वैद्यकीय शिक्षण प्रवेशाच्या लक्षवेधी वर विधान परिषदेत गदारोळ

thumbnail 1531818523858

नागपूर | वैद्यकीय शिक्षण प्रवेशावर आज विधान परिषदेत लक्षवेधी मांडण्यात आली. या लक्षवेधीवर बोलताना मराठवाड्यातील प्रवेशाच्या ७०/३० पॅटर्नचा उल्लेख झाला. विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी ७०/३० पॅटर्नवर लक्ष वेधले. चर्चा टोकाला भिडल्या मुळे विरोधक आमने सामने आले. शेवटी सभापतींच्या खुर्चीत असणारे माणिकराव ठाकरे यांनी विषय राखून ठेवत असल्याचे सांगत गदारोळ थांबवण्याचा प्रयत्न केला. मराठवाड्यात … Read more

शिव स्मारकावरून विधान सभेत अभूतपूर्व गदारोळ

thumbnail 1531817994196

नागपूर | विधान सभेत शिव स्मारकासंदर्भात निवेदन देते वेळी आज विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला. शिवस्मारका मधील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची खर्च कमी करण्यासाठी घटवल्याचा आरोप विरोधकांनी यावेळी केला आहे. जागतिक रेकॉर्ड मोडण्यासाठी पुतळ्याची उंची घटवून तलवारीची उंची वाढवण्यात येणार असल्याची नागरीकाट चर्चा सुरु आहे. त्या पार्श्वभुमीवर विरोधकांनी आज सरकारला धारेवर धरले. मुख्यमंत्री सभागृहात निवेदन देत … Read more

आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांना महापूजा करू देणार नाही

thumbnail 15318154037311

मुंबई | मुख्यमंत्र्यांना आषाढी एकादशीला विठ्ठलाची शासकीय महापूजा करू देणार नाही असा इशारा सकल मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे. लाखोंचे मोर्चे काढून ही मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली निघत नसल्याने आम्ही अशा आंदोलनाचा निर्णय घेतला असल्याचे सकल मराठा क्रांती मोर्चाचे राघव गायकवाड यांनी माध्यमांनाशी बोलताना म्हटले आहे. मुख्यमंत्री मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर कसल्याच हालचाली करत नसल्याने मराठा … Read more

दुध आंदोलन ही पुर्णपणे अराजकीय चळवळ – खा. राजु शेट्टी

thumbnail 15317471048172

मुंबई | राज्यात दुध आंदोलन चांगलेच पेटले असून अनेक प्रमुख शहरांचा दुध पुरवठा रोखण्यात आंदोलन कर्त्यांना यश आले आहे. यापर्श्वभुमीवर काल राज्यकृषी मंत्री सदाभाऊ खोत यांनी ‘दुध आंदोलन राजकीय स्वार्थापोटी आणि आपणच कसे शेतकर्यांचे खरे नेते आहोत हे दाखवण्याकरता केले जात आहे’ अशी टीका आंदोलकांवर केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. … Read more

भिडे पुन्हा बरळले, डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती वाचून राज्यघटना लिहील्याचा दावा

thumbnail 1531809610216

मुंबई | वादग्रस्त विधाने करुन सतत चर्चेत राहणारे शिवप्रतिष्ठान चे संस्थापक संभाजी भिडे यांनी डाॅ बाबासाहेब आंबेडकरांवर वादग्रस्त विधान केले आहे. डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती वाचून राज्यघटना लिहील्याचा दावा भिडे यांनी केला आहे. संभाजी भिडेंच्या या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्याता वर्तवण्यात येत आहे. न्युज १८ या वृत्तवाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी … Read more

आदिवासी विद्यार्थ्यांच्या मोर्चावर पोलीसांची दडपशाही

thumbnail 1531803414809

अहमदनगर | प्रलंबित मागण्यांसाठी पुण्याहून नाशिक आयुक्तालयावर निघालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या मोर्चावर पोलिसांनी दडपशाही केली आहे. नाशिक अहमदनगर जिल्हा हद्दीत पोलिसांनी आदिवासी विद्यार्थी मोर्चा अडवला आहे. आदिवासी वसतिगृहे बंद करु नयेत तसेच आदिवासी विद्यार्थ्यांची जेवणाची नवीन डि.बी.टी. पद्धत रद्द करण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थी कृती समिती, महाराष्ट्र ने आंदोलनाचा पवित्रा घेत आदिवासी विद्यार्थी शिक्षण … Read more

हॉटेलच्या आड सुरू होते हुक्का पार्लर

thumbnail 1531771280463

जळगाव | शहरातील एका उच्चभ्रू हाॅटेल मधे बेकायदेशीररीत्या हुक्का पार्लर चालत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहराच्या बाहेरील बाजूस विरळ लोक वस्तीत हे हॉटेल असून हॉटेलच्या नावाखाली या ठिकाणी हुक्का पार्लर सुरु असल्याचा छडा पोलिसांनी लावला आहे. या प्रकरणात माजी महापौरांचा मुलगा दोषी आढळला आहे. जळगावच्या माजी महापौर आशा कोल्हे यांचा मुलगा रितेश कोल्हे … Read more

आणि मोदींना रुग्णालयात हुंदका फुटला

thumbnail 1531750566458

मिदनापुर | पश्चिम बंगाल मधील मिदनापुर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेमधे मंडप कोसळून २४ जण जखमी झाले आहेत. पंतप्रधानांच्या उपस्थितीमधे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असता मोदींचे भाषण सुरू असताना ही दुर्घटना घडली आहे. नरेंन्द्र मोदींच्या सभेसाठी उभाण्यात आलेला मंडप मोदींचे भाषण सुरु असताना अचानक कोसळला आणि त्यामधे भाषण एकण्यासाठी आलेले २४ जण जखमी झाले. … Read more

या झेंड्यावर भारतात येणार बंदी

thumbnail 15317476359991

नवी दिल्ली | शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष सय्यद वसीम रिझवी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. रिझवी यांनी चंद्र आणि चांदणी असलेल्या झेंड्यावर बंदी घालावी असा दावा दाखल खटल्यातून केला आहे. कारण या झेंड्याचा आणि इस्लाम धर्माचा काहीच संबंध नाही असे रिझवी यांनी कोर्टात सांगितले आहे. सरकारशी सल्ला मसलत करून सरकारची बाजू … Read more

आपणच शेतकर्यांचे नेते आहोत हे सिद्ध करण्यासाठीच दुध आंदोलन – सदाभाऊ खोत

thumbnail 15317471048171

नागपूर | राज्यात दूध दरवाढीचे आंदोलन सुरू असतानाच कृषीराज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी माध्यमांशी बोलताना आंदोलनाची वास्तवता दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ‘लोकसभेची खासदारकी जिंकता यावी यासाठी छेडलेले हे आंदोलन असून या आंदोलनाचा जन्म खुर्चीच्या स्वार्थातून झाला आहे’ असे सदाभाऊ खोत म्हणाले आहेत. ‘मी हयातभर आंदोलन करत आलो आहे. आंदोलनाच्या दुधात पाणी किती आणि दूध किती … Read more