Tuesday, December 9, 2025
Home Blog Page 6708

केसरीवाडा गणेशोत्सव : शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष

kesari wada
kesari wada

पुणे | केसरीवाडा चा गणपती हा पुण्यातील मानाचा पाचवा गणपती आहे. मानाचा पाचवा केसरी गणपतीची स्थापना लोकमान्य टिळक यांनी १८९४ मध्ये विंचूरकर वाड्यात केली. तर १९०५ पासून टिळकवाड्यात केसरी संस्थेचा गणेशोत्सव सुरू झाला. या उत्सवामध्ये लोकमान्य टिळक त्यांच्या व्याख्यान्यातून समाजप्रबोधनाचे काम करत होते. १९९८ साली संत ज्ञानेश्‍वरांनी त्यांच्या ज्ञानेश्‍वरीमध्ये केलेल्या वर्णणाप्रमाणे केसरी गणपतीची मूर्ती तयार करण्यात आली. शेला, दागिणे, प्रतिके, मुकुंट, गंडस्थळ हे या मूर्तीची वैशिष्ट्ये आहेत. दरम्यान, केसरी गणपतीचे यंदा रौप्य महोत्सवी वर्ष असून, संस्थेचे सरव्यवस्थापक विश्‍वस्त डॉ. रोहीत दीपक टिळक यांच्या हस्ते गुरूवारी (दि. १३) सकाळी साडेअकरा वाजता प्राणप्रतिष्ठापना होणार आहे.

यंदाचे वेळापत्रक –

प्रतिष्ठापना मिरवणूक : स. १० वा. गोखले यांच्याकडील श्रींची मूर्ती पारंपरिक पद्धतीने सवाद्य मिरवणुकीने पालखीतून टिळक वाड्यात आणण्यात येईल.

सहभाग : श्रीराम आणि शिवमुद्रा ढोलताशा पथक, बिडवे बंधूंचे नगारावादन. शहापूरकर यांच्याद्वारे सभामंडपात आकर्षक रांगोळ.

‘श्रीं’ची प्राणप्रतिष्ठा : स. ११.३० वाजता डॉ. रोहित टिळक यांच्या हस्ते.

केसरीवाडा अंतर्गत दालन

px tilak museum kesari wada
px tilak museum kesari wada

केसरीवाडा – विशिष्ट नजरेतून

आनंदोत्सव | प्रतिनिधी

पुण्याच्या केसरीवाड्यातील गणपती विसर्जनाची २०१७ मधील विसर्जन मिरवणूक कशी होती? याशिवाय केसरीवाड्याचं अंतरंग कसं आहे? हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत – चित्र आणि दृश्यफीतींच्या माध्यमातून

व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

विसर्जन मिरवणूक २०१७

केसरीवाडा अंतरंग

https://youtu.be/JNA-X0PU6Rg

सौजन्य – ABP माझा

स्वराज्य गर्जनेचा प्रतिक – केसरीवाडा गणपती

IMG WA
IMG WA

ज्या लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला, त्यांच्या केसरीवाड्यातील गणपती हा पुण्यातील मानाच्या गणपतींपैकी पाचवा गणपती आहे. त्या गणपतीबद्दल…

………स्नेहा कोंडलकर……..

जनतेने एकत्र यावे या भावनेतून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. आता गणेशोत्सव महाराष्ट्रातील एक सांस्कृतिक सोहळाच बनला आहे. पुणे शहर तर या आपल्या भव्यदिव्य उत्सवासाठी प्रसिद्ध आहे. पुण्यातील गणेशोत्सवातील मानाच्या गणपतींपैकी केसरीवाड्यातील गणपती हा मानाचा पाचवा गणपती आहे.

केसरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून केसरीवाड्यात १८९४ सालापासून सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाली. लोकमान्य टिळक त्या वेळी विंचूरकर वाड्यात राहत होते. त्यानंतर १९०५पासून केसरीवाड्यात केसरी संस्थेचा उत्सव होऊ लागला. लोकमान्य टिळकांची व्याख्याने तेथे होत असत. केसरीवाड्यातील गणपतीची मिरवणूक आजही पालखीतून काढण्याची परंपरा जपली गेली आहे.

लोकमान्य टिळक त्या वेळचे देशातील प्रमुख नेते होते. त्यांनी गणेशोत्सवाला सामाजिक भान दिले. हा उत्सव साजरा करण्यासाठी विविध जागृतीपर कार्यक्रम होऊ लागले. ही परंपरा आजही कायम आहे. गणेशोत्सवादरम्यान येथे विविध व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. गणेशमूर्तीची स्थापना टिळक पंचांगाप्रमाणे होते. १२४ वर्षांपासून वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत आपले वेगळेपण केसरीवाडा गणेशोत्सवाने जपले आहे.

केसरीवाडा गणपतीची मूर्ती कायम स्वरुपी चांदीची असून त्यांची स्थापना दहा वर्षापूर्वी करण्यात आली, ती ज्ञानेश्वरीतील वर्णनाप्रमाणे घडवण्यात आली आहे. या मूर्तीला सहा हात आहेत. मूर्तीच्या एका हातात मोदक असून, दुसरा हात आशीर्वाद देत आहे. अन्य हातांपैकी एका हातात परशू, पाशांकुश, एका हातात चंद्र आणि एका हातात हस्तिदंत आहे. पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सनी ही मूर्ती घडवली आहे. या मूर्तीसमोर मातीची उत्सवमूर्ती बसवली जाते. दर वर्षी गोखले हे पुण्यातील मूर्तिकार ही मूर्ती घडवतात.

पहिल्या दिवशी ढोल-ताशाच्या गजरात बाप्पांचे आगमन होते. यंदा श्रीराम ढोलपथक बाप्पासमोर आपली कला सादर करणार आहे. तसेच ‘केसरी’चे विश्वस्त संपादक डॉ. दीपक टिळक आणि सरव्यवस्थापक डॉ. रोहित टिळक यांच्या हस्ते श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या वेळी डॉ. गीताली टिळक-मोने, डॉ. प्रणती टिळक व केसरी परिवार उपस्थित राहणार आहे.

केसरीवाडा हे अनेक ऐतिहासिक घडामोडींचा वारसा जपलेले ठिकाण आहे. त्यामुळे त्याचे महत्त्व आणखी वाढते. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवसापासून रोज दुपारी भजनी मंडळ येते. कार्यक्रमानिमित्त आलेल्या कलाकारांच्या हस्ते आरती केली जाते. केसरीवाड्याच्या गणपतीवर अनेकांची आस्था, श्रद्धा आहे. अनेक राजकीय पुढारी, सिनेमासृष्टीतले कलाकार दर्शनासाठी एक भाविक म्हणून दरसाल येथे हजेरी लावतात.

या वर्षी केसरीवाडा गणपतीला १२५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये महिलांसाठी गिफ्ट रॅपिंग, पाककृती, पुष्परचना व फुलांची रांगोळी या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच शालेय मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, क्ले मॉडेलिंग, नाट्यछटा स्पर्धा घेण्यात येणार आहेत. गणेश उपासना आणि आधुनिक जीवन, हिंदी चित्रपटातील गझल या कार्यक्रमांचे, तसेच चार सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा ते रात्री साडेआठ या वेळेत पानसुपारी समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

(Bytes of India च्या सौजन्याने)

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती आंबा महोत्सव विशेष फोटो

amba website images
amba website images

दरवर्षी अक्षयतृतियेला श्रीगणेशाला आंब्यांचा नैवेद्य दाखवला जातो. अक्षयतृतियेच्या दिवशी या सोनेरी-तांबूस रंगाच्या रसरशीत फळाला श्रीगणेशांच्या चरणी वाहिले जाण्याचा मान दिला जातो. पुण्यातील ’देसाई बंधू आंबेवाले’ हे आंब्यांचे अग्रेसर व्यापारी ११,००० आंब्यांचा भरघोस नैवेद्य श्रीगणेशांच्या चरणी अर्पण करतात. मंदिराचा परिसर पिकलेल्या, सोनेरी रंगाच्या आंब्यांनी भरून गेलेला असतो आणि त्या आंब्यांचा मंद सुवास कानाकोपऱ्यात भरून रहातो. मंदिराला भेट देणारे भक्त आणि माध्यमांचे कर्मचारी हे अद्‍भुत् दृश्य बघायला आणि आपल्या कॅमेऱ्यांमधे बंदिस्त करायला मोठ्या संख्येने हजर असतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मंदिरात येणाऱ्या भक्तांना हजारो आंबे वाटले जातात.

श्रीमंत दगडूशेठ गणपती शहाळे महोत्सव विशेष फोटो

shahale mahotsav
shahale mahotsav

पुणे | पुष्टीपती विनायक जयंतीचे औचित्य साधून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्टच्या वतीने दि. २९ एप्रिल २०१८ रोजी शहाळे महोत्सव २०१८ चे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान श्रींच्या चरणी अर्पण करण्यात येणाऱ्या ५००० शहाळ्यांचे वाटप दुसऱ्या दिवशी ससून रुग्णालयातील रुग्णांना करण्यात आले. दरवर्षी अशा महोत्सवाचे आयोजन केले जाते.