Monday, December 22, 2025
Home Blog Page 604

Thane To Boravali Travel | केवळ 12 मिनिटात कापणार ठाणे ते बोरिवली अंतर; बनणार देशातील सर्वात लांब भुयारी मार्ग

Thane To Boravali Travel

Thane To Boravali Travel | सध्या महाराष्ट्रात अनेक मोठे मोठे प्रकल्प सुरू आहेत. यामध्ये प्रामुख्याने रस्त्याचे प्रकल्प आणि मेट्रो प्रकल्प मोठ्या प्रमाणात चालू आहेत. यात रेल्वे प्रकल्प आणि त्यावर उभारण्यात आलेले टनेल प्रोजेक्ट हा एक तंत्रज्ञानाचा नवीन प्रकार उदयास येणार आहे. यामध्ये अनेक शहरांमधील अंतर आता कमी होणार आहे. अशातच आता ठाणे ते बोरवली या टनेल प्रोजेक्टचे काम देखील सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन पार झालेले आहे. आणि या प्रकल्पासाठी 16600 कोटी रुपये पायाभरणी देखील झालेली आहे.

ठाणे ते बोरवली (Thane To Boravali Travel) या टनेल प्रोजेक्टचे काम पूर्ण झाल्यावर याचा सगळ्यात मोठा फायदा होणार आहे. तो म्हणजे हे अंतर कापण्यासाठी एक ते सव्वा तास एवढा कालावधी लागायचा. परंतु हे अंतराचा केवळ बारा मिनिटातच पूर्ण करता येणार आहे.

हाय एक महत्वपूर्ण टनेल असणार आहे. तो संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून जाणार आहे. या बोगद्याचे काम पूर्ण झाल्यानंतर बोरवलीच्या दिशेने पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि ठाणे घोडबंदर रोड यांच्या दरम्यान थेट संपर्क व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची लांबी 11.8 किलोमीटर एवढी आहे. त्यामध्ये ठाणे ते बोरवली यामधील अंतर खूप कमी होणार आहे. आणि केवळ बारा मिनिटातच हा प्रवास होणार आहे. या प्रकल्पामध्ये 10.25 km लांबीच्या बोगद्याची उभारणी देखील केली जाणार आहे.

ठाणे ते बोरवली दुहेरी बोगदा प्रकल्पाची वैशिष्ट्ये | Thane To Boravali Travel

  • हा बोगदा भारतातील सर्वात मोठा आणि सर्वात लांब शहरी बोगदा असणार आहे.
  • संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील जैवविविधता अबाधित ठेवणारा हा मार्ग असणार आहे.
  • सिग्नल रहित तुम्हाला न थांबता प्रवास करता येणार आहे.
  • त्यामुळे ठाणे ते बोरवली हे अंतर तुम्हाला खूप कमी वेळेत पार करता येणार आहे.
  • जवळपास एक लाख प्रवाशांना याचा फायदा होणार आहे.

Ghee Benefits | उपाशी पोटी तूप खाल्याने होतात आश्चर्यकारक फायदे; आजच करा जेवणात समावेश

Ghee Benefits

Ghee Benefits | तुपाला आपल्या आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व आहे. याला आयुर्वेदात तुपाला औषधाचा दर्जा आहे. तुपाने आपल्या शरीराला खूप फायदे होतात. निरोगी जीवनासाठी तुपाचा आपल्या आहारात समावेश करणे खूप गरजेचे आहे. प्रत्येक जण स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु वेळेअभावी किंवा इतर कारणामुळे प्रत्येकाला ते शक्य होत नाही. परंतु जर तुम्हाला या धकाधकीच्या आयुष्यात देखील निरोगी राहायचे असेल, तर तुम्ही सकाळी उपाशी पोटी तूप (Ghee Benefits) खाऊ शकता. यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. अनेक लोक सकाळी गरम पाणी लिंबू यांसारखे पदार्थ खाण्याचा सल्ला देतात. परंतु त्याऐवजी जर तुम्ही तूप खाल्ले तर तुम्हाला खूप चांगला फायदा होईल.

शरीरातील पेशी मजबूत होतात | Ghee Benefits

आयुर्वेदानुसार तुम्ही जर सकाळी उपाशीपोटी तूप राहिले, तर तुमच्या शरीरातील पेशी मजबूत होतात. तसेच शरीरातील केसीकांचे पालन पोषण होण्यास देखील मदत करते. त्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते.

त्वचा उजळ होते

तुम्ही जर उपाशीपोटी तुपाचे सेवन केले, तर तुमच्या त्वचेमध्ये नैसर्गिक लो येतो आणि त्वचेतील ओलावा देखील टिकून राहतो तुमची स्किन जर ड्राय असेल, तर तुम्ही रोज सकाळी उपाशीपोटी एक चमचा तूप घेऊ शकता.

संधीवातापासून आराम

तुपाच्या सेवन केल्याने तुम्हाला सांधेदुखी आणि संधिवाताची समस्या असेल, तर ती देखील दूर होते. तूप हे एक नॅचरल लुब्रिकंट प्रमाणे काम करते. यामध्ये ओमेगा थ्री फॅसिड असतात. त्यामुळे तुमच्या हाडांना देखील ते निरोगी ठेवते.

मेंदू ऑक्टिव्ह राहतो

तुम्ही जर रोज सकाळी उपाशीपोटी तूप घेतले, तर तुमच्या मेंदूच्या केसीका ऍक्टिव्ह होतात. आणि मेमरी आणि शिकण्याची क्षमता वाढते यासोबतच अनेक आजार देखील दूर होतात.

वजन कमी होते

अनेक लोकांना वाटते की, तूप खाल्ल्याने वजन वाढते. परंतु तूप खाल्ल्याने तुमचा मेटाबोलिझम रेट वाढतो आणि वजन कमी होते. त्यामुळे तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल, तर तुम्ही तुपाचे सेवन करू शकता.

केस गळती थांबते | Ghee Benefits

उपाशीपोटी तुम्ही तूप खाल्ले, तर तुमचे केस खूप चांगले होतात. कारण तुमच्या केसांना तुपामधून सगळे न्यूट्रियन्स मिळतात त्यामुळे तुमचे केस अगदी मुलायम आणि चमकदार होतात.

कँसरपासून बचाव

तुपामध्ये अनेक अँटी कॅन्सर गुण असतात. त्यामुळे कॅन्सरच्या सेल तयार होत नाही. आणि कॅन्सर टाळता येतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या रोजच्या जेवणात तुपाचा वापर करणे गरजेचे आहे.

ऑफिसच्या डेस्कवर बसल्या बसल्या, ‘हे’ व्यायाम करून रहा एकदम फिट

exercise

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज काल लठ्ठपणा ही समस्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. सामान्यता जे लोक कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करतात. ते दिवसभर खुर्चीवर बसून काम करतात. त्यामुळे तासंतास खुर्चीवर बसल्याने त्यांना अनेक आजार देखील होतात. लठ्ठपणामुळे आपण अनेक आजारांना बळी देखील पडतो. परंतु एकीकडे ऑफिस आणि दुसरीकडे घर सांभाळून स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष देण्यासाठी कोणाकडेही वेळ नसतो. दिवसभर लॅपटॉप आणि कम्प्युटरवर काम केल्याने शारीरिक हालचाली खूप कमी होतात. त्यामुळे फिटनेससाठी वेळ देखील मिळत नाही.

अनेक लोकांना वाटते की, फिटनेससाठी जिममध्ये जाणे खूप गरजेचे आहे. परंतु तुम्ही अगदी साधा सोपा व्यायाम करूनही फिट राहू शकता. आता तुम्ही ऑफिसच्या वेळामध्ये किंवा घरी मोकळ्या वेळात अगदी साधे व्यायाम करून देखील फिट राहू शकता. आता ते कोणते व्यायाम आहेत हे आपण पाहूयात?

सीटेड लेग रेज

तुम्ही अगदी ऑफिसमध्ये देखील हा व्यायाम करू शकता. हा व्यायाम करण्यासाठी तुम्ही ऑफिसच्या खुर्चीवर सरळ बसा. त्यानंतर तुमचा डावा पाय सरळ ठेवा, तुम्ही दहा सेकंद या स्थितीत ठेवा. नंतर अगदी सेम उजव्या पायाने करा दोन्ही पायांसाठी तुम्ही पंधरा वेळा पुनरावृत्ती करा.

चेअर डिप्स

हा व्यायाम करण्यासाठी तुम्हाला चेअरची देखील गरज लागणार नाही. हा व्यायाम सुरू करण्यासाठी तुम्ही दोन्ही हातांनी खुर्चीचे हँडल धरा. आता खुर्चीवरून शरीर उचलण्यासाठी कोर आणि हात वापरा. शरीर थोडे पुढे सरकावा आणि नंतर खाली आणा. अशा प्रकारे तुम्ही दहा ते पंधरा वेळा याची पुनरावृत्ती करू शकता.

चेअर पुश अप्स

तुम्ही ऑफिसमध्ये असताना ऑफिसच्या चेअरवर देखील हे करू शकता. यासाठी तुम्ही आपले शरीर आपल्या हातांनी वर उचला आणि नंतर खाली घ्या. तुम्हाला दिवसा वेळ मिळेल तेव्हा दहा ते पंधरा वेळा हा व्यायाम करू शकता.

ऑफिस चेअर स्क्वॉट्स

डेस्कवर बसून देखील तुम्ही हा व्यायाम करू शकता. यासाठी तुम्ही बसताना दोन्ही हात खांद्याच्या पातळीवर ठेवून लांब करा. आणि नंतर वर धरा. या स्थितीत तुम्ही खुर्चीपासून किमान एक इंच वर असले पाहिजे. काही सेकंदासाठी तुम्ही स्वतःला होल्ड करा आणि नंतर बसा. तुम्ही तुमच्या सोयीनुसार दहा ते पंधरा वेळा हे करू शकता.

Tomato Cultivation | ‘या’ टिप्सचा वापर करून करा टोमॅटोच्या लागवड, कमी वेळात होईल लाखोंची कमाई

Tomato Cultivation

Tomato Cultivation | आजकाल शेतकरी शेतामध्ये वेगवेगळ्या पिकांची लागवड करायला लागलेले आहेत. भारतात टोमॅटोची लागवड देखील भारतात मोठ्या प्रमाणात होते. टोमॅटोची लागवड करून अगदी कमी वेळात लाखोंची कमाई शेतकरी करतात. भारतीय शेतकऱ्यांना टोमॅटोच्या लागवडीतून प्रचंड नफा मिळतो. जर तुम्हाला देखील टोमॅटोची शेती (Tomato Cultivation) करायची असेल. तर त्यासाठी आम्ही काही आज उत्तम टिप्स सांगणार आहोत. त्याचा वापर करून तुम्ही चांगले लागवड करू शकता. टोमॅटोची लागवड उत्तर भारतात वर्षातून दोनदा केली जाते.

चांगले पीक कशामुळे मिळते? | Tomato Cultivation

टोमॅटोचे चांगले पीक घेण्यासाठी सर्वप्रथम टोमॅटोचे बियाणे शेतात न लावता रोपवाटिकेत तयार करावे.रोपवाटिकेत रोपे तयार झाल्यावर एक महिन्यानंतर त्यांची शेतात पुनर्लावणी करावी लागते. टोमॅटोची लागवड करताना लक्षात ठेवा की झाडे खूप खोलवर लावू नयेत. याशिवाय हिवाळ्यात टोमॅटो पिकाला ६ ते ७ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.

शेतीसाठी योग्य माती आणि हवामान

चिकणमाती आणि काळी माती टोमॅटोच्या लागवडीसाठी उत्तम मानली जाते. तुम्ही कोणत्याही जमिनीत अगदी सहज टोमॅटोची लागवड करू शकता. याशिवाय 12 ते 21 अंश तापमान टोमॅटोच्या लागवडीसाठी उत्तम मानले जाते.

प्रत्यारोपण

रोपांची लागवड 20 ते 25 दिवसांची झाल्यावरच करावी.
झाडे फक्त 1 सेमी अंतरावर लावावीत.

खत

शेतात हेक्टरी 20 ते 25 टन शेणखत टाकावे.
याशिवाय रासायनिक खतांचा वापर माती परीक्षणाच्या आधारेच करावा.

टोमॅटो शेतीतून नफा | Tomato Cultivation

जर तुम्ही 1 एकरमध्ये टोमॅटोची लागवड केली तर तुम्हाला एका वर्षात सुमारे 15 लाख रुपयांचे उत्पन्न सहज मिळू शकते

Weather Update | रविवारी ‘या’ जिल्ह्यांत पावसाचा फटका, हवामान विभागाने केला रेड अलर्ट जारी

Weather Update

Weather Update | राज्यामध्ये सध्या विविध ठिकाणी जोरदार पाऊस बरसताना दिसत आहे. देशातील विविध राज्यांमध्ये पाऊस चांगलाच बरसत आहे. अशातच हवामान विभागाने 13 जुलै रोजी पश्चिम महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केलेला होता. त्याचप्रमाणे आज म्हणजे 14 जुलै रोजी काही जिल्ह्यांमध्ये (Weather Update) अतिवृष्टीचा इशाराही हवामान खात्याने दिलेला आहे.

गेले काही दिवसांपासून मुंबईमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. त्यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतूकीला चांगलाच फटका बसला आहे. अशातच आता रविवारी हवामान विभागाने (Weather Update) ठाणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर मुंबईसाठी येलो अलर्ट जारी केलेला आहे. त्याचप्रमाणे मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मुसळधार पाऊसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. ठाण्यामध्ये ऑरेंज अलर्ट दिलेला आहे

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये देखील रेड अलर्ट जारी केलेला आहे. त्याचप्रमाणे रायगडमध्ये देखील अति मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे. काही ठिकाणी 100 mm अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पुढील 48 तासांमध्ये मुंबईत चांगलाच पाऊस पडणार आहे. असे देखील सांगितलेले आहे.

त्याचप्रमाणे घाट भागात देखील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सातारा आणि कोल्हापूरमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. 11 जुलैपासून राज्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे. त्याचप्रमाणे पुढील दोन ते तीन दिवस पाऊस राहणार आहे.

PM svanidhi yojana | केवळ आधारकार्डवर मिळणार 50 हजारांचे कर्ज; जाणून घ्या सरकारची नवी योजना

PM svanidhi yojana

PM svanidhi yojana | केंद्र सरकार हे सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक नवनवीन योजना राबवत असतात. ज्याचा फायदा सगळ्याच सर्वसामान्य नागरिकांना होत असतो. आता अशीच एक सरकारकडून योजना राबविण्यात आलेली आहे. या योजनेचे नाव पंतप्रधान स्वानिधी योजना (PM svanidhi yojana) असे आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून तुम्हाला तब्बल 50 हजार रुपयांचे कर्ज मिळणार आहे. आणि यावर कोणत्याही प्रकारचे व्याज आकारले जाणार नाही. जर तुम्ही ही रक्कम एका वर्षाच्या आत परत केली, तर तुम्हाला दुप्पट रक्कम देखील कर्ज म्हणून मिळते. त्याचप्रमाणे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणताही प्रकारच्या गॅरंटीची गरज देखील लागणार नाही.

सर्वसामान्य लोकांना ज्यांचा व्यवसाय सुरू करायचा आहे. त्यांच्यासाठी ही योजना अत्यंत फायद्याची योजना आहे. गरीब लोकांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. या योजनेच्या मदतीने सर्वसामान्य नागरिकांना स्वतःचा रोजगार सुरू करण्याला खूप फायदा होतो. त्याचप्रमाणे देशातील अल्पभूधारक शेतकरी आणि व्यापाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. आता या योजनेची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

काय आहे स्वानिधी योजना ? | PM svanidhi yojana

  • या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून देशातील अल्पभूधारकांना कर्ज मिळत आहे.
  • या योजनेचा लाभ लहान आणि मध्यम व्यवसाय घेऊ शकतात.
  • या योजनेअंतर्गत तुम्हाला 50 हजार रुपये कर्ज म्हणून मिळते.
  • हे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला तुमची विश्वासहर्ता निर्माण करावी लागेल.
  • कर्जाची परतफेड केल्यावर तुम्हाला दुसऱ्यांदा दुप्पट रक्कम कर्ज म्हणून मिळेल.

योजनेचा लाभ कसा घ्यायचा?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या सरकारी बँकेत जाऊन अर्ज करावा लागेल. या अर्जासोबत काही महत्त्वाची कागदपत्रे देखील जोडावी लागेल. त्यानंतर तुमचा अर्ज आणि कामाची छाननी केली जाईल. आणि त्यानंतरच तुम्हाला कर्जाची रक्कम दिली जाईल.

योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्र

अर्जदाराची ओळखपत्र आणि आधार कार्ड
पॅन कार्ड
बँकेत बचत खाते
उत्पन्नाचा स्त्रोत

Aadhaar-based eKYC for LPG | आता गॅस सिलिंडरसाठीही करावे लागणार आधार केवायसी, ही आहे अंतिम मुदत

Aadhaar-based eKYC for LPG
Aadhaar-based eKYC for LPG

Aadhaar-based eKYC for LPG | अनेकवेळा लोक हे एलपीजी खरेदी करताना फेक आयडीवर खरेदी करतात. परंतु आता फेक आयडी वर LPG घेणे कठीण होणार आहे. कारण एलपीजी आता आधार कार्डशी लिंक होणार आहे. कारण आता तेल विपणन कंपन्या LPG ग्राहकांच्या ओळखीसाठी आधार आधारित ई-केवायसी सुरू करत आहे. यासंबंधीत माहिती केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिलेली आहे. त्यामुळे ग्राहक आता त्यांच्या वितरकांशी संपर्क साधून त्यांच्या सोयीनुसार हे केवायसी पूर्ण करू शकतात. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तेल विपणन कंपन्यांनी किंवा सरकारने कोणतीही अंतिम मुदत अजून निश्चित केलेली नाही.

याची गरज का होती? | Aadhaar-based eKYC for LPG

तेल विपणन कंपन्यांना आधार-आधारित ई-केवायसी आवश्यक आहे. कारण असे बरेच लोक आहेत जे निवासी नावाने एलपीजी खरेदी करतात. परंतु व्यावसायिक कारणांसाठी वापरतात. घरगुती एलपीजी सिलिंडर स्वस्तात मिळतात तर व्यावसायिक सिलिंडर महाग असतात. उदाहरणार्थ, 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 1646 रुपये असेल, तर 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 803 रुपये असेल. आता ई-केवायसीच्या माध्यमातून सरकारला हे थांबवायचे आहे आणि सबसिडी योग्य लोकांपर्यंत जाईल.

eKYC कसे केले जाईल?

ई-केवायसी तीन प्रकारे करता येते. जवळच्या एलपीजी वितरकाच्या शोरूममध्ये जा. जेव्हा दुसरा गॅस डिलिव्हरी करणारी व्यक्ती सिलिंडरची डिलिव्हरी करेल तेव्हा तो मोबाइल ॲपद्वारे करेल. तिसरे, तेल कंपन्यांच्या मोबाईल ॲप्सद्वारे eKYC सहज करता येते. भारत, इंडेन आणि एचपीसाठी ॲप्स प्ले स्टोअरवर उपलब्ध असतील.

मोबाईल ॲपद्वारे eKYC कसे करावे ?

आधार मोबाइलशी लिंक आहे आणि LPG खाते सक्रिय असल्याची खात्री करा. त्यानंतर तुमच्या एलपीजी प्रदात्याच्या साइटवर जा. येथे, eKYC पर्याय निवडा आणि आवश्यक तपशील जसे की LPG ग्राहक क्रमांक आणि आधार क्रमांक भरा. OTP येईल, तो भरा. त्यानंतर हा डेटा तेल विपणन कंपन्यांद्वारे प्रमाणित केला जाईल आणि सत्यापन पूर्ण झाल्यानंतर, एक संदेश येईल.

BSF Para Medical Recruitment 2024 | 10 वी आणि 12वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी; असा करा अर्ज

BSF Para Medical Recruitment 2024

BSF Para Medical Recruitment 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे आता तुम्हाला केंद्र शासनाची नोकरी लागण्याची एक सुवर्णसंधी आलेली आहे. त्यामुळे तुम्ही अजिबात वेळ जवळता लवकरात लवकर या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

BSF पॅरामेडिकल (BSF Para Medical Recruitment 2024) या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. या भरती प्रक्रियेत एकूण 99 पदे भरली जाणार आहेत त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करा. 25 जुलै 2024 अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर भरतीचा अर्ज करा.

एकूण रिक्त पदे | BSF Para Medical Recruitment 2024

या भरती अंतर्गत एकूण 99 रिक्त पदे भरली जाणार आहेत.

अर्ज पद्धती

ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकता.

शैक्षणिक पात्रता

असिस्टंट कमांडेड या पदासाठी इंजीनियरिंग झालेले उमेदवाराचा अर्ज करू शकता.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुमचे वय २० ते २७ वर्षे असणे गरजेचे आहे.

भरती प्रक्रिया

या भरतीसाठी सगळ्यात आधी शारीरिक मालक चाचणी होईल त्यानंतर कार्यक्षमता चाचणी त्यानंतर लेखी परीक्षा आणि वैद्यकीय परीक्षा घेतली जाईल आणि त्यातून उमेदवाराची निवड केली जाईल.

Kurukshetra University Recruitment 2024 | कोणतीही परीक्षा न देता मिळवा सरकारी नोकरी; मिळेल 1 लाखापेक्षाही जास्त पगार

Kurukshetra University Recruitment 2024

Kurukshetra University Recruitment 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. अनेक तरुणांना शिक्षक किंवा प्रोफेसर होण्याची इच्छा असते. परंतु शिक्षक होण्यासाठी बीएड किंवा पीएचडी ही पदवी असणे गरजेचे असते. परंतु जर आता तुमचे शिक्षण पूर्ण असेल, तर तुम्हाला असिस्टंट प्रोफेसर होण्याची एक संधी आहे. कुरुक्षेत्र विद्यापीठा (Kurukshetra University Recruitment 2024) एक भरती सुरू आहे. या विद्यापीठात असिस्टंट प्रोफेसर पदाची भरती सुरू आहे. या पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे त्याप्रमाणे 31 जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

एकूण रिक्त जागा | Kurukshetra University Recruitment 2024

असिस्टंट प्रोफेसर या पदाच्या एकूण 54 रिक्त जागा आहे. त्यातील असिस्टंट प्रोफेसरच्या 46 जागा आणि असोसिएट प्रोफेसरसाठी 4 रिक्त जागा आहेत.

शैक्षणिक पात्रता

उमेदवाराने संबंधित विषयात पन्ना 55% गुणांसह पदवी प्राप्त करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे पीएचडी केलेले उमेदवार देखील अर्ज करू शकता.

अर्ज पद्धती

या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

मासिक वेतन | Kurukshetra University Recruitment 2024

या नोकरी अंतर्गत तुम्हाला प्राध्यापक या पदासाठी 1 लाख 44 हजार एवढा पगार देण्यात येईल. त्याचप्रमाणे असोसिएट प्रोफेसर पदासाठी 1 लाख 31 हजार 400 रुपये प्रति महिना एवढा पगार देईल. तर असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी 5 लाख 77 हजार ते 1 लाख 82 हजार रुपये एवढा पगार दिला जाईल.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

Weather Update | मुंबईकरांसाठी पुढील काही तास महत्वाचे; ‘या’ विभागांना दिला सतर्कतेचा इशारा

Weather Update

Weather Update | संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पावसाने थैमान घातलेले आहे अशातच आता मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे पुढचे 36 तास मुंबईकरांसाठी खूप महत्त्वाचे असणार आहे. हवामान विभागाने मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे. त्यामुळे मुंबईत 200 mm पर्यंत पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे. मुंबईत मुसळधार स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. तसेच अंधेरी सबवे खाली तीन ते चार मीटर पाणी भरल्यानंतर आता अंधेरी सबवे देखील बंद करण्यात आलेला आहे.

सकाळपासूनच पावसाने मुंबईमध्ये हजेरी (Weather Update) लावलेली आहे. त्यामुळे सलग भागात देखील पाणी साचायला सुरुवात झालेली आहे. याचा परिणाम वाहतुकीवर झालेला दिसत आहे. अनेक ठिकाणची वाहतूक देखील बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे आज मुंबईसह ठाणे आणि पालघरला देखील पावसाचा येल्लो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात मुसळधार ते अतीमुसळधार स्वरूपाचा पाऊस (Weather Update) पडण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणेसह पालघर येथे देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे पुण्यातील महाराष्ट्राने साताऱ्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे विदर्भात देखील आज पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना खबरदारी घेण्याचे देखील सांगण्यात आलेले आहे.

त्यामुळे येत्या 72 तासात देशात अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 13 ते 15 जुलै दरम्यान कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, आसाम, अरुणाचल प्रदेश, बिहार, सिक्किम, ओडीसा, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये पाऊस पडू शकतो.