Sunday, August 3, 2025
Home Blog Page 6732

समलिंगी प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

thumbnail 15312232757161
thumbnail 15312232757161

दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात आज समलिंगी प्रकरणावर सुनावणी सुरु झाली आहे.समलिंगी संबंधांना बेकायदेशीर ठरवणारे भारतीय दंड संहितेचे कलम ३७७ रद्द करण्यात यावे यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्या गेलेल्या दोन खटल्यांवर आज सर्वोच्च न्यायालयात एकत्रित सुनावणी झाली. याचिकाकर्त्याच्या वतीने आज बाजू मांडण्यात आली. अरविंद दातार यांनी याचिकाकर्त्यांच्या वतीने बाजू मांडली. तर सरकारच्या बाजूने तुषार मेहता यांनी बाजू मांडली.
आज आणि उद्या सलग दोन दिवस खटल्याची सुनावणी चालणार आहे.या खटल्याची सुनावणी एक महिन्या नंतर घ्यावी अशी मागणी सरकारच्या वतीने करण्यात आली परंतु न्यायालयाने सुनावणी पुढे ढकळण्यास नकार दिला

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा उरुळी कांचनमध्ये विसावा, उरुळीला आले यात्रेचे स्वरूप

thumbnail 1531218510949
thumbnail 1531218510949

पुणे : संत तुकाराम महाराजांच्या पालखीने आज लोणी काळभोर वरून प्रस्थान करून उरुळी कांचन मध्ये दुपारचा विसावा घेतला आहे. दरम्यान उरुळीत वैष्णवांचा मेळा अवतरल्याने उरुळी कांचनला यात्रेचे स्वरूप आले आहे.तुकाराम महाराजांची पालखी उरुळीचा विसावा घेऊम यवतला मुक्कामी जाणार आहे.

भिडे गुरुजीचे ते भाषण तपासण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

thumbnail 1531155179943
thumbnail 1531155179943

पुणे : आपल्या बेताल वक्तव्याने सतत चर्चेत राहणारे आणि भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात संशयित असलेले संभाजी भिडे गुरुजी यांनी पुन्हाएकदा वादग्रस्त विधान केले आहे. रविवारी पुण्यातील जंगली महाराज मंदिरात भाषण देत असताना “मनू सर्व संतांपेक्षा श्रेष्ठ असल्याचे त्यांनी म्हणले आहे. आता गृहविभागा कडून तपासण्यात येणार आहे.
शनिवारी ७ जुलै रोजी पुण्याच्या जंगली महाराज मंदिरात भिडे गुरुजींनी दिलेल्या भाषणात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पेक्षा मनु श्रेष्ठ असल्याचे वक्तव्य भिडे गुरुजीनी केले होते. त्यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अाज विधानसभेत भिडे गुरुजींच्या मुद्यावर घेरण्याचा विरोधकांनी प्रयत्न केला. त्याला उत्तर देताना ‘भिडे गुरुजींचे जंगली महाराज मंदिरातील भाषण आम्ही तपासू आणि भिडे गुरुजी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू” असे मुख्यमंत्र्यानी जाहीर केले. यासंदर्भात सरकारने आपली भुमिका स्पष्ट करावी अशी मागणी विरोधकांनी केली असता, ‘आम्ही मनूचा कदापि पुरस्कार करणार नाही’ असे फडणवीसांनी सांगीतले.

उत्तर प्रदेशात वाढणार मोदींच्या चकरा

thumbnail 15310728926081
thumbnail 15310728926081

टीम HELLO महाराष्ट्र : दिल्लीचा रस्ता उत्तर प्रदेशातून जातो ही भारतीय लोकशाहीची सर्वर्स्वीकार्य म्हण आहे. लोकसभेची निवडणूक जसजशी जवळ येईल तशी रणनितीला चुरस चढणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून जुलै महिन्यात पंतप्रधान नरेंन्द्र मोदी उत्तर प्रदेशात चार दौरे काढणार असल्याचे समजत आहे. या दौऱ्याची वैशिष्ट्यपूर्ण बाब ही की मोदी मुलायमसिंग यादव यांच्या बालेकिल्ल्यात दौरा काढणार आहेत.

पहिला दौरा – नोएडा (९ जुलै २०१८)
या दौऱ्यासाठी मोदी नोएडाला दिल्लीहून थेट येणार असून त्यांच्या सोबत दक्षिण कोरियाई राष्ट्रपति मून जे -इन असणार आहेत. सॅमसंगच्या भारतात बनणाऱ्या पहिल्या युनिटला भेट देणे हे या दौर्याचे औचित्य असणार आहे. भारत हा मोबाईल खरेदी करणारा देश आहे. या देशात मोबाईल खरेदीचा आकडा मोठा आहे म्हणून इथल्या लोकांना रोजगार देण्याच्या उद्देशाने हे युनिट उभारले आहे. या कार्यक्रमात उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सहभागी होणार आहेत.

आजमगड (१४ जुलै २०१८)
या दिवशी नरेंद्र मोदी मुलायमसिंग यादव यांच्या बालेकिल्ल्यात दाखल होणार आहेत. येथे ते पूर्वांचल एक्सप्रेस वे ची कोनशीला बसवणार आहेत. हा महामार्ग उत्तर प्रदेशाची राजधानी लखनव ते बालिया असा आहे. या महामार्गांने यु.पी. चा चेहरा मोहराच बदलून जाणार आहे.

वाराणसी ( १५ जुलै २०१८)
होमी भाभा कॅन्सर रुग्णालयाचा कोनशीला समारंभ नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आयोजला आहे. तसेच काशी हिंदू विद्यापीठाला मोदी भेट देऊन महामना पं मदन मोहन मालवीय कैसर सेंटरची पहाणी करणार आहेत. तसेच नमामि गंगे प्रकल्पात बनलेल्या समेत शहरात स्थित पंच कोशी परिक्रमा मार्ग याची कोनशीला मोदींच्या हस्ते बसवली जाणार आहे.

लखनव ( २९ जुलै २०१८)
२९ जुलै रोजी मोदी उत्तर प्रदेशची राजधानी लखनव स्थित इंदिरा गांधी प्रतिष्ठानमध्ये शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मोदी प्रमुख अतिथी आहेत.

सुरज शेंडगे

अजितदादांनी विधानसभा अध्यक्षांनाच धरले धारेवर

thumbnail 1531150762725
thumbnail 1531150762725

नागपूर : विधान भवन परिसरात साचलेल्या पाण्याची पहाणी करण्यासाठी गेलेल्या विधानसभा अध्यक्षांचा फोटो काल प्रचंड व्हायरल झाला. नेमका हाच मुद्दा पकडून राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांनी अध्यक्षांना धारेवर धरले. अजितदादांनी चक्क अध्यक्षांनाच घेरल्याने सभागृहात हसावं की रडावं अशी स्थिती झाली होती. ‘ कोणीतरी आपला असा फोटो काढेल याचे भान ठेवून तुम्ही वागायला पाहिजे होते. तुमचा असा फोटो व्हायरल होणे हा विधानसभेचा अपमान आहे’ असे अजितदादा सभागृहात म्हणाले. त्यावर बोलताना ‘तातडीच्या मुद्यावर शिष्टाचार बाजूला ठेवून पुढे जावे लागते’ असे म्हणत अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी सारवा सारव केली.
आज अजितदादा यांनी अध्यक्षासहित सरकारवर ही टीकास्त्र सोडले. सरकार हट्टाला पेटले असून सरकारने केवळ हट्टासाठीच पावसाळी अधिवेशन नागपूरला घेतले असा आरोप अजित पवार यांनी यावेळी केला आहे.

आता सर्वोच्च न्यायालयाचे थेट प्रक्षेपण

thumbnail 1531143592175
thumbnail 1531143592175

दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज कसे चालते आणि कोर्ट नेमके करते काय असा प्रश्न नेहमीच सर्वसामान्य लोकांना पडत असतो. या प्रश्नांची उत्तरे आता मिळणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज आता लाइव्ह होणार आहे. न्यायालयात चालणाऱ्या कामकाजाचे आता थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.
न्या.चंद्रचूड यांनी एका खटल्याचा निकाल देताना “न्यायालय हे खुले आहे” असे मत व्यक्त केले होते. इथले कामकाज पाहण्याकरता सर्वांसाठी खुले आहे असे त्यांनी म्हणले होते. आता त्या निकालाच्या आधारे सर्वोच्च न्यायालयाने कामकाजाचे थेट प्रसारण करण्याचा निर्णय घेतला आहे. न्यायिक सुधारणा करण्याचा केंद्र सरकारचा अधिकार आहे असे यांसंबधी बोलताना न्यायालयाने म्हणले आहे. केंद्र सरकारने सहमती देऊन नवीन नियमावली बनवावी असे मत सर्वोच्च न्यायालयाने मांडले आहे.
थेट प्रक्षेपण झल्यास सरन्यायाधीशांच्या कोर्टरूमचे प्रक्षेपण केले जाईल असे न्यायालयाने म्हटले आहे. अटॉर्नी जनरल केके वेणुगोपाल यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

माऊलीच्या पालखीने ओलांडला कठीण दिवे घाट

thumbnail 1531142994657
thumbnail 1531142994657

पुणे : सकाळी पुण्याहून निघालेल्या माऊलीच्या पालखीने आज कठीण असा दिवे घाट ओलांडला असून पालखी झेंडेवाडीच्या विसाव्यावर विसावा घेऊन सासवडकडे मार्गस्थ झाली आहे. सासवड जवळील दिवे घाट ओलांडणे हे माऊलीच्या पालखी समोरचे दिव्य असते. घाटातील कठीण चढ ओलांडण्यासाठी यावर्षी चार अतिरिक्त बैल जोड्या जुंपण्यात आल्या होत्या. दिवे घाटातील हा सोहळा पाहून डोळ्यात साठवण्यासाठी भाविकांनी आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी दिवे घाटात अलोट गर्दी केली होती.

चक्क आय.पी.एस. अधिकार्याचा भाऊच झाला दहशतवादी संघटनेत सामील

thumbnail 1531137427809
thumbnail 1531137427809

श्रीनगर : बुरान वाणीच्या हत्येच्या वर्षस्फुर्तीच्या निमित्त हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेने २० युवकांच्या भरतीचे फोटो समाज माध्यमात पोस्ट केले आहेत. हे वीस युवक नव्याने म्हणजे मे महिन्यात हिजबुल मुजाहिद्दीन मध्ये दाखल झाले असल्याचा दावा संघटनेने केला आहे.
पूर्वेकडील एका राज्यात आय.पी.एस. म्हणून दायित्व निभावणाऱ्या एका अधिकाऱ्याचा छोटा भाऊ या संघटनेत सामील झाल्याचे धक्कादायक प्रकार यातून समोर आला आहे. शम्स उल हक असे त्या युवकाचे नाव आहे. तो दोन महिन्या पासून गायब आहे. तो ज्यावेळी गायब झाला त्यावेळी भारतीय सेना दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाई करत होती.
शम्स उल हक हा श्रीनगर जवळील हैदरपुरा मध्ये फार्मसी चे शिक्षण घेत होता. त्याच्या अचानक गायब होण्याने परिसरात घबराट होती. आता अशी बातमी येऊन धडकल्याने सगळेच आवक झाले आहेत.

निर्भयाच्या बलात्कार्यांना फाशीचीच, सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिका फेटाळली

thumbnail 1531134303619
thumbnail 1531134303619

दिल्ली : निर्भया बलात्कार आणि हत्याकांडातील गुन्हेगार मुकेश सिंह, विनय शर्मा, अक्षय ठाकुर, पवन गुप्ता या चार आरोपींची फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. न्या.अशोक भूषण यांनी याचिका फेटाळताना असे मत मांडले की गुन्हेगारांच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या पुनर्विचार याचिकेवर तेव्हाच पुनर्विचार केला जातो जेव्हा कायद्यात काही त्रुटी असतात. कायदा अगदी सक्षम असल्याने आम्ही ही याचिका फेटाळत असल्याचे न्यायपीठाने यावेळी म्हणले आहे.
निर्भयाची आई आशा देवी यांनी माध्यमांशी संवाद साधताना ‘सत्याचा विजय झाला पण शिक्षेची अंमलबजावणी होण्यास उशीर होतो आहे’ असे मत मांडले आहे.

माझ्या ब्रिटन मधील संपत्तीला कोणी हात लावू शकत नाही – विजय मल्ल्या

thumbnail 1531132491698
thumbnail 1531132491698

लंडन : हजारो कोटीचे कर्ज बुडवून परदेशात परागंदा झालेला भरतीत उद्योगपती विजय मल्ल्या काल ब्रिटनमध्ये माध्यमांसमोर आला. भारतातील १३ बँकांनी मल्ल्याच्या विरोधात ब्रिटनच्या उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना ब्रिटन उच्च न्यायालयाने मल्ल्याच्या ब्रिटन स्थित संपत्ती संदर्भात चौकशी करण्याचे आदेश संबंधीत तपास संस्थांना दिले आहेत.
या पार्श्वभूमीवर विजय मल्ल्या याने ‘ब्रिटनचीसंपत्ती माझ्या आई आणि मुलाच्या नावावर आहे. त्यामुळे त्या संपत्तीला कुणी हात लावू शकत नाही’ असा खुलासा केला आहे. ब्रिटनमध्ये माझ्या नावावर फक्त काही गाड्या आणि दागिने असल्याचे मल्ल्याचे म्हणणे आहे. भारतात सध्या निवडणुकीचे वर्ष आहे. मला पकडून देशात खटला चालवून मत कमावण्याचे काहींचे राजकारण आहे असेही विजय मल्ल्या म्हणाला यावेळी म्हणाला आहे.