‘गर्जा महाराष्ट्र माझा’च्या शाहीर साबळे यांचा आज जन्मदिन

shahir sabale

सांस्कृतिक नगरी | अमित येवले महाराष्ट्रशाहीर कृष्णराव साबळे तथा शाहीर साबळे यांचा आज जन्मदिन. चलेजाव व संयुक्त महाराष्ट्र चळवळ,गोवा,हैदराबाद मुक्ती संग्राम यामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. लोकप्रिय ठरलेल्या “गर्जा महाराष्ट्र माझा” या गीतातून त्यांनी महाराष्ट्र देशाची महती घराघरांत पोहोचविली. भारताच्या स्वातंत्र मिळण्याच्या दशकात शाहीरांचे योगदान अमूल्य ठरले आहे. शाहिर हे तत्कालीन वेळेस त्यांच्या शाहिरींच्या माध्यमातून … Read more

कोन बनेगा करोडपती आज पासून होणार सुरू

kbc

मुंबई | सुरज शेंडगे टेलिव्हिजन जगतात सर्वोच्च टी.आर.पी कमावणाऱ्या टिव्ही शो ला आज पासून सुरुवात होणार आहे.आज पासून सुरू होणाऱ्या कोन बनेगा करोडपती कार्यक्रमाचा हा दहावा अध्याय आहे. अमिताभ बच्चन यांच्या अनोख्या सूत्रसंचालनातून साकार होणारा कार्यक्रम लोकांच्या अत्यंत पसंतीला उतरला आहे.आज रात्री ९ वाजता सोनी वाहिनी वर हा कार्यक्रम सर्वांच्या भेटीला येतो आहे.या अध्यायात कोन … Read more

सरन्यायाधीशपदी रंजन गोगोई यांची वर्णी ?

ranjan gogoi

नवी दिल्ली | सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ न्यायाधीश असलेले रंजन गोगोई हे पुढील सरन्यायाधीश म्हणून पदभार स्विकारतील अशी शक्यता आहे. कारण, विद्यमान सरन्यायधीश दीपक मिश्रा यांनी याबाबत त्यांच्या नावाला पसंती दिली असून , तसे शिफारस पत्र त्यांनी विधी मंत्रालयाकडे पाठवले आहे. त्यामुळे येत्या ०३ ऑक्‍टोबर रोजी ते सरन्यायाधीशपदी विराजमान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, या … Read more

आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाची व्यथा

adivasi hostel

नवनाथ मोरे | ९९२१९७६४६० आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या विकासासाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. याच विभागामार्फत आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात यावे,शिक्षण घेता यावे. यासाठी राज्यभरात ४९१ वसतिगृहे चालवली जातात.या वसतिगृहांमध्ये ५८ हजारहून अधिक विद्यार्थी वास्तव्य करतात. वसतिगृहांमध्ये जेवण,नाष्टा,शैक्षणिक साहित्य,बेडिंग साहित्य,निर्वाह भत्ता इ. सुविधा पुरविल्या जातात. आदिवासी समाजाच्या सामाजिक प्रगतीत आश्रमशाळा,वसतिगृह यांचा महत्वाचा … Read more

उंदराला मारण्यासाठी गोळीची काय गरज – प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar

पुणे | सुनिल शेवरे अनेक पुरोगाम्यांना शहरी नक्षलवादी म्हणून अटक झाल्यानंतर देशभर डाव्या संघटनानी निषेध नोंदवला आहे. त्यात भर पडली आहे भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची. मोदींच्या हत्येचा कटासंदर्भात प्रश्न विचारला असता, उंदीर मारण्यासाठी गोळीची काय गरज? अशी कडवट प्रतिक्रिया त्यांनी दिली. दरम्यान त्यांच्या या वक्तव्यामुळे मोठा वाद होण्याची शक्यता आहे.

आशियाई स्पर्धेत भारताची आजपर्यंतची सर्वोत्तम कामगिरी

Indians

जकार्ता | १५ सुवर्ण, २४ रौप्य व ३० कांस्यपदक मिळवत भारताने आशियाई स्पर्धेत आपली आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली आहे. यातील सर्वात जास्त पदके ही अॅथलेटिक्स या क्रीडाप्रकारात मिळाली आहेत. यातील अनेक क्रीडाप्रकारांत भारताला पहिल्यांदाच पदक मिळाली आहेत. २०१० सालच्या भारतीय चमूने एकूण ६५ पदकांची कमाई केली होती. सर्व पदकविजेत्या खेळाडूंचे क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड व पंतप्रधान … Read more

अल्पवयीन मुलीवरील बलात्काराप्रकरणी पित्याला फाशी

child rape

राजस्थान | घरातील बाकी लोकांच्या अनुपस्थितीत आपल्याच मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापाला राजस्थान उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. बापाने स्वतःहून या गुन्ह्याची कबुली पोलीस स्टेशनला दिली होती. अवघ्या २० दिवसांत या गुन्ह्यावर शिक्षेची कारवाई करण्यात आली. विनोद बंजारा असे या आरोपीचे नाव असून पोस्को कायद्याअंतर्गत त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. पब्लिक प्रोसिक्युटर नंद किशोर … Read more

धर्मनिरपेक्षता जपणं महत्वाचं – वंदना चव्हाण

Vandana Chavan

पुणे | सुनिल शेवरे भारत हा विविधतेचा देश आहे. या देशांत राहणाऱ्या प्रत्येकाला सरकार विरोधात टीका करण्याचा अधिकार आहे असं मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार वंदना चव्हाण यांनी व्यक्त केलं. पुण्यात आयोजित राष्ट्रवादी पक्षाच्या स्नेहमेळाव्यात त्या बोलत होत्या. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून दिलेलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आज हिरावुन घेतल जात आहे. आताच्या विचारवंतांना नक्षलवादी … Read more

बाॅयफ्रेंड सोबत पळून जाण्यासाठी तिने रचला स्वत:च्याच हत्येचा कट

Thumbnail

बाराबंकी | एका विवाहीत महिलेने बाॅयफ्रेंन्ड सोबत पळून जाण्यासाठी स्वत:च्याच हत्येचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशात घडला आहे. याप्रकरणी उ. प्रदेश पोलीसांनी आरोपी महीला रुबी आणि तिचा बाॅयफ्रेंड रामू यांना अटक केली आहे. तर रुबीची हुंड्यासाठी सासरच्या लोकांनी हत्या केली आहे अशी तक्रार पोलीसांत करणार्या रुबीच्या वडीलांविरोधात दिशाभूलीचा गुन्हा दाखल केला आहे. हाती आलेल्या … Read more

जैन मुनी तरुण सागर यांचे ५१व्या वर्षी दिल्लीत निधन

Thumbnail

नवी दिल्ली | जैन मुनी तरुण सागर यांचे आज पहाटे निधन झाले आहे. त्यांना कावीळ आजाराने बऱ्याच दिवसांपासून ग्रासले होते. तरुण सागर हे आपल्या कडव्या प्रवचनासाठी प्रसिद्ध होते.आपल्या प्रवचनातून राष्ट्रवाद आणि मानवतावाद सर्वदूर पेरणारे संतमुनी म्हणून त्यांची ख्याती होती. तरुण सागर हे गेल्या काही दिवसापासून कावीळ आजाराने बाधित होते. त्यांचे शरीर उपचाराला साथ देत नव्हते. … Read more