Monday, December 22, 2025
Home Blog Page 592

गंभीरसोबतच्या वादाबाबत कोहलीने BCCI ला स्पष्टच सांगितलं; म्हणाला की…

GAMBHIR KOHLI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि विराट कोहली (Virat Kohli) ….. नाव वाचताच पहिल्यांदा आठवत ते म्हणजे दोन्ही खेळाडूंमधील वाद आणि मतभेत.. आयपीएल मध्ये अनेकदा गंभीर आणि विराटला भर मैदानात भिडताना क्रिकेट चाहत्यांनी बघितलंय. त्यामुळे आता गौतम गंभीर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर कोहलीचे कस होणार? दोन्ही खेळाडू एकमेकांना कस जमवून घेणार असा प्रश्न टीम इंडियाच्या चाहत्यांना पडला आहे. मात्र आता दोघांच्या नात्याबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार, विराट कोहलीने बीसीसीआयला स्पष्टपणे सांगितले आहे की, तो गंभीरसोबतचा मागील वाद विसरून पुढे जाण्यास तयार आहे. कारण हे काम भारतीय क्रिकेट आणि संघाच्या हिताचे आहे.

क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, “गंभीरसोबतच्या मागील वादाचा ड्रेसिंग रूमवर तसेच भारताचा संपूर्ण संघावर कोणताही परिणाम होणार नाही.” याबाबत विराट कोहलीने बीसीसीआयच्या अधिका-यांकडे आपले मत व्यक्त केले आहे.रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात आले आहे की, T20 विश्वचषकानंतर दोन्ही खेळाडूंमध्ये भूतकाळातील वादावर चर्चा झाली आहे आणि या काळात त्याच्या ज्या काही तक्रारी होत्या. त्या सर्व तक्रारी आणि मतभेद संपुष्टात आलेत. भारतीय संघाला जास्तीत जास्त फायदा होईल अशी कामगिरी करण्याचा मानस या दोघांनीही व्यक्त केल्याचे रिपोर्ट मधून सांगण्यात आलंय.

काही महिन्यांपूर्वीच गौतम गंभीरने विराटबरोबरच्या नात्यावर भाष्य केलं. विराट आणि माझ्यात दोघांमध्ये नेमका बॉण्ड कसा आहे हे देशाला ठाऊक नाही. “जे काही वाटतं ते प्रत्यक्षात जशी स्थिती आहे त्याहून फारच वेगळं आहे. माझं विराटबरोबरचं नातं हे देशाला माहित नाही. आपआपल्या संघाचे नेतृत्व करताना व्यक्त होण्याचा माझ्याइतकाच हक्क विराटालाही आहे. आमचं नातं हे लोकांना (वादाचा) मालमसाला देण्यासाठी नाहीये,” असं गंभीरने सांगितलं होतं.

दरम्यान, रोहित शर्मासोबत विराट कोहलीचीही श्रीलंका दौऱ्यावर खेळल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे. याआधी रोहित आणि विराटही श्रीलंका दौऱ्यातून बाहेर राहण्याची शक्यता होती. मात्र, गंभीरच्या विनंतीवरून दोन्ही खेळाडूंनी वनडे फॉरमॅटमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

MPSC मार्फत आता शिपाई पदांचीही होणार भरती; 2026 ला होणार अंमलबाजवणी

MPSC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची म्हणजेच एमपीएससी या परीक्षेची आहे विद्यार्थी तयारी करत असतात. या परीक्षा अंतर्गत अनेक पदे भरली जातात. अशातच आता एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ती म्हणजे आता राज्य सरकारच्या सेवेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्ष बाहेरील गट ब आणि गट क ही पदे वगळता इतर पदे भरण्यास आता सरकारकडून मान्यता देण्यात आलेली आहे.

ज्या विभागांनी आता ही भरती परीक्षा घेण्यासाठी टीसीएस, आयबीपीएस आणि आयओएन यांसारख्या कंपन्यांबरोबर तीन वर्षासाठी करार केलेला आहे. त्या विभागांची भरती आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत करायची आहे. त्यामुळे या पदांची भरती आता 2026 नंतरच एमपीएससीमार्फत होणार, असल्याचे देखील सांगण्यात आलेले आहे.

सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिवांचे अध्यक्षतेखाली समन्वय समितीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे आता प्रशासकीय विभागांनी एमपीएससी अंतर्गत ज्या प्रकारची भरती होणार आहे. त्या पदांबाबतचा प्रस्ताव समन्वय समितीकडे सादर करायचा आहे. त्यानंतरच समन्वय समितीकडे प्रस्तावाच्या अनुषंगाने जी पदे एमपीएससीकडे वर्ग करायचे आहे, याबाबत सहा महिन्यात शिफारस करण्यात येईल.

BSNL Network Coverage : तुमच्या भागात BSNL ला रेंज आहे का? एका क्लीकवर चेक करा

BSNL Network Coverage

BSNL Network Coverage । देशातील जिओ, एअरटेल आणि वोडाफोन- आयडिया या आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्जच्या किमती वाढवल्याने सर्वसामान्य ग्राहकांचा खिशाला चाप बसला आहे. त्यामुळे पैसे वाचवण्यासाठी अनेक ग्राहक देशी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलकडे वळत आहे. BSNL चे कमी किमतीत उपलब्ध असल्याने ग्राहकांना चांगलंच परवडत. परंतु देशात सर्वच ठिकाणी बीएसएनएलला नेटवर्क आहे असं नाही. अनेक ठिकाणी आजही BSNL पोचू शकलेलं नाही. अशावेळी तुमच्या भागात नेटवर्क आहे कि नाही ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

अनेकजण आपलं जिओ, एअरटेलचे सिमकार्ड BSNL मध्ये पोर्ट करत आहेत. मात्र टेलिकॉम नियमांनुसार, एकदा जियो, एअरटेल किंवा वोडाफोन-आयडिया मधून BSNL मोबाइल नेटवर्कवर स्विच केल्यास तुम्ही 90 दिवस म्हणजे 3 महिन्यापर्यंत दुसऱ्या नेटवर्कवर स्विच करू शकत नाही. त्यामुळे कोणतेही सीम कार्ड बीएसएनएल मध्ये पोर्ट करण्यापूर्वी तुम्ही ज्याठिकाणी राहता त्या भागात BSNL ला रेंज आहे का?? (BSNL Network Coverage) हे आधी जाणून घ्या आणि त्यानंतर BSNL कार्ड विकत घेण्याचा किंवा पोर्ट करण्याचा निर्णय घ्या. यासाठी तुम्हाला NPERF वेबसाइटवर जावं लागेल. हि एक ग्लोबल वेबसाइट आहे जिथे सर्व देशांमधील मोबाइल नटेवर्क कव्हरेज पाहता येते.

कशी आहे प्रॉसेस– BSNL Network Coverage

सर्वात आधी nperf वेबसाइटवर जा.
त्यानंतर तुम्हाला एक डॅशबोर्ड दिसेल, ज्यातून Map ऑप्शनवर जा.
त्यानंतर Country आणि मोबाइल नेटवर्क ऑप्शन सिलेक्ट करा.
त्यानंतर तुमचं लोकेशन किंवा शहर सर्च करा.
अशाप्रकारे तुम्ही तुमच्या क्षेत्रातील BSNL सह इतर कोणतंही नेटवर्क सर्च करू शकता.

BSNL मध्ये मोबाइल नंबर पोर्ट कसा करायचा

सर्वप्रथम 1900 वर पोर्ट रिक्वेस्ट पाठवा.
यासाठी मेसेज बॉक्समध्ये ‘PORT स्पेस आणि 10 डिजिट मोबाइल लिहून पाठवा.
त्यानंतर BSNL सेंटरवर जाऊन आधारसह इतर माहिती द्या.
अशाप्रकारे तुमची पोर्ट रिक्वेस्ट पूर्ण होईल.

रेल्वेचा अपघात कि घातपात?? लोको पायलटच्या दाव्याने खळबळ

Chandigarh-Dibrugarh Express Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तरप्रदेश मध्ये काल चंदीगड-दिब्रूगड एक्स्प्रेस ट्रेनचा (Train Accident) अपघात झाला. या एक्स्प्रेस ट्रेनचे काही डबे रुळावरून घसरले. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून काही लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. उत्तर प्रदेशातील गोंडा आणि जिलाही दरम्यान पिकौरा येथे ही घटना घडली. मात्र हा चुकून अपघात झाला कि यामागे कोणता घातपात आहे याबाबत शंका निर्माण झाली आहे. कारण अपघात होण्यापूर्वी एक कसला तरी मोठ्या स्फोटाचा आवाज ऐकू असल्याचा दावा ट्रेनच्या लोको पायलटने केला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

रेल्वेच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रेनचा लोको पायलट त्रिभुवन यांनी दावा केला आहे की, अपघात होण्यापूर्वी मोठा आवाज आला. त्याच्या मते, जेव्हा ट्रेन गोंडा-झिलाही रेल्वे सेक्शनच्या पिकौरा गावाजवळून जात होती, तेव्हा त्याला मोठा आवाज ऐकू आला, त्याचवेळी त्याला धोक्याची जाणीव झाली. त्याने इमर्जन्सी ब्रेक लावले गेले, त्यानंतर डबे रुळावरून घसरले.. रेल्वेने या अपघाताच्या तपासात घातपात असण्याची शक्यता वर्तवली आहे. या ट्रेन अपघातात 13 डबे रुळावरून घसरले आणि तीन एसी डबे उलटले. रेल्वेने या घटनेच्या CRS तपासाचे आदेश दिले आहेत. या अपघातातील सर्व जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिल्या आहेत.

दरम्यान, या रेल्वे अपघातानंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं. आरडाओरडा सुरु झाला. काही जणांनी भीतीने खाली उडी मारली, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून त्याची ओळखही पटू शकली नाही. तर तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर प्रवासी आपापल्या सामानाची काळजी घेत होते तर काहीजण आपल्या नातेवाईकांना मोबाईलवर मेसेज करत आपबिती सांगत होते.

AmrutVrusti FD Scheme | SBI ने आणली नवीन अमृतवृष्टी FD योजना; मर्यादित कालावधीत मिळणार चांगले व्याजदर

AmrutVrusti FD Scheme

AmrutVrusti FD Scheme | सध्या अनेक लोक हे भविष्यासाठी काही ना काही गुंतवणूक करून ठेवत असतात. बाजारामध्ये गुंतवणुकीचे सध्या अनेक पर्यायी उपलब्ध आहेत. तरी देखील अनेक लोक FD वर विश्वास ठेवतात प्रत्येक बँकेची नवीन योजना असतात. अशातच स्टेट बँक ऑफ इंडियाने एक नवीन योजना सुरू केलेले आहे. या योजनेचे नाव अमृतवृष्टी (AmrutVrusti FD Scheme) असे आहे. बँकेने ही योजना 15 जुलै 2024 पासून सुरू केली आहे. यामध्ये तुम्हाला खूप जास्त व्याज मिळण्याची चांगली संधी आहे. ही योजना खास करून भारतीयांनी अनिवासी भारतीय ग्राहकांसाठी आहे. या विशेष FD मध्ये एसबीआय शाखा इंटरनेट बँकिंगवरून देखील तुम्हाला गुंतवणूक करता येईल.

व्याज किती मिळणार ? | AmrutVrusti FD Scheme

अमृतवृष्टी योजना ही 444 दिवसांसाठी आहे. या योजनेच्या 444 दिवसांसाठी 7.25 टक्के वार्षिक व्याज मिळेल. त्याचप्रमाणे जेष्ठ नागरिकांना 0.25% अधिक व्याज मिळते म्हणजेच त्यांना एकूण 7.75 टक्के व्याज FD वर घेऊ शकता.

योजना मर्यादित कालावधीसाठी

एसबीआय अमृतवृष्टी योजना ही 15 जुलै 2024 ते 31 मार्च 2025 पर्यंत उपलब्ध असणार आहे. ही योजना 444 दिवसांसाठी असणार आहे. ही योजना सुरू करून आता ग्राहकांना जास्त पैसे कमावण्याची संधी आहे. यामुळे ग्राहकांना चांगला फायदा होईल आणि भविष्यासाठी गुंतवणूक देखील करता येईल.

पैसे कसे काढायचे | AmrutVrusti FD Scheme

तुम्हाला जर 5 लाख रुपयांपर्यंतची FD मुदतीपूर्वी काढण्यासाठी तुम्हाला 0.50% शुल्क भरावे लागेल. तसेच 5 लाख ते 1 कोटी रुपयांचे FD वर तुम्हाला 1 टक्के शुल्क भरावे लागणार आहे. एसबीआयने याआधी एक अमृत कलश नावाची योजना सुरू केली होती. या योजनेमध्ये सर्वसामान्य नागरिकांना 7.10% दराने व्याज मिळत होते, तर ज्येष्ठ नागरिकांना या 400 दिवसाच्या एफडीवर 7.60 टक्के दराने व्याज मिळत होते.

Beauty Tips : केसांच्या आरोग्यासाठी वापरून पहा ; घराच्या घरी कांद्यापासून बनवलेला शाम्पू

Beauty Tips : धकाधकीच्या जीवनात केसांची नीट काळजी घेता येत नाही. त्यामुळे केसगळतीची समस्या वाढली आहे. शिवाय धूळ, धूर प्रदूषण यामुळे देखील केसांची गळती होते. केसांसाठी बाजारात अनेक उत्पादने उपलब्ध आहेत पण त्यामध्ये विविध केमिकल्स असल्यामुळे केसांवर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. म्हणूनच हल्ली होम रेमेडिजचा ट्रेंड वाढतो आहे. केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी घरगुती उपायांपैकी एक चांगला उपाय (Beauty Tips) म्हणजे कांदा.

गुणकारी कांदा (Beauty Tips)

कांद्यामध्ये अनेक प्रकारचे घटक असतात की जे केसांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतात. फ्लेवोनोइड्स आणि कॅम्पेफेरॉल आणि क्वेरसेटिन यात असते. यात सूजविरोधी, एंटी ऑक्सिडेंट् आणि वसोडिलेटरी गुण असतात. ज्यामुळे स्काल्पमध्ये रक्तप्रवाह वाढतो. कांद्यातील सूजविरोझी गुणांमुळे डोकं शांत राहण्यास मदत होते. केसांच वाढ भराभर (Beauty Tips) होते.

कांद्याचा शाम्पू

जर्नल ऑफ ड्रग डिलिव्हरी अँड थेरेपीटिक्स मध्ये प्रकाशित केलेल्या 2018 च्या अभ्यासानुसार केसांच्या चांगल्या वाढीसाठी कांदा हा फायदेशीर ठरतो. त्यामुळे घरच्या घरी तुम्ही कांद्याचा वापर करून शाम्पू बनवू शकता आणि हा शाम्पू (Beauty Tips) लावू शकता. हा शाम्पू कसा बनवायचा चला पाहुयात

कांद्याचा शाम्पू बनवण्यासाठी शंभर ग्रॅम कांदा घ्या, नंतर या कांद्याचे छोटे छोटे तुकडे करा. नंतर हे तुकडे मिक्सरमधून वाटून घ्या. त्यानंतर एका कॉटनच्या कापडामध्ये या कांद्याचा अर्क गाळून घ्या. नंतर हा अर्क नारळाचे तेल, एरंडेल तेल, किंवा निलगिरीच्या तेलासोबत शाम्पू सोबत मिक्स करून तुम्ही लावा. अशा प्रकारचा शाम्पू बनवून लावल्यानंतर केसांची गळती ही (Beauty Tips) थांबू शकते.

कांद्याचा रस केसांना लावल्यामुळे केसांची रोम छिद्रे पोषक तत्त्वांनी भरून जातात. त्यांना पोषण मिळते त्यामुळे केस कोरडे होत नाहीत. केसांच्या विकासाला यामुळे मदत होते. परिणामी केस वाढण्यास देखील मदत (Beauty Tips) होते.

Thane Chowpatty: सिंगापूर आणि साबरमतीच्या धर्तीवर ठाण्यात साकारणार चौपाटी ; पावसाळ्यानंतर लोकार्पण

Thane Chowpatty: खरंतर मुंबई दुसऱ्या आणखी एका कारणासाठी प्रसिद्ध आहे ते म्हणजे ‘मुंबई चौपाटी’. मुंबईतील गिरगाव, दादर चौपाटी ही अतिशय प्रसिद्ध असून मुंबईकर या ठिकाणी नेहमी गर्दी करत असतात. मात्र मुंबई प्रमाणेच ठाणेकरांना देखील आता चौपाटीचा आनंद घेता येणार आहे. पारसिक- मुंब्रा येथे रेतीबंदर चौपाटीचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे पावसाळ्यानंतर या चौपाटीचे लोकार्पण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाणेकरांसाठी नक्कीच ही (Thane Chowpatty) आनंदाची बाब आहे.

दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या चौपाटीचं निरीक्षण केलं आणि याच दरम्यान त्यांनी घोषणा केली की पुढच्या दोन-तीन महिन्यांमध्ये ही चौपाटी जनतेसाठी खुली केली जाईल. यावेळी बोलताना आव्हाड यांनी सांगितले की “ही योजना ठाण्यासाठी 2009 पासून लांबलेली आहे. मात्र अनेक आव्हानानंतर या चौपाटीचे काम आता पूर्णत्वास येत आहे. हे पाहून आनंद (Thane Chowpatty) होतो आहे. “

खरंतर पारसिक- मुंब्रा येथील बहुप्रतिक्षित रेतीबंदर चौपाटी प्रकल्प हा 2009 पासून प्रस्तावित आहे. मात्र अनेक कारणांमुळे हा प्रकल्प रखडला होता. आता त्याचे लवकरच लोकार्पण होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे ठाणेकरांना निवांत वेळ (Thane Chowpatty) घालवण्यासाठी हक्काची जागा मिळणार आहे यात शंका नाही.

सिंगापूर आणि साबरमतीच्या धर्तीवर चौपाटी (Thane Chowpatty)

दरम्यान रेतीबंदर खाडीच्या 4 km लांबीच्या बाजूने 42 एकरांवर हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे सिंगापूर आणि साबरमतीच्या धर्तीवर ही चौपाटी उभारण्यात येणार असून यामध्ये थीम पार्क, बोटिंग, अॅम्फी थिएटर,आणि मनोरंजनाचे अद्यावत साधनं त्याचबरोबर 18 अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असणार आहेत. पुढच्या तीन महिन्यात या चौपाटीचे काम पूर्ण करण्यात येणार असून त्याचे लोकार्पण (Thane Chowpatty) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

ठाण्यातील खाडी आणि किनारे हे निसर्ग संपन्न आहेत. त्यामुळे या किनाऱ्यावर वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्पाच्या माध्यमातून ठाणेकरांसाठी खाडी किनाऱ्यावर पर्यटन केंद्र उभारण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून गायमुख चौपाटी (Thane Chowpatty) उभारण्यात आली होती. 2019 मध्ये या चौपाटीचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झालं होतं. येथे देखील ठाणेकर मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.

माकडा, नीच, नालायक…; जरांगे पाटलांच्या प्रसाद लाड यांना शिव्या

manoj jarange patil prasad lad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) याना डीडी म्हणजेच देवेंद्र द्वेष नावाचा आजार झाला आहे अशी टीका भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केल्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी प्रसाद लाड (Prasad Lad) यांच्यावर अक्षरशः शिव्यांचा पाऊस घातला. माकडा, आमच्या लेकराचं वाटोळं झालं आहे. तू आमच्या नादी लागू नकोस, आमच्यासारख्या गोरगरीब मराठ्यांच्या मध्ये पडू नकोस नाहीतर महागात पडेल असा इशारा जरांगे पाटील यांनी प्रसाद लाड याना दिला.

प्रसारमाध्यमांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले, बांडगुळ्या, तू माझ्या नादाला लागू नको, तू किती भ्रष्टाचारी आहे ते मला माहित आहे. मनोज जरांगे जातीसाठी लढतोय आणि तू जात विकून स्वतःच घर मोठी करणारी अवलाद आहेस. तू आपल्या औकातीत राहा, फडणवीसांचे पाय चाट.. आम्हाला काहीही घेणंदेणं नाही पण माझ्या नादाला लागू नकोस.. तुमच्यासारखी मोठी श्रीमंत लोक आमचे भूषण होता मात्र तुम्ही नीच आणि नालायक निघाला. आमच्यासारख्या गोरगरीब मराठ्यांच्या मध्ये पडू नकोस नाहीतर महागात पडेल असं म्हणत जरांगे पाटलांनी प्रसाद लाड यांच्यावर शिव्यांचा पाऊस पाडला.

तू भंगार आहेस. मी कधीही तुमच्यावर आत्तापर्यंत एका शब्दाने काही बोललो नाही त्यामुळे तुम्ही पण औकातीत रहा. तुम्ही फडणवीसांचे आमदार व्हा, मंत्री व्हा, मोठे व्हा .. आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. पन आमच्यामध्ये ढवळाढवळ करू नको. आमच्या लेकराचं वाटोळं झालं आहे. तुम्हाला एवढा राग येतोय तर ठाण्यात पोलीस भरती करणाऱ्या ४०० ते ५०० तरुणांना कुणबी प्रमाणपत्र असूनही बाहेर काढण्यात आलं आणि ओपन मध्ये टाकलं. तुम्हाला जर मराठ्यांबद्दल आस्था असेल आणि मराठाच्या रक्ताचा असशील तर देवेंद्र फडणवीस यांनी हे का केलं हे त्यांना विचारा असं आव्हान जरांगे पाटलांनी प्रसाद लाड यांना दिले.

प्रसाद लाड नेमकं काय म्हणाले होते?

मराठा आरक्षणावरून जरांगे पाटील ज्या पद्धतीने फडणवीस यांच्यावर टीका करत आहेत ते पाहता त्यांना देवेंद्र द्वेष नावाचा आजार झाल्याचे दिसून येत आहे. मराठा तरुणांचा विकास व्हावा यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी शैक्षणिक बदल केले. नोकऱ्यांमध्येही मराठा आरक्षण ठेवले, मराठा समाजासाठी योजना आणल्या. मराठा समाजासाठी पोलीस भरती, परदेशी शिक्षण, व्यवसाय यासाठी प्रयत्न केले. तरीही जरांगे पाटील कोणाच्या छत्रीखालून फडणवीस यांचा द्वेष करतात ते पाहिले पाहिजे. असा द्वेष योग्य नाही. विशिष्ट व्यक्तींना टार्गेट करून राजकारण करत असाल तर तुम्ही उघडपणे राजकारणात या. अन्यथा समाजासाठी काहीतरी करत असाल तर चर्चेतून मार्ग काढा. चर्चेला आम्ही तयार आहोत, पण द्वेषाचे राजकारण करू नका असं म्हणत प्रसाद लाड यांनी जरांगे पाटलांवर घणाघात केला होता.

Train Accident : उत्तर प्रदेशात चंदीगड-दिब्रुगड एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले ; एकाचा मृत्यू

Train Accident : नुकत्याच आलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशातील गोंडा येथे चंदीगड-दिब्रुगड एक्स्प्रेसचे काही डबे रुळावरून घसरले आहेत. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून काही लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. उत्तर प्रदेशातील गोंडा आणि जिलाही दरम्यान पिकौरा येथे ही घटना घडली. ट्रेन क्रमांक १५९०४ चंदीगडहून आसाममधील दिब्रुगडला जात होती. त्यादरम्यान हा (Train Accident) अपघात झाला आहे.

मदतकार्यासाठी बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. या ट्रेन मधील इतरप्रवासी त्यांचे सामान घेऊन ट्रॅकच्या बाजूला उभे आहेत. अचानक झालेल्या घटनेमुळे मोठा गोंधळ उडाला असून अनेक प्रवाशांनी अपघातानंतर ट्रेनमधून बाहेर आल्याची माहिती आहे. 12 डब्यांपैकी एसी डब्यातील चार डबे झुलाही रेल्वे स्थानकाच्या काही किलोमीटर आधी रुळावरून घसरले. या अपघातामुळे या मार्गावरन जाणाऱ्या अनेक गाड्यांवर परिणाम झाला असून काही गाड्या वळवण्यात आल्या आहेत, अशी माहिती उत्तर पूर्व रेल्वेचे सीपीआरओ पंकज सिंग यांनी एका माध्यमाशी (Train Accident) बोलताना दिली आहे.

दरम्यान, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी अपघाताची माहिती दिली असून अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.गोंडा जिल्ह्यातील रेल्वे अपघाताची दखल घेत जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचण्याचे आणि मदत कार्याला गती देण्याचे निर्देश (Train Accident) दिले आहेत, असे उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर योग्य उपचार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

रेल्वे मेडिकल कॅन साइटवर पोहोचले आहे आणि ईशान्य रेल्वेने हेल्पलाइन (Train Accident) क्रमांक जारी केले आहेत:

Commercial Control: 9957555984

  • Furkating (FKG): 9957555966
  • Mariani (MXN): 6001882410
  • Simalguri (SLGR): 8789543798
  • Tinsukia (NTSK): 9957555959
  • Dibrugarh (DBRG): 9957555960
    Lucknow – 8957409292
    Gonda – 8957400965

महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण? मोठी बातमी समोर

maha vikas aghadi CM

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) गोटातून एक मोठी बातमी समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीतील देदीप्यमान यशानंतर आता विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीला यशाची अपेक्षा आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. निवडणुकीआधीच महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा देण्यात यावा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. आता या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रिपदाबाबत मोठी बातमी समोर येत आहे. विधानसभेच्या निकालानंतरच महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रीपद जाहीर केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

महाविकास आघाडीत काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी असे ३ प्रमुख पक्ष आहेत. महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ जागा आहेत. यामध्ये तिन्ही पक्ष प्रत्येकी 95 ते 100 जागा लढण्याची शक्यता आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांमध्ये जागावाटपाचं सूत्र निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आता राहिलाय प्रश्न तो म्हणजे फक्त काँग्रेसचा …त्यामुळे काँग्रेसला हा फॉर्म्युला मान्य असेल का ते पाहायला हवं. तसेच विधानसभा निवडणुकीच्या आधी महाविकास आघाडी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा देणार नाही. निकालानंतरच मुख्यमंत्रीपद जाहीर केले जाणार आहे.

दरम्यान, तत्पूर्वी तिन्ही पक्ष सर्वच्या सर्व २८८ जागांची चाचपणी पण करत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं कि, आम्ही 288 जागांचा ॲक्सेसमेंट करत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस देखील 288 जागांवर चाचपणी करत आहे आणि काँग्रेस पक्ष सुद्धा 288 जागांची चाचपणी करतोय. तिघांचाही हा अभ्यास पूर्ण झाल्यावर आम्ही तिघे एकत्र बसू आणि त्यानंतर आम्ही ठरवू, की कोणत्या पक्षाने किती जागा लढवाव्या आणि कोणकोणत्या मतदारसंघात उमेदवार उभं करावे. मात्र सध्या तरी जो जिंकेल त्याची जागा असं महाविकास आघाडीचं सूत्र आहे अशी माहिती संजय राऊतांनी दिली.