Saturday, August 2, 2025
Home Blog Page 6730

पाकिस्तानातील पहिल्या शीख पोलीस अधिकार्याला राहत्या घरातून हाकलले

thumbnail 1531261525601
thumbnail 1531261525601

लाहोर : पाकिस्तानमधे सध्या शिख धर्मियांना मोठ्या प्रमाणात टार्गेट केले जात आहे. पाकिस्तानातील शिख धर्मियांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार पाकिस्तानातील पहिला शीख पोलीस अधिकारी गुलाब सिंग याला त्याच्या राहत्या घरातून जबरदस्ती बाहेर हाकलण्यात आले आहे. विषेश म्हणजे असे करण्यामागे पाकिस्तानचे पोलीस खातेच असल्याचे बोलले जात आहे. यावेळी पाकिस्तान पोलीसांनी सिंग यांच्याशी असभ्य वर्तन केले असल्याचे समजत आहे.

लाहोर मधील डेरा चहल परिसरात राहणार्या सिंग यांच्या राहत्या घरात सोमवारी पोलीस आले होते. त्यांनी सिंग यांना त्यांच्या राहत्या घरातून कुटूंबासहीत जबरदस्तीने बाहेर काढले तसेच त्यांना अपमानास्पद वागणूक दिली. यादरम्यानचा पोलीसांसोबतच्या झटापटीचा व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला असून पाकिस्तान पोलीसांवर टिकेची झोड उठत आहे. ‘चोर – डाकूंसोबत जसे वागितले जाते तसेच पाकिस्तान पोलीस माझ्यासोबत वागले. कसलीही नोटीस अथवा पुर्वकल्पना न देता मला जबरदस्तीने घर खाली करायला लावले’ असे सिंग यांनी म्हटले आहे. ‘मला माझ्या घरातून बाहेरपर्यंत लोळवत आणण्यात आले, माझ्या डोक्यावरची पगडी काढून टाकण्यात आली तसेच माझे केस विस्कटले गेले.’ असेही सिंग यांनी म्हटले आहे. ‘मी १९૪७ सालापासून इथे राहतो आहे, मला घर रिकामे करण्याकरता दहा मिनिटे तरी द्या’ अशी विनवणी करुन सुद्धा माझे कोणीच एकले नाही असे सिंग यांनी एका व्हिडिओत म्हटले आहे. याप्रकरणामुळे पाकिस्तानातील अल्पसंख्यांकांचे प्रश्न पुन्हाएकदा एरणीवर आले आहेत.

बुलेट ट्रेनला लागू शकतो ब्रेक

thumbnail 1531242791152
thumbnail 1531242791152

मुंबई ते अहमदाबाद संकल्पित बुलेट ट्रेनला अनेक अडचणीतून जावे लागत आहे. पालघर मधील फलोत्पादक शेतकऱ्यांनी केलेला विरोध मावळतो ना मावळतो तोपर्यंत नवीन समस्या बुलेट ट्रेन समोर येऊन उभी ठाकली आहे. विक्रोळी मध्ये स्थित गोदरेज कंपनीच्या मालकीच्या ३.५ हेक्टर जमिनीचे अधिग्रहण केल्या शिवाय बुलेट ट्रेन पुढे सरकू शकत नाही. गोदरेज कंपनी च्या जमिनीचे बाजार मूल्य ५०० कोटी रुपये आहे. गोदरेज कंपनी न्यायालयात गेली तर बुलेट ट्रेन कायदेशीर कचाट्यात गुंतून पडण्याची शक्यता आहे. सरकारने ठरवले तर महाराष्ट्र जमिनी अधिग्रहण अधिनियम २०१३ नुसार जमीन अधिग्रहण करून गोदरेज कंपनीला मात देऊ शकतात.
१.८ लाख कोटीच्या बुलेट ट्रेन प्रकल्पातील १०,००० कोटी रुपये जमीन अधिग्रहण करण्यासाठी प्रस्तावित आहेत.

सुमित्रा महाजनांनी लिहले खासदारांना पत्र, संसदेच्या अधिवेशनाचा वेळ कारणी लावण्याचे अावाहन

thumbnail 1531238978789
thumbnail 1531238978789

दिल्ली : १८ जुलै ते १० ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी सर्व खासदारांना पत्र लिहले आहे. १६ व्या लोकसभेची फक्त ३ अधिवेशने बाकी राहिली असून येत्या काळात आपण संसदेच्या अधिवेशनाचा वेळ कारणी लावावा असे अावाहन सुमित्रा महाजन यांनी केले आहे.
सुमित्रा महाजन यांनी पत्रामधे त्यांच्या परदेश दौऱ्याचा उल्लेख करून प्रवासी भारतीय भेटल्याचा प्रसंग रेखाटला आहे. ‘मी परदेश दौर्यावर असताना प्रवासात मला अनेक भारतीय भेटले. निवासी भारतीयांनी संसदेत होणाऱ्या गदारोळाबद्दल माझ्याकडे चिंता व्यक्त केली आहे. अनेक विधेयकांना मूर्त रूप देणे बाकी असून आपण सदन चालवण्यास सहकार्य करावे’ असे सुमित्रा महाजन यांनी पत्रात म्हटले आहे.
तसेच संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांनी संसदेच्या अधिवेशन प्रारंभाच्या पूर्वसंध्येला सर्व पक्षीय खासदारांसाठी सुमित्रा महाजन यांच्या घरी स्नेहभोजनाचे आयोजन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ही या स्नेहभोजनात सहभागी होणार आहेत.

भाजप झाला विधान परिषदेत सर्वात मोठा पक्ष, करू शकतो सभापती पदावर दावा

thumbnail 1531238213374
thumbnail 1531238213374

नागपूर : भाजप आता विधान परिषदेतील सर्वात मोठा पक्ष झाला आहे. भाजपचे विधान परिषदेत २१ सदस्य झाले आहेत. त्यामुळे भाजपला अाता विधान परिषदेतील सर्वात मोठा पक्ष म्हणून मान्यता मिळणार आहे. भाजपचे सद्याचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना पाय उतार व्हायला लावायची भाजपची योजना असल्याचे बोलले जाते. हल्लाबोल आंदोलन आणि विधी मंडळातील आक्रमकपणा यामुळे भाजप राष्ट्रवादीच्या विरोधात इरीला पेटले आहे. त्याचाच एक भाग म्हणून विधान परिषदेच्या सभापतींना पायउतार करून त्यांच्या जागी भाजपायी बसवण्याचा बेत भाजपने आखल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते. तर उपसभापती पदावर असलेले माणिकराव ठाकरे निवृत्त झाल्याने उपसभापती याच अधिवेशनात निवडले जाण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपवर नाराज असलेल्या शिवसेनेची उपसभापती पदी वर्णी लागेल असे बोलले जात आहे.

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा आज सासवडमध्ये दुसरा मुक्काम

thumbnail 1531234697544
thumbnail 1531234697544

सासवड : संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा आज सासवडमध्ये दुसरा मुक्काम होता. काल पालखी दिव्य दिवेघाट पार करून सासवड मुक्कामी पोहचली. कालचा शिन घालवण्यासाठी आज एक अधिकचा मुक्काम सासवडमध्ये आयोजण्यात आला आहे.
उद्या पालखी सासवड स्थित सोपान काकांच्या मंदिरात जाणार असून तेथे बंधू भेटीचा सोहळा पार पडणार आहे. बंधू भेटीचा हा सोहळा डोळ्यात साठवून घेण्यासाठी वारकरी आसुसले आहेत.
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सकाळी सहा वाजता जेजुरीकडे प्रस्थान करणार आहे.

संत तुकाराम महाराजांची पालखी यवत मुक्कामी दाखल

thumbnail 1531234739758
thumbnail 1531234739758

पुणे : लोणी काळभोर येथून निघालेली संत तुकाराम महाराजांची पालखी यवत मुक्कामी दाखल झाली आहे. पालखी सोलापूर महामार्गहून जाऊन आज सातच्या सुमारास यवत मुक्कामी पोहचली आहे.
दरम्याम पालखीचा विसावा उरुळी कांचन याठिकाणी संपन्न झाल. येथे वारकऱ्यांनी दुपारचे जेवन घेतले आणि पुढे प्रवास आरंभला. दोन दिवस पावसाने भिजलेल्या वारकऱ्यांनी आज प्रवासात कडक उन्हाचा अनुभव घेतला. अखंड हरिनामाचा गजर करत पालखी यवत मुक्कामी जाऊन पोहचली.

थाईलंडमधील गुहेत अडकलेल्या फुटबाॅल पटूंना वाचवण्यासाठी महाराष्ट्रातून किर्लोस्करच्या अभियंतांची फौज बँकॉकला

thumbnail 1531234329085
thumbnail 1531234329085

बँकॉक : उत्तर थायलंडमध्ये एका गुहेत फुटबाॅल पटूंची एक टीम अडकली होती. गुहेत अडकलेल्या १६ ते १८ वर्षाच्या मुलांना आणि २५ वर्षीय प्रशिक्षकांना बाहेर काढण्यासाठी गेले १० दिवस थायलंड सरकारकडून रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात येत होते. या बचाव कार्यात गुहेत असणार्या पाण्याचा अडथळा येत होता. गुहेतील पाणी उपसण्यासाठी योग्य क्षमतेचे पंप थायलंडकडे उपलब्ध नव्हते. थायलंडच्या परराष्ट्र उच्चायुक्ताने सुषमा स्वराज यांना पत्र लिहून मदत मागीतली होती. परराष्ट्र खात्याच्या निर्देशावरुन महाराष्ट्रातील किर्लोस्कर कंपनीचे अभियंते देशातील सर्वात जास्त आश्व क्षमतेच्या मोटारी घेऊन थायलंडला रवाना झाले. थायलंड मधील रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र धावून गेला आणि किर्लोस्करच्या अभियंत्यांनी त्या फुटबाॅल पटूंचे प्राण वाचवले.
किर्लोस्कर कंपनी ही महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील अग्रगण्य कंपनी आहे. शेतीची अवजारे यंत्रे बनवण्यासाठी या कंपनीची स्थापना झाली आहे.

मुंबईहुन पुण्याला सुटणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या रद्द

thumbnail 15306277884591
thumbnail 15306277884591

मुंबई : मुसळधार पाऊसाने मुंबईतील जनजीवण विस्कळीत झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेका पाऊस थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. आज सलग पाचव्या दिवशीही जोरदार पाऊस बरसला आहे. पावसाच्या बरसण्याने मुंबईच्या सखल भागासह रेल्वे ट्रकवरही पाणी साचले आहे. तसेच दादर, हिंद माता परिसर, शीव परिसर या मुंबईच्या भागात तळ्याच्या स्वरूपात रस्ते बघाला मिळत आहेत. यापार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकावरून पुण्याला सुटणाऱ्या सर्व गाड्या आज रद्द करत असल्याची घोषणा रेल्वे प्रशासनाने केली आहे.

स्थापने आधीच जिओ इंस्टीट्यूशनला उत्कृष्ठ इंस्टीट्यूशन म्हणून सरकारने केले जाहीर, सर्वत्र टीकेची झोड

thumbnail 1531229379977
thumbnail 1531229379977

दिल्ली : केंद्र सरकारच्या वतीने ‘इंस्टीट्यूशन ऑफ एमिनेंस’ ची लिस्ट जाहीर करतानाच सरकारवर टीकेची झोड उठली आहे. कारण स्थापना न झालेल्या जिओ इंस्टीट्यूशनला या यादीत स्थान मिळाले आहे. सरकारचा जिओ प्रति एवढा लागाव का असा प्रश्न सर्वत्र विचारला जात आहे.
जिओ इंस्टीट्यूशनच्या स्थापनेसाठी रिलायन्स
फाउंडेशनकडे कार्यवाहीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सरकारच्या वतीने उत्तरादाखल असे सांगण्यात आले आहे की जिओ इंस्टीट्यूशनच्या भविष्य कालीन नियोजनावरून असे दिसून येते की हे इंस्टीट्यूशन उत्कृष्ठ म्हणून नावारूपास येईल.

नाट्यमय हालचाली नंतर झाले महाक्षय आणि मदालसा शर्मा यांचे लग्न.

thumbnail 1531228654704
thumbnail 1531228654704

मुंबई : मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा महाक्षय याच्या मागे काही दिवसापूर्वी पोलिसांची ससेमिरी लागली होती. एका मुलीवर सतत बलात्कार करून तिला गर्भपात करण्यासाठी मजबूर करण्यात आल्याचा आरोप महाक्षय आणि त्याची आई योगिनी हिच्या वर ठेवण्यात आला होता. मुंबई उच्च न्यायालयाने या दोघांचा अटक पूर्व जामीन फेटाळला होता. परंतू नंतर दिल्लीच्या रोहिणी सत्र न्यायालयाने त्यांना जमीन दिला.
७ जुलै रोजी होणारे महाक्षय आणि मदालसा शर्मा यांचे लग्न आज पार पडले. मिथुन चक्रवर्ती यांच्याच उटीच्या पंचतारांकित हॉटेल मध्ये हे लग्न पार पडले आहे. मदालसा शर्मा या सिने अभिनेत्री आहेत. हिंदी चित्रपटात काम करण्या अगोदर त्यांनी ‘फिटिंग’ या तेलगू चित्रपटात काम केले होते.