Monday, December 22, 2025
Home Blog Page 591

Mhada Lottery : म्हाडाच्या ‘या’ मंडळाच्या सोडतीत नाव न आलेल्यांसाठी निघणार दुसरी लॉटरी

Mhada Lottery : सध्याच्या महागाईच्या जमान्यात घर घेणे म्हणजे मोठे अवघड काम झाले आहे. मोठ्या शहरांमध्ये घरांच्या किंमती कोटींच्या घरात जाऊन पोहचल्या आहेत. अशा स्थितीत घर पाहण्यापासून ते अगदी हप्ता सुरु होण्यापर्यंत मोठ्या जोखमीतून जावे लागते. अशा स्थितीत सर्वसामान्य कुटुंबाना त्यांच्या स्वप्नातलं घर पूर्ण करण्यासाठी म्हाडा सारखी संस्था पुढे येते. म्हणूनच म्हाडाच्या लॉटरीची (Mhada Lottery) वाट अनेकजण पाहत असतात. आता म्हाडाच्या पुणे मंडळासाठी एक महतवाची अपडेट हाती आली आहे.

लवकरच मुंबई म्हाडाची सोडत जाहीर होणार आहे. मात्र पुणेकरांसाठी एक खुशखबर आहे कारण पुण्यासाठीची एक सोडत नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. पण सोडतीसाठी इच्छुकांची एकूण संख्या पाहता सध्याची उपलब्ध गृह संख्या पुरेशी नसल्याची बाब लक्षात घेऊन म्हाडा ने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. पुणे म्हाडाची दुसरी सोडत लवकरच काढली जाणार आहे. याबाबतची माहिती गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे. बुधवारी 18 जुलै 2024 ला पुणे म्हाडाची 4850 घरांची संगणकीय सोडत काढण्यात आली. या सोडतीत ज्यांना घर मिळालं नाही त्यांना दुसऱ्या सोडतीत संधी मिळणार आहे. असं त्यांनी स्पष्ट केलं त्यामुळे म्हाडाने (Mhada Lottery) मनावर घेतल्यामुळे आता अनेक इच्छुकांना त्यांच्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करता येणार आहे.

दरम्यान म्हाडाच्यावतीने (Mhada Lottery) येत्या काळात 7500 घरांची मेगा सोडत काढली जाणार आहे. यामध्ये कोकण, पुणे आणि मुंबई मंडळांचा समावेश असणार आहे. म्हाडाच्या घरांना असणारी मागणी आणि सर्वसामान्यांकडून मिळणारा प्रतिसाद पाहता वर्षातून किमान एकदा तरी म्हाडाची सोडत काढली जाणार असल्याची माहिती म्हाडाच्या वतीने काही दिवसांपूर्वीच देण्यात आली होती. त्यामुळे आता महाडा कडून दिला जाणाऱ्या प्रत्येक अपडेट कडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.

दरम्यान मुंबईच्या डबेवाला संघटनेच्या वतीने म्हाडाच्या सोडतीमध्ये दहा टक्के आरक्षणाची मागणी करण्यात आलेली आहे. याचा परिणाम जनरल प्रवर्गावर होऊ शकतो. याशिवाय येत्या काळात म्हाडा (Mhada Lottery) कडून घरांच्या दरामध्ये साधारणतः 15 ते 50 टक्क्यांची वाढ होण्याची सुद्धा शक्यता असून आता ही वाढ नेमकी किती फरकाने होते याच्या अधिकृत वृत्ताकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे.

शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी!! महाराजांची वाघनखे साताऱ्यात प्रदर्शनासाठी खुली

shivaji maharaj wagh nakh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारकरांसह संपूर्ण महाराष्ट्रातील शिवप्रेमींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे आता महाराष्ट्रात याची देही याची डोळा पाहता येणार आहे. साताऱ्यात वस्तू संग्रहालयात शिवरायांची ही वाघनखं प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहे. या प्रदर्शनाला ‘शिवशस्त्रशौर्यगाथा’ असं नाव ठेवण्यात आलं आहे. या शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. याशिवाय लंडनहून वाघनखं घेऊन आलेल्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तुसंग्रहालयाचे आंतरराष्ट्रीय कार्यक्रम प्रमुख निकोलास मर्चंड हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

छत्रपती शिवरायांच्या वाघनखांची लांबी 8.6 सेमी आणि वजन हे केवळ 49 ग्रॅम इतकं आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पडदा बाजूला सारताच संपूर्ण महाराष्ट्राला शिवरायांच्या वाघनखांची पहिली झलक पाहायला मिळाली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन झाल्यानंतर आता सर्वसामान्य शिवप्रेमींना सुद्धा हि वाघनखे याची देही याची डोळा पाहायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे फक्त वाघनखंच नाहीत तर इतर शस्त्रास्त्रांचंदेखील प्रदर्शन शिवप्रेमींना पाहता येणार आहे. या प्रदर्शनाला ‘शिवशस्त्रशौर्यगाथा’ असं नाव ठेवण्यात आलं आहे.

सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत हि शिवकालीन वाघनखे नागरिकांना पाहण्यासाठी खुली राहतील . यासाठीची तिकिटे ऑनलाईन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने नागरिकांना उपलब्ध करून घेता येतील. एका वेळी दोनशे लोकांना हे प्रदर्शन पाहता येईल. दिवसभरातून यासाठी चार स्लॉट उपलब्ध करून देण्यात आले असून यामध्ये पहिला प्लॉट विद्यार्थ्यांसाठी मोफत राहणार आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री झोपलेयतय का? विशाळगड हिंसाचारावरून किरण मानेंचा सवाल

kiran mane vishalgad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात झालेल्या कारवाईवरून आता राजकारण तापलं आहे. विशाळगडावरील मशिदीत हिंसक जमावाकडून तोडफोड करण्यात आली होती. याशिवाय, विशाळगडाच्या परिसरातील गजापूर आणि मुस्लीमवाडी परिसरातील घरादारांचेही जमावाकडून नुकसान करण्यात आले होते. या हिंसाचारानंतर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करत आहेत. याच दरम्यान, आपल्या बेधडक शैलीसाठी प्रसिद्ध असणारे मराठी अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी फेसबुक पोस्ट करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. शेंबडं पोरगंबी सांगेल की हे सगळं विधानसभा निवडणुक डोळ्यापुढं ठेवून चाललेलं आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री झोपलेयतय का? असा सवाल सुद्धा त्यांनी केला.

किरण माने यांची पोस्ट जशीच्या तशी

“ओ माने… विशाळगड अतिक्रमणावर लिहा की.” अशा कमेन्ट गेल्या पंधरा दिवसांत अनेक अनोळखी अकाऊंटवरनं यायला लागल्या. चेक केलं तर कुणी ओळखीचं नाही. सगळी प्रोफाईल लॉक. सहसा आयटी सेलच्या गटारातली घाण पसरवायला अशी डुक्करपिलावळ नेमलेली असते. बर्‍याचजणांच्या पोस्टवर मी अशा कमेन्ट बघितल्या. अतिक्रमण काय कालपरवाचं नाही. बर्‍याच वर्षांपासूनचं आहे. मग नेमकं आत्ताच का यावर असं रान पेटवलं जातंय??? मग मी यावर उत्तर द्यायचो की “ही अतिक्रमणं हटवणं हे सरकारचं काम आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री झोपलेयतय का? असले निष्क्रीय, भ्रष्टाचारी लोक सत्तेत बसवले की हेच होणार.” डुक्करपिलावळ गपगार व्हायची. जिथून आदेश आलेत त्या नाजुक जागेवरच रट्टा बसल्यावर काय बोलणार?

अहो, शेंबडं पोरगंबी सांगेल की हे सगळं विधानसभा निवडणुक डोळ्यापुढं ठेवून चाललेलं आहे. लोकसभेत महाराष्ट्रानं मुस्काडात दिलीय. आता विधानसभा पाहिजे असेल तर बाकी कुठला मुद्दाच हातात नाही. सगळ्या क्षेत्रात बोंबाबोंब. सगळे उद्योग गुजरातला गेलेत. बेरोजगारीचा कहर झालाय. पेपर फुटताहेत. रस्त्यांची दुर्दशा झालीय. शेतकरी आत्महत्या तिपटीने वाढल्यात. मग यांच्या हातात एकच मुद्दा रहातो – ‘हिंदु-मुस्लीम’ ! केवळ त्यासाठी हे अतिक्रमणाचे नाटक सुरू होते. बरं हे जे अतिक्रमण आहे, ते सगळ्या जातीधर्माच्या लोकांनी केलंय. विशाळगडाच्या पायथ्याला जे अतिक्रमण आहे ते वनविभागाच्या अखत्यारीत येतं. वर जे आहे, ते पुरातत्त्व खात्याच्या…

आता गंमत अशी आहे की परवा जी दंगल घडवून आणली गेली, ती या दोन्ही ठिकाणी झाली नाही ! ती झाली गजापूरला !! जे विशाळगडाच्या पायथ्यापासून तीन किलोमीटर दूर वसलेलं जुनं गांव आहे. अतिक्रमणाशी कसलाही संबंध नसलेल्या तिथल्या मुस्लीम समाजाला विनाकारण टारगेट करून प्रचंड प्रमाणात नासधूस करण्यात आली. याचाच अर्थ ही दंगल घडवणारे कुणी शिवभक्त नव्हते, कुणाच्या तरी आदेशावरून आलेले दंगलखोर होते. त्यांचा हेतू गडावरचे अतिक्रमण वगैरे नसून काहीतरी वेगळाच होता. असो. ही घटना जरी दुर्दैवी असली तरी आपल्यासाठी अभिमानाची एक गोष्ट आहे… ती म्हणजे एवढे होऊनही महाराष्ट्र शांत आहे. कुठेही हिंदु-मुस्लीम तेढ निर्माण झालेली नाही. कुठेही याचे हिंसक पडसाद नाहीत. पुन्हा एकदा सिद्ध झाले की हा शिव-शाहु-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. अहो, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या हयातीत विशाळगडावरच्या दर्ग्याला हात लावला नाही. शिवरायांचे वडिल शहाजी महाराज आणि चुलते शरीफजी यांची नांवेच ‘शहाशरीफ’ या मुस्लीम सुफी संतांवरून ठेवलेली आहेत. शिवरायांच्या विचारांचा खरा वारसदार असलेला अस्सल मराठमोळा मावळा कधीच असल्या धर्मद्वेषाला बळी पडणार नाही !

विशाळगडावरील अतिक्रमणाबाबतीत महाराष्ट्र सरकारने त्वरित पावलं उचलावीत. कुठल्याही नागरिकाच्या जीवाची हानी न होता आणि कसलीही धार्मिक तेढ निर्माण न होता हे काम झाले पाहिजे. भावाबहिणींनो, सरकारच्या मनात असेल तर हे काम सहजसोपे आहे. आज महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, महिला सुरक्षा, रस्त्यांची दुरावस्था, टोलनाक्यांवरची लूट, स्पर्धा परीक्षांमध्ये होणारे घोटाळे, ड्रग्ज रॅकेट अशा अनेक भयानक गोष्टींचा विळखा महाराष्ट्राला पडलेला आहे. आपण त्यावरून लक्ष हटवायचे नाही. जय शिवराय… जय भीम ! अशी पोस्ट करत किरण माने यांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

Ganesh Utsav 2024 : खुशखबर ! गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेकडून 202 विशेष गाड्यांचे नियोजन

Ganesh Utsav 2024 : आपल्याला माहीत असेल की कोकणामध्ये गणेशोत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गणेशोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वसलेला कोकणवासी हा आपल्या गावी जात असतो. त्यासाठी आधीच रिझर्वेशन आणि बुकिंग कोकणवासीयांनी केलेलं असतं. या काळामध्ये रेल्वे गाड्यांना मोठी गर्दी असते. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वे कडून अतिरिक्त गाड्यांचं नियोजन केलं जातं. यंदाच्या गणेशोत्सवासाठी (Ganesh Utsav 2024) मुंबई ते कोकणदरम्यान 202 विशेष रेल्वे गाड्या चालवण्याच्या मध्य रेल्वेच्या नियोजनाला भारतीय रेल्वेने हिरवा कंदील दाखवला आहे. दिनांक 21 जुलैपासून या विशेष गाड्यांच्या आरक्षणाचा श्री गणेशा होणार आहे.

मुंबई -सावंतवाडी (Ganesh Utsav 2024)

मुंबई ते सावंतवाडी या रेल्वे गाडीसाठी दादर ठाणे पनवेल रोहा माणगाव वीर खेड चिपळूण सावंत आरवली रोड संगमेश्वर रोड रत्नागिरी अडवली विलवडे राजापूर रोड वैभववाडी रोड नांदगाव रोड कणकवली सिंधुदुर्ग आणि कुडाळ अशी स्थानक असतील.

मुंबई सीएसएमटी ते सावंतवाडी डेली स्पेशल रेल्वेच्या एकूण 36 फेऱ्या असतील ही खास ट्रेन मुंबईतून दिनांक एक सप्टेंबर 2024 ते 18 सप्टेंबर 2024 पर्यंत दररोज रात्री 00:20 वाजता सुटेल. आणि त्याच दिवशी14:20 वाजता सावंतवाडी येथे पोहोचेल.

तर गाडी क्रमांक 0 1 1 52 स्पेशल सावंतवाडी (Ganesh Utsav 2024) वरून दिनांक एक सप्टेंबर 2024 ते 18 सप्टेंबर 2024 दरम्यान15:10 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी चार पस्तीस वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.

कुडाळ स्पेशल (Ganesh Utsav 2024)

मुंबईतल्या लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून कुडाळपर्यंत एकूण ६ फेऱ्या होतील. यामध्ये ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग अशी स्थानके असतील.

०३ सप्टेंबर २०२४ ते १८ सप्टेंबर २०२४ (3 फेऱ्या) पर्यंत मंगळवारी रात्री ००:४५ वाजता सुटेल आण ि त्याच दिवशी सकाळी १२:३० वाजता कुडाळ येथे पोहोचेल. ०११६६ स्पेशल कुडाळवरून ०३.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (3 फेऱ्या) पर्यंत मंगळवारी संध्याकाळी १६:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री ०४:५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.

रत्नागिरी डेली स्पेशल (Ganesh Utsav 2024)

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटणाऱ्या या गाडीसाठी दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावडाव, आरवली रोड, संगमेश्वर रोड आशु स्थानके असतील. तर यात १२ स्लीपर क्लास, ०४ जनरल, २ थ्री टायर एसी आण ि २ एसएलआर असे मिळून एकूण २० डबे असतील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या) पर्यंत दररोज सकाळी ११:३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २०:१० वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल. ०११५४ स्पेशल रत्नागिरीवरून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या) दररोज पहाटे ४ वाजता सुटेल आणी त्याच दिवशी दुपारी १३:३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.

एलटीटी – कुडाळ डेली स्पेशल (Ganesh Utsav 2024)

गाडी क्रमांक ०११६७ लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून कुडाळला जाणाऱ्या कुडाळ डेली स्पेशल या गाडीच्या एकूण ३६ फेऱ्या असतील. यात ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, अंजनी, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग या थांब्यांचा समावेश असेल. या गाडीमध्ये १२ स्लीपर क्लास, ०४ जनरल, २ श्री टायर एसी आणि २ एसएलआर असे मिळून एकूण २० डबे असतील.

लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या) पर्यंत दररोज रात्री २१:०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०९:३० वाजता कुडाळ येथे पोहोचेल.०११६८ स्पेशल कुडाळवरून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या) दररोज दुपारी १२:०० वाजता सुटेल आण ि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री ००:४० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.

दिवा चिपळूण मेमू स्पेशल

गाडी क्रमांक ०११५५ मेमू स्पेशल दिवा येथून एकूण ३६ फेऱ्या असतील. दिवा, निळजे, तळोजा, कळंबोली, पनवेल, सोमाटणे, रसायनी, आपटा, जिते, हमरापूर, पेन, कासू, नागोठणे, निडी, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, (Ganesh Utsav 2024)गारगाव, साप े वामने, करंजाडी, विन्हेरे, कळंबणी, खेड, अंजनी या थांब्यांचा यात समावेश असेल.

ही गाडी ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या) पर्यंत दररोज सकाळी ०७:१५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १४:०० वाजता चिपळूण येथे पोहोचेल. ०११५६ मेमू स्पेशल चिपळूणवरून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या) पर्यंत दररोज दुपारी १५:३० वाजता सुटेल आण ि त्याच दिवशी रात्री २२:५० वाजता दिवा येथे पोहोचेल.

एलटीटी मुंबई (Ganesh Utsav 2024)

एलटीटी मुंबई येथून सुटणारी ही खास ट्रेन ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग. असे थांबे घेईल. तर या गाडीत १२ स्लीपर क्लास, ०४ जनरल, २ थ्री टायर एसी आणि २ एसएलआर असे मिळून एकूण २० डबे असतील.

ही गाडी ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या) पर्यंत दररोज सकाळी ०८:२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २१:०० वाजता सावंतवाडी येथे०११७२ स्पेशल सावंतवाडीवरून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या) पर्यंत दररोज रात्री २२:२० वाजता सुटेल आण ि दुसऱ्या दिवशी सकाळी १०:४० वाजता एलटीटी मुंबई येथे पोहोचेल.

शरद पवारांना मोठा दिलासा!! निवडणूक आयोगाने पिपाणी चिन्ह गोठवलं

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा दिलासा दिला आहे. लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाला पिपाणी (Pipani Symbol) चिन्हाचा फटका बसला होता, त्यामुळे चिन्हाच्या यादीतून हे चिन्ह वगळावे अशी विनंती शरद पवारांनी निवडणूक आयोगाला केली होती. पवारांची हि विनंती मान्य करत आता केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) पिपाणी हे चिन्ह गोठवलं आहे तर शरद पवारांचे तुतारी वाजवणार माणूस हे चिन्ह कायम ठेवण्यात आली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिल्यानंतर लोकसभा निवडुकीत शरद पवारांना तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह देण्यात आलं होते. शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीत तुतारी फुंकत १० पैकी ८ जागांवर दणदणीत विजय मिळवला. मात्र यातील अनेक ठिकाणी पिपाणी चिन्हावर उमेदवार उभे होते. त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला. अनेक ठिकाणी पवारांची तुतारी समजूनच मतदारांनी पिपाणीला मतदान केलं. दिंडोरी मध्ये पिपाणीला लाखांहून अधिक मते मिळाली. साताऱ्यात तर पिपाणीमुळे राष्ट्रवादी पवार गटाला आपली हक्काची जागा गमवावी लागली. या सर्व कारणांनी पवार गटाकडून पिपाणी हे चिन्ह काढून टाकण्याची विनंती निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती.

लोकसभा निवडणुकीत पिपाणी’ या चिन्हामुळे आपलं नुकसान झाल्याचं शरद पवार गटाने म्हटलं होते. लोकसभेची निवडणूक पक्षाने ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या चिन्हावर लढवली. मात्र या निवडणुकीत काही अपक्ष उमेदवारांना ‘पिपाणी’ चिन्ह देण्यात आलं होतं. यामुळे मतदारांना तुतारी आणि पिपाणी यातील फरक न समजल्यामुळे साताऱ्यात पराभव झाल्याचे पवार गटाने म्हंटल होते, अखेर आज पिपाणी हे चिन्ह गोठवण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना मोठा फायदा होणार आहे.

Toll Tax: महत्वाची बातमी ! FASTag संदर्भात नवा नियम, नाहीतर आकाराला जाईल दुप्पट टोल

Toll Tax: तुम्ही सुद्धा महामार्गावरून प्रवास करीत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. आपल्याला माहितीच असेल की टोल नाक्यावर टोल आकारणी करण्यासाठी फास्टॅग बंधनकारक करण्यात आले आहे. NHAI भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ने फास्टॅग संदर्भात नवीन अशी मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत. या मार्गदर्शक तत्वानुसार फास्टॅग खिशात ठेवणं किंवा गाडीच्या इतर कोणत्याही (Toll Tax) भागावर चिटकवल्यास कारवाई केली जाणार आहे. नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार विंडशिल्डवर व्यवस्थितपणे फास्टॅग लावले नाही तर तुम्हाला दुप्पट टोल भरावा लागेल.

का घेतला निर्णय? (Toll Tax)

खरंतरफास्टॅग विंडशिल्ड व्यतिरिक्त इतर कुठेही चिटकवला तर स्कॅनिंग करण्यासाठी समस्या निर्माण होते आणि ज्या कारणासाठी फास्टॅग ची सोय आणली आहे म्हणजेच वेळ वाचवण्यासाठी फास्टट्रॅक ची सोय आणली आहे इथे वेळ वाया जात असल्यामुळे इतर वाहनांना (Toll Tax) थांबावे लागते आणि हीच गोष्ट टाळण्यासाठी प्राधिकरण दुप्पट टोल वसुली करणार आहे.

गाडीच्या समोरच्या विंडशिल्ड वर फास्टॅग चिटकवलेले नसल्यास दुप्पट शुल्क वसुलीसाठी NHAI ने सर्व वापरकर्ता , शुल्क संकलन संस्थांना मानक प्रणाली (एसओपी )जारी केला आहे. याशिवाय सर्व टोल (Toll Tax) नाक्यांवर महामार्ग वापर करताना समोरच्या विंडशिल्ड वेळ निश्चित फास्टॅग शिवाय टोल लेनमध्ये प्रवेश केल्याबद्दल दंडा बद्दल माहिती दिली जाईल. याशिवाय विंडशिल्ड वर व्यवस्थित न लावलेल्या फास्टॅग प्रकरणांची नोंद त्या गाड्यांच्या वाहन नोंदणी क्रमांक सोबत केली जाणार आहे. त्यामुळे आकारले जाणारे शुल्क आणि टोल लेन (Toll Tax) मध्ये वाहनाची उपस्थिती याबाबतही रेकॉर्ड ठेवण्यास मदत होणार आहे.

Gold Price Today : सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण!! आजचे भाव इथे चेक करा

Gold Price Today 19 july

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोने खरेदीदार ग्राहकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. आज शुक्रवार १९ जुलै २०२४ मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव 73410 रुपयांवर व्यवहार (Gold Price Today) करत आहे. कालच्या तुलनेत या किमतीमध्ये 555 रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीच्या किमती मध्येही तब्बल 1150 रुपयाची घट झाली असून एक किलो चांदी 90609 रुपयांवर व्यवहार करत आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

सोने- चांदीच्या किमती (Gold Price Today) खूप दिवसांनी स्वस्त झाल्याने खरेदीदार ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गुड रिटर्न वेबसाईट नुसारही सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. गुड रिटर्न नुसार, २२ कॅरेट १० ग्राम सोन्याचा भाव ६८१५० रुपये आहे, तर २४ कॅरेट १० ग्राम सोन्याचा दर ७४३५० रुपये आहे. तुम्ही मिस्ड कॉलद्वारे सुद्धा सोन्या-चांदीची किंमत तपासू शकता. 22 कॅरेट सोन्याचे आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. तुम्ही मिस्ड कॉल करताच तुम्हाला सोन्याच्या दराची माहिती एसएमएसद्वारे मिळेल.

गुड रिटर्न नुसार सोन्याचा भाव – Gold Price Today

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)-

पुणे- 68,150 रुपये
मुंबई – 68,150 रुपये
नागपूर – 68,150 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 74,350 रूपये
मुंबई – 74,350 रूपये
नागपूर – 74,350 रूपये

सोन्याची शुद्धता कशी तपासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

Farmer Suicide | धक्कादायक ! गेल्या 6 महिन्यात विदर्भात तब्बल 618 शेतकऱ्यांनी केली आत्महत्या

Farmer Suicide

Farmer Suicide | शेती हा आपल्या भारतातील मुख्य व्यवसाय असला, तरी शेती करताना शेतकऱ्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. कधी कधी नैसर्गिक चक्र असे फिरतात की, शेतकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक नुकसान होते. आणि यामुळे अनेक शेतकरी आत्महत्या (Farmer Suicide) करत आहेत. अनेक सुविधा असल्या, तरी सगळ्यात शेतकऱ्यांपर्यंत त्या सुविधा पोहोचत नाही .आणि पर्यायाने त्यांच्याकडे आत्महत्या शिवाu दुसरा पर्याय उरत नाही. गेल्या काही वर्षापासून विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे.

पश्चिम विदर्भाच्या 6 जिल्ह्यांमध्ये 1 जानेवारी 2024 ते 10 जुलै 2024 यादरम्यान तब्बल 618 शेतकऱ्यांनी आत्महत्या (Farmer Suicide) केलेले आहेत. आता या सगळ्या गोष्टींचा केंद्र सरकारने चांगलं गांभीर्याने विचार करायला पाहिजे. तसेच बजेटमध्ये 1 लाख कोटींची एकात्मिक पश्चिम विदर्भ कृषी कल्याण कार्यक्रमाची घोषणा करावी, अशी मागणी देखील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा अभ्यास करणारे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी केलेली आहे.

किशोर तिवारी हे 2015 ते 2022 या काळात राज्य सरकारच्या वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे प्रमुख होते. त्याचप्रमाणे त्यांनी यवतमाळ, वाशिम, अमरावती, बुलढाणा, अकोला आणि वर्धा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत एकात्मिक अहवाल देखील तयार केला होता. शासनाच्या अधिकाऱ्यांनी नीट विचार केला नाही. त्यामुळे आत्महत्या सारखा गंभीर विषयी वाढत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

पश्चिम विदर्भाला पांढरे सोने म्हणून ओळखले जाते. कारण या भागात कापसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. 1998 पासून अनेक कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आत्महत्या (Farmer Suicide) केलेल्या आहेत. 2001 साली तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने राष्ट्रीय शेतकरी आयोगाची देखील स्थापना केली होती. मात्र यावर कोणतीही उपाययोजना केली नव्हती.

त्यानंतर 2005 मध्ये विदर्भासाठी 4800 कोटींचे शेतकरी पॅकेज देखील जाहीर करण्यात आले होते. 2008 मध्ये शेतकऱ्यांची कृषी कर्ज देखील माफ केले होते. त्यानंतर 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांनी शेतकरी यांच्या अडचणीच्या सर्व मुद्दे घेऊन त्यांच्यासाठी अनेक योजना आणल्या होत्या. आणि त्याबाबत आश्वासन देखील केले होते. परंतु सध्या नोकरशाहीमध्ये एवढा भ्रष्टाचार वाढलेला आहे की, या सगळ्या योजना यशस्वी ठरलेल्या आहेत.याच कारणामुळे आता अनेक शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागत आहे.

Viral Video | मानवी कवटीची अजब गजब गाडी उतरली रस्त्यावर; व्हिडीओ पाहून पिकेल हशा

Viral Video

Viral Video | आजकाल लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच सोशल मीडियाचा वापर करतात. सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. कधी कधी हे व्हिडिओ खूप रंजक असतात. तर कधी यातून आपल्याला खूप चांगली माहिती मिळते. आणि असे हे मनोरंजन करणारे व्हिडिओ क्षणार्धात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. अनेक युजर्स देखील त्यावर खूप प्रतिक्रिया देत असतात. अशातच एक व्हिडिओ समोर आलेला आहे. ज्यामध्ये एका विचित्र प्रकारची गाडी दिसत आहे. ही गाडी चक्क मानवाच्या कवटीच्या आकाराची आहे. हा मजेशीर व्हिडिओ पाहून तुम्हीही पोटभरून हसाल.

या व्हिडिओमध्ये (Viral Video) एका मानवाची कवटी रस्त्यावरती वेगाने धावताना दिसत आहे. या कवटीच्या दातांमध्ये एक सिगारेट देखील अडकलेले दिसत आहे. आणि त्या मानेच्या तळाशी चाके लावलेली आहेत. पांढऱ्या रंगाची कवटी ही कुठेही फिरताना दिसत आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

https://www.instagram.com/reel/C9T2UgdBcB_/?utm_source=ig_embed&utm_campaign=loading

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कवटीच्या आकाराची गाडी पुढे जात आहे. आणि त्या गाडीच्या मागून कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज देखील ऐकू येत आहे. हा व्हिडिओ शेअर करून कॅप्शन दिलेले आहे की, ‘कुत्र्यांना काय म्हणायचे आहे हे आता तुम्ही सांगा.”

वायरल झालेल्या या व्हिडिओवर (Viral Video) अनेक लोक कमेंट्स करत आहे. एका युजरने लिहिलेले आहे की, “हा घोस्ट रायडर नसून भुतातील स्वार आहे.” तर आणखी रका युजरने लिहिले आहे की, “याचा इंजीनियर नक्की कोण आहे?” अशा अनेक प्रकारे लोक या व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

Maharashtra Postal Circle Bharti 2024 |महाराष्ट्र पोस्टात तब्बल 3170 पदांची भरती सुरु; 10 वी पास उमेदवार करू शकतात अर्ज

Maharashtra Postal Circle Bharti 2024

Maharashtra Postal Circle Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. जेणेकरून त्यांना नोकरी मिळते आणि त्यांचे चांगले करिअर होते. आज देखील आम्ही अशीच एक नोकरीची संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता भारतीय टपाल (Maharashtra Postal Circle Bharti 2024) विभागांतर्गत ही एक भरती निघालेली आहे. ही भरती ग्रामीण डाक सेवक या पदासाठी निघालेली आहे. या पदाच्या एकूण 3170 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहे. ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करावा लागेल. त्याचप्रमाणे 5 ऑगस्ट 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदर अर्ज करा. या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

महत्त्वाची माहिती

  • पदाचे नाव – ग्रामीण डाक सेवक
  • पदसंख्या – 3170 जागा
  • शैक्षणिक पात्रता – दहावी पास
  • नोकरीच्या ठिकाण – संपूर्ण भारत
  • अर्जशुल्क – 100 रुपये
  • वयोमर्यादा – 18 ते 40 वर्ष
  • अर्ज पद्धती – ऑनलाइन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 ऑगस्ट 2024
  • वेतनश्रेणी -10 हजार ते 24, 470 रुपये दर महिना.

अर्ज कसा करावा ? | Maharashtra Postal Circle Bharti 2024

  • या भरतीचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे.
  • 5 ऑगस्ट 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा