Tuesday, December 9, 2025
Home Blog Page 6706

गिया आणि मितान, आयुष्यभर मैत्री निभावण्याची अजब प्रथा

Screenshot
Screenshot

या आहेत प्रियंका आणि निसा. ह्या दोन्ही मुली एकमेकांच्या गिया आहेत. गिया म्हणजे मैत्रिणी. अशा मैत्रिणी ज्यांना एकमेकांसोबत आयुष्यभर मैत्री निभवावीच लागेल !

बऱ्यापैकी संपूर्ण छत्तीसगड राज्यात ही प्रथा आहे. आपल्या गावांत किंवा आपल्या आजूबाजूच्या गावांत घरातल्या छोट्या मुला – मुलीसारखी दिसणारी किंवा सारखे नाव असणारी आणि थोडीफार साम्यता असणारी दुसरी तिच्याच वयाची मुलगी किंवा मुलगा असेल तर त्यांचे घरचे लोकं एकत्र येतात आणि एक सोहळा करून त्यांची मैत्री जाहीर करतात. ह्या सोहळ्यात दोन्ही घरचे सगळे लोकं असतात. गावचे लोक असतात. पूजा – अर्चा होते. मंत्रपठण होतं. जेवणाच्या पंगती बसतात.

याचेही काही नियम असतात. मुलगा आणि मुलगा यांचीच मैत्री होऊ शकते. आणि एक मुलगी आणि दुसरी मुलगी यांचीच अशी मैत्री होऊ शकते. मुलगा – मुलगी यांची अशी मैत्री होऊ शकत नाही.
आणि नात्यातल्या मुलामुलीशी असं नातं बनत नाही.
गिया किंवा मितान कोणत्याही जातीचा असला तरी चालतं ही अजून एक महत्त्वाची गोष्ट.

एका मुलाची दुसऱ्या मुलाशी मैत्री झाली तर त्याला ‘मितान’ म्हणतात. आणि मुलीशी-मुलीशी असणाऱ्या मैत्रीला ‘गिया’ म्हणतात. हें नातं जोडताना लग्नासारखा मोठा सोहळा केला जातो. आणि हे नातं त्यांना आयुष्यभर जोपासायच लागेल ही समाजाची त्यांच्याकडून अपेक्षा असते. एकमेकांचे गिया किंवा मितान असणारे लोकं एकमेकांच्या आई- वडिलांनाही आई – वडीलच समजतात आणि त्यांना आई वडील असच पुकारतात. त्यांच्या नंतरच्या पिढीलाही हे नातं जोपासावच लागतं.

जातीची क्रायटेरीया सोडला तर हे लग्नाच च एक रूप आहे असं वाटावं इतक ते लग्न ह्या संकल्पनेशी सान्धर्म्य साधतं.

ठिकाण – गेजामौडा

जिल्हा – रायगड

राज्य – छत्तीसगढ

श्वेता पाटील

कमवा आणि शिका योजनेत प्रत्येक गरजू विद्यार्थ्याला काम मिळावं या मागणीसाठी अभाविप चे पुणे विद्यापीठात आंदोलन

IMG WA
IMG WA

पुणे | प्रतिनिधी

सावित्रीबाई फुले विद्यापीठात शिकणाऱ्या व कमवा आणि शिका योजनेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला कमवा आणि शिका योजनेत घेतलं गेलं पाहिजे या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आज आंदोलन केले. विद्यापीठात शिकणारे अनेक विद्यार्थी ग्रामीण व दुर्गम भागातून येत असतात.अशावेळी कमवा आणि शिका योजनेतील संख्या मर्यादित ठेवली तर गरीब विद्यार्थ्यांना इतर ठिकाणी काम बघावे लागते. स्वावलंबनाची शिकवण देणाऱ्या कर्मवीर अण्णांच्या कमवा आणि शिका योजनेत विद्यार्थी विद्यापीठातच काम करुन पैसे मिळवू शकतात. त्यामुळे मागेल त्याला काम या कारणासाठी हे आंदोलन केले गेले आहे. यासोबतच विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला जयकर ग्रंथालयात प्रवेश मिळाला पाहिजे ही मागणीही आंदोलकांनी यावेळी उचलून धरली. यावेळी विकास खंडागळे, प्रताप हरकळ, रंगा हनुमंत, अजय चौधरी व इतर सहकारी उपस्थित होते. विद्यापीठ आवारातच हे आंदोलन सुरु असून दौऱ्यावर असलेले कुलगुरु नितीन करमाळकर याबाबतीत काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

बाप्पाला खूप मिस करतेय – सोनाली बेंद्रे

unnamed
unnamed

पुणे | प्रतिनिधी

न्यू यॉर्कमध्ये कर्करोगावर उपचार घेत असलेली बाॅलिवुड अभिनेत्री सोनाली बेंद्रे गणेशोत्सव मिस करत आहे. इंस्टाग्रामवर केलेल्या एका पोस्टमधे इमोशनल होत सोनालीने नुकताच तिच्या कुटुंबीयांचा गणपती स्पेशल फोटो शेअर केला असून आपण गणेशोत्सवाला खूप मिस करत असल्याचं म्हटलं आहे.

‘गणेशोत्सव सेलिब्रेशन माझ्यासाठी नेहमीच खास राहीले आहे. सध्या मी माझ्या घरचा गणेशोत्सव खूप मिस करत आहे.’ असे म्हणून तिने आपल्या चाहत्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘आज बाप्पाच्या आशीर्वादामुळे मी सुखरूप आहे, बाप्पा नेहमीच माझ्या हृदयाजवळ राहिला आहे. त्याच्या येण्याने नक्कीच चैतन्य आणि प्रेमात वाढ झाली असल्याचंही’ सोनाली इंन्स्टाग्राम पोस्टवर म्हटले आहे.

 

आपल्या सहकाऱ्याला वाचवण्यासाठी केली किडनी दान

IMG WA
IMG WA

पीटीआय | प्रतिनिधी
कुटुंबातील बाकी सदस्य असमर्थ ठरत असताना ऑफिसमधील एका सहकाऱ्यानेच किडनी दान करण्याची अनोखी घटना आज कोलकत्त्यात पहायला मिळाली. पीडित तरुणी ही झारखंडची रहिवासी असून किडनीच्या गंभीर आजाराने ती त्रस्त होती. बंगलोरमधील आयटी कंपनीत हे दोघेही कार्यरत आहेत. फॉरटीस हॉस्पिटल आणि कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये ही शस्त्रक्रिया पार पडली असून दोघेही सध्या सुखरुप असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

राष्ट्रपती पदक विजेत्या मुलीवर सामूहिक बलात्कार

gang rape
gang rape

हरियाणा | प्रतिनिधी

सीबीएसई परीक्षेत देशात अव्वल क्रमांक मिळवून राष्ट्रपती पदक मिळवलेल्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हरियाणातील महेंद्रगड जिल्ह्यातील कनिन परिसरात ही घटना घडली असून पीडित तरुणी तीव्र मानसिक धक्क्यात आहे. हाती आलेल्या माहीतीनुसार, पीडित मुलगी रेल्वेच्या परिक्षेची तयारी करत होती. परिक्षेच्या तयारीसाठी तिने महेंद्रगड येथील कनिनामधे कोचिंग क्लास लावला होता. शिकवणीसाठी जात असताना धावत्या कारमध्ये तिला ओढण्यात आले. त्यानंतर ५ जणांनी मिळून आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला. घटनेनंतर तिला कनिन बसस्थानकावर तशाच अवस्थेत सोडून देण्यात आले.

हाती आलेल्या माहीतीनुसार, पीडित मुलगी रेल्वेच्या परिक्षेची तयारी करत होती. परिक्षेच्या तयारीसाठी तिने महेंद्रगड येथील कनिनामधे कोचिंग क्लास लावला होता. शिकवणीसाठी जात असताना धावत्या कारमध्ये तिला ओढण्यात आले. त्यानंतर ५ जणांनी मिळून आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला. घटनेनंतर तिला कनिन बसस्थानकावर तशाच अवस्थेत सोडून देण्यात आले.

दरम्यान या घटनेची नोंद रेवारी आणि महेंद्रगड पोलीस स्टेशनमध्ये झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

भारतीय स्टेट बँकेत विविध पदांची भरती

डेप्युटी मॅनेजर (सिक्योरिटी) – २७ जागा

शैक्षणिक पात्रता – पदवीधर, सशस्त्र दलांमध्ये किंवा पोलीस अधिकारी म्हणून कमीतकमी ५ वर्षे सेवा

वयोमर्यादा – ३१ ऑगस्ट २०१८ रोजी २८ ते ४० वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

फायर ऑफिसर – २१ जागा

शैक्षणिक पात्रता – बीई (फायर) किंवा बी.टेक (Safety & Fire Engineering) किंवा बी.टेक (Fire Technology & Safety Engineering) किंवा बी.एस्सी.(Fire) किंवा समतुल्य आणि ५ / १० वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा – ३१ ऑगस्ट २०१८ रोजी ३५ ते ६२ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २४ सप्टेंबर २०१८

अधिक माहितीसाठीhttps://bit.ly/2wYK1ZN

ऑनलाईन अर्जासाठीhttps://bit.ly/2wSYDK5

धकधल गर्ल माधुरी दिक्षितच्या घरी बाप्पांचे आगमन

images
images

मुंबई | देशभरात आज गणपती बाप्पाचं वाजत गाजत स्वागत केलं जात आहे. घरोघरी बाप्पा विराजमान होत आहेत. यापर्श्वभूमीवर धकधक गर्ल आणि बाॅलिवूड अभिनेत्री माधुरी दिक्षित ने सोशन मिडियावरुन आपल्या चाहत्यांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी बाप्पांसोबतचा फोटोही माधुरीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंट वरुन शेअर केला आहे. मोदक, फेमिली गेदरींग, डान्स असे हॅशटॅग वापरुन माधुरीने चाहत्यांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

न्या. रंजन गोगोई यांची सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती

images
images

दिल्ली | न्या. रंजन गोगोई यांची सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गोगोईंच्या नियुक्तीची घोषणा केली. येत्या ३ ऑक्टोबर रोजी ते ४६ वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारतील. गोगोईंच्या निमित्ताने प्रथमच ईशान्य भारतातील व्यक्ती सरन्यायाधीशपदी नियुक्त होत आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे सध्याचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा २ ऑक्टोबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यांनी आपले उत्तराधिकारी म्हणून गोगोईंचे नाव केंद्र सरकारला पाठवले होते. त्यावर केंद्र सरकारने शिक्कामोर्तब केले असून गोगोई १७ नोव्हेंबर २०१९ पर्यंत सरन्यायाधीशपदी कार्यरत राहणार आहेत.

न्या. गोगोईंचा इतिहास –

२८ फेब्रुवारी २००१ रोजी गुवाहाटी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणुन नियुक्ती

१२ फेब्रुवारी २०११ रोजी पंजाब-हरयाणा हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश म्हणुन नियुक्ती

एप्रिल २०१२ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदाची जबाबदारी

आसाममधील नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजन (एनसीआर) अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेवर सध्या देखरेख करण्याचे काम करत आहेत.

 

पीएनजी ज्वेलर्स तर्फे थिंक प्युअर अ‍ॅवॉर्डस प्रदान

पुणे | समिर रानडे

‘दाजीकाका सतत कामात असत पण जेव्हा कामात नसत तेव्हा लोकात असत. कायम लोकांशी संवाद साधत ते प्रत्येकाला आपलेसे करायचे. हीच लोक संपर्काची कला एकविसाव्या शतकात यशाची गुरुकिल्ली आहे’ असे मत सिंबायोसिस चे संस्थापक डॉ एस बी मुजुमदार यांनी व्यक्त केले. पीएनजी ज्वेलर्सच्या थिंक प्युअर सोशल वेलफेअर फौंडेशन द्वारा टिळक स्मारक मंदिर येथे आयोजित पुरस्कार प्रदान समारंभात ते बोलत होते.

स्वर्गीय दाजीकाका गाडगीळ यांच्या स्मरणार्थ त्यांच्या 104 व्या जयंतीचे औचित्य साधून थिंक प्युअर अ‍ॅवॉर्डस सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला सिम्बायोसिसचे संस्थापक व अध्यक्ष डॉ.एस.बी.मुजूमदार,कायनेटिक उद्योगसमुहाचे अध्यक्ष अरूण फिरोदिया, पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ, कार्यकारी संचालक पराग गाडगीळ व संचालक विद्याधर गाडगीळ उपस्थित होते. यावेळी डॉ.मुजुमदार यांनी दाजीकाकांविषयीच्या आठवणींना उजाळा दिला.

याप्रसंगी बोलताना अरूण फिरोदिया म्हणाले की, पु.ना.गाडगीळचे जरी पीएनजी ज्वेलर्स मध्ये रूपांतर झाले असले तरी आमच्यासाठी ते पुण्यातील नामवंत गाडगीळ ज्वेलर्स असे आहे.कारण एक शतकाहून अधिक काळ सचोटीने काम करत त्यांनी सोन्याला झळाळी दिली आहे. पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ म्हणाले की सकारात्मकता,कामातील रुची आणि बदलांशी सुसंगत राहणे ही दाजीकाकांमधील वैशिष्टये होती. मनात शुध्दता असेल तर यश नक्की मिळेल हे दाजीकाका म्हणत.त्यांच्या ह्या गुणांनी प्रेरित होऊन विविध क्षेत्रात अशा वैशिष्ट्यांनी कामगिरी करणार्‍या व्यक्तींना सन्मानित करण्याच्या भावनेतून थिंक प्युअर पुरस्कार आम्ही चार वर्षांपूर्वी सुरू केले. थिंक प्युअर सोशल वेलफेअर फौंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम आम्ही राबवत आहोत.येत्या दिवाळीपर्यंत नव्याने पाच फ्रँचायझी सुरू करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुरस्कारांची विभागणी विविध श्रेणीअंतर्गत करण्यात आली होती. त्यामध्ये आयकॉन ऑफ महाराष्ट्र हा पुरस्कार विशेष सरकारी वकील व पद्मश्री उज्वल निकम यांना देण्यात आला. सर्वोत्कृष्ट सामाजिक कार्यासाठी डॉ.भार्गवी दावर, शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.अरूण निगवेकर,कला क्षेत्रातील कार्याबद्दल राहुल देशपांडे, व्यावसायिक क्षेत्रातील कार्याबद्दल दीपक छाब्रिया, क्रीडा क्षेत्रातील कार्याबद्दल केदार जाधव आणि पब्लिक सर्व्हिस क्षेत्रातील कार्यासाठी रविंद्र सेनगावकर यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यात गायक राहुल देशपांडे आणि त्यांच्या टीमने गायनाचा कार्यक्रम सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केलेे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ यांनी केले तर आभार प्रदर्शन पराग गाडगीळ यांनी केले.

लोकमान्य टिळकांचे चरित्र रांगोळीतून साकारले, केसरीवाडा गणेशोत्सवाचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष

New Doc ..
New Doc ..

पुणे | श्रीरंग कलादपर्ण ने यंदाच्या वर्षी केसरीवाडा गणेशोत्सवाचे शतकोत्तर रौप्य महोत्सवाचे अवचीत्य साधून “लोकमान्य टिळकांचे चरित्र रांगोळीतून साकारले आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध रंगावलीकार जगदिश चव्हाण आणि प्रा. अक्षय शहापूरकर आणि त्यांचे २० विद्यार्थी यांच्या वतीने “लोकमान्य” या शीषर्काने भव्य ३३ वे रंगावली प्रदर्शन टिळकांचे वास्तव्य असलेल्या केसरीवाडा, पुणे या ऐतिहासिक
वास्तूमधे आयोिजत करण्यात आलेले आहे.

नावाला अनुसरून या प्रदर्शनात लोकमान्यांच्या जीवनातील महत्वाचे प्रसंग रांगोळी द्वारे मांडण्यात आलेले आहेत. सावर्जनक शिवजयंती आणि गणेशोत्स उत्सवास प्रारंभ, विदेशी कपड्यांची होळी, न्यू इंग्लिश स्कूल ची स्थापना, मंडाले तुरुंगातील गीतारहस्यचे लिखाण, स्वराज्य हा माझा जन्मसद्ध हक्क आहे आण तो मी मिळवणारच! हा कोर्टप्रसंग इत्यादी १७ रांगोळ्यांचा समावेश करण्यात आलेला आह.

या प्रदशर्नाचे उदघाटन दिनांक १३ सप्टेंबर रोजी शास्त्रीय गायिका मंजुषा पाटील यांच्या शुभहस्ते
पार पडले. यावेळी टिळकांच्या कुटुंबातील डाॅ. रोहीत टिळक आणि गीताली टिळक – मोने हे उपिस्थत
होते. १३ ते २१ सप्टेंबर या कालावधीत दुपार २ ते रात्री १० पर्यंत हे प्रदशर्न पाहण्यास सवार्ना विनामूल्य उपलब्ध असेल. २ ते ५ ही वेळ शालेय विद्यार्थ्यांकरता राखीव ठेवण्यात आलेली आहे.
श्रीरंग कलादपर्णचे संस्थापक जयंत गुरव आणि त्यांचे सहकारी प्रतिक अथने, कमलेश कासट, कौस्तुभ वतर, शैनेश्वर खराड, त्रिवेणी पवार, अनिता खांदवे आदींनी प्रदशर्नाचे संयोजन केले आहे.