Monday, December 22, 2025
Home Blog Page 664

187 KM रेंजसह बाजारात आली नवी Electric Bike; कंपनी देतेय 40 हजारांचा डिस्काउंट

Oben Rorr electric bike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय मार्केटमध्ये इलेक्ट्रिक गाडयांची चांगलीच चलती असून पेट्रोलचा खर्च वाचवण्यासाठी ग्राहकवर्ग मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करत आहेत. ग्राहकांची वाढती मागणी बघता जवळपास सर्वच वाहन उत्पादक कंपन्या आपल्या गाड्या इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये लाँच करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध कंपनी Oben Electric ने ओबेन रोर बाईक लाँच केली आहे. एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर ही इलेक्ट्रिक बाईक तब्बल 187 KM पर्यंत रेंज देते हि या गाडीची खासियत आहे. आज आपण या इलेक्ट्रिक बाईकचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत याबाबत सविस्तर जाणून घेऊयात…

187 KM रेंज –

Oben Rorr बाईक मध्ये ८ किलोवॅट क्षमतेची पॉवरफुल अशी मोटर बसवण्यात आली आहे. बाईकला IP67 रेटिंगसह 4.4 kWh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. कंपनी बॅटरीवर तीन वर्षे किंवा 50 हजार किलोमीटरची वॉरंटीही देते. एकदा हि बॅटरी फुल्ल चार्ज केल्यानंतर हि इलेक्ट्रिक बाईक तब्बल 187 किलोमीटरपर्यंत अंतर सहज पार करते. यावेळी गाडीचे टॉप स्पीड 100 किलोमीटर प्रति तास इतक असते. अवघ्या तीन सेकंदात हि इलेक्ट्रिक बाइक 0-40 किमी वेग वाढवण्यास सक्षम आहे. ड्रायव्हिंगसाठी या इलेक्ट्रिक बाईक मध्ये इको, सिटी आणि हॅवॉक मोड देण्यात आले आहेत.

अन्य फीचर्स –

अन्य फीचर्सबाबत सांगायचं झाल्यास, या इलेक्ट्रिक बाईकमध्ये एलईडी हेडलॅम्प, सिंगल पीस सीट, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, ड्रायव्हर अलर्ट सिस्टीम, जिओ फेन्सिंग थेफ्ट प्रोटेक्शन, 200 एमएम ग्राउंड क्लीयरन्स, 230 एमएम वॉटर वेडिंग यासारखे फीचर्स आहेत. या इलेक्ट्रिक बाइकची वॉटर वेडिंग क्षमता अंदाजे 230 मिमी आहे. म्हणजेच पाण्याने भरलेल्या रस्त्यावरही तुम्ही हि बाईक आरामात चालवू शकता.

किंमत किती?

कंपनीने ही बाईक 1.50 लाख रुपयात लाँच केली आहे. मात्र कंपनी पहिल्या 100 ग्राहकांना 40 हजार रुपयांची सूट देत आहे. म्हणजेच अवघ्या 1.10 लाख रुपये किमतीत ग्राहक खरेदी करू शकतात.

विषारी दारूमुळे 32 लोकांचा मृत्यू; 60 हून अधिक जणांची प्रकृती गंभीर

Poisonous Liquor Tamil Nadu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दारूचा घोट चक्क जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना तामिळनाडू येथे घडली आहे. तामिळनाडू येथील कल्लाकुरिची जिल्ह्यात विषारी दारू (Poisonous Liquor) प्यायल्यानं 32 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 60 पेक्षा जास्त जणांची प्रकृती गंभीर आहे. जिल्हाधिकारी एमएस प्रशांत यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. सदर लोकांवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहे, मात्र मृतांसाजी संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

याप्रकरणी पोलिसांनी 49 वर्षीय दारू तस्कर के गोविंदराज उर्फ ​​कन्नूकुट्टी याला अवैध दारू विक्री केल्याप्रकरणी अटक केली असून त्याच्याकडून 200 लिटरहून अधिक दारू जप्त करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री, कल्लाकुरिची शहर आणि आसपासच्या भागातील डझनभर लोकांनी करुणापुरममध्ये तस्करांनी विकलेली अवैध दारू प्यायली होती. घरी आल्यावर, त्यापैकी अनेकांना चक्कर येणे, डोकेदुखी, उलट्या, मळमळ, पोटदुखी आणि डोळ्यात जळजळ असा प्रकारचा त्रास सुरु झाल. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना शहरातील एका खाजगी रुग्णालयात आणि कल्लाकुरीची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात नेले, मात्र यावेळी 10 जणांचा मृत्यू झाला.

दरम्यान, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केले आणि ते थांबवण्यात अपयशी ठरलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याचे सांगितलं. त्यांनी ट्विट करत म्हंटल, कल्लाकुरीची येथे भेसळयुक्त दारू प्यायल्याने लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी ऐकून मला धक्का बसला आणि दु:ख झाले. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या लोकांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. शिवाय ते रोखण्यात अपयशी ठरलेल्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे.अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या लोकांची माहिती जनतेने दिल्यास त्यांच्यावर तत्काळ कारवाई केली जाईल. समाजाला बरबाद करणाऱ्या अशा गुन्ह्यांना कठोरतेने ठेचले जाईल.

PNB ग्राहकांसाठी मोठी बातमी!! बँक लवरकच ही खाती करणार बंद; या ग्राहकांना बसणार फटका

Panjab National bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आहे. येत्या 30 जून 2024 पासून या बँकेकडून व्यवहारात असलेली खाती बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे बँकेने ग्राहकांना आणि खातेधारकांना
अलर्ट जारी केला आहे. पंजाब नॅशनल बँक (Panjab National Bank) आता ज्यांच्या खात्यावर गेल्या तीन वर्षांपासून कोणतेही व्यवहार झालेले नाहीत आणि या खात्यांमध्ये शिल्लक रक्कम जमा नाही अशी खाती कायमची बंद करणार आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वीच पंजाब नॅशनल बँकेने आपल्या ग्राहकांना व्यवहारात नसलेल्या खात्यांचे केवायसी करून घ्यावे अशा सूचना दिल्या होत्या. यासाठी बँकेने 30 जूनपर्यंत मुदत वाढवली आहे. परंतु ग्राहकांनी 30 जूनपर्यंत केवायसी केले नाही तर ही खाती बंद केली जातील. याबाबतची माहिती देत बँकेने म्हटले आहे की, सर्वात प्रथम ग्राहकांनी बचत खाते तपासावे. ज्या खात्यांमध्ये गेल्या तीन वर्षांमध्ये कोणतेही व्यवहार झाले नाहीत. तसेच गेल्या तीन वर्षात या खात्यांवरील रक्कम शून्य आहे. अशी खाती बंद होतील.

खाते बंद करण्याचे कारण काय??

महत्त्वाचे म्हणजे, खाते बंद करण्यापूर्वी ग्राहकांना नोटीस पाठवण्यात येईल. ही नोटीस पाठवल्याच्या एक महिन्यानंतर त्या ग्राहकाचे बँक खाते बंद केले जाईल. परंतु ज्या ग्राहकांना बंद केलेली खाते पुन्हा ऍक्टिव्ह करायची असतील त्यांनी बँकेच्या शाखांना भेट द्यावे. दरम्यान, जी खाती अनेक वर्षांपासून वापरली जात नाहीत त्या खात्यांचा स्कॅमर गैरवापर करतात. त्यामुळे अशा प्रकरणांना आळा घालण्यासाठीच पंजाब बँकेने हे मोठे पाऊल उचलले आहे.

बँकेच्या अधिसूचनेनुसार, ज्या खातेधारकांना पुन्हा आपले खाते सुरू करायचे असेल तर त्यांनी बँकेच्या शाखांना भेट द्यावी. तसेच केवायसी फॉर्म भरावा. या फॉर्मसह आवश्यक लागणारी कागदपत्रे जोडावी. त्यानंतरच ग्राहकांचे खाते पुन्हा सक्रिय केले जाईल. लक्षात घ्या की पंजाब बँक डिमॅट खाती बंद करणार नाही. म्हणजेच या खात्यांना केवायसी चा नियम लागू नसेल.

Government Scheme | शेतकऱ्यांना घरबसल्या मिळणार 1 लाख 25 हजार रुपये; जाणून घ्या सरकारची नवी योजना

Government Scheme

Government Scheme | शेती हा आपल्या भारतातील अर्थव्यवस्थेचा एक कणा आहे. त्यामुळे सरकार देखील शेतकऱ्यांसाठी नेहमीच नवनवीन योजना आणत असतात. समाजातील प्रत्येक घटकाचा आणि प्रत्येक व्यक्तीचा विचार करून सरकारकडून योजना (Government Scheme) राबवल्या जातात. आतापर्यंत सरकारने शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक योजना आणलेल्या आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पायाभूत सुविधांची मदत झालेली आहे.

आता देखील शेतकऱ्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातूनच केंद्र सरकारने राज्य सरकारच्या सौर ऊर्जा योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी पीएम सूर्य घरी योजना आणि महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री सौर कृषी योजना या महत्त्वाच्या योजना आहेत. सरकारच्या या योजनेच्या (Government Scheme) माध्यमातून सोलर पॅनल बसवण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते. महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ही एक लोकांच्या दृष्टीने महत्त्वाची योजना आहे. नुकताच योजनेचा दुसऱ्या टप्प्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी आपली जमीन सरकारला भाड्याने देऊन प्रतिहेक्टरी वर्षाला एक लाखापेक्षा जास्त पैसे कमावू शकतात. त्यामुळे घरबसल्या पैसे कमावण्याची ही शेतकऱ्यांकडे एक मोठी संधी आहे.

या योजनेचे काम करण्यासाठी शेतकऱ्यांना आपली जमीन सरकारला भाड्याने द्यावी लागेल. आणि प्रतिहेक्टरी वर्षाला सरकारकडून तुम्हाला 1 लाख 25 हजार रुपये भाडे मिळून मिळेल. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांची जमीन भाडे तत्वावर द्यावी लागणार आहे. या आधी या योजनेतून 75 हजार रुपये भाडे मिळत होते. परंतु आता सरकारने या रकमेत वाढ केलेली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी 1 लाख 25 हजार रुपये वर्षाला मिळतात.

या भाड्यामध्ये दरवर्षी 3 टक्क्यांनी वाढ होत असते. त्यामुळे तुम्ही शेतीशी संबंधित कुठलेही काम न करता. तुमची शेती केवळ भाड्याने देऊन देखील खूप चांगला पैसा कमवू शकतो. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा 20 पुरवठा करणे. हे सरकारचे मुख्य उद्दिष्ट आहे. म्हणजेच सरकारकडून आपल्याला या योजनेचा लाभ देखील मिळणार आहे. आणि पैसे देखील मिळणार आहे. या योजनेमध्ये आता सरकारी आणि खाजगी दोन्ही जमीन वापरता येते.

महावितरणाचे केंद्र आहेत म्हणजे सब स्टेशन असते. त्याच्या पाच किलोमीटरच्या परिघात राहणारे शेतकरी त्यांची जमीन भाड्याने देऊ शकतात. यामध्ये हे क्षेत्र किमान 3 एकर ते कमाल 50 एकर पर्यंत असणे गरजेचे आहे. अशाप्रकारे तुम्ही सरकारला तुमची जमीन भाड्यावर देऊन घरबसल्या पैसे कमावू शकतात.

छगन भुजबळ अजित पवारांची साथ सोडत उद्धव ठाकरेंच्या गटात जाणार?? चर्चांचा जोर वाढला

Chhagan Bhujbal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने महाराष्ट्रात चांगल्या जागा मिळवल्या आहेत. त्यामुळेच आता अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटातील अनेक नेते पुन्हा एकदा घरवापसी करतील अशी चर्चा रंगली आहे. यात पक्षातील अंतर्गत वादामुळे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) देखील नाराज असल्यामुळे ते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करतील अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. असे झाल्यास याचा मोठा परिणाम राजकीय वर्तुळावर होईल.

समोर आलेल्या माहितीनुसार, नाशिकमधून लोकसभेचे तिकीट नाकारल्यानंतर छगन भुजबळ नाराज झाले होते. पुढे त्यांना राज्यसभेवर पाठवले जाईल अशी अपेक्षा होती. मात्र छगन भुजबळ यांच्याऐवजी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्यामुळे आता छगन भुजबळ यांची नाराजी आणखीन वाढली आहे. यामुळेच सोमवारी पार पडलेल्या बैठकीत छगन भुजबळ यांनी वेगळा निर्णय घ्यावा, असा सल्ला त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिला असल्याचे समोर आले आहे.

या बाबतचीच माहिती देत छगन भुजबळ यांच्या निकटवर्ती यांनी सांगितले आहे की, सध्या छगन भुजबळ यांच्याकडे अनेक पर्याय आहेत. त्यामुळे ते या पर्यायांचा सारासार विचार करून योग्य ते निर्णय घेतील. नुकतीच समता परिषदेच्या बैठकीत याबाबत ही चर्चा झाली आहे. परंतु अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. असे असले तरी छगन भुजबळ लवकरच अजित पवार गटातून बाहेर पडतील हे निश्चित आहे. दरम्यान, राजकिय वर्तुळात छगन भुजबळ यांच्या पक्ष सोडण्याबाबत जोरदार चर्चा रंगली आहे. त्यामुळे आता ते काय निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रेल्वे बोर्ड सहाय्यक लोकोपायलटच्या 18,799 रिक्त जागा भरणार; कांचनजंगा ट्रेनच्या दुर्घटनेनंतर घेतला निर्णय

Railway Job

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पश्चिम बंगालमधील कांचनजंगा एक्स्प्रेस दुर्घटनेमध्ये तब्बल दहा जणांनी आपला जीव गमावल्यानंतर भारतीय रेल्वे बोर्डने एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्यात रेल्वे बोर्डाने (Raiway Board) सहाय्यक लोकोपायलट (Train Driver) साठी 13000 हून अधिक नवीन जागा भरण्यासाठी आदेश जारी केला आहे. जारी केलेल्या सूचनांनुसार, सहाय्यक लोकोपायलट (ALP) च्या 18,799 रिक्त जागा भरण्यासाठी रेल्वे बोर्डाने मान्यता दिली आहे. यामुळे तरुणांसाठी नोकरीची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.

जानेवारी महिन्यामध्ये याच पदासाठी 5696 रिक्त जागा भरण्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र आता रेल्वे बोर्ड 5696 पेक्षा अधिक जागा भरणार आहे. महत्वाचे म्हणजे, रेल्वे बोर्डाने सर्व विभागीय रेल्वे महाव्यवस्थापकांना एका आठवड्यात चालक भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे ओव्हर ड्युटी करणाऱ्या चालकांवरील ताण कमी होईल आणि चालकांमुळे होणाऱ्या अपघाताच्या प्रमाणातही घट होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, सोमवारी पश्चिम बंगालच्या दार्जिलिंगमध्ये कांचनजंगा एक्सप्रेसचा भीषण अपघात झाला. या अपघातात
मालगाडीच्या चालकाने थेट कांचनजंगा एक्सप्रेसला जोरदार धडक दिली. यामुळे रेल्वेचेही मोठे नुकसान झाले आणि अनेक प्रवाशांना आपला जीवही गमवावा लागला. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊनच भारतीय रेल्वे बोर्डाने सहाय्यक लोकोपायलटच्या (ALP) 18,799 रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे.

Chilli Farming | किडीचा स्पर्शही ना होता अशाप्रकारे करा मिरचीची लागवड; मिळेल भरघोस उत्पन्न

Chilli Farming

Chilli Farming | खरीप हंगामात अनेक पिकांची लागवड केली जाते. अनेक कापसाची लागवड केली आहे. कापसाप्रमाणेच लाल मिरचीची देखील लागवड या हंगामात केली जाते. मध्य प्रदेशातील खरगोनमध्ये देखील याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. या जिल्ह्यामध्ये 48000 हेक्टर वर लाल मिरचीची लागवड करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची मिरचीची बाजारपेठेही बेडीया येथे केली जाते. या मिरचीची लागवड जुलैमध्ये पाऊस पडल्यानंतर केली जाते. परंतु या पिकावर रोगाचा प्रभाव झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते. परंतु बागायत विभागाने दिलेल्या प्रक्रियेचे पालन शेतकऱ्यांनी केले, तर मिरची (Chilli Farming) त्याचप्रमाणे इतर पिकांवर देखील रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही.

शेतकऱ्यांनी घ्या ही काळजी | Chilli Farming

उपसंचालक केके निगवाल यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात शेतात खोल नांगरणी करून घेणे गरजेचे आहे. मेंढे स्वच्छ ठेवा. त्याचप्रमाणे शेताच्या सभोवतालची जुनी विषाणू संक्रमित मिरची टोमॅटो आणि पपईची झाडे नष्ट करा. शेतात जर जास्त पाऊस पडला, तर पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य ती सोय करा.

शेतात रोपे कशी लावायची ?

रोपवाटिकेतील रोपे 35 दिवसांची झाल्यावर शेतात लावा. रस शोषणाऱ्या किडींपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी रोपांची मुळे रोपे लावण्यापूर्वी इमिडाक्लोप्रिड 17.8 टक्के एसएल 0.3 मिली प्रति लिटर पाण्यात 20 मिनिटे बुडवून ठेवावीत आणि नंतर शेतात लावावीत. मिरचीच्या शेताभोवती ज्वारी आणि मक्याच्या दोन-तीन ओळी लावणेही फायदेशीर ठरते. शेतात रोगाची सुरुवातीची लक्षणे दिसू लागल्यावर वाळलेली झाडे उपटून टाकावीत आणि खड्ड्यात टाकून बंद करावीत.

पिकांचे रोगांपासून संरक्षण करा

उपसंचालक म्हणाले की, रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रोगग्रस्त झाडे शेतातून उपटून ती दिसताच नष्ट करावीत. शेतात पांढऱ्या माशीचे निरीक्षण करण्यासाठी, पिवळी चिकट पत्ते (स्टिकी कार्ड) 10 प्रति एकर या दराने लावावीत. मिरची लावल्यानंतर 30 ते 35 दिवसांनी, नीम सीड कर्नल एक्स्ट्रॅक्ट (NSKE) 5 टक्के किंवा नीम तेल ३००० पीपीएम ३ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून 10 दिवसांच्या अंतराने दोनदा फवारणी करावी.

व्हाईटफ्लाय नियंत्रण | Chilli Farming

मिरचीवरील पांढऱ्या माशीच्या पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी, पायरी प्रॉक्सीफॅन 10 टक्के ईसी 200 मिली प्रति एकर 120 लिटर पाण्यात किंवा फेनप्रोपेचिन 30 टक्के ईसी 100 ते 136 मिली प्रति एकर 300 ते 400 पाण्यात मिसळून किंवा पायरी प्रॉक्सीफॅन 5 टक्के प्रॉक्सीफॅन 5टक्के इ.सी. 15 टक्के EC 200 ते 300 मिली प्रति एकर 200 ते 300 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कीटकनाशकांची फवारणी 14 दिवसांच्या अंतराने करा. कीटकनाशकांची फवारणी फळे तयार होण्याच्या अवस्थेपर्यंत करा आणि तेच कीटकनाशक पुन्हा पुन्हा वापरू नका.

Cobra Snake : अरे बापरे!! Amazon च्या पार्सलमध्ये आढळला विषारी साप; ग्राहक सुरक्षेच्या नावाने बोंब

Cobra Snake

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Cobra Snake) आजकाल मार्केटमध्ये जाऊन शॉपिंग करणाऱ्यांची संख्या फार कमी झाली आहे. कारण जो तो डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शॉपिंगची हौस पूर्ण करू लागला आहे. अनेक ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट्समुळे घरबसल्या आवडत्या वस्तूची निवड करणे आणि ती खरेदी करणे फार सोपे झाले आहे. यामध्ये Amazon ही शॉपिंग साईट टॉपमध्ये आहे. अमॅझॉनवर अनेक ग्राहक नियमित शॉपिंग करत असतात. मात्र, नुकताच एका दाम्पत्याला अमॅझॉनवर खरेदी केल्याचा पश्चाताप झाला असेल. या दाम्पत्याला आलेला भीतीदायक अनुभव त्यांनी सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे.

काय झालं?

बंगळुरुत राहणाऱ्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअर दाम्पत्याने Amazon वर एक्स बॉक्स कंट्रोलर खरेदी केला होता. ज्याचं पार्सल घरी येताच त्यांनी खोललं आणि त्यांना घाम फुटला. कारण या पार्सलमधून चक्क जिवंत विषारी साप बाहेर आला. ज्याला पाहताच या दाम्पत्याची चांगलीच घाबरगुंडी उडाली. विशेष म्हणजे, या बॉक्समधून बाहेर आलेला साप हा कोब्रा जातीचा (Cobra Snake) होता. त्यामुळे आपल्या समोर जिवंत कोब्रा पाहून या दाम्पत्याची अवस्था काय झाली असेल? याचा अंदाज आपण लावू शकतो. सुदैवाने हा विषारी साप पॅकिंगच्या टेपमध्ये अडकला होता आणि त्यामुळे दाम्पत्य सुखरूप आहे.

दाम्पत्याने शेअर केला व्हिडीओ (Cobra Snake)

हा धक्कादायक प्रकार सर्वांसमोर उघड करण्यासाठी बंगळुरुतल्या या सॉफ्टवेअर इंजिनिअर कपलने एक व्हिडीओ बनवला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओत त्यांनी म्हटलंय की, ‘आम्ही Amazon वरुन एक्सबॉक्स कंट्रोलर मागवला होता. त्या बॉक्समध्ये जिवंत साप होता. Amazon च्या डिलिव्हरी बॉयने हा बॉक्स आमच्या हातात दिला नाही तर तो आमच्या घराबाहेर हा बॉक्स ठेवून गेला होता. आम्ही बंगळुरुतल्या सराजपूर रोड या ठिकाणी असलेल्या इमारतीत राहतो. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. तसंच प्रत्यक्षदर्शीही आहेत, ज्यांनी आम्हाला याबाबत सांगितलं असं या दाम्पत्याने व्हिडीओत म्हटलं आहे’.

या घटनेसाठी जबाबदार कोण?

या दाम्पत्यातीलं सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेने म्हटले, ‘सुदैवाने तो साप पॅकिंग टेपमध्ये अडकला होता. ज्यामुळे तो आम्हाला काही इजा करू शकला नाही. याबाबत आम्ही Amazonला संपर्क केला असता त्यांच्या ग्राहक सेवा अधिकाऱ्यांनी २ तास तुम्हीच या प्रसंगाशी दोन हात करा, असे सांगितले. त्यामुळे हा बॉक्स समोर ठेवून आम्ही त्यावर लक्ष ठेवला. ज्यात आमची अर्धी रात्र झाली. आम्ही दिलेले पैसे कंपनीने परत केले. पण, विषारी साप (Cobra Snake) आल्याचा जो धोका होता त्याचं काय? हा साप कुणाला चावला असता तर जीव गेला असता. Amazon कंपनीने निष्काळजीपणा केला आहे आणि त्यामुळे ही घटना घडली. या घटनेसाठी जबाबदार कोण आहे?’ असा प्रश्न या महिलेने उपस्थित केला आहे.

Amazon कंपनीने दिलं उत्तर

या घटनेला सामोरे गेलेल्या इंजिनिअर दाम्पत्याने शेअर केलेल्या व्हिडिओ पोस्टवर Amazon कंपनीने खेद व्यक्त करत म्हटले, ‘आमच्या ग्राहकांना जो त्रास सहन करावा लागला त्याचे आम्हाला वाईट वाटत आहे. आमची टीम लवकरच तुम्हाला याबाबत माहिती देऊ’. यावर दाम्पत्याने म्हटले, ‘आम्हाला कंपनीने सगळे पैसे परत केले. (Cobra Snake) मात्र, अधिकृतरित्या त्यांनी दिलगिरी व्यक्त केली नाही. तसेच घडलेल्या प्रकाराची नुकसान भरपाईदेखील दिलेली नाही. सुरक्षेच्या नियमांचं उल्लंघन झालं आहे आणि भविष्यातही यात काही सुधारणा होईल असं वाटत नाही’.

Tan Removal Home Remedies : उन्हामुळे त्वचा टॅन झालीये? चिंता सोडा!! ‘या’ उपायांनी घरच्याघरी दूर होईल काळपटपणा

Tan Removal Home Remedies

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Tan Removal Home Remedies) उन्हात घराबाहेर पडायचं म्हटलं की, जीवावर येतं. एकतर कडक उन्हाचे चटके सहन करावे लागतात आणि दुसरं म्हणजे टॅनिंगची समस्या होते. उन्हात बाहेर पडताना सनस्क्रीन लावणे, चेहरा आणि हात पाय पूर्ण झाकतील याची काळजी घेणे फार गरजेचे असते. पण बरेच लोक याकडे दुर्लक्ष करतात आणि यामुळे बराच वेळ उन्हात राहिल्याने त्यांची त्वचा काळपट पडते. ज्याला टॅनिंग म्हणतात.

हे टॅनिंग इतकं हट्टी असतं की, काही केल्या जात नाही. बराच काळ हा काळपटपणा तसाच राहतो आणि परिणामी शरीराच्या इतर भागापेक्षा टॅनिंग झालेली त्वचा वेगळी दिसू लागते. जे फार विचित्र दिसतं. (Tan Removal Home Remedies) तुम्हीही टॅनिंगच्या समस्येने त्रस्त असाल तर ही बातमी पूर्ण वाचा. कारण आज आम्ही तुम्हाला घरच्याघरी टॅनिंग काढून टाकतील असे काही उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमच्या त्वचेवरील काळपटपणा दूर होईल. चला जाणून घेऊया.

1. कच्चे दूध ((Tan Removal Home Remedies))

टॅनिंगवर सगळ्यात प्रभावी उपाय म्हणजे कच्चे दूध. यातील लॅक्टिक ॲसिड त्वचेवरील काळपटपणा दूर करण्यासाठी ब्लीचिंग एजंट म्हणून काम करते. यासाठी कच्चे दूध घ्या आणि टॅन झालेल्या भागावर हलक्या हाताने चोळा. साधारण अर्ध्या तासाने तो भाग स्वच्छ धुवा. असे आठवडाभर करा. कच्चे दूध हे आपल्या त्वचेला एक्सफोलिएट करते आणि यामुळे मृत त्वचेच्या पेशी निघून जातात. परिणामी त्वचा आधीसारखी तेजस्वी आणि मुलायम होते.

2. बटाट्याचा रस

टॅनिंग दूर करण्यासाठी बटाट्याचा रस देखील फायदेशीर ठरतो. कारण, यामध्ये कॅटेकोलेज नावाचे एन्झाइम असते. ज्याच्या वापराने त्वचेचा रंग सुधारतो आणि काळे डाग निघून जातात. यासाठी बटाट्याचा रस काढण्याऐवजी थेट बटाट्याचे कापदेखील वापरता येतील. टॅनिंग झालेल्या त्वचेवर बटाट्याचा रस किंवा काप चोळा आणि थोड्या वेळाने तो भाग स्वच्छ धुवा. यानंतर लगेच तुम्हाला फरक दिसेल.

3. ताज्या कोरफडीचा गर

त्वचेवरील टॅनिंग दूर करण्यासाठी ताज्या कोरफडीचा गर वापरा. (Tan Removal Home Remedies) टॅन झालेल्या त्वचेवर कोरफडीचा गर लावा आणि अर्ध्या तासाने तो भाग धुवा. यामुळे टॅनिंग खूप कमी होईल. आठवड्याभरात याचा परिणाम दिसून येईल.

4. काकडी

टॅनिंगवर काकडीचे काप किंवा रस फायदेशीर मानला जातो. कारण यामध्ये जळजळ आणि खाज कमी करणारी तत्त्व असतात. शिवाय काकडीतील थंडपणा त्वचेला ओलावा प्रदान करतो. (Tan Removal Home Remedies) यामुळे टॅनिंग झाली तर काकडी हा एक प्रभावी उपाय ठरतो.

5. दही

टॅनिंग दूर करण्यासाठी दह्याचा चांगला वापर करता येतो. यासाठी १ वाटी दह्यात चिमूटभर हळद घालून तयार पेस्ट टॅनिंगवर लावा. अर्ध्या तासाने तो भाग स्वच्छ पाण्याने धुवा. (Tan Removal Home Remedies) यामुळे त्वचेवरील काळेपणा दूर होऊन तुमचा रंग उजळतो.

6. बेसन

सूर्यप्रकाशामुळे टॅन झालेली त्वचा पुन्हा पूर्वीसारखी तेजस्वी करायची असेल तर बेसन एक उत्तम पर्याय आहे. कारण, बेसनमुळे त्वचेची टॅनिंग दूर होते. अगदी २ चमचे बेसन आणि त्यात गुलाबपाणी मिसळून तयार पेस्टने टॅन झालेला भाग स्क्रब करा. अर्ध्या तासाने पाण्याने स्वच्छ करा. काही मिनिटांतच तुम्हाला फरक दिसून येईल. (Tan Removal Home Remedies)

AIIPMR Mumbai Bharti 2024 | AIIPMR मुंबई येथे मोठी भरती सुरु; अशा प्रकारे करा अर्ज

AIIPMR Mumbai Bharti 2024

AIIPMR Mumbai Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. आम्ही नेहमीच तुमच्यासाठी नोकरीच्या नवीन संधी घेऊन येत असतो. जेणेकरून तुम्हालाही त्याचा फायदा होईल. आज देखील असेच एक संधी घेऊन आलेलो आहोत. मुंबईमध्ये जॉब करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. कारण आता अखिल भारतीय औषधे व पुनर्वसन संस्था मुंबई (AIIPMR Mumbai Bharti 2024) यांच्या अंतर्गत एक भरती जाहीर करण्यात आलेली आहे.

या भरती अंतर्गत वरिष्ठ निवासी आणि निबंधक या पदांच्या रिक्त जागा आहेत. या पदांच्या एकूण 6 रिक्त जागा आहेत. आणि त्या जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. त्याचप्रमाणे 29 जून 2024 करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

पदाचे नाव | AIIPMR Mumbai Bharti 2024

या भरती अंतर्गत वरिष्ठ निवासी आणि निबंधक या दोन पदासाठी जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

या पदांच्या एकूण 6 रिक्त जागा आहेत आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहे.

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत जर तुमची निवड झाली तर तुम्हाला मुंबई या ठिकाणी नोकरी करावी लागेल

वयोमर्यादा

35 ते 45 वर्ष दरम्यान असलेल्या व्यक्तींना या भरतीसाठी आहे अर्ज करता येईल.

अर्ज पद्धती

या भरतीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

संचालक ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल मेडिसिन अँड रिहॅबिलिटेशन मुंबई हाजी अली पार्क, महालक्ष्मी 400034 खोली क्रमांक 201, दुसरा मजला ब्लॉक बी

अर्ज करण्याची शेवटची तारीख

29 जून 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे

वेतनश्रेणी

वरिष्ठ निवासी – 67,700 ते 20,87,000 हजार रुपये
निबंधक – 35,400 ते 1,12,400 रुपये

अर्ज कसा करावा ? | AIIPMR Mumbai Bharti 2024

  • या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
  • दिलेल्या पत्त्यावरच अर्ज करा
  • अर्ज करताना सर्व कागदपत्र जोडा.
  • अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
  • 29 जून 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.