Monday, December 22, 2025
Home Blog Page 594

सर्वाना एक दिवस मरायचंच आहे; हाथरस घटनेवर भोले बाबांचं बेताल वक्तव्य

Hathras Stampede bhole baba

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात चेंगराचेंगरीची (Hathras Stampede) दुर्दैवी घटना घडली. बाबा हरिनारायण साकार उर्फ ​​भोले बाबा यांच्या एका सत्संग कार्यक्रमानंतर हि चेंगराचेंगरी झाली आणि यामध्ये १२१ पेक्षा जास्त लोकांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली. तसेच हि चेंगराचेंगरी कशामुळे झाली याची चौकशी सुद्धा सुरु आहे. मात्र याच दरम्यान, आता खुद्द भोले बाबा (Bhole Baba) यांनी एक बेताल विधान केलं आहे. आपल्या नशिबात जे लिहिले आहे ते कोणीही टाळू शकत नाही, प्रत्येकाला एक दिवस मरायचं आहे असं त्यांनी म्हंटल आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

पीटीआयला दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना भोले बाबा म्हणाले, 2 जुलैच्या घटनेपासून मी डिप्रेशनमध्ये गेलो आहे, मी अत्यंत व्यथित आहे. परंतु जे घडणार आहे त्याला कोण थांबवू शकत?? जो या जगात आला आहे त्याला एक ना एक दिवस जायचं आहेच असं त्यांनी म्हंटल. तसेच त्यांनी या चेंगराचेंगरी मागे काहीतरी षडयंत्र असल्याची शंकाही उपस्थित केली. सत्संगाच्याकार्यक्रमात कोणीतरी विषारी फवारणी केली. यामागे काही ना काही षडयंत्र रचले गेले आहे. सनातन आणि सत्याच्या आधारे चालणाऱ्या त्यांच्या संस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न काही लोक करत असल्याचा आरोप भोले बाबा यांनी केला. या सर्व प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर सर्व गोष्टी समोर येतील, आमचा तपास यंत्रणांवर विश्वास आहे असं भोले बाबा यांनी म्हंटल.

रिपोर्टनुसार, हाथरस सत्संगात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर भोले बाबांनी सध्या प्रवचन देणे बंद केले आहे. हातरसमधील दुर्घटनेनंतर चरणराजचा मुद्दा खोटा प्रचार करण्यात आला. सिकंदरावांसह कोणत्याही सत्संगात मी मंचावरून असे काहीही बोलले नाही असं भोले बाबानी स्पष्ट केलं आहे. तसेच या चेंगराचेंगरीत ज्या कुटुंबांचे नुकसान झाले. मी आणि संपूर्ण आश्रम परिवार त्यांच्यासोबत आहोत असेही त्यांनी सांगितलं.

Mumbai Rain Update : मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस!! पुढील 3-4 तास अतिशय महत्वाचे

Mumbai Rain Update

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र्राची राजधानी मुंबईत काल रात्रीपासून पुन्हा एकदा मुसळधार पाऊस (Mumbai Rain Update) सुरु झाला आहे. आजही मुंबईत मुसळधार पावसाचा यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. दरम्यान, पुढील 3 ते 4 तास पावसाची संततधार कायम राहणार असल्याची माहिती देखील हवामान विभागानं दिली आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई लोकलवर सुद्धा परिणाम पाहायला मिळत आहे. मध्यरेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून काही ट्रेन या उशिरा धावणार आहेत. तर रस्त्यावरील वाहतूक सुद्धा संथ गतीने पाहायला मिळत आहे.

आज सुद्धा मुंबईत मुसळधार पाऊस – Mumbai Rain Update

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज मुंबईत कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 29 सेल्सिअस आणि 25 सेल्सिअसच्या आसपास असणार आहे. तसेच मुंबईत पुढील 3 ते 4 तास मुसळधार पाऊस सुरु राहणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे मुंबईकरांनी सावध राहावे, विनाकारण घराबाहेर पडू नये. मुंबईत काही सखल भागात पाणी साठण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे रस्ते वाहतुकीचा वेगही संथ झाला आहे. तर मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल रेल्वेही मंदावली आहे. मधय रेल्वे आणि पश्चिम रेल्वेला पावसामुळे मोठा फटका बसला आहे. सकाळच्या वेळेला चाकरमान्यांना कामावर जायचं असतं, मात्र लोकल उशिरा धावणार असल्याने सर्व्ह काही विस्कळीत झालं आहे.

काय आहे लोकलची अवस्था ?

मध्य रेल्वे 10 ते 15 मिनिट उशिराने धावत आहेत.
पश्चिम रेल्वे 5 ते 6 मिनिट विलंबाने धावत आहे.
हार्बर रेल्वे सुद्धा 5 ते 6 मिनिट उशिराने धावत आहे.
कल्याण वरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या गाड्या दहा ते पंधरा मिनिटे उशिरा धावत आहेत.
पश्चिम दृतगती महामार्गावरही वाहतूक मंद गतीने सुरु

अखेर महाराष्ट्रात शिवरायांची वाघनखे दाखल; जाणून घ्या कुठे आणि कधी येणार पाहता??

waghnakhe

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| अखेर आज म्हणजेच 17 जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची (Shivaji Maharaj) वाघनखे (Waghanakhe)लंडनहून मुंबईमध्ये (Mumbai) दाखल झाली आहेत. येत्या 19 जुलै रोजी ही वाघनखे साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे 19 तारखेला या वाघनख्यांचे साताऱ्यात (Satara) दिमाखात स्वागत केले जाणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष अशी तयारी आणि बंदोबस्त करण्यात आला आहे. या वाघनख्यांच्या स्वागतावेळी राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असतील अशी माहिती समोर आली आहे.

यावेळेत येणार पाहता वाघनखे

महत्वाचे म्हणजे, 19 जुलै रोजी साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात शिवभक्तांना पाहण्यासाठी ही वाघनखे खुली करण्यात येतील. ज्याठिकाणी ही वाघनखे ठेवली जातील तेथे बुलेट प्रूफ कवच करण्यात आले आहे. तसेच या काळामध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त देखील संग्रहालयामध्ये राहील. साताऱ्यातील दररोज प्रत्येकी 2 शाळेच्या विद्यार्थ्यांना वाघनखे पाहण्यासाठी निशुल्क सोडण्यात येईल. तर इतर लोकांना 10 प्रमाणे तिकीट आकारले जाईल. ही वाघनखे सकाळी 10 ते 5 या वेळेत संग्रहालयामध्ये जाऊन पाहता येतील.

पावसाळ्यात सर्दी-खोकल्याचा त्रास किंवा त्वचेच्या समस्या उद्भवतात? तर कडुलिंबाच्या पानाचे करा सेवन

lemon leaves

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पावसाळ्याला सुरुवात झाली की जास्त आद्रतेमुळे त्वचा चिकट जाणवू लागते. तसेच याचं वातावरणामध्ये त्वचेवर फोड येणे, इन्फेक्शन होणे, अशाही समस्या उद्भवतात. इतकेच नव्हे तर सर्वात जास्त आजार हे पावसाळ्यामध्येच पसरतात. त्यामुळे या काळात स्वतःला निरोगी ठेवणे अत्यंत गरजेचे असते. अशावेळी कडुलिंबाचा (c) वापर करणे अत्यंत फायदेशीर ठरते. कडुलिंब आहारात घेतल्यामुळे त्वचेच्या आणि आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात. आज आपण याचं कडुलिंबाचे फायदे जाणून घेणार आहोत.

कडुलिंबाचे होणारे विविध फायदे

  • कडुलिंबाची पाने रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करतात. कडुलिंबाच्या पानाचे अमोशा पोटी सेवन केल्यामुळे कोणतेही आजार उद्भवू येत नाहीत. तसेच, पोटासंबंधित आजार होत नाहीत. कडुलिंबाच्या सेवनामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहते.
  • पावसाळ्यामध्ये जर सगळ्यात सर्दी खोकल्याचा त्रास जाणवत असेल तर रोज सकाळी कडुनिंबाची पाने चावून खाल्ल्याने चांगला परिणाम दिसून येईल. तसेच यामुळे खोकलाही बरा होईल आणि सर्दी ही निघून जाईल. हे पाने खाल्ल्यामुळे इतर बॅक्टेरियाच्या संसर्गापासून बचाव होतो.
  • इतकेच नव्हे तर पावसाळ्यामध्ये चेहऱ्यावर मुरूम , फोड येत असतील तर अंघोळ करताना गरम पाण्यामध्ये कडुलिंबाची पाने टाकावीत. कडुलिंबाच्या पाण्याने अंघोळ केल्यामुळे त्वचेसंबंधित कोणत्याही समस्या उद्भवणार नाहीत.
  • कडुलिंबाचे पाणी पिणे देखील शरीरासाठी या काळात अत्यंत चांगले ठरते. यामुळे इतर कोणतेही घातक आजार होत नाहीत. कडुलिंबाच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्यामुळे ही पाने खाल्ल्याने शरीरावर चांगला परिणाम होतो.

पानांचे सेवन कसे करावे??

रोज सकाळी कडुलिंबाची 4-5 ताजी पाने धुवून घ्या. यानंतर उपाशीपोटी ती पाणी चघळा. तसेच याऐवजी तुम्ही कडू लिंबाच्या पानांचा रसही पिऊ शकता.

Indian Railway : वंदे भारतसह भारतीय रेल्वेसाठी सुरक्षा कवचची अधिक गरज

Indian Railway : भारतामध्ये सार्वजनिक प्रवासी वाहतुकीमध्ये रेल्वे महत्वाची भूमिका बजावते. प्रवाशांना कमी वेळेत आणि गतिमान प्रवास करता यावा याकरिता रेल्वे विभाग कडून प्रयत्न केले जातात. यंदाच्या वर्षी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या वर्षाच्या सुरुवातीला त्यांच्या अंतरिम अर्थसंकल्पीय भाषणात घोषणा केली होती की 40,000 सामान्य रेल्वे डबे वंदे भारत मानकांनुसार (Indian Railway) बदलले जातील.

2024-25 या आर्थिक वर्षाच्या अंतरिम बजेटमध्ये भारतीय रेल्वेला 2.55 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. सीतारामन यांनी त्यांच्या सहाव्या अर्थसंकल्पीय भाषणात, आर्थिक वर्ष 2023-24 साठी निर्धारित केलेल्या 2.41 लाख कोटी रुपयांच्या (Indian Railway) अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये (BE) 5.8% वाढ प्रस्तावित केली.

अलिकडच्या वर्षांत, भारत सरकारने 1.4 अब्ज लोकसंख्येला सेवा देणारे तसेच सध्याच्या मार्गांवर होणारी गर्दी कमी करण्यासाठी आपल्या विस्तृत रेल्वे नेटवर्कचे आधुनिकीकरण करण्यासाठी प्रयत्नांना गती दिली आहे.या आधुनिकीकरण मोहिमेमध्ये पुरवठा साखळीतील अडथळे कमी करणे आणि लॉजिस्टिक कार्यक्षमतेत सुधारणा करण्याच्या उद्देशाने समर्पित मालवाहतूक कॉरिडॉर तयार करणे समाविष्ट आहे. अलीकडील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, सरकारने प्रवासी-केंद्रित उपक्रमांवर लक्ष केंद्रित करून 100 दिवसांच्या कृती (Indian Railway) आराखड्याचे अनावरण केले. यामध्ये 24 तास तिकीट परतावा योजना, रेल्वे सेवांसाठी सर्वसमावेशक सुपर ॲप विकसित करणे, तीन आर्थिक कॉरिडॉरची स्थापना आणि स्लीपर वंदे भारत ट्रेन सुरू करणे यांचा समावेश आहे.

रेल्वे प्रवास सुरक्षित करण्याचे आव्हान (Indian Railway)

तथापि, या प्रगती असूनही, भारताच्या रेल्वे पायाभूत सुविधांसाठी सर्वसमावेशक सुरक्षा फ्रेमवर्क सुनिश्चित करणे हे एक गंभीर आव्हान आहे, जे तेथील नागरिकांच्या प्रवास सुरक्षेसाठी गंभीर आहे.गेल्या वर्षी ओडिशाच्या बालासोर येथे तीन गाड्यांमधील टक्कर होऊन शेकडो लोकांचा मृत्यू झाल्याच्या काही महिन्यांनंतर, भारताने गेल्या महिन्यात पश्चिम बंगालमध्ये आणखी एक अपघात नोंदवला (Indian Railway) ज्यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला.

रेल्वेला जागतिक दर्जाच्या सुविधा देण्याचे उद्दिष्ट

23 जुलै रोजी सीतारामन यांच्या अर्थसंकल्पीय घोषणेपूर्वी, भारतातील 1.4 अब्ज नागरिकांपैकी बहुतांश नागरिकांची नजर ही आधुनिकीकरणाच्या मोहिमेदरम्यान रेल्वे नेटवर्कसाठी सरकार काय तरतूद करते यावर केंद्रित असेल.रेल्वे आधुनिकीकरण (Indian Railway) योजनेत पुढील पाच वर्षांमध्ये 10 ते 12 लाख कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक अपेक्षित आहे, ज्याचे उद्दिष्ट भारताच्या रेल्वे नेटवर्कमध्ये जागतिक दर्जाच्या सुविधांच्या नवीन युगाची सुरुवात करण्याचे आहे.

वंदे भारत (Indian Railway)

भारत तीन प्रकारात वंदे भारत ट्रेन्स लाँच करण्याच्या तयारीत आहे: 100 किमी पेक्षा कमी मार्गांसाठी वंदे मेट्रो, 100 ते 550 किमी च्या दरम्यानच्या मार्गांसाठी वंदे मेट्रो आणि वंदे स्लीपर 550 किमी. प्रवाशांचा अनुभव वाढवण्याच्या प्रयत्नांशी संरेखित, या गाड्या सुविधा आणि कार्यक्षमता वाढवण्याचे आश्वासन देतात.

भारतीय सैन्यात 381 रिक्त जागांसाठी भरती जाहीर; 2 लाख 50 हजार रूपये मिळेल पगार

Indian Army Job

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. जे तरुण भारतीय सैन्यात (Indian Army) नोकरी करू इच्छितात अशा तरुणांनी तर ही बातमी आवश्यक वाचावी. कारण, भारतीय सैन्याच्या अंतर्गत शॉर्ट सर्व्हिस कमिशन टेकच्या एकूण 381 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. याबाबतची नुकतीच नोटिफिकेशन जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये 16 जुलै अर्जांची अंतिम तारीख असेल अशी माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे पात्रता आणि वयोमर्यादा जाणून घ्या….

ही रिक्त पदे जाणार भरली

समोर आलेल्या माहितीनुसार, भारतीय सैन्यामध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशन टेक भरती अंतर्गत एकूण 381 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशन 64 (Male) अंतर्गत एकूण 350 रिक्त पदे भरली जातील. तर शॉर्ट सर्व्हिस कमिशन 35 (Female) ची एकूण 29 रिक्त पदे भरण्यात येतील. यासह जातील.एसएससी (W) टेक्निकलचे 1 पद तर एसएससी (W) नॉन टेक्निकल, नॉन यूपीएससीचे 1 पद भरण्यात येणार आहे. त्यामुळेच इच्छुक तरुणांसाठी ही संधी चांगली ठरू शकते.

या भरती प्रक्रियेअंतर्गत इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. याबाबतचे अधिक माहिती joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाईटवर मिळेल. लक्षात ठेवा की या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 जुलै आहे. या भरतीसाठी अर्ज भरताना कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. या भरती अंतर्गत निवडलेल्या उमेदवाराला विविध पदानुसार 56 हजार ते 2 लाख 50 हजार रुपयांपर्यंत पगार देण्यात येणार आहे. त्यामुळे वेळ न दवडता त्वरित अर्ज करावा.

Mumbai News : मुंबई विमानतळावर 13.24 किलोचं सोनं जप्त ; 7 जणांना अटक

Mumbai News : मुंबईतील कस्टम विभागाने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठी कारवाई करत तब्बल नऊ कोटींचं सोनं जप्त केल्याची माहिती आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 13.24 किलो सोनं जप्त करण्यात आलं आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात सोनं सापडल्यामुळे (Mumbai News) आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार यावेळी केवळ सोनेच नाही तर 1.38 कोटी रुपयांची इलेक्ट्रॉनिक उपकरण आणि 45 लाख रुपयांचे परदेशी चलन देखील जप्त करण्यात आले आहे. कस्टम विभागाने ही मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणांमध्ये पोलिसांनी (Mumbai News) सात जणांना अटक केली असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत. एकूण चोवीस प्रकरणांमध्ये हे कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळते आहे.

वेगवेगळ्या 24 गुन्ह्यांमध्ये आरोपींना अटक (Mumbai News)

खरंतर 10 जुलै ते 14 जुलै या पाच दिवसात सात जणांना अटक करण्यात आलेली आहे वेगवेगळ्या 24 गुन्ह्यांमधील आरोपींना अटक केली असून सोन्याची तस्करी ही मेणातील सोन्याची धूळ, कच्चे दागिने, सोन्याचे बार, कपड्यांमध्ये, कागदाच्या थरांमध्ये, शरीरात आणि त्यांच्या शरीरावर (Mumbai News) लपवून ठेवलेले होते. वेगवेगळ्या 24 गुन्ह्यांमध्ये आरोपींना अटक करण्यात आली आहे.

एका स्पेशल ऑपरेशनच्या दरम्यान दुबई (२), अबुधाबी (२) आणि जेदा इथून (१) प्रवास करणाऱ्या पाच भारतीय नागरिकांना रोखण्यात आलं आणि त्यांच्याकडे 24 कॅरेट सोन्याची धूळ, 24 कॅरेट कच्च्या सोन्याच्या चेन आणि एकूण 4850 वजनाच्या बांगड्या आढळून (Mumbai News) आल्या. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करत सोने जप्त करण्यात आले.

POCO C61 Airtel Edition : अवघ्या 5,999 रुपयांत लाँच झाला स्वस्तात मस्त Mobile; 50GB डेटाही Free

POCO C61 Airtel Edition

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तुम्ही जर कमी पैशात आणि स्वस्तात मस्त मोबाईल खरेदी करण्याच्या विचारात असाल तर हि बातमी खास तुमच्यासाठीच आहे. कारण प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी POCO ने भारतीय बाजारात POCO C61 Airtel Edition हा नवीन आणि परवडणारा मोबाईल लाँच केला आहे. या स्मार्टफोन मध्ये 5000mAh बॅटरी,4GB रॅम आणि 8MP कॅमेरा देण्यात आला आहे. अतिशय कमी किंमत असल्याने भारतीय मार्केट मध्ये हा स्मार्टफोन नक्कीच धुमाकूळ घालेल यात शंका नाही. आज आपण या मोबाईल बद्दल संपूर्ण माहिती सविस्तरपणे जाणून घेऊयात….

काय फीचर्स मिळतात?

POCO C61 Airtel Edition मध्ये 90Hz रिफ्रेश सह 6.71-इंचाचा IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. मोबाईल मध्ये MediaTek G36 चिपसेट बसवण्यात आली असून 4GB + 64GB स्टोरेज व्हेरिएंटमध्ये हा स्मार्टफोन लाँच करण्यात आलाय. मोबाईल मध्ये प्राथमिक कॅमेरा 8MP आणि सेल्फी आणि विडिओ कॉल साठी 5MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये बॅक पॅनलवरील कॅमेरा मॉड्यूलच्या वर गोलाकार रेडियंट रिंग डिझाइन वापरण्यात आली ज्यामुळे मोबाईलला आकर्षक लूक मिळतोय. मात्र याठिकाणी हि एक गोष्ट लक्षात ठेवा कि हा एक 4G मोबाईल असून 5G ला सपोर्ट करत नाही. तसेच यामध्ये फक्त एअरटेल प्रीपेड सिमकार्ड चालेल. जिओ, वोडाफोन- आयडिया किंवा अन्य कोणत्याही सिमकार्डला हा मोबाईल सपोर्ट करत नाही.

किंमत किती? POCO C61 Airtel Edition

POCO C61 Airtel Edition ची Flipkart वर किंमत 5,999 रुपये आहे. POCO C61 Airtel Edition वर 7.5 टक्क्यांपर्यंत सूट मिळेल, जी 750 रुपयांपर्यंतची सूट असेल. एवढच नव्हे तर हा स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर ग्राहकांना 50GB डेटा मोफत मिळणार आहे. POCO चा हा स्मार्टफोन मिस्टिकल ग्रीन, इथरियल ब्लू आणि डायमंड डस्ट ब्लॅक या तीन कलर व्हेरियंटमध्ये येतो.

Mumbai Metro : ठरलं ! याच महिन्यात धावणार मुंबईतील पहिली अंडरग्राउंड मेट्रो

Mumbai Metro : 24 तास व्यस्त असणारं शहर म्हणून ज्याची ओळख आहे अशा मुंबईसाठी आणि मुंबईकरांसाठी अतिअशय आनंदाची बातमी आहे. कारण मुंबईकरांची लवकरच ट्रॅफिकपासून सुटका होणार आहे. कारण याच जुलै महिण्याच्या 24 तारखेपासून मुंबईतील पहिली अंडरग्राउंड मेट्रो धावणार आहे. याबाबतची माहिती भाजप नेते विनोद तावडे यांनी आपल्या X अकाऊंटवरून दिली आहे.

त्यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हंटले आहे की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईकरांचे जीवन सुसह्य करण्याची हमी दिली होती, ती आता पूर्ण होणार आहे. मुंबईची पहिली भूमिगत मेट्रो (अक्वा लाईन) 24 जुलैपासून सुरू होत आहे, जी शहराला नवी उभारी देणार आहे” .अशा आशयाचे ट्विट करत या पोस्ट सोबत त्यांनी एक विडिओ पोस्ट केला आहे.

मुंबईच्या या पहिल्या टप्प्याच्या भूमिगत मेट्रो प्रकल्पामध्ये 33.5 किलोमीटर लांबीचा भुयारी मार्ग असणार आहे. हा मार्ग आरे कॉलनी पासून सुरू होणार असून या अंतर्गत 27 स्थानके असणार आहेत. त्यापैकी 26 स्थानके ही भूमिगत असणार असल्याची माहिती आहे. मेट्रोच्या एकूण मार्गातील पहिला टप्पा हा आरे कॉलनी ते बीकेसी (वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स) असा आहे. हाच पहिला टप्पा 24 जुलैपासून सुरू करण्यात येणार आहे.

या स्थानकांचा समावेश

चर्चगेट, विधान भवन, कफ परेड, हुतात्मा चौक, सीएसटी मेट्रो, काळबादेवी, गिरगाव, ग्रँड रोड, सेंट्रल मुंबई, मेट्रो महालक्ष्मी, सायन्स म्युझियम, आचार्य अत्रे चौक, वरळी, सिद्धिविनायक, दादर, शीतलादेवी, धारावी, बीकेसी, विद्यानगरी, सांताक्रुज, डोमेस्टिक एअरपोर्ट, सहारा रोड, आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट, मोरल नाका, एमआयडीसी, सीप्झ, आरे कॉलनी

काय असेल ट्रेनची वेळ

मिळालेल्या माहितीनुसार मेट्रो सेवा ही सकाळी साडेसहा वाजता सुरू होईल आणि रात्री 11:00 वाजेपर्यंत असेल.

Olympics 2024 : यंदाची ऑलिम्पिक भारतात कुठे आणि किती वाजता बघाल? पहा संपूर्ण माहिती

Olympics 2024 Live Streaming

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खेळाचा महाकुंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेला 26 जुलैपासून सुरूवात होणार आहे. यंदाची ओलीम्पिक स्पर्धा (Olympics 2024) सिटी ऑफ लाईट’ पॅरिसमध्ये आयोजित करण्यात आली असून 11 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. ऑलिम्पिकमध्ये 32 खेळांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये ब्रेकिंग, स्केटबोर्डिंग, सर्फिंग आणि स्पोर्ट क्लाइंबिंगसह अनेक खेळांचा समावेश आहे. भारताला सुद्धा यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत यशाची अपेक्षा आहे. यंदा भारताकडून ११७ खेळाडूंना ऑलिम्पिक साठी पॅरिसला पाठवण्यात आलं असून तिरंग्याचा मान उंचावण्याची जबाबदारी या खेळाडूंच्या खांद्यावर असेल. तुम्ही सुद्धा खेळाचे चाहते असाल तर ऑलिम्पिक स्पर्धा टीव्ही आणि मोबाईल वर कुठे आणि कशी बघायची ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

कसे बघाल ऑलिम्पिक सामने ?

Viacom18 Media Private Limited (Viacom18) कडे भारतात तसेच उपखंडात पॅरिस ऑलिम्पिकचे (Olympics 2024) प्रसारण करण्याचे खास मीडिया अधिकार आहेत. फ्रान्सच्या राजधानीत होणारे उन्हाळी ऑलिम्पिक स्पोर्ट्स 18 वाहिनीवर टीव्हीवर पाहता येईल. तसेच दूरदर्शनच्या स्पोर्ट्स चॅनलवरही तुम्ही ऑलिम्पिक बघू शकत. जर तुम्हाला मोबाईलवर ऑलिम्पिकचे सामने मोबाईलवर बघायचे असतील तर जिओ सिनेमावरून विनामूल्य तुम्ही सामने बघू शकता.

किती वाजता ऑलिम्पिक बघता येईल? Olympics 2024

पॅरिस भारताच्या वेळेपेक्षा 3 तास 30 मिनिटे मागे आहे. ऑलिम्पिक अधिकृतपणे 26 जुलै रोजी सुरू होईल, तर फुटबॉल आणि रग्बी सेव्हन्स सामने 24 जुलै रोजी IST संध्याकाळी 6:30 वाजता सुरू होतील. मात्र, ऑलिम्पिक संपेपर्यंत वेळापत्रक बदलू शकते.

भारतीय खेळाडूंची यादी पहा

तिरंदाजी – दीपिका कुमारी, धीरज बोम्मदेवरा, प्रवीण जाधव, तरूणदीप राय, भजन कौर, अंकिता भगत.
ॲथलेटिक्स – नीरज चोप्रा, किशोर जेना, अब्दुल्ला अबुबकर, मोहम्मद अनस, मुहम्मद अजमल, अक्शदीप सिंग, विकास सिंग, परमजीत सिंग बिष्ट, प्रियंका गोस्वामी, अविनाश साबळे, पारूल चौधरी, ज्योती याराजी, किरण पहल, तेजिंदरपाल सिंग तूर, आभा खटुआ, अनु राणी, सर्वेश कुशारे, प्रवीण चित्रावेल, अमोज जेकब, संतोष तमिलरासन, राजेश रमेश, मिजो चाको कुरियन, विद्या रामराज, ज्योतिका श्री दांडी, एमआर पूर्वम्मा, सुभा व्यंकटेशन, प्राची, सूरज पवार, जेसव्हिन एल्ड्रिन, किरण पाल.
बॅडमिंटन – पी.व्ही सिंधू, चिराग शेट्टी, सात्विक साईराज रेड्डी, एचएस प्रणय, लक्ष्य सेन, अश्विनी पोनप्पा, तनिशा क्रास्तो.
बॉक्सिंग – अमित पंघाल, निखत जरीन, लवलीना बोरगोहेन, जॅसमीन लबोडिया, प्रीती पवार, निशांत देव. इक्वेस्ट्रियन
(घोडेस्वारी) – अनुष अगरवाल.
गोल्फ – शुभांकर शर्मा, गगनजीत भुल्लर, अदिती अशोक, दीक्षा डागर.
हॉकी – गोलरक्षक : पी. आर. श्रीजेश. बचावपटू : जरमनप्रीत सिंग, अमित रोहिदास, हरमनप्रीत सिंग, सुमित, संजय. मध्यरक्षक : राजकुमार पाल, शमशेर सिंग, मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, विवेक सागर प्रसाद. आक्रमक : अभिषेक, सुखजीत सिंग, ललित कुमार उपाध्याय, मंदीप सिंग, गुरजंत सिंग.
नेमबाजी – मनू भाकर, ईशा सिंग, अंजुम मौदगिल, ऐश्वर्या प्रताप तोमर, राजेश्वरी कुमारी, श्रेयसी सिंग, अनंतजीत सिंग, रायजा धिल्लन, माहेश्वरी चौहान, संदीप सिंग, अर्जुन बाबौता, एलेनविले वालारिवन, रमिता जिंदाल, स्वप्नील कुसाळे, सिफ्ट कौर संगरा, रैझा धिल्लन. सरबज्योत सिंग, अर्जुन सिंग चीमा.
सेलिंग – विष्णू सरवनन, नेत्रा कुमानन
टेबल टेनिस – शरत कमल, मनिका बत्रा, श्रीजा अकुला, हरमीत देसाई, मानव ठक्कर, अर्चना कामत.
टेनिस – सुमित नागल, रोहन बोपन्ना, श्रीराम बालाजी.
कुस्ती – विनेश फोगाट, अंशु मलिक, अमन सेहरावत, निशा दहिया, रितीका हुडा, अंतिम पंघाल.
वेटलिफ्टिंग – मीराबाई चानू
पोहणे – धिनिधी देसिंगू, श्रीहरी नटराज
रोव्हिंग – बलराज रोव्हिंग
ज्युडो – तुलिका मान