बेंगलोर | कर्नाटक मधे सध्या कॉग्रेस आणि जनता दल आघाडीचे सरकार सत्तेत आहे. कॉग्रेस आणि जनता दलाचे मंत्रिपद न मिळलेले नाराज आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे समजते आहे. सरकार महामंडळाच्या नेमणुका करत नसल्याने आम्ही राजीनाम्याचे हत्यार उपसणार आहोत असे एका आमदाराने खाजगीत म्हणले आहे. सरकार म्हणून काम करणारे आमच्याच पक्षाचे नेते आम्हाला भाव देत नसल्याची खंत या आमदारांच्या मनात आहे. लोकसभेच्या निवडणुका जवळ येऊ लागल्याने राजकीय आघाड्या बनत आहेत. लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच या आमदारांचा राजीनामा देण्याचा डाव आहे जेणेकरून सरकार अल्पमतात जाईल.
२२४ च्या कर्नाटक विधानसभेत कॉग्रेस जनता दल आघाडीला १५५ जागा होत्या. कुमारस्वामिनीं एका जागेचा राजीनामा दिला आहे तर एका आमदाराचा अपघाती मृत्यू झाला आहे. १७ आमदारांनी राजीनामा दिल्यास आघाडीचे संख्याबळ ९६ वर घसरणार आहे. अशाने सरकार अल्पमतात येणार आहे. असे झाल्यास भाजप सत्तेवर दावा सांगू शकतो कारण भाजपचे संख्याबळ १०४ आहे. या बातमीने कर्नाटकच्या राजकारणात खळबळ उडाली असून ते नाराज १७ आमदार कोण याचा तपास कॉग्रेस जनता दल आघाडी लावत आहे.
आघाडीचे १७ आमदार राजीनाम्याच्या तयारीत
प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांचा मुंबईत धुमधडाक्यात साखरपूडा
मुंबई | बाॅलिवुड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा बाॅयफ्रेंड निक जोनस यांनी आज मुंबई येथे धुमधडाक्यात साखरपुडा केल्याचे समजत आहे. प्रियांकाच्या हातातील अंगठी बाॅलिवुडमधे चर्चेचा विषय ठरत असतानाच तिने निक सोबत साखरपुडा केल्याचे आता समोर येत आहे.
प्रियांका चोप्रा हिचे निक जोनस याच्यासोबत प्रेमसंबंध होते. दोघांमधे वाढलेल्या सलगीचे बाॅलिवुड मधे जोरदार चर्चा चालू होती. यापर्श्वभुमीवर शनिवारी मुंबई येथे दोघांनी रोका नावाच्या विधीत एकत्रीत सहभाग घेऊन आॅफिशीअल एन्गेजमेंट केली आहे.
Priyanka Chopra and Nick Jonas at their ‘roka’ ceremony in Mumbai. #PriyankaNickEngagement pic.twitter.com/IShuMYuegd
— ANI (@ANI) August 18, 2018
इम्रान खान यांनी घेतली पंतप्रधान पदाची शपथ, भारतातून नवजोतसिंग सिद्धु यांची उपस्थिती
इस्लामाबाद | माजी क्रिकेटपटू आणि पाकिस्तान तेहरिक ए इंसांफ ( पीटीआय) पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांनी शनिवारी पाकिस्तानचे २२ वे पंतप्रधान म्हणुन शपथ घेतली. पाकिस्तानचे राष्ट्रपती मामनून हुसेन यांनी खान यांना पंतप्रधाम पदाची शपथ दिली.
शुक्रवारी झालेल्या पंतप्रधान पदाच्या निवडीमधे इम्रान खान यांनी मुस्लिम लिग (नवाझ) च्या शेहबाझ शरिफ यांचा पराभव केला. २५ जुलै रोजी पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकांमधे पीटिआय ने १७६ जागा जिंकत बहुमत प्रस्थापित केले तर शरिफ यांच्या पक्षाला केवळ ९६ जागी विजय मिळवता आला. माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेते नवजोतसिंग सिद्धू हे या शपथविधी कार्यक्रमास उपस्थित होते.
Imran Khan takes oath as the 22nd Prime Minister of Pakistan at the President House in Islamabad.
Read @ANI Story | https://t.co/Jk0axyuFFy pic.twitter.com/Cih35KBxsw
— ANI Digital (@ani_digital) August 18, 2018
Islamabad: Navjot Singh Sidhu was seated next to President of PoK Masood Khan at Imran Khan’s oath ceremony. #Pakistan pic.twitter.com/MPrBQ9XtXD
— ANI (@ANI) August 18, 2018
Islamabad: #ImranKhan takes oath as the Prime Minister of #Pakistan pic.twitter.com/nhzRqpJQ6I
— ANI (@ANI) August 18, 2018
केरळात मृतांचा आकडा ३२४ वर, पंतप्रधान तिरुअनंतपूरम ला दाखल
तिरुअनंतपूरम | केरळमधे अतिवृष्टीमुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून जनजीवण विस्कळीत झाले आहे. मृतांचा आकडा ३२४ वर गेल्याचे वृत्त असून पूरात अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांनी केरळ दौर्याचे नियोजन केले असून ते तिरुअनंतपूरम मधे दाखल झाले आहेत.
विविध सामाजिक संस्था, पोलीस प्रशासन आणि एनडीआरएफ मदत कार्यात सहभागी झाले असून आत्तापर्यंत लाखो नागरिकांना सुरक्षीत स्थळी हलवण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनारई विजयन यांनी आज ट्विटर वरुन परिस्थितीचा आढावा दिला आहे.
रणवीर आणि दीपिकाच जमलं लग्न, लग्नात मोबाईल घेऊन जाण्यास असेल बंदी
मुंबई | बाजीराव मस्तानी आणि पद्मावत सारखे यशस्वी चित्रपट सोबत केल्यानंतर रणवीर सिंग आणि दीपिका यांनी विवाह बद्ध होण्याचे ठरवले असूनत्यांच्या लग्नाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. २० नोव्हेंबरला रणवीर आणि दीपिका विवाह करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
रणवीर आणि दीपिकाच्या लग्नात मात्र मोबाईल फोन घेऊन जाण्यास बंदी असणार आहे. कारण कोणीही त्यांच्या लग्नाचे फोटो अथवा व्हिडीओ व्हायरल करणार नाही. रणवीर आणि दीपिकांनी असा निर्णय घेतल्याचे बोलले जाते आहे.यापूर्वी सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांच्या लग्नात ही असेच मोबाईल वर बंदीचे प्रकरण घडले होते तरीही सोनम कपूरच्या लग्नाची व्हिडीओ क्लिप प्रचंड व्हायरल झाली होती. तेव्हा अनिल कपूरने यावर स्पष्टीकरण देताना हा लोकांना कसे रोखता येऊ शकत होते असे म्हणले होते.
प्रियांका चोप्राच्या हातातली अंगठी ठरते आहे चर्चेचे कारण
मुंबई | प्रियांका चोप्राच्या लग्नांच्या गोष्टींचा सध्या प्रचंड बोलबाला आहे. प्रियांका चोप्राचा बॉयफ्रेंड निक यांचा साखरपुडा पार पडला असल्याचे बोलले जाते आहे. न्यूयॉर्कवरून येताना प्रियांकाने विमानतळावर आपल्या हातातील अंगठी काढून खिशात टाकली तेव्हा ही माध्यमांनी तिच्या साखरपुड्याचा खल केला होता. परंतु आता प्रियंकानेच रविना टंडन सोबत आपला एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे त्यातून प्रियंका अभिमानाने अंगठी दाखवत असल्याचे समजते आहे.
एका कौटुंबिक कार्यक्रमात रविना टंडन आणि प्रियांका चोप्रा एकत्रित आल्या होत्या. तेव्हा काढलेला फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आणि अल्पावधीतच प्रचंड व्हायरल झाला. प्रियांका आणि निकच्या प्रेमाची चर्चा माध्यमातून सातत्याने होत आहे. ऑक्टोबर महिन्यात दोघे विवाह करणार असल्याचे ही बोलले जाते आहे. प्रियांका चोप्राचा बॉयफ्रेड निक हा प्रियांकापेक्षा दहा वर्षांनी लहान आहे.
प्रियंकाच्या हातात असलेल्या साखरपुड्याच्या अंगठीची किंमतीचा अंदाज सध्या लावण्यात येतो आहे. देशातील एका नामांकित दागिने कंपनीने त्या अंगठीची किंमत २००डॉलर अर्थात १कोटी५०लाख एवढी सांगितली आहे. अंगठीला वापरले गेलेले हिऱ्यांना दागिन्यांच्या भाषेत कुशन हिरे असे म्हणले जाते.
अटल बिहारी वाजपेयी पंचतत्वात विलीन, स्मृती स्थळावर झाले अंत्यसंस्कार
नवी दिल्ली | भारताचे लोकप्रिय माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यावर आज स्मृती स्थळ या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. तत्पूर्वी त्यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, डॉ.मनमोहन सिंग आदींनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. स्मृती स्थळाचा परिसर अत्यंत भावूक झाला होता. व्यंकय्या नायडू यांना तर पुष्प चक्र वाहते वेळी हुंदका आवरता आला नाही.
इतर महत्वाचे लेख –
अटलबिहारी वाजपेयींच्या या दहा गोष्टी तुम्हाला माहिती आहेत काय?
अटल बिहारी वाचपेयींच्या नावावरील हे राजकीय रेकॉर्ड कोणीच मोडू शकले नाही
अंत्यविधीच्या ठिकाणी जय श्रीराम,भारत माता की जय अशा घोषणा दिल्या जात होत्या. जब तक सूरज चांद रहेगा अटल तेरा नाम रहेगा. अटलबिहारी अमर रहे आशा घोषणाही दिल्या जात होत्या. अटलजींच्या अंत्यविधीला भूतानचे राजे तसेच नेपाळचे परराष्ट्र मंत्री तसेच अनेक देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
भारतीय सेनेच्या तिन्ही दला करून अटलजींना हवेत बंदुकीच्या फैरी उडवून सलामी देण्यात आली.मुखाग्नी देताच उपस्थित जनसागराने अटलजींचा प्रचंड जयघोष केला आणि जड अंतकरणाने भारतीयांनी अटलजींना अखेरचा निरोप दिला.अटलजींच्या पार्थिवाला ४ वाजून५६ मिनिटांनी मुखाग्नी देण्यात आला.
अटलजींच्या अंत्ययात्रेला लोटला जनसागर
नवी दिल्ली | भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अंत्ययात्रेला दुपारी ठीक २वाजता सुरुवात झाली. लष्कराच्या ताफ्यात अटलजींना अंत्यसंस्काराच्या ठिकाणी घेऊन जाणार आहे. अटलजींच्या अंत्ययात्रेचा मार्ग आरटीओ लाईट-डी डी यु मार्ग – दिल्ली गेट – राज घाट- स्मृती स्थळ असा आहे .दोन तासाचा वेळ अंत्ययात्रेला नियोजित केला असून चार वाजता अंत्यसंस्कार होणे क्रमप्राप्त मानले आहे.
अटलजींच्या रथमागे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाई चालत आहेत.त्यांच्या सोबत अमित शहा, शिवराजसिंह चोहन,देवेंद्र फडणवीस तसेच भाजपा शाशीत राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजपाचे बडे नेते पाई चालत आहेत.अटलजींच्या जाण्याने भारत देशात शोकाकुल वातावरण असून अटलजींच्या अंत्ययात्रेला लाखोंचा जनसागर उसळला आहे.
अटलजी…
डाॅ. जयंत कुलकर्णी
अटलजी गेले. गेली आठ-नऊ वर्षे आजारपण सोसणारे अटलजी आज इतिहासाचा भाग झाले. मनाचा ठाव घेणारी, संयमित शब्दांची पण आवेशपूर्ण लयीची त्यांची भाषणे माझ्या पिढीतील जवळपास सगळ्यांनीच ऐकली आहेत. किंबहुना लाखांच्या समूहासमोरची त्यांची भाषणे आम्ही केवळ ‘ऐकण्या’ पेक्षाही ‘अनुभवली’ आहेत. नव्या पिढीला ती आवर्जून सांगितली जातील. माध्यमांवर ती पुन्हा पुन्हा ऐकली जातील. त्यांचे संपूर्ण ‘व्यक्तित्व’च ज्यात तंतोतंत उतरले आहे अशा त्यांच्या कविता वारंवार वाचल्या आणि ऐकल्याही जातील. दिल्लीतील त्यांचे ‘स्मृति’स्थळ हे आगामी पिढ्यांसाठी प्रेरणेचा स्रोत बनेल. या सगळ्यांमध्ये सामावूनही त्यांचे व्यक्तित्व आणखी बरेच काही उरेल !
इतर महत्वाचे लेख –
अटलबिहारी वाजपेयींच्या या दहा गोष्टी तुम्हाला माहिती आहेत काय?
अटल बिहारी वाचपेयींच्या नावावरील हे राजकीय रेकॉर्ड कोणीच मोडू शकले नाही
भारतीय राजकारणात गांधी-नेहरूंच्या प्रभावात रूढ झालेल्या अनेक संदर्भांना, व्याख्यांना आणि समजांना त्यांनी समंजस आणि सोशिक विरोध करून, आदर आणि आंतरिक स्नेहाच्या आधारे अधिक देशानुकूल आणि त्या अर्थाने युगानुकूलही बनवले. स्वतः जडणघडण केलेल्या पक्षाला राजकीय विचारधारांच्या मुख्य प्रवाहात नव्हे तर त्या प्रवाहाच्या केंद्रस्थानी आणले. जे परिवर्तन त्यांना राजकारणात आणायचे होते, त्या पायवाटांवरती ते आणि त्यांचे सहकारी अथकपणे तडजोड न करता चालत राहिले. आपल्या व्यक्तित्वाचा एकेक पैलू उजळून त्यांनी या पायवाटांचे रूपांतर जनमार्गांमध्ये केले.
भाषणांतून, कवितेतून, साठ वर्षांच्या एकसलग संसदीय कार्यातून आणि पंतप्रधान म्हणून बजावलेल्या कामगिरीतून अटलजी जसे दिसतात तसेच किंवा त्याही पेक्षा काकणभर अधिक ते या उपेक्षित पायवाटांवर चालतांना, सहकाऱ्यांना दिलेल्या आधारातून, देशभर जोडलेल्या माणसांतून, सच्च्या कार्यकर्तेपणातून, भाषणाच्या सुरुवातीलाच फेकलेल्या त्या त्या भाषेतील नजाकतीच्या वाक्यांतून,साथीदारांची निराशा घालवणाऱ्या निर्भेळ विनोदांतून, तिरस्कार पचवून केलेल्या मिश्किल टिप्पणीतून आणि मुख्य म्हणजे त्या मागच्या दृढतम निर्धारातून दिसतात !
जनसंघाच्या स्थापनेचा काळ.मुंबईतील मधुकरराव महाजनांच्या घरीच बैठका चालायच्या. सुशीलाताई महाजनांनी तो सगळाच काळ आपल्या ‘डाव मांडियेला’ आत्मचरित्रात शब्दबद्ध केलाय. त्यांच्यासारख्या अनेक प्रांतातील अनेक घरातून झालेला तरुण वयातील अटलजींचा वावर, त्यातील सहजता, त्यांची ऋजुता आणि पक्षाचा तुटपुंजा निधी वाचविण्यासाठी केलेल्या काटकसरीच्या नानाविध तऱ्हा वाचल्या की लक्षात येते कि राजकारणात मूल्यांचा आदर्श म्हणून स्वतःच्या संपूर्ण आयुष्यालाच उभे करण्याची नैतिकता या माणसात कुठून आली !
इतर महत्वाचे लेख –
२०१९ची निवडणूक आम्ही विक्रमी जागांनी जिंकणार – नरेंद्र मोदी
दादा कोंडके आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यातला याराना तुम्हाला माहीती आहे का?
परराष्ट्र धोरणांवरील एका चर्चेत बोलतांना ‘बोलण्यासाठी वाणी हवी पण गप्प राहण्यासाठी वाणी आणि विवेक दोन्हींची गरज असते’ या अटलजींच्या वाक्याची दाखल घेत पंडितजींनी आपल्या इंग्रजीतील उत्तराची गाडी जाणीवपूर्वक हिंदीकडे वळवली व अटलजींच्या मुद्द्याचे विस्तृत समर्थन केले. नेहरूंच्या गटनिरपेक्ष धोरणाचे ते कट्टर समर्थक असले तरी ‘शांतता हवीच पण देशाच्या सार्वभौमत्वाकडे दुर्लक्ष व्हायला नको’ या आपल्या आग्रहाचेच अटलजींनी पुढे राजकीय धोरणात रूपांतर केले आणि जनसंघाचे काश्मीर, तिबेट पासून गोवामुक्तीच्या प्रश्नावरचे अनेक लढे त्यातूनच उभे राहिले. धर्मनिरपेक्षतेच्या एकाच बाजूकडे झुकलेल्या लंबकाला त्यांनी कायमच विरोध केला. तो ‘समतोल’ असला पाहिजे हे त्यांचे सांगणे म्हणजे जातीयवाद ठरवला गेला. आक्रमक न बनत अटलजी संयमाने प्रतिवाद करीत राहिले आणि म्हणता म्हणता त्यांनी हा ही आग्रह पक्षाची ओळख बनवला. ज्या ज्या मुद्द्यांचा आग्रह धरून भाजपने गेल्या वीस वर्षांत जनमानसाची पकड घेतली त्या सर्वांचा मूलस्रोत म्हणजे अटलजींनी साठ वर्षांत केलेली संसदेतील भाषणेच आहेत.
या वैचारिक स्पष्टतेचा केंद्रबिंदू होता तो त्यांचे संघ समर्पित व्यक्तित्व ! १९५७ च्या निवडणुकीत बालरामपूर या पूर्वीच्या एका छोट्या संस्थानातून ते निवडून आले. संघाचे त्या क्षेत्रातील प्रचारक प्रताप नारायण तिवारी यांचा व्यापक जनसंपर्क हेच जनसंघाच्या या पहिल्या विजयाचे गमक होते हे ते वारंवार सांगत असत. ‘हिंदू तन मन.. हिंदू जीवन .. रग रग हिंदू मेरा परिचय’ या कवितेत त्यांनी आपला ‘हिंदू’ असण्याचा अर्थ सांगितलाय. हे असे उदार आणि व्यापक पायावर आधारित असलेले ‘हिंदुत्व’च त्यांनी राजकीय विचारधारांच्या थेट केंद्रस्थानी आणले. वैचारिक आग्रह असले तरी प्रत्यक्ष देश चालवतांना या आग्रहांचेच अडथळे न होऊ देण्याची सम्यकताही त्यांनीच दाखवली!
आचार विचारात ढिसाळपणा असेल तर संघटनांचे गड म्हणता म्हणता ढासळतात. संघासारख्या देशव्यापी संघटनेचे स्वरूप हे थोडे कर्मठच राहणार हे समजण्याची प्रगल्भता जनसंघाच्या आघाडीच्या या सगळ्याच नेत्यांकडे होती. हीच विचारधारा घेऊन राजकीय क्षेत्रात उभे राहतांना मात्र अटलजींनी त्यात आपल्या व्यक्तित्वाचे, प्रतिभेचे सगळेच रंग इतक्या खुबीने मिसळले की संघावर पक्षाची छाया कधी पडली नाही कि पक्षाला संघाचे ओझे वाटले नाही ! संघ ते पक्ष हा सांधा जोडताना अटलजी त्यात एकरूप होऊन गेले.
डाॅ. जयंत कुलकर्णी
नात्यात या गोष्टी फार महत्वाच्या असतात
नातं म्हणलं की रुसणे – फुगणे आलेच. परंतू त्याचसोबत नातं म्हणलं की काही खास गोष्टींची काळजी घ्यावीच लागते. नक्की कोणत्या आहेत या गोष्टी आपण पाहुयात.
विश्वास – नातं म्हणलं तर विश्वास सर्वात महत्वाचा असतो. नाती विश्वासावरच चालत असतात. एकदा विश्वास गेला की नाती संपतात. म्हणुन पुढच्या व्यक्तीच्या मनात तुमच्याप्रती असलेला विश्वास कधीच कमी होणार नाही याची काळजी घ्या.
प्रेम – प्रेमाच्या जोरावर नातं बळकट होत असतं. तेव्हा प्रेम कधी कमी होऊ देऊ नका. जिथं प्रेम असतं तिथं नातं असतं आणि जिथं नातं असतं तिथं प्रेम असतं हे कायम लक्षात ठेवा.
आपलेपणाची भावना – नातं कोणतंही असो त्या नात्यातील आपलेपणाची भावना खूप महत्वाची असते. कोणालाही कोणाबद्दल उगाच आपलेपणा वाटत नाही. त्यासाठी तसे एकमेकांसोबत नाते असायला लागते.
काळजी – जिथे प्रेम असते तिथे काळजी ही असतेच. कोणी तुमची प्रमाणापेक्षा काळजी करत असेल तर त्याच्यावर कधीच चिडचिड करु नका. कारण काळजी करणारी माणसंही सहसा भेटत नाहीत. उगाच कोणीही कोणाची काळजी करत नाही.
इतर महत्वाचे –
इंटरनेटवर मुली सर्वाधिक काय सर्च करतात ? वाचून तुम्हालाही धक्का बसेल










