Monday, December 8, 2025
Home Blog Page 6711

पुणे मेट्रो तर्फे रस्ता सुरक्षा जागरूकता अभियान

rasta suraksha
rasta suraksha

पुणे | कर्वे रोड व नाशिक फाटा येथे पुणे मेट्रोतर्फे रस्ता सुरक्षा जागरूकता अभियान राबविण्यात आला. यामध्ये सर्वांनी रहदारीच्या नियमांचे पालन करावे ही विनंती करण्यात आली.

दुचाकी वापरतांना हेल्मेट अवश्य वापरा, शहरातील मेट्रो प्रकल्प सुरू असलेल्या ठिकाणांजवळून आपली वाहने सावकाश चालवा, शक्यतो आपली वाहने ही डाव्या बाजूने चालवा, जेनेकरूण जोरात जाणारी वाहने उजव्या बाजूने जातील याप्रकारची पत्रके यावेळी वाटण्यात आली.

महाराष्ट्रातील पहिल्या गे जोडप्याने केलं अमेरिकेत लग्न

gay couple
gay couple

पुणे | प्रदीप देशमुख

आपल्या एकमेकांप्रति असलेल्या प्रेमाला योग्य न्याय देण्याची इच्छा असणाऱ्या समीर समुद्र व अमित गोखले या समलिंगी पुरुष जोडप्याने मागील वर्षी सर्वांचा विरोध पत्करत देशाबाहेर जाऊन लग्न केलं. अमेरिकेत त्यांनी हे लग्न केलं होतं. गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिकाना मूलभूत अधिकार दिल्यानंतर त्यांच्या लग्नाची ही गोष्ट समोर आली आहे.
दोघेही व्यवसायाने अभियंता असून त्यांनी व्यवस्थापनशास्त्रातील पदवीही घेतली आहे. मागील १५ वर्षांपासून ते एकमेकांच्या प्रेमात आहेत. कुटुंब, नातेवाईक, मित्र-मंडळी यांच्याकडून तीव्र स्वरुपाच्या विरोधाला त्यांना सामोरं जावं लागलं होतं. “आम्ही जसे आहोत तसे आहोत, आमची काळजी समाजाने करण्याची गरज नाही. लोक काय म्हणतात यापेक्षा आम्हाला एकमेकांबद्दल काय वाटतं ते महत्वाचं आहे.” असंही दोघे म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर जवळपास दोघांच्याही डोळ्यांत १५ मिनिटे अश्रू तरळत होते. या निर्णयाबद्दल जंगी पार्टी करण्याचा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला.

गणेशोत्सवासाठी वाहनांना पथकरातून सूट

IMG WA
IMG WA

मुंबई | अमित येवले

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि कोल्हापूरमार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना गणेशोत्सवानिमित्त पथकरातून सूट मिळणार आहे.

त्यासाठी वाहनांना गणेशोत्सव २०१८ , कोकणदर्शन या नावाचे स्टीकर पोलीस, आरटीओच्या वतीने उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत असे सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत निर्णय जारी केला.

अधिक माहितीसाठी लिंक –

https://t.co/BxFBMYwAz0

जव्हार नगरपरिषदेच्या शताब्दीपूर्ती पर्यटन महोत्सव सोहळ्याचे उद्घाटन

jawahar paryatn kendra
jawahar paryatn kendra

पालघर | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जव्हार नगरपरिषदेच्या शताब्दीपूर्ती पर्यटन महोत्सव सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पालघरमधील ८५० पथदिव्यांचा आणि पर्यटनविषयक संकेतस्थळाचाही शुभारंभ करण्यात आला व कुपोषण मुक्तीसाठी सुरू असलेल्या ‘राष्ट्रिय पोषण महिना’ मोहिमेच्या भित्तीपत्रिकेचे प्रकाशनही करण्यात आले.

जव्हारच्या पाणीपुरवठ्यासाठी १७.३६ कोटी, पर्यटनवृद्धी १० कोटी,शहरातील विकास कामांसाठी १० कोटी रुपये मंजूर करण्याची मुख्यमंत्री यांनी घोषणा केली. जव्हारला उत्तम पर्यटन शहर म्हणून सर्व सोयी सुविधा विकसित करण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

साताऱ्यात ८ जण तडीपार, एसपी पंकज देशमुखांची धडक कारवाई

tadipar
tadipar

सातारा | योगेश जगताप

मारामारी, खंडणी व खुनाचा प्रयत्न करण्याच्या गुन्ह्यात सक्रिय असलेल्या ८ जणांना आज साताऱ्याचे पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांनी तडीपार केलं आहे. एका महिन्यात तडीपाराचा दुसरा दणका एसपी साहेबांनी दिल्यामुळे गुंडगिरी करणाऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. सातारा, मलकापूर, कराड आणि कोंडवे अशा परिसरातील हे रहिवासी असून २७ ते ३५ वर्ष वयोगटातील सर्वजण आहेत. यामध्ये श्रीरंग आवळे, सुजित आवळे (बुधवार नाका, सातारा), अमीर शेख, समीर मुजावर, लाजम होडेकर (कराड), गणेश निंबाळकर, योगेश निंबाळकर, आदिनाथ निंबाळकर (कोंडवे) अशी ३ वेगवेगळ्या गटांतील तडीपार केलेल्यांची नावे आहेत. सर्वसामान्य जनतेकडून सतत तक्रारी आल्याने अधिक्षकांनी तातडीने कारवाई करण्याचा निर्णय घेतला.

गणेशोत्सवानिमित्त बाजारपेठ बहरल्या !!

ganesh festival
ganesh festival

पुणे | सुनिल शेवरे

गणेशोत्सव आता अवघ्या सहा दिवसांवर येऊन ठेपलेला असताना गणेश मूर्तिंच्या विक्रीसाठी बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. दरवर्षी पुण्यात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. हा उत्सव पुण्यातून सुरु झाला असल्यामुळे संपूर्ण भारताचे लक्ष पुण्याकडे असते. वेगवेगळ्या प्रकारच्या मुर्त्या आणि सजावटीचं साहित्य दरवर्षी बाजारात येत असतं. पुण्यातील विविध भागांतील घरात मोठ्या गणेश मूर्तिची स्थापना करतात. गणेश मुर्ती विकत घेत असताना पुण्यात सारसबागेजवळ मोठ्या प्रमाणात नागरिक गर्दी करतात. यंदा मूर्ती घेताना जीएसटी टॅक्स लागणार का? आणि त्यामुळे किती प्रमाणात ग्राहकांवर परिणाम होईल? हे गणेशमूर्ती स्थापनेच्या दिवशीच कळेल. शहराचे प्रमुख मूर्ती विक्री केंद्र असल्याने सारसबागेजवळ असलेल्या स्टॉलला वेगळी झळाळी आल्याच दिसत आहे.

राष्ट्रीय अभियंता दिनानिमित्त एसीईडी कडुन प्रधानमंत्री आवास योजना या विषयावर चर्चासत्र

engineers day
engineers day

पुणे | सुनिल शेवरे

भारतरत्न एम्. विश्वेश्वरय्या यांच्या स्मरणार्थ साजरा होणाऱ्या राष्ट्रीय अभियंता दिनाच्या निमित्ताने असोसिएशन फॉर सिव्हिल इंजीनियर्स डेवलपमेंट संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दिनांक १५ सप्टें २०१८ रोजी सायंकाळी ६ वाजता कमिन्स सभागृह नवी पेठ येथे होणार असल्याची माहिती एसीईडी चे संस्थापक सदस्य प्रकाश भट, चेअरमन अशोक रेटवड़े यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी निखिल शहा,गोविंद देशपांडे,सतीश,यंबल,विलास भोसले, प्रवीण मुंडे उपस्थित होते.
भट म्हणाले ” प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २०२२ पर्यंत सर्वांना घर मिळावे या विषयी योग्य माहिती जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी पीएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त डॉ प्रविणकुमार देवरे, पुणे महापालिका प्रधानमंत्री आवास योजना विभागाचे सहसंचालक दिनेश रोकड़े मार्गदर्शक करणार आहेत. तसेच हौसिंग फॉर ऑल आणि कंस्ट्रक्शन सेक्टर स्टार्टअप या विषयावर पेपर प्रेजेंटेशन एनोव्हेटिव्ह आयडिया या दोन स्पर्धांचं आयोजन केले आहे. या स्पर्धामध्ये सहभागी होण्याची अंतिम तारीख २० सप्टें २०१८ आहे. दोन्ही स्पर्धेतील प्रथम व द्वीतीय क्रमांकाच्या विजेत्याला २९ सप्टें रोजी ५०,००० व २५००० रोख पारीतोषिक देण्यात येईल.

रिपब्लिकन ऐक्य ही काळाची गरज !!

republican
republican

विचारविश्व | रविंद्र बनसोडे

धर्माप्रमाणे राजकारणात निष्ठा बाणली नाही, तर तो लंफग्याचा बाजार बनेल
डॉ बाबासाहेब आंबेडकर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या सांस्कृतिक राष्ट्रवादी संघटनेने नरेंद्र मोदींच्या माध्यमातून दिलेल्या :सबका साथ सबका विकास’ या भुलथापाच्या गाजराला भुलून आंबेडकरी समुह रिपब्लिकन गटाच्या माध्यमातून हिंदुत्वाच्या जाळ्यात फसला आहे या फसल्या गेलेल्या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी आज विचार करण्याची वेळ आली आहे असे वाटते
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेच्या २६ नोव्हेबर १९४९ रोजी समारोपाच्या भाषणामध्ये इशारा दिला होता. आज आपण विसंगतपुर्ण सामाजिक जीवनात प्रवेश करीत आहोत आज आपण भारतीय समाजाला एक माणुस, एक मत, एक मुल्य,या माध्यमातून मताचा अधिकार देऊन राजकीय समता तर देत आहोत पण या देशातील सामाजिक आर्थिक विषमता नष्ट करून स्वभावतःच या देशातील राष्ट्रविरोधी असणारा हिंदु धर्मातील जातीभेदाचा उच्छाद आटोक्यात आणण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी १४ आॅक्टोबर १९५६ साली २२ प्रतिज्ञानी धम्मदिक्षा देऊन समाजाची धारणा करून दुसऱ्या बाजूने खुल्या पत्रावर आधारीत रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडली. आज आपण त्या खुल्या पत्रावर आधारीत पक्ष चालवत आहोत की, डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जातीनिर्मुलनाच्या ध्येयाच्या विरोधी प्रस्थापित पक्ष असलेल्या भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे सेल असल्यासारखे वावरत आहोत, याचा विचार करण्याची वेळ आज डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि रिपब्लिकन पक्षाचे नांव घेऊन राजकारण करणाऱ्या अनुयायांवर आली आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक आर्थिक विषमता व राष्ट्रविरोधी असणाऱ्या हिंदू धर्म, संस्कृती व त्यांच्या राजकीय पक्षाना आटोक्यात आणण्यासाठी नवयान बौध्द समाज निर्मितीतुन खुल्या पत्रावर आधारीत रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडली आहे परंतु रिपब्लिकन नेतृत्वाने आजपर्यंत नवयान बौध्द समाज निर्मिती व त्या समाजाचे आर्थिक सामाजिक प्रश्नांचे गांभीर्य समजुन घेतले नसल्यामुळे रिपब्लिकन नेतृत्वाने आजपर्यंत नवयान बौध्द समाजाची आर्थिक शैक्षणिक प्रश्नांच्या अजेंड्याची चर्चा न करता भावनिक प्रश्नांची चर्चा करून निवडणुकीच्या काळात सर्व जागावर कार्यकर्त्यांना निवडणूका लढवुन त्या माध्यमातून स्थानिक गल्लीपासून दिल्लीपर्यंत नेतृत्व निर्माण करून स्वतःच्या पक्षाला निवडणूक चिन्ह मिळवण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित असताना अशा प्रकारे कोणतीही निवडणूक सर्व जागावर न लढविता आंबेडकरी ध्येय उद्देशाच्या विरोधी असणाऱ्या पक्षाबरोबर युती आघाड्याच्या नावाखाली चार पाच जागा मिळवुन आंबेडकरी ध्येय उद्देशाच्या विरोधी असलेल्या
कमळ,धनुष्यबाण, पंजा, घड्याळ या चिन्हावर निवडणुका लढविल्या. यांची चर्चा घडवून आंबेडकरी ध्येयापेक्षा साधनाला महत्त्व देऊन आंबेडकरी समुहामध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण केली. आजपर्यंत या गोंधळाचा फायदा प्रस्थापित पक्षांना झाला आहे. या गोंधळाच्या परिस्थितीतुन आंबेडकरी समाजाला बाहेर पडायचे असेल तर आजच्या काळाच्या संदर्भात भावनिक प्रश्नांच्या पुढे जाऊन सामाजिक आर्थिक शैक्षणिक परिस्थिती समजुन घ्यावी लागेल,
ज्या हिंदू धर्मातील जाती व्यवस्थेने येथील अस्पृश्य ओबीसी बौध्द या समुहाचे सामाजिक आर्थिक शैक्षणिक विषमता निर्माण करून शोषण पिळवणुक वर्षानुवर्षे केली गेली त्या पिळवणुकीचे मुळ शोधण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी वयाच्या सव्वीसाव्या वर्षी भारतातील जातीची उत्पती व विकास यांचा अभ्यास करून भारतातील सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठेचे वाटप हे जातीनुसार केले असल्याने सत्ता संपत्ती आणि प्रतिष्ठेचे समान वाटप जातीनिर्मुलनाशिवाय होणार नाही या निष्कर्षावर ते येऊन ज्या हिंदू धर्माने जातीच्या उतरंडीची समाजमानसिकतेची धारणा केली त्या हिंदु धर्मातील जातीच्या उतरंडीच्या समाजाची चिकित्सा करून डॉ बाबासाहेब आंबेडकर थांबले नाहीत तर विषमता असलेल्या हिंदु धर्माचा त्याग करून समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्यायावर आधारित २२ प्रतिज्ञांची दिक्षा देऊन नवायान बौध्द धम्म समाजाची धारणा करण्यासाठी दरेकाने दरेकाला दिक्षा देण्याचा अधिकार देऊन दुसऱ्या बाजूला सामाजिक,आर्थिक, शैक्षणिक प्रश्न सोडविण्यासाठी राज्यघटनेच्या माध्यमातून संसदीय मार्गाचा अवलंब करून संसदेमध्ये जाऊन बौध्द ओबीसी अस्पृश्याची सामाजिक आर्थिक शैक्षणिक प्रश्न सोडविण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी खुल्या पत्रावर आधारीत रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडुन साधने निर्माण केली. रिपब्लिकन नेतृत्वाने आजपर्यंत आपल्या कार्यकर्त्यांना खुल्या पत्रावर आधारीत रिपब्लिकन पक्षाची संकल्पना समजावून सांगितले की नाही? हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे (बी सी कांबळे) वगळता डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी खुल्या पत्रावर आधारीत रिपब्लिकन पक्षाची संकल्पना कार्यकर्त्यांना समजावुन न सांगितल्यामुळे आज रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता रिपब्लिकन पक्षाचे नांव घेऊन ज्या हिंदू धर्म संस्कृतीने येथील भारतीय समाजाला सामाजिक आर्थिक गुलाम बनविले. हिंदु नववर्षाच्या स्वागतासाठी गुढीपाडवा, डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि हेडगेवारांचे होर्डिंग्ज लावुन दिवस साजरा करून ज्या हिंदू धर्म संस्कृतीचे संरक्षण करणाऱ्या हिंदुत्ववादी पक्षाच्या राजकीय चिन्ह असणाऱ्या कमळ धनुष्यबाण यावर निवडणूक लढवुन स्वतःची व आंबेडकरी समाजाची फसवणुक करीत आहोत हे आंबेडकरी कार्यकर्त्यांनी लक्षात घेऊन या ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकरांची भुमिका लक्षात घेतली पाहिजे डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात (धर्माप्रमाणे राजकारणात निष्ठा बाणली नाही तर तो लंफग्याचा बाजार बनेल) या लफंग्याच्या बाजारातुन मुक्तता हवी असेल आणि हिंदुत्वाच्या व नरेंद्र मोदींच्या विकासाच्या भुलथाप्यातुन आंबेडकरी समाजाला बाहेर काढायचे असेल तर डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी १९४६ साली दिलेला इशारा लक्षात घेतला पाहिजे (थॉटस आॅन पाकिस्तान) या ग्रंथात भारतीय समाजाला इशारा देताना म्हणाले की हिंदू राज्य सत्यात उतरले तर देशावर सर्वाधिक भीषण संकट ओढवेल यात शंका नाही हिंदु काहिहि म्हणोत हिंदुत्व हे समता स्वातंत्र्य बंधुत्वाच्या विरोधात असल्यामुळे लोकशाहीला घातक आहे म्हणून काहीही करून हिंदुराज येण्यापासून रोखावे लागेल या परिस्थितीत धर्माध हिंदुत्वाचा व ब्राम्हणी भांडवलशाहीचा धोका वाढला असताना त्याला रोखण्याचे सामर्थ्य फक्त डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या नवयान बौध्द समाज निर्मितीतुन होऊ शकतो डॉ बाबासाहेब नवायान बौध्द समाजाबद्दल बोलताना म्हणतात आम्हाला राजकीय हक्क प्राप्त व्हावेत कायदेमंडळात जागा मिळाव्यात आणि समाजाने समतेने वागवावे म्हणून भारतात आम्ही एक प्रदीर्घ राजकीय युध्द खेळीत आहोत तथापि आम्ही अध्याप यशस्वी झालो नाही या गोष्टीचा अर्थ असा की राजकीय संग्रामातुन आम्हास मुक्ती मिळालेली नाही गेली ३५ वर्ष मी राजकीय लढाई चालविली आहे या लढाईत मोठ मोठ्या उच्च हिंदुच्या तलवारी बरोबर तलवार मला भीडवावी लागली याच काळात जगातील सर्व धर्मांचा मी अभ्यासही केला आणि आता शेवटी एका अपरिहार्य निणर्यास मी येऊन पोहचलो आहे तो निर्णय हाच की बौध्द धर्माशिवाय अस्पृश्याना दुसरा कोणताही मुक्तीचा मार्ग नाही फक्त बौध्द धर्मातच अस्पृश्यतेचा निवारणाचा चिरकालिन उपाय आहे जर तुम्हास समतेचे तत्व हवे असेल आणि अर्थिक दास्यातुन मुक्तता करावयाची असेल तर बौध्दवादाशिवाय कोठेच दुसरा आश्रय नाही.

(लेखक बौध्द युवा संघर्ष समिती महाराष्ट्र चे राज्य संघटक आहेत )

महिला आयोगाने घेतली राम कदम यांच्या वादग्रस्त वक्तव्याची दखल

ram kadam
ram kadam

मुंबई | आमदार राम कदम यांच्या वादग्रस्त विधानाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने स्वाधीकारे (स्युमोटो) दखल घेतली असून आठ दिवसात आपले म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
गेल्या दोन दिवसापासून माध्यमांमध्ये या प्रकरणाची जोरदार चर्चा चालू असल्याने व याबाबत राज्यात अनेक ठिकाणी निषेध मोर्चे निघाल्यानंतर अखेर राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची आज रात्री उशिरा दखल घेतली.

अधिक माहितीसाठी लिंक –

https://t.co/CHukhcvFR4

पुण्यात महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे चौथे अधिवेशन

mseb
mseb

पुणे | सुनिल शेवरे

वीज उद्योगातील कामगारांना समान काम, समान वेतन मिळावे, कंत्राटदारांकडून होणारी कामगारांची पिळवणूक थांबावी यासाठी पूर्वाश्रमिच्या एम्एसइबी मधील रोजंदारी पद्धत व एनएम्आर पुन्हा सुरु केले पाहिजे. या मागणीसाठी अधिवेशनाच आयोजन करण्यात आलं आहे.

दिनांक ७ सप्टें २०१८ रोजी सकाळी १०:३० वाजता दुधाने लॉन्स, कमिन्स कॉलेज रोड, शाहू कॉलनी , कर्वेनगर येथे हे अधिवेशन संपन्न होणार असल्याचं महाराष्ट्र प्रदेश संघटक नीलेश खरात यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

कंत्राटी वीज कामगारांच्या समस्या आणि त्यांच्यासाठी लढ़ा देण्यासाठी गेली अनेक वर्षे काम करणारी म्हणून या कामगार संघाची ओळख आहे.

या अधिवेशनाचे उद्घाटन ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार असून या अधिवेशनाला मार्गदर्शन महावितरण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार हे करणार आहेत. व कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्षा आमदार मेधा कुलकर्णी आहेत.