Sunday, December 21, 2025
Home Blog Page 587

के एल राहुल RCB च्या ताफ्यात सामील होण्याची शक्यता; लखनौला धक्का बसणार?

KL Rahul RCB

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । IPL २०२५ पूर्वी एक मोठी अपडेट समोर येत आहे. लखनऊ सुपर जायंटचा कर्णधार केएल राहुल (K L Rahul) संघाची साथ सोडून रॉयल चॅलेंजर बंगळुरू मध्ये सामील होऊ शकतो. दैनिक जागरणच्या अहवालानुसार राहुल आणि लखनौ फ्रँचायझी यांच्यातील संबंध आणखी बिघडले आहेत. काही महिन्यांपूर्वी एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये संजीव गोयंका आणि केएल राहुल यांच्यात जोरदार वाद झाला होता. त्यामुळेच आता के एल राहुल लखनौच्या संघाची साथ सोडणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

आयपीएलच्या आगामी हंगामापूर्वी अनेक मोठे बदल आणि घडामोडी पाहायला मिळू शकतात. बीसीसीआय आणि फ्रँचायझी मालकांमध्ये लवकरच एक बैठक होणार असून किती खेळाडूंना रिटेन करता येईल? यासारख्या अनेक मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते. मोठा लिलाव असल्याने अनेक बडे खेळाडू त्यामध्ये पाहायला मिळू शकतील. त्यामध्ये के एल राहुल सुद्धा असू शकतो. राहुल २०२२ पासून लखनौच्या संघाचे नेतृत्व करत आहे मात्र दमदार खेळाडू असूनही संघाला अपेक्षित यश त्याच्या नेतृत्वाखाली मिळालं नाही. मागच्या हंगामात सुद्धा लखनौचा संघ ७ व्या क्रमांकावर होता. त्यामुळे राहुल आणि लखनौचे संबंध बिघडल्याची चर्चा आहे.

दुसरीकडे रॉयल चॅलेंजर बंगळुरूला सुद्धा भविष्याच्या दृष्टीने भारतीय कर्णधाराची गरज आहे. २०२२ मध्ये विराट कोहलीने आरसीबीचे कर्णधारपद सोडल्यानंतर फाफ डू प्लेसिस संघाचा नवा कर्णधार बनला, पण आता ४० वर्षीय फॅफ फ्रँचायझीला फार काळ साथ देऊ शकेल असं वाटत नाही. के एल राहुल हा मूळचा कर्नाटकचाच आहे. राहुलने 2013 मध्ये RCB सोबत आयपीएल कारकिर्दीची सुरुवात केली आणि नंतर हैदराबादच्या संघात तो सामील झाला 2016 मध्ये अंतिम फेरीत पोहोचलेल्या RCB संघाचा एक भाग होता. नंतर तो लखनऊ सुपर जायंटचा कर्णधार झाला. आता पुन्हा एकदा तो आरसीबीच्या ताफ्यात आपल्याला दिसू शकतो.

तुम्हीही फ्रिजमध्ये ठेवलेल्या पिठाच्या चपात्या करता का? जाणून घ्या नुकसान

chapati
chapati

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | चपाती ही आपल्या भारतीय जीवनातील एक अत्यंत महत्त्वाचा असा पदार्थ आहे. प्रत्येक भारतातील घरामध्ये चपाती ही केली जाते, चपातीशिवाय जेवण अपूर्ण मानले जाते. परंतु चपाती करताना त्याआधी पीठ मळणे. हा महिलांसाठी खूप मोठा टास्क असतो. सकाळी ऑफिसची त्याचप्रमाणे मुलांच्या शाळेची गडबड असल्याने अनेक महिला या रात्री पीठ मळून फ्रीजमध्ये ठेवतात. आणि सकाळी उठल्यानंतर त्याच्या चपात्या बनवतात. परंतु फ्रीजमध्ये ठेवलेले पीठ आपल्या आरोग्यासाठी कितपत योग्य आहेत. त्याने आपल्या आरोग्यावर कसा परिणाम होतो?हे आपण जाणून घेणार आहोत.

तुम्ही जर रात्री फ्रीजमध्ये ठेवलेल्या पिठाच्या चपात्या सकाळी करत असाल, तर त्याचा आपल्या पचनसंस्थेवर खूप परिणाम होतो. तुम्ही जर वारंवार हेच करत असाल, तर त्यामुळे तुम्हाला गॅस, एसिडिटी, अपचन यांसारख्या समस्या वारंवार उद्भवतात. त्याचप्रमाणे जर तुम्ही मळलेले पीठ जास्त वेळ फ्रीजमध्ये ठेवले, तर त्याला बुरशी येऊ शकते. आणि अशा पीठामुळे आपल्याला अनेक आजार देखील होऊ शकतात.

चपातीचे पीठ मळून जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवले, तर त्यावर बॅक्टेरिया जमा होण्याची शक्यता असते. अशा पिठापासून जर तुम्ही चपात्या बनवल्या, तर त्याची चव देखील बदलते. आणि रंग देखील बदलतो त्यामुळे हे पीठ आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असते.

त्याचप्रमाणे रात्री मळलेल्या पिठाच्या जर तुम्ही सकाळी चपट्या बनवत असाल, तर त्यातील पोषकतत्व कमी होतात. ज्याचा आपल्या शरीराला काहीच फायदा होत नाही. त्यामुळे जास्त वेळ पीठ म्हणून ते फ्रीजमध्ये ठेवू नका. किंवा त्याच्या नंतर चपात्या देखील करून खाऊ नका. आणि त्याचा तुमच्या आरोग्यावर खूप विपरीत परिणाम होऊ शकतो.

Viral Video | अजब – गजब ! चक्क 32 दातांसह झाला मुलीचा जन्म; महिलेने सोशल मीडियावर दिली माहिती

Viral Video

Viral Video | सोशल मीडियावर सध्या अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. ज्यामुळे वेगवेगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचतात. अशातच एक व्हिडिओ (Viral Video) समोर आलेला आहे. ज्यामध्ये जन्मलेल्या बाळाला चक्क दात आलेले आहेत. लहान मुलांना शक्यतो सहा महिने ते बारा महिन्यांच्या दरम्यान दात येणे सुरू होतात. काही मुलांना तर एक- दोन वर्षाचे होईपर्यंत दात येत नाही. परंतु सध्या अमेरिकेतील एका महिलेने असा दावा केलेला आहे की, तिच्या लहान मुलाने 32 दातांसह जन्म घेतलेला आहे. त्याचप्रमाणे त्या मुलाचा व्हिडिओ पाहून सगळेजण आश्चर्यचकित झालेले आहे. ही एक अत्यंत दुर्लभ अशी स्थिती आहे. जी ज्याला नेटल टीथ किंवा बेबी टीथ असे म्हणतात. याला जन्मजात आलेले दात असे देखील म्हणतात.

अमेरिकेमधील टेक्सास मधील डल्लास येथे राहणाऱ्या निका दिवा नावाच्या एका महिलेने एका लहान मुलाला जन्म दिलेला आहे. परंतु एका दुर्लभ स्थितीबाबत जागरूकता पसरवण्यासाठी तिने हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. तिचे असे म्हणणे आहे की, तिची मुलगी 32 दातांसह जन्मलेली आहे. यासाठी त्यांनी एक व्हिडिओ देखील शेअर केलेला आहे. तेव्हा त्या मुलीच्या जन्मानंतरचा फोटो दिसत आहे.

https://www.instagram.com/reel/C3N6PCeulxS/?utm_source=ig_embed&ig_rid=719fce77-f9f0-485c-b708-4efd1190577f

या महिलेच्या म्हणण्यानुसार जेव्हा तिने पहिल्यांदा तिच्या मुलीला कुशीमध्ये घेतले, तेव्हा त्या मुलीचे लाभ संपूर्ण दात होते. आणि ते पाहून तिला खूपच आश्चर्य वाटले. तिने जेव्हा हे डॉक्टरांना सांगितले. तेव्हा डॉक्टरांनी तिलाही अत्यंत दुर्लभ अशी स्थिती असल्याचे सांगितलेले आहे. परंतु सोशल मीडियावर तिनेही जागरूकता पसरवण्यासाठी व्हिडिओ शेअर केलेला आहे. या महिलेने सांगितलेली आहे की, ही कोणत्याही प्रकारची मस्करी नाहीये. ही लहान मुलांमध्ये असणारी अत्यंत दुर्लभ स्थिती आहे आणि याबाबत जागरूकता पसरवण्यासाठी तिने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलेला आहे.

या प्रकारची स्थिती ही कोणत्याही बालकांसाठी अत्यंत गंभीर अशी परिस्थिती बनत नाही. परंतु जर त्या बाळाचे दात तुटले तर ते बाळ ते दात गिळण्याची देखील शक्यता असते. त्याचप्रमाणे आईचे दूध पिताना देखील या दातांमुळे मोठ्या प्रमाणात समस्या येऊ शकतात.

Ajit Pawar : मी अजित अनंतराव पवार, महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की…..

Ajit Pawar cm

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा काही लपून राहिलेली नाही. अजितदादांनी सुद्धा अनेकदा जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. फक्त अजित पवारच नव्हे तर त्यांच्या समर्थकांची सुद्धा इच्छा आहे कि एक ना एक दिवस दादा मुख्यमंत्री व्हावेत… त्यामुळेच अजित दादांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवडमधील समर्थकांनी एक अनोखा केक आणलाय ज्यावर लिहिलं आहे कि मी अजित अनंतराव पवार, महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की… अजित पवारांच्या या केकची चर्चा पुणे शहरात चांगलीच रंगली आहे.

उद्या म्हणजेच २२ जुलैला अजित पवारांचा वाढदिवस आहे. त्यापार्श्वभूमीवर अजितदादाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला आहे. त्यातच आगामी विधानसभा निवडणूक सुद्धा अवघ्या ३ महिन्यावर आली असून अजित पवारांना आता तरी मुख्यमंत्रीपद मिळावं अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना आहे. त्याच पार्श्वभूमीवर हा अनोखा केक तयार करण्यात आलाय. हा केक कापून अजित पवार यांनी वाढदिवसाच्या एका दिवस अगोदरच कापला. केक कापल्यानंतर अजित पवारांनी केक खाल्ला. यावेळी केकवरील मजकूर वाचून अजितदादांच्या चेहऱ्यावरील उमटलेले स्मित हास्य देखील लपून राहिले नाही.

अजित पवार पिंपरी चिंचवड दौऱ्यावर –

पिंपरी चिंचवड मध्ये शरद पवारांनी अजित पवार गटाचे अनेक माजी नगरसेवक आणि नेत्यांना आपल्या पक्षात प्रवेश देत बालेकिल्ल्यातच दादांना धक्का दिला. यामध्ये शहराध्यक्ष अजित गव्हाणें यांचाही समावेश असल्याने दादा गट बॅकफूटवर गेलाय. या पडझडीनंतर अजित पवार सुद्धा सक्रिय झालेत. आज अजितदादा पवार पिंपरी चिंचवड दौऱ्यावर असून माजी नगरसेवक आणि पदाधिकारी यांच्याशी ते व्यक्तिगत संवाद साधणार आहेत. तसेच बैठका आणि मेळावा सुद्धा घेण्याची शक्यता आहे. शरद पवारांनी आपली आणखी काही माणसे गळाला लावू नयेत म्हणून अजित पवार आता ऍक्शन मोड मध्ये आलेत.

Weather Update | महाराष्ट्रासाठी पुढील काही दिवस धोक्याचे; ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Weather Update

Weather Update | गेल्या दोन दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रात चांगलाच पाऊस कोसळताना दिसत आहे. जुलैच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात चांगली हजेरी लावलेली आहे. 1 जुलै ते 20 जुलै या दरम्यान पावसाची खूप चांगली नोंद झालेली आहे.

भारतीय हवामान विभाग (Weather Update) देखील हवामानाबद्दलचा अंदाज रोज व्यक्त करत असतात. अशातच आता हवामान विभागाने अंदाज लावलेला आहे. ती म्हणजे पुढील दोन ते तीन दिवस महाराष्ट्रात चांगलाच मुसळधार पाऊस पडणार आहे. मुंबईत देखील शुक्रवारपासून पाऊस चांगलाच पडत आहे. मुंबई, ठाणे, वसई त्याचप्रमाणे विरारमध्ये देखील मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. नागपूरमध्ये देखील गेल्या दोन-तीन दिवसात चांगलाच पाऊस झालेला आहे. आणि हाच पावसाचा जर पुढील तीन ते चार दिवस सारखा राहणार आहे असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे.

सध्या बंगालचे उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालेले आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण वाढले असे दिसत आहे. मुंबई सह राज्यातील इतर भागांमध्ये देखील सुद्धा मुसळधार पाऊस (Weather Update) पडत आहे. आणि पुढील दोन ते तीन दिवस हा पावसाचा राहणार आहे यावेळी हवामान विभागाने आता काही जिल्ह्यांना ऑरेंज कलर देखील जारी केलेला आहे. तर काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केलेला आहे

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आता रायगड, रत्नागिरी, सातारा, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ या भागांना ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, कोल्हापूर या भागांना येलो अलर्ट जारी केलेला आहे. त्याचप्रमाणे इतर अनेक भागांमध्ये देखील पावसाचा अलर्ट जारी केलेला आहे.

Jio Recharge Plan | Jio ने आणला Hero 5G नवीन प्लॅन, प्रीपेड प्लॅनमध्ये मिळणार ‘या’ सुविधा

Jio Recharge Plan

Jio Recharge Plan | काही दिवसांपूर्वी जिओ, एअरटेल, वोडाफोन आयडिया यांसारख्या लोकप्रिय टेलिफोन कंपन्यांनी त्यांच्या रिचार्जच्या दरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ केलेली आहे. जिओने त्यांच्या रिचार्जची किंमत देखील खूप वाढवलेली आहे. त्यामुळे जिओचे खूप ग्राहक नाराज झालेले आहेत. अशातच आता जिओने (Jio Recharge Plan) काही नवीन योजनांचा देखील समावेश केला आहे. कंपनीने याला हिरो 5G असे नाव दिलेले आहे. आता या नवीन योजनाबद्दल आपण माहिती जाणून घेऊया. ज्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होईल.

98 दिवसांचा प्लॅन | Jio Recharge Plan

जि कडून अनेक योजना लॉन्च करण्यात आलेल्या आहे. यामध्ये 98 दिवसांच्या वैद्यतेसह एक विशेष योजना आहे. या मध्ये तुम्हाला दररोज 2 जीबी डाटा दिला जातो. हा एक डेटा प्लॅन आहे. त्यामुळे तुम्हाला जर डेटाची कमतरता असेल, तर तुम्ही या प्लॅनचा नक्कीच उपभोग घेऊ शकता.

999 रुपयांचा प्लॅन

जिओच्या या 999 च्या प्लॅनमध्ये दररोज तुम्हाला 100 SMS ची सुविधा दिली जाते. आणि खास गोष्ट म्हणजे याला अनलिमिटेड कॉलिंगचाही पर्याय आहे. मर्यादित डाटा देखील तुम्ही यामध्ये वापरू शकता. त्यामुळे या प्लॅनचा सध्या अनेक लोक लाभ घेतात.

आता WhatsApp वरूनही भरा ITR; पहा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

ITR Filling By WhatsApp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ITR म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न फाईल भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै आहे. म्हणजेच अवघे १० दिवस यासाठी राहिले असून काही तांत्रिक समस्यांमुळे, रिटर्न भरण्याची अंतिम तारीख वाढवली जाण्याची शक्यता आहे. करदाते आयटीआर भरण्यासाटी CA कडे जातात आहेत किंवा कोणत्या तरी थर्ड पार्टी अँपच्या माध्यमातुन इन्कम टॅक्स रिटर्न भरत आहेत. परंतु तुम्हाला माहितेय का? तुम्ही आता WhatsApp वरूनही ITR भरू शकता. होय, हे खरं आहे. त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात आणि काय प्रोसेस आहे ते आज आम्ही तुम्हाला अगदी सविस्तर पद्धतीने सांगणार आहोत. (ITR Filling By WhatsApp)

व्हॉट्सॲपवर आयटीआर भरण्याची ही खास पद्धत 2 कोटींहून अधिक गिग कामगारांसाठी तयार करण्यात आली आहे ज्यांना क्लिष्ट कर फॉर्म भरण्यात अडचण येते आणि त्यांचा कर परतावा मिळण्यात ते चुकतात . सध्या, तुम्ही या पद्धतीने फक्त ITR 1 आणि ITR 4 फॉर्म भरू शकता. खास कुणी हा ITR पगारदार वर्ग आणि कमी उत्पन्न असलेल्या लोकांसाठी भरला जातो. तुम्ही व्हॉट्सॲपवर चॅटद्वारे थेट तुमचा इन्कम टॅक्स रिटर्न सहज भरू शकता. ही सेवा इंग्रजी, हिंदी, कन्नड अशाप्रकारे एकूण 10 भाषांमध्ये दिली जात आहे. या प्लॅटफॉर्मवर एक पूर्णपणे सुरक्षित पेमेंट एग्रीगेटर सिस्टीम आहे, जी यूजर्सना व्हॉट्सॲप इंटरफेसमध्ये फाइल करण्यापासून पेमेंटपर्यंतची संपूर्ण प्रोसेस पूर्ण करू देते.

WhatsApp द्वारे ITR रिटर्न कसा भरावा?

सर्वात आधी Clear Tax चा WhatsApp नंबर सेव्ह करा आणि Hi टाइप करा.
यानंतर तुमची भाषा निवडा. करदात्यांना इंग्रजी, हिंदी तसेच 10 भाषांपैकी कोणतीही एक भाषा निवडावी लागेल.
आता तुमचा पॅन क्रमांक, आधार क्रमांक, बँक तपशील इत्यादी माहिती त्यामध्ये भरा
पुढे, AI Bot च्या मदतीने, ITR-1 किंवा ITR-4 भरा.
फॉर्म भरल्यानंतर तो पुन्हा तपासा आणि आवश्यक ठिकाणी चुकीची माहिती दुरुस्त करा.
पेमेंट प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, तुम्हाला WhatsApp वरच एक मेसेज येईल.

दहशतवादी नेटवर्क आणि त्यांच्या सहाय्यक इको-सिस्टमचा नायनाट करा- अमित शाह

Amit Shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय गृहमंत्री श्री अमित शाह (Amit Shah) यांनी विविध सुरक्षा आणि कायदा अंमलबजावणी एजन्सींच्या प्रमुखांसोबत देशाच्या सुरक्षा आव्हानांना सामोरे जाणाऱ्या आसूचना ब्यूरो (IB) च्या Multi Agency Centre (MAC) च्या कार्यपद्धतीची पुनरावलोकन करण्यासाठी नवी दिल्ली येथे एका उच्चस्तरीय बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, MAC फ्रेमवर्क त्याच्या पोहोच आणि परिणामकारकता वाढवण्यासाठी मोठ्या तांत्रिक आणि ऑपरेशनल सुधारणा लागू करण्यास तयार आहे.

अमित शहांसाठी यांनी देशातील उदयोन्मुख सुरक्षा धोक्यांच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी दहशतवादी नेटवर्क आणि त्यांच्या सहाय्यक इको-सिस्टमला संपवण्यासाठी सर्व एजन्सींच्या अधिक समन्वयावर जोर दिला .MAC ला अंतिम प्रतिसादकर्त्यांसह विविध हितधारकांमध्ये सक्रिय आणि रिअल-टाइम कार्य करण्यायोग्य माहिती सामायिक करण्यासाठी 24X7 काम करत राहावे यावर त्यांनी भर दिला. अमित शाह यांनी राष्ट्रीय सुरक्षेत सहभागी सर्व एजन्सींकडून तरुण, तांत्रिकदृष्ट्या कुशल आणि उत्साही अधिकाऱ्यांची एक टीम गठित करण्यावर जोर दिला, जेणेकरून Big Data आणि AI/ML संचालित विश्लेषण आणि तांत्रिक प्रगतीचा वापर करून दहशतवादी इकोसिस्टमला संपवता येईल.

नवीन आणि उदयोन्मुख सुरक्षा आव्हानांच्या दृष्टीने आम्हाला आमच्या प्रतिसादात नेहमी एक पाऊल पुढे राहावे लागेल अशा सूचना शहांनी दिल्या. तसेच देशभरातील गुप्तचर आणि अंमलबजावणी एजन्सींसह विविध सुरक्षा एजन्सींच्या प्रमुखांना राष्ट्रीय सुरक्षेसाठी ‘Whole of the Government’ दृष्टिकोन अंगीकारण्याचे निर्देश अमित शाह यांनी दिले.

विधानसभेला भाजप 160 जागा लढवणार?? मुख्यमंत्रीपदाबाबत काय ठरलं??

modi fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप १५० ते १६० जागा लढवण्याची शक्यता आहे. कोणत्याही परिस्थितीत विधानसभेच्या 155 पेक्षा कमी जागा लढवायच्या नाहीत, अशी भूमिका राज्यातील भाजप नेत्यांनी घेतल्याचे समजते. एका वृत्तवाहिनीने याबाबत बातमी दिली असून त्यामुळे अजित पवार गट आणि शिंदे गटाला किती जागा मिळणार हा प्रश्नच आहे. तसेच मुख्यमंत्री पदाबाबत आत्ताच कोणताही निर्णय घेण्यात येणार नसून निकालानंतरच याबाबत घोषणा करण्यात येईल असेही भाजपचं ठरल्याचं बोललं जात आहे.

अमित शाह यांच्या उपस्थितीत आज पुण्यात भाजप प्रदेश कार्यकारिणीचे अधिवेशन पार पडणार आहे. यावेळी अमित शाह भाजप नेत्यांना काय संदेश देतात? कोणती रणनीती राबवण्यास सांगतात? याकडे सर्वांचे लक्ष्य आहे. लोकसभेत भाजपला चांगलाच फटका बसला होता, अनेक ठिकाणी दिग्गज नेत्यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी भाजप ऍक्शन मोड मध्ये आलं आहे. भाजपच्या राज्यातील नेत्यांनी दिल्लीत १६०च्या खाली एकही कमी जागा लढवायची नाही, अशी ठाम भूमिका घेतली आहे. मात्र, दिल्लीतून १५५ ते १६० च्यामध्ये ग्रीन सिग्नल मिळेल असेही आशा भाजपला आहे.

मुख्यमंत्री कोण होणार?

भाजपाला खरं तर संपूर्ण महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणायची होती, पण आता २८८ जागा लढण्याची वेळ आता निघून गेली आहे. त्यामुळे जे आमदार ज्या पक्षातून निवडून आले आहेत, त्या जागा त्याच पक्षाकडे ठेवल्या जातील, उर्वरित जागांचे वाटप कसे करायचे हाच प्रश्न महायुतीपुढे आहे. तसेच विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर न करता सामूहिक नेतृत्त्वाखाली लढायचे, अशी भाजपची रणनीती आहे. भाजपने कधीही, कोणाचे नाव पुढे करून विधानसभेच्या निवडणुका कुठल्याही राज्यात लढवलेल्या नाहीत. ज्या राज्यांमध्ये भाजपची एकहाती सत्ता होती, अशी राज्ये किंवा मित्र पक्षांसोबत सत्ता असणाऱ्या राज्यांमध्ये भाजपने निवडणुकीच्या आधी कधीही मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्रातही भाजपकडून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केला जाणार नाही अशी शक्यता आहे.

Pizza Corn: भाजलेले कणीस खाल्ले असेलच ट्राय करा; ‘क्रंची पिझ्झा कॉर्न’ रेसिपी

Pizza Corn: पावसाळ्याचे दिवस म्हंटले की मस्त थंडगार पावसाळी वातावरण आणि आशा पावसात भाजलेले मक्याचे कणीस … आहाहा ! अफलातून कॉम्बिनेशन पावसाळ्याच्या दिवसात तुम्ही गाड्यावर किंवा घरी बनवलेले कणीस आवर्जून खात असाल मात्र नेहमीप्रमाणे भाजलेले किंवा उकडलेले कणीस न खाता तुमच्या मान्सून कॉर्न ला थोडा हटके ट्विस्ट देऊया.. तुम्ही कॉर्न पिझ्झा नेहमीच खात असाल मात्र पिझ्झा कॉर्न कधी ट्राय केलाय का ? चला तर मग यंदाच्या पावसाळ्यात ही हटके रेसिपी नक्की ट्राय करा. पाहुयात ही रेसिपी Pizza Corn कशी बनवायची

साहित्य Pizza Corn

दोन कॉर्न ,वन फोर्थ कप कॉर्न फ्लेक्स, दोन टेबलस्पून पिझ्झा सॉस, एक टेबलस्पून मेयोनीज ,अर्धा टीस्पून काळे मीठ, अर्धा टीस्पून काळीमिरी, अर्धा टीस्पून लाल तिखट, एक टीस्पून चीली फ्लेक्स, एक टीस्पून ओवा, एक टीस्पून चाट मसाला व दोन टेबलस्पून कोथिंबीर एक टेबलस्पून लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ.

कृती Pizza Corn

क्रंची पिझ्झा कॉर्न (Pizza Corn) बनवण्यासाठी सर्वप्रथम कोर्न सोलून घ्या. मीठ मिसळलेल्या पाण्यात ते झाकून दहा मिनिटे उकाडाण्यासाठी ठेवा. दुसऱ्या एका बाऊलमध्ये पिझ्झा सॉस मेयॉनीज , मीठ, काळे मीठ, काळीमिरी, लाल तिखट, चिली फ्लेक्स, ओवा, चाट मसाला ,कोथिंबीर, लिंबाचा रस आणि बटर घालून सर्व नीट मिक्स करून घ्या. मॅरिनेशन तयार करा. त्यानंतर मक्याच्या क्रंची टेस्ट साठी मिक्सरमध्ये कॉर्नफ्लेक्स थोडे जाडसर बारीक वाटून घ्या आणि एका प्लेटमध्ये पसरवा यानंतर पाण्यातून उकडलेला मका काढून त्यावरचे अतिरिक्त पाणी कापडाने वाळवून घ्या. त्यानंतर त्यावर ब्रशच्या सहाय्याने मॅरीनेट केलेली पेस्ट लावा. यानंतर हा मका बारीक केलेला कॉर्नफ्लेक्स मध्ये कोट करून घ्या. यानंतर हा मका गॅसवर एक मिनिटासाठी भाजून घ्या. तुमचा चविष्ट क्रंची पिझ्झा कॉर्न तयार आहे.