सांगली | भाजपाने कॉग्रेस आघाडीला घाम फोडल्याचे चित्र सांगली महानगरपालिका निवडणुकीतून दिसून येत आहे. सांगली पालिका निवडणुकीत भाजपाने अनपेक्षित पणे मुसंडी घेतली आहे. नुकत्याच हाती आलेल्या माहीतीनुसार भाजप ४० जागी तर कॉग्रेस आघाडी २० जागी आघाडीवर आहे. तर इतर २ जागी अपक्ष आघाडी वर आहे.
वसंतदादांची सांगली अशी सांगलीची ओळख असताना सांगली आता भाजपमय झाल्याचे बघून बऱ्याच जणांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. सकाळी निकालाचे कल आले तेव्हा कॉग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी पुढे चालत होती. परंतु आता दुपार नंतर भाजप पुढे चालल्याने बरेच लोक आवाक झाले आहेत. भाजपने बाहेरील पक्षातून उमेदवार आयात करून ही निवडणूक लढवली आहे. त्यामुळे भाजप अशा आश्चर्यकारक विजया पर्यंत पोहचले असल्याचे सामान्यातून बोलले जात आहे.
सांगलीत भाजपाची अनपेक्षित मुसंडी
श्रीकर परदेशींची पीएमओच्या उपसचिव पदी बढती
नवी दिल्ली | कर्तव्य कठोर अधिकारी म्हणून ओळख असलेले श्रीकर परदेशी यांची आज पीएमओच्या उप-सचिव पदी बढती झाली आहे. श्रीकर परदेशी २०१५ पासून पीएमओच्या संचालक पदावर काम पहात होते. परदेशी यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवत राष्ट्रीय राजधानीच्या प्रशासनात बढती मिळवली होती. त्यांच्या कार्य कौशल्याची दखल घेऊन त्यांना पीएमओच्या उपसचिव पदी बढती देण्यात आली आहे.
श्रीकर परदेशी हे पुण्याच्या बी.जे. मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी असून त्यांनी त्या ठिकाणी एमबीबीएसचे शिक्षण घेतले आहे. परदेशी हे २००१ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून त्यांचे महाराष्ट्र केडर होते. लातूरचे जिल्हाधिकारी, पिंपरी चिंचवडचे महानगरपालिका आयुक्त म्हणून त्यांनी जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. पिंपरी चिंचवडचे आयुक्त म्हणून काम करताना त्यांनी अनधिकृत बांधकामावर केलेली कठोर कार्यवाही विशेष गाजली. त्यासाठी त्यांना धमक्या ही आल्या होत्य. परंतु परदेशी आपल्या निर्णयावर कायम राहिले. जनसामान्यांना कधीही उपलब्ध असणारे अधिकारी आणि कॉफी मुक्त अभियान राबणारे जिल्हाधिकारी म्हणून ते महाराष्ट्रात प्रसिद्ध होते.
जळगाव महानगरपालिका निवडणूक, शिवसेनेला लागला विजयतिलक
जळगाव | शिवसेनेचा बालेकिल्ला होऊ घातलेल्या जळगाव महानगर पालिकेच्या निवडणुकीचा प्रभाग क्रमांक एकचा निकाल हाती आला आहे. या प्रभागातील सर्व म्हणजे तिन्ही जागी शिवसेना विजयी झाली आहे. प्रभाग एक मध्ये जिजाबाई भापके, लता सोनवणे, विक्रम सोनवणे यांचा विजय झाला आहे. चोपडा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या पत्नी लता सोनवणे या प्रभाग एक मधून विजयी झाल्या आहेत.
जळगाव महानगरपालिका मतमोजणी मध्ये शिवसेना ३१ जागी तर भाजप २३ जागी आघाडीवर आहे. सुरेशदादा जैन यांच्या अस्तित्वाची निवडणूक म्हणूज जळगाव महानगर पालिकेच्या निवडणुकीकडे पाहिले जात होते. सध्या तरी भाजप आघाडीवर आहे पण निकाल काय लागतो या कडे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सांगलीत कॉग्रेस आघाडी तर जळगावात भाजपा आघाडीवर.
सांगली/जळगाव | मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या निवडणुका भाजप जिंकेल का असा सवाल सर्वत्र विचारला जात होता या प्रश्नाचे उत्तर आज मिळणार आहे. निवडणुकांचे कल हाती येऊ लागले असून सांगलीत भाजपा ०७ तर कॉग्रेस/राष्ट्रवादी ०८ जागी आणि १ अपक्ष आघाडीवर आहेत.तर तिकडे जळगावात भाजप ०४, शिवसेना ०२ जागी आघाडीवर आहे.
सांगली कॉग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. भाजपने सांगली शहराचे घर नी घर पिंजून काढत आघाडीला जोरदार लढत दिली आहे. तर तिकडे सुरेश जैन यांच्या वर्चस्वाला भाजपाने धक्का देण्यासाठी कंबर कसली होती त्याचे फळ आज मिळताना दिसत आहे. सांगलीच्या ७८ जागांचे निकाल दुपारी २ वाजे पर्यंत लागतील असे मतमोजणी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तर जळगावची मतमोजणी धीम्या गतीने सुरू असल्याचे समोर येत आहे.
अॅट्रॉसिटी कायद्याबाबत तत्परता दाखवता मग मराठा आरक्षणासाठी का नाही ? – छत्रपती उदयनराजे भोसले
पुणे | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी सरकारवर टिकास्त्र सोडले आहे. अॅट्रॉसिटी कायद्याच्या बाबतीत सरकार तत्परता दाखवते मग मराठा आरक्षणासाठी तत्परता का नाही दाखवत असा सवाल भोसले यांनी केला आहे. पुणे येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
उदयनराजेंच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे.
– सरकार मराठा मुद्दा हाताळताना अपयशी ठरले आहे. आंदोलन हिंसक होण्यास सरकारच जबाबदार आहे.
– मराठा आंदोलनातील मृतांना चार लाखाची मदत आणि घरातील एका व्यक्तीला नोकरी मिळण्याचे आश्वासन सरकार देते आहे याचा अर्थ मराठ्यांनी नोकऱ्या मिळवण्यासाठी आत्महत्या करायच्या का?
– मुक मोर्चे सरकारने गांभीर्याने न घेतल्यानेच आंदोलनाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
– २५ वर्षे मराठा आरक्षणाचा प्रश्न लोंबकळत ठेवला आहे म्हणून तेव्हा पासून आज पर्यंतचे राज्यकर्ते दोषी आहेत.
– सरकार अॅट्रॉसिटी कायद्याच्या बाबतीत तत्पर आहे मग मराठा आरक्षणासाठी का नाही?
मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न आणखी तीन महिने असाच रखडून राहण्याची शक्यता उदयनराजेंनी बोलून दाखवली. मराठा समाज मला नेतृत्व करा म्हणतो आहे म्हणून आम्ही मराठा आरक्षण परिषद स्थापन करून पुढील रणनीती आखणार आहे असल्याचे यावेली उदयनराजे भोसले यांनी सांगितले.
‘पुष्पक विमान’ आज होणार प्रदर्शित
मुंबई | आजोबा आणि नातवाच्या नात्यावर आधारित असलेला पुष्पक विमान चित्रपट आज प्रदर्शित होतो आहे. मोहन जोशी आजोबाच्या तर सुबोध भावे नातवाच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. आजोबा नातवाच्या भेटी साठी कसे कासावीस होतात..रोज एसटी स्टँडवर जाऊन मुंबईवरून आलेल्या एसटी बसमध्ये नातू आलाय का हे बघायला जातात..मग नातू आजोबाला घेऊन मुंबईला जातो तिथं त्यांचे गावठी स्वरूप आणि त्यातून नातवाला करावी लागणारी दोरी वरील कसरत अशा दृश्यांनी चित्रपट तयार झाला आहे.
नातू लहान असताना आजोबाला प्रश्न विचारतो “आजोबा नातू म्हणजे काय रे?” या प्रश्नावर दिलेले उत्तर काळजाला हात घालून जाणारे आहे. नातू म्हणजे आजोबाचा शेवटचा मित्र आणि आजोबा म्हणजे नातवाचा पहिला मित्र. नात्यांचा बंध उलघडणारा असा हा पुष्पक विमान चित्रपट अद्वितीयच आहे.
धडक चित्रपटाने गाठली १०० कोटींची मजल
मुंबई | सैराट चित्रपटावर आधारित असलेला धडक चित्रपट १०० कोटीच्या कमाई पर्यंत जाऊन पोचला आहे. धडक हा जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर या दोघांचा पहिलाच चित्रपट होता. त्या दोघांच्याही अभिनयात तितकीशी ताकद नव्हती असे चित्रपट समीक्षकांनी म्हणले आहे. तरीही देश भर प्रदर्शित झाल्याने शंभर कोटींचा टप्पा गाठण्यात धडक यशस्वी झाला आहे. परंतु ज्या प्रमाणात चित्रपटावर खर्च केला त्या तुलनेत चित्रपटाची कमाई नगण्य आहे.
धडक चित्रपटात दाखण्यात आलेली कथा सैराटच्या प्रसिद्धीने एक प्रकारे लीक झाली होती. याचाही परिणाम कमाईवर झाला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन चांगले असले तरी ७० कोटी खर्चा समोर १०० कोटींची कमाई खूपच कमी आहे.
छिंदम आला आणि सभा झाली तहकूब
अहमदनगर | छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अवमान जनक वक्तव्य करणारा अहमदनगर महानगरपालिकेचा उपमहापौर श्रीपाद छिंदम आज महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आला होता. सभागृतात छिंदम येताच त्याच्या विरोधात सभागृतात जोरदार घोषणाबाजी झाली आणि त्यानंतर गदारोळ माजल्याने सभा तहकूब करण्यात आली.
छिंदम महानगरपालिकेत येणार म्हणून पालिकेच्या आवारात तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. श्रीपाल छिंदम याने १६ फेब्रुवारी २०१८ रोजी पालिका कर्मचारी अशोक बिडवे यांना फोनवरून शिवरायांच्या बद्दल अवमानकार वक्तव्य केले होते. यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर छिंदम याला अटक करण्यात आली होती आणि ९ मार्च रोजी त्याला न्यायालयाने जामीन दिला होता. त्यानंतर श्रीपाल छिंदम आजच सभागृहात उपस्थित राहिला होता.
कर्नाटक राज्यात उभी फूट, उत्तर कर्नाटक या वेगळ्या राज्याच्या मागणीला जोर
बेंगलोर | कर्नाटकातील १३ जिल्ह्यांनी वेगळ्या राज्याची मागणी केली आहे. या मागणी साठी आज १३ जिल्हे बंद ठेवण्यात आले होते. वेगवेगळ्या घडामोडींनी सारखेच प्रकाश झोतात असलेल्या कर्नाटक राज्यात ह्या बातमीची खळबळ माजली आहे.
माझ्या आणि माझ्या मुलाच्या हायातीत राज्याचे दोन तुकडे कदापी होऊ देणार नाही. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येदियुरप्पा लोकांमध्ये दुही पसरवून सरकारला अडथळा करत आहेत असे माजी पंतप्रधान एचडी देवेगौड़ा यांनी म्हणले आहे. कर्नाटकच्या राजकारणात सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपा कडूनच अशा कुरघोड्या केल्या जात आहेत. कारण त्यांना मोठा पक्ष असून सत्ता भोगण्यास मिळाली नाही याचे दुःख आहे असे राजकिय वर्तुळात बोलले जाते आहे.
मनसेचे पुन्हा ‘खळखट्याक’, मल्टी फ्लेक्स थेटरची केली तोड फोड
कल्याण | १ ऑगस्ट पासून मल्टी फ्लेक्स थेटरने खाद्य पदार्थाचे दर कमी करण्याची घोषणा विधानसभेत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केली होती. परंतु १ तारखे पासून दर जसेच्या तसेच असल्याने संतप्त झालेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज कल्याण मध्ये एका मल्टी फ्लेक्स थेटरला लक्ष केले. या थेटरमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी घुसून खिडकीच्या काचा खाद्य पदार्थांचे काऊंटर फोडले असून मल्टी फ्लेक्सचे दर कमी केले नाही तर हे आंदोलन राज्य भर केले जाईल असे संबंधित कार्यकर्त्यांनी सांगितले आहे.
गेल्या महिन्यात मनसेने हा विषय उचलून धरला होता. पुणे, मुंबई, नागपूर या राज्यातील प्रमुख शहरात मनसेने आंदोलन केले होते. हा मुद्दा विधान सभेत दाखल झाल्यावर शहरी आमदारांनी या विषयावर वादळी चर्चा केल्या नंतर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मल्टी फ्लेक्स थेटरला दर कमी करण्यासाठी आदेश देण्यात आले होते. तर आम्हाला आशा प्रकारचा कोणताच जी आर आला नाही असा दावा थेटर मालकांनी केला आहे. या विषयात सरकारने विधान सभेत घोषणा केल्याने विषयाचे गांभीर्य अधिक आहे त्यामुळे या विषयात सरकारने हस्तक्षेप करण्याची गरज आहे.










