत माहित त्यामुळे तुम्ही काहीही बोलू शकतात. तुमच्यात हिम्मत असेल तर व्हेरिफाईड पेजवर बोलून दाखवा, मग तुम्हाला सांगतो असं आव्हान शमीने दिले.

दरम्यान, यापूर्वी सानिया मिर्झाच्या वडिलांनीही या प्रकरणी स्पष्टीकरण दिले होते आणि शमी-सानियाच्या लग्नाच्या बातम्या केवळ अफवा असल्याचे त्यांनी म्हटले होते. आता शमीनेही याबाबत सर्व काही खरं खोट जगासमोर स्पष्ट केलं आहे. मोहम्मद शमी सध्या दुखापतीने त्रस्त असून तो भारतीय क्रिकेट संघाच्या बाहेर आहे. २०२३ च्या ५० षटकांच्या वर्ल्डकप स्पर्धेत शमीने अफलातून कामगिरी करत भारतीय संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहचवलं होतं. त्यानंतर दुखापतीमुळे तो संघाच्या बाहेर गेलाय. शमी आता लवकरच बरा होईल आणि पुनरागमन करेल अशी आशा त्याच्या चाहत्यांना आहे.

41 दिवसात आचार संहिता, जोमाने कामाला लागा; ठाकरेंचे शिवसैनिकांना आदेश

uddhav thackeray assembly election

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election 2024) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. येत्या 41 दिवसात आचार संहिता लागणार असून जोमाने कामाला लागा असे थेट आदेश उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिले आहेत. सेनाभवन येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत विधानसभा संपर्कप्रमुखांची बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरेंनी गावागावात शाखा स्थापन करण्यापासून ते मतदार नोंदणी करण्यापर्यंतच्या सूचना संपर्कप्रमुखांना देत विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे.

4 ऑगस्ट ते 11 ऑगस्टपर्यंत भगवा सप्ताहाचे आयोजन करा असं आवाहन उद्धव ठाकरेंनी या बैठकीत केलं. या भगवा सप्ताहमध्ये विधानसभा क्षेत्राचा आढावा घेऊन त्याची माहिती सेनाभवन येथे सादर करायची आहे. यामध्ये विविध कार्यक्रमांचा आढावा घेण्यासाठी बैठका घेण्याचे आदेशही देण्यात आले. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढील 4 महिन्यात 15 दिवसातून दोन दिवस विधानसभा क्षेत्रात संपर्कप्रमुखांनी स्वतः उपस्थितीत राहून आढावा घेण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी दिलेत. उद्धव ठाकरेंनी या बैठकीत संपर्क प्रमुखांना पाच सूत्री कार्यक्रम दिला आहे.

संपर्क प्रमुखांना दिलेला पाच सूत्री कार्यक्रम-

1) सर्व विधानसभा संपर्कप्रमुखांनी मतदारसंघात दौरा करावा . त्यांच्यासोबत संबंधित उपजिल्हाप्रमुख आणि तालुकाप्रमुख सुद्धा असावा.
2) सदर मोहिमेअंतर्गत प्रत्येक पंचायत समिती गणामध्ये बैठक आयोजित करणे आवश्यक आहे.
3)बैठकीसाठी स्थानिक विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख , युवासेना शाखा युवा अधिकारी आदी पदाधिकारी अपेक्षित आहेत.

4)सदर मोहिमेअंतर्गत खालील माहिती अपेक्षित आहे.
गावातील शाखाप्रमुख, शाखासंघटक, युवासेना शाखा युवा अधिकारी इत्यादींची नावे आणि दूरध्वनी
गावात किती शिवसैनिकांची नोंदणी झाली आहे?
नवीन मतदारांची नोंदणी किती झाली?
किती गावांमध्ये शाखा नाही?
नसल्यास कधीपर्यंत स्थापन करणार

5)विभागात कार्यरत असणाऱ्या ज्येष्ठ शिवसैनिकांची यादी मोबाईल क्रमांकासहित जोडावी.
गटप्रमुखाचे नाव
यादी क्रमांक
संपर्क क्रमांक

Bullet Train: भारतातील पहिल्या समुद्राखालील रेल्वे बोगद्याच्या कामाला सुरुवात; NHSRCL ने दिली माहिती

Bullet Train: भारताच्या विकासामध्ये भर घालणारे अनेक वेगवगेळे प्रोजेक्ट हाती घेण्यात आले आहेत. यातील एक महत्वाचा प्रकल्प म्हणजे मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प. या प्रकल्पाचे काम मोठ्या वेगाने सुरु आहे. या बुलेट ट्रेनचे वैशिष्ट्य म्हणजे ही ट्रेन समुद्रखालील बोरगाड्यामधून धावणार आहे. याच बाबत आता नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन (NHSRCL) एक अपडेट जारी केले आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हंटले आहे की, भारतातील पहिल्या समुद्राखालील रेल्वे बोगद्याचे (Bullet Train) काम सुरू केले आहे.

7 किमी समुद्राखालून जाईल मार्ग (Bullet Train)

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन सात किलोमीटरच्या समुद्राखालील बोगद्यातून धावणार आहे, ज्यामध्ये 13.2 मीटर व्यासाची एक ट्यूब असेल. बोगदा मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) आणि शिळफाटा यांना जोडणाऱ्या २१ किलोमीटर लांबीच्या बोगद्याचा (Bullet Train) एक महत्त्वाचा भाग आहे, जो महत्त्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा भाग आहे.

फायनान्शियल एक्स्प्रेसच्या अहवालानुसार हा बोगदा जमिनीच्या पातळीपासून सुमारे 25-65 मीटर खोल असेल आणि सर्वात खोल बांधकाम बिंदू शिळफाटाजवळील पारसिक टेकडीच्या खाली 114 मीटर असेल. या प्रकल्पाच्या बांधकामामध्ये दोन वेगळ्या बोगद्यांच्या (Bullet Train) पद्धतींचा समावेश आहे 16 किलोमीटर तीन टनेल बोरिंग मशीन (TBMs) वापरून खोदले जातील, तर उर्वरित 5 किलोमीटर न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धती (NATM) वापरून बांधले जातील.16-किलोमीटर टीबीएम विभाग तयार करण्यासाठी, एकूण 76,940 प्रीकास्ट काँक्रीट विभाग तयार केले जातील, 7,441 पूर्ण रिंग्ज तयार होतील. प्रत्येक सेगमेंटला एक पूर्ण रिंग बनवण्यासाठी बोल्ट केले जाते किंवा एकत्र जोडले जाते, जे नंतर TBM प्रगती करत असताना अनुक्रमे एकत्र केले जाते.

तथापि, भूमिगत बोगदा (Bullet Train) बांधण्याचा खर्च 100 पटीने वाढला आहे. C2 पॅकेजची सुरुवातीची किंमत 100 कोटी रुपये होती ती आता 10,000 कोटी रुपये झाली आहे.

एकूण 12 स्थानके असतील (Bullet Train)

320 किमी प्रतितास वेगाने चालणारी हाय-स्पीड रेल्वे मुंबई आणि अहमदाबाद दरम्यानचे 508.17 किमी अंतर केवळ दोन तासांत पार करेल. ते महाराष्ट्रात (Bullet Train) 155.76 किमी, दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात 4.3 किमी आणि गुजरातमध्ये 348.04 किमी, मार्गात 12 स्थानकांसह कव्हर करेल. गुजरातमध्ये साबरमती, अहमदाबाद, आनंद, वडोदरा, भरूच, सुरत, बिलीमोरा आणि वापी अशी आठ स्थानके असतील आणि महाराष्ट्रात बोईसर, विरार, ठाणे आणि मुंबई अशी चार स्थानके असतील.

सप्टेंबर 2017 मध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे जपानी समकक्ष शिंजो आबे यांनी अहमदाबादमधील साबरमती येथे हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाची पायाभरणी केली. 2026 पर्यंत दक्षिण गुजरातमधील सुरत आणि बिलीमोरा दरम्यान बुलेट ट्रेनचा (Bullet Train) पहिला टप्पा कार्यान्वित करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. NHSRCL चे बुलेट ट्रेन प्रकल्प 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे, या ट्रेनने मुंबई आणि अहमदाबाद दरम्यानचा प्रवास वेळ तीन तासांपर्यंत कमी करणे अपेक्षित आहे.

अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघात आमदार बाबासाहेब पाटील इतिहास रचतील?

aahamadpur Thumbnail

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अपक्षांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघात 2019 ला मात्र राष्ट्रवादीच्या तिकिटावर बाबासाहेब पाटील यांनी गुलाल उधळला… चार वेळा काँग्रेसने तर तब्बल आठ वेळा विरोधी पक्षाचा आमदार निवडून देणाऱ्या अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघाने 2014 च्या मोदी लाटेतही अपक्षाच्या बाजूने कौल दिला… वंजारी आणि धनगर समाज जायंट किलर ठरणाऱ्या या मतदारसंघात आमदार मात्र नेहमीच मराठा चेहरा राहिला… स्टँडिंग आमदार बाबासाहेब पाटील हे राष्ट्रवादीच्या फुटीत अजित दादांसोबत गेलेत… तर त्यांचे कडवे विरोधक माजी आमदार विनायक पाटील यांनी अलीकडेच राष्ट्रवादीची तुतारी हाती घेतलीये…. एकूणच हे तरी स्पष्ट दिसतय की येणाऱ्या विधानसभेला अहमदपूर चाकूरमध्ये दोन पाटलांच्यात घड्याळ वर्सेस तुतारी? असा राजकीय संघर्ष पाहायला मिळू शकतो… येणाऱ्या विधानसभेला या दोन्ही पाटलांपैकी नेमक्या कुठल्या राष्ट्रवादीच्या पाटलांना जनता आमदार बनवतेय? बाबासाहेब पाटील आपली विजयाची परंपरा कायम राखतील, की मतदारसंघात तुतारी वाजेल? अहमदपूर चाकूर या मतदारसंघाचं साधं सोप, पॉलिटिकल डिकोडिंग पाहूयात,

व्यापार, उद्योग, कारखानदारी, रोजगाराचा कसलाही गंध नसणारा… उजाड शेत, माळरान आणि सामाजिक हेळसांड या मतदारसंघाच्या नेहमीच पाचवीला पुजलेली… घोषणांचा पाऊस पाडायचा, आणि निवडणुका जिंकायच्या… असा इथला एकूणच प्रकार… राजकारणात विकास करण्यासाठी जी स्थिरता लागते ती अहमदपूर चाकूरला कधी मिळालीच नाही… कधी जातीच्या…कधी अस्मितेच्या… तर कधी भावनेच्या… आहारी जाऊन अहमदपूरकरांनी राजकीय कौल दिला…त्यामुळेच अगदी ठामपणे या मतदारसंघासाठी झगडणारा राजकीय पुढारी सांगायचा म्हटला, तर अगदी उरतो फक्त शून्य… याच राजकीय निष्क्रियतेतून मतदारसंघाने अनेक आमदार बदलले… 2009 साली महाराष्ट्रात रिपब्लिकन डावी लोकशाही संघटना म्हणजेच अनेक डाव्या विचारांच्या छोट्या मोठ्या पक्षांनी एकत्रित येत निवडणूक लढवली तेव्हा ही जागा रासपला सुटली… रासपकडून बाबासाहेब पाटील तर काँग्रेसकडून विनायक पाटील असा अटीतटीचा सामना यावेळेस झाला… आणि काँग्रेस सारख्या इस्टॅब्लिश पक्षाला डावलून रासपच्या तिकिटावर बाबासाहेब पाटलांनी आमदारकीचा भंडारा उधळला…

पुढे 2014 च्या निवडणुकीच्या आधीच मतदारसंघातील राजकीय समीकरणं बदलली… बाबासाहेब पाटलांनी निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला… मात्र यावेळेस झालेल्या चौरंगी लढतीत अपक्ष म्हणून विनायकराव पाटील विजयी झाले… 2019 पूर्वीचं राजकारणाचे गणित पाहून त्यांनी भाजपात प्रवेश केला खरा… पण अहमदपूर चाकुरने 2019 ला पुन्हा वातावरणाच्या विरोधात कौल देत राष्ट्रवादीच्या बाबासाहेब पाटलांना निवडून आणलं… खरतर 2019 लाही विनायकराव पाटीलच मैदान मारतील, असं क्लियर चित्र होतं…पण भाजपतील अंतर्गत नेत्यांनीच विनायकरावांना राजकारणातून डावल्यामुळे आणि भाजपातील दिलीपराव देशमुख, अयोध्या केंद्रे या दोन बंडखोरांनी बंडाळी केल्यामुळे मतदान फिरलं…आणि याचा फायदा बाबासाहेब पाटलांनी उचलत ते आमदार झाले…

यात काही निष्कर्ष निघाले… पहिलं असं की विनायकराव पाटलांना पक्षाच्या चिन्हावर निवडणूक जिंकता येत नाही… अहमदपूर चाकूरमध्ये एखाद्या आमदाराला लागून दुसरी निवडणूक जिंकता येत नाही… मतदार संघातील जनता नेहमी कौल सत्तेच्या विरोधात देते… सध्याचा राजकारण कसं आहे? हे पाहिल्यावर लक्षात येतं की राष्ट्रवादीतील फुटीनंतर बाबासाहेब पाटील अजित दादांसोबत गेलेत… त्यात बाबासाहेब महायुतीत आल्यामुळे पक्षातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून आणि विधानसभेच्या उमेदवारीचा अंदाज घेऊन विनायकराव पाटलांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाची तुतारी हाती धरलीय… सध्या मतदारसंघात हे दोनच तगडे उमेदवार असल्याने पहिल्यांदाच अहमदपूरची निवडणूक घड्याळ विरुद्ध तुतारी अशा लाईनने पुढे जाणार आहे… मतदार संघाची रचना विनायकराव पाटलांची कार्यकर्त्याची फळी आणि शरद पवार यांची मदत या त्रीसूत्रीचा फायदा येणाऱ्या विधानसभेला विनायकराव पाटलांना होऊ शकतो…

कारखानदारी, शिक्षण संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवर एकहाती असणारा होल्ड ही बाबासाहेब पाटलांची स्ट्रेंथ आहे… त्यासोबतच सत्ताधारी गटात असल्यामुळे विकासकामांचा आणलेला भरभक्कम निधीही त्यांच्यासाठी प्लस मध्ये जाणारा आहे… बाकी अजित दादांच्या राष्ट्रवादीसोबत गेल्यामुळे मतदारसंघातील कार्यकर्ते आणि जनता काही प्रमाणात नाराज आहेच… या गोष्टी अर्थात विद्यमान आमदारांच्या अंगलट येऊ शकतात… तब्बल तीन टर्म मतदार संघाचे प्रतिनिधित्व करूनही डोंगरी तालुक्यांतील पिण्याच्या पाण्याचा…स्थलांतराच्या प्रश्नाचा… आमदार साहेबांना तोडगा काढता आलेला नाहीये… मतदार संघाच्या विकासाचं लोकप्रतिनिधीकडे शाश्वत मॉडेल नसणं… हीच अहमदपूर चाकूर मतदारसंघासाची मोठी शोकांतिका म्हणावी लागेल… नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी बाबासाहेबांना अवघं तीन हजारांचं निसटत लीड देण्यात यश मिळालय… हा आकडा दाखवून देतोय की राष्ट्रवादीच्या बाबासाहेब पाटलांची आमदारकी धोक्यात आहे… बाकी दलित, मुस्लिम, वंजारी आणि धनगर मतदार कुणाच्या बाजूने राहणार? यावरही अहमदपूर चाकूरचा निकाल अवलंबून आहे हे नाकारता येत नाही…

Microsoft outage: मायक्रोसॉफ्ट सर्व्हर डाऊनचा भारतीय रेल्वेवर परिणाम का झाला नाही?

Microsoft outage : मायक्रोसॉफ्टच्या बंदमुळे काल (19) संपूर्ण जगात खळबळ उडाली. त्यामुळे विमान वाहतूक , दूरसंचार सेवा, बँका आणि माध्यम संस्थांना सर्वाधिक फटका बसला. मात्र तूम्हाला माहिती आहे का ? भारतीय रेल्वेवर मायक्रोसॉफ्टच्या बंदमुळे कोणताही परिणाम झाला नाही. भारतीय रेल्वेच्या सर्व सेवा काल सुरळीत सुरु होत्या. याचे कारण काय असेल ? तर याबाबत रेल्वेच्या एका अधिकाऱ्यांनी माहिती दिली (Microsoft outage) आहे. चला जाणून घेऊया यामागचे नेमके कारण काय ?

याबाबत माहिती देताना एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले की, “या सर्व सेवा 1999 मध्ये Y2K समस्यांमुळे CRISIS प्रवासी आरक्षण प्रणालीवर विकसित करण्यात आल्या होत्या. त्यामुळे मायक्रोसॉफ्ट (Microsoft outage) बंद झाल्यानंतरही रेल्वेवर कोणताही परिणाम दिसून आला नाही. सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम (CRIS) ही रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत असलेली एक संस्था आहे. CRIS हे सक्षम IT व्यावसायिक आणि अनुभवी रेल्वे कर्मचाऱ्यांचे एक अनोखे संयोजन आहे जे त्याला महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये जटिल रेल्वे IT प्रणाली यशस्वीपणे वितरित करण्यास सक्षम करते. स्थापनेपासून, CRIS भारतीय रेल्वेच्या अनेक प्रमुख क्षेत्रांसाठी सॉफ्टवेअर विकसित आणि देखरेख करते.

मायक्रोसॉफ्टसह या सेवा बंद (Microsoft outage)

मायक्रोसॉफ्टच्या बंदचा परिणाम भारत, जर्मनी, अमेरिका, ब्रिटन आदी अनेक देशांवर झाला. त्यामुळे जगभरातील विमानतळ, बँका, मीडिया आणि दूरसंचार सेवा ठप्प झाली. अमेरिकेची आपत्कालीन सेवा 911 स्वतःच बंद झाली होती. यादरम्यान आउटलुक वन ड्राईव्ह वन नोट एक्स बॉक्स अॅप मायक्रोसॉफ्ट टीम (Microsoft outage) मायक्रोसॉफ्ट 365 ऍडमिन सेंटर यासारखे अनेक सेवा बंद झाल्या होत्या.

मायक्रोसॉफ्ट ने काय सांगितले कारण?

मायक्रोसॉफ्टने सांगितले की, सर्व्हर डाऊनला गुरुवारी (19 जुलै, 2024) सुरुवात झाली, जेव्हा Azure सेवा वापरणाऱ्या अनेक ग्राहकांना समस्यांचा सामना करावा लागला. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की Azure च्या बॅकएंड इन्फ्रास्ट्रक्चरमधील (Microsoft outage) कॉन्फिगरेशन बदलामुळे सर्व्हर डाउन झाला असावा. मात्र, परिस्थिती हळूहळू सुधारत असल्याचे मायक्रोसॉफ्टचे म्हणणे आहे.

BSNL रिचार्जवर 1 लाखांचे बक्षीस; पहा काय आहे ऑफर?

bsnl recharge 1 lakh price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ला सध्या प्रचंड मागणी वाढत आहे. जिओ, एअरटेल सारख्या देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या मोबाईल रिचार्जच्या किमती वाढवल्यानंतर स्वस्तात मस्त रिचार्जसाठी ग्राहकवर्ग बीएसएनएल कडे वळू लागले आहेत. कमी पैशात रिचार्ज प्लॅन उपलब्ध असल्याने सर्वसामान्य नागरिकांना BSNL एक आशेचा किरण आहे. आता तर BSNL ने ग्राहकांसाठी भन्नाट ऑफर आणली आहे. या ऑफरच्या माध्यमातून काही ठराविक रिचार्जवर तब्बल १ लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आलं आहे.

BSNL निवडक स्पेशल टॅरिफ व्हाउचर (STV) सह 1 लाख रुपयांचे बक्षीस देत आहे. BSNL प्रीपेड मोबाईल ग्राहक पात्र होण्यासाठी या STV वरून रिचार्ज करू शकतात. बीएसएनएलने म्हटले आहे की ते ग्राहकांना प्रत्येक महिन्याला 1 लाख रुपयांचे बक्षीस देतील मात्र जे यूजर्स झिंग ॲप वापरतील त्यांनाच हे बक्षीस दिले जाईल. हे STV 118 रुपये, 153 रुपये, 199 रुपये, 347 रुपये, 599 रुपये, 997 रुपये , 1999 रुपये आणि 2399 रुपयांचे आहेत. या प्लॅन्सचा रिचार्ज केल्यानंतर ग्राहकांना त्यांच्या मोबाईलमध्ये झिंग ॲप डाउनलोड करावे लागेल. यानंतर, जर तुम्ही भाग्यवान असाल तर तुम्ही BSNL कडून बक्षीस जिंकू शकाल.

BSNL ची ही ऑफर नवीन ग्राहकांना आपल्याप्रति आकर्षित करण्यासाठी आणि जे ग्राहक सिमकार्ड असूनही रिचार्ज करत नाहीत अशा ग्राहकांनी रिचार्ज करण्यासाठी आणली आहे. तुम्ही अजूनही बीएसएनएलचे ग्राहक नसल्यास, तुम्ही नवीन सिम मोफत खरेदी करू शकता. कंपनीने मोफत 4G सिम कार्ड देत असल्याची सुद्धा घोषणा केली आहे. जर तुमच्याकडे जिओ एअरटेल किंवा वोडाफोन आयडीयाचे सिम असेल तर तुम्ही ते बीएसएनएल मध्ये पोर्ट करू शकता. तसा विचार केला तर देशातील सर्व टेलिकॉम ऑपरेटर्समध्ये BSNL चे रिचार्ज प्लॅन सर्वात स्वस्त आहेत. मात्र हाय-स्पीड नेटवर्कच्या कमतरतेमुळे, बीएसएनएल एअरटेल, जिओ ला टक्कर देऊ शकली नाही.

BSNL मध्ये मोबाइल नंबर पोर्ट कसा करायचा

सर्वप्रथम 1900 वर पोर्ट रिक्वेस्ट पाठवा.
यासाठी मेसेज बॉक्समध्ये ‘PORT स्पेस आणि 10 डिजिट मोबाइल लिहून पाठवा.
त्यानंतर BSNL सेंटरवर जाऊन आधारसह इतर माहिती द्या.
अशाप्रकारे तुमची पोर्ट रिक्वेस्ट पूर्ण होईल.

हार्दिक पंड्याला तिसरा धक्का?? मुंबई इंडियन्सचे कर्णधारपदही जाणार??

hardik pandya mumbai indians

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पत्नी नताशा सोबत घटस्फोट आणि भारतीय क्रिकेट संघाच्या उपकर्णधार पदावरून हटवल्यानंतर अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला (Hardik Pandya) तिसरा धक्का बसणायची शक्यता आहे. कारण आयपीएल मधील त्याचा संघ मुंबई इंडियस (Mumbai Indians) सुद्धा २०२५ च्या आयपीएल मधून हार्दिकचे कर्णधारपद काढेल अशा चर्चा सुरु आहेत. २०२४ च्या आयपीएल मध्ये मुंबईला हार्दिकला गुजरात मधून रिटेन केलं आणि रोहित शर्माच्या जागी कर्णधार सुद्धा केलं मात्र मुंबई इंडियसच्या सुमार कामगिरीमुळे हार्दिक टीकाकारांचा धनी बनला होता. पुढील सत्राआधी आयपीएलचा लिलाव होणार असल्याने मुंबई नेमकी काय भूमिका घेते ते पाहायला हवं.

पुढील आयपीएलसाठी मेगा लिलाव होणार आहे. बीसीसीआयने अद्याप स्पष्ट केलेले नाही की फ्रँचायझी किती खेळाडूंना कायम ठेवू शकते. मुंबईचा सूर्यकुमार यादव भारतीय टी-२० संघाचा कर्णधार झाल्याने त्याला मुंबईचा संघ कायम ठेवेल हे नक्की आहे.. रोहित शर्माचा फॉर्म आणि देशभरात त्याची वाढलेली लोकप्रियता पाहता मुंबईचा संघ रोहितला सोडेल अशी अजिबात शक्यता नाही आणि जसप्रीत बुमराह सारख्या मॅचविनर गोलंदाजाला सोडण्याची महाचूक मुंबई सारखी मुरब्बी फ्रॅन्चायजी करणार नाही हे सुद्धा तितकंच खरं आहे. जर ४ खेळाडू कायम ठेवण्याची परवानगी मिळाली तर मुंबई हार्दिकला सुद्धा संघात कायम ठेवेल मात्र तो मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी कायम राहणार की त्याचं कर्णधारपद हिसकावून घेणार, हे आगामी काही दिवसात स्पष्ट होईल.

दरम्यान, T20 वर्ल्ड कप-2024 नंतर रोहित शर्माने T20 मधून क्रिकेटला रामराम ठोकल्यानंतर उपकर्णधार असलेला हार्दिक पंड्याच भारताचा पुढचा कप्तान होईल असं बोललं जात होते. मात्र गौतम गंभीर प्रशिक्षक झाल्यानंतर उलटच घडलं. हार्दिकला कर्णधार तर केलं नाहीच याउलट त्याच्याकडील उपकर्णधार पद सुद्धा काढून घेण्यात आलं. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनीही पांड्याला कर्णधारपदासाठी योग्य मानले नाही. याचे कारण त्याचा फिटनेस होता. हार्दिकचा खराब फिटनेस आणि सततच्या दुखापतीमुळे त्याच्याकडील उपकर्णधार काढून घेण्यात आलं असल्याचे बोलले जातंय. आता जर मुंबई इंडियन्सने सुद्धा त्याच्याकडील कर्णधारपद काढलं तर मग हार्दिक पंड्यासाठी हा तिसरा मोठा धक्का असेल.

Budget 2024 : आगामी अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्रासाठी काय ?

Budget 2024: येत्या 23 जुलै रोजी 2024 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. यामध्ये मोठ्या वेगाने विस्तारत असलेल्या रिअल इस्टेट क्षेत्राची काय अपेक्षा आहे ? रिअल इस्टेट क्षेत्रातील तज्ञ (Budget 2024) व्यक्तींचे काय म्हणणे आहे ? चला जाणून घेउया…

केंद्रीय अर्थसंकल्प 2024 जसजसा जवळ येत आहे, रिअल इस्टेट क्षेत्राला परवडणारी घरे आणि गृहखरेदीदारांच्यासाठी प्रमुख धोरणात्मक सुधारणा आणि बजेट वाटपाची अपेक्षा आहे. तज्ञांना या क्षेत्रासाठी अनेक सुधारणा अपेक्षित आहेत, ज्यात एकसिंगल-विंडो क्लीयरन्स प्रणालीसह क्षेत्रासाठी (Budget 2024) उद्योग स्थिती समाविष्ट आहे. सहकारी क्षेत्र लहान-मोठ्या सहकारी ग्राहकांसाठी वस्तू आणि सेवा कर (GST) दर कमी करण्याचा विचार अपेक्षित आहे , ज्यामुळे स्टार्टअप्सना प्रोत्साहन मिळेल.

उद्योग स्थिती आणि कर प्रोत्साहन (Budget 2024)

बाजारातील तज्ञांचे म्हणणे आहे की रिअल इस्टेट क्षेत्राला उद्योगाचा दर्जा दिल्याने गुंतवणूक आकर्षित होईल आणि नियमांमध्ये सुसूत्रता येईल. उद्योगाचा दर्जा मिळाल्याने रिअल इस्टेटमधील गुंतवणूक वाढेल आणि नियमावली सोपे होईल. यामुळे रिअल इस्टेट क्षेत्राच्या जलद वाढीचा मार्ग मोकळा होईल, जे शेवटी एकूण अर्थव्यवस्थेसाठी उपयुक्त ठरेल. शिवाय गृहकर्जाच्या व्याजावरील कर सवलत किमान ५ लाखांपर्यंत वाढवावी, अशी मागणीही बिल्डरांनी (Budget 2024) केली आहे.

नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (NAREDCO) चे अध्यक्ष हरी जी बाबू म्हणाले की, वित्त मंत्रालयाने आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात 50,000 रुपयांच्या निधीसह स्वामिह निधीचा दुसरा भाग आणावा. इतर अर्थसंकल्पीय सहाय्य आणि सवलतींसह जीएसटी अंतर्गत इनपुट टॅक्स क्रेडिटला (Budget 2024) परवानगी देणे आणि सर्व लक्ष्यांसाठी घरे साध्य करण्यासाठी भाड्याने घेतलेल्या घरांसाठी प्रोत्साहन द्यावे.

सहकारी क्षेत्र (Budget 2024)

संस्थापक मानस मेहरोत्रा ​​यांच्या म्हणण्यानुसार, छोट्या प्रमाणातील सहकारी क्लायंटसाठी कमी वस्तू आणि सेवा कर (GST), लहान स्टार्टअप्समध्ये रेखांकन करून आणि सरकारी महसूल संकलनाला चालना देऊन सहकारी उद्योगाला त्याचा ठसा वाढविण्यात मदत करेल. याव्यतिरिक्त, उच्च मुद्रांक आणि नोंदणी शुल्कामध्ये सवलत किंवा आयकर अंतर्गत खर्च म्हणून भरलेल्या शुल्काच्या दुप्पट परवानगी (Budget 2024) दिल्यास अगदी लहान करारांना नोंदणी करण्यास प्रोत्साहन मिळेल.

Manoj Jarange Patil : … तर सत्ता आपलीच; जरांगे पाटलांचं मिशन विधानसभा, पहा विजयाचा फॉर्म्युला??

jarange patil vidhan sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 4-5 जाती एकत्र आल्या तर सत्ता आपलीच असं म्हणत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकले आहे. एका जातीच्या मतांच्या आधारावर कुणीही निवडून येऊ शकत नाही. त्यासाठी जातीचे समीकरणं जुळवावे लागतं. राज्यात असा एकही मतदार संघ नाही ज्यात 50 हजार मराठा नाहीत. एका जातीवर कोणीच निवडून येऊ शकत नाही. चार-पाच जाती एकत्र आल्या तर सत्ता आपलीच येणार असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे आजपासून पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. जोपर्यंत सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत हे उपोषण सुरू राहणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना जरांगे पाटलांनी सर्वच राजकीय पक्षांना इशारा दिला आहे. 20 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट दरम्यान मतदार संघनिहाय चर्चा करायची आहे. जे कोणी इच्छुक विधानसभा लढवण्यास इच्छुक आहेत त्यांनी आंतरवली सराटी येथे यावं असं आवाहन जरांगे पाटील यांनी केलं आहे. आपल्य आंदोलनाला 29 ऑगस्ट रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. त्याच दिवशी उमेदवार पाडायचे की निवडून आणायचे याचा निर्णय घेतला जाणार आहे, जो म्हणेल ओबीसीमधून तुमची मागणी पूर्ण करू त्याला निवडून आणायचं असं म्हणत 29 ऑगस्टला कसा डाव टाकतो बघा असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिलाय.

दरम्यान, आज पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसल्याने सरकारच टेन्शन वाढलं आहे. सगेसोयरेची अंमलबजावणी करा, मराठा समाजातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या, तीनही गॅझेट लागू करा अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे केली आहे. मराठा समाजाच्या मुलांना नोकरभरती, ऍडमिशनमध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. Ews सुरू ठेवावे. Ecbc आणि कुणबी हे तीनही प्रमाणपत्र सुरू ठेवावे, अशी मागणी सुद्धा त्यांनी यावेळी केली आहे.