Wednesday, December 17, 2025
Home Blog Page 6740

कोण आहे हा अमित शहा – राज ठाकरे

Thumbnail
Thumbnail

नवी मुंबई | अमित शहांचा एकेरी उल्लेख करत मनसे अध्यक्ष राज ठाकरें यांनी भाजप चे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर चौफेर टीका केली आहे. शहांच्या तोंडावर नेहमी अहंकार दिसतो. मोदींच्या छत्रछायेत शहा यांना राष्ट्रीय अध्यक्ष पद मिळाले. या माणसाचे वैयक्तिक कर्तृत्व काय? असा सवाल राज ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला आहे. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी अटल बिहारी वाचपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्या सारखी माणसे बसली. आता त्या ठिकाणी अमित शहा सारखा भ्रष्ट माणूस बसला आहे. ही भाजपाला आत्मपरीक्षण करायला लावणारी बाब आहे. ज्या अमित शहांच्या मुलाच्या कंपनीत काळ्याच पांढर केलं जाते त्या व्यक्तीला अटलजी अडवाणींच्या ओळीत बघायचं का? असा सणसणीत टोला राज ठाकरे यांनी आज मुंबईत बोलताना लगावला. नवी मुंबईच्या महानगरपालिका कामगार नवनिर्माण सेनेच्या कामगार मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते.

‘एसएफआय’ चा नाशिक आयुक्तालयाला महाघेराव , DBT पद्धत रद्द करण्याची मागणी

Thumbnail
Thumbnail

नाशिक | आदिवासी विकास विभागाच्या शासकिय वस्तिगृहांच्या मेस बंद करून रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्याला आदिवासी वस्तिगृहातून विरोध होत आहे. हा शासन निर्णय वस्तिगृह व्यवस्था मोडीत काढून आदिवासीचं शैक्षणिक भवितव्य उध्वस्त करणारा आहे. त्यांमुळे हा निर्णय त्वरीत मागे घेण्याची मागणी स्टुडंट्स फेडरेशन आँफ इंडिया ही विद्यार्थी संघटना करत आहे.

मागे आदिवासी विद्यार्थ्यांनी पुणे ते नाशिक ‘लाँग मार्च’ काढला होता. परंतु शासनाने त्यांच्या आंदोलनाला कुठलीही दाद दिली नाही. शासन निर्णयात म्हटलं आहे की वसतिगृह व शिक्षण संस्था यातील अंतर जास्त असते, वसतिगृहात बाहेरचे विद्यार्थी राहतात त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु शासन वसतिगृहातील मूलभूत समस्यांपासून पळ काढत आहे. हा त्यावर उपाय नाही, असे संघटनेचे म्हणणे आहे.

तसेच शासन निर्णय लागू झाल्यानंतर निवास व्यवस्था, विद्यार्थी-विद्यार्थींनींची सुरक्षितता, आरोग्याची जबाबदारी, वसतिगृहातील शैक्षणिक सुविधा यांसारखे अनेक प्रश्न उभे राहणार आहेत. मुळात शासनाला वसतिगृह व्यवस्थाच मोडीत काढायची आहे, असा आरोप ‘एसएफआय’ ने केला आहे.

या निर्णयाच्या अंमलबजावणी नंतर वसतिगृह प्रशासनाची जबाबदार राहणार नाही. विद्यार्थ्यांना पैसे देण्याची जबाबदारी वसतिगृह प्रशासनाची राहणार नाही तर ती जबाबदारी थेट महाराष्ट्र शासनाची होणार आहे. मग विद्यार्थ्यांनी जेवणाच्या पैशासाठी मुंबईत मंत्रालयासमोर रांगा लावायच्या का? हा सवाल ‘एसएफआय’ ने राज्य सरकारला केला आहे

सद्यस्थितीत वसतिगृहातील जेवणासाठी मेस चालवल्या जातात. त्यानुसार विद्यार्थ्यांची वसतिगृहात नाष्टा व जेवणाची सोय करण्यात येत आहे. विद्यार्थी सोयीनुसार जेवन करतात अथवा डबा घेऊन शाळा महाविद्यालयांत जातात.त्यामुळे विद्यार्थ्यांना जेवण व नाष्टा वेळेवर, नियमित आणि निश्चित मिळण्याची हमी आहे. परंतु नवीन निर्णयानुसार जेवणाऐवजी पैसे मिळणार आहेत,ते वेळेवर मिऴणार का? हा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आहे. कारण विद्यार्थ्यांना मिळणारा मासिक निर्वाह भत्ता अनुक्रमे ५,००,८०० रूपये आणि किरकोळ वार्षिक शिष्यवृत्ती वेळेवर मिळत नाही.

त्यामुळे DBT ( Direct Benefit Transfer) चा निर्णय वस्तिगृहासाठी अत्यंत घातक असल्यामुळे जो पर्यंत निर्णय रद्द होत नाही. तो पर्यंत नाशिक आयुक्तालयाला दिनांक २८ आँगस्ट २०१८ पासून बेमुदत महाघेराव टाकण्याचा निर्धार एसएफआय या विद्यार्थी संघटनेने केला आहे.

गंभीर प्रश्नांमधे हात घालायचे सोडून मोदी करत बसतात योगा – राज ठाकरे

Thumbnail
Thumbnail

नवी मुंबई | गंभीर प्रश्नात हात घालायचे सोडून पंतप्रधान नरेंन्द्र मोदी योगा करत बसतात आणि योगा करून झाला की बॅग उचलून विदेशात पळतात अशी खोचक टीका महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. महानगरपालिका कामगार सेनेच्या कामगार मेळाव्यात ते बोलत होते. ‘नोटबंदीवर भाजप वाल्यांनी बोलून दाखवावे. नोट बंदीचे फायदे सांगा म्हणले तर भाजपची पाचावर धारण बसते’ असे राज ठाकरे म्हणाले. नोटबंदीमुळे तीन कोटी लोकांचे रोजगार गेले आणि ही बातमी माध्यमात येण्या अगोदर मॅनेज केली गेली असा गौप्यस्फोट राज ठाकरे यांनी केला आहे.
महाराष्ट्रात उत्तर भारतीय बिल्डर मनमानी करून जर सरकारी भूखंड लाटत असतील तर त्यांची गय महाराष्ट्र नवनिर्माण सेना करणार नाही. मराठी भूमीवर मराठी बिल्डर मोठा व्हावा अशी आमची भूमिका आहे. आसाम मधील घुसखोरी वर देशात आगडोंब उसळला आहे. महाराष्ट्रातील बांग्लादेशी घुसखोर इथं शहरभर पसरले आहेत. त्यावर उपाय काय असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.

मराठा आरक्षणावर मुख्यमंत्र्यांची मन की बात

Thumbnail
Thumbnail

मुंबई | मी मुख्यमंत्री बोलतोय या कार्यक्रमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अगोदर राज्यातील जनतेशी संवाद साधला आहे. शेतकरी, कामगार, महिला यांच्या प्रश्नावर या कार्यक्रमातून संवाद साधण्याचा मुख्यमत्र्यांनी प्रयत्न केला आहे. आज मुख्यमंत्री महाराष्ट्रात धगधगणाऱ्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जनसामांन्यंशी संवाद साधणार आहेत.
दरम्यान हा संवाद साधण्या अगोदर मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या समवेत मुंबईतील यशवंत महाविद्यालयावर बैठक घेतली आहे. आजच्या जनसंवादाची रणनीती ठरवण्यासाठीच ही बैठक घेतली असे बोलले जाते आहे.
आज सायंकाळी ७.३० वाजता मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचे प्रेक्षपण दूरदर्शन सह्याद्री वाहिनी आणि राज्यातील सर्व आकाशवाणी केंद्रावरून केले जाणार आहे. आजच्या जनसंवादात मुख्यमंत्री काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

हात जोडून विनंती करतो यातून मार्ग काढा – छत्रपती उदयनराजे भोसले

Thumbnail
Thumbnail

पुणे | मराठा आरक्षण आंदोलकांच्या समन्वयकांशी आज छत्रपती उदयनराजेंनी संवाद साधला. मराठा आरक्षणाचा प्रश्न तीस वर्षातील सरकारांनी गांभीर्याने घेतला नाही म्हणून आज हा प्रश्न उद्रेक होऊन समोर आला आहे. मराठा समाज गरीब आहे हे सांगण्यासाठी किती पुराव्यांचे साधरीकरण करावे लागणार आहे. शहरी झोपडपट्ट्यात ४५ % लोक हे मराठा समाजाचे आहेत. आणखी किती मागासलेपण दाखवून द्यायचे असा सवाल उदयनराजेंनी विचारला आहे.
न्याय व्यवस्थे कडे बोटे दाखवत बसण्यापेक्षा आरक्षणाचा प्रश्न कायदेशीर मार्गे सोडवला असता तर न्यायालयाकडे बोट दाखवण्याची वेळच आली नसती. दोनच गोष्टी मुळे मराठा आरक्षण रोखले आहे. निर्णर्याची उदासीनता किंवा राजकारण या दोनच कारणाने आरक्षण रोखले गेले आहे असे उदयनराजे म्हणाले. मराठा समाजातील युवकांनी केलेल्या आत्महत्येचे आपल्याला वाईट वाटते. तरूणांनी आत्महत्या करू नये असे मी आव्हान करतो असे उदयनराजे म्हणाले.
९ ऑगस्ट रोजी होणारा महामोर्चा शांततेच्या मार्गाने काढावा. मराठा समाजाने समाजाचा अवमान होईल असे कृत्य करू नका असे आवाहन उदयनराजेंनी केले आहे. लवकरात लवकर तोडगा काढला नाही तर उद्रेक सरकार ही थांबवू शकणार नाही असे भाकीत उदयनराजेनी केले आहे.

जागतिक मूळनिवासी दिनानिमित्त भामरागडमधे भरणार अधिकार सम्मेलन

Thumbnail
Thumbnail

भामरागड | दरवर्षीप्रमाणे यंदा ही गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड येथे “जागतिक मूळनिवासी दिवस” साजरा करण्यात येणार आहे. भामरागड़ पट्टी पारंपारिक गोटूल समितीच्या वतीने जागतिक मूळनिवासी दिवस समारोहाचे दिनांक ९ ऑगस्ट रोजी मौजा बेजुर येथे आयोजण करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्हा आणि विशेषत: भामरागड तालुका आदिवासी बहुल म्हणुन सर्वांना परिचित आहे. या भागात माडिया-गोंड आदिवासींची सख्या मोठ्या प्रमाणात आहे. येथील बेजुर या गावाजवळ बेजुर कोंगा नावाची पाहाड़ी आहे. या पहाडीच्या पायथ्याशी बाबलाई देवी आहे. दर वर्षी जानेवारी महिन्यात इथे मोठी जत्रा भरते. क्षेत्रात वास्तव्य करीत असलेले आदिवासी व अन्य समाज सदर जत्रेमध्ये मोठ्या आस्थेने सहभागी होतात. तालुक्यातील सर्वच सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जातात.

या कार्यक्रमात तालुक्यातील अनेक मुद्यांवर चर्चा होणार आहे. हा कार्यक्रम भामरागड़ पट्टी पारंपारिक गोटूल समितीच्या वतीने लोक स्वतः आयोजीत करतात. त्यामुळे भामरागड़ तालुक्यातील जनता अनेक मुद्यांवर चर्चा करून ठरावही पारित करणार आहे. जागतिक मूळनिवासी दिवसाच्या निमित्ताने भव्य सांस्कृतिक रैलीचेही आयोजन करण्यात आले आहे. आयोजकांनी सर्व मूळ निवासी बंधवांना व अन्य जनतेला उपस्थित राहून आपले अधिकार जाणून घेण्याचे आवाहन केले आहे. आपल्या अधिकाराप्रती जागरूक होऊन जल, जंगल, जमीनीवर मालकी हक्क प्रस्थापित करून स्वशासन व स्वनिर्णय प्रक्रियेकडे वाटचाल करावी असे आवाहन यानिमित्ताने करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला प्रमुक वक्ते व मार्गदर्शक म्हणून माजी सनदी अधिकारी प्रभू राजगड़कर उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर कैलाश अंडील (तहसीलदार, भामरागड़), एड. लालसू नोगोटी (जि.प. सदस्य), सुखराम मडावी (पं.स. सभापती), रतन दुर्गे (प्राचार्य, भगवंतराव माध्यमिक आश्रम शाळा), शिक्षक व ज्येष्ठ पत्रकार, बिरादरी हेमलकसा इत्यादी मान्यवर जनतेशी संवाद साधनार आहेत.

९ ऑगस्ट हा दिवस जागतिक मुलनिवासी दिवस म्हणुन ओळखला जातो. सन १९९४ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने ९ आॅगस्ट हा दिवस जागतिक मुलनिवासी दिवस म्हणुन घोषित केला होता. जगभरातील आदिवासी बांधव हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात. आदिवासी समाजाचे प्रश्न आणि समस्या यांकडे लक्ष वेधण्याकरता या दिवसाची घोषणा करण्यात आली होती.

सुप्रीम कोर्टात तीन महिला न्यायाधीश

Thumbnail
Thumbnail
नवी दिल्ली | मद्रास उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश इंदिरा बनर्जी यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नेमणूक करण्यात आली आहे. यामुळे सर्वोच्च न्यायालयात तीन महिला न्यायाधीशांची संख्या झाली आहे. न्या. इंदू मल्होत्रा व न्या. आर.भानुमती ह्या दोन महिला न्यायाधीश त्यांच्या सोबत असणार आहेत.
देशातील मुख्य न्यायाधीशांच्या काल बदल्या करण्यात आल्या आहेत. जम्मू कश्मीरच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून न्या. गीता मित्तल यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्या याआधी दिल्ली उच्च न्यायालयाच्या कार्यकारी मुख्य न्यायाधीश होत्या.
अन्य न्यायधीशांच्या बदल्या -(मुख्य न्यायाधीश पदी)
न्या. राजेंद्र मेनन – दिल्ली उच्च न्यायालय
न्या.कल्पेश सत्येंद्र जव्हेरी – ओडिसा उच्च न्यायलय

ऊर्जा बचतीच्या बाबतीर महाराष्ट्र देशात अग्रेसर

Thumbnail
Thumbnail

दिल्ली | ऊर्जा बचत आणि कार्यक्षमता क्षेत्रात महाराष्ट्र देशातील अग्रेसर राज्य ठरले आहे. नीती आयोगाने जाहीर केलेल्या ऊर्जा कार्यक्षमता सज्जता निर्देशांकात महाराष्ट्राचा समावेश करण्यात आला आहे.

देशात ऊर्जा बचतीच्या दिशेने महत्वाचे पाऊल उचलत निती आयोगाने यंदा प्रथमच ऊर्जा कार्यक्षमता सज्जता निर्देशांक तयार केला आहे. याकरता केंद्रीय ऊर्जा मंत्रालयातर्फे सर्व राज्यांकडून माहीती मागविण्यात आली होती. या माहीतीच्या आधारावर ऊर्जा बचत करणार्या काही राज्यांची निवड करण्यात आली. त्यामधे महाराष्ट्र अग्रेसर ठरले आहे. महाराष्ट्रासोबत केरळ, राजस्थान आणि आंध्रप्रदेश या राज्यांचाही समावेश निर्देशाकांत करण्यात आला आहे.

डाॅ. दाभोळकरांच्या हत्येला पाच वर्ष उलटली तरी खून्यांचा पत्ता नाही, नेटीझम्स मधे संताप

Thumbnail 1533410200989
Thumbnail 1533410200989

पुणे | डाॅ. नरेंन्द्र दाभोळकर यांच्या खूनाला येत्या २० आॅगस्ट रोजी पाच वर्ष पूर्ण होत आहेत. दाभोळकरांचे मारेकरी अजूनही मोकाट सुटलेले आहेत. आरोपींना पकडण्यात शासन यंत्रणा आणि पोलीस प्रशासनाला अद्याप यश आलेले नाही. या पार्श्वभुमीवर अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मिडियावर निषेध व्यक्त केला जात आहे. #WhoKilledDabholkar आणि #JawabDo हे दोन हॅशटॅग वापरुन नेटकरी सरकारला जवाब विचारत आहेत.

२० आॅगस्ट २०१३ रोजी पुण्यातील विठ्ठल रामजी पुलावर डाॅ. नरेंन्द्र दाभोळकर यांची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यानंतर गोविंद पानसरे, एम.एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश या विचारवंतांच्या एकामोगामाग एक हत्या करण्यात आल्या. यातील गौरी लंकेश यांच्या मारेकर्यांचा तपास लावण्यात कर्नाटक पोलीसांना यश आले आहे. सनातन संस्थेचा विचारवंतांच्या हत्येमागे हात असल्याचे तपासातून पुढे येत आहे. डाॅ. दाभोळकरांच्या खूनाला पाच वर्ष उलटली असतानासुद्धा त्यांच्या खून्यांचा छडा लावण्यात महाराष्ट्र पोलीसांना यश आलेले नाही. या पार्श्वभुमीवर महाराष्ट्र अंनिस कडून निषेध व्यक्त केला जात आहे. #WhoKilledDabholkar आणि #JawabDo हे हॅशटॅग वापरुन दाभोळकर यांच्या विचारांचे नेटकरी डाॅ. नरेंन्द्र दाभोळकर यांची हत्या कोणी केली या प्रश्नाचे उत्तर सरकारला विचारत आहेत.

इतर महत्वाचे लेख – 

खूशखबर! जानेवारी २०‍१९ पासून लागू होणार सातवा वेतन आयोग

Thumbnail
Thumbnail

मुंबई | राज्य शासनाच्या अधिकारी आणि कर्मचारी आदींना येत्या जानेवारी पासून सातवा वेतन आयोग देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी जाहीर केला आहे. सदरील निर्णय फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत शनिवारी घेण्यात आला.

यावेळी शासकीय कर्मचार्यांना निर्धारीत (जानेवारी २०१६) तारखेपासूनच वेतन आयोग लागू केला जाईल असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. सहाव्या वेतन आयोगात अनेक कर्मचार्यांच्या वेतनात त्रुटी असून त्यासंदर्भातील सुनावण्या घेण्याचे काम बक्षी समिती करत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

सदरील वेतन आयोग २०१७ मधील थकीत महागाई भत्यासह देण्यात येणार असून त्याकरता एकुण ४ हजार ८०० कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे.