Tuesday, December 16, 2025
Home Blog Page 6741

मुंबईतून ५० कोटीचे ड्रग्स जप्त

Thumbnail 1533402751825
Thumbnail 1533402751825

मुंबई | नवी मुंबईतील तळोजा भागात एका कंपनीवर छापे टाकल्या नंतर त्या ठिकाणी केटा माईन नावाचे ड्रग्स सापडले आहे. त्याची किंमत ५० कोटीं रुपयांच्या घरात असल्याचे बोलले जात आहे. तळोजा भागात एका कंपनी सारख्या दिसणाऱ्या इमारतीत हे ड्रग्स बनवायाचे काम सुरू होते. या प्रकरणात प्रत्यक्ष छाप्यात १० व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.
नवी मुंबई मधील हा ड्रग्सचा व्यवसाय जगभर व्यापलेला असल्याचा अंदाज तपासातील पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. तळोजा भागात काही अज्ञात लोकांच्या विशिष्ठ हालचाली सुरू असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. साध्या वेशातील पोलिसांनी गस्त घालून सदर प्रकारचा ठोकटाळा घेतला आणि अचानक छापा टाकला. त्यावेळी ५० कोटींचे ड्रग्स जप्त केले आहेत. पुढील तपास मुंबई पोलीस करत आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या –

धक्कादायक, विद्यार्थीनीवर मुख्याध्यापक, शिक्षकांनीच केला बलात्कार

ठाण्यात भरदिवसा तरुणीची धारधार चाकूने हत्या

जळगाव महापालिकेचे नवे शिलेदार

Thumbnail 1533402339929
Thumbnail 1533402339929

जळगाव | महापालिका निवडणुकांचा निकाल नुकताच जाहीर झाला असून जळगाव महापालिकेवरील सुरेश जैन यांची सलग ३५ वर्षांची सत्ता संपुष्टात आली आहे. जळगाव महापालिका निवडणकांत भाजप ला ५७ जागी दणदणीत विजय मिळाला आहे. पालिकेच्या ७५ जागांसाठी एकुण ३०३ उमेदवार उभे राहीले होते. त्यापैकी ५७ जागांवर विजय मिळवत भाजपा ने जळगावात झेंडा रोवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला जळगाव पालिकेत एकही जागा जिकता आलेली नसून एम.आय.एम. ने ३ जागा मिळवल्या आहेत.

यशस्वी उमेदवारांची नावे खालीलप्रमाणे –

प्रभाग क्रमांक ०१.
अ.प्रिया मधुकर जोहेर – भाजप-४३६८मते
ब.सरिता अनंत नेरकर – भाजप४४६७मते
क.दिलीप बबनराव पोकळे – भाजप-३९०३मते
ड.खान रुकसानाबी गलबु – भाजप-३५८२मते

प्रभाग क्रमांक ०२.
अ.कांचन विकास सोनवणे – भाजप-५९९६मते
ब.नवनाथ विश्वनाथ दारकुर – भाजप-मते४९६५
क.गायत्री उत्तम शिंदे-भाजप – ५१४०मते
ड.किशोर रमेश बाविस्कर – भाजप-६०५०मते

प्रभाग क्रमांक ०३.
अ.मीना धुडकू सपकाळे-भाजप – ६५८०मते
ब.दत्तात्रय कोळी-शिवसेना – ३६९३मते
क.रंजना भरत सपकाळे – भाजप-५६००मते
ड.प्रवीण रामदास कोल्हे – भाजप-४७९७मते

प्रभाग क्रमांक ०४.
अ.चेतन गणेश सनकत-भाजप – ६९९१मते
ब.भारती कैलास सोनवणे-भाजप – ८०२६मते
क.चेतना किशोर चौधरी-भाजप – ८६८२मते
ड.मुकुंदा भागवत सोनवणे-भाजप – ७६८६मते

प्रभाग क्रमांक ०५.
अ.विष्णू रामदास भंगाळे-शिवसेना-मते७५७९
ब.रखीबाई सोनवणे-शिवसेना- ६८९३मते
क.ज्योती शरद तायडे-शिवसेना-६५३८मते
ड.नितीन बालमुकुंद लड्डा-शिवसेना६३२८-मते

प्रभाग क्रमांक ०६.
अ.अमित पांडुरंग काळे-भाजप-५०२३मते
ब.मंगला संजय चौधरी-भाजप-५४२३मते
क.सुचिता अतुलसिंह हाडा-भाजप-५४४५मते
ड.धीरज मुरलीधर सोनवणे-भाजप-३१६७मते

प्रभाग क्रमांक ०७.
अ.सीमा सुरेश भोळे-भाजप-८०९५मते
ब.दिपमाला मनोज काळे-भाजप- ६६५२मते
क.अश्विन सोनवणे-भाजप-६१५०मते
ड.सचिन पाटील-भाजप-५७७५मते

प्रभाग क्रमांक ०८.
अ.मनोज सुरेश चौधरी-भाजप-४९२२मते
ब.लताबाई रणजित भोईटे-भाजप-५६९६मते
क.प्रतिभा सुधीर पाटील-भाजप-५७४२मते
ड.चंद्रशेखर पाटील-भाजप-५१८८मते

प्रभाग क्रमांक ०९.
अ.मयूर चंद्रकांत कापसे-भाजप-५६०२मते
ब.प्रतिभा चंद्रकांत कापसे-भाजप-५२९८मते
क.प्रतिभा गजानन देशमुख-भाजप-५३९६मते
ड.विजय पुंडलिक पाटील-भाजप-३२७५मते

प्रभाग क्रमांक १०.
अ.सुरेश माणिक सोनवणे-भाजप-५३४७मते
ब.शोभा दिनकर बारी-भाजप-५५७७मते
क.हसीनबाई शफिक शेख -भाजप-मते३७६०
ड.कुलभूषण पाटील-भाजप-४३१०मते

प्रभाग क्रमांक ११.
अ. पार्वतीबाई दामू भिल-भाजप-६००३मते
ब.-उषा संतोष पाटीलभाजप-६८२९मते
क.प्रतिभा सुधीर पाटील-भाजप-५७४२मते
ड.चंद्रशेखर पाटील-भाजप-५१८८मते

प्रभाग क्रमांक १२.
अ.नितीन मनोहर बरडे-शिवसेना-५०५४मते
ब.उज्वला मोहन बेंडाळे-भाजप-५८५९मते
क.गायत्री इंद्रजित राणे-भाजप-५०६९मते
ड.अनंत हरीश्चंद्र जोशी-शिवसेना-मते४६०७

कोयना धरण भरले, ९० टी.एम.सी पाणीसाठा

Thumbnail 1533392858872
Thumbnail 1533392858872

कोयनानगर | कोयना आणि परिसरात मुसळधार पाऊस सुरु असून गेल्या २४ तासात ३७१७ मिली मिटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे कोयना धरणातील पाणी साठ्यात लक्षणीय वाढ झाली असून एकुण पाणीसाठा ९०.८३ टी.एम.सी. झाला आहे. त्याचबरोबर माण आणि खटाव या तालुक्यांसाठी भाग्यरेशा ठरलेल्या उरमोडी धरणातील पाणीसाठ्यातही वाढ झाली असून पाणीसाठा ८६.८१ टी.एम.सी. झाला आहे.

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असला तरी कोयना भागात मागील काही तासांत जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळे जावळी खोर्यातील जनजीवण विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील कन्हेर, तारळी, चांदोली, धाम बलवडी इत्यादी धरणांतील पाणीसाठ्यातही चांगलीच वाढ झाली आहे.

ठाण्यात भरदिवसा तरुणीची धारधार चाकूने हत्या

Thumbnail 1533380571682
Thumbnail 1533380571682

ठाणे | महाविद्यालयाला निघालेल्या तरुणीची युवकाने धारधार चाकूने भरदिवसा हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार ठाणे येथे घडला आहे. या घटनेने ठाणे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यामधे प्राची झाडे (वय २२) हीचा मृत्यु झाला असून आरोपी आकाश पवार (वय २५) याला पोलीसांनी अटक केली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या –

धक्कादायक! गर्भवती महिलेवर सामुहिक बलात्कार

एकतर्फी प्रेमातून त्याने चक्क माॅडेलला ठेवले ओलीस, पोलीसांवर केला गोळीबार

हाती आलेल्या माहीतीनुसार, प्राची सकाळी काॅलेजला दुचाकीवरुन जात असताना आकाशने तिला रस्त्यात अडवले आणि तिच्यावर धारधार चाकूने हल्ला केला. सदरील घटना शुक्रवारी दुपारी १२ वाजता घडली. या हल्ल्यात प्राची रक्तबंबाळ होऊन रस्त्यात पडली असता स्थानिकांनी तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारादरन्यान तिचा मृत्यु झाला. चाकूने हल्ला करुन आकाश पवार घटना स्थळावरुन पसार झाला. परंतु पोलीसांनी त्याला शोधून काढले आणि अटक केले.

आकाश आणि प्राची मागील तीन वर्षांपासून एकमेकांना ओळखत असून त्यांच्यात प्रेमसंबंध होते असे तपासातून समोर आले आहे. परंतू गेल्या काही दिवसांत त्यांच्यात तणाव निर्मान झाला होता. याआधीही आकाशने प्राची हिस मारहान केली होती. तसेच आकाश विरोधात प्राचीने पोलीसांत तक्रारही नोदवली असल्याचे दिसत आहे. हत्येमागील नेमके कारण काय हे अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

एस.सी/एस.टी ना बढतीतही आरक्षण द्या – भारत सरकार

Thumbnail 1533378441392
Thumbnail 1533378441392

नवी दिल्ली | एस.सी/एस.टी ना नोकरीत आणि शिक्षणात जसे आरक्षण आहे त्याच प्रमाणे त्यांना पद बढतीला ही आरक्षण द्यावे अशी मागणी सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारच्या वतीने करण्यात आली आहे. एस.सी/एस.टी सामाजिक दृष्ट्या मागासलेले आहेत. त्यांच्यावर हजारो वर्षा पासून अन्याय होतो आहे. परिणामी त्यांना त्यांची प्रगती साधता आली नाही. त्यामुळे त्यांना पद बढतीत ही आरक्षण देण्यात यावे अशी मागणी केंन्द्र सरकारने न्यायालयाला दिलेल्या निवेदनात केली आहे.
भारताचे महाधिवक्ता के. के. वेणुगोपाल यांनी कलम ३३५ नुसार एस.सी/एस.टी च्या सामाजिक उन्नतीसाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे असे मत सुप्रीम कोर्टासोमोर सांगितले आहे.

कर्ज न मिळल्याने शेतकऱ्याचा बँकेत आत्महत्येचा प्रयत्न

Thumbnail 1533373000981
Thumbnail 1533373000981

औरंगाबाद | बँकने कर्ज मंजूर करण्यास नकार दिल्याने शेतकऱ्याने बँकेतच विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यातील विहा मांडवा या गावी घडली आहे. मधुकर अहिर असे आत्महत्त्येचा प्रयत्न करणार्या शेतकऱ्याचे नाव असून त्याने मांडवा गावातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेला ५० हजार रुपयांच्या कर्जाची मागणी केली होती. गेल्या वर्षी या शेतकऱ्याचे बोन्ड आळीच्या प्रादुर्भावामुळे नुसकान झाले होते. या वर्षी त्याला बँकेने कर्ज देण्यास नकार दिल्याने त्याने हा प्रकार केला आहे.
दरम्यान, ‘५० हजारांचे कर्ज मागणे हे अवास्तव होते. मागील वर्षीच्या कर्जाची रक्कम फेडण्यात हे शेतकरी अपयशी ठरले असतानासुद्धा आम्ही त्यांना आज २० हजार रुपयांचे कर्ज देणार होतो. तसेच त्यातील ४ हजार मागील वर्षीच्या कर्जाचे व्याज म्हणून कापून घेणार होतो. तरीही या शेतकऱ्याने असे पाऊल उचलले’ असे संबंधित बँक अधिकाऱ्याने सांगितले आहे. कर्जासाठी शेतकऱ्यांना बँकेच्या दारात आत्महत्येची वेळ येणे हे दैनिय गोष्ट आहे. मधुकर अहिर यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

एकतर्फी प्रेमातून तरुणीवर जीवघेणा हल्ला

Women Rape

ठाणे | कॉलेजला चाललेल्या तरुणीवर धारधार शस्त्राने जीवघेणा हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार ठाणे येथे घडला आहे. यामधे २२ वर्षीय तरुणी गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हाती आलेल्या माहीतीनुसार, निळ्या रंगाचा शर्ट परिधान केलेला एक मुलगा त्या तरुणीच्या गाडी जवळ आला. त्याने अचानक तरुणीवर वार करण्यास सुरुवात केली. तिच्या शरीरातून तीव्र वेगात रक्त बाहेर पडू लागल्याने तो बैचेन झाला. त्याने गोंधळून त्याच ठिकाणी आपला जीव देण्याचा प्रयत्न केला. परंतु लोक आजू बाजूला गोळा होऊ लागल्याने त्याने तेथून पळ काढला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणीला तेथील स्थानिक दोन मुलांनी रुग्णालयात दाखल केले. या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीची प्रकृती गंभीर असल्याचे समजत आहे.
मुलगा आणि ती तरुणी एकमेकांच्या ओळखीचे असल्याचा अंदाज प्रत्यक्षदर्शनींनी लावला आहे. सदरील घटना एकतर्फी प्रेमातून घडली असण्याची शक्यता ठाणे पोलिसांनी व्यक्त केली आहे. तरुणी ठाणे कॉलेजची विद्यार्थीनी असल्याची माहिती समोर आली आहे. ठाणे पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.

मराठा आरक्षणासाठी आणखी एक आत्महत्या

Thumbnail 1533364602878
Thumbnail 1533364602878

जेजुरी | मराठा आरक्षणासाठी मराठा तरुणांचे आत्महत्येचे सत्र सुरुच असून काल दत्तात्रय शिंदे नावाच्या युवकाने रेल्वे रुळावर आत्महत्या केली. शिदे हे पिंगोरी या पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील गावचे रहिवासी असून त्यांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली असल्याचे समोर आले आहे. शिंदे यांनी पुणे कोल्हापूर लोहमार्गावर रेल्वे खाली आपली जीवनयात्रा संपवली आहे. त्यांचे वय ३४ वर्षे होते.
दत्तात्रय शिंदेच्या मागे त्यांचा चार वर्षाचा मुलगा असून गर्भवती पत्नी आहे. आई, वडील आणि एक अविवाहित भाऊ असा परिवार आहे. शिंदे कुटुंबाला शासनाची आर्थिक मदत आणि घरातील एका व्यक्तीला सरकारी नोकरीचे लेखी आश्वासन मिळेपर्यंत गावकऱ्यांनी दत्तात्रय शिंदेचा मृतदेह घेण्यास नकार दिला. तहसीलदारांनी लेखी आश्वासन दिल्या नंतरच मृतदेह ताब्यात घेऊन रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.
दत्तात्रय शिंदे यांच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीत मराठा आरक्षणासाठी मी आत्महत्या करत आहे असे लिहले आहे. मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणे चुकीचे आहे. आपण आत्महत्येचा पर्याय निवडू नका असे आवाहन मराठा समाजाच्या अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी केले आहे.

महापालिकेने कर्मचार्यांना ठेवले बांधून, काम न करणार्यांना धडा शिकवण्यासाठी तंत्रज्ञानाचा असाही उपयोग

Thumbnail 1533364462484
Thumbnail 1533364462484

सोलापूर | महानगरपालिकेचे कामगार कामावरती येतात आणि खाजगी कामासाठी बाहेर निघून जातात. त्यामुळे सोलापुरातील नागरिकांनी वरिष्ठांकडे अनेकदा तक्रारी केल्या आहेत. एखादा कर्मचारी त्याच्या जागी नसेल तर त्याबद्दल विचारणा केल्यास तो मिटिंगला गेला असल्याची बतावणी करण्यात येते. इतकंच काय तर पाणी पुरवठ्याचे कामगार ही पाणी सोडण्याच्या वेळी कामाच्या ठिकाणी नसतात. यावर उपाय म्हणून पालिका प्रशासनाने कामगारांच्या हातात जीपीएस लोकेशनचे घड्याळ बांधून त्यांना कामाच्या जागेवर बांधून ठेवले आहे.
तंत्रज्ञानाचा असाही वापर केला जाऊ शकतो हेच या प्रकारातून उघड होते. या प्रक्रियेत कोणता कामगार कोठे आहे हे संगणकाच्या एका क्लिक वर समजणार आहे. ज्यातून कामगारांवर मोठा धाक बसणार आहे. जीपीएस घड्याळांच्या निर्णयाचे जनसमन्यातून स्वागत केले जाते आहे.

कॅटरीना आणि सलमान ‘भारत” चित्रपटात दिसणार एकत्र

Thumbnail 1533303182939
Thumbnail 1533303182939

मुंबई | बाॅलिवुड अभिनेत्री (Bollywood actress) कॅटरीना कैफ आणि अभिनेता सलमान खान आगामी ‘भारत’ या चित्रपटामधे एकत्र दिसणार आहेत. प्रियांका चोप्राने भारत मधून काही कारणांमुळे माघार घेतल्याने आता तिच्या जागी कोण भुमिका करणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. आता त्या रोल साठी कॅटरिनाचे नाव फायनल झाले असून सलमान आणि कॅटरिना भारत च्या निमित्ताने पुन्हा रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.

मागे सलमान खान ने फेसबुकवर कॅटरीनाचा उल्लेख सुशील कन्या असा केला होता. आता कॅटरीना ने भारत ची आॅफर कसलाही इगो मनात न बाळगता लगेच स्विकारल्याने सल्लु आणि कॅट यांच्या नात्याबद्दल त्यांच्या चाहत्यांमधे वेगवेगळ्या चर्चांना उधान आले आहे. यापार्श्वभूमीवर ‘अली आब्बास जफर’ माझे चांगले मित्र आहेत, त्यांचे यापूर्वीचे ‘मेरे ब्रदर की दुल्हन’ आणि ‘टायगर जिंदा है’ हे चित्रपट चांगलेच गाजले आहेत. त्यामुळेच मी भारत साठी होकार दर्शवला आहे असे कॅटरीना कैफ ने म्हटले आहे.