Police Bharti 2024| सध्या महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यात दुसऱ्या बाजूला राज्यात पोलीस भरतीची प्रक्रिया ही सुरू आहे. परंतु आता या पावसाने पोलीस भरतीच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण केले आहे. मुसळधार पावसामुळे अनेक मैदानांवर चिखल साचला असल्यामुळे मैदानी चाचणीत अडचणी येत आहेत. त्यामुळेच आता जिथे पाऊस आहे तेथे भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. यात नांदेड आणि अमरावतीचा समावेश आहे.
याठिकाणी पोलीस भरती रद्द (Police Bharti 2024)
राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका यंदाच्या पोलीस भरतीला बसत असताना दिसून येत आहे. याच पावसामुळे पोलीस भरती प्रक्रियेत अडथळे निर्माण होऊ नये म्हणून राज्यातील नांदेड आणि अमरावती ग्रामीण पोलीस भरती रद्द करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे, राज्यात जिथे पाऊस असेल तिथे पोलीस भरती पुढे ढकलली आहे, अशी माहिती नुकतीच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आली आहे.
आज माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘राज्यात ज्या ज्या ठिकाणी पाऊस आहे. तिथे चाचणी पुढे ढकलण्यात आली आहे. (Police Bharti 2024) पाऊस पुढे वाढणार आहे, त्यानंतर आचारसंहिता लागेल. त्यामुळे चाचणी पुढे गेली आहे.” दरम्यान, मुसळधार पावसाच्या कारणामुळे पोलीस भरतीची प्रक्रिया पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी तरुणांकडून करण्यात आली होती. आता हीच मागणी मान्य झाल्यामुळे तरुणांना दिलासा मिळाला आहे.
Central Bank Of India Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या नवनवीन संधी घेऊन येत असतो. ज्याचा तुम्हाला नेहमीच फायदा होत असतो. आज देखील आम्ही अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. आज आम्ही एका बँकेच्या भरतीची माहिती घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे.bया भरती अंतर्गत सफाई कर्मचारी या पदाच्या रिक्त जागा आहेत. आणि त्या जागा भरण्यासाठी इच्छुक आणिपात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. या भरतीच्या एकूण 484 रिक्त जागा आहेत. ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्याचप्रमाणे 27 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदर अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.
महत्त्वाची माहिती | Central Bank Of India Bharti 2024
पदाचे नाव- सफाई कर्मचारी
पदसंख्या – 484 जागा
वयोमर्यादा – 18 ते 26 वर्ष
अर्ज पद्धती – ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जून 2024
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शिक्षण संस्थेतून कमीत कमी दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे.
अर्ज कसा करावा ?
या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि क्रिकेटपटू मोहम्मद शमी (Mohammed Shami) लवलरच लग्न करणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर पसरत आहेत. सानियाने काही दिवसापूर्वी शोएब मलिक सोबत तलाक घेतला आहे तर दुसरीकडे मोहम्मद शमी सुद्धा त्याच्या पत्नीपासून वेगळा आहे. त्यामुळे हे दोन्ही खेळाडू लग्न करणार असल्याच्या बातम्यांनी वातावरण चांगलंच तापवलं. मात्र आता खुद्द सानिया मिर्झाच्या वडिलांनी या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत. सानिया मोहम्मद शमीसोबत लग्न करणार असल्याच्या बातमीत कोणतेही तथ्य नाही असं सानियाचे वडील इम्रान मिर्झा यांनी स्पष्ट केलं आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना इम्रान मिर्झा म्हणाले, ज्या काही बातम्या सुरू आहेत त्या पूर्णपणे मूर्खपणाच्या आहेत. ती त्याला साधी भेटलेलीही नाही असं म्हणत सोशल मीडियावर सुरु असलेल्या सर्व चर्चा सानियाच्या वडिलांनी फेटाळून लावल्या आहेत. सानिया मिर्झाने अलीकडेच हजच्या पवित्र प्रवासाला सुरुवात केली आहे. पती शोएब मलिकपासून विभक्त झाल्याची घोषणा केल्यानंतर सुमारे 5 महिन्यांनी सानिया मिर्झा हजला गेली आहे. याबाबत सानियाने तिच्या X हँडलवर पोस्ट शेअर केली आहे. दीर्घ प्रतिक्षेनंतर तिला या पवित्र प्रवासाला जाण्याची संधी मिळाली आहे. ती लवकरच सौदी अरेबियातील मक्का या पवित्र शहरात येणार आहे असं तिने म्हंटल आहे.
सानिया म्हणते, ‘माझ्या प्रिय मित्रांनो, मी एका नवीन अनुभवाची तयारी करत आहे. माझ्या सर्व चुकांसाठी मी तुम्हा सर्वांची माफी मागतो, माझे हृदय यावेळी खूप भावूक आणि कृतज्ञतेने भरलेले आहे. मला आशा आहे की अल्लाह माझ्या प्रार्थना स्वीकारेल आणि मला मार्गदर्शन करेल, मी जीवनाच्या एका खास प्रवासाला सुरुवात करत आहे. मला आशा आहे की मी चांगल्या मनाने आणि दृढ विश्वासाने एक चांगली व्यक्ती म्हणून परत येईन.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मद्य घोटाळाप्रकरणी अडचणीत सापडलेल्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना दिल्ली उच्च न्यायालयाने (High Court) मोठा धक्का दिला आहे. न्यायालयाने सुनावणी दरम्यान केजरीवाल यांचा जामीन मंजूर करण्यास स्थगिती दिली आहे. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होईपर्यंत जामिनावर स्थगितीच राहील असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. गुरुवारी राऊस एव्हेन्यू कोर्टाने केजरीवाल यांचा नियमित जामीन मंजूर केला होता. परंतु ईडीने या जामीनाला विरोध दर्शवत उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर न्यायालयाने ईडीच्या बाजूने निकाल दिला.
मद्य घोटाळाप्रकरणी ईडीने 21 मार्चला अरविंद केजरीवाल यांना अटक केली होती. या अटकेनंतर केजरीवाल यांना राऊस एव्हेन्यू कोर्टाने 15 एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्यांच्या कोठडीत सतत वाढ करण्यात आली. मधल्या काळात अरविंद केजरीवाल यांचा अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता. परंतु पुन्हा त्यांना 2 जून रोजी आत्मसमर्पण जावे लागले. यानंतर 21 जून रोजी राऊस एव्हेन्यू कोर्टाने त्यांचा जामीन मंजूर केला. यामुळे केजरीवाल यांना मोठा दिलासा मिळाला होता.
मात्र हा जामीन मंजूर होताच ईडीने त्याला विरोध दर्शवत उच्च न्यायालयात धाव घेतली. पुढे आज झालेल्या सुनावणीत ताबडतोब उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांच्या जामीनाला स्थगिती दिली. त्याचबरोबर, या प्रकरणाची सुनावणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत जामीनाला स्थगिती राहील असे देखील सांगितले. उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळेच आता केजरीवाल यांच्या अडचणीत आणखीन वाढ झाली आहे. त्यामुळे केजरीवाल यांचे वकील काय भूमिका घेतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 | नोकरीच्या शोधातअसणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांसाठी आम्ही नवनवीन नोकरीच्या संधी घेऊन येत असतो. अशातच आज आम्ही शिक्षक या पदाची भरती प्रक्रियेची माहिती तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत (Rayat Shikshan Sanstha Bharti 2024) एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत शिक्षक या पदाच्या 184 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत . पात्र उमेदवारांसाठी एक मुलाखत आयोजित केलेली आहे. इच्छुकांनी उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे, ही मुलाखत 23 जून 2024 रोजी होणार आहे. त्यानंतरच तुमची निवड केली जाईल. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.
महत्त्वाची माहिती | Rayat Shikshan Sanstha Bharti 2024
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नणंद भावजय यांच्यात लोकसभेला रंगतदार सामना झाल्यानंतर, आता पवार कुटुंबातील काका पुतण्या आमदारकीला एकमेकांच्या विरोधात भिडणारयत… पण ही काका पुतण्याची जोड जुनी नाही तर नवीनय…आम्ही बोलतोय ती जोड आहे…. युगेंद्र पवार वर्सेस रोहित पवार यांची…. राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर बारामती आपलीच असं म्हणत सुनेत्रा ताईंना पुढे करून अजितदादांनी फिल्डिंग लावली, पण जनतेने कौल दिला तो सुप्रिया सुळे यांनाच… मधल्या काळात अजितदादांनी शरद पवारांपासून ते पवार कुटुंबातील जवळपास सगळ्यांनाच शिंगावर घेतलं, आता त्याचाच वचपा काढण्यासाठी शरद पवार (Sharad Pawar) डायरेक्ट मुळावर घाव घालण्याच्या तयारीत आहेत… आणि तो घाव म्हणजे बारामती विधानसभा निवडणूक… बारामतीचा पर्मनंट आमदार म्हणून अजितदादांची (Ajit Pawar) ओळख आहे… त्याच्याच जीवावर ते मंत्री झाले, उपमुख्यमंत्रीही झाले… बारामती अजितदादांना सेफ जाते म्हणूनच ते राजकारण करू शकतात… पण आता शांतीत क्रांती करत हिशोब चुकता करण्यासाठी अजितदादांच्या पुतण्याच्याच हातात आमदारकीला तुतारी देणार आहेत… काका पुतण्याच्या या संघर्षात आता शरद पवार पुतण्याच्या बाजूने ताकद लावतील… तशी त्यांनी सुरुवातही केली आहे… अजितदादांना आमदारकीला पाडण्यासाठी शरद पवारांनी कशी फिल्डिंग लावलीय? युगेंद्र पवार (Yugendra Pawar) या तशा नवख्या चेहऱ्याला अजितदादांच्या बालेकिल्ल्यातून निवडून आणणं खरंच सोप्प आहे का? बारामती विधानसभेला महत्त्वाचे फॅक्टर कोणते ठरतात? आणि सध्याच्या सिच्युएशनला विचार केला तर काका विरुद्ध पुतण्या या संघर्षात आघाडीवर कोण आहे? त्याचंच हे पॉलिटिकल ऍनालिसिस…
हाय व्होल्टेज बारामती लोकसभेचा निकाल लागला… काका की पुतण्या या संघर्षात जनता काकांच्या बाजूने उभी राहिली… सुप्रिया सुळे निवडून आल्या… सुनेत्रा पवार दीड लाखांनी पडल्या… त्यात बरीच भर म्हणून की त्यात भरीत भर म्हणून की काय अजितदादा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात त्या बारामतीतूनच तुतारीला 45 हजारांचं लीड मिळालं… सांगायचा मुद्दा असा की येणाऱ्या विधानसभेला अजितदादांची आमदारकीही धोक्यात आलीय… आपल्या बाजूने जाणारा हाच बोनस पॉइंट पाहून आता शरद पवारांनीही विधानसभेसाठी बारामती तुतारीच कशी वाजेल, याची तयारी सुरू केलीये… त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी मतदारसंघातील जिरायती आणि बागायती पट्टयात प्रत्येक गावी जावून शेतकरी संवाद साधला… आणि सोबत लोकसभेला भरभरून मतदान केल्याबद्दल नागरिकांचे आभारही मानले… अजितदादांचे स्थानिक नेते जिथं पॉवरफुल आहेत अशा गावांमध्ये तर शरद पवारांचं जंगी स्वागत झालं… आणि नागरी सत्कारही झाला… पण या सगळ्या लाईनअप केलेल्या प्रोग्राममध्ये शरद पवारांच्या सोबत एक चेहरा होता तो म्हणजे युगेंद्र पवार…
शरद पवार जिथे जिथे जातील अगदी तिथे त्यांच्या बाजूलाच युगेंद्र पवार असायचे… अनेक ठिकाणी त्यांनी केलेली भाषणही चांगलीच गाजली… या सगळ्याचा अर्थ एकच निघतो येणाऱ्या आमदारकीला अजितदादांच्या विरोधात तुतारी कडून उमेदवार कोण असेल तर तो म्हणजे युगेंद्र पवार… अजितदादांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांचा मुलगा म्हणजे युगेंद्र पवार… राजकारणात हे नाव नवखं असलं तरी औद्योगिक आणि सामाजिक क्षेत्रात हे नाव तसं मुरलेलं आहे… शरयू फाउंडेशनच्या मदतीने अनेक उद्योगसमूह सांभाळणं, सामाजिक काम करणं, विद्या प्रतिष्ठानच्या भव्यदिव्य शैक्षणिक संस्थेची खजिनदार पदाची जबाबदारी ते बारामती कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्षपदही सांभाळण्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे… पण पडद्याआड राहून काम करणारा हा चेहरा फ्रंटला आला तो लोकसभेच्या निमित्ताने…
आपल्या सख्या काकाने संघर्षाचा जो विस्तव पवार कुटुंबात पेरला त्याच्या विरोधात या पुतण्याने दंड थोपटला… आणि आपल्या आत्याला सपोर्ट करण्याचा निर्णय घेतला…सुरवातीला अजितदादा गटाकडून हे राजकारणातलं नवकोर पोरं करून करून काय करणार? असा डाऊट घ्यायला लागले… पण याच पोरानं बारामती विधानसभेचा पट्टा पिंजून काढला… प्रत्येक गावागावात जाऊन अपुरी यंत्रणा आणि स्थानिक नेत्यांची कमतरता असतानाही सभा घेतल्या, घोंगडी बैठका घेतल्या, मिळेल तसं जमेल तसं प्रचार करायला सुरुवात केली… नव्या दमाची विविध जाती-धर्मांची तरुण पिढी सोबत घेतली… सोशल मीडियापासून युथ विंग तयार करून पदांची वाटपणी केली… प्रचार सभांमधील भाषणातून हाच तरुण पोरगा दादांना जड जाऊ लागला… सोशल मीडियाच्या रिल्स मधून याच युगेंद्र दादाची हवा होती… रेवती सुळे आणि युगेंद्र दादा यांच्या प्रचारांच्या रिल्सने तर सोशल मीडिया व्यापून टाकला होता… एकट्या बारामती नीरा पट्ट्या बद्दल बोलायचं झालं तर सुप्रिया ताई इकडे फारशा फिरकल्याही नाहीत, इकडे तुतारीसाठी वन मॅन शो फिल्डिंग लावून बसला होता तो म्हणजे हाच युगेंद्र पवार… त्याचाच इम्पॅक्ट म्हणून की काय अजितदादांनी प्रचाराच्या सांगता सभेत युगेंद्र पवारांना टार्गेट करत अनेक इशारे दिले… आरे तुरेची भाषा वापरली… त्याचाच रिवर्स इफेक्ट म्हणा की काय लोकसभेच्या निकालात बारामती मतदारसंघातून तब्बल 45 हजारांचं लीड सुप्रिया ताईंच्या पारड्यात पडलं… अर्थात यात खारीचा वाटा का होईना पण युगेंद्र पवार यांनाच जातो…
तसं अजितदादांना नडणं तसं सोप्पं काम नाहीये… पण ती हिम्मत दाखवली.. ती युगेंद्र पवार यांनीच… आणि आपल्यावर टाकलेला विश्वास पूर्णही करून दाखवला… मतदारसंघातून मिळालेल्या लीडने युगेंद्र पवार यांचा कॉन्फिडन्सही चांगलाच वाढला असेल… टेस्ट मॅच तर झाली आता वेळ आलीय ती फायनल मॅचची… आणि अशा वेळेस युगेंद्र पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतील ते शरद पवार… येणाऱ्या विधानसभेला बारामतीतून अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार यांच्यात आमदारकीसाठी पवार कुटुंबातला दुसरा सामना रंगेल… आणि तो तितकाच अटीतटीचा देखील असेल… पण इथून अजितदादांना हरवणं वाटतं तितकं सोपं नक्कीच नाहीये… विविध ग्रामपंचायतचे पॅनेल, स्थानिक नेते, कार्यकर्ते यांचं स्ट्रॉंग नेटवर्क दादांनी उभारलय… दादांचाच आत्तापर्यंत लोकप्रतिनिधी म्हणून या भागाशी जास्त संपर्क राहिलाय… म्हणूनच की काय अजितदादांनी राष्ट्रवादीत फूट पाडली त्याचं वाईट वाटलं असलं तरी त्यावर सोल्युशन म्हणून लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा हे वाक्य इथल्या प्रत्येक जनतेच्या तोंडात होतं… थोडक्यात लोकसभेला जितकी हलकी फाईट झाली तितकी विधानसभेची नक्कीच नसेल….
अजितदादा हिंदुत्ववादी भाजप पक्षासोबत गेल्याने दलित, मुस्लिम आणि अल्पसंख्यांकांची मतं ही तुतारीकडे वळली… त्यात सहानुभूतीची लाट होतीच… सुनेत्रा पवार म्हणावा असा स्ट्रॉंग कॅंडिडेटही नसल्याने लोकसभा एका बाजूला वळली… पण विधानसभेला रिंगणात असतील ते दस्तूरखुद्द अजित पवार…. पण त्यांची सलग सात टर्मची खासदार की आता धोक्यात आणणारय ते तेच त्यांचे काका शरद पवार… त्यांनी अप्रत्यक्षपणे युगेंद्र पवार यांना सोबत फिरवून अजितदादांच्या विरोधात युगेंद्रच उभा राहील, याचा अप्रत्यक्ष मेसेजच बारामतीच्या जनतेला दिलाय… त्यात बारामतीच्या पट्ट्यातून फिरताना निंबुत, सोमेश्वर, वडगाव, कोऱ्हाळे यांसारख्या गावात जाऊन त्यांनी युगेंद्र पवारांसाठी बिल्डिंग लावल्याचंही बोललं जातंय… लोकसभेला सुप्रियाताईंच्या पाठीशी उभ राहण्यासाठी शरद पवारांनी या मतदारसंघातील जुन्या जाणत्या तर कधी विरोधातल्याही राजकीय मित्रांच्या गाठीभेटी घेत बरंच मतदान फिरवलं विधानसभेलाही युगेंद्र पवार यांनी केलेल्या कामाची पोचपावती म्हणून शरद पवार आपल्या नातवासाठी नक्कीच फिल्डिंग लावतील, असं सध्या तरी चित्र दिसतंय… विधानसभा हरली तर अजितदादांचं राजकीय करिअर संपुष्टात येऊ शकतं… त्यामुळे बदला घेतला जाणारच… असं म्हणत शरद पवार आता पवार कुटुंबात नव्या काका पुतण्याच्या संघर्षाला ग्रीन सिग्नल देतील का? बारामतीची जनता आमदार म्हणून कोणत्या चेहऱ्याला पसंती देतील? युगेंद्र पवार की अजित पवार? तुमचा अंदाज काय सांगतो? ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय बाजारात Ola या प्रसिद्ध इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपन्यांच्या स्कुटर जास्त लोकप्रिय आहेत. बाजारात सर्वात जास्त इलेक्ट्रिक स्कुटर या ओलाच्या बघायला मिळतात. उत्कृष्ठ फीचर्स, दमदार रेंज आणि आकर्षक लूक या कारणांनी ग्राहकवर्ग ola च्या स्कुटर खरेदीला आपलं प्राधान्य देत आलाय. आता कंपनी सुद्धा आपल्या ग्राहकांना नवी भेट देणारा आहे… होय, Ola इलेक्ट्रिक आता इलेक्ट्रिक स्कूटर नंतर इलेक्ट्रिक बाईक लाँच (Ola Electric Bike) करण्याच्या तयारीत आहे. २०२६ मध्ये ओलाची इलेक्ट्रिक बाईक ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. ओला एकूण ४ इलेक्ट्रिक बाईक्स लाँच करणार आहे. डायमंडहेड, ॲडव्हेंचर, रोडस्टर आणि क्रूझर असं या चारही गाड्यांची नावे आहेत.
Ola ला ग्राहकांचा पाठिंबा- Ola Electric Bike
आम्ही 2026 च्या पहिल्या ६ महिन्यांत या मोटारसायकलींची डिलिव्हरी करण्याची आशा करत आहोत. आम्ही बाईक्ससह आमचा उत्पादन पोर्टफोलिओ वाढवण्याचा विचार करत आहोत असं कंपनीने म्हटले आहे. ओला इलेक्ट्रिकने नुकतेच तिच्या तीन मोटरसायकल आणि काढता येण्याजोग्या इलेक्ट्रिक बॅटरीच्या डिझाइनसाठी पेटंट दाखल केले आहे. इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटमध्ये ओलाच्या स्कुटरचा तब्बल 30 टक्के हिस्सा आहे. यापूर्वी ग्राहकांनी ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटरला मोठा पाठिंबा दिला आहे, आता इलेक्ट्रिक बाईकला लोकांची पसंती मिळेल अशी आशा कंपनीला आहे. ओलाच्या या आगामी इलेक्ट्रिक बाईकमध्ये बॅटरी कपॅसिटी किती असेल, हि इलेकट्रीक बाईक किती किलोमीटर अंतर पार करेल याबाबत कोणतीही माहिती सध्या तरी समोर आलेली नाही. मात्र 2026 मध्ये लाँच होणाऱ्या इलेक्ट्रिक बाईकचे (Ola Electric Bike) डिझाइन त्यांच्या कॉन्सेप्ट व्हर्जनच्या डिझाइनप्रमाणेच राहण्याची शकयता आहे.
Ola च्या गाड्या बाजारात बजाज ऑटो, टीव्हीएस मोटर्स आणि एथर स्कूटरशी स्पर्धा करतात. अथरने अलीकडेच फॅमिली स्कूटर रिझटा बाजारात आणली होती. दुसरीकडे Hero MotoCorp सुद्धा येत्या वर्षभरात इलेक्ट्रिक बाईक लाँच करण्याच्या विचारात आहे. हिरोच्या लाइन-अपमध्ये Vida श्रेणीतील ६ मॉडेल्सचा समावेश असू शकतो. याशिवाय झिरो मोटर्ससोबत पार्टनरशिप अंतर्गत हिरोचे ४ मॉडेल्सही बाजारात आणले जाऊ शकतात.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारने अनेक नवनवीन योजना आणलेल्या आहेत. त्याचप्रमाणे त्यांची सगळी कामे अत्यंत सुलभ पद्धतीने व्हावीत, त्यासाठी अनेक कामांमध्ये त्यांना मुभा देखील देण्यात आलेली आहे. अशातच आता सरकारने बँक व्यवहारांसाठी ज्येष्ठ नागरिकांना मुभा दिलेली आहे. अनेक ज्येष्ठ नागरिकांना आजारपणामुळे तसेच जास्त वय झाल्यामुळे बँकेचे व्यवहार करण्यात अडचण येतात. रोज बँकेत जाण्यास त्यांना जमत नाही.
सरकारने यावर आता तोडगा काढलेला आहे. 11 जून 2024 रोजी सरकारने याबाबतचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आता ज्येष्ठ नागरिकांना घरबसल्या बँकेचे सगळे व्यवहार करता येणार आहे. शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार आता संयुक्त बँक खात्याची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. त्याचप्रमाणे बँकेचे व्यवहार करण्यासाठी पालक नियुक्त करणे आणि प्रत्यक्ष उपस्थित राहणे.
हे जर शक्य नसेल तर पैसे काढण्याचे स्वाक्षरी किंवा त्याचा अंगठ्याचा ठसा देण्याची मुभा देण्यात आलेली आहे. गरजेनुसार त्यातून रक्कम देखील काढली जाते. परंतु आजारपणामुळे जास्त वयामुळे बँकेत जाणे, जर ज्येष्ठ नागरिकांना जमत नसेल, तर आता सरकारने त्यांच्यासाठी ही नवीन कार्यपद्धती लागू केलेली आहे त्यामुळे आता बँकेच्या अधिकारी ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जाऊन त्यांची मदत करणार आहेत. त्यामुळे जेष्ठ नागरिकांना बँकेची कामे आता घरबसल्या करता येणार आहे.
Gold Price Today: आज हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा सण वटपौर्णिमा आहे. त्यामुळे या सणाच्या पार्श्वभूमीवरच सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. कारण, वटपौर्णिमेच्या दिवशी नवरा आपल्या बायकोला अवश्य प्रेमाने एखादा तरी दागिना भेट देतो. परंतु अशा सुवर्ण दिनीच सोन्या-चांदीच्या भावात मोठी तेजी दिसून आली आहे. (Gold Price Today) या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत वाढ झाल्यामुळे दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना याचा फटका बसत आहे.
आज मार्केट उघडताच MCX वर सोन्याचा भाव 72581 रुपयांपासून सुरु झाला. परंतु थोड्याच वेळात या किमतीमध्ये वाढ झाली. 10 वाजता तर सोन्याचा दर 72715 रुपयांवर गेला. त्यानंतर 12 वाजता सोन्याच्या किमतीनी 72712 रुपयांनी उसळी मारली. उच्चांकी पातळी गाठली. सध्या, सोन्याचा भाव 72581 वर व्यवहार करताना दिसत आहे. दुसरीकडे गुड रिटर्न्सनुसार 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने 73250 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 22 कॅरेट 10 ग्रॅम सोने 67150 रुपयांनी व्यवहार करत आहे.
(Gold Price Today) Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 67150 रुपये मुंबई – 67150 रुपये नागपूर – 67150 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 73250 रूपये मुंबई – 73250 रूपये नागपूर – 73250 रूपये
चांदीचे आजचे भाव
आज वटपौर्णिमेच्या मुहूर्तावर चांदीच्या भावांनी देखील उसळी मारली आहे. कारण की Good Return नुसार, आज 10 ग्रॅम चांदीचा भाव 940 रुपयांनी व्यवहार करत आहे. (Gold Price Today) तसेच, 100 ग्रॅम चांदीचा भाव 9400 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीची किंमत 94,000 रूपये अशी आहे. त्यामुळे आज सोने चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला कात्री बसणार आहे.
Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana | सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक विविध योजना आणलेल्या आहेत. ज्यामुळे शेतकऱ्यांना नेहमीच फायदा होत असतो. शेती करताना विविध गोष्टींची गरज लागते आणि त्याच गोष्टींची पूर्तता करण्याच्या प्रयत्न सरकार करत असतात. सरकारने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 (Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana ) ही योजना आणलेली आहे. महाराष्ट्र सरकारने आणलेली ही योजना शेतकऱ्यांच्या आर्थिक घटकाला चालना देण्यासाठी आणि राज्यात सौर ऊर्जा निर्मिती वाढवण्यासाठी आणलेली आहे.
सरकारच्या या योजनेअंतर्गत शेतकरी त्यांची जमीन सरकारला भाड्यावर देऊ शकतात. आणि ते दरवर्षी सरकारकडून हेक्टरी 1.25 लाख रुपये एवढी रक्कम मिळू शकतात. यासाठी शेतकऱ्यांना कुठेही जाण्याची गरज नाही. त्यांची शेती केवळ सरकारला द्यायची आहे. सौर कृषी वाहिनी योजनेसाठी ही जमीन सरकार घेतात आणि त्याचे तुम्हाला दरवर्षाला भाडे देखील मिळते. आता या योजनेचे कोणते फायदे आहेत ते जाणून घेणार आहोत
या योजनेचे फायदे | Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana
या योजनेअंतर्गत सरकारला जमिनीचा ताबा न देता शेतकऱ्यांना दरवर्षी उत्पन्न प्राप्त होते.
या योजनेमुळे राज्यात सौर ऊर्जा निर्मिती देखील होणार आहे.
त्यामुळे या योजनेचा शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होणार आहे.
या योजनेसाठी किमान 3 एकर आणि जास्तीत जास्त 50 एकर जमीन भाड्याने शेतकऱ्याला दिली जाऊ शकते.
महावितरण वीज केंद्राच्या 5 किलोमीटरचा आत असलेले शेतकरी या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात.
पात्रता
सरकारचे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ही शेतकऱ्यांसाठी एक उत्तम संधी आहे. यातून शेतकऱ्यांना दरवर्षी भाडेतत्त्वावर काही रक्कम देखील मिळेल आणि त्यांना या योजनेचा देखील फायदा होईल.