दिग्विजय – नेपोलियन बोनापार्ट

nepolian

ज्या माणसाच्या शब्दकोषात “अशक्य” नावाचा शब्दच नाही.असा दूर्दम्य इच्छाशक्ती असणारा माणूस म्हणून नेपोलियन बोनापार्टकडे पाहिलं जातं!!
आज आपण जगभर ज्या फ्रेंच राज्यक्रांतीचे दाखले देत असतो. त्या राज्यक्रांतीने राजेशाही नष्ट झाली आणि लोकशाही मूल्ये रुजली. खरं तर ही राज्यक्रांती फसली आणि या फसलेल्या राज्यक्रांतीमुळेच नेपोलियनला बळ मिळाले. एक दिवस त्याने फ्रान्सच्या गादीवर बसून स्वतः चा राज्याभिषेक केला.
नेपोलियनच्या बाबतीत आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो जन्माने फ्रेंच नव्हता. फ्रान्सच्या अंकित असणाऱ्या दक्षिणेतील कॉर्सिका बेटावरचा त्याचा जन्म. याच नेपोलियनच्या वडीलांनी आणि कॉर्सिकावासीयांनी फ्रेंचांच्या सत्तेविरोधात लढा दिला.त्याच कॉर्सिकाचा युवक एक दिवस बलाढ्य अशा फ्रान्सच्याच गादीवर बसला.
उंचीने बुटका,ज्याला घोड्यावर नीट मांड टाकता येत नाही, ज्याचा बंदूकीचा निशाणा अचूक नाही मात्र त्याची सैन्यवर भक्कम मांड आहे. त्याचा घोडा ऐन लढाईत सर्वांच्या पुढे असतो अशा नेपोलियनचे सैनिक आपल्या सेनापतीसाठी सूदूर रशियाची मोहीम असो वा इजिप्त,इटलीची मोहीम असो जीवावर उदार होऊन लढत असत.
नेपोलियनच्या वैयक्तिक महत्वकांक्षा प्रचंड असल्या तरी त्याने जनतेसाठी मोठे रस्ते,बागा,अनेक शैक्षणिक संस्था उभारणे अशी लोकोपयोगी कामे केलीच त्याचबरोबर अमिर उमरावांचे वर्चस्व कमी केले.
अशा नेपोलियनचं वैयक्तिक आयुष्यमात्र एका अर्थाने दुःखद होतं. पहिल्या प्रेयसीसाठी त्याने केलेला देशत्याग एकीकडे आणि सत्तेच्या जवळ जाण्यसाठी एका विधवा उमराव स्त्रीशी केलेला विवाह एकीकडे. ज्या नेपोलियनने फ्रान्सला महासत्ता बनवून जगात उभं केलं त्याच नेपोलियनच्या सख्या बहिणीने सत्तेसाठी त्याचा केलेला विश्वासघात एकीकडे. अशा प्रकारे निष्ठा,पराक्रम,महत्वकांक्षा फितुरी,विश्वासघात,प्रेम,विरह अशा रोमांचक गोष्टीने भरलेलं आयुष्य आणि अतिमहत्वकांक्षे पोटी आयुष्याची अखेरची वर्षे इंग्रजांच्या कैदेत सेंट हेलेना बेटावर काढताना खचितस त्याला अशक्य नावाचा शब्द शिवला असेल. त्याच्या मृत्यूनंतर 19 वर्षांनी त्याचं शव फ्रान्सला नेईपर्यंत त्यांच्या कबरीची देखभाल करणाऱ्या एका सैनिकाची निष्ठा उदारहरणा दाखल दिली जाते की त्याच्या सैन्यचा त्याच्यावर किती जीव होता.अशा नेपोलियन बद्दल तो साधा जनरल असताना बोलले जाई कि लवकरच त्याला संपूर्ण सैन्याचा ताबा द्यायला हवा. नाही तर तो स्वतः आपल्या हाताने तो घेईल. अशा महत्वाकांक्षी फ्रेंच नायकाच्या युध्द मोहीमा आशाच अशक्य ,अतर्क्य कोटीतल्या होत्या. त्याच्या लढाईतील सैन्य डावपेचांचा अभ्यास आजही जगभरातील सैनिकी शिक्षण संस्थामधे केला जातो.अशा नायकावर मराठीत लिहलेली ही कादंबरी त्याच्या कर्तृत्वाला न्याय देणारीच! तसेच अतिशय छान गुंतून जावे अशा शैलीत लिहली आहे.

पुस्तक परिचय – प्रणव पाटील
पुस्तकाचे नाव – दिग्विजय
लेखक – भा.द.खेर, राजेन्द्र खेर
मेहता प्रकाशन
किंमत – ४५०/- रुपये फक्त

वकील व मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या अटक सत्राने खळबळ

Activist

लोकशाहीची वाटचाल अधिकारी हुकूमशाहीकडे? – विचारवंतांचा संतप्त सवाल विशेष प्रतिनिधी | केंद्र सरकारतर्फे सरकारविरोधात बोलणाऱ्या, समाजातील दुभंगलेल्या घटकांसाठी काम करणाऱ्या समाजसेवक, वकील व कृतिशील कार्यकर्त्यांच्या धरपकडीचे सत्र सुरु झाले आहे. समाजात दहशतीचं वातावरण बनवून ठेवण्यासाठी तसेच गट पाडण्यासाठी या प्रकारच्या कृतींचा आधार भाजप सरकारने घेतला आहे. काही माध्यमसमूह जे सरकारच्या जवळ आहेत, त्यांनीसुद्धा ठराविक घटकांना … Read more

वस्त्रोद्योग धोरणानुसार राज्यातील कापूस उत्पादक तालुके घोषित

cotton

मुंबई | आज वस्त्रोद्योग धोरण २०१८-२०२३ नुसार राज्यातील काही कापूस उत्पादक तालुके घोषित करण्यात आले आहेत. एखाद्या तालुक्यातील सहकारी सुतगिरणी स्थापन करण्यासाठी वार्षिक किमान ४८०० टन कापूस उत्पादन असणे आवश्यक असते. या बाबीचा विचार करता भविष्यात यापुढे स्थापन होणारी सहकारी सुतगिरणी सक्षमपणे चालण्यासाठी ज्या तालुक्यात वार्षिक किमान ९६०० टन कापूस उत्पादन होत आहे, असेच तालुके … Read more

नगर वाचनालायतर्फे सांगलीत गीत गायन स्पर्धा

sangli music

सांगली | सांगली जिल्हा नगर वाचनालयाच्या वतीने मराठी गीत गायन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा महिला व पुरुष या गटात होतील. वय वर्षे २० पूर्ण असणा-या स्पर्धकांस यामध्ये भाग घेता येईल. स्पर्धेचं स्वरुप मराठी भाषेतून असेल. स्पर्धक गाण्याच्या मागील संगीत वापरुन गाऊ शकतात. स्पर्धेसाठी प्रवेश फी २५ रुपये असून यासाठीची नावनोंदणी नगरवाचनालयात किंवा … Read more

सिंधूची रुपेरी तर मनजितसिंगची सोनेरी कामगिरी

manjitsing

जकार्ता | आशियाई स्पर्धेच्या १० व्या दिवशी भारताने दिमाखदार कामगिरी केली. तिरंदाजीमध्ये महिला व पुरुषांच्या संघाने रौप्यपदकाची कमाई केली. टेबल टेनिसमध्ये भारताने पहिल्यांदाच पदकाची कमाई केली. जपानकडून पराभव झाल्याने भारताला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. अॅथलेटिक्स मध्ये ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीत मनजितसिंग याने सुवर्णपदकाची कमाई केली तर याच स्पर्धेत जिन्सन जॉन्सन याने रौप्यपदक मिळवले. हॉकीमध्येही भारताने … Read more

तेज अप्लिकेशन आजपासून ‘गूगल – पे’ नावाने ओळखले जाणार

G Pay

तंत्रज्ञानविश्व | डिजीटल इंडियासाठी गूगलने विकसित केलेल्या ‘Tez’ या अँप्लिकेशनचे लोकप्रिय नाव आजपासून G-Pay असे असणार आहे. यातील इतर फंक्शनमध्ये कुठल्याही स्वरुपातील बदल करण्यात आलेले नसून सद्यस्थितीत फक्त नावामध्ये बदल केलेला आहे. पैशांची देवाणघेवाण, वेगवेगळ्या प्रकारचे रिचार्ज आणि इतर आर्थिक उलाढालींसाठी अत्यंत उपयुक्त असे हे अँप आहे.

वनाज ते सिविल कोर्ट पुणे मेट्रोचे काम प्रगतीपथावर

pune metro

पुणे | पुणे मेट्रोच्या मार्गिका २ वनाज ते सिविल कोर्टचे काम प्रगती पथावर असून आनंद नगर येथे लाँचिंग गर्डरची उभारणी अखेरच्या टप्प्यात आहे. यासाठीच्या खांबांची पायाभरणी मोरे विद्यालय पर्यंत पोहचली आहे. तर कृष्णा हॉस्पिटल जवळील खांबांवर कॅप घातले जात आहेत. सध्या ह्या भागातील कामे प्रगती पथावर असून वाहन चालवतांना कृपया प्रत्येकाने काळजी घ्यावी, असे आदेश … Read more

क्रिकेट स्टेडियमवरील सर्वात मोठा सोलर प्लांट ब्रेबॉर्न वर

breborn

मुंबई | जागतिक तापमानवाढीशी सामना करताना महत्वाच्या मानल्या गेलेल्या सौरऊर्जेच्या वापराबाबत लोक अधिक जागरूक होऊ लागले आहेत. महाराष्ट्र सरकारनेही यात पुढाकार घेऊन ब्रेबॉर्न स्टेडियमवर उभारल्या गेलेल्या सोलर प्लांटचे अनावरण सोमवारी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्लांटचे अनावरण करण्यात आले. जगात असणाऱ्या सर्व क्रिकेट स्टेडियममधील हा सर्वात मोठा प्लांट आहे. याठिकाणी २२८० सोलर पॅनेल … Read more

‘डीएमके’ मध्ये ‘स्टॅलिन’राज

stalin

चेन्नई | द्रविड मुनेत्र कळघमच्या अध्यक्षपदी एम के स्टॅलिन यांची निवड झाली आहे. एम करुणानिधी यांच्या मृत्यूनंतर रिकाम्या झालेल्या या जागेसाठी आज पक्षाची साधारण बैठक घेण्यात आली होती. त्यात हा निर्णय घेण्यात आला. स्टॅलिन हे पक्षाचे केवळ दुसरेच अध्यक्ष आहेत. याआधी करुणानिधी यांनी ४९ वर्ष अध्यक्ष म्हणून काम पाहिलं. मागील वर्षी स्टॅलिन यांची पक्षाच्या कार्याध्यक्षपदी … Read more

वीज वितरण कंपनीच्या उलट्या बोंबा

electricity

मुंबई | राज्यातील वीज वापराबाबत गळती आणि चोरीच्या प्रकरणाला आळा घालण्याऐवजी महावितरणने वीज नियामक मंडळाकडे वीजदरवाढीसाठी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर ३१ ऑगस्ट पर्यंत निकाल लागणे अपेक्षित असून निकाल लागला नाही तरी १५ सप्टेंबरपासून किमान ५ ते १०% वीजदरवाढ होण्याची शक्यता आहे. महावितरणाची ३० हजार ८४२ कोटी रुपयांची तूट भरुन काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात … Read more