Monday, December 8, 2025
Home Blog Page 6709

नऊ थराच्या दहिहंडीचा हा थरारक व्हिडिओ तुम्ही पाहीलात का?

Screenshot
Screenshot

मुंबई | दहिहंडी उत्सव होऊन आठवडा झाला असला तरी सोशल मिडियावरील त्याचा फिव्हर अजून उतरलेला दिसत नाही. नऊ थराची विक्रमी हंडी लावण्याचा पराक्रम केलेल्या जय जवान गोविंदा पथकाने नुकताच एक व्हिडीओ त्यांच्या फेसबुक पेजवर शेअर केला आहे. नवव्या थरावरील गोविंदाला वरुन दहिहंडीसाठी जमलेली गर्दी कशी दिसते याचा थरार या व्हिडीओमधे दिसत आहे. गोविंदा वरती कसा चढतो आणो हंडी फोडून तो सुरक्षितपणे कसा खाली उतरतो हे सदर व्हिडिओतून प्रेक्षकांना समजते. नऊ थरांची दहिहंडी लावणार्या गोविंदाचा थरार अनुभवण्यासाठी हा व्हिडीओ जरुर पहावा

व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

तेलंगणात बसला भीषण अपघात – ४५ ठार, ६५ जखमी

तेलंगणा | प्रतिनिधी

जगतीयल जिल्ह्यात कोंडागट्टूजवळ राज्य परिवहन मंडळाच्या बसला आज दुपारी भीषण अपघात झाला. यावेळी ४५ जण ठार तर ६५ जण जखमी झाले आहेत. महाराष्ट्रात मागील महिन्यात झालेल्या आंबेनळी अपघाताच्या आठवणी यानिमित्ताने ताज्या झाल्या आहेत.

दरम्यान तेलंगनाचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सर्व मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

समाजभान जपणारा – दगडूशेठ हलवाई गणपती

Rugna Seva Abhiyan Year
Rugna Seva Abhiyan Year

आनंदोत्सव | जय गणेश संस्था

जय गणेश जलसंवर्धन अभियान

पुणेकरांनी पुणेकरांसाठी सुरू केलेली एक चळवळ म्हणजे ‘जन-सहभागातून पाणी’.

पुणे शहराला खडकवासला धरणातून पाणी-पुरवठा होतो. पुण्याला पाणी मिळण्याचे हे मुख्य उगमस्थान आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून या पाण्यात गाळ साठल्यामुळे ह्या स्थानाची पाणी-साठवण-क्षमता कमी होत गेली आहे. या पाणी-साठ्यातून पुणेकरांना पिण्याचे पाणी मिळण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याच्या गरजाही हे धरण भागवते. गेल्या काही वर्षांत यातही पाण्याची कमतरता जाणवू लागल्यामुळे शेतकऱ्यांवर एकच पीक घेण्याची वेळ येऊन ठेपली आहे. शहरवासियांनाही पाणी-कपातीला तोंड द्यावे लागत आहे.

कर्नल सुरेश पाटील या निवृत्त सैन्याधिकाऱ्याने निवृत्तीनंतर स्वत:ला समाजकार्यासाठी वाहून घेतले आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. राज्य सरकार आणि काही स्वेच्छा-संस्था यांच्या एकत्रित सहाय्य्याने त्यांनी हा प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न केले. पण त्याचे फारसे चांगले परिणाम दिसेनात. कर्नल पाटील यांच्या या प्रयत्नांबद्दल श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती-ट्रस्ट्ला कळले आणि त्यांनी ह्या प्रश्नात लक्ष घातले. ट्रस्टने आता ’जलसंवर्धन अभियान’ सुरू केले आहे.

हे खूप प्रचंड काम आहे, त्यामुळे ट्रस्टने इतर अनेक गणेश-मंडळे आणि नागरिक-गटांना एकत्रित करण्याचे ठरवले. ट्रस्टच्या या हाकेला जवळजवळ ४०० गणेश-मंडळांनी प्रतिसाद दिला आणि मदतीचा हात पुढे केला. दहा जड खोदाई-यंत्रे आणि सोळा डंपर्सच्या सहाय्याने या पाणी-साठ्यातील गाळ उपसण्याचे काम सुरू झाले आहे. ह्या कामाची दैनंदिन पहाणी करण्याची जबाबदारी गणेश-मंडळांवर सोपवण्यात आली आहे. तीन ते चार गणेशमंडळांचे कार्यकर्ते रोज स्वत: जातीने हजर राहून या कामावर देखरेख करतात. सैन्यानेसुद्धा या कामाला हातभार लावला असून त्यांनी आपली काही खोदाई-यंत्रे दिली आहेत. नागरिक आणि सैन्य यांच्या सहकार्याचे हे एक दुर्मिळ उदाहरण आहे.

गाळ उपसण्याचे हे काम पूर्ण झाल्यावर तो परिसर स्वच्छ करून त्याचे सुशोभिकरण करण्याचे ट्रस्टने ठरवले आहे. नागरिकांना चालण्यासाठीचे हे एक निसर्गरम्य ठिकाण बनवण्याचा मानस आहे. इथे पक्ष्यांना आमंत्रित करतील अशी झाडे लावण्याची कल्पना आहे. या कामासाठी सरकारची परवानगीही ट्रस्टने मिळवली आहे. ’सरकारचे काम’ म्हणून साधारणपणे बोळवण केल्या जाणाऱ्या या प्रकारच्या कामात लोकांच्या व सार्वजनिक संस्थांच्या सहभागातून ही जबाबदारी उचलली जाण्याचे हे एक उत्तम उदाहरण म्हणता येईल. भविष्यकाळात या कामाकडे एक आदर्श म्हणून पाहिले जाईल यात शंका नाही.

२०१७ साली शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त हे अभियान राबविण्यात आले होते. साधारण २० दिवस गरीब व गरजू रुग्णांना मोफत शस्त्रक्रिया व उपचार देण्यात आले.

दगडूशेठ गणपतीचे गणेशोत्सव वेळापत्रक २०१८

Shrimant Dagdusheth Ganpati
Shrimant Dagdusheth Ganpati

आनंदोत्सव | प्रतिनिधी

गणेशोत्सव २०१८ वेळापत्रक
१३ सप्टेंबर २०१८ – गणेश चतुर्थी (गणेशोत्सव प्रारंभ)

१३ सप्टेंबर २०१८ – श्रींची आगमन मिरवणूक – वेळ – सकाळी ८:३० वाजता.

१३ सप्टेंबर २०१८ – श्रींची प्राणप्रतिष्ठापना – वेळ – सकाळी ११:०५ वाजता.

१३ सप्टेंबर २०१८ – देखाव्यावरील विद्युत रोषणाईचे उदघाटन- वेळ – सायं. ७ वाजता.

१४ सप्टेंबर २०१८ -अथर्वशीर्ष पठण (केवळ विद्यार्थ्यांसाठी)- वेळ -पहाटे ५ ते ६.

१४ सप्टेंबर २०१८ -अथर्वशीर्ष पठण (केवळ महिलांसाठी)- वेळ – पहाटे ६ वाजता.

१४ सप्टेंबर २०१८ -श्रींची दैनंदिन महापूजा – वेळ – सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत.

१४ सप्टेंबर २०१८ -गणेशयाग सोहळा- वेळ -सकाळी ९ वाजता.

१४ सप्टेंबर २०१८ -वारकरी गजर – वेळ -रात्री १० वाजता.

२३ सप्टेंबर २०१८ – अनंत चतुर्दशी

२८ सप्टेंबर २०१८ – संकष्ट चतुर्थी ; चंद्रोदय : रात्री ८ : ५३ वाजता (पुणे)


इतर कालावधीतील वेळापत्रक
मंदिराच्या वेळा (दररोज) – स. ६.०० ते रा. ११.००
सुप्रभातम् आरती – स. ७.३० ते ७.४५
नैवेद्य आरती – दु. १.३० ते १.४५
मध्यान्ह आरती – दु. ३.०० ते ३.१५
महामंगल आरती – रा. ८.०० ते ९.००
शेजारती – रा. १०.३० ते १०.४५

दगडूशेठच्या सजावटीचा गौरवशाली इतिहास

Dagdusheth Ganpati with dagine
Dagdusheth Ganpati with dagine

आनंदोत्सव | प्रदीप देशमुख

यंदाच्या वर्षी (२०१८) साली केरळमधील श्री राजराजेश्वर मंदिराची प्रतिकृती पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीची आरास करण्यासाठी वापरली जात आहे. मागील ३ वर्षांमध्ये (२०१५, २०१६ व २०१७) सुद्धा अशाच प्रकारची सजावट पहायला मिळाली होती. काही कारणाने ती पाहता आली नसेल तर खास तुमच्यासाठी आम्ही ती उपलब्ध करुन देत आहोत. तुम्हाला नक्कीच आवडेल.

व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा –

गणेशोत्सव २०१७ – ब्रह्मस्पती मंदिर (शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष)

गणेशोत्सव २०१६

गणेशोत्सव २०१५ –

दगडूशेठ हलवाई गणपती आणि श्री राजराजेश्वर मंदिर

Dagdusheth Ganpati
Dagdusheth Ganpati

आनंदोत्सव | राहुल दळवी

पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या दगडूशेठ हलवाई गणपतीची दरवर्षी असणारी आरास ही नयनरम्य अशीच असते. यंदाच्या वर्षीही श्री राजराजेश्वर मंदिराच्या प्रतिकृतीमध्ये दगडूशेठ हलवाई विराजमान होणार आहेत. केरळमधील कन्नूर जिल्ह्यात श्री राजराजेश्वर मंदिर आहे. केरळमधील १०८ प्राचीन शिवमंदिरांपैकी हे एक आहे. भगवान परशुरामाचे संदर्भही याठिकाणी असल्याचं आढळतात. मंदिराच्या उभारणीचा प्रवास जाणून घेऊया खास तयार केलेल्या चित्रफितीतून

दगडूशेठ हलवाई गणपती – तयारी २०१८, व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

१) https://www.youtube.com/watch?v=NybW9Sw3EAY

२) https://www.youtube.com/watch?v=PCOefikr-DM

सौजन्य – जय गणेश

सरकारने मोफत कौशल्याधिष्ठीत कोर्स सुरू करावेत – प्रा सुभाष वाघमारे

IMG WA
IMG WA

पाचवड | स्थानिक प्रतिनिधी

“संयुक्त राष्ट्र संघाच्या युनेस्को समितीने २०१८ हे वर्ष” साक्षरता आणि कौशल्य विकास” या नावाने साजरे करण्याचे ठरविले असून भारत सरकारने देशातील कौशल्यपूर्ण कामगारांची संख्या वाढविण्यासाठी गरजूंना मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण द्यावे, आणि त्यासाठी गरजे नुसार कोर्स सुरू करावेत असे मत प्राध्यापक सुभाष वाघमारे यांनी व्यक्त केले, पाचवड येथील रयत शिक्षण संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालय या महाविद्यालयात,राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन समारंभात बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा राजेंद्र देशमुख,प्रा.गणेश तारु उपस्थित होते

आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन हा ८ सप्टेंबर १९६६ पासून साजरा केला जात असून आंतरराष्ट्रीय सहकार्यातून शिक्षण, विद्न्यान, आणि सांस्कृतिक विकास, यातून शांतता आणि सुव्यवस्था उत्तेजन देण्यासाठी साक्षरता दिन साजरा केला जात असल्याचे त्यानी सांगितले, केरळ हा शंभर टक्के साक्षर असला तरी आजही तेथे साक्षरता वाढविण्यासाठी प्रयत्न चालू आहेत, केरळने जगाला शिक्षणाद्वारे मनुष्य बळ पुरविले आहे, बिहार सर्वात मागे आहे, सफल जगणे, गरीबी हटविणे,बाल मृत्यु थांबविणे, लोकसंख्या दर कमी करत जाणे, लिंगभाव समता प्रस्थापित करणे, बेकारी कमी करणे, जातिव्यवस्था नष्ट करून समता प्रस्थापित करणे, अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम सर्वत्र प्रसार करणे, विज्ञानाचा प्रसार करणे, धर्मांध विचारसरणीस पायबंद घालणे, देशात वैचारिक जागृती करणे, जगाबरोबर चालण्यासाठी कृति कार्यक्रम सुरू करणे आवश्यक आहे, नुसते खोट्या घोषणा आणि भपकेबाज कार्यक्रम करण्याने वास्तव बदलत नाही, त्यासाठी नैतिकता लागते असेही ते म्हणाले.

मुलींच्यावर होणारे बलात्कार, धर्मांधानी कायदा हातात घेणे हे सगळे लोकांच्या आत्मविश्वासाचे खच्चीकरण आहे, लोकांनी विधायक कामे करून देशाला वाचवावे, केवळ लिहण्या-वाचण्याची साक्षरता अभिप्रेत नाही, तर कौशल्य, तंत्रविद्न्यान आवश्यक आहे, लोकांना हताश वाटता कामा नये, भाषणबाजी पेक्षा कामाची खात्री देणारी यंत्रणा राज्य आणि केंद्र सरकारने उभी करावी, आदिवासी आणि मागास, या लोकांचेसाठी सरकारने अधिक जागृती व प्रशिक्षण कार्यक्रम घ्यावेत असे ते म्हणाले जाहिरात कराच पण कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम मोफत असल्याची करा असेही ते म्हणाले. गरीबी असली तरीही शिकलेल्या लोकांनी समाजात एेक्य निर्माण करण्यासाठी काम करावे असे ते म्हणाले,
अध्यक्षीय भाषणात राजेंद्र देशमुख यांनी भारतात वैचारिक जागृती करणे आवश्यक असल्याचे सांगितले,.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी प्रा दिलीप घोलप यांनी केले, तर प्रा इंद्रजीत एेवळे यांनी सुत्र संचालन केले, या कार्यक्रमास प्रा बी. आर. नदाफ, प्रा,भिसे एम.पी. राष्ट्रीय सेवा योजनेचे सदस्य यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रा प्रदीप शिंदे यांनी आभार मानले.

महाराष्ट्राचं आराध्य दैवत – श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती

Dagdusheth Halwai
Dagdusheth Halwai

आनंदोत्सव | चिन्मय साळवी

पुण्यात १२ महिने १८ काळ कधीही आलात तरी या बाप्पाच्या मंदिरात कायम गर्दी असते. पुण्याची ओळख बनलेल्या याबाप्पाचे विलोभनीय रूप भव्यदिव्य आरास हे पुण्यनगरीच्या गणेशोत्सवाचे सगळ्यात मोठे केंद्रबिंदू आहेत.

इतिहास : श्री. दगडूशेठ हलवाई हे मिठाईचे सुप्रसिद्ध व्यापारी होते, त्यांच्या मिठाईच्या गुणवत्तेमुळे त्यांना भरपूर लोकप्रियता व्यावसायिक यश मिळाले. सारे काही सुरळीत चालू असताना पुण्यात हाहाकार माजवणाऱ्या प्लेगच्या साथीत त्यांनी आपला एकुलता एक मुलगा गमावला. या धक्याने हलवाई दाम्पत्याला नैराश्याचा सामना करावा लागला.दगडूशेठ हलवाईंचे गुरुश्री माधवनाथमहाराजयांनी त्यांना गणपतीची भक्ती करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार दगडूशेठ हलवाईंनी गणेश मंदीर बांधण्यास सुरुवात केली.१८९३ मध्ये यामंदिराचे बांधकाम पूर्ण झाले गणेशोत्सवाला थाटामाटात सुरुवात झाली. भाविकांची अपार श्रद्धा असलेल्याया मंडळाने नुकतीच गणेशोत्सवाची १२५वर्षे उत्साहात पूर्ण केली. भाविकांनी वर्षभरात बाप्पाचरणी अर्पण केलेल्या सोन्यापासून दागिने बनवले जातात.सोन्याचे दागिने एखाद्या राजाला शोभूनदिसेल असा साज यामुळे बाप्पाची मूर्तीनावाप्रमाणेचश्रीमंतभासते.

खासियत : दगडूशेठ आणि गर्दी हे समीकरण अनेक वर्षांपासून जुळून आले आहे. वर्षभर गणपतीची मंदिरात प्रतिष्ठापना केलेली असते तर गणेशोत्सवाच्या कालावधीत बाप्पा उत्सवमंडपात विराजमान होतात. दगडूशेठ हलवाई गणपती म्हणलं की आठवतात ते सोन्याचे दागिने. सोंडें पासून पायापर्यंत दागिन्यांनी नटलेल्या याबाप्पाचे रूप तेजोमय दिसते. शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त गेल्याच वर्षी मंडळाने गणपतीसाठी ४० किलो सोन्याचे दागिने घडवले आहेत. या गणपतीची फुलांनी सजलेल्या रथातून निघणारी प्रतिष्ठापना मिरवणुक लक्षावधी दिव्यांच्या प्रकाशाने उजळलेल्या रथातून निघणारी विसर्जन मिरवणूक हे नयनरम्य सोहळे असतात. वर्षभर मंडळाकडून आंबा महोत्सव, शहाळे महोत्सव, मोगरा महोत्सव अशा विविध उत्सवांचे आयोजनकेले जाते त्याला अनुरूप आरासहीकेली जाते.

यंदा काय ? दरवर्षी भारतातील भव्यदिव्य मंदिरांची प्रतिकृती बनवण्याची परंपरा मंडळाने जपली आहे. यावर्षी मंडळाने तमिळनाडू, तंजावर येथील श्रीराजराजेश्वर मंदिराची प्रतिकृती उभारलीआहे. प्रतिकृतीचा आकार ७५ बाय १०० फूट असून उंची ९० फूट आहे. लक्ष्य लक्ष्य दिव्यांनी मनमोहक झुंबरांनी नटलेल्याया राजराजेश्वर मंदिरात गणेशपुराणातील प्रसंग चितारण्यात आले आहेत. यंदाही मंडळाने विद्यार्थी महिलांच्या सामुहिक अथर्वशीर्ष पठनाचे आयोजन केले आहे. १४ सप्टेंबरच्या पहाटे वातावरणात हा अथर्वशीर्षाचा जयघोष होईल. १४ सप्टेंबरच्या रात्री मंडळानेवारकरीगजराचेआयोजन केले आहे. त्यामुळे लाडक्या बाप्पासमोर लाडक्याविठुरायाचा गजर अनुभवायला मिळेल.

सामाजिक कार्य : श्रीमंत दगडूशेठहलवाई गणपती ट्रस्ट विविध सामाजिक कार्यातही अग्रेसर आहे. जय गणेश विद्यार्थी पालकत्व अभियानाद्वारे अनेक गरजू विद्यार्थ्यांचे पालकत्व घेऊन त्यांचा शैक्षणिक खर्च केला जातो. जय गणेश जलसंवर्धन अभियान, जय गणेश रुग्णसेवा अभियान यांच्या मार्फतही मंडळ गरजूंना मदतीचा हात पुढे करते.

वैशिष्ट्यपूर्ण : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टची मूर्ती हे अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. परंतु सध्या आपल्याला दिसणारा गणपती ही या मंडळाची तिसरी मूर्ती आहे. १८९३ साली कागदी लगदा शाडूची माती वापरून पहिली मूर्ती बनवण्यात आली. ही मूर्ती आजही अकरामारुती चौक मंडळाने जपून ठेवली आहे.मूर्तीला १२५ वर्ष पूर्ण झाल्याने गेल्या वर्षी तिचे काही प्रमाणात नूतनीकरण करण्यातआले. मंडळाने घडवलेली दुसरी मूर्ती कोंढव्याच्या मातोश्री वृद्धाश्रमात पाहण्यास मिळते. सध्या आपल्याला दिसणारी मूर्ती ज्येष्ठ मूर्तिकार नागेश शिल्पी यांनी घडवली आहे. सूर्यग्रहणाच्याकाळात घडवलेल्या या मूर्तीच्या पोटात मंत्रजपाच्या साक्षीने विधिवत श्रीयंत्र बसवण्यात आले आहे. त्यामुळे या तेजोमय मूर्तीला जीवत्व आले आहे अशी भाविकांची धारणा आहे.

जगणं आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं

disha pinki shaikh
disha pinki shaikh

विचारविश्व | दिशा पिंकी शेख

तृतीयपंथी असं बोललं जाणं हेसुद्धा आमच्यावर कुणीतरी लादलेलच आहे. ती वेगळी ओळख आम्हाला दिली जाते. बऱ्याचदा तर आम्हाला पुरुष असल्याचं समजलं जातं. नाव घेताना पुरुषार्थी वचनं वापरली जातात. आम्हाला समजून घेण्यात समाज अजूनही कमी पडतो आहे. आशा आहे हे चित्र एक दिवस नक्कीच बदलेल.

दिशाची मुलाखत ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

आधी सेरेनाचा राडा, नंतर नोवाकचा विजयोत्सव

images
images

क्रीडानगरी | योगेश जगताप

शनिवारी सायंकाळी झालेल्या अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात जपानच्या नाओमी ओसाका हिने २३ वेळच्या ग्रँडस्लॅम विजेत्या सेरेना विलीयम्सचा पराभव केला. मातृत्वानंतर विजेतेपद मिळवण्याचं सेरेनाचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं. ओसाका ही ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवणारी जपानची पहिलीच खेळाडू ठरली. या सामन्यात पंच सदोष कामगिरी करतायत, ही तक्रार करुन सेरेनाने पंचांशी हुज्जत देखील घातली. या कृत्याबद्दल तिला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत सर्बियाच्या नोवाक जोकोविकने अर्जेंटिनाच्या ज्यूआन मार्टिन डेल पोट्रोचा पराभव करत आपले १४ वे ग्रँडस्लॅम जेतेपद मिळवले. तब्बल ९ वर्षांनी अमेरिकन ओपन स्पर्धेची अंतिम फेरी खेळणाऱ्या डेल पोट्रोला नोवाकने पूर्णपणे निष्प्रभ केले. यंदाच्या वर्षातील नोवाकचे हे दुसरे विजेतेपद आहे. मागील २ वर्षांत रॉजर फेडरर, राफेल नदाल यांनी प्रत्येकी ३, नोवाक जोकोविकने २ विजेतेपद आपल्या नावावर केली आहेत.