Tuesday, December 9, 2025
Home Blog Page 6707

विजय मल्ल्याचा गौप्यस्फोट, भारत सोडण्यापूर्वी अर्थमंत्री अरुण जेटलींची घेतली होती भेट

Screenshot
Screenshot

लंडन | भारतीय बँकांचे हजारो कोटींचे कर्ज बुडवून फरार झालेला किंगफिशरचा मालक विजय मल्ल्या याने लंडन येथे सुरु असलेल्या सुनावणी दरम्यान खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. भारत सोडण्यापूर्वी अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतल्याचे मल्ल्याने म्हटले आहे. तसेच ‘बँकेने माझ्या कर्जफेडीसंदर्भातल्या प्रक्रियेविषयी प्रश्न उपस्थित केले होते.’ असेही विजय मल्ल्याने म्हटले आहे.

बँकांना कर्जासाठी अर्ज करताना विजय मल्ल्या आणि किंगफिशर चा हेतू वाईट होता याचा कोणताही पुरावा नसल्याचे मल्ल्या याच्या वकिलाने लंडन येथील वेस्टमिनिस्टर कोर्टाला सांगीतले आहे. आय.डी.बी.आय. बँकेला किंगफिशर तोट्यात जाणार असल्याची कल्पना होती. बँकेच्या ई मेल वरुन हे स्पष्ट दिसत असून विजय मल्ल्या यांनी सरकारला अंधारात ठेवल्याचा सरकारचा आरोप खोटा असल्याचे मल्ल्या यांच्या वकिलांनी यावेळी म्हटले आहे.

विजय मल्ल्यावर ९ हजार कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप आहे. त्यासंबंधी त्याच्यावर लंडन येथील वेस्टमिनिस्टर कोर्टात केस सुरु आहे.

कसबा गणपती लाईव्ह दर्शन

images
images

कसबा गणपती आरास

images
images

कसबा गणपती पालखी

n
n

मानाचा पहिला गणपती

images
images

कसबा गणपती आरती

maxresdefault
maxresdefault

कसबा गणपती पुरस्कार अभिनेते सुबोध भावे, एम.आय.टी. चे राहुल कराड यांना जाहीर

पुणे | पुण्याचे ग्रामदैवत समजला जाणारा मानाचा पहिला श्री कसबा गणपती यंदा १२६ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. यंदाचा मानाचा ‘श्री कसबा गणपती पुरस्कार’ कलाक्षेत्रासाठी अभिनेता सुबोध भावे यांना जाहीर करण्यात आला आहे तर एम.आय.टी. चे राहुल कराड यांना शिक्षण क्षेत्रातील कामगिरीसाठी पुरस्कार जाहीर झाला आहे. कसबा गणपती हा पुण्यातील अग्रगण्य गणपती असून तो मानाचा पहिला गणपती आहे. कसबा गणेश मंडळा तर्फे दरवर्षी कसबा गणपती पुरस्कार देण्यात येतो. यंदाच्या पुरस्कार्थींची नावे मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी पत्रकार परीषद घेऊन जाहीर केली. तसेच यंदा श्रींची प्रान प्रतिष्ठपना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सचिव भैयाजी जोशी यांच्या हस्ते दिनांक १३ सप्टेंबर रोजी होणार असल्याची माहिती शेटे यांनी सांगितली.

कसबा गणपती पुरस्काराला ३८ वर्षांची परंपरा आहे. समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रांत विशेष कामगीरी करणार्या ५ खास व्यक्तींना कसबा गणपती पुरस्कार देण्यात येतो. त्यानुसार यावर्षीच्या पुरस्कारांची घोषणा मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी केली. यावर्षीचे मानाचे कसबा गणपती पुरस्कार अभिनेते सुबोध भावे, वैद्य योगेश बेंडाळे, एम.आय.टी. चे राहुल कराड, भारतीय बास्केटबाॅल संघाची कर्णधार शिरिन लिमये आणि प्रकाश दांडगे गुरुजी आदींना जाहीर झाले आहेत.

कसबा गणपतीचे यंदा ई वेस्ट कलेक्शन ड्राइव्ह

maxresdefault
maxresdefault

पुणे | श्री कसबा गणपती सार्वजणीक गणेशोत्सव मंडळाने यावर्षी स्तुत्यजन्य उपक्रम हाती घेतला आहे. महाराष्ट्र प्रदुषण बोर्ड आणि कसबा गणेश मंडळ यांनी संयक्तपणे ई वेस्ट कलेक्शन ड्राईव्ह करण्याचे ठरवले आहे. सध्या ई वेस्ट मुळे पर्यावरणाला मोठ्या प्रमाणावर हानी पोहोचत आहे. यापार्श्वभूमीवर कसबा गणेश मंडळाच्या या उपक्रमाचे पुणेकरांमधे स्वागत केले जात आहे.

सदर ई वेस्ट कलेक्शन ड्राईव्ह कसबा गणेश मंडळामधे गणेशोत्सवादरम्यान राबवला जाणार आहे. खराब झालेली इलेक्ट्रिकल उपकरणे या वेळी मंडळा कडून गोळा करण्याचे काम केले जाईल असे मंडळाकडून सांगण्यात आले आहे. यामधे प्रामुख्याने मोबाईल फोन, लेपटोप, रिमोट, टि.व्ही. आदी वस्तूंचा समावेश असणार आहे. गोळा झालेले ई वेस्ट महाराष्ट्र प्रदुषण बोर्डाकडे पुढील विघटनाच्या प्रक्रीयेकरता देण्यात येणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी सांगीतले आहे.

केसरीवाडा गणेशोत्सव – वेळापत्रक

images
images

पुणे : पारंपरिक पद्धतीने पालखीतून श्रींच्या मिरवणुकीस सकाळी दहा वाजता रमणबाग चौकातून सुरुवात होईल. मिरवणूक लक्ष्मी रस्ता, विजय चित्रपटगृह, माती गणपतीमार्गे टिळक वाड्यातील सभामंडपात दाखल होईल. मिरवणुकीत श्रीराम आणि शिवमुद्रा ही ढोल-ताशा पथके, बिडवे बंधुंचे नगरावादन पथक सहभागी होणार आहेत. सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांनी डॉ. रोहित टिळक यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठापना होईल. त्यानंतर दुपारी 3 ते 4.30 या वेळेत सग्रहमख वरदविनायक याग केला जाणार आहे.