Monday, December 22, 2025
Home Blog Page 605

Kitchen Tips : चिरलेल्या भाज्या फ्रिजमध्ये टिकवून ठेवा ; वापरा ह्या सोप्या ट्रिक्स

Kitchen Tips : सध्याच्या धावपळीच्या जगात जॉब आणि घर सांभाळताना गृहिणींची तारेवरची कसरत होते. त्यातही स्वयंपाक करायचा म्हंटल्यावर किमान १ तास जातोच जातो. भाज्या धुवा, निवडा, चिरा आणि मग वाटण करून भाजी बनवा ह्या गोष्टी खप वेळ खाऊ असतात. पालेभाज्या निवडून ठेवू शकतो. पण इतर भाज्या चिरून ठेवल्या तर त्या खराब होतात. म्हणूनच आजच्या लेखात आम्ही चिरलेल्या भाज्या फ्रिजमध्ये जास्त काळ (Kitchen Tips) टिकवण्याच्या टिप्स सांगणार आहोत जेणेकरून तुमच्या भाज्या बिनधास्त 4-8 दिवस ताज्या टिकून राहू शकतात.

  • चिरून ठेवलेल्या भाज्या टिकून ठेवायचे असतील ताज्या ठेवायच्या असतील तर त्या धुऊ नका. चिरलेल्या भाज्या पाण्यामध्ये धुवून फ्रीजमध्ये ठेवल्या तर त्या कुजू शकतात. त्यामुळे भाज्या कापल्या गेल्या असतील तर त्या न धुता झिप लॉक मध्ये ठेवा. आपण कोणतीही भाजी करताना आधी भाजी धुवून घेतो मात्र तुम्हाला ते टिकून ठेवायचे असेल तर ती भाजी धुवून घ्या (Kitchen Tips) चांगल्या कापडाने स्वच्छ कोरडी करा आणि नंतर चिरून ती तुम्ही जिप लोक करून फ्रीजमध्ये ठेवू शकता.
  • बटाटा, वांग यासारख्या भाज्या कापल्यानंतर त्यांना हलक्या हाताने तेल लावा तसं केल्याने या भाज्यांना हवा लागणार नाही. याच्या (Kitchen Tips) मदतीने भाजी खराब होण्यापासून वाचू शकता पण तिचा ताजेपणाही टिकून राहतो.
  • फ्रिज मधल्या भाज्या ह्या कुजण्याचं महत्त्वाचं कारण जर भाज्या ओल्या झाल्या त्यांना मॉइश्चुर आलं तर ह्या भाज्या कुजण्याची प्रोसेस सुरू होते. त्यामुळे बॅक्टेरिया आणि बुरशींची वाढ होऊ लागते म्हणूनच भाज्या कोरड्या ठेवणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे चिरलेल्या भाज्या नीट वाळवा आणि डबा, टिशू किंवा टॉवेल न पुसून टाका अतिरिक्त ओलावा सुकवण्यासाठी कंटेनरच्या तळाशी टिशू पेपर ठेवता येतो आणि त्यावर झाकण (Kitchen Tips) ठेवून वाळलेल्या भाज्या ठेवा.
  • भोपळा, फणस यासारख्या भाज्या कापल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायच्या असतील तर आधी त्यावर आंबट रस किंवा लिंबाचा रस घाला. त्यामुळे भाजी फार काळात खराब होणार नाही आणि त्यांचा ताजेपणा (Kitchen Tips) कायम राहील.
  • चिरलेल्या भाज्या स्टोअर करायच्या असतील तर एअर टाईट कंटेनरचा वापर करा. असं केल्याने चिरलेल्या भाज्या खुल्या हवेच्या संपर्कात येणार नाहीत. पण ह्या माझ्या कंटेनर मध्ये ठेवताना बॉक्समध्ये कापड किंवा टॉवेल ठेवायला विसरू नका. कारण भाजीचा ओलावा त्यामुळे शोषला जाईल आणि भाजी खराब होणार नाही.
  • चिरलेल्या भाज्या स्टोअर करताना टोमॅटो हा इथलीन वायू सोडत असतो. म्हणून तुम्ही त्यांना पालेभाज्या कोबी, गाजर, ब्रोकोली इत्यादी भाज्यांपासून (Kitchen Tips) वेगळाच ठेवा.

Indian Railway : भारतीय रेल्वे देणार मोफत उपचार ; जाणून घ्या काय आहे हा खास नियम ?

Indian Railway : देशभरात 7000 हून अधिक रेल्वे स्थानके आहेत. यामध्ये A, B, C आणि D श्रेणीतील स्थानकांचा समावेश आहे. येथून दररोज 2 कोटींहून अधिक प्रवासी प्रवास करतात आणि 10000 हून अधिक गाड्या चालतात. प्रीमियम गाड्यांव्यतिरिक्त, यात एक्सप्रेस, मेल आणि पॅसेंजर गाड्यांचा समावेश आहे. कधीकधी प्रवासादरम्यान किंवा रेल्वेच्या आवारात काही अनुचित प्रकार घडत असतात. यादरम्यान व्यक्ती जखमी झाल्यास किंवा अपघात झाल्यास उपचाराची जबाबदारी रेल्वेची असेल. काय आहे हा नियम ? चला जाणून घेऊया

रेल्वे स्थानक किंवा अगदी स्थानक परिसरात कुठेही कोणाचा अपघात झाला (Indian Railway) तर उपचाराची जबाबदारी भारतीय रेल्वेची असते. महत्वाची बाब म्हणजे पीडित व्यक्तीकडे रेल्वेचे तिकीट आहे की नाही हे पाहण्यापूर्वी जखमी व्यक्तीवर तातडीने उपचार करून घेण्यास रेल्वेचे प्राधान्य असेल. भारतीय रेल्वेचा हा नियम जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे.

साधारणपणे, प्रवाशांना हे माहिती असले पाहिजे की ट्रेनमध्ये अपघात झाला, तर प्रत्येक जखमी (Indian Railway) प्रवाशाच्या उपचाराची जबाबदारी रेल्वेची असते, जोपर्यंत तो बरा होत नाही. याशिवाय नुकसान भरपाईचीही तरतूद आहे.

काय आहे खास नियम ? (Indian Railway)

भारतीय रेल्वे नियमावलीनुसार, जर एखादी व्यक्ती ट्रेनने प्रवास करण्यासाठी प्लॅटफॉर्म किंवा स्टेशनवर पोहोचली किंवा स्टेशन परिसरात पोहोचली आणि त्यादरम्यान प्रवाशासोबत एखादी अप्रिय घटना घडली आणि त्यामुळे तो जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात नेऊन त्याच्यावर उपचार करण्याची जबाबदारी रेल्वेची आहे. पीडित व्यक्तीकडे कोणत्याही प्रकारचे तिकीट आहे की नाही याची पर्वा न करता.

काय आहे कारण ? (Indian Railway)

रेल्वे नियमावलीनुसार, परिसरात येणारी व्यक्ती संभाव्य रेल्वे प्रवासी असू शकते. स्टेशनवर पोहोचल्यानंतर तो तिकीट खरेदी करतो. त्यामुळेच स्टेशन परिसरात जखमींवर उपचार करण्याचा नियम आहे. मात्र, एखादी व्यक्ती विना तिकीट असेल आणि तपासात हे सिद्ध झाले, तर रेल्वे त्याच्यावर नंतर नियमानुसार कारवाई करेल. तिकीट नसल्यामुळे जखमी व्यक्तीवर उपचार थांबवता येत नाहीत. भारतीय रेल्वेचा (Indian Railway) हा नियम प्रत्येकाने जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

मोदी सरकारची मोठी खेळी!! जम्मू आणि काश्मीरच्या निवडणुकीपूर्वी केला कायद्यात बदल

Jammu And Kashmir

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| जम्मू आणि काश्मीरसंदर्भात (Jammu And Kashmir) केंद्र सरकारने (Central Government) एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर नवीन नियम अधिसूचित करण्यात आले आहेत. यामध्ये, जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल यांना अधिक अधिकार देण्यात आले असल्याचे म्हणले आहे. थोडक्यात सांगायचे तर, आता दिल्लीच्या उपराज्यपालांप्रमाणेच जम्मू-काश्मीरच्या उपराज्यपालांना देखील अधिकार मिळणार आहेत. यामुळे राज्यपालांच्या परवानगीशिवाय कोणत्याही अधिकाऱ्याची पोस्टिंग किंवा बदली करता येणार नाही.

महत्वाचे म्हणजे, केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरबाबत असा निर्णय घेऊन सांविधानिक अधिकार देण्याची तयारी दाखवली आहे. पुढील महिन्यामध्येच जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वीच केंद्र सरकारने पुनर्गठन अधिनियम, २०१९ मधील कलम ५५ मध्ये दुरुस्ती केली आहे. यामुळेच आता जम्मू-काश्मीरमध्ये नवीन सरकार स्थापन झाले तरी सर्वाधिक अधिकार उपराज्यपालांनाच असणार आहेत.

दरम्यान जम्मू काश्मीरला देखील राज्याच्या दर्जा देण्याची मागणी गेल्या आणि काळापासून करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने कायद्यामध्येच मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय आगामी निवडणुकीच्या तोंडावर घेण्यात आला आहे. त्यामुळेच अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. अशातच आता या निर्णयाचा परिणाम कसा होतो? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Viral Video : पृथ्वी फिरताना कधी पाहिलीय ? पहा डोळ्यांचे पारणे फेडणारा व्हिडीओ

Viral Video : भारतात पृथ्वी हा केवळ गृह नसून तिला आईचा दर्जा दिला जातो. पृथ्वीवरून आपल्याला खाण्यापिण्याच्या आणि राहण्याच्या सर्व गोष्टी मिळत असल्याने मातेच्या रूपातही तिची पूजा केली जाते. विज्ञानानुसार पृथ्वी आपल्या अक्षावर फिरत राहते. याचा पुरावा देणारा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोशल मीडियाच्या जमान्यात आपण खूप काही पाहतो पण काही व्हिडिओ असे असतात. ज्यावर डोळ्यांना लगेच विश्वास बसत नाही. व्हिडिओमध्ये पृथ्वी फिरताना दिसत आहे. हा एक टाइमलॅप व्हिडिओ (Viral Video) आहे, जो आश्चर्यकारक दिसत आहे. मार्टिन जी नावाच्या व्यक्तीने हे रेकॉर्ड केले आहे आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर शेअर केले आहे.

पृथ्वी फिरताना पहा… (Viral Video)

ऑगस्ट 2022 मध्ये फ्रान्सच्या दक्षिणेकडील कॉस्मोड्रोम वेधशाळेत पृथ्वीच्या परिभ्रमणाचा व्हिडिओ कॅप्चर करण्यात आला होता. यामध्ये एका कॅमेऱ्याने स्थिरीकरण करून संपूर्ण रोटेशन टिपण्यात आले. विज्ञान आणि विशेषत: अवकाशात स्वारस्य असलेल्यांसाठी व्हिडिओ (Viral Video) मनोरंजक आहे. पृथ्वीच्या रोषणाईमुळे आकाशगंगा लपलेली दिसते, तारे स्थिर असले तरी झाडे, शेततळे यांच्यासोबत पृथ्वी फिरत असल्याचे दिसते.


डोळे दिपवणारा व्हिडीओ (Viral Video)

@wonderofscience नावाच्या अकाऊंटवरून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओ ला कॅप्शन दिलेले आहे की ” आपण एका सुंदर टाइमलॅप व्हिडिओमध्ये पृथ्वी फिरत असल्याचे पहा”. व्हिडिओवर कमेंट करताना युजर्सनी म्हंटले आहे की किती सुंदर आहे. तर एका यूजरने लिहिले- कुठे गेले ते लोक जे पृथ्वी सपाट (Viral Video) आहे असे म्हणायचे.

Airtel चा 11 रुपयांचा रिचार्ज प्लॅन!! पहा काय सुविधा मिळतात??

Airtel 11 rs recharge

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ३ जुलैपासून देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या एअरटेल, जिओ आणि वोडाफोन आयडीया ने आपले मोबाईल रिचार्ज प्लॅन वाढवल्याने सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला झळ बसत आहेत. त्यामुळे कमीत कमी पैशात कोणता रिचार्ज आहे याकडे ग्राहकांचे लक्ष्य आहे. त्याच पार्श्वभूमीवर तुम्ही जर एअरटेल युजर्स असाल तर तुमच्यासाठी आम्ही १०० रुपयांच्या आतील काही रिचार्ज प्लॅन बद्दल सांगणार आहोत. यातील एक रिचार्ज प्लॅन तर फक्त ११ रुपयांचा आहे. चला तर मग याबाबत सविस्तर जाणून घेऊयात…

11 रुपयांचा रिचार्ज प्लॅन-

एअरटेलचा हा 11 रुपयांचा प्लॅन 1 तासाच्या व्हॅलिडिटीसह येतो आणि अनलिमिटेड डेटा यामध्ये ग्राहकांना मिळतो. एअरटेलचा हा रिचार्ज प्लॅन 10GB च्या FUP सह येते. याचा अर्थ तुम्ही 1 तासात 10GB डेटा वापरू शकता.

49 रुपयांचा रिचार्ज प्लॅन –

एअरटेलचा 49 रुपयांचा प्लॅन 1 दिवसाच्या व्हॅलिडिटीसह येतो. ज्या वापरकर्त्यांना अधिक इंटरनेट डेटाची गरज आहे त्यांच्यासाठी हा प्लॅन सर्वोत्तम पर्याय ठरेल. या प्लॅन अंतर्गत, वापरकर्त्यांना 20 GB ची FUP लिमिट मिळते.

99 रुपयांचा रिचार्ज प्लॅन-

एअरटेलचा हा 99 रुपयांचा रिचार्ज प्लॅन 2 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. ज्याद्वारे वापरकर्ते 2 दिवसांसाठी अनलिमिटेड डेटा प्लॅनचा आनंद घेऊ शकतात. ज्यांना जास्तीत जास्त इंटरनेटचा वापर करायचा आहे त्यांच्यासाठी हा रिचार्ज नक्कीच परवडेल.

एअरटेलच्या सर्वात स्वस्त प्लॅनची ​​वैशिष्ट्ये

तस बघीतले तर एअरटेलचे हे ३ प्लान ग्राहकांना अनलिमिटेड इंटरनेट ऑफर्स देत आहेत. मात्र या तिन्ही रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना एसएमएस किंवा कॉलिंगची सुविधा मिळत नाही. तुमच्याकडे जर आधीच कोणता ऍक्टिव्ह रिचार्ज प्लॅन असेल तर तुम्ही वरील रिचार्ज करून जास्तीचा इंटरनेटचा लाभ घेऊ शकता. कंपनीने हे प्रीपेड प्लॅन खासकरून अशा यूजर्सना लक्षात घेऊन आणले आहेत ज्यांना मोठ्या प्रमाणात इंटरनेट डेटाची आवश्यकता आहे.

Chitra Wagh On Sanjay Raut : अहो रडतरौत, थोबाड फुटल्यानंतर घबाड आठवलं का? शहाणे व्हा; चित्रा वाघ यांचा राऊतांवर प्रहार

Chitra Wagh Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानपरिषद निवडणुकीत (Vidhan Parishad Election 2024) महायुतीने पुन्हा एकदा महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम करत धक्का दिला. महायुतीचे सर्वच्या सर्व ९ उमेदवार विजयी झाले तर महाविकास आघाडीच्या प्रज्ञा सातव आणि मिलिंद नार्वेकर हे दोनच उमेदवार विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून पुरस्कृत असलेले शेकापचे जयंत पाटील पराभूत झाले. या पराभवानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी निवडणुकीत घोडेबाजार झाल्याचा आरोप केला. आमदारांचा भाव शेअर बाजाराप्रमाणे चढत होता अस संजय राऊतांनी म्हंटल होते. त्यावर आता भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी प्रत्युत्तर देत राऊतांना सुनावलं आहे. थोबाड फुटल्यानंतर घबाड आठवलं का? आता तरी शहाणे व्हा असं चित्रा वाघ यांनी म्हंटल.

याबाबत चित्रा वाघ यांनी ट्विट करत म्हंटल अहो, रडतरौत सर्वज्ञानी, संजय राऊत पराभव मान्य करायला सुद्धा मोठं मन लागतं. हातात आमदार नसताना ‘हात दाखवून अवलक्षण’ का केलं? थोबाड फुटल्यानंतर घबाड आठवलं का? तुमच्या विकृत आघाडीकडं आमदार नव्हते, त्यामुळं घोडेबाजार करण्याचा तुमचाच प्रयत्न झाला, हे आधी मान्य करा. नाक कापलं तरी भोकं आहेत, हे तुमचं ब्रीद वाक्य सगळ्यांना माहीत आहे. मुख्य म्हणजे शेकाप च्या जयंत पाटलांना शरद पवार गटानं उमेदवारी दिली होती, त्यांच्याकडं असलेली मतं देखील पडली नाहीत आणि काँग्रेसनं तर तोंडावरच पाडलं. शहाणे व्हा!

संजय राऊत काय म्हणाले होते?

काल आमदारांचा भाव शेअर बाजाराप्रमाणे चढत होता. शेअरबाजाराप्रमाणे अपक्ष आमदारांचा आणि लहान पक्षाचा भाव कसा चढत होता हे आम्ही पाहिलं आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. ज्यांना 23च्या पुढे मते पडली. त्यांचा भाव समजून घ्या. नुसता भाव नव्हता. काही आमदारांना दोन एकर जमीन देण्यात आली आहे. कालच्या आमदारांचा भाव जो फुटलेला आहे. तो 20 ते 25 कोटीपर्यंत आहे. महाविकास आघाडी हा खेळ खेळणार नाही. ज्यांच्याकडे पैसा आहे, ज्यांची ‘समृद्धी’ वाढली आहे, त्यातून हा पैसा जाऊ शकतो, असा टोला संजय राऊत यांनी विरोधकांना लगावला.

Ladki Bahin Yojana 2024: लाडकी बहीण योजनेत 5 मोठे बदल; नव्या अटी जाणून घ्याच

Ladki Bahin Yojana 2024

Ladki Bahin Yojana 2024 | राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत (Ladki Bahin Yojana 2024) आज मोठे बदल करण्यात आले आहेत. याबाबतची नुकतीच सूचना ही जाहीर करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये आता इथून पुढे महिलांना अर्ज करताना लाईव्ह फोटो द्यावा लागणार नाही, असे सांगितले आहे. यासह इथून पुढे नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशनकार्ड उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरले जाणार असल्याची माहिती दिली आहे. या योजनेमध्ये आणखीन कोणते बदल झाले आहेत? याविषयी जाणून घेऊया.

योजनेमध्ये झालेले महत्त्वाचे बदल (Ladki Bahin Yojana 2024)

आज म्हणजेच १३ जुलै रोजी मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावा आणि अर्ज भरताना कोणतीही अडचणी येऊ नये, यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. तसेच या योजनेमधील काही महत्त्वाच्या अनेक अटींमध्ये बदल करण्यात आले. नव्या बदलानुसार, आता अर्ज भरताना महिलेच्या फोटोचा फोटो काढून तो ऑनलाइन अर्ज भरताना ग्राह्य धरण्यात येणार आहे. थोडक्यात, इथून पुढे महिलांना फॉर्म भरताना लाईव्ह फोटो द्यावा लागणार नाही.

नवविवाहित महिलांसाठी अटीत सुधारणा

यापूर्वी अनेक नवविवाहित महिलांकडे रेशनकार्ड नसल्यामुळे अर्ज भरत असताना अडचण येत होती. त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या नवविवाहित महिलांच्या पतीचे रेशन कार्डच उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे. तसेच परराज्यात जन्म झालेल्या परंतु सध्या महाराष्ट्रात वास्तव असलेल्या महिलांना अर्ज भरताना पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाईल. तसेच, 15 वर्षापूर्वीचे रेशनकार्ड आणि 15 वर्षापूर्वीचे मतदान कार्ड ही ग्राह्य असेल. यासह लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात येईल.

दरम्यान, ही योजना जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचावी आणि त्याचा अधिक महिलांनी लाभ घ्यावा यासाठी या योजनेतंर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका / अंगणवाडी सेविका, NULM यांचे समूह संघटक, मदत कक्ष प्रमुख व CMM, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले आहे. (Ladki Bahin Yojana 2024) लक्षात ठेवा की, या योजनेचा लाभ घेण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे.

Real Estate : मुंबईच्या नजीक वाढतीये सेकंड होमची क्रेझ ; दिड वर्षात 200 कोटींपेक्षा जास्त व्यवहार

Real Estate : पुणे, मुंबई सारख्या शहरांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रोजच्या धकाधकीच्या जीवनातून एका निसर्गरम्य ठिकाणात क्वॅलिटी टाईम घालवणं पसंत करतात. आणि म्हणूनच मागच्या काही दिवसात सेकंड होम घेण्याकडे नागरिकांचा कल वाढताना दिसतो आहे. एका आकडेवारीनुसार मागच्या दीड वर्षात अलिबाग लोणावळा कर्जत नेरळ मुरबाड पाचगणी अशा पर्यंत 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवहार (Real Estate) झाल्याची माहिती आहे.

मुंबईच्या आसपास घर घेण्याकडे कल (Real Estate)

मुंबई पासून अलिबाग, लोणावळा, खंडाळा, कर्जत अशा ठिकाणी पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे अशा ठिकाणी जाण्यासाठी लागणाऱ्या वेळेमध्ये मोठी बचत झाली आहे. शिवाय अटल सेतूची निर्मिती झाल्यामुळे पुणे ते मुंबई हा प्रवास कमी वेळात करता येतो. या प्रवासात 40 मिनिटांची बचत होत आहे. त्यामुळे एका दिवसात वीकेंडसाठी इकडे जाण्याचा कल सुद्धा वाढत आहे. त्यामुळे अशा ठिकाणी सेकंड होम (Real Estate) घेण्यासाठी लोक पुढे येत असल्याचे दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार श्रीमंत लोकांनी अपार्टमेन्ट सारख्या बिल्डिंगमध्ये घर घेण्यापेक्षा मोकळा भूखंड घेण्याला (Real Estate) अधिक पसंती दिली आहे. आपल्या मनाप्रमाणे घर बांधण्याचा ट्रेंड सध्या दिसून येत आहे.

सेलिब्रिटींच्या घरांचा समावेश (Real Estate)

अभिनेता रणवीर सिंग, शाहरुख खान, दीपिका , विश्वविजेता संघाचा कप्तान रोहित शर्मा, विराट, कोहली, अनुष्का शर्मा, अमिताभ बच्चन अशा अनेक नामांकित व्यक्तिमत्वांनी गेल्या दोन वर्षात मुंबई नजीक अनेक ठिकाणी सेकंड होम आणि त्यासाठी भूखंड खरेदी (Real Estate) केले आहेत. सेकंड होम ची खरेदी केवळ श्रीमंतांकडूनच होत नाही. तर यापैकी बहुतांश ठिकाणी मुंबईतील नामांकित बिल्डर्सने इमारतींचे प्रकल्प देखील सादर केले आहेत. त्यामुळे मध्यमवर्गीय आणि उच्च माध्यम वर्गीय लोकांनाही अशा ठिकाणी फ्लॅट घेऊन स्वतःचे सेकंड होम चे स्वप्न साकारता येणार आहे.

धक्कादायक!! छत्रपती संभाजीनगरातील 50 तरुण इसिसच्या गळाला

Chhatrapati Sambhajinagar ISIS

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) मधून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. छत्रपती संभाजीनगरातील 50 तरुण इसिसच्या (ISIS) गळाला लागले आहेत. 15 फेब्रुवारी 2024 रोजी संभाजीनगर मधील बेरीबाग परिसरातून एनआयएने 35 वर्षीय मोहंमद जोएव खानला अटक केली होती. त्याच्याविरुद्ध शुक्रवारी मुंबईतील एनआयएच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या आरोप पत्रातून छत्रपती संभाजीनगरमध्ये पसरलेल्या एनआयएच्या जाळ्याबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मोहम्मद झोएब खान स्लीपर सेल म्हणून काम करत होता. छत्रपती संभाजीनगरमध्ये इसिसचे जाळे पसरवण्याचे काम त्याने केले. देशातील महत्वाच्या ठिकाणी हल्ला करण्यासाठी तरुणांची मोठी टोळी तयार करण्यात आली होती. भारतात मोठ्या घातपाती कारवाया करून अफगाणिस्तान किंवा तुर्कि येथे पळून जाण्याचा कट रचण्यात आला होता. लिबियाचा शोएब आणि छत्रपती संभाजीनगरातील जोएब त्या कटाचे मुख्य सूत्रधार होते, असे या दोषारोपपत्रात म्हटले आहे. मोहम्मद झोएबच्या मदतीने मराठवाड्यातील आणि राज्यातील 50 जणांची एक टोळी तयार करण्यात आली होती.

जोएब हा अगोदर बंगळुरुमध्ये नोकरी करत होता. त्यानंतर त्यानं वर्क फ्रॉम होम घेऊन छत्रपती संभाजीनगरात इसीसचं जाळं पसरवण्याचं काम सुरू केलं, असंही या आरोपपत्रात नमूद करण्यात आलं आहे. मोहम्मद झोएब ने 50 तरुणांचा एक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केला. या माध्यमातून विविध ठिकाण हल्ला करण्यासाठी स्फोटकांची निर्मिती करण्याचे प्रशिक्षण तो तरुणांना देत होता. महत्वाची बाब म्हणजे जोएबला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी शहरात 9 ठिकाणी छापे टाकले. सर्व एजन्सींचे तपास कार्य अजूनही सुरु आहे.