Monday, December 8, 2025
Home Blog Page 6710

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवसानिमित्त पथनाट्य

images
images

सातारा | प्रतिनिधी

आज जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवसाचे औचित्य साधून जकातवाडी गावामध्ये परिवर्तन संस्था आणि किमया नवजीवन प्रेरणा केंद्राच्या सदस्यांनी पथनाटय़ सादर केले. महिला व मुलांमध्ये याविषयी जनजागृती व्हावी, माहिती पोहचावी म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायतीचे सरपंच तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य व महिला व बालकल्याणचे अधिकारी श्री खाडे साहेब डॉ. मनिषा शिरोडकर उपस्थित होते.

विचार तर कराल..

IMG WA
IMG WA

विचारविश्व | घनश्याम येणगे

काही गोष्टी समजून घेतल्या की जास्त सोप्या वाटतात. तर काही गोष्टी जाणीवपूर्वक समजू नयेत म्हणून षडयंत्र वापरली जातात.आपण मात्र कंटाळा करतो आणि माझा याच्याशी काय संबंध असं बोलत राहतो. जात-धर्म व दहशतीचे वातावरण अधोरेखित करणारी चित्रफीत मागे आनंद पटवर्धन यांनी केली होती. त्यावरच भाष्य करणारा त्यांचाच हात लेख – इंग्रजी माध्यमातून देत आहे. सोबत काही व्हिडीओ सुद्धा आहेतच.

https://scroll.in/reel/893699/india-today-anand-patwardhans-documentary-reason-holds-a-troubling-mirror-to-the-headlines

उकडीचे मोदक

मोदक
मोदक

खाद्यभ्रमंती | अमृता जाधव

साहित्य :
1 मोठा नारळ, किसलेला गूळ, 2 कप तांदूळाचे पिठ, वेलचीपूड, मिठ, तांदूळाच्या उकडीत घालण्यासाठी तेल, तूप

कृती :
▪ सारण बनवण्यासाठी नारळ खवून घ्यावा. प्रमाणासाठी एक स्टीलची वाटी घ्यावी. जितकया वाट्या खवलेला नारळ असेल त्याच्या निमपट किसलेला गूळ घ्यावा.पातेल्यात खवलेला नारळ आणि गूळ एकत्र करून मंद आचेवर ढवळत राहावे. गूळ वितळला कि वेलची पूड घालावी.

▪ आवरणासाठी तांदूळाची उकड करण्यासाठी नेहमी जितके पिठ तितके पाणी असे प्रमाण घ्यावे. 2 कप तांदूळ पिठासाठी 2 कप पाणी गरजेचे असते. जाड पातेल्यात 2 कप पाणी उकळवत ठेवावे. त्यात 1 चमचा तेल किंवा तूप घालावे. चवीसाठी थोडे मिठ घालावे. गॅस बारीक करून पिठ घालावे, ढवळावे. मध्यम आचेवर 2-2 मिनीटे 2-3 वेळा वरती झाकण ठेवून वाफ काढावी. गॅसवरून उतरवून 5 मिनीटे झाकून ठेवावे.

▪ परातीत तयार उकड काढून घ्यावी. हि उकड व्यवस्थित मळून घ्यावी लागते. उकड मळताना तेल आणि थोडे पाणी लावून मऊसर मळून घ्यावी.

▪ उकड व्यवस्थित मळून झाली कि त्याचे सुपारीपेक्षा थोडे मोठे गोळे करून त्याची पारी तयार करावी. त्यात एक चमचाभर सारण भरून बोटाने पारीच्या चुण्या कराव्यात आणि सर्व चुण्या एकत्र आणून मोदक बंद करावा.

▪ मोदकांना वाफवण्यासाठी चाळणीपेक्षा मोठ्या तोंडाचे जाड बुडाचे पातेले घ्यावे. त्यात 3-4 भांडी पाणी उकळावे. चाळणीत स्वच्छ सुती कापड ठेवून त्यावर जेवढे मावतील तेवढेच मोदक ठेवावेत. पातेल्यातील पाणी उकळले कि मिडीयम हाय गॅसवर पातेल्यात कूकरचा डबा ठेवावा त्यावर मोदकांची चाळण ठेवावी. पाणी मोदकांच्या तळाला स्पर्शेल एवढे असले पाहिजे. वरून झाकण ठेवून 12-15 मिनीटे वाफ काढावी.


मोदकाची उकड झाली सोप्पी

नमस्ते दोस्तहो, मोदकाची उकड कशी सोप्पी करता येईल त्यावर महिनाभर प्रयोग करत होतो. आता सर्वाना सहज करता येईल अशी उकडीची पध्दत सापडली. नक्कीच करुन पहा

१. पाव कीलो मोदकाच पिठ घेवून त्यात चवीपुरते मिठ व १ चमचा तूप घालून ते साध्या पाण्याने भाकरी सारख सॉफ्ट मळून घ्यायचे

२. कुकरची शिट्टी काढून अळुवड्या लावतो तस डब्यात हा मळलेला गोळा ठेवून कुकरमधून वाफ यायला लागल्यावर ६ ते ७ मिऩिटांनी गँस बंद करावा

३. वाफवलेला गोळा परातीत घेवून साध्या पाण्याने पुन्हा सॉफ्ट मळून घ्यायचा व त्याचे मोदक बनवावेत हवे तसे मोदक बनवता येतात लाती न फाटता
मोदक तयार झाल्यावर नेहमीप्रमाणे कुकरची शिट्टी काढून वाफवून घ्यायचे
मोदकाचे सारण
सारणासाठी मोठ्या नारळाची १ कवड ,२००ग्रँम गुळ, १ चमचा तूप, १चमचा वेलची पावडर

क्रिमरोल

images
images

जावे कवितांच्या गावा | नितीन चंदनशिवे

क्रिमरोल वर सुद्धा कविता होते आणि लिहिता लिहिता रडवून जाते.आपणाला ही नक्कीच भावेल ही कविता.
आणि तसंही प्रत्येकाच्या संघर्षाची कथा या क्रिमरोल शिवाय कधीच पूर्ण होणार नाही.आपली प्रतिक्रिया महत्वाची आहे.जरूर द्या.

—- क्रिमरोल —-

भूक
उचंबळून वर यायची
आतडी फाटायची
जीभ सुकायची
लाईफ संघर्षाच्या काळात
करिअर करिअर म्हणायची
तेव्हा,
पोटाला आधार देणारा
कटिंग चहाबरोबर
खिसा सांभाळत हातात यायचास
माझ्या प्रिय मित्रा क्रिमरोल…

दिवसातून एकच भेट
तुझं माहीत नाही
पण मी तरसायचो तुला भेटायला
भुकेचा आणि मेंदूचा
जुगार चाललेला असताना
भूक नेहमी हारायची
तेव्हा तू द्यायचास आधार
माझ्या प्रिय मित्रा क्रिमरोल…

तू फार आवडत होतास
असं नाही
पण तू भूक अडवत होतास
काही काळ तरी
तुला बनवणाऱ्या हाताला
मी कायम सलाम करत राहिलो
माझ्या प्रिय मित्रा क्रिमरोल…

मराठवाड्याचा दुष्काळ
विदर्भाचे दुःख
खान्देशी,माणदेशी,
कोकणी आणि बरंच काही
फक्त तू जवळून पाहिलं
तु प्रत्येकाचा आधार झालास
माझ्या प्रिय मित्रा क्रिमरोल…

तू हातात आलास की
नेमकं त्याचवेळी आई
फोनवर विचारायची
काही खाल्लं का रे बाळा..?
तेव्हा तुला अख्खा तोंडात
कोंबून बोबडे बोल बोलायचो आईशी
आई जेवतोय नंतर बोलतो.
खरंतर तेव्हा फार जवळचा वाटायचास मला
माझ्या प्रिय मित्रा क्रिमरोल…

अस्लमला भेटतोस
चंदनशिवेला भेटतोस
भोसलेला भेटतोस
आणि एखाद्या जोशीलासुद्धा
पण तूच एकमेव आहेस
कुणाला नाव,गाव,जात,धर्म
न विचारता आधार देत राहतोस
माझ्या प्रिय मित्रा क्रीमरोल..

तू संपून जाणारा
एक पदार्थ असलास तरीही
तू स्टगलरांचा फार मोठा आधार आहेस
तू मला जी साथ दिलीस
नाद खुळा यार नाद खुळा
पाच रुपयात भूक मारायची
कला तुझ्यात आहे
म्हणूनच
अनेक स्टगलर कलाकारांना
तुझा फार मोठा आधार आहे
माझ्या प्रिय मित्रा क्रिमरोल..

दंगलकार-नितीन चंदनशिवे
मु.पो.कवठेमहांकाळ
जि.सांगली
7020909521

ग्रामीण भागातच मराठी पत्रकारितेचे, साहित्याचे भविष्य – उत्तम कांबळे

uttam kamble
uttam kamble

पुणे | चैतन्य दासनूर

ग्रामीण भागात अनेक गोष्टींची मुळं रोवलेली असतात. त्यामूळ तिथल्या लोकांना उसनं अवसान घेऊन काम करावं लागत नाही. या ठिकाणीच पत्रकारितेचे, साहित्याचे भविष्य आहे. त्यामुळं ग्रामीण पत्रकारांसाठीच्या कार्यशाळा या गावातच झाल्या पाहिजेत असं मत ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांनी व्यक्त केलं. पुण्याचा दृष्टीकोन हा ग्रामीण भागाबाबत तुच्छतावादी आहे. पत्रकारांनी केवळ शब्दांच्या खेळात न अडकता वस्तुस्थिती समजावून घेऊन त्याच्या खोलात काम करण्याची आवश्यकता आहे. बातमीदारापेक्षा येथील व्यवस्था मोठी आहे. त्यामुळे व्यवस्थेत काम करताना स्वत्व न हरवता काम कसं करता येईल याकडे पत्रकारांनी लक्ष द्यावे असंही कांबळे म्हणाले.

पत्रकार भवन येथे पार पडलेल्या ग्रामीण पत्रकार सन्मान कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणुन बोलताना ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांनी ग्रामीण भागातील आव्हानं व संधी यावर भाष्य केले. सम्यक संवाद व संसाधन केंद्र पुणे, एम्प्लिफाय चेंज, एशिया सेफ एबॉर्शन पार्टनरशीप, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्री अभ्यास केंद्र आणि संज्ञापन व व्रुत्तपत्रविभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ स्रिवादी कार्यकर्त्या रझिया पटेल होत्या तर प्रमुख अतिथी म्हणुन उत्तम कांबळे यांच्यासहीत कवयित्री दिशा शेख, संज्ञापन व व्रुत्तपत्रविद्या विभागाच्या प्रमुख डॉ. उज्ज्वला बर्वे व स्री अभ्यास केंद्राच्या प्राध्यापिका स्वाती देहाडराय या होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाची उद्देशिका वाचुन झाली. प्रास्ताविक डॉ. आनंद पवार यांनी मांडले त्यात त्यांनी गर्भपाताची आवश्यकता समजाऊन सांगताना रेडियोलोजीस्टची लॉबी कशाप्रकारे समाजात कार्यरत आहे याचीही माहीती दिली. दिशा शेख हिने कलम ३७७ विषयी बोलताना सांगीतले की ह्या निर्णयाद्वारे समलैंगिकांसाठी केवळ एक दार उघडले गेले आहे, अजुन बरीच कामं बाकी आहेत. पुढे त्या म्हणाल्या की लेखकाने विचार करुन लिहीण्यापेक्षा आपल्या विचारात लिहीले पाहिजे. भोंगळ होऊन लिहील पाहीजे. सांस्कृतिक बदलाचा भाग होताना आपण आपलं मुळपन विसरुन जातोय. हल्ली माझ्या लिखाणावर प्रेम करणारेसुद्धा म्हणतात – ‘दिशा, तू पहिल्यांदा लिहायची तेच जास्त भारी होतं, ते मनाला भिडायचं’. एकूणच काय पुण्यात आल्यावर माझ्याही भाषेचा ऱ्हास होईल का? अशी भीती मला वाटते.

या कार्यक्रमाचा समारोप अध्यक्षा रझिया पटेल यांच्या भाषणाने झाला सम्यकचे अभिनंदन करताना त्या म्हणाल्या की स्री पुरुष समानतेसाठी आपणास अजुन बऱ्याच गोष्टींवर काम करण्याची आवश्यकता आहे. स्रियांसंबंधीच्या अनेक विषयांवर केवळ चर्चा होते मात्र त्यावर कारवाई करताना सर्वत्र उदासिनता दिसते. भाषेविषयी बोलताना त्या म्हणाल्या की आजची प्रचलित भाषा ही पुरुषसत्ताक मानसिकतेतुन जन्माला आली आहे. त्यामुळे आपणांस भाषेवरही काम करण्याची आवश्यकता आहे.
अध्यशीय भाषणाआधी काही ग्रामीण पत्रकारांचा संविधानाची प्रत देऊन सत्कार करण्यात आला . या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रज्ञा मोळावडे यांनी केले.

गुणवत्तापूर्ण व वैज्ञानिक शिक्षणासाठी ‘एसएफआय’चा लढा

sfi logo
sfi logo

पुणे | नवनाथ मोरे

सर्वांना मोफत भेदभाव विरहित गुणवत्तापूर्ण व वैज्ञानिक शिक्षण या मागणीला घेऊन स्टुडंटस् फेडरेशन आँफ इंडिया या विद्यार्थी संघटनेचे देशभरात लढे सुरू आहेत. मध्यप्रदेशमधून निघालेल्या जत्थ्याचे आगमन महात्मा फुले वाडा पुणे येथे झाले. या जत्थ्याला संबोधित करताना अखिल भारतीय महासचिव डाँ.विक्रमसिंग म्हणाले, गुणवत्तापूर्ण शिक्षण म्हणजे चांगले स्कुल शिक्षण हे ज्यांचे आई-वडिल शेती, शेतमजूर,मनरेगावर काम करतात. त्यांना चांगले शिक्षण पाहिजे. शिक्षण हे सामाजिक, नैतिक संविधानिक दृष्ट्या आमचा हक्क आहे.पण आज ते नाकारले जात आहे.शिक्षण हे विचार करण्याची क्षमता निर्माण करते.परंतु त्या पध्दतीचे शिक्षण आज दिसत नाही. ते मिळेपर्यंत लढाई चालू राहणार आहे.
आरएसएस प्रणित सरकार आल्यानंतर सरकार विरोधात बोलणाऱ्यांना नक्षलवादी,देशद्रोही ठरविले जात आहे. तर आज शिक्षण हे ज्याच्या खिशात पैसा त्याच्यासाठी अशी परिस्थिती झाली आहे असे प्रतिपादन राज्यध्यक्ष मोहन जाधव यांनी केले.
या व्यवस्थेने एकलव्याचा अंगठा घेतला,परंतु आज एकलव्यप्रमाणे शिक्षण नाकारले जात असेल तर त्याविरोधात निर्धाराने लढण्याचे प्रतिपादन राज्य सदस्य मंजूश्री कबाडे यांनी केले.
यावेळी राज्य सचिव बालाजी कलेटवाड, राज्य सदस्य विलास साबळे,राज्य सदस्य राजु शेळके, गणेश नागरगोजे,संदिप मरभळ,अक्षय रघतवान,देविलाल बागूल,रवि साबळे आदी उपस्थित होते.

लोकशाहीचे सुदृढीकरण महत्वाचे- सरन्यायाधीश

IMG WA
IMG WA

पुणे | अमित येवले

डॉ. पतंगराव कदम स्मृती प्रबोधन व्याख्यानमाला व पुणे लॉ सेंटर विस्तारित कक्षाचे आणि आंतरराष्ट्रीय लवाद केंद्राचे आज सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांचे हस्ते उद्घाटन झाले.

यावेळी बोलतांना ते म्हणाले, लोकशाही संकल्पना कोसळली तर कायद्याचे राज्य कोसळल्याशिवाय राहणार नाही’, त्यामुळे लोकशाही ही सुदृढ केली पाहिजे.

संविधानाने दिलेले अधिकार व हक्क लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी आवश्यक आहेत आणि सामाजिक न्यायाच्या पायावरच लोकशाही उभी आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अजय खानविलकर, मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील, न्यायमूर्ती अजय खानविलकर, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, विश्वविद्यालयाचे कुलगुरु डॉ. माणिकराव साळुंखे, विश्वजीत कदम आदी उपस्थित होते.

जागतिक साक्षरता दिनाचा देशभर उत्साह

IMG WA
IMG WA

पुणे | अमित येवले

चांगल्या जीवनासाठी शिक्षण आणि ज्ञान असणे फार महत्वाचे आहे. त्यातूनच परिवर्तन घडवता येते आणि विकासाच्या मार्गावर जाता येते. यासाठी लोकांना साक्षरतेची संधी मिळावी म्हणून ‘युनेस्को’च्या वतीने दरवर्षी ८ सप्टेंबर रोजी ‘आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस’ साजरा केला जातो.

‘साक्षरता आणि कौशल्य विकास’ ह्या घोषवाक्याने यंदाचा साक्षरता दिन साजरा करण्यात येत आहे.

अधिक माहिती व ट्विटसाठी लिंक

https://t.co/p1rBt9yxmB

लीला पूनावाला शिष्यवृत्ती – ऑनलाईन अर्जाला सुरुवात

leela poonawala foundation
leela poonawala foundation

पुणे | सुनिल शेवरे

दरवर्षी लीला पूनावाला फाउंडेशन शैक्षणिक क्षेत्रात अनेक विद्यार्थिनींना प्रवेश मिळवून देते. यंदाही ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. यामध्ये बायोटेक्नोलॉजी, कॉम्प्युटर सायन्स, इंजिनियरिंग, माइक्रोबायोलॉजी,गणित,एम्.एस.सी, नर्सिंग,फार्मसी, भौतिकशास्त्र, सांख्यिकी इत्यादि आहेत. उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मुलींसाठी ही सुवर्णसंधी मानली जाते. फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक मुली विविध क्षेत्रात नावीन्यपूर्ण यश मिळवून मोठ्या प्रमाणात कार्य करत आहेत त्यांना पॅकेज सुद्धा चांगले आहे. यशस्वी मुलींची अनेक उदाहरणे फौंडेशनमध्ये असल्याचं लीला पुनावाला यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच पदवी, अभियांत्रिकी (सर्व शाखा, डिप्लोमा नंतर ,२ वर्षाचा इंजिनियरिंग) सायन्स (बी.एस.सी इन बायोमेट्रिक, संगणक विज्ञान , संगणक एप्लिकेशन, केमिस्ट्री, माइक्रोबायोलॉजी, गणित, भौतिकशास्त्र) मध्ये इछुक उमेद्वारांनी अर्ज करण्यास सुरुवात करण्याच आवाहन लीला पूनावाला यांनी केलं आहे.

पदव्युत्तर पदवी आणि पदवीसाठी अर्ज करण्यासाठी

www. lpfscholarship.com

या संकेतस्थळावर अर्ज करू शकता.
पदव्युत्तर पदवीसाठी १६ सप्टेंबर २०१८ ही अंतिम तारीख आहे.
प्रवेश मर्यादित असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देण्यात येईल.