Monday, December 22, 2025
Home Blog Page 663

Mumbai : 45 मिनिटांचे अंतर होणार 15 मिनिटांत पार, खुला होणार मुंबईतील महत्वाचा पूल

mumbai news update

Mumbai : मुंबई राज्यातील केवळ एक महत्वाचे शहर नसून आर्थिक उलाढालीचे प्रमुख केंद्र देखील आहे. मुंबई झपाट्याने विकसित होत असून मुंबईची कनेक्टिव्हिटी वाढवण्यावर शासनाचा भर आहे. म्हणूनच मुंबईत रोड आणि पूल प्रोजेक्ट हाती घेतले जात आहेत. आता मुंबईतील आणखी एक महत्वाचा पूल लवकरच खुला केला जाणार असून त्यामुळे 45 मिनिटांचे आंतर केवळ 15 मिनिटात पार होऊ शकणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचा (Mumbai) वेळ निश्चितच वाचणार आहे. हा पूल नेमका कोणता आहे ? त्यामुळे कोणत्या भागातील रहिवाशांना याचा लाभ होणार आहे चला जाणून घेऊया…

प्रवासाचा कालावधी होणार कमी

हा ब्रीज खुला झाल्यानंतर प्रवासाचा कालावधी कमी होणार असून अंधेरी पश्चिमपासून वेस्टर्न एक्पप्रेस वे पर्यंत जुहूपर्यंतचा 9 किमी अंतर केवळ 15 मिनिटात पार करता येणार आहे. या पुलाचा वापर करून चालक वेस्टर्न एक्स्प्रेस वेवरुन तेली गल्ली ब्रिजवरुन गोखले ब्रिज पार करुन बर्फीवाला पुलावरुन (barfiwala flyover) थेट जुहूपर्यंत पोहचू शकणार आहेत. सध्या हे 9 किमीपर्यंतचे अंतर पार करण्यासाठी वाहन (Mumbai) चालकांना 45 मिनिटांचा वेळ लागतो. पूल खुला झाल्यानंतर 15 मिनिटांत हे आंतर पार होणार आहे.

हायड्रॉलिक जॅक आणि एमएस स्टूल पॅकिंगचा वापर (Mumbai)

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ने बुधवारी सांगितले की अंधेरी गोखले पुलाचा एक भाग सीडी बर्फीवाला उड्डाणपुलाशी यशस्वीरित्या संरेखित करण्यात आला आहे आणि 1 जुलै रोजी हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीएमसीने एका निवेदनात म्हटले आहे की सीडी बर्फीवाला उड्डाणपूल उचलण्याचे आणि गोपाळकृष्ण गोखले उड्डाणपुलाच्या (Mumbai) समांतर संरेखित करण्याचे आव्हानात्मक काम यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. हायड्रॉलिक जॅक आणि एमएस स्टूल पॅकिंग वापरून काम पूर्ण करण्यात आले.

या दिवशी पूल होणार खुला (Mumbai)

बर्फीवाला उड्डाणपुलाचा एक भाग एका बाजूला 1,397 मिमी आणि दुसऱ्या बाजूला 650 मिमीने उंचावला होता. बीएमसी ने सांगितले की , “या जोडणीच्या कामासाठी गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या सूक्ष्म-स्तरीय नियोजन आणि अथक प्रयत्नांना या महत्त्वाच्या टप्प्यात यश मिळाले आहे. काँक्रिटीकरणाच्या कामानंतर या दोन्ही पुलांवरील वाहतूक 1 जुलै 2024 रोजी खुली करण्याची तयारी सुरू आहे. अंधेरीतील गोखले पूल आणि सीडी बर्फीवाला उड्डाणपूल (Mumbai) अंधेरी पूर्व आणि पश्चिमेकडील वाहतुकीसाठी महत्त्वपूर्ण आहेत.

बबनदादा शिंदेविरुद्ध आमदारकीला कोण? हाताचा पंजा की तुतारी?

baban shinde madha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभेला जाळ अन् धूर संगटच निघलेल्या माढा लोकसभेचा निकाल लागला.. अकलूजच्या मोहिते पाटलांनी पुन्हा एकदा भाजपसारख्या बड्या पक्षाला आणि त्यांच्या मतदारसंघातील आमदारांना पुन्हा एकदा दाखवून दिलं की आपल्या नादाला लागायचं नाय… भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या प्रचारासाठी मोदींपासून फडणवीसांनी ताकद लावूनही सव्वा लाखांच्या लीडने अखेर मोहिते पाटलांनी विरोधकांना कानठाळ्या बसतील असा तुतारीचा आवाज काढला.. लोकसभा आटोपली.. आता वेल आलीये विधानसभेची.. तेव्हा सगळ्यांच्याच नजरा पुन्हा वळल्यात त्या माढ्याकडे.. माढ्याचे विद्यमान खासदार आहेत बबनदादा शिंदे.. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात असणारे बबनदादा इथले सलग सहा टर्मचे आमदार.. पण याच माढ्यात प्रस्थापित असणाऱ्या बबनदादांची आमदारकी आता धोक्यात आलीय… मोहिते पाटलांनी लोकसभेला दणक्यात मिळवलेला विजय हे त्यामागचं प्रमुख कारण… पण बबनदादा शिंदे (Baban Shinde) खरंच आमदारकीसाठी इच्छुक आहेत का? जर त्यांनी निवडणुक लढवली तर त्यांच्या विरोधात कुठला उमेदवार रिंगणात असेल? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मोहिते पाटील फॅक्टर माढा विधानसभा मतदारसंघात खरंच निर्णायक ठरु शकतो का? त्याचीच ही इनसाईड स्टोरी…

माढा विधानसभा मतदारसंघ.. इथं राजकारण चालतं ते फक्त बबनदादांचं.. बबनदादा शिंदे, सलग सहा टर्म माढ्यातून आमदार म्हणून निवडुन येतायत… साखर कारखाने, बँका, बाजार समित्या, जिल्ह्या दुध संघ यावर बबनदादा शिंदे यांचे वर्चस्व राहीलंय… तालुक्यात असणारा तगडा आणि दांडगा जनसंपर्काला त्यांनी कधीच नख लागू दिला नाही.. आपल्या विरोधात विरोधकच असता कामा नये, आणि असला तरी तो टीकू नये यासाठी बबनदादांची यंत्रणा एक्टीव्ह असायची… सध्या अजितदादांच्या राष्ट्रवादीत असणारे बबनदादा जिल्ह्यावरही आपला दबाव ठेवून आहेत… पण त्यांच्या या वर्चस्वाला धक्का लागला तो लोकसभा निवडणुकीत.. माढा विधानसभा निवडणुकीत आपल्या मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराला मोठं लीडं मिळेल.. यासाठी दिवसरात्र एक करणाऱ्या शिंदेंना मोठा धक्का बसला.. बबनदादांच्या एकट्या मतदारसंघातून तुतारीला तब्बल ५२ हजारांचं मताधिक्य मिळालं.. ही बाब अर्थात बबनदादांसाठी येणाऱ्या विधानसभेला धोक्याची घंटा असल्याचंच दाखवून देणार आहे… लोकसभेपेक्षा आमदारकीचे अस्पेक्ट वेगळे असतात याचा विचार केला तरी जनमत विरोधात आहे हा मॅसेज देखील विधानसभेचा निकाल फिरवू शकतो, हे राजकारण कोळून पिलेल्या माणासाला सांगायला नको.. आता येऊयात मुख्य मुद्द्याकडे तो म्हणजे बबनदादा निवडणूक लढणार का?

कारण सध्या माढ्यातील राजकीय उठबस पाहिली तर बबनदादा शिंदे हे येणाऱ्या विधानसभेला आपले सुपुत्र रणजितसिंह शिंदे यांना मैदानात उतरवण्याच्या फुल तयारीत आहेत. म्हणूनच शिंदे दररोज तालुक्यातील विविध गावांना गाठी भेटी देतायत… लहान मोठ्या कार्यक्रमांना हजेरी लावतायत.. त्यामुळे त्यांचं महायुतीकडून आमदारकीचं तिकीट फिक्स समजलं जातंय.. अपवाद फक्त एकच तो म्हणजे सावंत बंधूंचा.. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजीराव सावंत यांचंही जिल्ह्यावर वर्चस्व आहे.. त्यांचे साखर कारखाने, बँका, शिक्षणसंस्था आहेत. ते सध्या शिवसेना शिंदे गटात असल्यानं त्यांनी आमदारकीची मागणी लावून धरली तर भांड्याला भांड लागू शकतं.. पण सध्यातरी बबन शिंदे किंवा त्यांचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे यांपैकी एकाला महायुतीकडून आमदारकीची उमेदवारी मिळेल, असं चित्र आहे.. आता राहता राहीला प्रश्न की यांच्या विरोधात कोण?

तर त्यासाठीही एक नाव एका भेटीमुळे चर्चेत आलंय.. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार धनाजीराव साठे यांच्या सुन माढ्याच्या नगराध्यक्षा मिनल साठे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतल्यानं त्यांच्या नावाची चाचपणी माढ्याच्या उमेदवारीसाठी केली जात असल्याची राजकीय वर्तुळात बरीच चर्चा आहे… . पण ही भेट सदिच्छ भेट होती. यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याची माहिती मिनल साठे यांनी दिली. मात्र, या भेटीमागे विविध राजकीय तर्क काढले जात आहेत. माढ्यातील साठे कुटुंब हे काँग्रेसशी एकनिष्ठ असलेलं कुटुंब मानलं जातं. मध्यंतरी काही काळ साखर कारखाना अडचणीत असल्यामुळं साठे कुटुंबाने भापमध्ये प्रवेश केला होता. मात्र, पुन्हा त्यांनी घरवापसी केलीय.. पण माढ्यातून पवार फॅक्टर चालत असल्याने मिनल साठे हातात तुतारी घेऊन इथली लढत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी करण्याची शक्यता दाट आहे… शरद पवारांच्या सहानुभुतीचा फॅक्टर, साठे कुटूंबाची ताकद आणि त्याला मोहिते पाटलांचं मिळणारं बळ या सगळ्यांची बेरीज करुन पाहिली तर इथं शिंदे पितापुत्रांचा करेक्ट कार्यक्रम होऊ शकतो…

तसा माढा मतदारसंघातील मोहिते पाटील आणि शिंदे यांच्यातला राजकीय संघर्ष तसा जुनाच.. सोलापुर जिल्ह्याच्या राजकारणात जिल्हा परिषदेपासून ते बॅंकापर्यंत या दोन गटात तुंबळ वाद पाहायला मिळतो.. मोहिते पाटलांच्या राजकारणाला शह देण्याचा बबन शिंदेंचा नेहमीच प्रयत्न राहीलाय.. आता त्याचाच वचपा काढायची आयती संधी मोहिते पाटलांसाठी विधानसभेच्या निमित्ताने चालून आलीय… बबन शिंदे वयोमानाचा विचार करता निवडणुकीत उतरणार नसले तरी त्यांचा मुलगा रणजितसिंह शिंदे याला घेरण्याचा मोहिते पाटील नक्कीच प्रयत्न करतील.. माळशीरस तालुक्यातील १४ गावं आणि पंढरपुरातील ४१ गावं ही शिंदेंसाठी डोकेदुखी ठरणारी आहेत.. कारण तिथं मोहिते पाटलांचा हुकुमी एक्का चालत असल्यानं आणि त्यातही शरद पवारांनी इथँ जुळवून आणलेलं जातीय समीकरण शिंदेंच्या विरोधात जाणार असल्यानं माढ्यात बबनदादा शिंदेंच्या राजकीय कारकिर्दीला सुरुंग लागणार, असं म्हणायला फुस स्कोप आहे.. आता चहुबाजूंनी वादळात सापडलेल्या या आपल्या शिलेदाराला अजितदादा किती आणि कशी ताकद देणार? हा ही मोठा प्रश्नच आहे… बाकी महाविकास आघाडी माढ्यातून कुठला उमेदवार देईल.. त्याला कुठल्या चिन्हावर निवडणुकीत उतरवेल.. यावरही पुढची बरीच समीकरणं अवलंबून असणार आहेत.. या सगळ्या विश्लेषणाचा विचार करता माढ्याचा यंदाचा आमदार कोण असेल? तुमचा कौल कुणाला जातोय.. आम्हाला कमेंट करुन नक्की कळवा.

RD Interest Rates : ‘या’ बँकांनी बदलले RD वरील व्याजदर; पहा कुठे मिळतील सर्वाधिक रिटर्न्स?

RD Interest Rates

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (RD Interest Rates) देशभरात गुंतवणूकदारांची संख्या काही कमी नाही. पैसा कमावण्याइतकाच योग्य ठिकाणी गुंतवणे देखील महत्वाचे असते आणि त्यामुळे बरेच लोक सरकारी योजना तसेच बँकांच्या स्कीममध्ये गुंतवणूक करण्यास पसंती देतात. यापैकी एक सर्वाधिक पसंत केला जाणारा गुंतवणुकीचा पर्याय म्हणजे आवर्ती ठेव अर्थात RD. देशातील अनेक गुंतवणूकदारांनी RD मध्ये गुंतवणूक केली असेल. यात केलेली गुंतवणूक ही मोठा निधी जमा करण्यासाठी सहाय्यक ठरते.

दरम्यान, अनेक बँकांनी त्यांच्या आवर्ती ठेवींचे व्याजदर बदलले आहेत. त्यामुळे कोणत्या बँकेत RD केल्यास सर्वाधिक परताव्याचा लाभ मिळेल? (RD Interest Rates) याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. म्हणूनच आज आपण विविध बँकांच्या आवर्ती ठेवींवरील व्याजदराची माहिती घेणार आहोत. ज्याच्या सहाय्याने तुम्हाला आवर्ती ठेव (RD) मध्ये गुंतवणूक करून सर्वाधिक लाभ मिळवता येईल.

1) HDFC बँक (RD Interest Rates)

वृत्तानुसार, HDFC बँकेने आपल्या आवर्ती ठेवींचे व्याजदर बदलले आहेत. यात २७ महिने आणि ३६ महिने कालावधीच्या आवर्ती ठेवींसाठी सुधारित व्याजदर लागू करण्यात आले आहेत. ज्यामध्ये सामान्य नागरिकांना ७.१५% तर ज्येष्ठ नागरिकांना ७.६५% इतका व्याजदर दिला जातोय. तसेच ३९ महिने, ४८ महिने आणि ६० महिने कालावधीच्या आवर्ती ठेवींवर सर्वसामान्य नागरिकांना ७.२०% तर ज्येष्ठ नागरिकांना ७.७०% व्याजदर दिला जात आहे.

2) ICICI बँक

ICICI बँकेने देखील आवर्ती ठेवींवरील व्याजदर सुधारित केले आहेत. जे १७ फेब्रुवारी २०२४ पासून लागू करण्यात आले आहेत. (RD Interest Rates) त्यानुसार, ICICI बँक ही आपल्या ग्राहकांना ६ महिने ते १० वर्ष कालावधीच्या आवर्ती ठेवींवर सर्वसामान्य नागरिकांना ४.७५% ते ७.२०% व्याजदर देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना ५.२५% ते ७.७५% इतका व्याजदर देते आहे.

3) स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)

स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांसाठी आवर्ती ठेवींवर व्याजदर बदलले आहेत. (RD Interest Rates) त्यानुसार, ही बँक आपल्या ग्राहकांना १ वर्ष ते १० वर्ष कालावधीच्या आवर्ती ठेवींवर ६.८०% ते 7% इतका व्याजदर देत आहे.

4) YES बँक

YES बँकेने देखील आपल्या आवर्ती ठेवींचे व्याजदर बदलले आहेत. त्यानुसार, ही बँक आपल्या ग्राहकांना ६ महिने ते ५ वर्ष इतक्या कालावधीच्या आवर्ती ठेवींवर ६.१०% ते ८% इतका व्याजदर देत आहे. दरम्यान, उशीरा पेमेंट केल्यास बँकेकडून १% दंड आकारला जाणार आहे. (RD Interest Rates) हे नवे व्याजदर ३० मे २०२४ पासून लागू करण्यात आले आहेत.

5) पंजाब नॅशनल बँक (PNB)

पंजाब नॅशनल बँकेने (PNB) आवर्ती ठेवींवरील व्याजदर सुधारित करून ४.५०% ते ७.२५% इतके केले आहेत. माहितीनुसार, ही बँक आपल्या ग्राहकांना १ महिन्याच्या पटीत ६ महिने ते १२० महिने कालावधीसाठी हे व्याजदर लागू करेल. समजा, जर तुम्ही तुमचे प्रलंबित हप्ते मॅच्युरिटी तारखेपूर्वी जमा केले तर बँक दंड आकारू शकते. (RD Interest Rates)

Indian Railways: 10,000 किमी रेल्वे ट्रॅकवर लागणार कवच, रोखणार रेल्वे अपघात

railway kavach

Indian Railways: पश्चिम बंगालमधील जलपाईगुडीजवळील रंगपानी स्टेशनजवळ सोमवारी सकाळी झालेल्या कांचनजंगा एक्स्प्रेस रेल्वे अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला असून 60 हून अधिक जण जखमी झाले. या अपघाताची भीषणता लक्षात घेऊन केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. असे अपघात रोखण्यासाठी रेल्वेने कवच ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन (एटीपी) तंत्रज्ञान तयार केले आहे. यासाठी रेल्वे लवकरच 5000 कोटी रुपयांची निविदा काढणार आहे. रेल्वेला (Indian Railways) सुमारे 10,000 किमी ट्रॅकवर कवच बसवण्यात येणार आहे.

5000 किमीच्या दोन निविदा काढण्यात येणार

भारतीय रेल्वेने स्वदेशी कवच ​​विकसित केले आहे. त्याची त्वरीत अंमलबजावणी करण्यासाठी पाच हजार किमीच्या दोन निविदा काढण्यात येणार आहेत. रेल्वे अपघात टाळण्यासाठी कवच ​​विकसित करण्यात आले आहे. गेल्या वर्षी ओडिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातात 296 जणांचा मृत्यू झाला होता तर 1200 जण जखमी झाले होते. 2021 मध्ये पहिली कवच ​​निविदा काढण्यात आली होती. ही निविदा फक्त 3000 किमी साठी होती. मानवी चुकांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी ही यंत्रणा सक्षम आहे. ट्रॅकवर बसवण्यात येणारे हे कवच ट्रेन (Indian Railways) किंवा पुढे कोणताही अडथळा ओळखून वाहन थांबवण्यास सक्षम आहे. यामुळे गाड्यांची टक्कर आणि रुळावरून घसरणे टाळता येईल.

दरवर्षी 7000 किमी ट्रॅकवर कवच बसवण्याची योजना (Indian Railways)

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी एका माध्यमाला सांगितले की, 10 हजार किमीच्या रेल्वे ट्रॅकवर (Indian Railways) चिलखत बसवण्याचे काम लवकरच सुरू होईल. सुमारे 6000 किमी ट्रॅकचा डीपीआर तयार करण्यात आला असून 4000 किमीचा मार्ग जवळपास पूर्णत्वास आला आहे. ही यंत्रणा विकसित करण्याचे काम २०१२ मध्ये सुरू झाले. सध्या सुमारे 1500 किमी ट्रॅकवर कवच बसविण्यात आले आहे. नवीन निविदेनुसार दरवर्षी सुमारे 7 ते 8 हजार किमी रेल्वे रुळांवर कवच बसवण्याचे नियोजन आहे. या वेगाने, 70 हजार किमी लांबीचे भारतीय रेल्वेचे नेटवर्क 10 वर्षात कवचने सुसज्ज होईल.

परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडेंविरोधात शरद पवारांचा ‘हा’ मोहरा उतरणार?

baban gitte dhanajay munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लांबलचक दाढी, पांढराशुभ्र सदरा, 400 गाड्यांचा ताफा आणि एखाद्या साउथच्या चित्रपटातील सुपरस्टारला लाजवेल अशी हालचाल… चार-पाच पिढ्यांपासून राजकारणात मुरलेल्या कुण्या अट्टल नेत्यांचं हे वर्णन नाहीये… तर हे वर्णन आहे साधासुधा कार्यकर्ता ते परळीच्या राजकारणातला हुकमी एक्का बनलेल्या शशिकांत पांडुरंग गित्ते उर्फ बबन गित्ते (Baban Gite) यांचं… बीडच्या लोकसभा निकालात पंकजा मुंडेंचा बजरंग बाप्पांनी पानिपत केलं… तर आता विधानसभेला धनंजय मुंडेंच्या आमदारकीवर आभाळ आलंय… आणि ते आणलय तरुणाईच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या याच बबन गित्ते यांनी… धनंजय मुंडेंनी केलेल्या गद्दारीचा हिशोब चुकता करण्यासाठी शरद पवारांनी परळीच्या राजकारणात एक नवा मोहरा फ्रंटला आणला, तो हाच बबन गित्ते… येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत परळीतून घड्याळाकडून धनंजय मुंडे (Dhananjay Munde) विरुद्ध तुतारीच्या चिन्हावर बबन गित्ते यांच्यात लढत होणार असल्याचं जवळजवळ फिक्स मानलं जातंय… लोकसभेला झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर आता परळी वाचवणं हा धनंजय मुंडेंसाठी प्रतिष्ठेचाच नाही तर अस्तित्वाचाही मुद्दा बनलाय… पण मैदानात बबन गित्ते असल्यानं आमदारकी बरीच अवघड जाऊ शकते .. बीड पाठोपाठ परळीतूनही मुंडे कुटुंबाला राजकारणावर तुळशीपात्र ठेवण्याची वेळ का आलीय? धनुभाऊंच्या राजकारणाचा द एन्ड करून बबन गित्ते आमदारकीची तुतारी वाजवतील का? येणाऱ्या विधानसभेला परळीत किंगमेकर ठरणारे हे बबन गित्ते नेमके आहेत कोण? त्याचीच ही इनसाईड स्टोरी…

२०१४ च्या निवडणूकीत पंकजा मुंडे यांना मी पाठींबा दिला म्हणून त्या निवडून आल्या आणि मंत्री झाल्या…. २०१९ मध्ये धनंजय मुंडे यांना पाठींबा दिला ते निवडून आले आणि मंत्री झाले… थोडक्यात काय तर परळीत आपण ठरवलं तरच आमदार होत असतो, असं ऑन स्टेज छातीठोकपणे सांगणारे बबन गित्ते… पंकजा असो किंवा मग धनंजय मुंडे… यांना निवडणूक जिंकायची असेल तर बबन गित्तेंचा पाठींबा असावाच लागतो, असं परळीत बोललं जातं…. आणि याला कारण ठरतं ते त्यांचं परळीतील नेटवर्क… गोपीनाथ मुंडेंकडून बबन गित्ते यांनी राजकारणाची उजळणी पक्की केली… त्यांच्या नंतर पंकजा यांचं नेतृत्व मान्य नसतानाही केवळ मुंडे साहेबांची मुलगी म्हणून त्यांनी पंकजा मुंडेंना मदत केली. पण, पुढे मतभेद झाल्याने ते धनंजय मुंडेंसोबत गेले. त्यांच्या सोबत जनक्रांती संघटनेच्या माध्यमातून परळीची पंचायत समिती निवडणूक लढवली आणि जिंकलीही…बबन गित्ते यांच्या पत्नी सभापती म्हणून निवडून आल्या. पण बायकोची काम सगळे गित्ते करतात… म्हणून त्यांच्यावर आरोप होऊ लागले.. पुढे धनंजय मुंडेंच्या गटाबरोबर वाद झाल्यानंतर त्यांच्या पत्नीवर बहुमताने अविश्वास ठराव आणला.. इथेच धनंजय मुंडे आणि बबन गित्ते यांच्यात संघर्षाचा विस्तव पडला…

पुढे एका प्रकरणात त्यांना जेलमध्येही जावं लागलं. मात्र, जेलमधून बाहेर आल्यानंतर राजकारणात राहूनच विरोधकांना धडा शिकवायचा, असा निर्धार गित्ते यांनी केला…सुरुवातीपासूनच परळीच्या राजकारणात मुंडे कुटुंब प्रस्थापित असल्यानं बबन गित्ते यांच्या राजकारणाला मर्यादा यायच्या… पण त्यांना तो स्पेस मिळाला तो राष्ट्रवादी फुटीनंतर… धनुभाऊ अजितदादांसोबत गेल्याने बबन गित्तेंनी हीच ती वेळ म्हणत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला.. आणि परळीत नव्या राजकीय शक्यतांचा जन्म झाला… मुंडे कुटुंब एकत्र येऊनही लोकसभेला पराभव झाल्यानं धनंजय मुंडेंचं निम्मं अवसान गळून गेलंय… या धक्क्यातून सावरत नाही तोच आमदारकी तोंडावर आलीये… आणि इथं आव्हान असणार आहे ते बबन गित्ते यांचं…

परळीतील येणारी विधानसभा निवडणूक बबन गित्ते विरुद्ध धनंजय मुंडे अशी होणार असल्याची दाट शक्यता आहे…जर आमदारकीला हे दोघे आमने-सामने आले तर गित्ते धनुभाऊंना पराभवाचा मोठा राजकीय धक्का देऊ शकतात… आणि याला कारण ठरेल ते म्हणजे परळीची जातीय समीकरणं… परळीच्या जातीय समीकरणाच्या राजकारणाचा विचार केला. तर, परळीत ४० टक्के मराठा मतदार आहे. ३० टक्के वंजारी मतदार तर उरलेले ३० टक्के मुस्लिम आणि इतर मतदार आहेत. मुंडे बंधू-भगिनी यांना मराठा समाजाच्या मतांशिवाय पर्याय उरत नाही… पण जरांगे फॅक्टरमुळे मराठा समाज मुंडे कुटुंबापासून लांब गेलाय…इतकंच काय तर लोकसभेला दिसलेला टोकाचा जातीयवाद पाहता मराठा समाजाला आपल्याकडे खेचून आणणं धनंजय मुंडेंसाठी सध्या तरी अशक्य अशी गोष्ट आहे… त्यात तुतारी चिन्हाकडे असणारी सहानुभूती आणि त्यात मराठा समाजाचा महाविकास आघाडीला असणारा पाठिंबा पाहता शरद पवारांनी जर का फिल्डिंग लावली तर बबन गित्ते मुंडे घराण्याच्या राजकारणाला सुरुंग लावत आमदार बनण्याचे सध्या सर्वाधिक चान्सेस आहेत…

बबन गित्ते हे नाव जरी नवीन असलं. तरीही त्यांचा स्थानिक राजकारणात असला दांडगा जनसंपर्क, तसेच मोठा पक्ष आणि नेतृत्वाची सर्व बाजूंची ताकद आणि फुटीच्या राजकारणाचा फायदा, हे सारं जर का बघितलं तर बबन गित्ते हे धनंजय मुंडेंपेक्षा नेहमीच प्लस मध्येच राहतायेत… 2019 ला बहीण भाऊ अशी कडवी झुंज परळीला बघायला मिळाली, तेव्हा गित्ते हे धनुभाऊंच्या पाठीशी उभे राहिल्याने त्यांचा विजय झाला, असं स्थानिक पत्रकारही सांगतात… त्यामुळे आता जर त्याच धनंजय मुंडेंच्या समोर बबन गित्ते असतील, तर परळीत कुठल्या लेव्हलचं राजकारण रंगेल याचा विचारच न केलेला बरा…बाकी लोकसभेला पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर आता शरद पवारांनी परळीसाठी विधानसभेचा प्लॅन ऍक्टिव्हेट केलाय… लोकसभेला बजरंग बाप्पांना सोबत घेत शरद पवारांनी गुलाल उधळला… आता विधानसभेला बबन गित्ते यांच्या हातात तुतारी देत शरद पवारांना विजयाचा गुलाल उधळता येईल का? तुम्हाला काय वाटतं? परळीचा पुढचा आमदार कोण? तुमची मतं, प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

पेपरलीग प्रकरणामुळे UGC-NET परीक्षा रद्द!! शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय

UGC-NET

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| प्राध्यापक पदासाठी आणि JRF साठी घेण्यात येणारी UGC-NET परीक्षा बुधवारी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने रद्द केली आहे. UGC-NET परीक्षेचा पेपरलीक झाल्याच्या संशयावरूनच NTA ने पेपर रद्द केल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा ही परीक्षा घेण्यात येणार आहे. यापूर्वी राज्यात NEET परीक्षेत झालेल्या गोंधळामुळे खळबळ उडाली होती. आता पुन्हा एकदा NET परीक्षेमध्ये देखील घोळ झाल्याचे समोर आले आहे. यामुळे लाखो उमेदवारांचे टेन्शन वाढले आहे.

मंगळवारी म्हणजेच 18 जून रोजी NTA ने देशातल्या विविध शहरांमध्ये नेट परीक्षा आयोजित केली होती. ही परीक्षा दोन शिफ्टमध्ये पेन आणि पेपर या पारंपारिक पद्धतीने घेण्यात आले. या परीक्षेसाठी तब्बल 11,21,225 उमेदवार बसले होते. परीक्षेची पहिली शिफ्ट सकाळी 9.30 ते 12.30 अशी होती. तर दुसरी शिफ्ट दुपारी 3 ते 6 अशी होती. 83 विषयांसाठी एकाचदिवशी NTA कडून ही परीक्षा घेण्यात आली. परंतु आता हीच परीक्षा रद्द झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 19 जून रोजी विद्यापीठ अनुदान आयोगाला (UGC) गृह मंत्रालयाच्या सायबर गुन्हे शाखेकडून काही इनपूट प्राप्त झाले होते. ज्यातून मंगळवारी झालेल्या UGC-NET परीक्षेत काही गडबड झाल्याचा संशय बळावत होता. त्यामुळे या परीक्षेची पारदर्शकता अबाधित ठेवण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे ही परीक्षा पुन्हा एकदा घेण्यात येईल. याबाबतची माहिती स्वातंत्रपणे उमेदवारांना देण्यात येईल. तर दुसऱ्या बाजूला परीक्षेची चौकशी करण्यात येईल.

Gold Price Today : सोने- चांदी महागलं!! आजचे भाव इथे चेक करा

Gold Price Today 20 june

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज २० जून २०२४ रोजी सोने- चांदीच्या किमती (Gold Price Today) वाढलेल्या आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर १० ग्राम २४ कॅरेट सोन्याचा दर 71900 रुपयांवर व्यवहार करत आहे. कालच्या तुलनेत या किमतीमध्ये 0.53% म्हणजेच 381 रुपयांची वाढ झालेली आहे. तर दुसरीकडे एक किलो चांदीचा भाव सुद्धा 90385 रुपयांवर व्यवहार करत असून या किमतीमध्ये 1173 रुपयांची घसघशीत वाढ झालेली आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठं आर्थिक फटका बसणार आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

आज MCX वर सोन्याचा भाव ७१६०० रुपयांपासून सुरु झाला.. मात्र थोड्याच वेळात या किमती (Gold Price Today) वाढल्याचे पाहायला मिळाले.१० वाजता तर सोन्याचा दर ७१७९९ रुपयांवर गेला . १२ वाजता सोन्याच्या किमतीनी ७१८९४ रुपयांची उच्चांकी पातळी गाठली. यानंतर हा दर काहीसा कमी झाला असून सध्या २४ कॅरेट १० ग्राम सोने 71900 रुपयांवर व्यवहार करत आहे. तर दुसरीकडे गुड रिटर्न वेबसाईट नुसार, २४ कॅरेट १० ग्राम सोन्याची किंमत ७२४४० रुपये आहे. तर २२ कॅरेट १० ग्राम सोन्याचा भाव ६६४०० रुपये आहे.

गुड रिटर्न नुसार सोन्याचा भाव – Gold Price Today

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)-

पुणे- 66,400 रुपये
मुंबई – 66,400 रुपये
नागपूर – 66,400 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 72,440 रूपये
मुंबई – 72,440 रूपये
नागपूर – 72,440 रूपये

सोन्याची शुद्धता कशी तपासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

Real Estate : भारतातील 17 शहरे बनणार रिअल इस्टेटसाठी उदयोन्मुख ‘हॉट स्पॉट’ : कॉलियर्स रिपोर्ट

real estate

Real Estate : भारताची वाटचाल जगातील सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था होण्याकडे सुरू आहे. यासाठी झपाट्यांने विकसित होणारी शहरं महत्त्वाची भूमिका बजावतायत. आता एका अहवालानुसार पायाभूत सुविधांचा विकास, डिजिटलायझेशन, पर्यटन आणि ऑफिस लँडस्केप मधील बदल या काही घटकांमुळे शहर झपाट्याने विकसित (Real Estate) होतील असं सांगण्यात आलं आहे.

100 हुन आधीक शहरे विकसित होणार

2050 पर्यंत, आठ मेगा-शहरांच्या शिवाय , भारतात 10 लाख लोकसंख्या असलेली जवळपास 100 शहरे असण्याची शक्यता आहे असे या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे. कॉलियर्स (Colliers) कडून सादर केलेल्या “समान वाढ आणि उदयोन्मुख रिअल इस्टेट हॉटस्पॉट्स (Real Estate)”,नामक अहवालात अशा 100 हून अधिक उदयोन्मुख शहरांची ओळख करून दिली आहे, ज्यामुळे त्यांची रिअल इस्टेटची मागणी आणि पुढील ५-६ वर्षांत वाढीची क्षमता निश्चित केली जाईल.

रिअल इस्टेट क्षेत्रात परिवर्तन

पायाभूत सुविधा, परवडणारी घरे, कुशल कामगार आणि सरकारी पाठबळ यामुळे भारतातील रिअल इस्टेट (Real Estate)क्षेत्र एका परिवर्तनातून जात आहे आणि छोटी शहरे अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाची ठरत आहेत. हे क्षेत्र 2030 पर्यंत USD 1 ट्रिलियन आणि 2050 पर्यंत USD 5 ट्रिलियन पर्यंत पोहोचू शकते, जे भारताच्या GDP मध्ये 14-16 टक्के योगदान देईल. कोलियर्स यांच्या अहवालानुसार 2050 पर्यंत दहा लाख लोकसंख्या असलेल्या शहरांची संख्या सुमारे 100 पर्यंत जाईल. तपशीलवार विश्लेषणानंतर कॉलियर्सने 100 पेक्षा जास्त शहरांच्या यादीतून 30 संभाव्य उच्च वाढ असणारी शहरे वेगळी केली आहेत. अहवालात पुढे म्हटले आहे की या 30 पैकी 17 शहरे रिअल इस्टेट हॉट स्पॉट म्हणून उदयास येतील.

या ठिकाणांना प्राधान्य

अमृतसर, अयोध्या, जयपूर, कानपूर, लखनौ आणि वाराणसी या शहरांना सुधारित पायाभूत सुविधा आणि वाढत्या आर्थिक क्रियाकलापांचा फायदा होणार आहे. कनेक्टिव्हिटी आणि सरकारी उपक्रमांचा फायदा घेण्यासाठी ही स्थाने धोरणात्मकदृष्ट्या स्थित आहेत, ज्यामुळे ते रिअल इस्टेट(Real Estate) गुंतवणुकीसाठी आकर्षक ठिकाणे बनतात.

ही शहरे व्यवसायिक वाढीची केंद्रे

पूर्वेकडील प्रदेशातील पाटणा आणि पुरी ही संभाव्य वाढीची केंद्रे म्हणून ओळखली जातात, पायाभूत सुविधांच्या सुधारणांमुळे आणि वाढत्या व्यावसायिक प्रकल्पांमुळे.पश्चिम विभागातील द्वारका, नागपूर, शिर्डी आणि सुरतमध्ये औद्योगिक विकास आणि पायाभूत सुविधांच्या विस्तारामुळे मजबूत वाढ अपेक्षित (Real Estate) आहे. दक्षिणेकडील कोइम्बतूर, कोची, तिरुपती आणि विशाखापट्टणम हे निवासी आणि व्यावसायिक घडामोडींचे प्रमुख केंद्र म्हणून उदयास येत आहेत, ज्यांना स्थानिक अर्थव्यवस्था आणि पायाभूत सुविधांच्या सुधारणांचा आधार आहे.

निवासी शहरांमध्ये यांचा समावेश

मध्य भारतातील इंदूर हे त्याचे धोरणात्मक स्थान आणि वाढत्या औद्योगिक पायामुळे वेगळे आहे, ज्यामुळे ते रिअल इस्टेट (Real Estate) गुंतवणुकीसाठी एक प्रमुख ठिकाण बनले आहे. नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाइपलाइन (NIP) आणि PM गतिशक्ती प्रकल्प हे टियर I शहरांच्या पलीकडे वाढीसाठी महत्त्वपूर्ण आहेत.
कनेक्टिव्हिटी आणि उत्पादन अक्टव्हिटीमुळे या उदयोन्मुख हॉटस्पॉटमधील निवासी विभागांमध्ये मागणी वाढेल अशी अपेक्षा आहे.
हायब्रीड वर्क मॉडेल्सकडे वळल्याने छोट्या शहरांमध्ये ऑफिस स्पेसची मागणी वाढली आहे. कोइम्बतूर, इंदूर आणि कोची सारखी ठिकाणे कमी भाडे खर्च आणि स्वस्त घरांच्या पर्यायांमुळे सॅटेलाइट ऑफिस मार्केट म्हणून वाढलेली रुची पाहत आहेत, दोन्ही कंपन्या आणि कुशल प्रतिभा आकर्षित करत आहेत.

अध्यात्म आणि पर्यटन

वाढत्या डिजिटल प्रवेशामुळे लहान शहरे डेटा सेंटर्स आणि स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चरच्या हबमध्ये बदलत आहेत.जयपूर, कानपूर आणि लखनौ सारखी शहरे ई-कॉमर्स आणि डेटा वापराद्वारे चालविल्या जाणाऱ्या महत्त्वपूर्ण रिअल इस्टेट (Real Estate) साक्षीदार होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे पूर्ती केंद्रे आणि गोदामांचा विकास होईल. अमृतसर, अयोध्या, वाराणसी आणि तिरुपती यांसारख्या मंदिर शहरांना अध्यात्मिक पर्यटनाचा फायदा होणार आहे, ज्यांना पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा आणि सरकारी धोरणांचा पाठिंबा आहे.

वाढणार जीडीपीचा टक्का

वाढत्या पर्यटकांच्या संख्येची पूर्तता करून ही स्थळे हॉस्पिटॅलिटी आणि रिटेल क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करतील अशी अपेक्षा आहे. कॉलियर्स इंडियाचे सीईओ बादल याज्ञिक यांनी ठळकपणे सांगितले की, “सुधारित पायाभूत सुविधा, परवडणारी रिअल इस्टेट, कुशल प्रतिभा आणि सरकारी उपक्रम यामुळे लहान शहरे भारताच्या अर्थव्यवस्थेत गतिशील योगदान देणारे म्हणून उदयास येत आहेत. ही वाढ 2030 पर्यंत रिअल इस्टेट क्षेत्राला अंदाजे USD 1 ट्रिलियन आणि संभाव्य USD 5 ट्रिलियन, 2050 पर्यंत GDP मध्ये 14-16 टक्के वाटा वाढवणार आहे.”

विधानसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीने जागावाटपाचा तोडगा काढलाय

Maha Vikas Aghadi 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभेच्या निकालात महाविकास आघाडीनं सगळे एक्झीट पोल फेल ठरवत दणक्यात विजय मिळवला… ४८ पैकी ३1 जागा जिंकत कॉंग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उद्धवसेनेनं विरोधकांच्या तोंडाला पानं पुसली.. महायुतीचे नेते लोकसभेच्या पराभवाच्या धक्क्यातून अजून सावरलेलेन नसताना महाविकास आघाडीनं (Maha Vikas Aghadi) विधानसभेच्या निवडणुकांची तयारी देखील सुरु केली आहे… लोकसभेला दाखवलेली ऐकी विधानसभेलाही आम्ही कायम ठेवणार असून जागावाटपाचा अंदाजे फॉर्मुलाही महाविकास आघाडीने ठरवल्याचं आता समजतंय.. लोकसभेच्या निकालांचा विधानसभेच्या जागा वाटपांवर मोठा इम्पॅक्ट झाल्याचंही दिसून येतंय.. त्यामुळे या व्हिडीओतून समजून घेऊयात की महाविकास आघाडीत नेमक्या कोणच्या पक्षाला किती जागा सुटतायत? जागावाटपाच्या फॉर्मिल्यात मोठा भाऊ कोण? आणि छोटा भाऊ कोण? जास्तीत जास्त आमदार निवडून आणत महाराष्ट्राची सत्ता पुन्हा आपल्या ताब्यात घेण्यासाठी मविआचा नेमका प्लॅन काय आहे? त्याचंच हे पॉलिटीकल एनालिसीस..

लोकसभेचा निकाल लागला… निकालानुसार कॉँग्रेसनं १७ जागांवर उमेदवार दिले होते.. त्यातले १३ निवडून आले.. ठाकरेंची शिवसेना २१ जागांपैकी अवघ्या ९ जागांवर विजयी झाली.. तर शरद पवारांच्या तुतारीने १० जागांपैकी तब्बल ८ जागांवर विजयश्री खेचून आणला.. त्यामुळे शिवसेना सोडली तर महाविकास आघाडीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आणि कॉंग्रेसचा स्ट्राईक रेट जास्त होता… त्यामुळे विधानसभेला शरद पवार आणि कॉंग्रेसची जास्तीत जास्त जागा मिळवण्याची बार्गेनिंग पॉवर आपसूकच वाढली.. हीच सगळी आकडेमोड बघीतली तर आता १०२ + ९६ +९० चा महाविकास आघाडीचा नवा फॉर्मुला सध्या बाहेर आलाय… या फॉर्म्युलानुसार कॉंग्रेसला १०२ जागा, ठाकरेंच्या शिवसेनेला ९६ जागा तर शरद पवारांची राष्ट्रवादी ९० जागांवर निवडणूक लढवेल… असा हा फॉर्मुला सांगतोय..

त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये लोकसभेच्या निकालात चांगलाच सुळका मारणाऱ्या कॉंग्रेसला सर्वाधिक जागा तर त्याखालोखाल शिवसेना व राष्ट्रवादीला जागा सुटतील, असा अंदाज आहे… यानुसार महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जागावाटप अंतिम करण्यासाठी चर्चेच्या आणखी काही फेऱ्या होणार आहेत. सध्या मविआतील तिन्ही पक्षांनी आपापल्या नेमक्या ताकदीचा अंदाज लावण्यासाठी अंतर्गत यंत्रणा कामाला लावल्या आहेत. ही सगळी माहिती प्राप्त झाल्यानंतर तिन्ही पक्ष पुन्हा एकदा जागावाटपासाठी चर्चेला बसतील… तेव्हा जागावाटपाटपाटचा अंतिम आणि खरा आकडा समोर येईल…

लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यात काँग्रेसला घरघर लागली होती. अनेक बड्या नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. तर पक्षात पडलेल्या फुटीमुळे ठाकरे गट आणि शरद पवार गटाचीही अवस्था तितकीशी चांगली नव्हती. भाजपच्या बड्या यंत्रणेसमोर हे पक्ष कितपत टिकाव धरतील, हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता… मात्र, मविआने ३१ जागा जिंकून युतीला घाम फोडला… त्यामुळे आता विधानसभा निवडणुकाला सामोरं जाताना मविआतील तिन्ही पक्षांचा आत्मविश्वास चांगलाच वाढलाय.. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भाग, मुंबईतील काही भागांत काँग्रेसची ताकद आहे तिथे त्यांना जास्त जागा दिल्या जातील. कोकणासह मुंबई, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भातील काही भागांत उद्धवसेनेची ताकद आहे. शरद पवार गटाची पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भागांत ताकद असल्याने त्यांना तिथल्या जागा दिल्या जाण्याची शक्यता आहे… थोडक्यात काय लोकसभेला ज्या भागात महाविकास आघाडीच्या ज्या पक्षाने चांगली कामगिरी केली त्याच जागांवर विधानसभेलाही जास्तीत जास्त जागा सोडण्याचा प्रयत्न या जागावाटपात होईल…महाविकास आघाडीकडे सध्या असणारी आमदारांची आकडेवारी पाहिली तर कॉंग्रेसकडे ४४ आमदार तर पक्षफुटीमुळे ठाकरेंच्या शिवसेनेकडे १४ तर राष्ट्रवादीकडे १४ इतक्याच आमदारांचं बलाबल आहे… थोडक्यात वर्तमान स्थितीत महाविकास आघाडीची राज्यातील ताकद ७० आमदारांच्या आसपास आहे.. पण अर्थात हा फिल्टर २०१९ च्या निकालाचा, मोदीलाट असताना आणि त्यातही दोन्ही पक्ष फुटल्यानंतरचा असल्यानं याचा सध्या रिलिव्हन्स असण्याची शक्यता तशी कमीच आहे… कारण राज्यात महाविकास आघाडी सध्या स्ट्राँग पोजिशनमध्ये आहे.. लोकसभेच्या निकालाची विधानसभानिहाय आकडेवारी बघीतली तर जवळपास महाविकास आघाडीच्या आमदारांचा आकडा हा १८० च्या घरात जातोय.. म्हणजेच येणाऱ्या विधानसभेला महाराष्ट्रात महाविकास आघाडी स्पष्ट बहुमतात असेल, असं म्हणत येईल..

त्यातही लोकसभेची निवडणुक राष्ट्रीय पातळीवरील महत्वाच्या मुद्दयांवर लढली जाते.. पण विधानसभेला महत्वाचे ठरतात ते स्थानिक मुद्दे.. महाराष्ट्रात सध्या महायुतीचं सरकार आहे. पण फोडाफोडीच्य राजकारणाने हे सरकार बनल्यानं त्याचा स्थानिक पातळीवर बराच राग आहे… या सगळ्या राजकारणाच्या गोंधळात जनतेच्या कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी म्हणावी अशी करता आलेली नाहीये… त्यात लोकसभेला महायुतीला दारुण पराभवाला सामोरं जावं लागल्यानं जनतेत विधानसभेसाठीही योग्य मॅसेज गेलाय… त्यामुळे विधानसभेला आपल्याला फटका बसणार असल्याचं दिसत असल्यानं महायुतीच्या विद्यमान आणि इच्छुक उमेदवारांचीही यामुळे धाकधूक वाढलीय… हे सगळं आपल्या बाजूने प्लसमध्ये असणारं वातावरण पाहता महाविकास आघाडीने निवडणुकीच्या तयारीला योग्य वेळ मिळावा म्हणून जागावाटपाचा तीढा लवकरच हाती घेतलाय.. विशाल पाटलांच्या बाबतीत जे झालं ते विधानसभेला होऊ नये, यासाठीही जागावाटपाची बोलणी आघाडीने लवकर हाती घेतली आहेत…

बॉटमलाईन अशी की लोकसभा निकालातील यशानं हुरळून न जाता विधानसभेला फुल प्लँनिंग करुन आघाडी म्हणून एकदिलाने निवडणूक लढण्याचा मविआचा विचार आहे…. त्यामुळे खासदारकीला वाढलेला आकडा आमदारकीलाही कायम राहून महाविकास आघाडी राज्यात सत्तेत येईल का? हे ठरवणारा जागावाटपाचा कार्यक्रम अद्याप तरी गुलदस्त्यातच आहे..बाकी तुम्हाला काय वाटतं.. विधानसभेच्या निकालात महायुतीच्या कोणत्या पक्षाला किती मतं मिळतील… तुमचा अंदाज काय सांगतो.. ते आम्हाला कमेंट करुन नक्की सांगा..

बाबर आझमने मॅच फिक्सिंग केली; पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T20 विश्वचषक स्पर्धेत आपल्या सुमार कामगिरीने स्पर्धेबाहेर पडलेल्या पाकिस्तानच्या संघाला आधीच टीकाकारांना सामोरे जावं लागत आहे. त्यातच आता कर्णधार बाबर आझमवर (Babar Azam Match Fixing Allegation) मॅच फिक्सिंगचे आरोप करण्यात आल्याने पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पाकिस्तानचे ज्येष्ठ पत्रकार मुबशीर लुकमान यांनी हा खळबळजनक आरोप केला आहे. बाबर आझमने अमेरिका विरुद्धचा सामना फिक्स केला होता असं त्यांचं म्हणणं आहे. अमेरिकेविरुद्धचा सामना हरण्यासाठी बाबरला महागड्या भेटवस्तू मिळाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

सोशल मीडियावर मुबशीर लुकमान यांचा एक विडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते म्हणतात कि, बाबर आझम यांना अमेरिकेकडून महागड्या भेटवस्तू मिळाल्या आहेत. अमेरिकेविरुद्धचा सामना हरण्यासाठी त्याला या भेटवस्तू मिळाल्या. या T20 विश्वचषकात पाकिस्तानचा हा पहिलाच सामना होता आणि तो येथे टाय झाला, त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेने पाकिस्तानवर मात केली. लुकमानचा दावा आहे की बाबरला सट्टेबाजांकडून एक ऑडी कार मिळाली आहे, जी तो त्याच्या भावाकडून भेट असल्याचे सांगत आहे. त्याने सांगितले की बाबरची ऑडी ई-ट्रॉन, जी त्याने त्याला त्याच्या भावाकडून भेट म्हणून दिली होती, ती संशयास्पद बुकींकडून विकत घेतली होती, तर त्याला ऑस्ट्रेलिया आणि दुबईमध्ये अपार्टमेंट देखील मिळाले होते. बाबरचा भाऊ 7-8 कोटींची कार त्याला गिफ्ट का करेल? असा सवालही त्यांनी केला आहे.

दरम्यान, एकेकाळच्या चॅम्पियन असलेल्या पाकिस्तानला यंदाच्या T20 विश्वचषक स्पर्धेत मोठया नामुष्कीचा सामना करावा लागला. अमेरिकेविरुद्व पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा धक्कादायक पराभव झाला. त्यानंतर कट्टर प्रतिस्पर्धी भारताने सुद्धा पाकड्याना लोळवले. या २ पराभवानंतर पाकिस्तानने कॅनडा आणि आयर्लंड विरुद्ध विजय मिळवला मात्र दोन्ही वेळेस त्यांना निकराची लढत द्यावी लागली. आणि सुपर 8 साठी पाकिस्तानचा संघ पात्र होऊ शकला नाही. त्यामुळे आजी माजी क्रिकेटपटूनी पाकिस्तानी खेळाडूंवर आपलं तोंडसुख घेतलं, त्यातच आता कर्णधार बाबर आझमवर मॅच फिक्सिंगचे आरोप झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.