Travel : पावसाळा म्हंटलं की ट्रेकिंग , उंचावरून कोसळणाऱ्या धबधब्यांच्या भेटी , चिंब भिजणं , थंड्गार वातावरणात गरमागरम भजी चा आस्वाद घेणं हे सगळं आपसूक येतंच. अशाच प्रकारचा पावसाळा अनुभवण्यासाठी तरुणाई पावसाळ्याची आतुरतेने वाट पाहत असते. आज आम्ही तुम्हाला अशा एका पावसाळी पर्यटनाच्या स्पॉट विषयी सांगणार आहोत. जिथे जाऊन तुमचे मन निसर्गाच्या (Travel ) सानिध्यात तृप्त होऊन जाईल.
तर आम्ही बोलत आहोत माळशेज घाटातल्या काळू धबधब्याबद्दल… मुंबईपासून माळशेज घाट जवळ असल्यामुळे वन डे पावसाळी पिकनिकला जायचा तुम्ही विचार करीत असाल तर हे ठिकाण (Travel) उत्तम आहे.
माळशेज घाटातील सर्वात उंच आणि नयनरम्य धबधबा म्हणून काळू धबधबा प्रसिद्ध आहे. हा धबधबा हरिश्चंद्रगड पर्वतातून उगम पावतो आणि शिखरेश्वर गावातून वाहतो. हा धबधबा दख्खनच्या पठारावरून कोकणात येतो. या धबधब्याजवळ आणखी एक धबधबा ज्याला माऊली धबधबा म्हणतात. आणि नंतर पुढे जाऊन काळू धबधबा आणि माऊली धबधबा एकत्र येऊन काळू (Travel) नदी बनते.
घेऊ शकता ट्रेकिंगचा आनंद
तुम्हाला इथे भेट द्यायचे असेल तर उत्तम काळ म्हणजे जुलै ते ऑक्टोबर चा काळ यासाठी ठीक राहील. तुम्ही इथे ट्रेकिंगचा सुद्धा आनंद घेऊ शकता. धबधब्याच्या या प्रवासादरम्यान तुम्ही हिरव्यागार जंगलातून, असंख्य पाण्याचे प्रवाह आणि धबधबे (Travel) ओलांडून मार्गक्रमण कराल. इथलं निसर्ग संपन्न सौंदर्य तुमचं मन फ्रेश करून जाईल यात शंका नाही.
इतर लोकप्रिय ठिकाणे (Travel)
जुन्या मार्केट घाटा मार्गे ‘गॉड व्हॅली’ म्हणून ओळखला जाणारा माळशेज घाटाचा ट्रेक मुली महिला एकट्याने प्रवास करणाऱ्यांसाठी सुरक्षित आणि योग्य आहे. इथल्या इतर लोकप्रिय ठिकाणांना तुम्हाला भेटी द्यायचे असतील तर ही ठिकाण म्हणजे एड्राई सोंडाई नाणेघाट देवकुंड (Travel) आणि नानेमाची
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी HONOR ने भारतीय बाजारपेठेत HONOR 200 5G आणि HONOR 200 Pro 5G असे २ नवीन मोबाईल लाँच केलेले आहेत. या स्मार्टफोन मध्ये 12GB रॅम, 50 मेगापिक्सेल कॅमेरा आणि 5200mAh बॅटरी सारखी अतिशय दमदार फीचर्स देण्यात आलेले आहेत. मोबाईल लूक सुद्धा दिसायला अगदी आकर्षक असून ग्राहकांना बघता क्षणीच या स्मार्टफोनची भुरळ पडेल. आज आपण या दोन्ही मोबाईलच्या किमती आणि स्पेसिफिकेशन याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात…
HONOR 200 चे फीचर्स
HONOR 200 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेट सह 6.7-इंचाचा OLED कर्व्ह डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला 2664×1200 पिक्सेल रिझोल्युशन आणि 4000 nits पर्यंत पीक ब्राईटनेस मिळतो. कंपनीने यामध्ये स्नॅपड्रॅगन 7 Gen 3 ऑक्टा कोअर प्रोसेसर दिला असून हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित MagicOS 8.0 ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो. मोबाईल मध्ये 8GB/12GB रॅम आणि 256GB/512GB स्टोरेज पर्याय दिला आहे. कॅमेराबद्दल सांगायचं झाल्यास, HONOR 200 मध्ये पाठीमागील बाजूला 50 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल आणि 50 मेगापिक्सेलचा टेलेफोटो कॅमेरा मिळतो. तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 50-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. स्मार्टफोनमध्ये 5200mAh बॅटरी असून हि बॅटरी 100W सुपरचार्ज फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
HONOR 200 Pro चे फीचर्स
HONOR 200 Pro 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.78 इंचाचा OLED कर्व्ह डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला 2700 × 1224 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 4000 nits पर्यंत पीक ब्राईटनेस मिळतो. कंपनीने यामध्ये स्नॅपड्रॅगन 8s Gen 3 प्रोसेसर दिला असून हा मोबाईल सुद्धा Android 14 वर आधारित MagicOS 8.0 या ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो. या स्मार्टफोनमध्ये फक्त 12GB रॅम 512GB स्टोरेज दिल आहे. मोबाईलच्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर, या स्मार्टफोनच्या मागील बाजूस 50 मेगापिक्सेल मुख्य कॅमेरा, 12 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड अँगल आणि 50 मेगापिक्सेल टेलिफोटो कॅमेरा दिला आहे. तर समोरील बाजूला 50 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी या स्मार्टफोनमध्ये 5200mAh बॅटरी देण्यात आली असून ही बॅटरी 100W सुपरचार्ज फास्ट चार्जिंग आणि 66W वायरलेस सुपरचार्ज फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
किंमत किती?
HONOR 200 Pro 5G च्या 12GB + 512GB व्हेरिएंटची किंमत 57,999 रुपये आहे. तर HONOR 200 5G च्या 12GB + 512GB व्हेरिएंटची किंमत 39,999 रुपये आणि 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 34,999 रुपये आहे. हे दोन्ही स्मार्टफोन ई-कॉमर्स साइट Amazon, ब्रँडची अधिकृत वेबसाइट आणि रिटेल स्टोअर्सवर 20 जुलैपासून दुपारी 12 वाजता विक्रीसाठी उपलब्ध होईल.
Mumbai local : मुंबईची लाईफलाईन म्हणजे मुंबई लोकल. अनेक चाकरमान्यांना आपल्या इच्छित स्थळी पोहचवण्याचे काम लोकल करते. लोकल ने प्रवास करणाऱ्यांसाठी आता एक खुशखबर आहे. मुंबई करांचा प्रवास सुकर होण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून मोठे प्रयत्न केले जात आहेत. लोकलमध्ये वाढणारी गर्दी हे त्याचे मुख्य कारण आहे. मात्र प्रवाशांचा प्रवास आरामदायी व्हावा मध्य रेल्वे कडून नवीन वेळापत्रक बनवण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार दादर (Mumbai local) स्थानकातून 10 लोकल फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
लोकलचे नवीन वेळापत्रक ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणार असून दादर स्थानकातून दहा लोकल फेऱ्या तर परळस्थानाकातून अतिरिक्त 24 फेऱ्या सुरू (Mumbai local) होणार आहेत. सीएसएमटी हून सुटणाऱ्या दहा फेऱ्या दादर स्थानकातून चालवण्यात येणार आहेत. यात पाच अप आणि पाच डाऊन लोकलचा समावेश असणार आहे. तर दादर मधील फलाट क्रमांक 10 चे डबल प्लॅटफॉर्म झाले आहे. त्यामुळे जलद लोकलमध्ये दोन्ही बाजूने याच्यावर करण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. दादर स्थानकातून सुरू होणाऱ्या 24 धीम्या लोकल फेऱ्या (Mumbai local) परळस्थानाकातून चालवण्यात येणार आहे. सध्या परळस्थानाकातून 22 गाड्या सुटतात. आता एकूण ही संख्या 46 वर पोहोचणार आहे.
कळवा आणि मुंब्रा मधील रेल्वे प्रवाशांना नव्या वेळापत्रकानुसार दिलासा मिळणार आहे. कारण सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेत एका अतिरिक्त लोकलचा थांबा इथे देण्यात आलेला आहे. ठाणे स्थानकांपर्यंत धावणाऱ्या सहा लोकलचा कल्याण (Mumbai local) पर्यंत विस्तार करण्यात येणार असून त्यामुळे एकंदरीतच प्रवाशांना नव्या वेळापत्रकामधून मोठा दिलासा मिळणार आहे.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संग्राम थोपटे (Sangram Thopate) … हे नुसतं नाव नाहीये… तर हा आहे भोरच्या राजकारणाचा हुकुमी एक्का… आपल्या वडिलांचा वारसा पुढे चालू ठेवत 2009 पासून सलग तीन टर्म संग्राम थोपटे फक्त आमदार झाले नाहीत तर त्यांनी आपल्या मतदारसंघात विरोधकांना नावाला देखील शिल्लक ठेवलं नाही… भाजप, शिवसेनेनं अनेकदा प्रयत्न करुनही काँग्रेसी विचाराला जागले..नेहमी एकनिष्ठ राहीले.. भोर मतदारसंघात यंदा हायलाईटमध्ये राहीला कारण शरद पवार, अजित पवार आणि विजयबापू शिवतारे यांनी थोपटेंच्या घरी जाऊन अनंतरावांच्या घेतलेल्या भेटींमुळे… बारामतीच्या लोकसभेचा निकाल पाहीला तर लगेच लक्षात येत की सुप्रियाताईंच्या विजयात भोरचा मोठा वाटा राहीलाय… थोडक्यात थोपटे यांनी एकदा शब्द दिला की तो तडीस नेल्याशिवाय जनता राहत नाही.. असा इथला एकूणच प्रकार आहे.. पण हे सगळं पाहील्यावर एक प्रश्न पडतो की थोपटे या नावात अशी नेमकी कोणती जादू आहे? की त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय भोरच्या राजकारणाचं पानही हालत नाही… भाजप आणि शिवसेनेसारख्या सत्तेतल्या पक्षांनी प्रयत्न करुनही मतदार थोपटेंनर डोळेझाकून विश्वास कसा ठेवतात… सर्वात महत्वाचं म्हणजे सलग तीन टर्म आमदार राहीलेले संग्राम थोपटे या निवडणुकीत विजयाचा चौकार मारतील का? भोर – वेल्हा – मुळशी या विधानसभा मतदारसंघात नेमकं काय घडू शकतं.. या सगळ्याचीच ही इनसाईड स्टोरी..
सुरवात करुयात एका किस्स्यापासून..१९९५ च्या आसपास पुण्यात शरद पवारांना समांतर असं काँग्रेसमधून एक सत्ताकेंद्र तयार होत होतं.. ते नावं म्हणजे भोर विधानसभेचे अनंतराव थोपटे.. थोपटे काँग्रेसमधील पहील्या फळीतील नेते.. २००४ ला थोपटे यांची पक्षातील पत इतकी वाढली होती की तेच मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील, हे कन्फर्म समजलं जात होतं.. पण राजकारणात पडद्याआडून असं काही घडलं की ज्या थोपटेंशिवाय देशमुखांचं पानही हालत नव्हतं त्या विलासराव देशमुखांना मुख्यमंत्री करण्यात आलं.. थोडक्यात अनंतराव थोपटेंचा पत्ता कट करण्यात आला… १९९९ च्या निवडणुकीत तर थोपटेंना पराभवाचा धक्का बसला.. अर्थात या सगळ्या प्रकरणात पडद्याआडून राजकीय सोंगट्या चालवण्याचा प्रकार सुरु होता तो कार्यक्रम शरद पवार पार पाडत असल्याची चर्चा होती..
थोडक्यात एकाच जिल्ह्यात असूनही… एकाच पक्षात सुरुवातीचं राजकारण गिरवूवही… पवार आणि थोपटे यांच्यात हाडवैर तयार झालं ते कायमचंच… यानंतर थोपटेंनी आपल्या सुपुत्राला २००९ ला राजकारणात उतरवलं.. तेव्हापासून झालेल्या प्रत्येक लोकसभा निवडणुकीत संग्राम थोपटे काँग्रेसचा झेंडा घेऊन निवडणुक लढवत गेले.. आणि जिंकतदेखील… 2009 ला शिवसेनेच्या शरद ढमालेंचा तर 2014 आणि 2019 अशा सलग दोन टर्म शिवसेनेच्या कुलदीप कोंडे यांना अस्मान दाखवत संग्राम थोपटे वन साईड निवडणूक जिंकत आले… महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर संग्राम थोपटे यांचं मंत्रीपद कन्फर्म समजलं जात होतं… मात्र त्याही वेळेस त्यांच्या नावाला कात्री लावण्यात आली… अर्थात हे सगळं पवारांकडून सुरू असल्याच्या वावड्याही तेव्हा बऱ्याच उठल्या होत्या…पण पक्षफुटी नंतर शिवसेनेची ही ताकद कमी झाल्यामुळे संग्राम थोपटे आजही मतदारसंघात वन मॅन शो असल्यासारखे आहेत…
पुण्याला अगदी लागून असणाऱ्या या मतदारसंघ तसा जास्त फोकसमध्ये येतो तो लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान… बारामती मतदारसंघात मोडणारा हा भोर विधानसभा मतदारसंघ नेहमीच आघाडीच्या बाजूने निर्णायक मताधिक्य टाकत आलाय… थोडक्यात बारामती हा पवारांचा बालेकिल्ला असला तरी त्याच्या चाव्या या भोरमुळे थोपटेंच्या हातात असतात…राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर जेव्हा लोकसभेचं बिगुल वाजलं तेव्हा गेला बाजार इतिहास विसरून शरद पवार, अजित पवार, विजयबापू… यांना स्वतः मदतीसाठी थोपटेंच्या घराच्या पायऱ्या झिजवाव्या लागल्या… यावरून भोरमध्ये थोपटे नावाचा ब्रँड किती मोठा आहे, याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो… नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत संग्राम थोपटेंनी तब्बल 43 हजारांचं लीड तुतारीच्या पाठीशी दिलं… हाच आकडा गृहीत धरला तर संग्राम थोपटे यंदाही आरामात आमदार होतायत, असं म्हणल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही…
पण काँग्रेसमधील अनेक प्रस्थापितांचे बालेकिल्ले उध्वस्त होत असताना आजही थोपटेंचा मतदारसंघावर इतका होल्ड कसा आहे? तर याची बरीच कारण देता येऊ शकतील… सहकार चळवळ, शिक्षण संस्था, स्थानिक स्वराज्य संस्थांवरचं वर्चस्व आणि यासोबत मतदारसंघातील अनेक निकाली काढलेले प्रश्न हे सगळं थोपटेंच्या राजकारणाला प्लसमध्ये घेऊन जातं… मराठा समाजाचं असणारं वर्चस्व आणि वेल्हा – मुळशी भागातला आदिवासी भाग हा परंपरागत काँग्रेसलाच मतदान करत आलाय… साखर कारखानदारी, लोकसभेला आघाडीच्या बाजूने दिलेलं निर्णायक लीडही येणाऱ्या काळात थोपटेंना फायद्याचं ठरणार आहे… बाकी ऊसाची थकीत बिलं, गुंजवणीचा रखडलेला प्रस्ताव आणि शहरी पट्टयातील भागाकडे झालेलं दुर्लक्ष हे मात्र थोपटेंच्या अंगलट येऊ शकतं…
बारामती मतदारसंघातील इतर विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपला आपला विस्तार करता आला असला तरी, भोर मतदारसंघांमध्ये भाजपला अद्याप आपलं अस्तित्व त्या प्रमाणात निर्माण करता आलेलं नाही. स्पष्ट भाषेत सांगायचं झालं तर थोपटेंच्या वर्चस्वामुळे ते त्यांनी करू दिलं नाही. शिवसेनेनं काही प्रमाणात या भागामध्ये आपलं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला असला तरी मुळशीतील काही भाग आणि भोर तालुक्यातील हायवे लगतचा परिसर या भागातच फक्त शिवसेनेला आपला अस्तित्व निर्माण करता आलंय… बाकी मतदारसंघात अजूनही ‘सब कूछ थोपटे’ अशीच परिस्थिती आहे…
बाकी यंदा निवडणूक कशी होऊ शकते? याचा थोडा अंदाज लावला तर महाविकास आघाडीकडून संग्राम थोपटे यांचं नाव साहजिकच कन्फर्म आहे… तर थोपटेंचे पारंपारिक विरोधक कुलदीप कोंडे याही वेळेस शिंदेंच्या शिवसेनेकडून निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे… अजित पवार गटाकडून माजी आमदार काशिनाथ खुटवत यांचे सुपुत्र विक्रम खुटवत आणि नगरसेवक किरण दगडे पाटील ही नाव सध्या थोपटेंच्या वर्चस्वला आव्हान देण्यासाठी तयार आहेत…लोकसभेला थोपटेंनी आघाडी धर्म पाळला… हेच पाहता शरद पवार गट थोपटेंचे प्रामाणिक काम करेल, यात तशी शंका नाही… पण मुख्यमंत्रीपद, मंत्रीपद अशा सगळ्यांना हुलकावणी देत राजकारण शाबूत ठेवणाऱ्या थोपटेंना यंदा महायुतीकडून दणका मिळू शकतो का? संग्राम थोपटे यंदा आमदारकी वन साईड मारतील की फाईट घासून होईल? थोपटेंना पाणी पाजण्याची हिंमत भोरमध्ये कोण दाखवू शकतो? तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.
Railway Rule : सार्वजनिक वाहतुकीमध्ये अव्वल स्थान असलेले वाहन म्हणजे रेल्वे. भारतामध्ये रेल्वेचे मोठे जाळे पसरले आहे. दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करीत असतात. जरी दररोज मोठ्या संख्येने लोक रेल्वेने प्रवास करीत असले तरी रेल्वेचे नियम सगळ्यांनाच माहिती (Railway Rule) असतात असे नाही.
रेल्वेने किंवा कोणत्याही सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांनी प्रवास करायचा म्हटल्यास तिकीट काढणे अनिवार्य असते. जर तुम्ही रेल्वेचे तिकीट काढले नाही तर टीटी तुम्हाला दंड करू शकतो किंवा तुम्हाला ट्रेन मधून बाहेर काढण्याचे सुद्धा त्याला अधिकार असतात. हा नियम बहुतांशी सर्वाना माहिती असेलच मात्र तुम्हाला हे माहिती आहे का ? की जरी तुमच्या कडे तिकीट (Railway Rule) असले तरी तुम्हाला टीटी ट्रेनमधून बाहेर काढू शकतो. नक्की काय आहे कारण ? काय सांगतो रेल्वेचा नियम ? चला जाणून घेऊया …
तुम्हाला रेल्वेचा एक नियम जाणून आश्चर्य वाटेल टीटी तिकीट (Railway Rule) असूनही चालत्या ट्रेनमधून तुम्हाला उतरवू शकतो. जर तुमच्यासोबत असे झाले तर तुम्ही टीटीशी गोंधळ किंवा वाद घालू नका. लक्षात घ्या टीटी कडे कोणते अधिकार आहेत ? काय आहे रेल्वेचे नियम ? खरेतर प्रवाशांचे हित लक्षात घेऊन हा नियम करण्यात आला आहे.
भारतीय रेल्वेचे सीपीआरओ सांगतात की, प्रवाशांची सोय आणि सुरक्षितता लक्षात घेऊन रेल्वेची नियमावली बनवण्यात आली आहे. या रेल्वे नियमावलीनुसार टीटी कारवाई करू शकतो . प्रवाशांची प्राथमिकता आणि सुरक्षा हे भारतीय रेल्वेचे प्राधान्य आहे. यामध्ये हलगर्जीपणा केल्यास रेल्वे कर्मचाऱ्यावरच कारवाई होऊ शकते.
काय आहे नियम ? (Railway Rule)
ट्रेनमध्ये प्रवास सुरू करण्यापूर्वी किंवा प्रवासादरम्यान, TT ला वाटत असेल की, कोणत्याही प्रवाशाची तब्येत ठीक नाही आणि तो प्रवास करण्याच्या स्थितीत नाही. प्रवासादरम्यान वाटेत अडचण येऊ शकते. असे असूनही, तो प्रवास करत असल्यास, प्रवाशाची तब्येत खराब असल्याचे कारण देत टीटी प्रवाशाला ट्रेनमधून काढू शकतो. प्रवाशाकडे फर्स्ट क्लास किंवा जनरल क्लासचे तिकीट (Railway Rule) असले तरी. प्रवाशाने तिकिटाचा हवाला देऊन प्रवास करायचे म्हटले तर TT वैद्यकीय प्रमाणपत्रासह प्रवास करण्याची परवानगी देऊ शकतो.
प्रवाशांचे आरोग्य लक्षात घेऊन हा नियम बनवण्यात आला आहे. उदाहरणार्थ, एखाद्या प्रवाशाची तब्येत बरी नसते आणि टीटीला त्याची कल्पना येते, तरीही तो प्रवास थांबवत नाही आणि अशा परिस्थितीत तत्काळ वैद्यकीय सुविधा मिळाल्यास त्या प्रवाशाच्या अडचणी वाढतात न दिल्यास रुग्णाचा (Railway Rule) जीव जाऊ शकतो. हे TT चे प्रवाशांकडे दुर्लक्ष मानले जाऊ शकते. अशा प्रवाशांना लक्षात घेऊन रेल्वेने हा नियम केला आहे.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर BCCI नव्या कोचच्या शोधात आहे. यासाठी उपकर्णधार हार्दिक पंड्या आणि आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव यांची नावे समोर येत आहे. आधीच संघाचा उपकर्णधार असल्याने कर्णधार पदाची माळ आपोआप हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) गळ्यात पडेल असं बोललं जात होते. मात्र आता यामध्ये मोठा ट्ट्विस्ट आला आहे. त्यानुसार, सूर्यकुमार यादव भारताचा नवा T20 बनण्याची शक्यता आहे. कारण मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि नुकताच रीटायर झालेल्या रोहित शर्माने सुद्धा कॅप्टनशिपच्या पदासाठी सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) आपली पसंती दिलीय. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.
हार्दिक पंड्याने वर्ल्डकप मध्ये जरी दमदार कामगिरी केली असली तरी सततची दुखापत हि त्याची कमकुवत बाजू आहे. पुढची T20 विश्वचषक स्पर्धा २०२६ मध्ये आहे. त्यासाठी योग्य तयारी व्हावी याकरिता टीम इंडियाला प्रमुख कर्णधाराची गरज आहे. हार्दिकच्या दुखापती आणि त्याचं वर्कलोड मॅनेजमेंट टीमसाठी एक मोठ आव्हान ठरतं. ज्यामुळे दीर्घकालीन नेतृत्वासाठी त्याच्या योग्यतेबद्दल चिंता आहे. यामुळेच गौतम गंभीर आणि रोहित शर्माने नव्या कर्णधार पदासाठी हार्दिक पंड्या ऐवजी सूर्यकुमार यादवला आपली पसंती दिली आहे. गंभीर आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी हा निर्णय पंड्याला आधीच कळवला असल्याचेही रिपोर्टमधून सांगण्यात आलय.
कर्णधार म्हणून हार्दिक पंड्याच्या कामगिरी बद्दल सांगायचं झाल्यास, आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून, हार्दिक पांड्याने 45 सामन्यांमध्ये नेतृत्व केले. यातील 26 सामन्यात त्याला विजय मिळवता आलाय, त्याची विजयाची टक्केवारी 57.77 इतकी राहिली आहे. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटबद्दल बोलायचं झाल्यास, हार्दिकने आतापर्यंत 16 T20 इंटरनॅशनलमध्ये टीम इंडियाच नेतृत्व केलय. यात 10 सामन्यात त्याला विजय मिळवता आलाय तर 5 मॅचमध्ये पराभवाचा समन्व करावा लागला आहे तर एक सामना टाय झालेला. दुसरीकडे, सूर्यकुमार यादवने 7 T20 सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केलय. यात 5 मॅचमध्ये विजय मिळवला तर 2 सामन्यात पराभव झाला.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ३ जुलैपासून जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया या देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्याने सर्वसामान्य ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. आधीच महागाईने त्रस्त असलेली जनता आता रिचार्ज प्लॅनच्या वाढत्या किमतींनी हैराण झाली आहे. त्यामुळे अनेक ग्राहक पैसे वाचवण्यासाठी BSNL कडे वळत आहेत. कमी खर्च असल्याने आजकाल बीएसएनएलचा रिचार्ज करणे (BSNL Recharge Plans) सर्वसामान्य ग्राहकांना परवडत आहेत. आज आम्ही तुम्हाला BSNL च्या अशाच एका रिचार्ज बद्दल सांगणार आहोत ज्याची व्हॅलिडिटी 160 दिवस आहे. हा रिचार्ज प्लॅन 997 रुपयांचा असून जिओला सुद्धा मागे टाकत आहे. चला तर सविस्तर तुलना करूनच पाहुयात…
BSNL चा 997 रुपयांचा रिचार्ज– BSNL Recharge Plans
BSNL च्या 997 रुपयांच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 2 GB हायस्पीड इंटरनेट डेटा वापरायला मिळतो. तसेच अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसचा लाभ घेता येईल. हा रिचार्ज प्लॅन 160 दिवसांच्या व्हॅलिडिटी सह येत असून यामध्ये काही ॲप्सचा विनामूल्य ऍक्सेस सुद्धा मिळतोय. 160 दिवसांची व्हॅलिडिटी आणि दररोज 2GB इंटरनेट म्हणजेच या रिचार्ज प्लॅनच्या माध्यमातून ग्राहकांना 320 GB हायस्पीड इंटरनेटचा लाभ मिळतोय.
Jio चा 999 रुपयांचा रिचार्ज प्लॅन–
दुसरीकडे जिओच्या 999 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 2GB हायस्पीड डेटा, दररोज 100 SMS आणि फ्रि मध्ये अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ मिळतो. परंतु जिओच्या या रिचार्जला फक्त 98 दिवसांची व्हॅलिडिटी मिळतेय. म्हणजेच BSNL शी तुलना करायचं झाल्यास खुपच कमी दिवसांसाठी हा प्लॅन चालेल. आणि 2GB डेटा तो पण फक्त 98 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह म्हणजेच एकूण 196GB हाय स्पीड डेटा ग्राहकांना वापरायला मिळेल. BSNL कंपनीच्या प्लानमध्ये Jio पेक्षा 124 GB जास्त इंटरनेट डेटा मिळतोय आणि व्हॅलिडिटी सुद्धा जास्त असल्याने सतत रिचार्ज करायचं टेन्शन नाही. त्यामुळे BSNL चा रिचार्ज (BSNL Recharge Plans) जिओ पेक्षाही परवडणारा म्हणता येईल.
Vertical Lift Railway Bridge : भारताच्या विकासात भर घालणारे अनेक नवनवीन प्रोजेक्ट्स हाती घेण्यात आले आहेत. बुलेट ट्रेन , मेट्रो प्रकल्प , रस्ते आणि पूल यांचा यात समावेश आहे. यापैकी काही प्रकल्प पूर्ण झाले आहेत तर काही प्रकल्प पूर्णत्वास येण्याच्या मार्गावर आहेत. आता भारतातील पहिला वर्टिकल लिफ्ट रेल्वे पूल लवकरच पूर्णत्वास येण्याच्या मार्गावर आहे. पुढच्या दोन महिन्यात याची ट्रायल रन (Vertical Lift Railway Bridge) सुरु होणार आहे. याबाबतची माहिती पायाभूत सुविधांसाठीचे रेल्वे बोर्ड सदस्य अनिल खंडेलवाल यांनी जाहीर केली आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, खंडेलवाल यांनी पुलाची पाहणी केल्यानंतर हे अपडेट आले आहे. त्यांनी याबाबत सांगितले की बांधकाम 90 टक्के पूर्ण झाले आहे. नवीन पूल सुमारे 2.2 किमी लांबीचा असेल आणि भारताच्या (Vertical Lift Railway Bridge) मुख्य भूभागातील मंडपम शहराला पंबन बेट आणि रामेश्वरमशी जोडेल.
भारतातील पहिला व्हर्टिकल -लिफ्ट रेल्वे सागरी पूल, एक आधुनिक अभियांत्रिकी चमत्कार आहे असे आपण म्हणून शकतो. यामुळे कनेक्टिव्हिटी वाढणार आहे यात शंकाच नाही. रेल विकास निगम लिमिटेड (RVNL) कडून याचा विकास (Vertical Lift Railway Bridge) केला जात असून . यासाठी 535 कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत.
समुद्रसपाटीपासून 22 मीटर उंच पूल
समुद्रसपाटीपासून 22 मीटर उंचीवर नेव्हिगेशनल एअर क्लिअरन्ससह व्हर्टिकल लिफ्ट ब्रिज सध्याच्या पुलापेक्षा 3 मीटर उंच असेल. ट्रेन कंट्रोल सिस्टमसह इंटरलॉक केलेल्या इलेक्ट्रो-मेकॅनिकल कंट्रोल सिस्टमचा (Vertical Lift Railway Bridge) वापर करून हा ऑपरेट केला जाईल. पांबन रेल्वे सागरी सेतूमध्ये 99 स्पॅन आहेत, प्रत्येकाची लांबी 18.3 मीटर आहे, तसेच 72.5 मीटरचा एक स्पॅन आहे.
हा रेल्वे पूल मुख्य भूमीला रामेश्वरम, एक ऐतिहासिक दक्षिण भारतीय शहर आणि चार धाम तीर्थस्थानांपैकी एक, उत्तरेकडील बद्रीनाथ, पश्चिमेला द्वारका आणि पूर्वेला पुरीशी जोडतो म्हणून हा पूल खूप महत्त्व आहे. हा पूल परंपरा आणि नवकल्पना यांच्या गतिशील समन्वयाचे उदाहरण देतो, जो भारताच्या विकास (Vertical Lift Railway Bridge) कथेचे वैशिष्ट्य आहे.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर (Manorama Khedkar Arrested) यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी मनोरमा खेडकर यांचा स्थानिक शेतकऱ्यांना धमकावतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. पुणे पोलिसांची चार पथके त्यांच्या शोधात होती. अखेर आज महाड येथून मनोरमा खेडकर यांना अटक करण्यात आली आहे. आज दुपारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांना धमकवल्याच्या प्रकरणात मनोरमा खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल होता. गुन्हा दाखल झाल्यापासून मनोरमा खेडकर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार होत्या. अनेक दिवसांपासून मनोरमा खेडकरचा शोध पोलिसांकडून सुरू होता. त्यांचा फोन सुद्धा बंद होता. यानंतर मनोरमा खेडकर यांच्या शोधासाठी पुणे पोलिसांची चार पथके रवाना झाली होती. अखेर आज पोलिसांनी मनोरमा खेडकरला महाड मधील हॉटेल मधून अटक (Manorama Khedkar Arrested) केली आहे. स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करुन पोलिस त्यांना पुण्याला घेऊन येत आहेत. आजच त्यांना न्यायालयात हजर करण्यात येईल.
नेमकं काय आहे प्रकरण? Manorama Khedkar Arrested
पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातल्या धडवली गावात खेडकर कुटुंबाने 25 एकर वादाची जमीन खरेदी घेतली होती. या जमिनीचे प्रकरण न्यायप्रविष्ट होते. त्यामुळे शेजारील शेतकऱ्यांनी विरोध केला होता. त्यावेळी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर या बाउन्सर अन् गुंड घेऊन त्या ठिकाणी पोहोचल्या. त्यांनी हातात पिस्तूल घेऊन या शेतकऱ्यांना दमदाटी करत धमकावलं होते. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर मनोरमा खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. मात्र त्या फरार झाल्याने त्यांचा शोध लागत नव्हता. अखेर आज पुणे ग्रामीण पोलिसानी त्यांना बेड्या ठोकल्या.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकप्रिय मोबाईल ब्रँड सॅमसंगने भारतीय बाजारात Samsung Galaxy M35 5G नावाचा नवीन मोबाईल लाँच केला आहे. सॅमसंगचा हा स्मार्टफोन 6GB रॅम आणि 8GB रॅम पर्यायात आला आहे. यामध्ये 50MP कॅमेरा, 6000mAh बॅटरीसह अनेक भन्नाट फीचर्स देण्यात आले आहेत. आज आपण या मोबाईलची किंमत आणि त्याचे स्पेसिफिकेशन याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
डिस्प्ले –
Samsung Galaxy M35 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.6 इंचाचा FHD+ सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला 1080×2340 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 1000 nits पीक ब्राइटनेसचा सपोर्ट मिळतोय. सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस सपोर्ट सुद्धा देण्यात आला आहे. कंपनीने या मोबाईल मध्ये Exynos 1380 चिपसेट बसवली असून हा मोबाईल Android 14 आधारित One UI 6 या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतो.
कॅमेरा – Samsung Galaxy M35 5G
मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Samsung Galaxy M35 5G मध्ये पाठीमागील बाजूला 50MP चा प्राथमिक कॅमेरा, 8MP चा अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि 2MP मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 13MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पॉवरसाठी मोबाईल मध्ये 6000mAh बॅटरी असून ही बॅटरी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनी या मोबाईलवर ४ वर्षांसाठी सॉफ्टवेअर अपडेट्स आणि 5 वर्षांची सुरक्षा अपडेट देत आहे.
किंमत किती?
Samsung Galaxy M35 5G च्या 6GB + 128GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 19,999 रुपये, 8GB + 128GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 21,499 रुपये आणि 8GB + 256GB स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनची किंमत 24,499 रुपये आहे. हा मोबाईल निळ्या आणि ग्रे कलरमध्ये लाँच करण्यात आलाय. तुम्ही हा स्मार्टफोन Amazon किंवा Samsung वेबसाइटवरून खरेदी करू शकता. सर्व बँक कार्डवर तुम्हाला 2000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल.