Sunday, December 21, 2025
Home Blog Page 589

लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात रमेश कराड यांचं आव्हान कायम

Latur Dhiraj Deshmukh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विलासराव देशमुख या नावानं लातूरला (Latur) सामाजिक, आर्थिक आणि राजकीय ओळख मिळवून दिली…. काम करण्याची इच्छाशक्ती असेल तर कितीही संकट आली तरी बदल हा होतोच, हे विलासरावांच्या राजकारणाने दाखवून दिल… महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले विलासरावांच्या राजकारणाचा बेस याच मतदारसंघात तयार झाला… आणि आता त्यांच्या पश्चातही तोच वारसा सुपुत्र धीरज देशमुख (Dhiraj Deshmukh) पुढे चालवतायत… विलासराव देशमुखांचा मतदारसंघ म्हणून ओळख असणाऱ्या या लातूर ग्रामीणमध्ये धीरज देशमुख गुलाल उधळून ही परंपरा अशीच चालू ठेवणार का? रमेश कराड हे नाव देशमुखांना येत्या विधानसभेला जड जाऊ शकतं का? या सगळ्या प्रश्नांसोबतच लातूर ग्रामीण विधानसभेचा सातबारा पाहूया,

शिवराज पाटील आणि नंतर विलासराव देशमुख यांच्यामुळे लातूरमध्ये फक्त आणि फक्त काँग्रेसचीच हवा आहे… इथला मतदारही नेहमी काँग्रेसशीच एकनिष्ठ राहिला… त्याचाच परिणाम म्हणूनच की काय भाजपने देशमुखांचा हा बालेकिल्ला फोडण्याचा कित्येकदा प्रयत्न करूनही तो इथल्या जनतेनं नेहमीच हाणून पाडला… तसं पाहायला गेलं तर मतदारसंघ पुनर्रचनेपूर्वी म्हणजेच 2009 पूर्वी लातूर ग्रामीण हा मतदारसंघ रेनापुर या नावाने ओळखला जायचा… आणि इथले आमदार असायचे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे… होय… लातूर आणि बीड अगदीच चिकटून असल्यामुळे इथल्या सामाजिक अस्तित्वा सोबतच इथलं राजकारणही एकमेकांच्यात मिसळून जायचं… पण 2009 ला रेनापुर, लातूर आणि औसा तालुक्यातील काही गावांचा मिळून नवा लातूर ग्रामीण विधानसभा अस्तित्वात आला… बदलती समीकरण लक्षात घेऊन यानंतर हा मतदारसंघ काँग्रेसचा झाला… 2009 ला वैजनाथ शिंदे यांना देशमुखांनी तिकीट देऊन निवडून आणलं…यानंतर 2014 ला त्र्यंबक भिसे हे विजयी झाले… 2019 ला मात्र देशमुखांची पुढची पिढी राजकारणात उतरली… जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकारणात उतरलेल्या धीरज देशमुखांनी भाजपच्या रमेश कराड यांना मात देत काँग्रेसचा गड सेफ केला… आणि मतदार संघ तयार झाल्यानंतर काँग्रेसकडे असला तरी देशमुख कुटुंबाकडे हा मतदारसंघ सुपूर्त झाला…

लातूर ग्रामीण बाबत स्पेसिफिक बोलायचं झालं तर या पट्टयात विलासराव देशमुखांनी आधीपासूनच मतदार संघासाठी निधी आणून विकासकामं केली आहेत… त्यामुळे विकासाच्या मुद्द्याची लाईन पुढे रेटत याही टर्मला धीरज देशमुख प्रचार करताना दिसतील… त्यात पाच साखर कारखाने आणि जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्या राजकारणावर होल्ड असल्यामुळे सहकार आणि शेतकऱ्यांशी त्यांचा थेट कनेक्ट येतो… अगदी जिल्हा परिषदेपासून ते बाजार समित्यांवरही देशमुख बंधूंची एक हाती सत्ता राहिलीये… त्यामुळे याही टर्मला धीरज देशमुखांना विजयी होण्यासाठी एक्स्ट्रा एफर्ट घेण्याची गरज पडणार नाही, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे… फक्त कारखानदारी व्यतिरिक्त इतर औद्योगिक प्रकल्प नसणे आणि घराणेशाहीचा ठपका या गोष्टीच त्यांना सध्या तरी मायनस मध्ये घेऊन जातायत…विधानसभेला नेमकं काय होईल? याची लिटमस टेस्ट समजल्या जाणाऱ्या लोकसभा निवडणुकीत लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवाराच्या पाठीशी तब्बल 17 हजारांचं घसघशीत लीड मिळवून देण्यात देशमुखांना यश आल्याने धीरज देशमुखांची आमदारकी सध्या तरी सेफ झोनमध्ये आहे, असं प्रेडिक्शन आपल्याला करता येऊ शकतं…

इथल्या जातीय समीकरणांचा विचार करायचा झाला तर इथं मराठा समाजाचं वर्चस्व असल्याचं पाहायला मिळतं… तर औसा तालुक्यात लिंगायत समाज मोठ्या प्रमाणावर आहे… तरुणांच्या हाताला काम नसण आणि रखडलेली लग्न हे देखील लातूर ग्रामीणचं सामाजिक वास्तव होऊन बसलय…. भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश आप्पा कराड लातूर ग्रामीणचे संभाव्य उमेदवार असतील, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे… त्यामुळे कराड विरुद्ध देशमुख अशी इंटरेस्टिंग लढत यावर्षी मतदारसंघात पाहायला मिळू शकते… भाजपाकडून रमेश कराड यांना दोन वेळा संधी देण्यात आली होती. दोन्ही वेळेस रमेश कराड यांचा पराभव झाला होता. 2019 मध्ये तिसऱ्या वेळेस संधी घेऊन रमेश कराड यांना लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून निवडून यायचं होतं. मात्र, ऐनवेळी ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली. पंधरा वर्षापासून तयारी करणार रमेश कराड यांना तो मोठा झटका होता.

धीरज देशमुख यांची पॉलिटिकल लॉन्चिंग यामुळे अतिशय सोपी झाली होती. धीरज देशमुख नकोत आणि नोटाला मतदान करा असा प्रचार यावेळी करण्यात आला… त्याचाच इम्पॅक्ट म्हणून काँग्रेस नंतर दोन नंबरची सर्वाधिक मतं ही नोटाला पडली होती, यावरून कराड हे इथले तगडे उमेदवार आहेत हे नाकारून चालत नाही… .पण लोकसभेच्या निकालाचा अंदाज, बंधू अमित देशमुखांचा जिल्ह्यावर आलेला होल्ड आणि राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाची ताकद पाठीशी लागणार असल्याने धीरज देशमुख यांचं पारड सध्यातरी जड दिसतंय… असं म्हणायला हरकत नाही…. एकूणच लातूर ग्रामीण देशमुख जिंकतीलच… पण सर्वसामान्यांच्या जीवन मरणाच्या आणि रोजंदारीच्या प्रश्नांवर इथल्या लोकप्रतिनिधींनी लवकरात लवकर तोडगा काढावा, एवढी काय ती अपेक्षा… बाकी लातूर ग्रामीणमध्ये धीरज देशमुख आणि रमेश कराड यांच्यात लढत झालीच, तर निवडून कोण येईल? तुमचा कौल कुणाला? ते आम्हा
ला कमेंट करून नक्की सांगा…

Gold Price Today : सोन्याच्या किमती पुन्हा आपटल्या; खरेदीची हीच ती वेळ?

Gold Price Today 20 july

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर तुम्ही सोने खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आहे. भारतीय सराफा बाजारात सोने- चांदीच्या दरात (Gold Price Today) आज घसरण झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किमती घसरल्याने ग्राहकांसाठी खरेदीची हीच ती वेळ म्हणता येईल. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आज २४ कॅरेट १० ग्राम सोन्याचा भाव 73410 रुपयांवर व्यवहार करत आहे. कालच्या तुलनेत या किमतीत 555 रुपयांची घसरण झाली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरात 1150 रुपयांची घट होऊन आज एक किलो 90609 रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

गुड रिटर्न वेबसाईट नुसारही सोन्या चांदीच्या दरात (Gold Price Today) मोठी घसरण पाहायला मिळाली. गुड रिटर्न नुसार, २२ कॅरेट १० ग्राम सोन्याचा भाव ६७८०० रुपये आहे, तर २४ कॅरेट १० ग्राम सोन्याचा दर ७३९७० रुपये आहे. सोन्याच्या किमतीत घसरण पाहायला मिळाल्याने ग्राहकांच्या चेहऱ्यावरची कळी खुलेल हे नक्की. तुम्ही मिस्ड कॉलद्वारे सुद्धा सोन्या-चांदीची किंमत तपासू शकता. 22 कॅरेट सोन्याचे आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. तुम्ही मिस्ड कॉल करताच तुम्हाला सोन्याच्या दराची माहिती एसएमएसद्वारे मिळेल.

गुड रिटर्न नुसार सोन्याचा भाव – Gold Price Today

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)-

पुणे- 67,800 रुपये
मुंबई – 67,800 रुपये
नागपूर – 67,800 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 73,970 रूपये
मुंबई – 73,970 रूपये
नागपूर – 73,970 रूपये

सोन्याची शुद्धता कशी तपासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

Diamond Layer On Mercury | शास्त्रज्ञाना बुध ग्रहावर चक्क सापडले हिरे, पण पृथ्वीवर आणणे अशक्य! कसे ते जाणून घ्या

Diamond Layer On Mercury

Diamond Layer On Mercury | आपल्या अवकाशामध्ये अनेक ग्रह तारे असतात. आणि या ग्रह ताऱ्यांबद्दल सगळ्यांनाच खूप उत्सुकता असते. आपले शास्त्रज्ञ देखील गेले कित्येक वर्षापासून सगळ्या ग्रहांवरील गोष्टींचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच आता बुध ग्रहावर शास्त्रज्ञांना मोठी गोष्ट सापडलेली आहे. शास्त्रज्ञांना बुध ग्रहाच्या पृष्ठभागावर हिरे (Diamond Layer On Mercury)सापडलेले आहे. परंतु हे हिरे पृथ्वीवर आणता येणार नाहीत. याबद्दल देखील त्यांनी अनेक गोष्टींचा शोध घेतलेला आहे.

बुध ग्रहामध्ये रहस्य | Diamond Layer On Mercury

बुधा एक असा ग्रह आहे. जिथे अनेक रहस्य दडलेली आहेत. या ग्रहावर सर्वत्र चुंबकीय क्षेत्र आहे. यामुळे ग्रहाचे चुंबकीय क्षेत्र हे पृथ्वीच्या तुलनेत खूपच कमकुवत आहे. कारण हा ग्रह खूपच लहान आहे आणि भौगोलिकदृष्ट्या जास्त सक्रिय नाही.

नासाच्या मेसेंजर मिशनने बुध ग्रहाच्या पृष्ठभागावर गडद रंग ग्रेफाईट म्हणून ओळखले होते. हे एक कार्बनचे रूप आहे. त्याचप्रमाणे बुध ग्रहाचे रहस्य त्याच्या आतील स्तराची संरचनेचा अभ्यास करूनच उघड होऊ शकते. अशी देखील माहिती मिळालेली आहे. याच प्रमाणे यान्हाओ ली, यांनी सांगितलेले आहे की, “आम्हाला शंका आहे की हा ग्रह इतर ग्रहांप्रमाणे तयार झालेला आहे. म्हणजेच गरम मॅग्मा उतरल्यानंतर पण बुध ग्रहातील मॅग्मा समुद्र कार्बन आणि सिलिकेटचे समृद्ध असावा. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात तिथे हिरे सापडले आहेत हा एक पूर्णपणे घन हिरा आहे.”

याआधी म्हणजे 2019 मध्ये देखील एक अभ्यासावर आला होता. ज्यावेळी बुध ग्रहाचे निरीक्षण करण्यात आले होते. त्यावेळी बुध ग्रहाचे आवरण हे पूर्वी लावलेल्या अंदाजापेक्षा पाच किलोमीटर खोल आहे. म्हणजेच गाभा आणि आवरण यांच्यामध्ये खूप दबाव निर्माण होऊन, त्यामुळे ग्रहाच्या आज असलेल्या कार्बन हिऱ्यांमध्ये बदलत असावा. त्यामुळेच हिऱ्याचा इतका जाड थर सापडलेला आहे असे अंदाज लावले जात आहे.

Wipro Job Hiring : Wipro चा मेगा प्लॅन!! 10 ते 12 हजार कर्मचाऱ्यांची भरती करणार

Wipro Job Hiring 12000 thousand

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध IT कंपनी Wipro ने 2025 या आर्थिक वर्षासाठी मोठा प्लॅन आखला आहे. त्यानुसार कंपनी 10,000 ते 12,000 लोकांची नियुक्ती करणार आहे. यामध्ये कॅम्पसच्या माध्यमातून नियुक्ती आणि कॅम्पस शिवाय होणाऱ्या नियुक्त्यांचा समावेश असेल. गेल्या दोन आर्थिक वर्षांत Wipro कंपनीने कर्मचाऱ्यांच्या संख्येत सातत्याने कपात केली होती. मात्र आता अचानक Wipro 10 ते 12 हजार कर्मचाऱ्यांची नियुती 2025 च्या आर्थिक वर्षात करणार आहे. त्यामुळे IT सेक्टर मध्ये काम करणाऱ्या तरुणांसाठी हि मोठी आनंदाची बाब म्हणावी लागेल.

30 जून 2024 रोजी संपलेल्या पहिल्या तिमाहीत, विप्रोने 3,000 हून अधिक नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. हेडकाउंटमध्ये सलग सहा तिमाहीत घट झाल्यानंतर या तिमाहीत 337 कर्मचाऱ्यांची वाढ नोंदवली गेली. कंपनीने पुढील आर्थिक वर्षासाठी सुद्धा अशाच प्रकारे तब्बल 10,000 ते 12,000 नोकर भरतीची योजना आखली आहे. आम्ही पुन्हा एकदा नोकरभरती करणार आहोत असं मुख्य मानव संसाधन अधिकारी सौरभ गोविल यांनी 19 जुलै रोजी कंपनीच्या Q1 कमाई परिषदेदरम्यान सांगितले.

ते पुढे म्हणाले, विप्रो FY25 मध्ये दिलेल्या सर्व जॉब ऑफर पूर्ण करण्याच्या प्रक्रियेत आहे. आम्ही काही संस्थांसोबत आमचे संबंध आणि भागीदारी मजबूत केली आहे. त्यामुळे आम्ही या वर्षी कॅम्पसमध्ये आणि कॅम्पसबाहेर भरती करू. पुढच्या वर्षीही तितक्याच लोकांना नोकरी देण्याची आमची योजना आहे. आमचा युटिलायझेशन रेशो सर्वोच्च शिखरावर असून त्यामुळे आमच्या पुरवठा साखळीवर लक्ष केंद्रित करण्याची ही योग्य वेळ आहे. असे गोविल यांनी सांगितलं.

Business Idea | पावसाळ्यात फक्त 5,000 रुपयांमध्ये सुरु करा हा व्यवसाय; होईल बक्कळ कमाई

Business Idea

Business Idea | संपूर्ण महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झालेली आहे. पावसाळ्यात अनेक नवनवीन व्यवसाय देखील असतात. ज्यातून तुम्ही खूप चांगले कामही करू शकता. अगदी खेड्यापासून ते शहरांपर्यंत या व्यवसायांना प्रचंड मागणी असते. पावसाळ्यात सगळ्यात महत्त्वाचा असतो तो म्हणजे रेनकोट आणि छत्री. आज आम्ही तुम्हाला रेनकोट आणि छत्रीच्या व्यवसायाबद्दल सांगणार आहोत. पावसाळ्यामध्ये याची सर्वाधिक गरज असते. त्याचप्रमाणे भारतामध्ये उन्हाळा देखील खूप असतो. त्यामुळे अनेक लोक उन्हाळ्यात देखील छत्रीचा वापर करतात. पावसाळ्यामध्ये छत्र्या, वॉटरप्रूफ स्कूल बॅग, रबरी शूज यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. या हंगामात तुम्ही अशा प्रकारचा व्यवसाय (Business Idea) सुरू करू शकता. आणि त्यातून खूप चांगला नफा देखील कमवू शकता. आता या व्यवसायाची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

5000 रुपयांपासून व्यवसाय सुरू करा | Business Idea

फक्त 5,000 रुपये गुंतवणूक करून हा व्यवसाय सुरू करता येतो. तुम्हाला किती मोठ्या प्रमाणावर हा व्यवसाय सुरू करायचा आहे हे तुमच्यावरही अवलंबून आहे. पावसाळ्यात रेनकोट, छत्री, मच्छरदाणी आणि रबर शूजची मागणी सर्वाधिक असते. हा माल घाऊक बाजारातून विकत घेऊन स्थानिक बाजारपेठेत विकून तुम्ही चांगला नफा मिळवू शकता. तुम्ही या वस्तू थेट उत्पादकांकडून देखील खरेदी करू शकता. तुम्हाला त्यांच्या वेबसाइटवर उत्पादकांची माहिती मिळेल. आजकाल बाजारात अनेक प्रकारच्या छत्र्या उपलब्ध आहेत. चांगल्या दर्जाचे विविध किमती श्रेणींमध्ये विकले जातात. त्यासाठी तुम्हाला अधिक चांगले संशोधन करावे लागेल.

छत्री आणि रेनकोट खूप पैसे कमावतील

रेनकोट, मच्छरदाणी यांसारखे पदार्थही घरी बनवता येतात. जर तुम्हाला शिवणकामाची आवड असेल, तर तुम्ही घाऊक बाजारातून वस्तू खरेदी करून घरीही तयार करू शकता. या वस्तू स्थानिक बाजारात विकून तुम्हाला 20-25 टक्के नफा सहज मिळेल. एकूणच, तुम्ही या व्यवसायात दरमहा 15,000 ते 35,000 रुपये सहज कमवू शकता.

कच्चा माल कुठे खरेदी करायचा? | Business Idea

तुम्ही कोणत्याही मोठ्या शहरातील घाऊक बाजारातून वस्तू खरेदी करू शकता. घाऊक बाजारातून ते खरेदी केल्यानंतर, तुम्ही ते तुमच्या स्थानिक बाजारपेठेतील किरकोळ विक्रेत्यांना विकू शकता. येथून तुम्ही छत्री किंवा रेनकोट बनवण्यासाठी साहित्य देखील खरेदी करू शकता. हे घरबसल्या बनवून विकताही येतात.

Atul Benke Meet Sharad Pawar : दादांचा आमदार साहेबांच्या भेटीला; पवार म्हणाले, लोकसभेला ज्याने आमचं काम केलं ….

sharad pawar atul benke

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके (Atul Benke) यांनी आज शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतली आहे. शरद पवार आज जुन्नर, खेड, आंबेगाव दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्या नारायणगाव येथील निवासस्थानी भेट दिली. यावेळी दादा गटात असलेले अतुल बेनके यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळे चर्चाना उधाण आलं आहे. विधानसभा निवडणूक अवघ्या ३ महिन्यांवर आली असताना अतुल बेनके शरद पवारांच्या भेटीला गेल्याने अजित पवारांना शरद पवार आणखी एक धक्का देणार का अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत.

शरद पवारांचे सूचक विधान –

अमोल कोल्हे यांच्या घरी अतुल बेनके यांनी शरद पवारांची भेट घेतली. अतुल बेनके यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर पवारांनी केलेल विधान चर्चेत आलं आहे. अतुल बेनके यांचे वडील माझे मित्र होते. आमच्या मित्राचा तो मुलगा आहे. यामध्ये काही राजकारण होत असेल तर त्यावेळेला त्याचा निकाल देऊ , त्याची इथे चर्चा करण्याची गरज नाही. लोकसभा निवडणुकीत ज्यांनी आमच्या पक्षाचे काम केलं आहे ते आमचे आहेत. त्यांच्या हिताची जपणूक करण्याची जबाबदारी आमची असेल असं सूचक विधान शरद पवारांनी केलं. त्यामुळे शिरूर लोकसभा निवडणुकीत अतुल बेनके यांनी पवार गटाच्या अमोल कोल्हे यांचं काम केलं का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण झाला आहे.

मी दादांसोबत- अतुल बेनके

दरम्यान, शरद पवारांच्या भेटीनंतर अतुल बेनके यांनी प्रसारमाध्यांशी बोलत प्रतिक्रिया दिली. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. ते आमच्यासाठी दैवत आहेत. गेल्या 40 वर्षांचा बेनके परिवाराचा राजकीय इतिहास हा शरदचंद्र पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, दिलीप वळसे पाटील यांच्या आशीर्वादाने चालू राहिलेला आहे. सध्या राजकीय स्थित्यंतरं झाली. सहा महिन्यांच्या तटस्थतेच्या भूमिकेनंतर आता जुन्नर तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीकोनातून एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून अजित पवार यांच्यासोबत राहणं पसंत करेन असं अतुल बेनके यांनी स्पष्ट केलं तसेच माझ्या या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही असेही त्यांनी सांगितलं.

SBI Mumbai Bharti 2024 | SBI बँकेत ‘या’ पदांसाठी भरती सुरु; अशाप्रकारे करा अर्ज

SBI Mumbai Bharti 2024

SBI Mumbai Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही नोकरीची अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. अनेक लोकांना मुंबईमध्ये काम करण्याची इच्छा असते. आता ही त्यांची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत भरती चालू झालेली आहे. ही भरती विशेषज्ञ अधिकारी या पदांसाठी आहे. या पदाच्या एकूण 1040 रिक्त जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहे. ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करावा लागेल. त्याचप्रमाणे 8 ऑगस्ट 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

महत्त्वाची माहिती | SBI Mumbai Bharti 2024

  • पदाचे नाव – विशेषज्ञ अधिकारी
  • पदसंख्या – 1040 जागा
  • नोकरीच्या ठिकाणी – मुंबई
  • वयोमर्यादा – 23 ते 50 वर्ष
  • अर्ज शुल्क – 750 रुपये
  • अर्ज पद्धती – ऑनलाइन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ऑगस्ट – 8 ऑगस्ट 2024

अर्ज कसा करावा ? | SBI Mumbai Bharti 2024

  • या भरतीचा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
  • खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करता येईल.
  • अर्ज करण्यावर ही नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
  • आठ ऑगस्ट 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

Mazi Ladki Bahin Yojana : मोठी बातमी!! लाडकी बहीण योजनेसाठी सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

Mazi Ladki Bahin Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा (Mazi Ladki Bahin Yojana) लाभ घेण्यासाठी राज्यभरातून महिलावर्ग अर्ज करत आहेत, मात्र अर्ज करताना महिलांना अडचणी येत आहेत. याच पार्श्वभूमीवर या योजनेची नीट अंमलबजावणी व्हावी यासाठी महायुती सरकारने आणखी एक मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार, ही योजना काटेकोरपणे राबवण्यासाठी राज्य सरकारकडून दोन समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. लाभार्थी नोंदणी पोर्टल समिती आणि लाभदायी प्रणाली समिती असे या दोन्ही समित्यांची नावे आहेत. या समित्या अंमलबजावणीसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहेत.

महिलांच्या खात्यावर कधी पैसे जमा होणार?

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांच्या खात्यावर जमा होणार आहेत. या योजनेनुसार, दर महिन्याला १५०० रुपये महिलांना मिळणार आहेत. येत्या १९ ऑगस्ट म्हणजेच रक्षाबंधनच्या शुभमुहूर्ती जुलै आणि ऑगस्ट अशा दोन्ही महिन्याचे मिळून प्रत्येकी ३००० रुपये राज्यभरातील महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत. खरं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Mazi Ladki Bahin Yojana) घोषणा झाल्यापासूनच अर्ज करण्यासाठी महिलांची झुंबड उडाल्याचं पाहायला मिळाली होती. सुरुवातील अर्ज करताना महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता, मात्र सरकारने अनेक अटी आणि शर्थी काढून टाकल्यानंतर आता अर्ज प्रक्रिया सोप्पी झाली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता काय?

२१ ते ६५ वय वर्ष असलेल्या महिलांना अर्ज करता येईल
सदर महिला महाराष्ट्र रहिवासी असावी
विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला
लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 2.50 लाखापेक्षा कमी असावं

आवश्यक कागदपत्रे – Mazi Ladki Bahin Yojana

आधारकार्ड
रेशनकार्ड
रहिवासी दाखला
बँक पासबुक
अर्जदाराचा फोटो
अधिवासाचं प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र
लग्नाचे प्रमाणपत्र

दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी, ब्रश करताना ‘या’ गोष्टींचा करा वापर

White Teeth

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपले दात ही आपली ओळख असते. त्यामुळे आपले दात हे नेहमी स्वच्छ आणि सुंदर असावे, तसे प्रत्येकाला वाटते. परंतु आजकाल दातांवर असलेला पिवळेपणा ही एक सामान्य समस्या बनत चाललेली आहे. आपण रोज ब्रश करतो, तरी देखील दातांवरील पिवळेपणा ब्रशने काढता येत नाही. यासाठी अनेक लोक घरगुती उपाय देखील करतात. परंतु त्याचा जास्त काही फायदा होत नाही. आज आम्ही तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमच्या दातांवर असलेला पिवळेपणा दूर होऊ शकतो. तुम्ही लिकोरिस पावडर आणि दही यांचे मिश्रण करून दातांना लावले, तर तुमचे दात अगदी पांढरे होतील आणि हिरड्या देखील निरोगी राहतील. आता लिकोरीस पावडर आणि दही वापरून दात कसे साफ करायचे? हे आपण जाणून घेऊया.

पांढऱ्या दातांसाठी लिकोरिस आणि दह्याचे फायदे

दात पांढरे आणि चमकदार करण्यासाठी लिकोरिस पावडर आणि दही वापरणे ही जुनी आणि नैसर्गिक पद्धत मानली जाते. या घरगुती उपायामध्ये असलेले घटक केवळ दात पांढरेपणा वाढवू शकत नाहीत तर तोंडाचे आरोग्य देखील सुधारू शकतात.

लिकोरिस पावडरचे फायदे

लिकोरिसमध्ये अनेक फायदेशीर घटक असतात जे दात आणि हिरड्यांसाठी फायदेशीर असतात. यात अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत, जे दात किडणे टाळतात आणि हिरड्यांची जळजळ कमी करतात.

दह्याचे फायदे

दह्यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम आणि प्रोबायोटिक्स असतात जे दातांची मजबुती आणि पांढरेपणा वाढवतात. दह्यामध्ये असलेले लॅक्टिक ऍसिड दातांचा पिवळसरपणा दूर करू शकतो आणि त्यांचा पांढरापणा वाढवण्यास मदत करतो.

लिकोरिस पावडर आणि दही मिश्रण बनवण्याची पद्धत

एक चमचा लिकोरिस पावडर घ्या आणि त्यात 2 चमचे ताजे दही घाला. दोन्ही साहित्य नीट मिसळा आणि पेस्ट बनवा. ही पेस्ट टूथब्रशच्या मदतीने दातांवर लावा. हलक्या हाताने २-३ मिनिटे ब्रश करा. यानंतर, तोंड स्वच्छ पाण्याने चांगले धुवा. ही प्रक्रिया आठवड्यातून 2-3 वेळा पुनरावृत्ती केली जाऊ शकते.

ही खबरदारी अवश्य घ्या

  • हे मिश्रण वापरताना लक्षात ठेवा की ते जास्त चोळू नका, अन्यथा दातांच्या वरच्या पृष्ठभागाला इजा होऊ शकते.
  • तुम्हाला कोणत्याही घटकांची ऍलर्जी असल्यास, हे मिश्रण वापरू नका.
  • चांगल्या परिणामांसाठी, हा घरगुती उपाय नियमितपणे वापरा आणि संतुलित आहार घ्या.
  • लिकोरिस पावडर आणि दही यांचे मिश्रण दात पांढरे आणि चमकदार करण्यासाठी एक प्रभावी आणि सुरक्षित मार्ग मानले जाते. हा नैसर्गिक उपाय केवळ दात पांढरे करण्यास मदत करत नाही तर तोंडाचे संपूर्ण आरोग्य देखील सुधारतो. नियमित वापराने तुम्हाला निरोगी आणि चमकदार दात मिळू शकतात.

फौजदारी कायदे बदलण्याची काय गरज होती? कोर्टाकडून केंद्राची कानउघडणी

madras highcourt central government

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयपीसी, सीआरपीसी आणि पुरावा कायदा यांसारखे पूर्वीचे गुन्हेगारी कायदे रद्द करण्यास केंद्र सरकारला कशामुळे प्रवृत्त केले? या कायद्यात सुधारणा करून काही प्रस्तावित बदल करू शकलो असतो, मग ते फौजदारी कायदे बदलण्याची काय गरज होती? असा थेट सवाल मद्रास उच्च न्यायालयाने केंद्रातील मोदी सरकारला केला आहे. या प्रकरणामध्ये केंद्र सरकारने पुढील चार आठवड्यांमध्ये त्यांचे म्हणणे मांडावे, असे आदेश न्यायालयाने दिला आहे.

द्रमुकचे नेते आर. एस. भारती यांनी तिन्ही नव्या कायद्यांना आव्हान देणारी याचिका मद्रास उच्च न्यायालयात दाखल केली केली. यानंतर न्यायमूर्ती एसएस सुंदर आणि एन सेंथिलकुमार यांच्या खंडपीठाने तिन्ही याचिकांवर तोंडी निरीक्षण नोंदवले. तुम्हाला सर्व काही का बदलायचे होते? लोकांना गोंधळात टाकण्यासाठी होता का? तुम्ही थोडेफार बदल करू शकला असता असं न्यायालयाने म्हंटल. जेव्हा सीपीसीमध्ये सुधारणा करण्यात आली, तेव्हा खूप गाजावाजा झाला आणि कायद्याचा अर्थ लावणारे अनेक निर्णय दिले गेले. त्यामुळे नवीन कायद्यांमुळे गोंधळ निर्माण होईल आणि त्याचा अर्थ लावावा लागेल, ज्यामुळे न्याय वितरण प्रणालीमध्ये आणखी विलंब होईल अशी भीती होती असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं.

नवीन कायदे आणताना विधी आयोगाचे मत विचारात न घेतल्याबद्दल न्यायमूर्ती सुंदर यांनी सरकारवर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “जेव्हा प्रक्रिया येते, तेव्हा नागरिकांना किमान संरक्षणाची अपेक्षा असते. किमान विधी आयोगाने विचार केला पाहिजे. इथे मत मागवले होते, पण विचारात घेतले गेले नाही… सर्वसाधारणपणे, किमान तत्त्वानुसार, कायद्याला हात घालण्यापूर्वी दुरुस्ती, कायदेमंडळ हे प्रकरण विधी आयोगाकडे पाठवते जे या प्रकरणाची चौकशी करते. त्यासाठीच ते तेथे आहेत,” अशा कठोर शब्दांमध्ये न्यायालयाने केंद्र सरकारची कानउघाडणी केली.