मुख्यमंत्र्यांची धमकी, कचरा प्रश्न सोडवला नाही तर औरंगाबाद महानगर पालिका बरकास्त करीन

thumbnail 1531911812669

नागपूर | मागील पाच महिन्यांपासून प्रलंबित असलेला औरंगाबाद कचरा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि औरंगाबाद चे मनपा आयुक्त व महापौर यांच्यात नागपूर येथे नुकतीच बैठक पार पडली. सदर बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘कचरा प्रश्न सोडवला नाही तर औरंगाबाद महानगर पालिका बरकास्त करीन’ असा अौरंगाबाद म.न.पा. ला निर्वाणीचा इशारा दिला आहे. औरंगाबाद मनपावर भाजपचीच सत्ता … Read more

भाजपच्या खासदारांनी मांडली अशी लक्षवेधी सूचना की त्याचे तुम्हाही हसू येईल | लोकसभा Live

thumbnail 1531903996861

नवी दिल्ली | संसदेचे पावसाळी अधिवेशन आज पासून सुरू झाले आहे. लक्षवेधी सूचना मांडून सरकारचे लक्ष महत्वाच्या विषयावर आकर्षित करून घ्यायचे असते यासाठी लक्षवेधी सुचनेची रचना करण्यात आली आहे. परंतु आज भाजपच्या खासदाराने लोकसभेत मांडलेली लक्षवेधी ऐकून आपणास हसू आल्याशिवाय राहणार नाही. भाजचे मेरठचे खासदार राजेंद्र अग्रवाल यांनी आज लोकसभेत टीव्ही वर दाखवल्या जाणाऱ्या जाहिराती … Read more

पहिले ते आठवी इयत्तेसाठी आता होणार परीक्षा | लोकसभा Live

thumbnail 1531906567435

नवी दिल्ली | देशात चौदा वर्षा पर्यंत मोफत आणि सक्तीचे शिक्षण देणे शासन संस्थेचे मूलभूत कर्तव्य असेल असे संविधानात नमूद करण्यात आले आहे. यातूनच सर्व शिक्षा अभियान नावाने सरकारने अभियान सुरू केले. अभियानात वेळोवेळी बदल करण्यात आले. मागील काही वर्षांपासून पहिली ते आठवी पर्यंत परीक्षाच घेतल्या जात नव्हत्या. त्यामुळे पहिले ते आठवीचे वर्ग शिक्षक आणि … Read more

कॉग्रेस आणणार भाजप सरकारवर अविश्वास प्रस्ताव |लोकसभा Live

thumbnail 1531902155306

नवी दिल्ली | कॉग्रेसने भाजपच्या विरोधात रान पेटवले असतानाच भाजप सरकारच्या लोकसभेच्या सदस्य संख्येत घट झाल्याने कॉग्रेसने भाजपवर अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी केली आहे. आज सकाळी ११ वाजता संसदेचे अधिवेधन सुरू झाले. लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी सुरुवातीला शोक प्रस्ताव मांडले. त्यानंतर प्रश्न उत्तराचा तास सुरू झाला. कॉग्रेसने त्या तासाच्या दरम्यान आम्हाला न्याय पाहिजे अशा … Read more

दूध आंदोलन ठरले फोल, पुण्यात चितळेचे शंभर टक्के वितरण

thumbnail 1531893472079

पुणे | पुण्यात चितळे दुधाला विशेष मागणी आहे. चितळेचे ४ लाख लिटर दुध पुण्यामध्ये रोज वितरित होते. आत्ताच आलेल्या माहिती नुसार चितळे दुधाचे आजच्या दिवशी १००% वितरण झाले आहे. आंदोलकांची नजर चुकवून दूध पुण्याला पोच करण्यात चितळे दूध संघाला यश आले आहे. चितळे दुधाचे संकलन आणि प्रक्रिया सांगली जिल्ह्यातील पलूस या ठिकाणी होते. तेथून पुणे … Read more

तुकोबांची पालखी सराटीहुन तर माऊलींची पालखी नातेपुत्याहून मार्गस्थ

thumbnail 1531893564912

अकलूज | संत तुकाराम महाराजांच्या पावलांना सराटी येथे नीरा स्नान घालण्यात आले आहे. नीरा स्नानानंतर पालखीने सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. अकलूजमध्ये सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रारंगणात गोल रिंगण पार पडणार आहे. ज्ञानेश्वर माऊलींची पालखी नातेपुते मुक्कामाहून मार्गस्थ झाली असून माऊलींच्या पालखीचे पहिले गोल रिंगण सदाशिवनगर या ठिकाणी दुपारी पार पडणार आहे. रिंगण सोहळा पार पडल्यानंतर माऊलींची … Read more

सांगलीत झाली पोलिसाचीच हत्या

thumbnail 1531889598241

सांगली | पोलीस हवालदार समाधान मानटे यांचा अज्ञान इसमानी धारदार चाकूने भोकसून खून केला आहे. मानटे सांगलीत आपल्या मित्रांच्या सोबत हॉटेल रत्ना डिलक्स येथे जेवायला गेले असताना हा सगळा प्रकार घडला आहे. हल्लेखोरा सोबत दोन साथीदार होते त्यांनी चेहरे झाकल्याने त्यांची ओळख पटू शकली नाही. तसेच हा खुनाचा थरार सीसीटिव्ही कामेऱ्यात कैद झाला आहे. पोलीस … Read more

राजू शेट्टींनी गुजरात मुंबई सीमेवर दिला ठिय्या

thumbnail 1531886860314

मुंबई | आज दूध आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. सलग तिसर्या दिवशीही आंदोलनात कमालीची सक्रियता बघायला मिळत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी स्वत: महाराष्ट्र गुजरात सीमेवर गुजरात मधील दूध अडवण्यासाठी ठिय्या देऊन बसले आहेत. गुजरातवरुन मुंबईकडे येणार्या दुधाच्या गाड्या माघारी पाठवण्यात आंदोलकांना यश आले आहे. गुजरातचे पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी दुध आंदोलनाला … Read more

रत्नाकर गुट्टे महाराष्ट्राचे निरव मोदी – धनंजय मुंडे

thumbnail 1531841396794

नागपूर | मराठवाड्यात लक्ष्मीपुत्र म्हणून प्रसिद्ध असणारे रत्नाकर गुट्टे हे महाराष्ट्राचे निरव मोदी असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत केला आहे. रत्नाकर गुट्टे यांनी मराठवाड्यात २२कंपन्या नोंदवल्या आहेत आणि या कंपन्यांच्या नावे ५,४६२ कोटी रुपयांचे कर्ज उपसले आहे. रत्नाकर गुट्टे यांच्या जवळ असलेल्या कंपन्यांची एकूण किंमत ४८४ कोटी रुपये होत असताना … Read more

जिओ आणि पतंजलीचे दूध येण्याची वाट बघू नका, दूध आंदोलनावर निर्णय घ्या – धनंजय मुंडे.

e0a4a7e0a4a8e0a482e0a49ce0a4af e0a4aee0a581e0a482e0a4a1e0a587 dhananjay munde

नागपूर | आज विधान परिषदेत दूध दरवाढीच्या आंदोलनावर चर्चा झाली. यावेळी बोलत असताना, ‘जिओ आणि पतंजलीच्या दुधाची वाट बघत बसू नका, दूध दर वाढीवर तोडगा काढा’ असे म्हणुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडें यांनी सरकारला चिमटा काढला आहे. विधान परिषदेत दूध आंदोलनाचा विषय सुरू असताना धनंजय मुंडे यांनी सभागृहात उपस्थित दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांना … Read more