Monday, December 22, 2025
Home Blog Page 661

डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं आश्वासन! अमेरिकेत शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना होणार फायदा

Donald Trump

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेतून पदवीधर झालेल्या परदेशी विद्यार्थ्यांना अमेरिकेत राहण्यासाठी आणि काम करण्यासाठी ग्रीन कार्ड मिळावे, अशी इच्छा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी केली आहे. ट्रम्प यांच्या या आश्वासनामुळे अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. कारण एका अहवालानुसार, 2022-23 शैक्षणिक वर्षात अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी निवड करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या मागील वर्षाच्या तुलनेत 35% ने वाढली आहे.

जगातील बुद्धिमान लोकांना थांबवण्याची गरज अमेरिकेला आहे. ज्यांना इथे राहायचे आहे आणि ज्या लोकांकडे देशाला फायदा होईल अशा योजना आहेत त्यांनी इथेच राहावे असं ट्रम्प याना वाटत. जर तुम्ही (परदेशी विद्यार्थी) महाविद्यालयातून पदवीधर असाल, तर तुम्हाला या देशात राहण्यासाठी आपोआप ग्रीन कार्ड मिळायला हवे. यामध्ये कनिष्ठ महाविद्यालयांचाही समावेश आहे. मला अनेक कथा माहित आहेत जिथे लोक आमच्या देशातील उच्च महाविद्यालयांमधून पदवीधर झाले आणि त्यांना आमच्या देशात राहायचे होते आणि त्यांच्याकडे एक चांगली व्यवसाय कल्पना होती, परंतु ते येथे राहू शकले नाहीत. जर कोणी इथून शिकत असेल, परंतु तो येथे राहण्यास सक्षम नसल्यामुळे तो कोणत्याही कंपनीशी व्यवहार करू शकत नाही, तर जेव्हा मी राष्ट्राध्यक्ष होईल तेव्हा यात बदल करण्यात येईल असं आश्वासन ट्रम्प यांनी दिले.

ट्रम्प यांची बदललेली भूमिका अमेरिकेतील महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल एज्युकेशन (IIE) च्या डेटावरून असे दिसून आले आहे की 200,000 हून अधिक भारतीय विद्यार्थ्यांनी विविध यूएस संस्थांमध्ये ऍडमिशन घेतलं असून हा एक नवा विक्रम आहे. ही लक्षणीय वाढ परदेशात, विशेषतः युनायटेड स्टेट्समध्ये शैक्षणिक संधी शोधण्याच्या भारतीय विद्यार्थ्यांचा वाढता कल अधोरेखित करते. या अहवालात शिक्षणाची उच्च गुणवत्ता, व्यापक संशोधन सुविधा आणि अमेरिकन विद्यापीठांची जागतिक प्रतिष्ठा यासह या वाढीला हातभार लावणाऱ्या अनेक घटकांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. याशिवाय, आंतरराष्ट्रीय प्रदर्शन मिळवण्याच्या आणि करिअरच्या संधी वाढवण्याच्या संधीमुळे यूएस भारतीय विद्यार्थ्यांसाठी एक पसंतीचे ठिकाण बनले आहे.

International Yoga Day 2024 | हृदयाच्या आरोग्यांसाठी करा ‘ही’ 5 योगासने; हे आजारही होतील दूर

International Yoga Day 2024

International Yoga Day 2024 | दरवर्षी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. आज संपूर्ण भारतात आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा केला जात आहे. शतकानुशतकापासून भारतात योगासनाला खूप जास्त महत्त्व आहे. योगामुळे आपल्या आरोग्याला खूप जास्त फायदे होतात. त्यामुळे योगासनाचे आपले आयुष्यातील महत्त्व समजून सांगण्यासाठी हा दिवस संपूर्ण भारतात साजरा केला जातो. योगासनामुळे आपल्या शरीराला त्याचप्रमाणे मनशांती देखील मिळते. त्याचप्रमाणे तुमचे हृदय निरोगी ठेवण्यापासून योगाची मदत होते. आता आपण काही योगासनांबद्दल (International Yoga Day 2024) जाणून घेणार आहोत. ज्यामुळे आपल्या हृदयाला खूप जास्त फायदे होतात.

उस्ट्रासन | International Yoga Day 2024

उस्ट्रासनामुळे रक्ताभिसरण सुधारते. या कारणास्तव ते हृदयासाठी खूप फायदेशीर मानले जाते. मात्र, तुम्हाला आधीच हृदयविकार असल्यास हे आसन करू नका. हे आसन करण्यासाठी गुडघ्यावर उभे राहा आणि हातांनी कमरेला आधार देत मागे वळा. काही सेकंद या आसनात राहा आणि नंतर आराम करा.

त्रिकोनासन

या आसनाच्या मदतीने हृदय निरोगी राहण्यास मदत होते. त्यामुळे हे आसन करण्यासाठी दोन पायांमध्ये थोडे अंतर ठेवून उभे रहा. आपला उजवा पाय बाहेर वळवून आणि हळू हळू त्याकडे झुकून प्रारंभ करा. आता तुमच्या उजव्या हाताने तुमच्या उजव्या पायाच्या गुडघ्याला स्पर्श करा आणि डावा हात सरळ वरच्या दिशेने ठेवा. काही सेकंद या आसनात राहा आणि नंतर आराम करा.

भुजंगासन

भुजंगासनामुळे रक्तप्रवाह देखील सुधारतो, जो हृदयासाठी खूप फायदेशीर आहे. हे आसन करण्यासाठी पोटावर जमिनीवर झोपा आणि हातांच्या साहाय्याने शरीराचा पुढचा भाग उचलून मागे वाकवा. काही सेकंद या आसनात राहिल्यानंतर आराम करा.

ताडासन

ताडासन केल्याने तुमचे संपूर्ण शरीर ताणले जाते. याशिवाय शरीरातील रक्तप्रवाहही सुधारतो आणि तणावही कमी होतो. हे आसन करण्यासाठी पायांवर सरळ उभे राहून दोन्ही हात वर करून स्वत:ला वर खेचा. यासाठी तुमची बोटे एकत्र जोडून स्वतःला वरच्या बाजूस स्ट्रेच करा.

विरभद्रासन | International Yoga Day 2024

या आसनाच्या मदतीने रक्ताभिसरण सुधारते आणि तणावही कमी होतो. त्यामुळे हे आसन केल्याने हृदय निरोगी राहण्यास मदत होते. हे आसन करण्यासाठी उजवा पाय पुढे वाढवा आणि गुडघा वाकवून पुढे वाकून दोन्ही हात जोडून घ्या. काही वेळ या स्थितीत राहा आणि नंतर आराम करा.

पंकजा मुंडेंची राज्यसभेवर वर्णी? भाजप मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?

pankaja munde rajya sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) याना बीड लोकसभा मतदारसंघातून अनपेक्षित पराभवाला सामोरं जावं लागल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनावणे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव करत ते बीडच्या राजकारणातील जायंट किलर ठरले होते. पंकजा यांच्या पराभवनंतर बीडमधील त्यांच्या २-३ कार्यकर्त्यांनी थेट टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या सुद्धा केल्या. या एकूण सर्व घडामोडींनी बीडचे राजकारण ढवळून निघालं आहे. त्याच दरम्यान, आता पंकजा मुंडे याना भाजप राज्यसभेवर (Rajya Sabha) पाठवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा देखील केली असल्याचे बोललं जातंय.

पीयूष गोयल आणि उदयनराजे भोसले हे दोन्ही राज्यसभा खासदार लोकसभेवर निवडून गेल्याने त्यांच्या राज्यसभेतील जागा रिक्त झाल्या आहेत. यापैकी एका जागेवर पंकजा मुंडे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. असं झाल्यास पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना मोठा दिलासा मिळू शकतो. त्यातच महत्वाची बाब म्हणजे सध्या राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद सुरु आहे. पंकजा मुंडे या ओबीसी समाजाच्या मोठ्या नेत्या मानल्या जातात. त्यामुळे त्यांना राज्यसभेवर घेण्यात यावं अशी मागणी भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांकडून केली जात आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीत अशी मागणी केंद्रीय नेतृत्वाला बोलूनही दाखवण्यात आली असल्याची सूत्रांची माहिती आहे.

दरम्यान, धनंजय मुंडे, प्रीतम मुंडे यांची साथ… गोपीनाथ मुंडे याना मानणारा भलामोठा वर्ग आणि स्वतःचा स्वतंत्र असा फॅनबेस असतानाही पंकजा मुंडे यांचा बीड लोकसभेत धक्कादायक पराभव झाला. मराठा आंदोलनाचा फटका पंकजा मुंडे याना बसल्याचे बोललं जात आहे. मराठा मतदार हा भाजपपासून लांब गेलाय, मात्र ओबीसी मतदाराने भाजपला साथ दिली आहे. पंकजा मुंडे या ओबीसी समाजाच्या नेत्या आहेत. त्यामुळे त्यांचे राजकीय पुनर्वसन करून पक्षाला जास्तीत जास्त फायदा करून घेण्याचा भाजपचा प्लॅन असू शकतो.

Weather Update | विकेंडला ‘या’ विभागाला पावसाचा ऑरेंज अलर्ट; ट्रिपचे प्लॅन करताना घ्या काळजी

Weather Update

Weather Update | महाराष्ट्रात मान्सूनला सुरुवात झाल्यानंतर काही काळ खंड पडला होता. परंतु आता पुन्हा एकदा राज्यामध्ये मान्सून सक्रिय झालेला आहे. राज्यासह देशातील अनेक भागांमध्ये देखील मान्सूनला मोठ्या प्रमाणात सुरुवात झालेली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार आता नैऋत्य मोसमी वाऱ्यांसाठी पोषक असे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यामुळे पुढील 48 तासात जोरदार पावसाचा (Weather Update) इशारा देण्यात आलेला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आता येत्या 24 तासांमध्ये विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे. तसेच विदर्भतील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक पावसासह (Weather Update) वादळीवारा पाहायला मिळणार आहे. यावेळी ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहणार असल्याची माहिती देखील दिलेली आहे.

विदर्भसह कोकणाला देखील मुसळधार पावसाचा (Weather Update) मारा बसणार आहे. कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आणि या ठिकाणाला येलो अलर्ट देखील दिलेला आहे. तसेच मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये देखील पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे या वीकेंडला जर तुम्ही कोकणात जाण्याचा प्लान करत असाल, तर काहीही काळजी घेऊनच प्लॅन करा. कारण या वीकेंडला जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आता येत्या 24 तासामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई शहर,पुणे ठाणे, सातारा या ठिकाणी पावसाचा येल्लो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे यवतमाळमध्ये देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. अमरावती, गडचिरोली, यवतमाळ या ठिकाणी देखील चांगलाच पाऊस पडणार असल्याचा सांगितले आहे. पाऊस सुरू झाला की अनेक लोक ट्रेकिंगला जातात. परंतु प्रशासनाने या लोकांना काळजी घेऊन ट्रेकिंग करण्यास किंवा फिरण्यास सांगितलेले आहे. कारण कोणत्याही कृतीमुळे जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे काळजी घेण्याचे आव्हान प्रशासनाकडून देण्यात आलेले आहे.

मी स्वतः बच्चू कडूला संपवणार; पहा कोणी दिली धमकी?

Bacchu Kadu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू (Bachhu Kadu) यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती समोर येत आहे. यानंतर बच्चू कडू यांनी जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांना लिहिलं असून या संपूर्ण प्रकरणाची. सखोल चौकशी करावी आणि संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. मात्र या एकूण सर्व प्रकारामुळे अमरावतीत खळबळ उडाली आहे. तसेच बच्चू कडू यांच्या मागावर नेमकं आहे तरी कोण? असा प्रश्न निर्माण झालाय.

माझा अपघात झाला अशा प्रकारचे नागरिकांचे फोन येत आहेत. अपघात झाल्याची कोणीतरी अफवा पसरवत आहे, असं बच्चू कडू यांनी सदर पत्रात म्हटलं आहे. भाऊ तुमचा अपघात झाला आहे का? तुमची तब्येत कशी आहे? असे काही प्रश्न या फोनवरुन बच्चू कडू यांना विचारले जातात. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबधीतावर गुन्हा दाखल करून त्यांना जेरबंद करण्याची मागणी बच्चू कडू यांनी पत्रातून केली आहे. सध्या बच्चू कडू याना पोलिसांनी वाय प्लस सुरक्षा दिली आहे.

बच्चू कोड यांच्या पत्रातील ठळक मुद्दे

शिंदे साहेबांचा कट्टर कार्यकर्ता आहे. मी गडचिरोली येथे राहत असून माझे नक्षलवाद्यांशी नजीकचे संबंध आहेत. बच्चू कडूला पाहून घेऊ. जसे बाळासाहेब ठाकरे यांनी दिघेंना संपवले, तसं शिंदे साहेब बच्चू कडूला संपवणार नाहीत, तर मी स्वतः बच्चू कडूला संपवणार. बच्चू कडू म्हणजे काहीच नाही, बच्चू कडूला पाहून घेऊ. आज मोका देख के बच्चू कडू को चौका मारेंगे अशा प्रकारच्या धमक्या येत असल्याचं बच्चू कडू यांनी पत्रात म्हंटल आहे. त्यामुळे अमरावतीत खळबळ उडाली आहे.

योगा करा… निरोगी रहा!! मोदींचा देशवासियांना कानमंत्र

yoga day modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज जागतिक योगा दिनानिमित्त (International Yoga Day) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी जम्मू-काश्मीरमध्ये श्रीनगर येथे योगा केला. यावेळी उपस्थितांना संभोधित करताना मोदी म्हणाले, जम्मू-काश्मीर योग साधनेची भूमी आहे. योगाचा हा अविरत प्रवास सुरु आहे. सौदी अरेबियात योगाचा एज्युकेशन सिस्टिममध्ये समावेश करण्यात आलाय असे सांगायलाही मोदी विसरले नाहीत.

मोदी म्हणाले, योगा करा आणि निरोगी रहा…. आपण 10 वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करत असताना, मी प्रत्येकाने विनंती करतो कि त्यांनी योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवावा. योग शक्ती, चांगले आरोग्य आणि निरोगीपणा वाढवतो. योगा समाजात सकारात्मक बदलाचे नवीन मार्ग तयार करत आहे. जगात योग करणाऱ्यांची संख्या वाढतेय. जगातील अनेक देशात योग दिनचर्येचा भाग बनतोय असं मोदींनी म्हंटल.

योग फक्तच विद्या नाही, विज्ञान आहे. एकाग्रता मानवी मनाची मोठी ताकद आहे. योगाच्या माध्यमातून ही एकाग्रता साध्य करणं शक्य होतय”असं पीएम मोदी म्हणाले. योगा संदर्भातील धारणा बदलल्या आहेत. नवीन योग इकोनॉमी पुढे जात आहे. ऋषिकेश, काशी ते केरळमध्ये योग पर्यटन दिसून येतेय. अस्सल योगा शिकण्यासाठी लोक जगभरातून इथे येत आहेत. लोक फिटनेससाठी पर्सनल योग ट्रेनर ठेवत आहेत. योगामुळे नवीन रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.

International Yoga Day 2024 | योगासने करताना घ्या ‘ही’ काळजी; अन्यथा होईल मोठी दुखापत

International Yoga Day 2024

International Yoga Day 2024 | दरवर्षी आज म्हणजेच 21 जून रोजी सर्वत्र आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा केला जातो. फार प्राचीन काळापासून योगाचे आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्व आहे. यामुळे आपल्या शरीराला अनेक फायदे देखील होतात. याच योगासनाचे (International Yoga Day 2024) महत्त्व पटवून देण्यासाठी सर्वत्र आज योगा दिन साजरा केला जातो. योगा केल्याने केवळ आपल्याशी आरोग्यालाच नाही, तर आपल्या मानसिक आरोग्याला देखील खूप फायदा होतो. यामुळे आपले मन शांत होते आणि ताण तणावापासून आपण मुक्त होतो. त्यामुळे दिवसभर कितीही धावपळ असली, तरी 20 ते 25 मिनिट योगा करणे, तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. परंतु तुम्ही जेव्हा योगा करता तेव्हा काही गोष्टींची काळजी देखील घेतली पाहिजे अन्यथा तुम्हाला मोठ्या प्रमाणात दुखापत होऊ शकते, तर आज आपण योगासन करताना कशाप्रकारे दुखापत होतील. आणि त्या त्या कशा टाळता येईल हे आपण जाणून घेऊया.

जास्त टाईप कपडे घालू नका | International Yoga Day 2024

योगासने करताना जास्त फिटिंगचे टाईप कपडे घालू नका. अगदी लूज असे कपडे घाला. शक्यतो सुती कपडे घालायला हवे. अन्यथा आपल्याला जास्त घाम येतो आणि आपले लक्ष देखील विचलित होते. त्यामुळे आपल्या योगाचा फायदा देखील होणार नाही.

जेवण करून योगा करू नये

ज्यावेळी तुम्हाला योगासने करायचे असतात. त्या आधी दोन ते तीन तास काही खाऊ नका. जेवण करून योगासन करणे चुकीचे आहे. त्यामुळे आपल्या आपला त्रास होऊ शकतो. आणि पचनक्रिया सुरू असताना शरीराला ऊर्जेची गरज असते. त्यामुळे आपण जेवल्यानंतर लगेच योगा करू नये.

मोबाईलचा वापर

ज्यावेळी आपण योगा करतो, त्यावेळी आपले संपूर्ण लक्ष हे आपल्या श्वासाकडे आणि योगासनाकडे असले पाहिजे. इतरत्र लक्ष विचलित होऊ होईल, अशा वस्तू तिथे ठेवू नका. अशावेळी शक्यतो मोबाईलपासून दूर राहा. मोबाईलमुळे आपले लक्ष विचलित होते.

योगा करताना बोलू नये

योगा करताना जर तुम्ही बोलत असाल, तर तुमचे लक्ष योगासनावर लागणार नाही. त्यामुळे योगासन करताना अत्यंत शांततेने आणि एकाग्रतेने योगासने करावी. तर त्याचा फायदा आपल्या शरीराला होईल. नाहीतर तुमच्या सगळे प्रयत्न वाया जातील.

घाई करू नये | International Yoga Day 2024

योगासने करताना अत्यंत शांतीत आणि लक्षपूर्वक करावे. योगासन करताना घाई करू नये. कोणतेही आसन करताना घाई करून यांनी तुम्हाला मोठी दुखापत होऊ शकते. योगासने करताना शरीराचा कोणताही भाग दुखत असेल किंवा वेदना होत असेल, तर त्यासाठी योग गुरू किंवा डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी.

Pat Cummins Hat Trick : T20 वर्ल्डकपमध्ये पॅट कमिन्सची Hat-Trick; पहा Video

Pat Cummins Hat Trick

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बांगलादेश विरुद्व सुपर ८ मधील पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज पॅट कमिन्सने हॅट्रिक (Pat Cummins Hat Trick) घेतली आहे. पॅट कमिन्सने डावाच्या १८ व्या षटकात २ बळी आणि २० व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूंवर १ बळी घेत हॅट्रिक साजरी केली. टी-20 विश्वचषक 2024 मध्ये पहिली हॅट्ट्रिक घेण्याचा भीमपराक्रम कमिन्सने करून दाखवला. तसेच T20 विश्वचषकाच्या इतिहासात हॅट्ट्रिक विकेट घेणारा कमिन्स हा दुसरा ऑस्ट्रेलियन गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी ब्रेट लीने 2007 मध्ये हॅट्रिक घेण्याची कामगिरी करून दाखवली होती.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीपासूनच कांगारूंनी बांगलादेशवर अंकुश ठेवला होता, टिच्चून गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाने बांगलादेशला अवघ्या १४० धावांत रोखले. ऑस्ट्रेलिया कडून पॅट कमिन्सने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. त्याने डावाच्या १८ व्या षटकाच्या पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर महमदुल्ला आणि मेहंदी हसन याना बाद केलं. त्यानंतर २० व्या षटकात कमिन्स पुन्हा गोलंदाजीला आला आणि त्याने पहिल्याच चेंडूवर रिदोयला माघारी धाडलं आणि विश्वचषकातील आपली पहिली हॅट्रिक (Pat Cummins Hat Trick) साजरी केली.

T20 विश्वचषकात हॅट्ट्रिक घेणार गोलंदाज– Pat Cummins Hat Trick

ब्रेट ली (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध बांगलादेश, केप टाउन, 2007
कर्टिस कॅम्फर (आयर्लंड ) विरुद्ध नेदरलँड्स, अबू धाबी, 2021
वानिंदू हसरंगा (श्रीलंका) विरुद्ध दक्षिण आफ्रिका, शारजाह, 2021
कागिसो रबाडा (दक्षिण आफ्रिका) विरुद्ध इंग्लंड, शारजाह, २०२१
कार्तिक मयप्पन (UAE) विरुद्ध श्रीलंका, गिलॉन्ग, 2022
जोशुआ लिटल (आयर) विरुद्ध न्यूझीलंड, ॲडलेड, 2022
पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध बांगलादेश, अँटिग्वा, 2024

Viral Video : अरे यांना आवरा कुणीतरी ! पती पत्नीच्याच्या भांडणाचा व्हिडीओ झाला व्हायरल

viral video husband wife

Viral Video : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे काही सांगता येत नाही. सोशल मीडियावर व्हायरल होणारे हे व्हिडीओ कधी हास्यास्पद असतात, कधी प्रेरणादायी तर कधी मनाला हळवे करणारे असतात. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओजच्या गराड्यात युजर्सची मात्र फुल्ल ऑन एन्टरटेनमेन्ट होते यात शंका नाही. बऱ्याचदा सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ हे पती पत्नीमधील असतात. अशा व्हिडीओज ना देखील नेटकऱ्यांची मोठी पसंती मिळत असते. आता सोशल मीडियावर पती पत्नीच्या भांडणाचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. अगदी हातात विट घेऊन हे पती पत्नी हाणामारी करीत आहेत. नक्की काय आहे हा व्हिडीओ पाहूया…

काय आहे व्हिडीओ ? (Viral Video)

या व्हिडिओमध्ये एक जोडपे त्यांच्या घराबाहेर एकमेकांसोबत भांडताना दिसत आहे. त्यावेळी अचानक पती त्याच्या पत्नीच्या डोक्यात मारण्यासाठी हातात वीट घेतो; पण नंतर हातातील वीट खाली फेकून पत्नीची बॅग घेऊन तिला घराबाहेर हाकलण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी त्याची पत्नी फेकलेली वीट स्वतःच्या हातात घेते आणि त्याच्या डोक्यात मारण्यासाठी जाते. पत्नी डोक्यात वीट मारणार हे दिसताच पती खूप घाबरतो. इतक्यात ती वीट चुकून तिच्या हातातून खाली पडते. त्यावेळी पती तिला पकडतो आणि बेदम चोप देतो. यावेळी त्यांची मुलगी (Viral Video) हा सर्व प्रकार घरातून पाहत, ती मोठमोठ्याने हसताना दिसत आहे. हा सर्व विचित्र प्रकार पाहता, हे सर्व नाटक व्हिडीओ बनविण्यासाठी केल्याचे दिसत आहे.

हा व्हिडीओ @riya_rajpoot16 या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडिओला अनेक लाईक्स आणि कमेंट्सही मिळाल्या आहेत. एका युजरने कमेंट करताना लिहले आहे की, “गेम चेंजर.” दुसऱ्या एका व्यक्तीने लिहले आहे , “ही बॅग कोणाची आहे?” तर दुसऱ्या एका व्यक्ती आपली हकीकत सांगत “मी आणि माझी बायकोपण असंच भांडतो.” असे म्हंटले आहे. तर व्हिडीओ (Viral Video) मध्ये दिसणारी मुलगी हे भांडण एन्जॉय करीत असल्याचे दिसत आहे.

Travel : अनुभवा निसर्गाचं देखणं रूप ! पावसाळ्यात भेट द्या ‘या’ टॉप 5 धबधब्यांना

Top 5 Waterfalls In Maharashtra

Travel : चिंब भिजलेले…! रूप सजलेले …! असंच काहीसं निसर्गाचं बदलेलं रुपडं आपल्याला पावसाळ्यात पाहायला मिळते. पावसाळ्यात धरती हिरवी शाल पांघरते आणि डोंगरांमधून दुधाळ धबधब्यांचे प्रवाह वाहायला सुरवात होते. निसर्गाचे हे सुंदर रूप नेहमीच आठवणीत ठेवण्यासारखे असते. म्हणूनच अनेक निसर्गप्रेमी पावसाळ्यात आवर्जून धबधबे असणाऱ्या ठिकाणांना भेटी (Travel) देत असतात. आजच्या लेखात आम्ही तुम्हाला अशा काही ठिकाणांविषयी सांगत आहोत जिथे अप्रतिम धबधब्यांचे (Waterfall) सौन्दर्य तुम्हाला अनुभवायला मिळेल. चला तर मग जाणून घेऊया…

ठोसेघर धबधबा (Travel)

ठोसेघर धबधबा म्हणजे डोंगरांच्या कुशीतून कोसळणाऱ्या पाण्याच्या धारा तुमचे मन मोहून टाकतील यात शंका नाही. सातारा शहरापासून 25 किलोमीटर अंतरावर हा ठोसेघर धबधबा आहे. हा धबधबा तारळी नदीवर आहे. हा महाराष्ट्रातला सर्वात उंच धबधबा आहे. तर, उंच धबधब्यांच्या यादीत भारतात याचा दुसरा क्रमांक लागतो. यंदाच्या पावसाळ्यात तुम्हला येथे जायचे असेल तर रेल्वेने महाराष्ट्रातल्या (Travel) सातारा स्टेशनवर उतरून, बसने ठोसेघर गावी पोहचा.

कुंडमळा धबधबा (Travel)

पुण्यापासून 30 किमी अंतरावर असलेलं कुंडमळा हे ठिकाण आसपासच्या लोकांमध्ये फारच प्रसिद्ध आहे. इथली शांतता आणि सौंदर्य पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र आहे. इंद्रायणी नदीवर छोटा बांध घालण्यात आला असून तिथे लहानसा धबधबा तयार झाला आहे. पुण्यापासून जवळच तुम्हाला धबधब्याला भेट द्यायची असेल तर हा चांगला पर्याय आहे.

रंधा धबधबा

भंडारद-यापासून उत्तरेला 10 कि.मी.अंतरावर प्रवरा नदी 50 मीटर खोल दरीत झेपावते. त्या ठिकाणाला रंधा धबधबा म्हणतात. 20कि.मी.च्या प्रवासानंतर अचानक 5० मीटर खोल दरीत प्रवरा झेपावते. तसे पहायला गेल्यास हा धबधबा (Travel) रौद्र आहे.

मढे घाट लक्ष्मी धबधबा

राजगड, रायगड, भाटघर धरण आणि तोरणा किल्ल्याच्या मागील बाजूला मढे घाट धबधबा आहे. हा लक्ष्मी धबधबा म्हणूनही ओळखला जातो. हा धबधबा समुद्रसपाटीपासून (Travel) सुमारे 850 मीटर उंच आहे आणि तोरणा किल्ल्यामागे घनदाट जंगलात आहे.

झेनीथ वॉटरफॉल

मान्सून मध्ये तुम्ही जर मुंबईच्या जवळच्या धबधब्यांना भेट (Travel) देऊ इच्छित असाल तर हा धबधबा उत्तम आहे. हा धबधबा खोपोली जवळ आहे. तुम्ही इथे ट्रेनने जाऊ शकता. येथे जाण्यासाठी तुम्हाला पायी छोट्या छोट्या ओढ्या ओहोळांमधून जावे लागेल. केवळ पावसाळ्यात हा धबधबा प्रवाहित होतो. येथे जाण्यासाठी तुम्हाला छोटा ट्रेक करावा लागेल.