Tuesday, December 9, 2025
Home Blog Page 6705

JNUSU Elections 2018 | जे.ऐन.यू. विद्यार्थी परिषदेच्या निवडणूकी दरम्यान अभाविप कडून हिंसा, निकाल आज जाहिर होण्याची संभाव्यता

JNUSU Election Result
JNUSU Election Result

दिल्ली | जवाहरलाल नेहरु विद्यापिठाच्या (जे.ऐन.यू.) विद्यार्थी परिषदेच्या निवडणूकांचे निकाल आज जाहीर होण्याची संभाव्यता आहे. शनिवारी अभाविप कडून विद्यापिठ परिसरात झालेली हिंसा आणि मतमोजनी विरोध यानंतर रात्री उशीराने मतमोजनी सुरु झाली.

शनिवारी जे.ऐन.यू. निवडणूक अधिकार्यांनी मतमोजणी कक्षातील जबरदस्तीचा प्रवेश आणि मतपेटी हिसकावणे आदी कारणांवरुन मतमोजणी स्थगित केली होती. मतमोजणी सुरु असल्याची माहिती आम्हाला देण्यात आली नाही असा आरोप करत अभाविप ने मतमोजनी सुरु असलेल्या कक्षात गोंधळ घालून मतमोजनी बंद पाडली. जे.ऐन.यू. प्रशासनाने अभाविप चा आरोप पुसून काढत मतमोजनी सनदशीर मार्गानेच सुरु असल्याचे स्पष्ट केले. यावेळी डावे आणि अभाविप यांच्यात धूमचक्री झाली. डाव्या संघटनांनी अभाविप चा निवडणूक प्रक्रियाच बंद पाडण्याचा डाव होता असे म्हणत हिंसेचा निषेध केला आहे. तसेच अभाविप चे कार्यकर्ते हत्यारे घेऊन आले होते असा आरोप केला आहे. मात्र अभाविप ने सर्व आरोप खोटे असल्याचे म्हटले अाहे.

शुक्रवारी झालेल्या मतदान प्रक्रियेत यावर्षी रेकाॅर्ड ब्रेक ७० % मतदान झाले आहे. आजवर झालेल्या मतदानापैकी हे सर्वाधिक मतदान आहे. तेव्हा जे.ऐन.यू. विद्यार्थी परिषदेवर कोणाचा झेडा फडकणार यावर सर्वांचे लक्ष लागून आहे.

 

 

 

 

 

 

पुण्यात गणेश मंडळाचे कार्यकर्ते गेले पोलिसांच्या अंगावर धाऊन, तिघांना अटक

कर्मचार्याला धक्काबुक्की
कर्मचार्याला धक्काबुक्की

पुणे | सुनिल शेवर

सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या पोलीसांच्या अंगावर गणेशमंडळाचे कार्यकर्ते धावून गेल्याचा प्रकार पुण्यातील गुलटेकडी येथे घडला. यावेळी पोलीस कर्मचार्याला धक्काबुक्की करुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने तणाव निर्माण झाला.

हाती आलेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवामुळे शहरात सुरक्षेच्या कारणास्तव कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यावेळी गणेशोत्सव मंडळ तपासणीचे कार्य गणेश उत्सवात करणे साहजिकच आहे. त्यानुसार पोलीस महानगरपालिका व्हेइकल डेपो, गुलटेकड़ी पुणे ३७ येथील गणेश मंडळाच्या इथे गेले असता त्यांच्या अंगावर बबलू पितले ( वय ३२) कात्रज, परशुराम बसप्पा होसमनी ( वय ३९ ) गुलटेकड़ी, राहुल रेवनअप्पा ढोणे ( वय १८) गुलटेकड़ी धाऊन गेले.

तिनही आरोपींना स्वारगेट पोलिसांनी अटक केली असून पोलिस शिपाई डी. डी. रणसिंह यांनी फिर्याद दिली. बीट मार्शल ड्यूटी करताना पोलिसांना धक्काबुक्की, जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस उपनिरिक्षक आर. आय. उसगावकर तपास करीत आहेत.

कोलकत्त्याच्या युवा गायक प्रियांको सूर ने पुण्याच्या सुप्रसिद्ध  दगडूशेट हलवाई गणपती साठी गायलेले ‘भो गणेशा सूरश्रेष्ठ’ ही गणेश स्तुती  प्रसारित

dagdusheth halwai ganpati
dagdusheth halwai ganpati

पुणे प्रतिनिधी | सुनिल शेवरे

यंदा च्या गणपती उत्सवासाठी पुण्याच्या सुप्रसिद्ध दगडूशेट हलवाई गणपती ट्रस्ट च्या वतीने नुकतेच ‘भो गणेशा सूरश्रेष्ठ’ ही स्तुती पालकमंत्री गिरीश बापट आणि पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्या हस्ते प्रसारित करण्यात आली. ही स्तुती गाण्याचा मान कोलकत्त्याच्या युवा गायक प्रियांको सूर याला मिळाला. स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा येथे झालेल्या कार्यक्रमात दगडूशेट हलवाई गणपती ट्रस्ट चे अध्यक्ष अशोकराव गोडसे, उपाध्यक्ष सुनील रासने, खजिनदार महेश सूर्यवंशी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण आणि कार्याध्यक्ष यतिश रासने उपस्थित होते. गायक प्रियांको सूर याचे गुरु आणि सूर्य स्तोत्राचे अभ्यासक संगीतकार विश्वनारायणजी यांनी ही स्तुती संगीतबद्ध केली आहे. त्यांच्या मते श्री गणेशा ची ही स्तुती सर्व कल्याणात्मक आणि मंगलात्मक अशी सर्वात शुभ मानली जाणारी असून ती नारद मुनीं रचित आहे व नारद पंचतंत्रा मध्ये याचा उल्लेख असल्याचे सूर याने या वेळी सांगितले.

जळगाव महानगरपालिका महापौर पदी सीमा भोळे व उपमहापौर पदी अश्विन सोनावणे

IMG WA
IMG WA

जळगाव प्रतिनिधी | सुरेंद्र पाटील

जळगाव महानगरपालिकेच्या महापौर पदी सीमा भोळे व उपमहापौर पदी अश्विन सोनावणे यांची निवड झाली आहे. यंदा महापौरपद हे ओबीसी महिला राखीव असल्याने भोळे यांना संधी मिळाली आहे.
महापौर पदी निवड झालेल्या सीमा भोळे या जळगाव शहरांचे विद्यमान आमदार सुरेश भोळे यांच्या पत्नी आहेत. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांनंतर ही नेमणूक करण्यात आली आहे. अखेर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आमदार भोळे यांच्या पत्नीला संधी दिली. भाजपाने सत्ता मिळविल्यापासून महापौरपदी कुणाला संधी मिळते याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून होते.

आशा – दिल से ने रसिक मंत्रमुग्ध.

Thumbnail
Thumbnail

पुणे |सुनिल शेवरे

सिने-संगीता च्या माध्यमातून निखळ आनंद देण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या पुण्यातील स्वयम संस्थे तर्फे नेहमीच वैविध्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. विविध संकल्पनां वर आधारित गाण्यांचे सादरीकरण हे स्वयम चे वैशिष्ठ्य आहे. आपल्या सर्वांच्या आवडत्या गायिका आशा भोसले यांनी नुकतेच वयाच्या ८६ व्या वर्षात पदार्पण केले. आशाताईंच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून स्वयम ने एस. एम. जोशी फाऊंडेशन च्या सभागृहात “आशा -दिल से” या नावाने ‘आशा भोसले महोत्सव’ आयोजित केला होता.’ या मध्ये विविध ‘मुड्स’ दर्शवणाऱ्या तब्बल ८६ गाण्यांचा समावेश केला गेला होता. रफी, किशोर कुमार आणि इतर गायक-गायिकांबरोबर गायलेली लोकप्रिय तसेच पुरस्कारप्राप्त गाण्यांबरोबरच काही मराठी आणि आशाताईंनी गायलेल्या बंगाली आणि इंग्रजी भाषिक गाण्याचा समावेश होता. आशा भोसले यांची सोलो पस्तीस गाणी पुण्याच्या मृदुल निक्ते यांनी या तीन दिवसीय महोत्सवात सादर केली. विवेक पांडे, संयोगिता बदरायणी, उमेश पेडगावकर, रमेश कानडे, अभिजात भिडे, नरेंद्र डोळे, विवेक दाभाडकर आणि अनुपम बॅनर्जी यांनी सह गायन केले. उपस्थित रसिकांना समर्पित केलेल्या गुलजार लिखित मेरा कुछ सामान… या गाण्याला रसिकांची वाहवा मिळाली. कार्यक्रमाचे निवेदन शीतल कापशीकर, डॉ. बीना शहा आणि सतीश सेखरी यांनी केले.

स्वयम् च्या प्रत्येक कार्यक्रमास मनोरंजना सोबत सामाजिक बांधिलकीची जोड असतेच. डॉ. अभिजीत सोनवणे हे गेली काही वर्षे पुण्यातील विविध भागातील भिक्षेकरींवर मोफत औषधोपचार करीत असून त्यांना भीक मागण्या पासून परावृत्त करण्याचे कार्य करतात. त्यांच्या सोहम ट्रस्ट साठी स्वयम ने या महोत्सवाच्या स्थळी दानपेटी ठेवून महोत्सवास आलेल्या रसिक प्रेक्षकांना ऐच्छिक दाना विषयी आवाहन केले होते. या दानपेटी मध्ये जमा झालेल्या निधी मध्ये स्वयम तर्फे काही निधी ची भर घालून महोत्सवाच्या समारोपा दरम्यान हा निधी डॉ. अभिजित सोनवणे आणि त्यांच्या पत्नी डॉ. मनीषा सोनवणे यांना सुपूर्त करण्यात आला. महोत्सवाचे आयोजन कर्नल विवेक निक्ते (निवृत्त) यांनी आणि संयोजन सरिता सिधये यांनी केले होते.

ब्रिटिश कौन्सिल व स्माईल तर्फे पुण्यात मिक्स द सिटी उपक्रम

british council
british council

पुणे | ब्रिटिश कौन्सिल व स्माईल (सावित्री मार्केटिंग इन्स्टिट्युशन फॉर लेडीज एम्पॉवरमेंट) तर्फे मिक्स द सिटी इन्स्टॉलेशन पुणेकरांसाठी आणण्यात आले आहे. हा उपक्रम १७ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर २०१८ दरम्यान विश्रामबागवाडा येथे सकाळी ११ ते ९ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.मिक्स द सिटी हे इंटरअ‍ॅक्टिव्ह म्युझिक प्लॅटफॉर्म असून यामध्ये त्या त्या शहरातील संगीत,वाद्ये किंवा स्थळे याचे सादरीकरण करते व वापरकर्त्यांना अभिनव संगीत रचना निर्माण करून ऑनलाईन शेअर करता येते.

या उपक्रमात भारतातून प्रेरित झालेल्या संगीत, संस्कृती व कलात्मकतेचे सादरीकरण करण्यात येते. मिक्स द सिटी या उपक्रमाद्वारे भारतातील नवीन निर्माण होणारे संगीत व शास्त्रीय, लोकसंगीत, प्रादेशिक व समकालीन अशा वेगवेगळ्या संगीत शैलींचा मिलाफ प्रतिबिंबित होेतो. हा उपक्रम ब्रिटिश कौन्सिल भारतात गेल्या दोन वर्षे राबवित असून याद्वारे भारतातील संगीत क्षेत्रात असलेली विविधता जगभरातील सर्वांना प्रेरित करत आहे. डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट मिक्सदसिटी डॉट कॉम या संकेतस्थळावर जाऊन वापरकर्ते स्वत:चा साऊंड ट्रॅक निर्माण करू शकतात.

आज अभियंता दिन

Engineering Day
Engineering Day

पुणे | अमित येवले

१५ सप्टेंबर हा दिवस महान अभियंता भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिन म्हणून दरवर्षी अभियंता दिवस देशभरात साजरा केला जातो. आजच्याच दिवशी १९५९ मध्ये देशात DDNational ने प्रायोगिक तत्वावर अर्ध्या तासाचे प्रसारण सुरू केले होते.

विश्वेश्वरय्या यांनी केवळ अभियांत्रिकी नव्हेच तर उद्योग,अर्थ, नगरसुधार इ. कार्यात मोलाचे योगदान दिले आहे.समर्थ भारत हे त्यांचे स्वप्न होते. त्यांना भारत सरकारने भारतरत्न हा सर्वोच्च किताब बहाल केला. त्यांनी अखेरचा श्वास १४ एप्रिल १९६२ रोजी घेतला. अभियंता दिनाच्या सर्वांना शुभेच्छा..!

आता पत्रकारीता शिका सकाळ समुहा सोबत

student journalists .jpg.crop display
student journalists .jpg.crop display

पुणे | मिडिया इंडस्ट्रीजच्या बदलत्या मागण्या लक्षात घेऊन झेवियर इन्स्टिट्युट आॅफ कम्युनिकेशन्स आणि एपीजी लर्निंग यांच्या संयुक्तविद्यमाने पत्रकारितेच्या नवीन कोर्सची घोषणा करण्यात आली आहे. पोस्ट ग्रेज्युएट डिप्लोमा इन जर्नलिझम अँड मास मिडिया असे या कोर्सचे नाव असून कोणत्याही क्षेत्रातील पदवीधारक या कोर्सला प्रवेश घेऊ शकतात.

क्सासरुम ट्रेनिंग सोबतच आॅन जाॅब ट्रेनिंगवर भर असणार्या या कोर्समधे १००% प्लेसमेंटची खात्री दिली जाणार आहे. प्रिंट, ब्राॅडकास्ट आणि डिजीटल मिडिया यांचा एकत्रित अभ्यास उपलब्ध करुन देणारा एकमेव अभ्यासक्रम, वृत्तपत्र पत्रकारिता आणि टि.व्ही. मिडिया इंडस्ट्रीतील तंज्ञांकडून आॅन द जाॅब ट्रेनिंग द्वारा थेट मार्गदर्शन आणि लेखी सरावाबरोबरच प्रात्यक्षिकांवर भर ही या कोर्सची खास वैशिष्टे आहेत. याचबरोबर कोर्सला प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांना सकाळ, सकाळ टाईम्स, साम टि.व्ही., अॅग्रोवन, गोमंतक, गोमंतक टाईम्स अशा नामवंत वृत्तपत्रांमधे इंटर्नशीपची संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

सकाळ समुह आणि ए.पी.जे. लर्निंग यांच्याकडून पत्रकारितेत करिअर करु इच्छिणार्या विद्यार्थ्यांना सदर कोर्सला प्रवेश घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी मर्यादीत जागा असून मुलाखतींद्वारा प्रवेश दिला जाणार आहे. सदर कोर्स ८ आॅक्टोबर रोजी सुरु होणार असून इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती दिनांक ३० सप्टेंबर रोजी पुणे, मुंबई, कोल्हापूर आणि नाशिक येथे नियोजीत करण्यात आल्या आहेत.

लालबागचा राजा लाईव्ह दर्शन

Lalbaughcha Raja Live Darshan
Lalbaughcha Raja Live Darshan

भारत विकास परिषदे तर्फे राष्ट्रीय समुहगान प्रतियोगिता 2018 संपन्न 

MG
MG

पुणे |समिर रानडे

भारत विकास परिषदेच्या पश्‍चिम महाराष्ट्र प्रांतातर्फे राष्ट्रीय समुहगान प्रतियोगिता २०१८ ची दुसरी फेरी नुकतीच बीएनसीए सभागृह येथे संपन्न झाली. या स्पर्धेचे आयोजन भारत विकास परिषदेच्या शिवाजीनगर शाखेने केले होते.

या स्पर्धेत बालशिक्षण मंदिर इंग्लिश मिडियम स्कुल, कोथरूड शाळेला विजेतेपद मिळाले आहे. विजेता संघ ७ ऑक्टोबर २०१८ रोजी मुंबई येथे होणार्‍या क्षेत्रीय स्पर्धेत सहभागी होणार आहे. विजेत्या संघाला ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात आले. द्वितीय क्रमांक अशोका युनिव्हर्सल स्कुल, चांसी, नाशिक आणि तृतीय क्रमांक विस्डम हायस्कुल इंटरनॅशनल स्कुल, नाशिक यांना मिळाला.

राष्ट्रभावना वाढीस लागण्यासाठी दरवर्षी आयोजण्यात येत असलेल्या या राष्ट्रीय समुहगान स्पर्धेत पश्‍चिम महाराष्ट्रातील १६ शाळांचे संघ सहभागी झाले होते. ६ वी ते ‍१० वीचे १६० विद्यार्थ्यांनी यांत सहभाग घेतला. या स्पर्धेत प्रत्येक संघाने हिंदी व संस्कृत भाषेत गाणे सादर केले.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिध्द गायिका सायली पानसे उपस्थित होत्या. याबरोबरच राष्ट्रीय समुहगान स्पर्धेचे राष्ट्रीय अध्यक्ष दत्ताजी चितळे, पश्चिम क्षेत्राचे राष्ट्रीय सचिव राजेंद्र जोग, पश्चिम क्षेत्राच्या संस्कार विभागाच्या सचिव सारिका पेंडसे, पश्चिम क्षेत्राच्या सेवा विभागाचे सचिव सचिन गांजवे, शिवाजीनगर शाखेचे अध्यक्ष जगदीश धोंगडे, पश्‍चिम महाराष्ट्र प्रांताचे सचिव अजय लोखंडे, पश्‍चिम महाराष्ट्र प्रांताचे उपाध्यक्ष शशिकांत पद्ममवार, संयोजिका माधुरी कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंदार जोग यांनी केले तर शिवाजीनगर शाखेचे खजिनदार अमित ठक्कर यांनी आभार मानले. या स्पर्धेकरिता परीक्षक म्हणून संगीत क्षेत्रातील मान्यवर आसावरी गोडबोले, भाग्यश्री अभ्यंकर आणि प्रफुल देशपांडे यांनी काम पाहिले.