प्रामाणिक अधिकाऱ्यांशी भाजपचा ३६ चा आकडा

tukaram mundhe

तुकाराम मुंढे यांच्यावर अविश्वास ठराव नाशिक | महापालिकेत शिस्तीचे वातावरण, विकासकामांसाठी त्रिसूत्री रचना राबविण्यात पुढाकार घेणाऱ्या तुकाराम मुंढे यांच्या विरोधात भाजपने अविश्वास ठराव दाखल केला आहे. शिवसेनेची मालमत्ता करावरील सूट देण्याची अट मान्य झाल्यास ते तुकाराम मुंढेंच्या समर्थनार्थ काम करतील. १ सप्टेंबर रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत याबाबत निर्णय घेण्यात येईल. नेहमीप्रमाणे स्थानिक नागरिकांनीही प्रसंगी … Read more

रोटरी क्लब ऑफ़ हेरिटेज नॉन गॅस कुकिंग स्पर्धेच आयोजन

cooking

पुणे | घरात आईच्या स्वंयपाककामात मदत करणाऱ्या मुला-मुलींची नेहमी लगबग सुरु असते. त्यांनाही शेफची आवड़ निर्माण व्हावी म्हणून स्वतंत्र कुकिंग स्पर्धेच आयोजन रोटरी क्लबने केलं आहे. लिटल मास्टर शेफ या नावाने घेतली जाणारी ही स्पर्धा ८ ते १४ वयोगटातील लहान मुलांसाठी ही स्पर्धा आहे. नॉन गॅस कुकिंग म्हणजे गॅस न वापरता करता येणाऱ्या पदार्थाची स्पर्धा … Read more

आशियाई स्पर्धा – भारतासाठी संमिश्र दिवस

neeraj chopra

सिंधू अंतिम फेरीत, नीरज चोप्राला भालाफेकीत सुवर्ण जकार्ता | आशियाई स्पर्धेचा नववा दिवस भारतासाठी संमिश्र राहिला. कांस्यपदक, रौप्यपदक आणि सुवर्णपदक मिळविण्यात भारतीय खेळाडू यशस्वी ठरले. नीरज चोप्रा याने भालाफेकीत ८८.०६ मीटर फेक घेत सुवर्णपदक पटकावले. ही फेक घेत त्याने स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला. १९८२ साली गुरतेज सिंग याने जिंकलेल्या कांस्यपदकानंतर भालाफेकीत भारताचे हे पहिलेच … Read more

राज्यातील काही जिल्ह्यांना अतिरिक्त निधी

agri

मुंबई | आरोग्य, पोषण आहार, शिक्षण, कृषि, जलसंधारण, आर्थिक समावेशन, कौशल्य विकास आणि मूळ पायाभूत सुविधा या क्षेत्रातील विविध विकासांच्या कामासाठी नंदूरबार, गडचिरोली, वाशिम आणि उस्मानाबाद या चार जिल्ह्यांना मुख्यमंत्री यांनी १२१ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी आज जाहिर केला. या चार आकांक्षित जिल्ह्यांमधील विकास कामांच्या प्रगतीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला. या … Read more

क्रिकेटच्या पहिल्या देवाचा वाढदिवस – भाग २

Don Bradman

एकंदरीत आढावा घेतला असता डॉनच्या कसोटी कारकिर्दीची सुरवात तितकी चांगली झाली नव्हती. पहिल्या कसोटीत दोन्ही डावात मिळून १९ धावा केल्यामुळे दुसऱ्या कसोटीत त्याला डच्चू देण्यात आला होता. तिसऱ्या कसोटीत मात्र एक खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यामुळे डॉनला संधी मिळाली आणि याच संधीचे त्याने सोने केले. या कसोटीच्या दुसऱ्या डावात त्याने शतक केले अन हे त्याचे सर्वात कमी … Read more

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या बोधचिन्ह व घोषवाक्याचे अनावरण

lokseva

मुंबई | नागरिकांना पारदर्शक,गतिमान आणि कालबद्ध सेवा देण्यासाठी पारित केलेल्या महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या बोधचिन्ह व घोषवाक्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज अनावरण झाले. लोकसेवा हक्क कायद्याच्या लोकप्रियतेसाठी घेण्यात आलेल्या बोधचिन्ह स्पर्धेत नरेश अग्रवाल यांच्या बोधचिन्हाची तर उत्कृष्ट घोषवाक्य स्पर्धेत हेमंत कानडे यांच्या घोषवाक्याची निवड करण्यात आली. यावेळी या दोघा स्पर्धकांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रत्येकी … Read more

पुण्यात पुस्तक दहीहंडीचे आयोजन

initiative

पुणे | राष्ट्रीय एकात्मता जपण्यासाठी अनेक संस्था नानाविध कार्यक्रमाचे आयोजन करत असतात. परंतु वंदे मातरम संघटनेने आणि फीनिक्स फाउंडेशन यांनी दरवर्षी प्रमाणे पुस्तक दहीहंडीचे आयोजन करत राष्ट्रीय एकात्मता जपली आहे. सर परशुरामभाऊ महाविद्यालय येथे जुने पुस्तक स्विकारण्याच्या उपक्रमाचे आयोजन केले आहे. गडचिरोली जिल्ह्यात या उपक्रमाअंतर्गत आजपर्यंत ३३ ग्रथालये उभारण्यात आली आहेत, वंदे मातरम संघटनेचे या … Read more

पूर्व-विदर्भात पावसाचा जोर वाढणार

rain

मुंबई | अमित येवले पूर्व-भारतात तयार झालेल्या एका कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पूर्व-विदर्भात २७ आणि २८ ऑगस्ट रोजी पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. यामुळे या दरम्यान गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. पावसाच्या या स्थितीमुळे नदी-नाल्यांना पूर येण्यासारखी स्थिती उद्भवू शकते ज्यामुळे काही गावांचा … Read more

जम्मू काश्मीरच्या राज्यपालांनी घेतली मोदींची भेट

Satyapal Malik

नवी दिल्ली | जम्मू कश्मीर राज्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. नुकतीच त्यांची जम्मू कश्मीर या राज्याचे राज्यपालपदी नियुक्ती झाली आहे. काश्मीर खोऱ्यात वाढता तणाव व तेथील लागु असलेली राष्ट्रपती राजवट या बाबतीत या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. सत्यपाल मलिक या अगोदर बिहारचे राज्यपाल होते. मेहबुबा मुफ्ती व … Read more

जैवइंधनावर चालणाऱ्या पहिल्या विमानाची चाचणी यशस्वी

biofuel

दिल्ली | भारतातील जैव इंधनावर चालणाऱ्या पहिल्या विमानाचे यशस्वी लँडिंग आज पार पडले. देहरादून ते दिल्ली असा या चाचणीचा प्रवास राहिला. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम या संस्थेने यासाठी इंधन निर्मिती केली आहे. नरेंद्र मोदी यांनी अशा नविकरणक्षम इंधन निर्मितीची देशाला गरज आहे, अशी भावना मागील एका कार्यक्रमात व्यक्त केली होती. त्या धर्तीवर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ … Read more